01-07-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो, साऱ्या
दुनियेला शांती देणे एका बाबांचेच काम आहे म्हणून म्हणतात, ‘हे शांती देवा’, तर
प्राईज सुद्धा बाबांना मिळाले पाहिजे”
प्रश्न:-
कोणती मुले
बाबांना पूर्णपणे फॉलो करू शकतात?
उत्तर:-
१) जी
बाबांसारखी पावन बनतात - तीच पूर्णपणे फॉलो करू शकतात. २) जे पक्के आशिक बनतील तेच
मज माशुकला फॉलो करू शकतील. अशा आशिकांनाच मी सोबत घेऊन जातो म्हणून शास्त्रांमध्ये
दाखवतात - गाईचे शेपूट पकडल्याने पार व्हाल. आता इथे काही गाईच्या शेपटाची गोष्टच
नाहीये.
गीत:-
तू प्यार का
सागर है…
ओम शांती।
बापदादा
दोघेजण आहेत ना. आता हे तर मुले जाणतात की, आत्म्यांचे पिता शिवबाबा आहेत. हे देखील
तुम्ही जाणता की मी पतित-पावन आहे, मी निराकार आहे. तुम्ही देखील निराकार आहात,
शांत स्वरूप आहात. निराकार बाबा देखील शांत स्वरूप आहेत, आत्मा देखील शांत स्वरूप
आहे. आत्म्याचा स्वधर्म आहेच मुळी शांती. तुमचे निवासस्थान आहे - शांतीधाम. जेव्हा
यज्ञ इत्यादी रचतात तेव्हा म्हणतात - ‘शांतीदेवा’ कारण की शांतीचा सागर तर ते
परमात्मा आहेत. साऱ्या दुनियेला शांती देणारे ते पिता आहेत. असे अनेक आहेत ज्यांना
शांतीसाठी प्राईज मिळते. कधी कोणाला प्राईज मिळते तर म्हणतात हे शांती स्थापन
करण्यासाठी निमित्त बनलेले आहेत, यामध्ये मोठ-मोठ्या हस्तींची नावे घेतात. आता शांती
तर पाहिजे - साऱ्या दुनियेमध्ये. नाहीतर अशांतीमध्ये राहणारे इतरांना देखील अशांत
करतील. हे आहेच रावण राज्य. रावण शत्रू आहे ना, रामाला शत्रू म्हणणार नाही. रामाचा
कधी पुतळा जाळणार नाहीत. ना त्रेतायुगातील रामाचा, ना परमपिता परमात्म्याचा.
रामराज्य तर सर्वच इच्छितात परंतु रामराज्य कशाला म्हटले जाते, हे देखील कोणी जाणत
नाही. फक्त म्हणतात नवीन दुनिया व्हावी, नवीन दिल्लीमध्ये रामराज्य असावे. नवीन
दिल्ली म्हणतात, नावे तर खूप ठेवली जातात. दिल्ली सर्वांची राजधानी असते. दिल्लीच
परिस्तान होती. राधे-कृष्णाला देखील तिथेच दाखवतात. हे दोघेच मुख्य प्रिन्स आणि
प्रिन्सेस आहेत. फक्त दोघेच नाहीत जरूर आणखी देखील असतील. ८ राजघराणी तर गायली
जातात, बुद्धीने विचार करायचा आहे. सतयुगामध्ये जरूर अजूनही राजघराणी असतील. इथेही
बघा किती राजघराणी आहेत, वृद्धी होता-होता पुष्कळ वाढत जातात. अमुक-अमुक गावाचा
महाराजा, छोटी-छोटी गावे देखील भरपूर आहेत ना. सतयुगामध्ये इतके थोडेच होते. तिथे
तर लक्ष्मी-नारायणाचेच नाव प्रसिद्ध आहे. २५०० वर्षे त्यांचे राज्य चालले आहे.
मनुष्य म्हणतात - लाखो वर्षे झाली, विचार करण्याची गोष्ट आहे. हे आहे आत्म्यांसाठी
भोजन. बाबा तुमच्या बुद्धीला, आत्म्याला हे रूहानी भोजन देतात.
आता तुमच्या बुद्धीचे
कुलूप उघडले आहे. ऋषी-मुनी इत्यादी सर्व म्हणत असत - ‘आम्ही रचयिता आणि रचनेला जाणत
नाही’. तुम्ही मुले मात्र आता असे म्हणणार नाही. तुम्ही तर रचयिता आणि रचनेच्या
आदि-मध्य-अंताला जाणता. तुम्ही आपल्या ८४ च्या चक्राला जाणले आहे. आदि च्या
काळामध्ये तुम्ही देवी-देवता होता. मग मध्य काळामध्ये रावणाची प्रवेशता झाल्यामुळे
विकारी बनला आहात. आता आहे अंत. तुम्ही जाणता - आता जुन्या दुनियेचा विनाश होऊन मग
आदि होईल (पुन्हा नव्याने सुरुवात होईल). आदि (सुरुवातीच्या काळामध्ये) असेल -
रामराज्य. मध्य काळापासून रावण राज्य सुरू होते. आता रावण राज्य पूर्ण होऊन पुन्हा
रामराज्य सुरू होईल. नरापासून नारायण बनायचे आहे ना. ही आहे सत्यनारायणाची कथा.
तुम्ही जाणता - सर्व शास्त्रमई शिरोमणी श्रीमत गीता आहे. श्रीमत मिळते - श्रेष्ठ
बनण्याकरिता. ‘श्री’ म्हटले जाते श्रेष्ठ असणाऱ्याला. मुले जाणतात - एकमेव गीता
शास्त्रच असे आहे, ज्याला देवी-देवता धर्माचे शास्त्र म्हटले जाते, ज्याद्वारे
संगमावर देवता धर्माची स्थापना होते. सतयुगामध्ये तर कोणीही पतित नसतात ज्यांना
पावन बनवतील. आता तुम्हाला बाबा समजावून सांगत आहेत - गीतेला पतित-पावनी म्हणू शकत
नाही. गीतेद्वारे पावन बनू शकत नाही. गीतेच्या भगवंताला पतित-पावन म्हणतात. हे
चांगल्या रीतीने लक्षात ठेवा. गीता आहे आदि सनातन देवी-देवता धर्माचे शास्त्र.
गीतेच्या वेळीच महाभारी महाभारत युद्ध देखील झाले होते, ज्यामुळे अनेक धर्मांचा
विनाश झाला आणि एका धर्माची स्थापना झाली. गीतेसाठी म्हणतात - देवी-देवता धर्माचे
शास्त्र. ब्राह्मणांचे शास्त्र म्हणत नाहीत. ब्राह्मणांचे नाव गीतेमध्ये नाहीये.
परमपिता परमात्माच येऊन ब्रह्माद्वारे या सर्व वेद-शास्त्र इत्यादींचे सार सांगतात.
आता तुम्ही समजता सतयुगामध्ये तर ब्राह्मण नसतात. तिथे आहेत लक्ष्मी-नारायण, देवता,
ब्रह्मानंतर आहे विष्णू. चित्रांमध्ये देखील दाखवले आहे - ब्रह्मा द्वारे स्थापना
विष्णूपुरीची. ब्रह्मा आणि विष्णू एकत्र तर असणार नाहीत. ब्रह्मा द्वारे देवी-देवता
धर्माची स्थापना होईल. या सर्व विस्ताराने समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. आता तुम्ही
मुले शिवबाबांकडून वारसा घेत आहात. अधिकारी बनलात ना! मुख्य धर्मशास्त्रे आहेत ४,
श्रीमत भगवद्गीता आहे पहिल्या नंबरचे शास्त्र, ज्याद्वारे पहिल्या नंबरच्या धर्माची
स्थापना होते. त्यानंतर असतात इस्लामी, बौद्धि. एक गीताच असे धर्मशास्त्र आहे -
ज्यामध्ये ‘श्रीमत भगवद्गीता’ लिहिलेले आहे, इतर कोणत्याही धर्म शास्त्रामध्ये
‘श्रीमत’ नाही आहे. ‘श्रीमत इस्लामी’ अथवा ‘श्रीमत बौद्धी’शास्त्र असे म्हटले जात
नाही. श्रीमत भगवद्गीता आहेच मुळी एक. त्यातून कोणता धर्म स्थापन केला? आदि सनातन
देवी-देवता धर्माची स्थापना झाली आणि स्थापना होते कल्पाच्या अखेरीला. या समजून
घेण्यासारख्या गोष्टी आहेत.
आता बाबा आपल्याला
टीचरच्या रूपामध्ये शिकवत आहेत - हे लक्षात राहिले पाहिजे. बाबा आपले पिता आहेत आणि
टीचर देखील आहेत. बाबा शिक्षणाद्वारे सर्वांची सद्गती करतात तर मग सद्गुरु देखील
झाले ना. बाबांची सर्व जण आठवण करतात. आता गीतेमध्ये श्रीकृष्णाचे नाव टाकले आहे.
परंतु तो (श्रीकृष्ण) काही ज्ञानाचा सागर नाहीये, बाबांनी त्याला असा ज्ञानाचा सागर
बनविले आहे; याचाच अर्थ ते टीचर देखील आहेत. इथे तुम्ही नवीन गोष्टी ऐकता, शास्त्रे
इत्यादी आतापर्यंत तर भरपूर वाचत आणि ऐकत आला आहात. आता तुम्ही बाबांकडून डायरेक्ट
ऐकता. यापूर्वी सर्व शरीरधारी आणि मनुष्यांकडून ऐकले होते. आता तुम्ही समजता - आपण
आत्मे खरे तर अशरीरी होतो. शरीर तर नंतर धारण केले आहे. बाबा देखील अशरीरी आहेत.
शिवलिंग बनवतात ना. आत्मा शरीराद्वारे त्यांची पूजा करते. बोलावता देखील - ‘हे
परमपिता परमात्मा, येऊन आम्हा पतितांना पावन बनवा’. लिंगाची पूजा करतात परंतु हे
थोडेच समजतात की, हे पतित-पावन बाबा आहेत, ज्यांना आपण बोलावत आहोत. शिव, भगवान
आहेत, ईश्वर आहेत. बस्स, अशीच आठवण करतात. त्यांना बाबा म्हटले तर हे बुद्धीत आले
पाहिजे की, बाबांकडून वारसा मिळाला पाहिजे. आपल्याला वारसा मिळाला आहे तेव्हाच तर
आपण त्यांची पूजा करतो. भारतवासीयांना वारसा मिळाला आहे जरूर, परंतु कधी मिळाला हे
मात्र विसरून गेले आहेत. आता तुम्हा मुलांना समजते आहे, मुले म्हणतात - आम्ही
बाबांकडे आलो आहोत. शिवबाबा ब्रह्मा तनामध्ये येऊन समजावून सांगतात. त्रिमूर्तीचे
नाव प्रसिद्ध आहे. त्रिमूर्तीमार्ग असे नाव देखील ठेवले आहे. बाबांची महिमा खूप मोठी.
गाण्यामध्ये देखील ऐकले - ‘प्यार का सागर है…’; सर्वांचे सद्गती दाता आहेत. सर्वांना
सुख-शांती देणारे आहेत. सर्वांचे दुःख-हर्ता, सुख-कर्ता आहेत, अत्यंत प्रिय आहेत
ना. त्यांच्यापेक्षा प्रिय गोष्ट दुसरी कोणतीही नाही. जे बाबा स्वर्गाचा मालक
बनवतात, ते जरूर प्रिय असतील ना. ते आहेत बेहदचे बाबा. म्हणतात - मुलांनो,
माझ्याकडून स्वर्गाची बादशाही मिळते ना. तुम्ही आत्मे भाऊ-भाऊ आहात. आता बाबांकडून
ऐकत आहात. आता आत्मे बाबांची आठवण करतात; बाबा, येऊन आम्हाला पावन बनवा. आता आत्मा
म्हणते - बाबा आलेले आहेत पावन बनविण्याकरिता. म्हणतात - ‘मुलांनो, ५ हजार
वर्षांपूर्वी तुम्हाला पावन बनविण्याकरिता आलो होतो. आता मज पित्याची आठवण करा
म्हणजे मग तुमची विकर्म विनाश होतील आणि तुमची सर्व दुःख दूर होतील’. बोलावतात
देखील - ‘हे पतित-पावन या…’, किंवा टाळ्या वाजवून घसा फोडून गात राहतात -
‘पतित-पावन सीताराम…’ तर स्वतः पतित झाले ना. हा आहेच नरक, याला रौरव नरक म्हटले
जाते. गरुड पुराणामध्ये तर रोमांचक गोष्टी भरपूर लिहून ठेवल्या आहेत की, असे
केल्याने असे बनाल, असे होईल… आणि मग म्हणतात - गाईची शेपूट पकडल्याने स्वर्गामध्ये
निघून जाल. असे काहीतरी लिहिलेले आहे. आता इथे प्राण्याची तर काही गोष्टच नाहीये.
तुम्ही गो माता आहात ना. तुमचे शेपूट अर्थात तुमची पाठ जोपर्यंत कोणी पकडत नाही
तोपर्यंत मार्ग मिळू शकणार नाही. शेपूट काही नाही आहे. म्हणतात देखील तुमचे शेपूट
पकडून तर जाणार. आता इथे काही शेपूट पकडायची नाहीये, परंतु फॉलो करायचे आहे.
संन्याशांचे फॉलोअर्स तर पुष्कळ आहेत परंतु फॉलो करणे अर्थात पवित्र बनणे. तुम्ही
तर खरे-खरे फॉलोअर्स आहात. शिवबाबा म्हणतात - ‘मी आलो आहे तुम्हा सर्वांना परत घेऊन
जाण्याकरिता. तुम्ही माझी आठवण करा तर तुमची पापे भस्म होतील’. पावन बनल्याशिवाय
तुम्ही मला फॉलो करू शकणार नाही. शिवबाबांना पूर्णपणे फॉलो करायचे आहे. तुम्ही इथे
बसला आहात फॉलो करण्याकरिता. भक्तिमार्गामध्ये देखील माझी आठवण करत आला आहात. तुम्ही
जाणता - आत्मे आशिक आहेत, परमात्मा माशुक आहेत. आत्मे त्यांची आठवण करतात आणि ते आले
आहेत नेण्याकरिता. म्हणतात मला फॉलो करा तर तुम्हाला सोबत घेऊन जाईन. कसे फॉलो
करायचे ते देखील सांगतात - मी आहे पावन, तुम्ही आहात पतित. तर जरूर पावन बनावे
लागेल, जरूर फॉलो करावे लागेल. विकारी काही फॉलो करू शकणार नाही. फॉलो करण्यासाठी
माझ्यासारखे पवित्र बना. मी काय पतितांना माझ्यासोबत शांतीधाममध्ये घेऊन जाईन का?
इतके सर्व मनुष्य भक्ती, तप दान-पुण्य इत्यादी करतात - मुक्ती प्राप्त करण्यासाठी
कारण इथे दुःख आहे; त्यांना वाटते की आपण आपल्या घरी परत जावे.
बाबा म्हणतात -
पवित्र जरूर बनावे लागेल. मी पावन आहे, तेव्हाच तर तुम्हाला पावन बनवतो.
येईन देखील
ब्रह्माच्या तनामध्ये. मी रचता आहे, मी या ब्रह्माच्या तनामध्ये येतो. असे दाखवतात
देखील की, ब्रह्मा द्वारा बाबा देवी-देवता धर्माची स्थापना करतात. तुम्ही बी. के. च
हे जाणता की, शिवबाबांना फॉलो करायचे आहे. बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर मी
प्रतिज्ञा करतो - तुम्हाला पावन दुनियेमध्ये घेऊन जाईन, दुसरा कोणताच उपाय नाही.
म्हणतात - ‘पतित-पावन…’ एकतर दृष्टी वरच्या दिशेने जाते, नाहीतर मग पाण्याकडे बघतात.
गंगा काही पतित-पावनी नाही आहे. या तर सागरातून निघालेल्या नद्या आहेत. आता शेपूट
तर तुमचे पकडले पाहिजे. बाबा म्हणतात - तुम्हाला पावन बनायचे आहे, मला फॉलो करायचे
आहे, तेव्हाच सोबत येऊ शकाल. बाबा म्हणतात - तुम्ही माझ्यासोबत राहणारे होता, आता
८४ चे चक्र फिरून पतित बनला आहात. आता पुन्हा माझी आठवण करा तर पावन बनाल. संन्यासी
देखील गृहस्थीवाल्यांना म्हणतात - ‘फॉलो करायचे असेल तर घरदार सोडून द्या’. बाबा
म्हणतात - मी परमधाममध्ये राहतो, तुम्ही देखील येणार आहात की इथेच विषय सागरामध्ये
रहायला चांगले वाटते? तुम्ही बोलावत आले आहात - ‘हे पतित-पावन या’. आता बाबा आले
आहेत सोबत घेऊन जात आहेत. कल्प-कल्प येऊन तुम्हाला सोबत घेऊन जातो. मग सतयुगामध्ये
तुम्ही खूप सुखात राहता. हे लक्ष्मी-नारायण स्वर्गाचे मालक होते ना. यांना इतके सुख
देणारा कोण आहे? हेवनली गॉडफादर. बाबा आठवण करून देत आहेत - तुम्ही माझी जयंती साजरी
करता. परमपिता परमात्म्याची जयंती सर्व भारतवासी साजरी करतात. माझे हे बर्थ प्लेस (जन्म
स्थान) आहे. ख्रिश्चन लोक यांना थोडेच मानतील. ते तर क्राईस्टला मानतील. शिवजयंती
भारतवासीच साजरी करतात. हे सर्वांचे पतित-पावन असणाऱ्या बाबांचे जन्मस्थान आहे. बाबा
सर्वांना सुख देणारे आहेत. सर्वांना लिबरेट करणारे आहेत. तर भारत किती श्रेष्ठ आहे.
बाबा जाणतात ड्रामा
अनुसार जेव्हा माझी मुले खूप दुःखी होतात तेव्हा मी येतो - वारसा देण्याकरिता. बाबा
आहेत ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर… मुलांना वारसा देत आहेत. म्हणतात मला फॉलो करा.
तुम्ही हे देखील जाणता - आपण आत्मा विकारी आहोत त्यामुळे शरीर देखील विकारीच आहेत.
सतयुगामध्ये आत्मा पवित्र आहे तर शरीर देखील पवित्र मिळते. आता बाबा म्हणतात -
‘मुलांनो, पावन बना. आठवणी द्वारेच तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल.’ अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाबांकडून
स्वर्गाचा वारसा घेण्याकरिता - ‘मी आत्मा भाऊ-भाऊ आहे’, हे पक्के करायचे आहे.
सर्वांसोबत खूप प्रेमाने राहायचे आहे. जसे बाबा प्रिय ते प्रिय आहेत, असे प्रिय
बनायचे आहे.
२) पित्या समान बनून
बाबांना पूर्णपणे फॉलो करायचे आहे. बाबांसोबत घरी परत शांतीधाममध्ये जाण्याकरिता
पावन जरूर बनायचे आहे.
वरदान:-
निर्बल
आत्म्यांमध्ये (शक्तिहीन आत्म्यांमध्ये) शक्तींची ताकद भरणारे ज्ञान-दाता सो वरदाता
भव
वर्तमान समय शक्तिहीन
आत्म्यांमध्ये इतकी शक्ती नाहीये जे जंप मारू शकतील, त्यांना जास्त ताकद हवी आहे.
तर तुम्हा विशेष आत्म्यांनी स्वतःमध्ये विशेष शक्ती भरून त्यांना हाय जंप करण्यासाठी
मदत करायची आहे. यासाठी ज्ञान-दाता सोबतच शक्तींचे वरदाता बना. रचताचा प्रभाव
रचनेवर पडतो त्यामुळे वरदानी बनून आपल्या रचनेला सर्व शक्तींचे वरदान द्या. आता याच
सेवेची आवश्यकता आहे.
बोधवाक्य:-
प्रत्येक खेळ
साक्षी होऊन पहा म्हणजे मग सेफ देखील रहाल आणि मजा सुद्धा येईल.
हे अव्यक्त इशारे -
ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.
तुम्ही महान तपस्वी
आत्म्यांनी ज्वालारूप शक्तिशाली आठवणीद्वारे प्राप्तीच्या किरणांची अनुभूती करा आणि
इतरांनाही करवून द्या. तुमचे तपस्वी स्वरूप इतरांना देण्याचे स्वरूप आहे. जसे सूर्य
विश्वाला प्रकाश देण्याची आणि इतर अनेक अविनाशी प्राप्तींची अनुभूती करवितो अगदी
तसेच तुम्ही देखील आपल्या तपस्वी स्वरूपाद्वारे शांती आणि शक्तीची किरणे देत रहा.