01-08-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही पवित्र बनल्याशिवाय परत जाऊ शकत नाही त्यामुळे बाबांच्या आठवणीने आत्म्याची बॅटरी चार्ज करा आणि नॅचरल पवित्र बना”

प्रश्न:-
बाबा तुम्हा मुलांना घरी जाण्यापूर्वी कोणती गोष्ट शिकवतात?

उत्तर:-
मुलांनो, घरी जाण्यापूर्वी जिवंतपणी मरायचे आहे म्हणूनच बाबा तुम्हाला आधीच देहभानाच्या पलीकडे घेऊन जाण्याचा अभ्यास करायला लावतात अर्थात मरणे शिकवतात. वर जाणे अर्थात मरणे. जाणे आणि येण्याचे ज्ञान आता तुम्हाला मिळाले आहे. तुम्ही जाणता - आपण आत्मा वरून आलो आहोत, या शरीराद्वारे पार्ट बजावण्यासाठी. आपण खरे तर तिकडचे रहिवासी आहोत, आता तिकडेच परत जायचे आहे.

ओम शांती।
स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करण्यात काहीच त्रास नाहीये, गोंधळून जायचे नाही. याला म्हटले जाते सहज आठवण. सर्वात आधी स्वतःला आत्मा समजायचे आहे. आत्माच शरीर धारण करून पार्ट बजावते. संस्कारही सर्व आत्म्यातच असतात. आत्मा तर स्वतंत्र आहे. बाबा म्हणतात - ‘स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा’. हे नॉलेज आताच तुम्हाला मिळते, नंतर मिळणार नाही. तुमचे हे शांतपणे बसणे दुनिया जाणत नाही, याला म्हटले जाते नैसर्गिक शांती. आपण आत्मा वरून आलो आहोत, या शरीराद्वारे पार्ट बजावण्यासाठी. आम्ही आत्मे खरे तर तिथले (परमधामचे) रहिवासी आहोत. हे ज्ञान बुद्धीमध्ये आहे. बाकी यामध्ये हठयोगाची काही गोष्ट नाही, अगदी सोपे आहे. आता आम्हा आत्म्यांना घरी जायचे आहे. परंतु पवित्र बनल्याशिवाय जाऊ शकत नाही. पवित्र बनण्यासाठी परमात्मा बाबांची आठवण करायची आहे. आठवण करता-करता पापे नष्ट होतील. त्रासाची तर काही गोष्टच नाही. तुम्ही फेरफटका मारायला जाता तर बाबांच्या आठवणीमध्ये रहा. आताच आठवणीने पवित्र बनू शकता. तिथे ती तर आहे पवित्र दुनिया. तिथे त्या पवित्र दुनियेमध्ये या ज्ञानाची काही आवश्यकता राहत नाही कारण तिथे कोणतेही विकर्म होत नाही. इथेच आठवणीने विकर्म नष्ट करायची आहेत. तिथे तर तुम्ही नॅचरल आत्मिक स्मृतिमध्ये चालता, जसे इथे चालता. मग थोडे-थोडे खाली उतरता (कला कमी होत जाते). असे नाही कि तिथे देखील तुम्हाला हि प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस आताच करायची आहे. बॅटरी आता चार्ज करायची आहे नंतर मग हळू-हळू बॅटरी डिस्चार्ज होणारच आहे. बॅटरी चार्ज होण्याचे ज्ञान आता एकदाच तुम्हाला मिळते. सतोप्रधाना पासून तमोप्रधान बनण्यामध्ये तुम्हाला किती वेळ लागतो! सुरुवातीपासून काही ना काही बॅटरी कमी होत जाते. मूलवतनमध्ये तर आहेतच आत्मे. शरीरे तर नाही आहेत. त्यामुळे नॅचरल उतरण्याची अर्थात बॅटरी कमी होण्याची गोष्टच नाही. मोटार जेव्हा चालेल तेव्हाच तर बॅटरी कमी होत जाईल. मोटार उभी असेल तर बॅटरी थोडीच चालू होईल. जरी मोटारीमध्ये बॅटरी चार्ज होत राहते तरी मोटार जेव्हा चालेल तेव्हा बॅटरी चालू होईल; परंतु तुमची बॅटरी एकदाच या वेळी चार्ज होते. तुम्ही मग जेव्हा इथे शरीराद्वारे कर्म करता तर मग थोडी-थोडी बॅटरी कमी होत जाते. पहिले तर हे समजावून सांगायचे आहे कि, ते आहेत सुप्रीम फादर, ज्यांची सर्व आत्मे आठवण करतात. ‘हे भगवान’, असे ज्यांना म्हणतात, ते पिता आहेत, आपण त्यांची संतान आहोत. इथे तुम्हा मुलांना समजावून सांगितले जाते, बॅटरी कशी चार्ज करायची आहे. भले हिंडा-फिरा, बाबांची आठवण करा तर सतोप्रधान बनाल. कोणतीही गोष्ट समजली नाही तर विचारु शकता. आहे एकदम सोपे. ५ हजार वर्षांनंतर आमची बॅटरी डिस्चार्ज होते. बाबा येऊन सर्वांची बॅटरी चार्ज करतात. विनाशाच्या वेळी सर्व बाबांची आठवण करतात. समजा पूर आला तरीही जे भक्त असतील ते ईश्वराचीच आठवण करतील परंतु त्या वेळी ईश्वराची आठवण येऊ शकणार नाही. मित्र-संबंधी, धन-दौलतच आठवत राहणार. भले ‘हे भगवान’, असे म्हणतात परंतु ते देखील म्हणण्या पुरते. भगवान बाबा आहेत, आपण त्यांची संतान आहोत. हे तर जाणतही नाहीत. त्यांना सर्वव्यापीचे उलटे ज्ञान मिळते. बाबा येऊन सुलटे ज्ञान देतात. भक्तीचे डिपार्टमेंटच वेगळे आहे. भक्तीमध्ये त्रास सहन करायचा असतो. ब्रह्माची रात्र सो ब्राह्मणांची रात्र आहे. ब्रह्माचा दिवस सो ब्राह्मणांचा दिवस आहे. असे तर म्हणणार नाही शूद्रांचा दिवस, शूद्रांची रात्र. हे रहस्य बाबा बसून समजावून सांगतात. हि आहे बेहदची रात्र आणि दिवस. आता तुम्ही दिवसामध्ये जाता, रात्र पूर्ण होते. हे शब्द शास्त्रांमध्ये आहेत. ब्रह्माचा दिवस, ब्रह्माची रात्र म्हणतात परंतु जाणत नाहीत. तुमची बुद्धी आता बेहदमध्ये गेली आहे. असे तर देवतांना देखील म्हणू शकतात - विष्णूचा दिवस, विष्णूची रात्र कारण विष्णू आणि ब्रह्माचा संबंध देखील समजावून सांगितला जातो. त्रिमूर्तीचे ऑक्यूपेशन (कार्यप्रणाली) काय आहे - बाकीचे कोणी तर हे समजू शकणार नाही. ते तर ईश्वरालाच कच्छ-मच्छ अवतारामध्ये किंवा जन्म-मरणाच्या फेऱ्यात घेऊन गेले आहेत. राधे-कृष्ण इत्यादी देखील मनुष्य आहेत, परंतु दैवी गुणवाले. आता तुम्हाला असे बनायचे आहे. दुसऱ्या जन्मामध्ये देवता बनाल. ८४ जन्मांचा जो हिशोब होता तो आता पूर्ण झाला. पुन्हा रिपीट होईल. आता तुम्हाला हे शिक्षण मिळत आहे.

बाबा म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो, स्वतःला आत्मा निश्चय करा’. म्हणतात देखील आम्ही पार्टधारी आहोत. परंतु आपण आत्मे वरून कसे येतो - हे समजत नाहीत. स्वतःला देहधारीच समजतात. आपण आत्मे वरून येतो मग परत कधी जाणार? वर जाणे अर्थात मरणे, शरीर सोडणे. कोणी मरू इच्छितात का? इथे तर बाबा म्हणतात - तुम्ही या शरीराला विसरत जा. जिवंतपणी मरणे तुम्हाला शिकवतात, जे इतर कोणी शिकवू शकणार नाही. तुम्ही आलाच आहात आपल्या घरी जाण्यासाठी. घरी कसे जायचे आहे - हे ज्ञान आताच मिळते. तुमचा या मृत्युलोकातील हा अंतिम जन्म आहे. अमरलोक सतयुगाला म्हटले जाते. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे - आपण लवकरात लवकर जावे. सर्वात आधी तर घरी मुक्तिधामला जावे लागेल. हे शरीररुपी वस्त्र इथेच सोडायचे आहे मग आत्मा घरी निघून जाईल. जसे हदच्या नाटकातील ॲक्टर्स असतात, नाटक पूर्ण झाले कि कपडे तिथेच सोडून घरचे कपडे घालून घरी जातात. तुम्हाला देखील आता हा चोला (शरीर) सोडून जायचे आहे. सतयुगामध्ये तर थोडे देवता असतात. इथे तर किती अगणित मनुष्य आहेत. तिथे (सतयुगामध्ये) तर असेलच एक आदि सनातन देवी-देवता धर्म. आता तर स्वतःला हिंदू म्हणतात. आपल्या श्रेष्ठ धर्माला आणि कर्माला विसरून गेले आहेत तेव्हाच तर दुःखी झाले आहेत. सतयुगामध्ये तुमचे श्रेष्ठ कर्म, धर्म होता. आता कलियुगात धर्म भ्रष्ट आहेत. बुद्धीमध्ये येते की आपण कसे कोसळलो (कसे पतन झाले)? आता तुम्ही बेहदच्या बाबांचा परिचय देता. बेहदचे बाबाच येऊन नवी दुनिया स्वर्ग रचतात. म्हणतात - मनमनाभव. हे गीतेतीलच शब्द आहेत. सहज राजयोगाच्या ज्ञानाचे नाव ठेवले जाते - ‘गीता’. हि तुमची पाठशाळा आहे. मुले येऊन शिकतात तर म्हणतील - ‘आमच्या बाबांची पाठशाळा आहे’. जसे कोणा मुलाचे वडील प्रिन्सिपल असतील तर मुले म्हणतील - ‘आम्ही आमच्या वडीलांच्या कॉलेजमध्ये शिकतो’. त्यांची आई सुद्धा प्रिन्सिपल असेल तर म्हणतील, ‘माझे आई-वडील दोघेही प्रिन्सिपल आहेत. दोघेही शिकवतात. आमच्या आई-बाबांचे कॉलेज आहे’. तुम्ही म्हणाल - ‘आमच्या मम्मा-बाबांची पाठशाळा आहे. दोघेही शिकवतात. दोघांनी हे रुहानी कॉलेज अथवा युनिव्हर्सिटी उघडली आहे. दोघे एकत्र शिकवतात’. बाबांनी मुलांना ॲडॉप्ट केले आहे. या अतिशय गूढ ज्ञानाच्या गोष्टी आहेत. बाबा काही कोणती नवीन गोष्ट सांगत नाहीत. हे तर कल्पापूर्वी देखील स्पष्ट करून सांगितले आहे. हो, एवढे ज्ञान आहे जे दिवसेंदिवस गुह्य होत जाते. आत्म्याविषयीचे स्पष्टीकरण बघा आता तुम्हाला कसे मिळते आहे. एवढ्या छोट्याशा आत्म्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट भरलेला आहे. तो कधी नाश पावत नाही. आत्मा अविनाशी तर त्यात पार्ट देखील अविनाशी आहे. आत्म्याने कानांद्वारे ऐकले. शरीर आहे तर पार्ट आहे. शरीरापासून आत्मा वेगळी होते तर उत्तर मिळत नाही. आता बाबा म्हणतात - मुलांनो, तुम्हाला परत घरी यायचे आहे. हे पुरुषोत्तम युग जेव्हा येते तेव्हाच परत जायचे असते, यामध्ये मुख्य पवित्रताच पाहिजे. शांतीधाममध्ये तर पवित्र आत्मेच राहतात. शांतीधाम आणि सुखधाम दोन्हीही पवित्र धाम आहेत. तिथे शरीर नाहीये. आत्मा पवित्र आहे, तिथे बॅटरी डिस्चार्ज होत नाही. इथे शरीर धारण केल्याने मोटार चालते. मोटार उभी राहिली तर पेट्रोल कमी थोडेच होईल? आता तुमच्या आत्म्याची ज्योत खूप कमी झाली आहे. एकदम विझून जात नाही. जेव्हा कोणी मरते तर दिवा पेटवतात. मग त्याला खूप सांभाळतात की विझून जाऊ नये. आत्म्याची ज्योत कधी विझत नाही, ती तर अविनाशी आहे. या सर्व गोष्टी बाबा बसून समजावून सांगतात. बाबा जाणतात की ही खूप स्वीट मुले आहेत, ही सर्व कामचितेवर बसून जळून भस्म झाली आहेत. पुन्हा यांना जागे करतो. एकदमच तमोप्रधान मुडदे बनले आहेत. बाबांना जाणतच नाहीत. मनुष्य काहीच कामाचे राहिलेले नाहीत. मनुष्याची माती कोणत्याही कामाची राहत नाही. असे नाही की मोठ्या व्यक्तीची माती काही कामाची आहे आणि गरिबांची नाही. माती तर मातीतच मिसळून जाते मग कोणीही असो. कोणी जाळतात, कोणी कबरीमध्ये बंद करून ठेवतात. पारशी लोक विहिरीवर ठेवून देतात मग पक्षी मांस खाऊन टाकतात. मग हाडे जाऊन खाली पडतात. ती तरीदेखील कामी येतात. दुनियेमध्ये तर पुष्कळ मनुष्य मरतात. आता तुम्हाला तर स्वतःहून शरीर सोडायचे आहे. तुम्ही इथे आलेच आहात शरीर सोडून परत घरी जाण्यासाठी अर्थात मरण्यासाठी. तुम्ही आनंदाने जाता की आम्ही जीवनमुक्तीमध्ये जाणार.

ज्यांनी जो पार्ट बजावला आहे, शेवटपर्यंत तोच बजावतील. बाबा पुरुषार्थ करून घेत राहतील, साक्षी होऊन पाहत राहतील. ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे, यामध्ये घाबरण्याची काहीच गरज नाही. आम्ही स्वर्गामध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करून स्वतःच शरीर सोडून देतो. बाबांचीच आठवण करत रहायचे आहे. तर अंत मती सो गती होईल, यामध्ये मेहनत आहे. प्रत्येक शिक्षणामध्ये मेहनत आहे. ईश्वराला येऊन शिकवावे लागते. जरूर शिक्षण मोठे असेल, यामध्ये दैवी गुण देखील पाहिजेत. हे लक्ष्मी-नारायण बनायचे आहे ना. हे सतयुगामध्ये होते. आता पुन्हा तुम्ही सतयुगी देवता बनण्यासाठी आले आहात. एम ऑब्जेक्ट किती सोपे आहे. त्रिमूर्तीच्या चित्रामध्ये देखील क्लियर आहे. हे ब्रह्मा, विष्णु, शंकर इत्यादीचे चित्र नसेल तर आम्ही कसे समजावून सांगू शकतो. ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो ब्रह्मा. ब्रह्माच्या ८ भुजा, १०० भुजा दाखवतात कारण ब्रह्माची किती अनेक मुले आहेत. तर त्यांनी मग ते चित्र बनवले आहे. बाकी मनुष्य काही इतक्या भुजावाला थोडाच असतो. रावणाच्या दहा डोक्यांचा देखील अर्थ आहे, असा मनुष्य नसतो. हे बाबाच बसून समजावून सांगतात, मनुष्य तर काहीही जाणत नाहीत. हा देखील खेळ आहे, हे कोणालाही माहित नाही आहे की हा केव्हा सुरू झाला. परंपरा म्हणतात. अरे ती देखील कधीपासून? तर गोड-गोड मुलांना बाबा शिकवतात, ते टीचर देखील आहेत तर गुरु देखील आहेत. तर मुलांना किती खुशी झाली पाहिजे.

हे म्युझियम इत्यादी कुणाच्या डायरेक्शनने उघडता? इथे आहेतच आई-वडील आणि मुले. पुष्कळ मुले आहेत. डायरेक्शन प्रमाणे म्युझियम उघडत राहतात. लोक म्हणतात - ‘तुम्ही म्हणता भगवानुवाच तर रथाद्वारे आम्हाला ईश्वराचा साक्षात्कार घडवा’. अरे, तुम्ही आत्म्याचा साक्षात्कार केला आहे का? इतक्या छोट्याशा बिंदूचा साक्षात्कार तुम्ही काय करू शकाल! गरजच नाहीये. हे तर आत्म्याला जाणायचे असते. आत्मा भ्रुकुटीच्या मध्यभागी राहते, ज्याच्या आधारावरच इतके मोठे शरीर चालते. आता तुमच्याजवळ ना लाईटचा ना रत्नजडित ताज आहे. दोन्ही ताज घेण्यासाठी परत तुम्ही पुरुषार्थ करत आहात. कल्प-कल्प तुम्ही बाबांकडून वारसा घेता. बाबा विचारतात - ‘आधी कधी भेटले आहात?’ तर म्हणतात - ‘हो बाबा कल्प-कल्प भेटत आलो आहोत.’ कशासाठी? हे लक्ष्मी-नारायण बनण्यासाठी. हे सर्वजण एकच गोष्ट बोलतील. बाबा म्हणतात - ‘अच्छा शुभ बोलता, आता पुरुषार्थ करा’. सर्वच काही लक्ष्मी-नारायण बनणार नाहीत. प्रजा सुद्धा हवी. कथा देखील होते सत्यनारायणाची. ते लोक कथा ऐकवतात, परंतु काहीही बुद्धीमध्ये येत नाही. तुम्ही मुले समजता ते आहे शांतीधाम, निराकारी दुनिया. मग तिथून जाल सुखधामला. सुखधाममध्ये घेऊन जाणारे एक बाबाच आहेत. तुम्ही कोणालाही समजावून सांगा, बोला - आता परत घरी जाणार? आत्म्याला आपल्या घरी तर अशरिरी बाबाच घेऊन जातील. आता बाबा आले आहेत, त्यांना जाणतच नाहीत. बाबा म्हणतात - ‘मी ज्या तनामध्ये आलो आहे, त्याला (ब्रह्मा बाबांना) देखील जाणत नाहीत’. रथ सुद्धा आहे ना. प्रत्येक रथामध्ये आत्मा प्रवेश करते. सर्वांची आत्मा भृकुटीच्या मध्यभागी राहते. बाबा येऊन भृकुटीमध्ये बसतील. सांगतात तर खूप सोपे करून. पतित-पावन तर एक बाबाच आहेत, बाबांची सर्व मुले एकसमान आहेत. त्यांच्यामध्ये प्रत्येकाचा आपला-आपला पार्ट आहे, यामध्ये कोणीही इंटरफेअर (ढवळाढवळ) करू शकत नाही. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

१) या शरीर रुपी कपड्यातून मोह काढून जिवंतपणी मरायचे आहे अर्थात आपले सर्व जुने हिशोब चुकते करायचे आहेत.

२) डबल ताजधारी बनण्यासाठी अभ्यासाची मेहनत करायची आहे. दैवी गुण धारण करायचे आहेत. जसे लक्ष्य आहे, शुभ बोल आहेत, तसा पुरुषार्थ करायचा आहे.

वरदान:-
अकल्याणाच्या संकल्पाला समाप्त करून अपकारींवर उपकार करणारे ज्ञानी तू आत्मा भव

कोणी रोज तुमची ग्लानी करो, अकल्याण करो, शिव्या देवो - तरीदेखील त्यांच्या प्रति मनामध्ये घृणा भाव येऊ नये, अपकारीवर देखील उपकार - हेच ज्ञानी तू आत्म्याचे कर्तव्य आहे. जसे तुम्ही मुलांनी बाबांना ६३ जन्म शिव्या दिल्या तरी देखील बाबांनी कल्याणकारी दृष्टीने पाहिले, तर फॉलो फादर. ज्ञानी तू आत्म्याचा अर्थच आहे सर्वांप्रती कल्याणाची भावना. अकल्याण संकल्पमात्र सुद्धा असू नये.

बोधवाक्य:-
मनमनाभवच्या स्थितीमध्ये स्थित रहा तर इतरांच्या मनातील भावांना जाणू शकाल.