01-08-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो,
परचिंतन करणे सोडून देऊन आपले कल्याण करा, तुम्ही सोन्यासारखे बनून इतरांना मार्ग
सांगा”
प्रश्न:-
जे अशरीरी
बनण्याचा अभ्यास नियमितपणे करतात, त्यांचे मुख्य लक्षण सांगा?
उत्तर:-
ते आपल्या
कर्मेंद्रियांना कधीही हट्टाने वश करत नाहीत, परंतु त्यांची कर्मेंद्रिये स्वतःच
शीतल बनतात. आपण आत्मे भाऊ-भाऊ आहोत, ही स्मृती स्वतःच राहते. देह-अभिमान नाहीसा
होतो. नावा-रूपाचा नशा नष्ट होत जातो. दुसऱ्यांची आठवण येत नाही.
गीत:-
तू प्यार का
सागर है...
ओम शांती।
हे काही फक्त
प्रेमाचा सागर नाहीत, तर ज्ञानाचाही सागर आहेत. ज्ञान आणि अज्ञान. ज्ञानाला - दिवस,
अज्ञानाला - रात्र, म्हटले जाते. ‘ज्ञान’ हा शब्दच खूप सुंदर आहे. ‘अज्ञान’ शब्द
वाईट आहे. अर्धा कल्प आहे - ज्ञानाचे प्रारब्ध. अर्धा कल्प आहे - अज्ञानाचे
प्रारब्ध. अज्ञानाचे प्रारब्ध आहे - दुःख. ज्ञानाचे प्रारब्ध आहे - सुख. या गोष्टी
समजायला तर अगदी सोप्या आहेत. दिवस आहे - ज्ञानाचा, रात्र आहे - अज्ञान. हे देखील
कोणालाही माहीत नाहीये की, ज्ञान कशाला म्हटले जाते, अज्ञान कशाला म्हटले जाते, या
बेहदच्या गोष्टी आहेत. तुम्ही सर्वांना समजावून सांगता - ज्ञान काय आहे, भक्ती काय
आहे. ज्ञानाद्वारे तुम्ही पूज्य बनत आहात. जेव्हा पूज्य बनता तेव्हा पूजेच्या
सामग्रीला जाणता. हे देखील तुम्ही जाणता की ही जी मंदिरे इत्यादी आहेत, ही सर्व
यादगार आहेत. त्यांच्या जीवन कहाणीला देखील तुम्ही जाणता. जे पूजा करायला जातात ते
स्वतः जाणत नाहीत. पूजेला भक्ती म्हटले जाते, भगवंताला भक्तांना भेटायचे आहे -
भक्तीचे फळ देण्याकरिता. ते तर स्वतः भगवंतच येऊन पुजारी पासून पूज्य बनवतात. पूज्य
सतयुगामध्ये असतात, पुजारी कलियुगामध्ये असतात. तुम्ही मुले जाणता - आज काय आहोत आणि
उद्या काय बनणार आहोत. विनाश तर जरूर होणार आहे, कोणत्याही वेळी होऊ शकतो. तयारी
सुरु आहे. गायले देखील आहे - अनेक नैसर्गिक आपत्ती येतात. हे तर स्पष्टपणे नमूद केले
पाहिजे की, गृह-युद्ध आणि नैसर्गिक आपत्ती, त्यांना काही ‘ईश्वरीय आपत्ती’ म्हणता
येणार नाही. ही तर ड्रामाची नोंद आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती
येणार आहेत. त्या विनाशकार्यामध्ये देखील मदत करतील. मुसळधार पाऊस पडेल.
अन्न-पाण्याविना मृत्यू होतील, भूकंप इत्यादी सर्व काही होणार आहे. यांच्याद्वारेच
विनाश होणार आहे. मुले जाणतात, हे तर जरूर व्हायचेच आहे. अन्यथा सतयुगामध्ये इतकी
कमी माणसे कशी असतील, निश्चितपणे एकत्र विनाश होईल. मुले चांगल्या रीतीने जाणतात,
हे सर्व कपडे धुतले जातील (आत्म्यांना स्वच्छ केले जाईल). ही बेहदची खूप मोठी मशिनरी
आहे. गायले जाते - ‘मूत पलीती कपड़े धोए…’ ही या स्थूल कपड्यांची गोष्ट नाहीये. ही
शरीराची गोष्ट आहे. आत्म्यांना योगबलाद्वारे धुवायचे आहे. यावेळी ५ तत्त्वे
तमोप्रधान आहेत तर शरीरे देखील अशीच बनतात. पतित-पावन बाबा येऊन पावन बनवतात आणि
बाकीचे सर्व नष्ट होतात. तुम्ही जाणता पावन कसे बनतात. मार्ग तर खूप सोपा सांगतात.
मनुष्यांना तर काहीही समजत नाही. जिथे-जिथे भक्ती, यज्ञ इत्यादी होत असतात, तिथे
जाऊन समजावून सांगितले पाहिजे की, ज्यांची तुम्ही भक्ती करता, त्यांची बायोग्राफी
समजून घेतल्यानेच तुम्ही देवता बनू शकता. त्यांनी (देवतांनी) जीवनमुक्ती कशी
प्राप्त केली, ते तर समजून घ्या, म्हणजे मग तुम्ही देखील जीवनमुक्ती प्राप्त करू
शकता. मंदिरांमध्ये बसून जीवन कहाणी समजावून सांगितल्यास चांगल्या रीतीने समजतील.
तुम्ही देखील
बाबांकडून आता जीवन कहाणी ऐकता, तुम्हा मुलांना किती समज मिळते (ज्ञान मिळते).
परमपिता परमात्म्याची जीवन कहाणी कोणीही जाणत नाही. सर्वव्यापी म्हटल्याने जीवन
कहाणी थोडीच होते. तुम्ही मुले आता परमपिता परमात्म्याच्या जीवन कहाणीला जाणता,
अर्थात आदि-मध्य-अंताला जाणता. या काळाला आदि म्हणता येईल, जेव्हा की बाबा येऊन
पतितांना पावन बनवतात, मग मध्य काळामध्ये भक्तीचा पार्ट चालतो. बाबा म्हणतात, यावेळी
मी येऊन स्थापना करतो आणि करवून घेतो. मी करनकरावनहार आहे. प्रेरणेला ‘करणे’ म्हणता
येणार नाही. बाबा येऊन यांच्या कर्मेंद्रियांद्वारे (ब्रह्माबाबांच्या तनाद्वारे)
करतात, यामध्ये प्रेरणेचा प्रश्नच नाही. करन-करावनहार तर जरूर सन्मुख येऊन करवून
घेतील. प्रेरणेने काहीही होऊ शकत नाही. शरीराशिवाय आत्मा काहीही करू शकत नाही.
अनेकजण म्हणतात की, ईश्वरच प्रेरणेद्वारे सर्व काही करतो. “बाबा, तुम्ही माझ्या
पतीला प्रेरणा द्या आणि त्यांची बुद्धी ठीक करा”! बाबा म्हणतात - यामध्ये प्रेरणेचा
तर प्रश्नच नाही. मग शिव जयंती का साजरी केली जाते? प्रेरणेद्वारे जर काम होणार
असेल तर मग येतीलच कशासाठी? एक तर ईश्वर काय चीज आहे, हेच कोणी जाणत नाहीत. फक्त
म्हणतात - ईश्वराच्या प्रेरणेने सर्व काही होते. निराकार प्रेरणेद्वारे कसे काम
करतील, ते तर करनकरावनहार आहेत. येऊन मार्ग सांगतात. कर्मेंद्रियांद्वारे मुरली
चालवतात. जोपर्यंत कर्मेंद्रियांचा आधार घेत नाहीत, तोपर्यंत मुरली कशी चालवतील.
ज्ञानाचा सागर आहेत तर ऐकविण्यासाठी मुख पाहिजे ना.
आता तुम्हा मुलांना
संपूर्ण दुनियेच्या आदि-मध्य-अंता बद्दल ठाऊक झाले आहे. पूर्ण नॉलेज मिळाले आहे.
समजतात, ज्ञाना शिवाय गती नाही. ज्ञान कोण देईल. अज्ञान मार्ग आणि ज्ञान मार्गामध्ये
फरक तर बघा ना. ‘विज्ञान’ असे देखील म्हटले जाते. अज्ञान आहे अंधार, बाकी ज्ञान आणि
विज्ञानाला आपण मुक्ती-जीवनमुक्ती देखील म्हणू शकतो. तुम्हाला आता पावन बनण्याचे
ज्ञान मिळते. तुम्ही स्वदर्शन चक्रधारी बनता. कोणी ऐकतील तर आश्चर्यचकित होतील.
म्हणतील - ‘आत्मा ज्ञान घेते तर आत्मा जरूर संस्कार घेऊन जाईल ना’. मनुष्यापासून
देवता बनता तर ज्ञान राहिले पाहिजे. परंतु बाबा समजावून सांगत आहेत, हा पुरुषार्थ
आहे प्रारब्धासाठी. प्रारब्ध मिळाले की त्यानंतर मग ज्ञानाची काय गरज आहे. सतयुग
आहेच तुम्हा मुलांसाठी प्रारब्ध. या गोष्टी ऐकल्यानेच आश्चर्यचकित होतील. हे ज्ञान
परंपरेने चालत नाही, असे का? बाबा म्हणतात - हे प्रायः लोप होते. दिवस झाला की मग
अज्ञान तर असणारच नाही, ज्यामुळे ज्ञानाची गरज भासेल. या देखील समजून घेण्याच्या आणि
समजावून सांगण्याच्या गोष्टी आहेत. लगेचच कोणी समजू शकणार नाही. शिवबाबा भारतातच
येतात, मुलांसाठी सौगात घेऊन येतात, भक्तीचे फळ देण्याकरिता. भक्ती नंतर आहे सद्गती.
हा विनाश देखील होणार जरूर. तशी चिन्हे समोर दिसून येत आहेत. तुम्ही ऐकत रहाल -
ठिणगी पडते तर एक-दोन तासात सारे घर जळून भस्म होते. ही काही नवीन गोष्ट नाहीये,
विनाश तर जरूर होणार आहे. सतयुगामध्ये फार थोडे मनुष्य असतात, श्रेष्ठाचारी असतात.
तर श्रेष्ठाचारी बनण्याकरिता किती मेहनत लागते. माया एकदम नाकालाच पकडते. अशा
प्रकारे घसरणाऱ्यांना खूप मोठी हानी होते, त्यातून सावरण्यास खूप वेळ लागतो.
मोठ्यात मोठा घाव आहे काम विकाराचा, म्हणून म्हटले जाते - ‘काम महाशत्रू आहे’. हाच
पतित बनवतो. कामविकारावरूनच भांडण होते. जर पती विकाराशिवाय सोडत नसेल तर माता जरूर
म्हणतील - ‘यापेक्षा भांडी घासणे चांगले. झाडू-पोछा करेन, परंतु पवित्र राहीन’,
यासाठी खूप हिंमत पाहिजे. जेव्हा कोणी बाबांच्या शरणमध्ये (आश्रयाला) येतात तेव्हा
मग माया देखील संघर्ष करू लागते. ५ विकारांचा आजार अजूनच उफाळून येतो. सर्वात पहिले
तर पक्के निश्चय-बुद्धी असले पाहिजे. जिवंतपणी मेलेले आहोत. इथून नांगर उचलला आहे.
कलियुगी, विकारी किनारा तुम्ही सोडला आहे. आता आम्ही यात्रेवर जात आहोत - आम्ही
अशरीरी होऊन आपल्या घरी जात आहोत. आत्म्याला हे ज्ञान आहे की आपण एक शरीर सोडून
दुसऱ्या शरीरामध्ये जाणार. आम्ही गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमलपुष्प समान पवित्र
बनून यात्रेवर राहतो. बुद्धीमध्ये आठवण राहावी की हे तर कब्रस्तान आहे, मग आपण
सुखधामामध्ये जाणार आहोत. आम्हाला वारसा देण्याची युक्ती बाबा सांगत आहेत. पावन
बनण्याकरिता आम्ही योगमध्ये (आठवणीमध्ये) राहतो. आठवणीद्वारेच विकर्म विनाश होतील
तेव्हा आत्मा शरीर सोडेल. यात्रा किती वंडरफुल आहे. फक्त बाबांची आठवण करा आणि
आपल्या राजधानीची आठवण करा. इतकी सोपी गोष्ट देखील लक्षात राहत नाही. अल्फची आठवण
करा, बस्स. परंतु माया तेवढी सुद्धा आठवण करू देत नाही, मेहनत करावी लागते.
आत्म्याला ज्ञान मिळाले आहे, आमचे बाबा आलेले आहेत. आत्मा शिकते ना. आत्मा शरीरा
द्वारे जन्म घेते. आत्मे भाऊ-भाऊ आहेत. देह-अभिमानामध्ये आल्याने मग अनेक नाती
होतात. इथे तुम्ही भाऊ-बहीणी आहात. आपसामध्ये भाऊ-भाऊ देखील आहात, बहीण-भाऊ देखील
आहात. प्रवृत्ती मार्ग आहे ना. दोघांनाही वारसा पाहिजे. आत्माच पुरुषार्थ करते.
स्वतःला आत्मा समजणे - हीच मेहनत आहे. देह-अभिमान राहू नये. शरीरच नसेल तर विकार
कोणाशी करतील. ‘मी आत्मा आहे, बाबांकडे जायचे आहे’; शरीराचे भानच राहू नये. जितके
योगी बनत जाल, तितकी कर्मेंद्रिये शांत होत जातील. देह-अभिमानामध्ये आल्याने
कर्मेंद्रिये चंचल होतात. आत्मा जाणते, आपल्याला प्राप्ती होत आहे. शरीरापासून वेगळे
होत जाल, तर कर्मेंद्रिये शांत होत जातील. संन्यासी लोक औषधे खाऊन कर्मेंद्रियांना
शांत करतात. तो तर हठयोग झाला ना. तुम्हाला तर ‘योग’चा वापर करायचा आहे.
कर्मेंद्रियांना तुम्ही योगबलाने वश करू शकत नाही काय? जितके आत्म-अभिमानी होत जाल
तर कर्मेंद्रिये शांत होत जातील. खूप मेहनत करावी लागते, प्राप्ती तर खूप श्रेष्ठ
आहे ना. बाबा म्हणतात, योगबलाने तुम्ही विश्वाचे मालक बनता. कर्मेंद्रियांवर विजय
प्राप्त करता म्हणून भारताचा योग नामीग्रामी आहे. तुम्ही मनुष्यापासून देवता,
पतितापासून पावन बनता. प्रजा देखील स्वर्गवासी तर आहे ना. योगबलाने तुम्ही
स्वर्गवासी बनता, बाहुबळाने बनू शकत नाही. जास्त काही मेहनत नाहीये. यासाठी
कुमारींना तर मेहनतीची गरजच नाही. त्या फ्री आहेत (मुक्त आहेत). विकारामध्ये गेली
तर मोठी पंचाईत होते. कुमारी राहणे चांगले आहे. नाही तर मग अधर-कुमारी नाव पडते.
युगल देखील बनण्याची गरजच काय! यामध्ये देखील नावा-रूपाचा नशा चढतो. हा देखील
मूर्खपणा आहे. युगल (विवाहित) बनल्या नंतर मग पवित्र राहण्यासाठी खूप चांगली हिंमत
पाहिजे. ज्ञानाची पूर्ण पराकाष्ठा पाहिजे. असे पुष्कळ आहेत जे हिंमत करतात, परंतु
आगीची झळ आली तर मग खेळ संपला; म्हणून बाबा सांगतात, कुमारी तरीही चांगली आहे.
अधर-कुमारी बनण्याचा विचार तरी का केला पाहिजे. कुमारींचे नाव प्रसिद्ध आहे. बाल
ब्रह्मचारी आहेत. बाल ब्रह्मचारी राहणे चांगले आहे, ताकद असते. दुसऱ्या कोणाचीही
आठवण येणार नाही. बाकी हिंमत असेल तर करून दाखवा, परंतु मेहनत आहे. लग्न केल्याने
एकाचे दोन होतात ना. कुमारी आहे तर एकटी आहे. दोघे झाल्याने द्वैत येते. जितके शक्य
आहे कुमारी होऊन राहणे चांगले आहे. कुमारी सेवेसाठी बाहेर जाऊ शकते. बंधनामध्ये
पडल्याने मग बंधन वृद्धीला प्राप्त होते. असे जाळे पसरवायचेच कशाला, ज्यामध्ये
बुद्धी अडकून पडेल. अशा जाळ्यामध्ये अडकणे ठीक नाही. कुमारींसाठी तर खूप चांगले आहे.
कुमारींनी नाव देखील गाजवले आहे. ‘कन्हैया’ नाव गायले जाते ना. कुमारी होऊन राहणे
खूप चांगले आहे. यांच्यासाठी खूप सोपे आहे. स्टुडंट लाईफ पवित्र लाईफ देखील आहे.
बुद्धी देखील फ्रेश राहते. कुमारांना भीष्म पितामह सारखे बनायचे आहे. कल्पापूर्वी
देखील राहिले आहेत, तेव्हाच तर दिलवाडा मंदिरामध्ये यादगार बनलेले आहे.
आता बाबा मुलांना
आदेश देत आहेत - ‘माझी आठवण करा’. इतर सर्व गोष्टी सोडून तुम्ही आपले कल्याण करा.
बाबांची आठवण करण्यातच कल्याण आहे. चूक-भूल होते, मुले घसरतात (अधोगती होते), तुम्ही
परचिंतन सोडून आपले कल्याण करा. बाकीच्या चिंतनामध्ये जाऊच नका. तुम्ही सोन्यासारखे
बना आणि इतरांनाही मार्ग सांगा. सतोप्रधान बनण्याचा एकच उपाय आहे. पावन बनल्या
शिवाय मुक्तिधाम मध्ये जाऊ शकत नाही. उपाय एकच आहे, मग ‘अंत मति सो गति’ होईल.
झरमुई-झगमुई (व्यर्थ गोष्टी) सोडून द्या. नाही तर आपलेच नुकसान कराल. बाबा काही शाप
देत नाहीत. श्रीमतावर चालत नाहीत, तर मग आपणच आपल्याला शापित करतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
निश्चय-बुद्धी बनून जिवंतपणी या जुन्या दुनियेमधून आपला नांगर उचलायचा आहे.
बाबांच्या प्रत्येक आदेशाचे पालन करून आपले कल्याण करायचे आहे.
२) दुसऱ्यांविषयीचे
चिंतन सोडून आपल्या बुद्धीला स्वच्छ सोन्यासारखे बनवायचे आहे. झरमुई-झगमुईमध्ये (व्यर्थ
गोष्टींमध्ये) आपला वेळ वाया घालवायचा नाही. योगबलाने आपल्या कर्मेंद्रियांना शांत,
शीतल बनवायचे आहे.
वरदान:-
आपल्या विजयाला
अथवा सफलतेला निश्चित समजून सदैव ‘निश्चिंत’ राहणारे निश्चय-बुद्धी भव
जी मुले सदैव बाबांवर,
स्वतःच्या पार्टवर आणि ड्रामाच्या प्रत्येक सेकंदाच्या ॲक्टवर १०० टक्के
निश्चय-बुद्धी आहेत, त्यांचा विजय अथवा सफलता निश्चित आहे. निश्चित विजय
असल्याकारणाने ते सदैव निश्चिंत राहतात. त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची कोणतीही रेषा
दिसून येणार नाही. त्यांना कायम निश्चय असतो की, हे कार्य अथवा हा संकल्प सिद्ध
झालेलाच आहे. त्यांना कधीही कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत प्रश्न उठू शकत नाही.
बोधवाक्य:-
ऐकणे-ऐकविण्यामध्ये ‘भावना’ आणि ‘भाव’ बदलून टाकणे म्हणजेच वातावरण खराब करणे आहे.
हे अव्यक्त इशारे -
अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.
संपूर्ण पवित्रतेच्या
हिशोबाने व्यर्थ संकल्प देखील अपवित्रतेचे बीज आहे. व्यर्थ संकल्प चालणे, मेजॉरिटी
मुलांमध्ये अजून हा संस्कार राहिलेला आहे. व्यर्थ संकल्पाचा आधार ‘मन’ आहे, जे
‘मनमनाभव’ होऊ देत नाही, त्यामुळे श्रीमतरूपी लगाम टाइट करून व्यर्थ संकल्पांच्या
अपवित्रतेला नष्ट करा.