01-06-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही सर्व आपसामध्ये रूहानी भाऊ-भाऊ आहात, तुमचे रूहानी प्रेम असले पाहिजे, आत्म्याचे प्रेम आत्म्यासोबत असावे, शरीरासोबत नाही”

प्रश्न:-
बाबांनी आपल्या घरा विषयी अशी कोणती वंडरफुल गोष्ट सांगितली आहे?

उत्तर:-
जे पण आत्मे माझ्या घरामध्ये येतात, ते आपल्या-आपल्या सेक्शनमध्ये आपल्या नंबरवर फिक्स राहतात. ते कधीही हलत-डुलत नाहीत. तिथे सर्व धर्मांचे आत्मे माझ्याजवळ राहतात. तिथून नंबरवार आपल्या-आपल्या वेळेवर पार्ट बजावण्यासाठी येतात, हे वंडरफुल नॉलेज याचवेळी कल्पामध्ये एकदाच तुम्हाला मिळते. दुसरे कोणीही हे नॉलेज देऊ शकत नाही.

ओम शांती।
बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत. मुले जाणतात आम्हा आत्म्यांना बाबा समजावून सांगत आहेत आणि बाबा, स्वतःला आत्म्यांचे पिता समजतात. असे कोणीही स्वतःला समजत नाही आणि ना कधी कोणी असे समजावून सांगत की, ‘स्वतःला आत्मा समजा’. हे बाबाच बसून आत्म्यांना समजावून सांगतात. या ज्ञानाचे प्रारब्ध तुम्ही नवीन दुनियेमध्ये घेणार आहात नंबरवार पुरुषार्थनुसार. हे देखील काही सर्वांच्याच आठवणीत राहत नाही की, ही दुनिया बदलणार आहे, बदलणारे बाबा आहेत. इथे तर सन्मुख बसले आहात, जेव्हा घरी जाता तेव्हा पूर्ण दिवस आपला कामधंदा इत्यादीमध्ये व्यस्त राहता. बाबांचे श्रीमत आहे - ‘मुलांनो, कुठेही राहत असाल तरी तुम्ही माझी आठवण करा.’ जशी कन्या असते तर ती जाणत नसते की आपल्याला कोणता पती मिळणार आहे, फोटो बघताच आठवण पक्की होते. कुठेही राहिले तरी दोघेही एकमेकांची आठवण करतात, याला म्हटले जाते शारीरिक प्रेम. हे आहे रूहानी प्रेम. रुहानी प्रेम कोणासोबत? मुलांचे, रूहानी बाबांसोबत आणि मुलांचे, मुलांसोबत. तुम्हा मुलांचे आपसामध्ये देखील खूप प्रेम असले पाहिजे, म्हणजेच आत्म्यांचे आत्म्यांसोबत देखील प्रेम असले पाहिजे. ही शिकवण देखील आता तुम्हा मुलांना मिळते. दुनियेतील लोकांना काहीच माहिती नाहीये. तुम्ही सर्व भाऊ-भाऊ आहात तर आपसामध्ये जरूर प्रेम असले पाहिजे कारण एका पित्याची मुले आहात ना. याला म्हटले जाते रुहानी प्रेम. ड्रामाप्लॅन अनुसार फक्त पुरुषोत्तम संगम युगावरच रूहानी बाबा येऊन रुहानी मुलांना सन्मुख समजावून सांगतात. आणि मुले जाणतात की बाबा इथे आले आहेत. आम्हा मुलांना गुलगुल, पवित्र, पतिता पासून पावन बनवून सोबत घेऊन जातील. असे नाही की कोणी हाताला पकडून घेऊन जातात. सर्व आत्मे असे उडतील जसा पक्षांचा थवा जातो. त्यांचा देखील कोणी गाईड असतो. गाईड सोबत आणखीही गाईड्स असतात जे फ्रंटला राहतात. पूर्ण थवा जेव्हा एकत्र जातो तेव्हा खूप आवाज होतो. सूर्याच्या प्रकाशाला देखील झाकून टाकतात, इतका मोठा थवा असतो. तुम्हा आत्म्यांचा देखील किती मोठा अगणित थवा आहे. कधीही मोजू शकणार नाही. इथे मनुष्यांची देखील मोजणी करू शकत नाही. भले जनगणना करतात, ती देखील ॲक्युरेट करत नाहीत. आत्मे किती आहेत, तो हिशोब कधीच काढू शकत नाहीत. अंदाज लावला जातो की सतयुगामध्ये किती मनुष्य असतील कारण फक्त भारतच शिल्लक राहतो. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की, आम्ही विश्वाचे मालक बनत आहोत. आत्मा जेव्हा शरीरामध्ये असते तेव्हा ती जीवात्मा असते, त्यामुळे दोघे एकत्र सुख आणि दुःख भोगतात. खूप लोक असे समजतात की, आत्माच परमात्मा आहे, ती कधीच दुःख भोगत नाही, निर्लेप आहे. बरीच मुले या गोष्टीमध्ये देखील गोंधळून जातात की आपण स्वतःला आत्मा निश्चय तर करु, परंतु बाबांची आठवण कुठे करायची? हे तर जाणता बाबा परमधाम निवासी आहेत. बाबांनी आपला परिचय तर दिलेला आहे. कुठेहि चालता-फिरता बाबांची आठवण करा. बाबा राहतात परमधाममध्ये. तुमची आत्मा देखील तिथे राहणारी आहे आणि मग इथे पार्ट बजावण्यासाठी येते. हे ज्ञान देखील आत्ता मिळाले आहे.

जेव्हा तुम्ही देवता असता तिथे तुम्हाला या गोष्टीची आठवण राहत नाही कि अमक्या-अमक्या धर्माचे आत्मे वरती आहेत. वरून येऊन इथे शरीर धारण करून पार्ट बजावतात, हे चिंतन तिथे चालत नाही. आधी हे माहीत नव्हते की बाबा देखील परमधाममध्ये राहतात, तिथून इथे येऊन शरीरामध्ये प्रवेश करतात. आता ते कोणत्या शरीरामध्ये प्रवेश करतात, तो आपला पत्ता तर सांगतात. तुम्ही जर लिहिले की, ‘शिवबाबा केअर ऑफ परमधाम’, मग परमधाममध्ये तर चिट्ठी जाऊ शकत नाही यासाठी लिहिता की, ‘शिवबाबा केअर ऑफ ब्रह्मा’, आणि मग इथला पत्ता घालता कारण तुम्ही जाणता बाबा इथेच येतात, या रथामध्ये प्रवेश करतात. तसेतर आत्मे देखील वर (परमधाममध्ये) राहणारे आहेत. तुम्ही भाऊ-भाऊ आहात. नेहमी असे समजा कि हा आत्मा आहे, यांचे नाव अमके आहे. आत्म्याला इथे बघतात परंतु मनुष्य देह-अभिमानामध्ये येतात. बाबा देही-अभिमानी बनवतात. बाबा म्हणतात - तुम्ही स्वतःला आत्मा समजा आणि मग माझी आठवण करा. यावेळीच बाबा समजावून सांगतात - ‘आता मी इथे आलो आहे, येऊन मुलांना ज्ञान देखील देतो. जुने शरीर घेतले आहे, ज्यामध्ये मुख्य हे मुख आहे, डोळे देखील आहेत, ज्ञान अमृत मुखाद्वारे मिळते’. गौमुख म्हणतात ना अर्थात मातेचे हे मुख आहे. मोठ्या मातेद्वारे तुम्हाला दत्तक घेतात. कोण? शिवबाबा. ते इथे आहेत ना. हे सर्व ज्ञान बुद्धीमध्ये राहिले पाहिजे. मी तुम्हाला प्रजापिता ब्रह्माद्वारे ॲडॉप्ट करतो. तर ही, माता देखील झाली. गायले देखील जाते - ‘तुम माता-पिता हम बालक तेरे…’. तर ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत. त्यांना माता म्हणणार नाही. ते तर बाबाच आहेत. बाबांकडून वारसा मिळतो नंतर मग माता पाहिजे. ते इथे येतात. आता तुम्हाला माहिती झाले आहे, बाबा वर (परमधाममध्ये) राहतात. आपण आत्मे देखील वर राहतो. मग इथे येतो पार्ट बजावण्यासाठी. दुनियेला या गोष्टीं विषयी काहीच माहिती नाहीये. ते तर परमात्मा दगड-धोंड्यामध्ये आहे असे म्हणतात, मग तर अगणित होतील. याला म्हटले जाते घोर अंध:कार. गायन देखील आहे - ‘ज्ञानसूर्य प्रगटा, अज्ञान अंधेर विनाश’. यावेळी तुम्हाला ज्ञान आहे - हे आहे रावण राज्य, ज्यामुळे अंध:कार आहे. तिथे तर रावण राज्य असत नाही म्हणून कोणताही विकार नाही. देह-अभिमान देखील नाही. तिथे आत्म-अभिमानी असतात. आत्म्याला ज्ञान आहे - आता छोटे बाळ आहोत, आता आपण तरुण आहोत, आता शरीर वृद्ध झाले आहे म्हणून हे शरीर सोडून दुसरे घ्यायचे आहे. तिथे असे म्हणत नाहीत कि अमका मरण पावला. तो तर आहेच अमर लोक. आनंदाने एक शरीर सोडून दुसरे घेतात. आता आयुष्य पूर्ण झाले, हे सोडून नवीन घ्यायचे आहे म्हणून संन्यासी लोक सापाचे उदाहरण देतात. उदाहरण खरेतर बाबांनी दिले आहे. त्याचे मग संन्यासी लोक अनुकरण करतात. म्हणूनच बाबा म्हणतात, हे जे ज्ञान मी तुम्हाला देतो, ते प्राय: लोप होते. बाबांचे शब्द देखील आहेत, तर चित्र देखील आहे परंतु जसे की पिठात मीठ. तर बाबा बसून अर्थ समजावून सांगतात - जसे साप जुनी कात सोडून देतो आणि नवीन कात येते. त्यांच्यासाठी असे म्हणणार नाही की, एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतात. नाही. कात बदलण्याचे एक सापाचेच उदाहरण आहे. त्याची ती कात दिसते देखील. जसा शरीरावरून कपडा काढला जातो तसे सर्प देखील कात सोडतो, दुसरी मिळते. साप तर जिवंतच राहतो, असे देखील नाही की कायम अमर राहतो. दोन-तीनवेळा कात बदलून मग मरून जातात. तिथे देखील तुम्ही वेळेवर एक शरीर सोडून दुसरे घेता. हे जाणता कि, आता मला गर्भामध्ये जायचे आहे. तिथे तर आहेच योगबळाची गोष्ट. योगबळाने तुम्ही जन्म घेता, म्हणून अमर म्हटले जाते. आत्मा म्हणते आता मी वृद्ध झालो आहे, शरीर जुने झाले आहे. साक्षात्कार होतो. आता मी जाऊन छोटे बाळ बनणार. सहजच आत्मा शरीर सोडून धावत जाऊन छोट्या बाळामध्ये प्रवेश करते. त्या गर्भाला जेल नाही, महाल म्हटले जाते. पाप तर काही होतच नाही जे भोगावे लागेल. गर्भ महालामध्ये आरामात राहतात, दुःखाची कोणती गोष्ट नाही. ना अशी कोणती घाणेरडी वस्तू खाऊ घालत ज्यामुळे आजारी पडतील.

आता बाबा म्हणतात - मुलांनो, तुम्हाला निर्वाणधाममध्ये जायचे आहे, ही दुनिया बदलणार आहे. जुन्या पासून परत नवीन होणार. प्रत्येक गोष्ट बदलते. झाडातून बीज निघते, पुन्हा बीज लावाल तर किती फळ मिळते. एका बिजा पासून किती बियाणे निघते. सतयुगामध्ये एकच मुलगा जन्माला येतो - योगबलाने. इथे विकारातून ४-५ मुले जन्माला घालतात. सतयुग आणि कलयुगामध्ये बरेच अंतर आहे जे बाबा सांगतात. नवीन दुनिया पुन्हा जुनी कशी होते, त्यामध्ये आत्मा कसे ८४ जन्म घेते - हे देखील समजावून सांगितले आहे. प्रत्येक आत्मा आपापला पार्ट बजावून जेव्हा परत जाईल तेव्हा आपापल्या जागेवर जाऊन उभी राहील. जागा बदलत नाही. आपापल्या धर्मामध्ये आपल्या जागेवर क्रमवारीने उभे राहतील, मग नंबरवार खाली यायचे आहे म्हणून मूलवतनची छोटी-छोटी मॉडेल्स बनवून ठेवतात. सर्व धर्मांचा आपला-आपला सेक्शन आहे. देवी-देवता आहे पहिला धर्म, मग क्रमवार येतात. नंबरवारच जाऊन राहतील. तुम्ही देखील नंबरवार पास होता, आणि केलेल्या मार्कांप्रमाणे जागा घेता. हे बाबांचे शिक्षण कल्पामध्ये एकदाच होते. तुम्हा आत्म्यांचा किती छोटा (सिजरा) वंश वृक्ष असेल. जसे तुमचे इतके मोठे झाड आहे. तुम्ही मुलांनी दिव्यदृष्टीने पाहून मग इथे बसून चित्र इत्यादी बनविली आहेत. आत्मा किती छोटी आहे, शरीर किती मोठे आहे. सर्व आत्मे तिथे जाऊन बसतील. खूप थोड्या जागेमध्ये अगदी जवळ जाऊन राहतात. मनुष्यांचे झाड किती मोठे आहे. मनुष्यांना तर जागा पाहिजे ना - चालण्यासाठी, फिरण्यासाठी, खेळण्यासाठी, शिकण्यासाठी, नोकरी करण्यासाठी. सर्व काही करण्यासाठी जागा पाहिजे निराकारी दुनियेमध्ये आत्म्यांची छोटीशी जागा असेल म्हणून या चित्रांमध्ये सुद्धा दाखविले आहे. पूर्वनियोजित नाटक आहे, शरीर सोडून आत्म्यांना तिथे जायचे आहे. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की आपण तिथे कसे राहतो आणि दुसरे धर्मवाले कसे राहतात. मग कसे क्रमवारीने वेग-वेगळे होतो. या सर्व गोष्टी तुम्हाला कल्प-कल्प एकदाच बाबा येऊन ऐकवतात. बाकी तर सर्व आहे भौतिक शिक्षण. त्याला आत्मिक शिक्षण म्हणू शकत नाही.

आता तुम्ही जाणता आपण आत्मा आहोत. ‘आय’ म्हणजे - आत्मा, ‘माय’ म्हणजे - माझे शरीर आहे. मनुष्य हे जाणत नाहीत. त्यांचा तर सदैव दैहिक संबंध असतो. सतयुगामध्ये देखील दैहिक संबंध असणार. परंतु तिथे तुम्ही आत्म-अभिमानी असता. हे माहिती होते की मी आत्मा आहे, हे माझे शरीर आता वृद्ध झाले आहे, म्हणून मी आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेतो. यात गोंधळून जाण्याचे काहीच कारण नाही. तुम्हा मुलांना तर बाबांकडून राजाई घ्यायची आहे. जरूर बेहदचे बाबा आहेत ना. मनुष्य जोपर्यंत ज्ञानाला पूर्ण समजत नाहीत तोपर्यंत अनेक प्रश्न विचारतात. ज्ञान आहे तुम्हा ब्राह्मणांना. तुम्हा ब्राह्मणाचे मंदिर देखील खरेतर अजमेरमध्ये आहे. एक असतात - पुष्करणी ब्राह्मण, दुसरे आहेत - सार सिद्ध. अजमेरमध्ये ब्रह्माचे मंदिर बघण्यासाठी जातात. ब्रह्मा बसले आहेत, दाढी इत्यादी दाखविली आहे. त्यांना मनुष्याच्या रूपामध्ये दाखविले आहे. तुम्ही ब्राह्मण देखील मनुष्याच्या रूपामध्ये आहात. ब्राह्मणांना देवता म्हटले जात नाही. सच्चे-सच्चे ब्राह्मण तुम्ही आहात - ब्रह्माची संतान. ते काही ब्रह्माची संतान नाहीत, नंतर मागाहून येणाऱ्यांना हे माहित नसते. तुमचे हे विराट रूप आहे. याची बुद्धीमध्ये आठवण राहिली पाहिजे. हे सर्व नॉलेज आहे जे तुम्ही कोणालाही चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकता. आपण आत्मा आहोत, बाबांची मुले आहोत, हे यथार्थरित्या जाणून, हा निश्चय अगदी पक्का झाला पाहिजे. ही गोष्ट तर योग्यच आहे की, सर्व आत्म्यांचे पिता एक परमात्मा आहेत. सर्वजण त्यांची आठवण करतात. ‘हे भगवान’, मनुष्याच्या मुखातून जरूर निघते. परमात्मा कोण आहेत - हे कोणीही जाणत नाहीत, जोपर्यंत बाबा येऊन समजावून सांगतील. बाबांनी समजावून सांगितले आहे की, हे लक्ष्मी-नारायण जे विश्वाचे मालक होते, तेच जर जाणत नाहीत तर मग ऋषी-मुनी तरी कसे काय जाणू शकणार! आता तुम्ही बाबांद्वारे जाणले आहे. तुम्ही आहात आस्तिक, कारण तुम्ही रचयिता आणि रचनेच्या आदि, मध्य, अंताला जाणता. कोणी चांगल्या रीतीने जाणतात, कोणी कमी. बाबा सन्मुख येऊन शिकवतात मग कोणी चांगल्या रीतीने धारण करतात, कोणी कमी धारण करतात. शिक्षण एकदम सोपे आहे, श्रेष्ठ देखील आहे. बाबांमध्ये इतके ज्ञान आहे जे सागराला शाई बनवा तरी देखील अंत मिळू शकणार नाही. बाबा सोपे करून समजावून सांगतात. बाबांना जाणायचे आहे, स्वदर्शन चक्रधारी बनायचे आहे. बस्स! अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
जसे रुहानी बाबांचे आत्म्यावर प्रेम आहे, तसे आपसामध्ये देखील रुहानी प्रेमाने रहायचे आहे. आत्म्याचे आत्म्यावर प्रेम असावे, शरीरावर नाही. आत्म-अभिमानी बनण्याचा सखोलपणे अभ्यास करायचा आहे.

वरदान:-
हदच्या इच्छांपासून मुक्त राहून सर्व प्रश्नांपासून दूर राहणारे सदा प्रसन्नचित्त भव

जी मुले हदच्या इच्छांपासून मुक्त राहतात त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेची झलक दिसून येते. ‘प्रसन्नचित्त’ कोणत्याही गोष्टीमध्ये ‘प्रश्नचित्त’ होत नाहीत. ते सदैव निःस्वार्थी आणि सर्वांना सदैव निर्दोष असल्याचे अनुभव करतील, ते इतर कोणालाही दोष देणार नाहीत. भले कोणतीही परिस्थिती येऊ देत, नाहीतर कोणतीही आत्मा हिशोब चुकता करणारी सामना करण्यासाठी येऊ देत, नाहीतर शरीराचा कर्मभोग सामना करण्यासाठी येऊ देत परंतु संतुष्टतेमुळे ते कायम प्रसन्नचित्त राहतील.

बोधवाक्य:-
व्यर्थचे चेकिंग अटेन्शनने (लक्ष देऊन) करा, निष्काळजीपणाने नाही.