01-10-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - देही-अभिमानी बनण्याची प्रॅक्टिस करा, या प्रॅक्टिसनेच तुम्ही पुण्य
आत्मा बनू शकाल”
प्रश्न:-
कोणत्या एका
नॉलेजमुळे तुम्ही मुले कायम हर्षित राहता?
उत्तर:-
तुम्हाला नॉलेज मिळाले आहे की हे नाटक अतिशय अप्रतिम बनलेले आहे, यामध्ये प्रत्येक
ॲक्टरचा अविनाशी पार्ट नोंदलेला आहे. सर्वजण आपापला पार्ट बजावत आहेत. या कारणामुळे
तुम्ही कायम हर्षित राहता.
प्रश्न:-
कोणती एक हुनर
(कला) बाबांकडेच आहे, इतरांकडे नाही?
उत्तर:-
देही-अभिमानी बनविण्याची कला एका बाबांकडेच आहे कारण ते स्वतः कायम देही आहेत,
सुप्रीम आहेत. ही कला कोणत्याही मनुष्याला येऊ शकत नाही.
ओम शांती।
आत्मिक मुलांनो अर्थात आत्म्यांप्रती बाबा बसून समजावून सांगतात. स्वतःला आत्मा तर
समजायचे आहे ना. बाबांनी मुलांना समजावून सांगितले आहे - सर्वप्रथम ही प्रॅक्टिस करा
की आपण आत्मा आहोत, ना कि शरीर. जेव्हा स्वतःला आत्मा समजाल तेव्हाच परमपित्याची
आठवण कराल. स्वतःला आत्मा समजला नाहीत तर मग जरूर लौकिक नातेवाईक, धंदा इत्यादी
आठवत राहील म्हणून सर्वप्रथम तर ही प्रॅक्टिस असायला हवी की, मी आत्मा आहे तर मग
रुहानी बाबांची आठवण राहील. बाबा ही शिकवण देतात की, स्वतःला देह समजू नका. हे
ज्ञान बाबा संपूर्ण कल्पामध्ये एकदाच देतात. पुन्हा मग ५ हजार वर्षांनंतर ही माहिती
(ज्ञान) मिळेल. स्वतःला आत्मा समजाल तर बाबांची देखील आठवण येईल. अर्धाकल्प तुम्ही
स्वतःला देह समजले आहात. आता स्वतःला आत्मा समजायचे आहे. जसे तुम्ही आत्मा आहात, मी
देखील आत्माच आहे. परंतु सुप्रीम आहे. मी आहेच मुळी आत्मा तर मला कोणता देह आठवतच
नाही. हे दादा (ब्रह्मा बाबा) तर शरीरधारी आहेत ना. ते बाबा आहेत निराकार. हे
प्रजापिता ब्रह्मा तर साकारी झाले. शिवबाबांचे खरे नाव आहेच ‘शिव’. ते आहेतच आत्मा
फक्त ते उच्च ते उच्च अर्थात सुप्रीम आत्मा आहेत. फक्त याच वेळी येऊन या शरीरामध्ये
प्रवेश करतात. ते कधी देह-अभिमानी असू शकत नाहीत. देह-अभिमानी साकारी मनुष्य असतात,
ते (शिवबाबा) तर आहेतच निराकार. त्यांना येऊन ही प्रॅक्टिस करवून घ्यायची आहे.
म्हणतात - ‘तुम्ही स्वतःला आत्मा समजा. ‘मी आत्मा आहे, आत्मा आहे’ - बसून हा धडा
पाठ करा. मी आत्मा शिवबाबांची संतान आहे’. प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस पाहिजे ना.
बाबा कोणती नवी गोष्ट सांगत नाही आहेत. तुम्ही जेव्हा स्वतःला पक्के-पक्के आत्मा
समजाल तेव्हा बाबा देखील पक्के लक्षात राहतील. देह-अभिमान असेल तर बाबांची आठवण करू
शकणार नाही. अर्धा कल्प तुम्हाला देहाचा अहंकार असतो. आता तुम्हाला शिकवतो की
स्वतःला आत्मा समजा. सतयुगामध्ये असे कोणी शिकवत नाही की, ‘स्वतःला आत्मा समजा’.
शरीराला नाव तर पडतेच. नाहीतर एकमेकांना बोलावणार कसे. इथे तुम्ही बाबांकडून जो
वारसा घेतला आहे तोच मग प्रारब्ध म्हणून तिथे प्राप्त होते. बाकी बोलावणार तर
नावानेच ना. ‘श्रीकृष्ण’ हे देखील शरीराचे नाव आहे ना. नावाशिवाय तर कारभार इत्यादी
चालू शकत नाही. असे नाही की तिथे हे सांगतील - ‘स्वतःला आत्मा समजा’. तिथे तर
आत्म-अभिमानी असतातच. ही प्रॅक्टिस तुमच्याकडून आता करवून घेतली जाते कारण डोक्यावर
खूप पापे चढलेली आहेत. हळू-हळू थोडे-थोडे पाप चढता-चढता आता पूर्ण पाप-आत्मा बनले
आहात. अर्ध्या कल्पासाठी जे काही केले ते मग खलास देखील होईल ना. हळू-हळू कमी होत
जाते. सतयुगामध्ये तुम्ही सतोप्रधान असता, त्रेतामध्ये सतो बनता. वारसा आता मिळतो.
स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण केल्यानेच वारसा मिळतो. ही देही-अभिमानी बनण्याची
शिकवण बाबा आता देतात. सतयुगामध्ये ही शिकवण मिळत नाही. आपल्या देहाच्या नावानुसारच
चालतात. इथे तुम्हा प्रत्येकाला आठवणीच्या बळावर पाप आत्म्यापासून पुण्य आत्मा
बनायचे आहे. सतयुगामध्ये या शिक्षणाची काही गरजच नाही. ना हे शिक्षण तुम्ही तिथे
घेऊन जात. तिथे ना हे ज्ञान घेऊन जात, ना योग घेऊन जाता. तुम्हाला पतिता पासून पावन
आताच बनायचे आहे. मग हळू-हळू कला कमी होत जातात. जसे चंद्राच्या कला कमी होत-होत
कोर उरते. तर यामध्ये गोंधळून जाऊ नका. जर काही समजले नाही तर विचारा.
पहिले तर हा निश्चय
पक्का करा की आपण आत्मा आहोत. तुमची आत्माच आता तमोप्रधान बनली आहे. आधी सतोप्रधान
होती मग दिवसेंदिवस कला कमी होत जाते. ‘मी आत्मा आहे’, हे पक्के नसल्यानेच तुम्ही
बाबांना विसरता. सर्वप्रथम मूळ गोष्टच ही आहे. आत्म-अभिमानी बनल्याने बाबांची आठवण
येईल आणि वारसा देखील आठवेल. वारसा आठवला तर पवित्र सुद्धा रहाल. दैवी गुण देखील
असतील. एम ऑब्जेक्ट तर समोर आहे ना. ही आहे गॉडली युनिव्हर्सिटी. ईश्वर शिकवतात.
देही-अभिमानी देखील तेच बनवू शकतात; दुसरे कोणीही ही कला जाणतसुद्धा नाहीत. एक
बाबाच शिकवतात. हे दादा (ब्रह्मा बाबा) देखील पुरुषार्थ करतात. बाबा तर कधी देह
घेतच नाहीत, ज्यामुळे त्यांना देही-अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ करावा लागेल. ते
फक्त याच वेळी येतात तुम्हाला देही-अभिमानी बनविण्यासाठी. एक म्हण आहे - ‘जिनके माथे
मामला, वह कैसे नींद करें…’ धंदा इत्यादी मोठा, टू मच असतो तेव्हा सवड मिळत नाही आणि
ज्यांना सवड आहे ते बाबांकडे पुरुषार्थ करण्यासाठी येतात. काही नवीन देखील येतात.
समजतात ज्ञान तर खूप चांगले आहे. गीतेमध्ये देखील हे शब्द आहेत - ‘मज पित्याची आठवण
करा तर तुमची विकर्मे विनाश होतील’. तर बाबा हे समजावून सांगतात. बाबा कोणाला दोष
देत नाहीत. हे तर जाणता तुम्हाला पावन पासून पतित बनायचेच आहे आणि मला येऊन पतिता
पासून पावन बनवायचेच आहे. हा पूर्वनियोजित ड्रामा आहे, यामध्ये कोणाच्या निंदेची
गोष्ट नाही. तुम्ही मुले आता ज्ञानाला चांगल्या रितीने जाणता बाकीचे तर कोणीही
ईश्वराला जाणतही नाहीत त्यामुळे अनाथ नास्तिक म्हटले जातात. आता बाबा तुम्हा मुलांना
किती हुशार बनवतात. टीचरच्या रूपामध्ये शिकवण देतात. हे सृष्टीचे चक्र कसे चालते,
हे शिक्षण मिळाल्याने तुम्ही देखील सुधारता. भारत जो शिवालय होता तो आता वेश्यालय
आहे ना. यामध्ये निंदेचा प्रश्नच नाही. हा खेळ आहे, जो बाबा समजावून सांगतात. तुम्ही
देवता पासून असूर कसे बनलात, असे म्हणत नाहीत की का बनलात? बाबा आलेच आहेत मुलांना
आपला परिचय देण्यासाठी आणि सृष्टीचे चक्र कसे फिरते, हे नॉलेज देतात. मनुष्यालाच
कळेल ना. आता कळल्यावर मग तुम्ही देवता बनता. हे शिक्षण आहे मनुष्यापासून देवता
बनण्याचे, जे बाबाच बसून शिकवतात. इथे तर सारे मनुष्यच मनुष्य आहेत. देवता तर या
सृष्टीवर येऊ शकत नाहीत ज्यांना बाबा शिक्षक बनून शिकवतील. शिकवणारे बाबा बघा कसे
शिकविण्यासाठी येतात. गायन देखील आहे - परमपिता परमात्मा कोणता रथ घेतात, परंतु हे
स्पष्ट करून लिहीत नाहीत की कोणता रथ घेतात. त्रिमूर्तीचे रहस्य देखील कोणालाच समजत
नाही. परमपिता अर्थात परम-आत्मा. ते जे आहेत तसा आपला परिचय तर देतील ना. अहंकार
येण्याचा प्रश्नच नाही. न समजल्यामुळे म्हणतात - यांना अहंकार आहे. हे ब्रह्मा तर
म्हणत नाहीत की मी परमात्मा आहे. ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे, ही तर बाबांची
महावाक्ये आहेत. सर्व आत्म्यांचे पिता एकच आहेत. यांना (ब्रह्मा बाबांना) दादा
म्हटले जाते. हा भाग्यशाली रथ आहे ना. नाव देखील ब्रह्मा ठेवले आहे कारण ब्राह्मण
हवेत ना. आदि देव प्रजापिता ब्रह्मा आहेत. प्रजेचे पिता आहेत, आता प्रजा कोणती?
प्रजापिता ब्रह्मा शरीरधारी आहेत तर ॲडॉप्ट केले ना. मुलांना शिवबाबा समजावून
सांगतात की, मी ॲडॉप्ट करत नाही. तुम्ही सर्व आत्मे तर कायम माझी मुले आहातच. मी
तुम्हाला बनवत नाही. मी तर तुम्हा आत्म्यांचा अनादि पिता आहे. बाबा किती चांगल्या
प्रकारे समजावून सांगतात तरीही म्हणतात - स्वतःला आत्मा समजा. तुम्ही साऱ्या जुन्या
दुनियेचा संन्यास करता. बुद्धीने जाणता सर्वजण या दुनियेतून परत जातील. असे नाही,
संन्यास करून जंगलात जायचे आहे. संपूर्ण दुनियेचा संन्यास करून आम्ही आपल्या घरी
जाणार, त्यामुळे एका बाबांशिवाय कोणतीही गोष्ट आठवू नये. वयाची साठी पूर्ण झाली की
मग वाणीपासून परे वानप्रस्थमध्ये जाण्याचा पुरुषार्थ केला पाहिजे. ही वानप्रस्थची
गोष्ट आहे आत्ताची. भक्तीमार्गामध्ये तर वानप्रस्थ बद्दल कोणाला माहीतच नाही आहे.
वानप्रस्थचा अर्थ सांगू शकत नाहीत. वाणी पासून परे मूलवतनला म्हणणार. तिथे सर्व
आत्मे निवास करतात तर सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे, सर्वांना घरी जायचे आहे.
शास्त्रांमध्ये
दाखवतात आत्मा भृकुटीच्या मध्यभागी चमकणारा तारा आहे. बरेचजण समजतात आत्मा
अंगुष्ठाकार आहे. अंगुष्ठाकार समजूनच आठवण करतात. ताऱ्याची आठवण कशी करणार? पूजा कशी
करणार? तर बाबा समजावून सांगतात - तुम्ही जेव्हा देह-अभिमानामध्ये येता तेव्हा
पुजारी बनता. भक्तीचा काळ सुरु होतो, त्याला ‘भक्ती कल्ट’ (भक्ती पंथ) म्हणतात.
ज्ञान कल्ट (ज्ञान पंथ) वेगळा आहे. ज्ञान आणि भक्ती एकत्र असू शकत नाहीत. दिवस आणि
रात्र एकत्र होऊ शकत नाही. दिवस सुखाला म्हटले जाते आणि रात्र दुःखाला अर्थात
भक्तीला म्हटले जाते. असे म्हणतात प्रजापिता ब्रह्माचा दिवस आणि रात्र. तर प्रजा आणि
ब्रह्मा जरूर दोघेही एकत्र असतील ना. तुम्ही समजता आपण ब्राह्मणच अर्धा कल्प सुख
भोगतो आणि मग अर्धा कल्प दुःख. ही बुद्धीने समजून घेण्याची गोष्ट आहे. हे देखील
जाणता सगळेच काही बाबांची आठवण करू शकत नाहीत तरीही बाबा स्वतः समजावून सांगत
राहतात - ‘स्वतःला आत्मा समजा आणि माझी आठवण करा तर तुम्ही पावन बनाल’. हा संदेश
सर्वांना द्यायचा आहे. सेवा करायची आहे. जे सेवाच करत नाहीत तर त्यांना फूल म्हणता
येणार नाही. माळी बगिच्यामध्ये येतील तर त्यांना जी सेवाभावी आहेत अनेकांचे कल्याण
करतात अशी फुलेच समोर पाहिजेत. ज्यांना देह-अभिमान आहे ते स्वतःच समजतील आम्ही फूल
तर नाही आहोत. बाबांसमोर तर चांगली-चांगली फुले बसली आहेत. तर बाबांची त्यांच्यावर
नजर पडेल. डान्स देखील चांगला चालेल. (डान्सिंग गर्लचे उदाहरण आहे) शाळेत देखील
शिक्षक तर जाणतात ना - कोण एक नंबरला, कोण दोन नंबरवर, तीनमध्ये आहे. बाबांचे देखील
अटेन्शन सेवा करणाऱ्यांकडेच जाईल. हृदयावर देखील तेच चढतात. डिससर्व्हिस करणारे
थोडेच हृदयावर चढतील. बाबा सर्वात पहिली मुख्य गोष्ट समजावून सांगतात - ‘स्वतःला
आत्मा निश्चय करा तेव्हा बाबांची आठवण राहील. देह-अभिमान असेल तर बाबांची आठवण
राहणार नाही. लौकिक नातेवाईकांकडे, काम-धंद्याकडे बुद्धी जाईल. देही-अभिमानी
झाल्याने पारलौकिक बाबांचीच आठवण येईल’. बाबांची तर अतिशय प्रेमाने आठवण केली पाहिजे.
स्वतःला आत्मा समजणे - यामध्ये मेहनत आहे. एकांत पाहिजे. ७ दिवसांच्या भट्टीचा
कोर्स खूप कडक आहे. कोणाचीही आठवण येऊ नये. कोणाला पत्रसुद्धा लिहू शकत नाही. ही
भट्टी तुमची सुरु केली होती. इथे तर सर्वांनाच ठेऊ शकत नाही म्हणून म्हटले जाते घरी
राहून प्रॅक्टिस करा. भक्त लोक देखील भक्तीसाठी वेगळी खोली बनवतात. बंद खोलीमध्ये
बसून माळा जपतात, तर या आठवणीच्या यात्रेमध्ये देखील एकांत पाहिजे. एका बाबांचीच
आठवण करायची आहे, यासाठी काही तोंडाने बोलण्याची देखील गरज नाही. या आठवणीच्या
अभ्यासासाठी सवड पाहिजे.
तुम्ही जाणता लौकिक
पिता आहे हदचा क्रिएटर, हे आहेत बेहदचे. प्रजापिता ब्रह्मा तर बेहदचे झाले ना,
मुलांना ॲडॉप्ट करतात. शिवबाबा ॲडॉप्ट करत नाहीत. तुम्ही त्यांची तर मुले नेहमी
आहातच. तुम्ही म्हणाल - शिवबाबांची आम्ही मुले आत्मे अनादि आहोतच. ब्रह्माने
तुम्हाला ॲडॉप्ट केले आहे. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घ्यायची आहे. बाबा
रोज-रोज मुलांना समजावून सांगतात; मुले म्हणतात - ‘बाबा, आठवण राहत नाही’. बाबा
म्हणतात - ‘यासाठी थोडा वेळ काढला पाहिजे. काहीजण तर असे असतात जे अजिबातच वेळ देऊ
शकत नाहीत. डोक्यामध्ये काम खूप असते. मग आठवणीची यात्रा कशी होईल’. बाबा समजावून
सांगतात मूळ गोष्टच ही आहे की, ‘स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा तर तुम्ही
पावन बनाल. मी आत्मा आहे, शिवबाबांची संतान आहे’ - हे मनमनाभव होणे झाले ना. यासाठी
परिश्रम घेतले पाहिजेत. आशीर्वादाची गोष्टच नाही. हे तर शिक्षण आहे, यामध्ये कृपा
अथवा आशीर्वाद चालत नाहीत. मी कधी तुमच्या डोक्यावर हात ठेवतो का! तुम्ही जाणता
बेहदच्या बाबांकडून आम्ही वारसा घेत आहोत. ‘अमर भव’, ‘आयुष्यमान भव…’ यामध्ये सर्व
काही येते. तुम्हाला पूर्ण दीर्घायुष्य प्राप्त होते. तिथे कधी अकाली मृत्यू होत
नाही. हा वारसा कोणी साधू-संत इत्यादी देऊ शकत नाहीत. ते म्हणतात पुत्रवान भव… तर
मनुष्य समजतात त्यांच्या कृपेने मूल झाले आहे. बस्स, ज्यांना मूल नाही ते जाऊन
त्यांचे शिष्य बनतील. ज्ञान तर एकदाच मिळते. हे आहे अव्यभिचारी ज्ञान, ज्याचे अर्धा
कल्प प्रारब्ध चालते. त्यानंतर आहे अज्ञान. भक्तीला अज्ञान म्हटले जाते. प्रत्येक
गोष्ट किती चांगल्या प्रकारे समजावून सांगितली जाते. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आता
वानप्रस्थ अवस्था आहे म्हणून बुद्धीने सगळ्याचा संन्यास करून एका बाबांच्याच
आठवणीमध्ये रहायचे आहे. एकांतामध्ये बसून अभ्यास करायचा आहे - ‘मी आत्मा आहे… आत्मा
आहे’.
२) सेवाभावी फूल
बनायचे आहे. देह-अभिमान वश असे कोणते कर्म करायचे नाही ज्यामुळे डिससर्व्हिस (अनादर)
होईल. अनेकांच्या कल्याणाच्या निमित्त बनायचे आहे. आठवणीसाठी थोडा वेळ अवश्य काढायचा
आहे.
वरदान:-
परमात्म
ज्ञानाची नवीनता “पवित्रता” धारण करणारे सर्व आकर्षणांपासून मुक्त भव
या परमात्म ज्ञानाचे
नाविन्यच पवित्रता आहे. तुम्ही अभिमानाने म्हणता, आग-कापूस एकत्र राहून देखील आग
लागू शकत नाही. विश्वाला तुम्हा सर्वांचे हे चॅलेंज आहे की पवित्रतेशिवाय योगी आणि
ज्ञानी तू आत्मा बनू शकत नाही. तर पवित्रता अर्थात संपूर्ण लगाव-मुक्त (आकर्षण-मुक्त).
कोणत्याही व्यक्ती अथवा साधनांमध्ये देखील आकर्षण असू नये. अशा पवित्रतेद्वारेच
प्रकृतीला पावन बनविण्याची सेवा करू शकाल.
बोधवाक्य:-
पवित्रता
तुमच्या जीवनाचे मुख्य फाऊंडेशन आहे, ‘धरत परिये धर्म ना छोड़िये’.