01-09-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला या पुरुषोत्तम संगम युगावरच उत्तम ते उत्तम पुरुष बनायचे आहे,
सर्वात उत्तम पुरुष आहेत हे लक्ष्मी-नारायण”
प्रश्न:-
तुम्ही मुले
बाबांसोबत कोणते एक गुप्त कार्य करत आहात?
उत्तर:-
आदि सनातन देवी-देवता धर्म आणि दैवी राजधानीची स्थापना - तुम्ही बाबांसोबत गुप्त
रूपामध्ये हे कार्य करत आहात. बाबा बागवान आहेत जे येऊन काट्यांच्या जंगलाला फुलांचा
बगीचा बनवत आहेत. त्या बगीच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या भयानक दुःख देणाऱ्या
गोष्टी असत नाहीत.
गीत:-
आखिर वह दिन
आया आज…
ओम शांती।
रूहानी बाबा बसून रूहानी मुलांना समजावून सांगत आहेत. सांगतील तर जरूर शरीराद्वारे.
आत्मा शरीराशिवाय कोणतेही कार्य करू शकत नाही. रूहानी बाबांना देखील एकदाच
पुरुषोत्तम संगमयुगावर शरीर घ्यावे लागते. हे संगमयुग देखील आहे, याला पुरुषोत्तम
युग देखील म्हणणार कारण या संगमयुगा नंतर मग सतयुग येते. सतयुगाला देखील पुरुषोत्तम
युग म्हणणार. बाबा येऊन स्थापना देखील पुरुषोत्तम युगाचीच करतात. संगमयुगावर येतात
तर जरूर ते देखील पुरुषोत्तम युग झाले. इथेच मुलांना पुरुषोत्तम बनवितात. मग तुम्ही
पुरुषोत्तम नवीन दुनियेमध्ये राहता. पुरुषोत्तम अर्थात उत्तम ते उत्तम पुरुष हे
राधे-कृष्ण अथवा लक्ष्मी-नारायण आहेत. हे ज्ञान देखील तुम्हालाच आहे. इतर धर्मवाले
देखील मानतील खरोखर हे हेवनचे मालक आहेत. भारताची खूप मोठी महिमा आहे. परंतु
भारतवासी स्वतःच जाणत नाहीत. म्हणतात देखील ना - ‘अमका स्वर्गवासी झाला’ परंतु
स्वर्ग काय गोष्ट आहे, हे समजत नाहीत. आपणच सिद्ध करतात स्वर्गात गेला, याचा अर्थ
नरकामध्ये होता. स्वर्ग तर जेव्हा बाबा स्थापन करतील. ते तर नवीन दुनियेलाच म्हटले
जाते. दोन गोष्टी आहेत ना - स्वर्ग आणि नरक. मनुष्य तर स्वर्गासाठी लाखो वर्षांचे
आहे असे म्हणतात. तुम्ही मुले समजता की, काल स्वर्ग होता, यांचे राज्य होते पुन्हा
बाबांकडून वारसा घेत आहोत.
बाबा म्हणतात - ‘गोड
लाडक्या मुलांनो, तुमची आत्मा पतित आहे म्हणून नरका मध्येच आहे’. म्हणतात देखील -
अजून कलियुगाची ४० हजार वर्षे बाकी आहेत, तर जरूर कलियुगवासी म्हणणार ना. जुनी
दुनिया तर आहे ना. मनुष्य बिचारे घोर अंधारामध्ये आहेत. शेवटी जेव्हा आग लागेल
तेव्हा हे सर्व नष्ट होतील. तुमची प्रीत-बुद्धी आहे, नंबरवार पुरुषार्था नुसार.
जितकी प्रीत-बुद्धी असेल तितके उच्च पद प्राप्त कराल. पहाटे उठून अतिशय प्रेमाने
बाबांची आठवण करायची आहे. भले प्रेमाचे अश्रू देखील येतील कारण खूप काळानंतर बाबा
येऊन भेटले आहेत. बाबा तुम्ही येऊन आम्हाला दुःखातून सोडविता. आम्ही विषय सागरामध्ये
गटांगळ्या खात किती दुःखी होत आलो आहोत. आता हा आहे रौरव नरक. आता तुम्हाला बाबांनी
संपूर्ण चक्राचे रहस्य समजावून सांगितले आहे. मूलवतन काय आहे - ते देखील येऊन
सांगितले आहे. आधी तुम्ही जाणत नव्हता; याला म्हटलेच जाते काट्यांचे जंगल. स्वर्गाला
म्हटले जाते गार्डन ऑफ अल्लाह, फुलांचा बगीचा. बाबांना बागवान देखील म्हणतात ना.
तुम्हाला फुलापासून काटा कोण बनवतो? रावण. तुम्ही मुले समजता - भारत फुलांचा बगीचा
होता, आता जंगल आहे. जंगलामध्ये पशू, विंचू इत्यादी राहतात. सतयुगामध्ये कोणतेही
भयानक पशू इत्यादी नसतात. शास्त्रांमध्ये तर खूप गोष्टी लिहिल्या आहेत -
श्रीकृष्णाला सर्प डसला, असे झाले. आणि मग श्रीकृष्णाला द्वापरमध्ये घेऊन गेले आहेत.
बाबांनी समजावून सांगितले आहे - भक्ती एकदम वेगळी गोष्ट आहे, ज्ञान सागर एक बाबाच
आहेत. असे नाही की ब्रह्मा-विष्णू-शंकर ज्ञानाचे सागर आहेत. नाही, ‘पतित-पावन’ एकाच
ज्ञान सागराला म्हणणार. ज्ञानाद्वारेच मनुष्याची सद्गती होते. सद्गतीची ठिकाणे दोन
आहेत - मुक्तिधाम आणि जीवनमुक्तीधाम. आता तुम्ही मुले जाणता ही राजधानी स्थापन होत
आहे, परंतु गुप्त. बाबाच येऊन आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करतात, तेव्हा
सर्व आपापल्या मनुष्य तनामध्ये येतात. बाबांना स्वतःचे तन काही नाही आहे, म्हणून
यांना निराकार गॉडफादर म्हटले जाते. बाकी सर्व आहेत साकारी. यांना म्हटले जाते
इनकार्पोरियल गॉडफादर, इनकार्पोरियल आत्म्यांचे (निराकारी ईश्वर पिता, निराकारी
आत्म्यांचे). तुम्ही आत्मे देखील तिथेच राहता. बाबा देखील तिथेच राहतात. परंतु आहेत
गुप्त. बाबाच येऊन आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करतात. मूलवतनमध्ये कोणतेही
दुःख नसते. बाबा म्हणतात - तुमचे कल्याण आहेच मुळी एका गोष्टीमध्ये - बाबांची आठवण
करा, मनमनाभव. बस्स, बाबांचा मुलगा बनला, मुलाला वारसा निश्चित आहे. ‘अल्फ’ची आठवण
केली तर सतयुगी नवीन दुनियेचा वारसा जरूर आहे. या पतित दुनियेचा विनाश देखील जरूर
होणारच आहे. अमरपुरीमध्ये जायचेच आहे. अमरनाथ तुम्हा पार्वतींना अमरकथा ऐकवत आहेत.
तीर्थांवर किती लोक जातात, अमरनाथला किती जातात. तिथे आहे तर काहीच नाही. सर्व आहे
फसवणूक. किंचितही खरेपणा नाही. गायले देखील जाते - ‘झूठी काया झूठी माया…’ याचा
देखील अर्थ असला पाहिजे. इथे आहेच खोटे. ही देखील ज्ञानाची गोष्ट आहे. असे नाही की
ग्लासाला ग्लास म्हणणे खोटे आहे. बाकी बाबांविषयी जे काही बोलतात ते खोटे बोलतात.
खरे बोलणारे एक बाबाच आहेत. आता तुम्ही जाणता बाबा येऊन खरी-खरी सत्यनारायणाची कथा
ऐकवतात. खोटे हिरे-मोती देखील असतात ना. आज-काल खोट्याचा खूप शो आहे. त्याची चमक
इतकी असते की खऱ्या पेक्षाही सुंदर. हे खोटे दगड आधी नव्हते. नंतर परदेशातून आले
आहेत. खोटे खऱ्या सोबत एकत्र करतात, कळतही नाही. मग अशी साधने देखील निघाली ज्यातून
पारख करतात. मोती देखील असे खोटे निघाले आहेत जे जरासुद्धा समजून येत नाहीत. आता
तुम्हा मुलांना कोणताही संशय राहत नाही. संशय असणारे मग येतच नाहीत. प्रदर्शनीमध्ये
किती असंख्य येतात. बाबा म्हणतात - आता मोठी-मोठी दुकाने काढा, हे एकच तुमचे खरे
दुकान आहे. खरी दुकाने तुम्ही उघडता. मोठ्या-मोठ्या संन्याशांची मोठी-मोठी दुकाने
असतात, जिथे मोठ्या-मोठ्या व्यक्ती जातात. तुम्ही देखील मोठी-मोठी सेंटर्स उघडा.
भक्ती मार्गाची सामग्री एकदम वेगळी आहे. असे म्हणणार नाही की, भक्ति सुरुवातीपासून
चालत आली आहे. नाही. ज्ञानाद्वारेच होते सद्गती अर्थात दिवस. तिथे संपूर्ण
निर्विकारी विश्वाचे मालक होते. मनुष्यांना हे देखील माहिती नाही आहे की हे
लक्ष्मी-नारायण विश्वाचे मालक होते. सूर्यवंशी आणि चंद्रवंशी, दुसरा कोणताही धर्म
नसतो. मुलांनी गाणे देखील ऐकले. तुम्ही समजता - शेवटी तो दिवस आला आज संगमाचा, जिथे
आपण येऊन आपल्या बेहदच्या बाबांना भेटलो. बेहदचा वारसा मिळविण्यासाठी पुरुषार्थ करतो.
सतयुगामध्ये तर असे म्हणणार नाही - ‘आखिर वह दिन आया आज…’ ते (दुनियावाले) लोक
समजतात - पुष्कळ धान्य असेल, असे होईल. समजतात की, स्वर्गाची स्थापना आपणच करत आहोत.
समजतात की विद्यार्थ्यांचे नवीन रक्त आहे, हे खूप मदत करतील म्हणून त्यांच्यावर
गव्हर्मेंट खूप मेहनत घेते. आणि मग दगडफेक इत्यादी देखील तेच करतात. गोंधळ
करण्यामध्ये सर्वप्रथम स्टुडंटच पुढे असतात. ते खूप हुशार असतात. त्यांचे नवीन ब्लड
आहे असे म्हणतात. आता नवीन ब्लडची तर काही गोष्टच नाही. ते आहे ब्लड कनेक्शन, आता
तुमचे हे आहे रूहानी कनेक्शन. म्हणतात ना - ‘बाबा, मी तुमचा दोन महिन्याचा मुलगा आहे.
बरीच मुले रुहानी बर्थ डे साजरा करतात. ईश्वरीय बर्थ डेच साजरा केला पाहिजे. तो
भौतिक बर्थडे कॅन्सल केला पाहिजे. आम्ही ब्राह्मणांनाच खाऊ घालणार. साजरा तर हाच
केला पाहिजे ना. तो आहे आसुरी जन्म, हा आहे ईश्वरीय जन्म. रात्रं-दिवसाचा फरक आहे,
परंतु तेव्हा जेव्हा निश्चयामध्ये बसाल. असे नाही, ईश्वरीय जन्म साजरा करून परत
जाऊन आसुरी जन्मामध्येच पडून राहणार. असे देखील होते. ईश्वरीय जन्म साजरा करता-करता
मग रफू-चक्कर होतात. आज-काल तर मॅरेज डे (लग्नाचा वाढदिवस) देखील साजरा करतात,
लग्नाला जसे की चांगले शुभकार्य समजतात. नरकात जाण्याचा देखील दिवस साजरा करतात.
वंडर आहे ना. बाबा बसून या सर्व गोष्टी समजावून सांगतात. आता तुम्हाला तर ईश्वरीय
बर्थ डे ब्राह्मणांसोबतच साजरा करायचा आहे. आपण शिवबाबांची मुले आहोत, आपण बर्थ डे
साजरा करतो तर शिवबाबांचीच आठवण राहील. जी मुले निश्चय-बुद्धी आहेत त्यांनी जन्म
दिवस साजरा केला पाहिजे. तो आसुरी जन्मच विसरून जावा. हा देखील बाबा सल्ला देतात.
जर पक्का निश्चय-बुद्धी असेल तर. बस्स आम्ही तर बाबांचे बनलो, दुसरे ना कोणी; मग
अंत मती सो गती होईल. बाबांच्या आठवणीमध्ये मेला तर दुसरा जन्म देखील असाच मिळेल.
नाहीतर ‘अन्तकाल जो स्त्री सिमरे…’ असे देखील ग्रंथामध्ये आहे. इथे मग म्हणतात -
‘अन्त समय गंगा का तट हो’. या सर्व आहेत भक्ती मार्गाच्या गोष्टी. तुम्हाला बाबा
म्हणतात - शरीर सुटले तरी देखील स्वदर्शन चक्रधारी असावे. बुद्धीमध्ये बाबांची आणि
चक्राची आठवण असावी. ते तर जरूर जेव्हा पुरुषार्थ करत रहाल तेव्हाच तर अंतकाळी आठवण
येईल. स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा, कारण तुम्हा मुलांना आता अशरीरी
होऊन परत जायचे आहे. इथे पार्ट बजावता-बजावता सतोप्रधानापासून तमोप्रधान बनला आहात.
आता पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे. यावेळी आत्माच अपवित्र आहे, तर मग शरीर पवित्र कसे
बरे मिळू शकेल? बाबांनी खूप उदाहरणे समजावून सांगितली आहेत तरीही सोनार आहेत ना.
भेसळ दागिन्यामध्ये नाही तर सोन्यामध्ये पडते. २४ कॅरेट पासून २२ कॅरेट बनवायचे
असेल तर चांदी घालतील. आता काही सोने तर नाही आहे. सर्वांकडून घेत राहतात. आज-काल
नोटा देखील बघा कशा बनवतात. कागद सुद्धा नाहीये. मुले समजतात कल्प-कल्प असे होत आले
आहे. पूर्ण लक्ष ठेवतात. लॉकर्स इत्यादी घेतात. जणूकाही तपासणी वगैरे केली जाते ना.
गायन देखील आहे - ‘किनकी दबी रही धूल में…’ आग देखील भयंकर लागते. तुम्ही मुले जाणता
हे सर्व होणार आहे म्हणून तुम्ही भविष्यासाठी बॅग-बॅगेज तयार करत आहात. आणखी कोणाला
माहिती थोडेच आहे, तुम्हालाच वारसा मिळतो २१ जन्मांसाठी. तुमच्याच पैशातून भारताला
स्वर्ग बनवत आहात, ज्यामध्ये मग तुम्हीच निवास कराल.
तुम्ही मुले आपल्याच
पुरुषार्थाने आपणच राज-तिलक घेता. गरीब निवाज (गरिबांचे कैवारी) बाबा स्वर्गाचा
मालक बनविण्यासाठी आले आहेत परंतु बनतील तर आपल्या अभ्यासाद्वारे. कृपा अथवा
आशीर्वादाने नाही. शिक्षकाचा तर शिकविणे धर्म आहे. कृपेची गोष्ट नाही. शिक्षकाला
गव्हर्मेंट कडून पगार मिळतो. ते तर जरूर शिकवतील. इतके मोठे इनाम मिळते. पद्मापदमपती
बनता. श्रीकृष्णाच्या पायावर पद्मची निशाणी दाखवतात. तुम्ही इथे आला आहात
भविष्यामध्ये पदमपती बनण्यासाठी. तुम्ही खूप सुखी, श्रीमंत, अमर बनता. काळावर विजय
प्राप्त करता. या गोष्टींना मनुष्य समजू शकत नाही. तुमचे आयुष्य पूर्ण होते, अमर
बनता. त्यांनी मग पांडवांची चित्रे उंच-रुंद बनविली आहेत. समजतात की पांडव इतके उंच
होते. आता पांडव तर तुम्ही आहात. किती रात्रं-दिवसाचा फरक आहे. माणूस काही जास्त
उंच तर असत नाही, सहा फुटाचाच असतो. भक्ती मार्गामध्ये सर्वप्रथम शिवबाबांची भक्ती
होते. त्यांना काही मोठे बनवणार नाहीत. आधी शिवबाबांची अव्यभिचारी भक्ती चालते. मग
देवतांच्या मुर्त्या बनतात. त्यांची मग मोठ-मोठी चित्रे (मूर्त्या) बनवतात. मग
पांडवांची मोठी-मोठी चित्रे बनवतात. ही सर्व पूजेसाठी चित्र (मूर्त्या) बनवतात.
लक्ष्मीची पूजा १२ महिन्यातून एकदा होते. जगत-अंबेची पूजा रोज करतात. हे देखील
बाबांनी समजावून सांगितले आहे तुमची डबल पूजा होते. माझी तर फक्त आत्म्याची अर्थात
लिंगाचीच पूजा होते. तुमची शाळीग्रामाच्या रूपामध्ये देखील पूजा होते आणि मग
देवतांच्या रूपामध्ये देखील पूजा होते. रुद्र यज्ञ रचतात तर किती शाळीग्राम बनवतात
तर मोठे कोण झाले? तेव्हाच तर बाबा मुलांना नमस्ते करत असतात. किती उच्च पद प्राप्त
करवून देतात.
बाबा किती
गुह्य-गुह्य गोष्टी ऐकवतात, तर मुलांना किती आनंद झाला पाहिजे. आपल्याला स्वयं
भगवान शिकवत आहेत भगवान-भगवती बनविण्याकरिता. किती आभार मानले पाहिजेत. बाबांच्या
आठवणीमध्ये राहिल्यामुळे स्वप्न देखील चांगली येतील. साक्षात्कार देखील होईल. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) स्वतःचा
ईश्वरीय रूहानी बर्थडे साजरा करायचा आहे, रूहानी कनेक्शन ठेवायचे आहे, ब्लड कनेक्शन
नाही. आसुरी भौतिक बर्थ डे देखील कॅन्सल. त्याची मग आठवण देखील येऊ नये.
२) भविष्यासाठी आपले
बॅग-बॅगेज तयार करायचे आहे. आपले पैसे भारताला स्वर्ग बनविण्याच्या सेवेमध्ये सफल
करायचे आहेत. आपल्या पुरुषार्थाने स्वतःलाच राज-तिलक द्यायचा आहे.
वरदान:-
स्नेह आणि
सहयोगाच्या विधीद्वारे सहज योगी भव
बापदादांना मुलांचा
स्नेहच पसंत आहे, जे यज्ञ स्नेही आणि सहयोगी बनतात ते सहजयोगी स्वतः बनतात. सहयोग
सहजयोग आहे. दिलवाल्या बाबांना हृदयापासूनचा स्नेह आणि हृदयापासूनचा सहयोगच प्रिय
आहे. छोटे मन असणारे छोटा सौदा करून खुश होतात आणि मोठ्या मनाचे बेहदचा सौदा करतात.
व्हॅल्यू स्नेहाची आहे वस्तूची नाही म्हणूनच सुदाम्याच्या कच्च्या पोह्याचे गायन
केले गेले आहे. तसेही भले कोणी कितीही देवो परंतु स्नेह नसेल तर जमा होत नाही.
स्नेहाने थोडे जरी जमा करतात तर ते पदम होते.
बोधवाक्य:-
वेळ आणि शक्ती
व्यर्थ जाऊ नये यासाठी आधी विचार करा नंतर कृती करा.
अव्यक्त इशारे:- आता
लगनच्या (उत्कटतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा.
बापदादा मुलांना
विशेष इशारा देत आहेत - मुलांनो आता तीव्र पुरुषार्थाच्या लगनला अग्नि रूपामध्ये आणा,
ज्वालामुखी बना. जे काही मनाचे, संबंध-संपर्काचे हिशोब राहिलेले आहेत - त्यांना
ज्वाला स्वरूपाच्या आठवणीने भस्म करा.