01-07-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - शांतीधाम पावन आत्म्यांचे घर आहे, त्या घरामध्ये यायचे असेल तर संपूर्ण पावन बना”

प्रश्न:-
बाबा सर्व मुलांना कोणती गॅरंटी देतात?

उत्तर:-
गोड मुलांनो, तुम्ही माझी आठवण करा तर मी गॅरंटी करतो की तुम्ही शिक्षा न भोगता माझ्या घरी याल. तुम्ही एका बाबांमध्ये मन गुंतवा, या जुन्या दुनियेला बघत असताना सुद्धा बघू नका, या दुनियेमध्ये राहून पवित्र बनून दाखवा, तर बाबा तुम्हाला विश्वाची बादशाही अवश्य देतील.

ओम शांती।
रूहानी मुलांना रूहानी बाबा विचारत आहेत, हे तर मुले जाणतात बाबा आले आहेत आम्हा मुलांना आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी, तर आता घरी जायची इच्छा होते का? ते आहे सर्व आत्म्यांचे घर. इथे सर्व जीव आत्म्यांचे एक घर नाही आहे. हे तर समजता की, बाबा आलेले आहेत. बाबांना निमंत्रण देऊन बोलावले आहे. आम्हाला घरी अर्थात शांतीधामाला घेऊन जा. आता बाबा म्हणतात आपल्या मनाला विचारा - हे आत्म्यांनो, तुम्ही पतित कसे येऊ शकाल? पावन तर जरूर बनायचे आहे. आता घरी जायचे आहे, बाकी अजून काही सांगत तर नाहीत. भक्तिमार्गामध्ये तुम्ही इतका वेळ पुरुषार्थ केला आहे, कशासाठी? मुक्तीसाठी. तर आता बाबा विचारत आहेत - ‘घरी जाण्याचा विचार आहे का?’ मुले म्हणतात - ‘बाबा, यासाठीच तर एवढी भक्ती केली’. हे देखील जाणता जे काही जीव आत्मे आहेत, सर्वांना घेऊन जायचे आहे. परंतु पवित्र बनून घरी जायचे आहे आणि मग सर्वात पहिले पवित्र आत्मेच येतील. अपवित्र आत्मे तर घरात राहू शकत नाहीत. आता जे काही करोडोंनी आत्मे आहेत, सर्वांना घरी जरूर जायचे आहे. त्या घराला शांतीधाम अथवा वानप्रस्थ म्हटले जाते. आम्हा आत्म्यांना पावन बनून पावन शांतीधामला जायचे आहे. बस्स. किती सोपी गोष्ट आहे. ते (परमधाम) आहे आत्म्यांचे पावन शांतीधाम. ते (सतयुग) आहे पावन सुखधाम जीव आत्म्यांचे. हे आहे पतित दुःख धाम जीव आत्म्यांचे. यात गोंधळून जाण्याची गोष्टच नाही. शांतीधाम जिथे सर्व पवित्र आत्मे निवास करतात. ती आहे आत्म्यांची पवित्र दुनिया - व्हाइसलेस, इनकॉर्पोरियल वर्ल्ड (निर्विकारी, निराकारी दुनिया). ही जुनी दुनिया आहे सर्व जीव आत्म्यांची. सर्वजण पतित आहेत. आता बाबा आले आहेत आत्म्यांना पावन बनवून, पावन दुनिया शांतीधाममध्ये घेऊन जाण्यासाठी. मग जे राजे योग शिकतात तेच पावन सुखधाममध्ये येतील. हे तर खूप सोपे आहे, यात कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नाहीये. बुद्धीने समजायचे आहे. आम्हा आत्म्यांचे बाबा आलेले आहेत, आम्हाला पावन शांतीधाममध्ये घेऊन जाण्यासाठी. तिथे जाण्याचा रस्ता जो आम्ही विसरून गेलो होतो, तो आता बाबांनी सांगितला आहे. कल्प-कल्प मी असाच येऊन सांगतो - ‘हे मुलांनो, मज शिवबाबांची आठवण करा’. सर्वांचा सद्गती दाता एक सद्गुरुच आहेत. तेच येऊन मुलांना संदेश अथवा श्रीमत देतात की मुलांनो आता तुम्हाला काय करायचे आहे? अर्धा कल्प तुम्ही खूप भक्ती केली आहे, दुःख झेलले आहे. खर्च करता-करता कंगाल बनले आहात. आत्मा देखील सतोप्रधानापासून तमोप्रधान बनली आहे. बस, ही छोटीशी गोष्टच समजून घ्यायची आहे. आता घरी जायचे आहे की नाही? ‘हो बाबा, नक्की जायचे आहे’. ते आमचे स्वीट सायलेन्स होम (गोड शांतीधाम) आहे. हे देखील समजता कि खरोखर आता आम्ही पतित आहोत त्यामुळे जाऊ शकत नाही. आता बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा तर तुमची पापे नष्ट होतील. कल्प-कल्प हाच संदेश देतो. स्वतःला आत्मा समजा, हा देह तर खलास होणार आहे. बाकी आत्म्यांना परत जायचे आहे. त्याला म्हटले जाते निराकारी दुनिया. सर्व निराकारी आत्मे तिथे राहतात. ते घर आहे आत्म्यांचे. निराकार बाबा देखील तिथे राहतात. बाबा येतात सर्वात शेवटी कारण सर्वांना परत घेऊन जायचे आहे. एकही पतित आत्मा राहत नाही, यामध्ये काही गोंधळून जाण्याची किंवा त्रासाची गोष्ट नाहीये. गातात देखील हे पतित-पावन येऊन आम्हाला पावन बनवून सोबत घेऊन जा. ते सर्वांचे पिता आहेत ना. मग जेव्हा आपण नव्या दुनियेमध्ये पार्ट बजावण्यासाठी येतो तेव्हा खूप थोडे असतात. बाकी इतके करोड आत्मे कुठे जाऊन राहतात? हे देखील जाणता सतयुगामध्ये थोडेसेच जीव आत्मे होते, छोटे झाड होते मग त्याची वृद्धी झाली आहे. झाडामध्ये अनेक धर्मांची व्हरायटी आहे. त्यालाच कल्पवृक्ष म्हटले जाते. जर काहीही समजत नसेल तर विचारू शकता. कितीतरीजण म्हणतात - ‘बाबा, आम्ही कल्पाचा कालावधी ५ हजार वर्षे आहे हे कसे मान्य करायचे?’ अरे, बाबा तर सत्यच सांगतात. चक्राचा हिशोब देखील सांगितला आहे.

या कल्पाच्या संगमावरच बाबा येऊन दैवी राजधानी स्थापन करतात, जी आता नाही आहे. सतयुगामध्ये पुन्हा एक दैवी राजधानी असेल. यावेळी तुम्हाला रचता आणि रचनेचे ज्ञान ऐकवतात. बाबा म्हणतात - ‘मी कल्प-कल्प, कल्पाच्या संगम युगावर येतो. नव्या दुनियेची स्थापना करतो’. जुनी दुनिया नष्ट होणार आहे. ड्रामा प्लॅन अनुसार, नव्या पासून जुनी, जुन्या पासून नवीन बनते. याचे ४ भाग देखील पूर्ण आहेत ज्याला स्वस्तिक देखील म्हणतात परंतु समजत काहीच नाहीत. भक्तिमार्गामध्ये तर जसे बाहुल्यांचा खेळ खेळत राहतात. पुष्कळ चित्रे आहेत, दिवाळीमध्ये खास दुकाने उघडतात, अनेकानेक चित्रे आहेत. आता तुम्हाला समजले आहे, एक आहेत शिवबाबा आणि आपण मुले. मग इथे याल तर लक्ष्मी-नारायणाचे राज्य, नंतर मग राम-सीतेचे राज्य, त्या नंतर बाकी इतर धर्म येतात, ज्याच्याशी तुम्हा मुलांचा काही संबंधच नाही. ते आपल्या-आपल्या वेळेवर येतात मग सर्वांना परत जायचे आहे. तुम्हा मुलांना देखील आता घरी जायचे आहे. ही संपूर्ण दुनिया नष्ट होणार आहे. आता त्यात राहण्यासारखे काय आहे. या दुनियेमध्ये मनच लागत नाही. मन लागणार आहे एका माशुक सोबत, ते म्हणतात - ‘मज एका सोबत मन लावाल तर तुम्ही पावन बनाल. आता बराच काळ निघून गेला आहे फार थोडा बाकी आहे, वेळ पुढे जात राहतो. योगामध्ये राहिले नसाल तर मग शेवटी खूप पश्चाताप कराल, सजा खाल, पद सुद्धा भ्रष्ट होईल. हे देखील तुम्हाला आता समजले आहे की आपले घर सोडून आपल्याला किती वेळ झाला आहे. घरी जाण्यासाठीच तर डोके फोड करतात ना. बाबा देखील घरीच भेटणार, सतयुगामध्ये काही मिळणार नाहीत. मुक्तिधाममध्ये जाण्यासाठी मनुष्य किती मेहनत करतात. त्याला म्हटले जाते भक्ती मार्ग. ड्रामा अनुसार भक्ती मार्ग आता संपणार आहे. आता मी तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे. नक्कीच परत घेऊन जाईन. जितके जे पावन बनतील तितके उच्च पद प्राप्त करतील. यात गोंधळून जाण्याची गोष्टच नाही. बाबा म्हणतात - ‘मुलांनो तुम्ही माझी आठवण करा, मी गॅरंटी करतो तुम्ही कोणतीही शिक्षा न भोगता घरी निघून जाल’. आठवणीनेच तुमची विकर्मे विनाश होतील. जर आठवण केली नाही तर शिक्षा भोगावी लागेल, पद देखील भ्रष्ट होईल. दर ५ हजार वर्षांनंतर मी हेच येऊन समजावून सांगतो. मी अनेकानेक वेळा आलो आहे तुम्हाला परत घेऊन जाण्यासाठी. तुम्ही मुलेच जय-पराजयाचा पार्ट बजावता, मग मी येतो घेऊन जाण्यासाठी. ही आहे पतित दुनिया; म्हणून गातात देखील - ‘पतित-पावन या, आम्ही विकारी पतित आहोत, येऊन निर्विकारी पावन बनवा’. हि आहे विकारी दुनिया. आता तुम्हा मुलांना संपूर्ण निर्विकारी बनायचे आहे. जे शेवटी येतात ते शिक्षा भोगून जातात; त्यामुळे परत येतात देखील अशा दुनियेमध्ये जिथे दोन कला कमी असतात. त्यांना संपूर्ण पवित्र म्हणणार नाही म्हणून आता पुरुषार्थ देखील पूर्णपणे केला पाहिजे. असे होऊ नये की पद कमी होईल. भले रावण राज्य नाहीये परंतु पद तर नंबरवार आहेत ना. आत्म्यामध्ये खाद (अशुद्धता) पडते तर मग तिला शरीर देखील तसेच मिळेल. आत्मा गोल्डन एजेड पासून सिल्व्हर एजेड बनते. चांदीची खाद आत्म्यामध्ये पडते नंतर मग दिवसेंदिवस जास्तच खराब खाद (विकाराची अशुद्धता) पडते मुलामा दिलेली. बाबा खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. कोणाला समजत नसेल तर हात वर करा. ज्यांनी ८४ जन्मांचे चक्र लावले आहे, त्यांनाच समजावून सांगतील. बाबा म्हणतात - ‘याच्या (ब्रह्मा बाबांच्या) ८४ जन्मांच्या अंताला मी येऊन प्रवेश करतो. यालाच मग पहिल्या नंबरमध्ये यायचे आहे. जो सुरुवातीला होता, तो शेवटी आहे. त्यालाच पहिल्या नंबरमध्ये जायचे आहे; जो अनेक जन्मांच्या अंती पतित बनला आहे, मी पतित-पावन त्याच्याच शरीरामध्ये येतो, त्याला पावन बनवतो’. किती स्पष्ट करून सांगतात.

बाबा म्हणतात - ‘माझी आठवण कराल तर तुमची पापे भस्म होतील. गीतेचे ज्ञान तर तुम्ही खूप ऐकले आहे आणि ऐकवले आहे परंतु त्याने देखील तुम्हाला सद्गती मिळाली नाही. अनेक संन्याशांनी तुम्हाला गोड-गोड आवाजामध्ये शास्त्र ऐकवली, जो आवाज ऐकून मोठ-मोठ्या व्यक्ती जाऊन एकत्र होतात. कनरस आहे ना. भक्ती मार्ग आहेच मुळी कनरस. यामध्ये तर आत्म्याला बाबांची आठवण करायची आहे. भक्ती मार्ग आता पूर्ण होतो. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हा मुलांना ज्ञान देण्यासाठी आलो आहे, जे कोणीही जाणत नाही’. मी ज्ञानाचा सागर आहे. ज्ञान म्हटले जाते नॉलेजला. तुम्हाला सर्व काही शिकवतात. ८४ चे चक्र देखील समजावून सांगतात, तुमच्यामध्ये सर्व नॉलेज आहे. स्थूल वतन पासून सूक्ष्म वतन क्रॉस करून मग मूल वतनमध्ये जाता. सर्वात पहिली आहे लक्ष्मी-नारायणाची डीनायस्टी (घराणे). तिथे विकारी मुले नसतात, रावण राज्यच नाही. सर्व काही योगबलाने होते, तुम्हाला साक्षात्कार होतो - आता बाळ बनून गर्भ महालामध्ये जायचे आहे. आनंदाने जातात. इथे तर मनुष्य किती रडतात-ओरडतात. इथे तर गर्भ जेलमध्ये जातात ना. तिथे रडण्या-ओरडण्याची गरज नाही. शरीर तर जरूर बदलायचे आहे. जसे सापाचे उदाहरण आहे, यामध्ये गोंधळून जाण्याची गरजच नाही. जास्त काही विचारायची गरज नाही. एकदम पावन बनण्याच्या पुरुषार्थामध्ये व्यस्त झाले पाहिजे. बाबांची आठवण करणे कठीण असते का! बाबांच्या समोर बसले आहात ना. मी तुमचा बाबा तुम्हाला सुखाचा वारसा देतो. तुम्ही हा एक अंतिम जन्म आठवणीत राहू शकत नाही! इथे चांगल्या प्रकारे समजतात देखील आणि मग घरी जाऊन पत्नी इत्यादीचा चेहरा बघतात तर माया खाऊनच टाकते. बाबा म्हणतात - ‘कोणातही मोह ठेवू नका. ते तर सर्व नष्ट होणारच आहे. आठवण तर एका बाबांचीच करायची आहे. चालता-फिरता बाबा आणि आपल्या राजधानीची आठवण करा. दैवी गुण देखील धारण करायचे आहेत. सतयुगामध्ये या खराब गोष्टी मांस इत्यादी असतही नाहीत. बाबा म्हणतात विकारांना देखील सोडा. मी तुम्हाला विश्वाची बादशाही देतो, किती कमाई होते. तर का नाही पवित्र राहणार. फक्त एक जन्म पवित्र राहिल्याने किती मोठी कमाई होते. भले एकत्र रहा, ज्ञानाची तलवार मधे असावी. पवित्र राहून दाखवले तर सर्वात उच्च पद प्राप्त कराल कारण बालब्रह्मचारी झालात. आणि मग नॉलेज देखील हवे. इतरांना आपसमान बनवायचे आहे. संन्याशांना दाखवायचे आहे की, कसे आम्ही एकत्र राहून पवित्र राहतो. तेव्हा समजतील यांच्यामध्ये तर खूप ताकद आहे. बाबा म्हणतात - ‘या एका जन्मामध्ये पवित्र राहिल्याने २१ जन्म तुम्ही विश्वाचे मालक बनाल’. किती मोठे प्राईज मिळते तर का नाही पवित्र राहून दाखवणार. थोडा वेळ बाकी आहे. आवाज देखील होत राहील, वर्तमानपत्रांमध्ये देखील येईल. रिहर्सल तर पाहिली आहे ना. एका ॲटमबॉम्बने काय हाल झाले. अजून पर्यंत हॉस्पिटलमध्ये पडले आहेत. आता तर असे बॉम्ब इत्यादी बनवतात जे काहीच त्रास नाही, ताबडतोब खलास. आणि हि रिहर्सल होऊन मग फायनल होईल. बघतील एका फटक्यात मरतात की नाही? मग अजून युक्त्या शोधून काढतील. हॉस्पिटल इत्यादी राहणार नाहीत. कोण बसून सेवा करेल. कोणी ब्राह्मण इत्यादी खाऊ घालणारा राहणार नाही. बॉम्ब टाकला आणि खलास. भूकंपामध्ये सर्व गाडले जातील. वेळ लागणार नाही. इथे भरमसाठ मनुष्य आहेत. सतयुगामध्ये फार थोडे असतात. तर इतके सारे कसे विनाश होतील! पुढे जाऊन पहायचे आहे, तिथे (सतयुगामध्ये) तर सुरुवातीला ९ लाख आहेत.

फकीर देखील तुम्ही आहात, साहेब देखील तुम्हालाच प्रिय आहे. आता सर्वांना सोडून स्वतःला आत्मा समजत आहात, अशा फकीरांना बाबा प्रिय वाटतात. सतयुगामध्ये खूप छोटेसे झाड असेल. गोष्टी तर खूप सांगतात. जे काही ॲक्टर्स आहेत, सर्व आत्मे अविनाशी आहेत, आपला-आपला पार्ट बजावण्यासाठी येतात. कल्प-कल्प तुम्हीच येऊन बाबांकडून स्टुडंट बनून शिकता. तुम्ही जाणता - बाबा, आम्हाला पवित्र बनवून सोबत घेऊन जातील. बाबा देखील ड्रामा अनुसार बांधलेला आहे, सर्वांना परत जरूर घेऊन जातील म्हणून नावच आहे पांडव सेना. तुम्ही पांडव काय करत आहात? तुम्ही बाबांकडून राज्यभाग्य घेत आहात, हुबेहूब कल्पा पूर्वीप्रमाणे. नंबरवार पुरुषार्थानुसार. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांचे प्रिय बनण्यासाठी पूर्णत: फकीर बनायचे आहे. देहाला सुद्धा विसरून स्वतःला आत्मा समजणे हेच फकीर बनणे आहे. बाबांकडून मोठ्यात मोठे प्राईज घेण्यासाठी संपूर्ण पावन बनून दाखवायचे आहे.

२) परत घरी जायचे आहे त्यामुळे जुन्या दुनियेमध्ये मन गुंतू द्यायचे नाही. एका माशुकमध्येच मन गुंतवायचे आहे. बाबा आणि राजधानीची आठवण करायची आहे.

वरदान:-
ब्राह्मण जीवनामध्ये कायम चीअरफुल आणि केअरफुल मूडमध्ये राहणारे कंबाइंड रूपधारी भव

जर कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रसन्नतेचा मूड बदलत असेल तर त्याला सदा काळची प्रसन्नता म्हणणार नाही. ब्राह्मण जीवनामध्ये कायम चीअरफुल आणि केअरफुल मूड असावा. मूड बदलता कामा नये. जेव्हा मूड बदलतो तेव्हा म्हणतात - ‘मला एकांत पाहिजे. आज माझा मूड असा आहे.’ मूड तेव्हा बदलतो जेव्हा एकटे राहता, कायम कंबाइंड स्वरूपामध्ये रहाल तर मूड बदलणार नाही.

बोधवाक्य:-
कोणताही उत्सव साजरा करणे अर्थात आठवण आणि सेवेच्या उत्साहामध्ये राहणे.