01-11-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“
गोड मुलांनो - या समयी निराकार बाबा साकार मध्ये येऊन तुमचा शृंगार करत आहेत, एकटे
नाहीत”
प्रश्न:-
तुम्ही मुले
आठवणीच्या यात्रेमध्ये कशासाठी बसता?
उत्तर:-
१. कारण तुम्ही जाणता या आठवणीनेच आम्हाला दिर्घायुष्य मिळते, आम्ही निरोगी बनतो.
२. आठवण केल्यामुळे आमची पापे नष्ट होतात. आम्ही खरे सोने बनतो. आत्म्यामधून
रजो-तमोची खाद (भेसळ) निघून जाते, आत्मा कांचन बनते. ३. आठवणीमुळेच तुम्ही पावन
दुनियेचे मालक बनाल. ४. तुमचा शृंगार होईल. ५. तुम्ही पुष्कळ श्रीमंत व्हाल. ६. ही
आठवणच तुम्हाला पद्मा-पदम भाग्यशाली बनवते.
ओम शांती।
रुहानी मुलांना रुहानी बाबा समजावून सांगत आहेत. इथे बसून तुम्ही काय करत आहात? असे
नाही, फक्त शांतीमध्ये बसला आहात. अर्थासहित ज्ञानमय अवस्थेमध्ये बसला आहात. तुम्हा
मुलांना आता ज्ञान आहे की, बाबांची आपण का आठवण करतो. बाबा आम्हाला खूप दीर्घायुष्य
देतात. बाबांची आठवण केल्याने आमची पापे भस्म होतील. आम्ही खरे सोने सतोप्रधान बनू.
तुमचा किती शृंगार होतो. तुमचे आयुष्य वाढेल. आत्मा एकदम कांचन होईल. आता
आत्म्यामध्ये भेसळ पडली आहे. आठवणीच्या यात्रेद्वारे ही सर्व रजो-तमोची जी भेसळ आहे
ती सर्व निघून जाईल, इतका तुम्हाला फायदा होतो; आणि मग आयुष्य देखील वाढेल. तुम्ही
स्वर्गाचे निवासी बनाल आणि खूप श्रीमंत बनाल. तुम्ही पद्मा-पदम भाग्यशाली बनाल
म्हणूनच बाबा म्हणतात - मनमनाभव, मामेकम् (मज एकाची) आठवण करा. हे काही कोणत्या
देह-धारीसाठी म्हणत नाहीत. बाबांना तर शरीरच नाही. तुमची आत्मा देखील निराकार होती.
मग पुनर्जन्मामध्ये येता-येता पारस-बुद्धी पासून पत्थर-बुद्धी बनली आहे. आता पुन्हा
कांचन बनायचे आहे. आता तुम्ही पवित्र बनत आहात. पाण्याचे स्नान तर जन्म जन्मांतर
केले आहे. वाटले की याने पावन होऊ परंतु पावन होण्याऐवजी अजूनच पतित बनून नुकसान
झाले आहे, कारण ही आहेच खोटी माया, सर्वांचे खोटे बोलण्याचे संस्कार आहेत. बाबा
म्हणतात - ‘मी तुम्हाला पावन बनवून निघून जातो मग पुन्हा तुम्हाला पतित कोण बनवतो?’
आता तुम्हाला जाणीव होते ना. किती गंगा स्नान करत आला आहात परंतु पावन काही बनला
नाहीत. पावन बनून तर पावन दुनियेमध्ये जावे लागेल. शांतीधाम आणि सुखधाम आहेत -
‘पावन धाम’. ही तर आहे रावणाची दुनिया, याला ‘दु:ख धाम’ म्हटले जाते. ही तर समजण्या
सारखी सोपी गोष्ट आहे ना. यामध्ये कोणतीही अडचण नाही. ना कोणाला सांगण्यामध्ये अडचण
आहे. जेव्हा कोणी भेटेल तेव्हा फक्त एवढेच सांगा - ‘स्वतःला आत्मा समजून बेहदच्या
बाबांची आठवण करा’. आत्म्यांचे पिता आहेत परमपिता परमात्मा शिव. प्रत्येकाच्या
शरीराचे पिता तर वेगवेगळे असतात ना. आत्म्यांचे तर एकच पिता आहेत. किती चांगल्या
रीतीने समजावून सांगतात आणि हिंदीतच समजावून सांगतात. हिंदी भाषाच मुख्य आहे. तुम्ही
पद्मा-पदम भाग्यशाली या देवी-देवतांना म्हणाल ना. हे किती भाग्यशाली आहेत. हे
कोणालाही माहीत नाही की हे स्वर्गाचे मालक कसे बनले. आता बाबा तुम्हाला सांगत आहेत.
या सहजयोग द्वारा या पुरुषोत्तम संगमावरच हे बनतात. आता आहे जुनी दुनिया आणि नवीन
दुनियेचा संगम. मग तुम्ही नवीन दुनियेचे मालक बनाल. आता बाबा म्हणतात - ‘फक्त दोन
शब्द अर्थासहित आठवण करा’. गीतेमध्ये आहे - ‘मनमनाभव’. शब्द तर वाचतात परंतु अर्थ
अजिबात जाणत नाहीत. बाबा म्हणतात माझी आठवण करा कारण मीच पतित-पावन आहे, दुसरे
कोणीही असे म्हणू शकणार नाही. बाबाच म्हणतात माझी आठवण केल्यानेच तुम्ही पावन बनून
पावन दुनियेमध्ये निघून जाल. सर्वात पहिले तुम्ही सतोप्रधान होता नंतर मग पुनर्जन्म
घेता-घेता तमोप्रधान बनले आहात. आता ८४ जन्मानंतर पुन्हा तुम्ही नवीन दुनियेमध्ये
देवता बनता.
रचयिता आणि रचना दोघांनाही तुम्ही जाणले आहे. तर आता तुम्ही आस्तिक बनला आहात. आधी
जन्मो-जन्मी तुम्ही नास्तिक होता. या गोष्टी ज्या बाबा सांगत आहेत त्या दुसरे कोणी
जाणतही नाहीत. कुठेही जा, कोणीही तुम्हाला या गोष्टी सांगू शकणार नाहीत. आता दोन्ही
पिता (शिवबाबा आणि ब्रह्माबाबा) तुमचा शृंगार करत आहेत. सुरुवातीला तर बाबा एकटेच
होते. शरीर विरहित होते. वरती (परमधाममध्ये) बसून तुमचा शृंगार करू शकत नव्हते.
म्हणतात ना- बत्त बारह (१ आणि २ मिळून १२ होतात) बाकी प्रेरणा अथवा शक्ती इत्यादीची
गोष्टच नाही. वरून प्रेरणेद्वारे भेटणे अशक्य आहे. निराकार जेव्हा साकार शरीराचा
आधार घेतात तेव्हा तुमचा शृंगार करतात. तुम्ही समजता देखील - बाबा आम्हाला
सुखधाममध्ये घेऊन जातात. ड्रामा प्लॅन अनुसार बाबा बांधील आहेत, त्यांना ड्युटी
मिळालेली आहे. तुम्हा मुलांसाठी दर ५ हजार वर्षांनी येतात. या योगबलाद्वारे तुम्ही
किती कांचन बनता. आत्मा आणि शरीर दोन्ही कांचन बनतात आणि मग पुन्हा घाणेरडे बनता.
आता तुम्ही साक्षात्कार करता - या पुरुषार्थाद्वारे आम्ही असे शृंगारलेले बनणार.
तिथे क्रिमिनल दृष्टी (विकारी दृष्टी) असत नाही. तरीही सर्व अंग झाकलेले असते. इथे
तर पहा रावण राज्यामध्ये किती घाणेरड्या गोष्टी शिकतात. या लक्ष्मी-नारायणाला पहा
पेहराव किती सुंदर आहे. इथे (कलियुगी दुनियेमध्ये) सर्व आहेत देह-अभिमानी. त्यांना
(देवी-देवतांना) देह-अभिमानी म्हणणार नाही. त्यांचे नैसर्गिक सौंदर्य असते. बाबा
तुम्हाला असे नैसर्गिक रित्या सुंदर बनवतात. आजकाल तर खरे दागिने कोणी वापरू सुद्धा
शकत नाही. कोणी घातलेच तर त्यालाच लुटतात. तिथे (सतयुगमध्ये) तर अशी कोणती गोष्टच
नाही. असे बाबा तुम्हाला मिळाले आहेत, त्यांच्याशिवाय तर तुम्ही बनूच शकणार नाही.
पुष्कळ जण म्हणतात आम्ही डायरेक्ट शिवबाबांकडून घेतो. परंतु ते देणार कसे. भले
प्रयत्न करून पहा डायरेक्ट मागा, पहा मिळते का! असे खूप जण म्हणतात - ‘आम्ही तर
शिवबाबांकडून वारसा घेणार. ब्रह्मा बाबांना विचारण्याची तरी काय आवश्यकता आहे;
शिवबाबा प्रेरणेने काही देतीलच!’ चांगली-चांगली जुनी मुले त्यांना देखील माया असा
डंख मारते. एकाला मानतात परंतु एकटा काय करणार? बाबा म्हणतात - ‘मी एकटा कसा येऊ.
मुखा शिवाय बोलू कसा शकणार?’ मुखाचेच तर गायन आहे ना. गोमुखातून अमृत घेण्यासाठी
किती त्रास सहन करतात. मग श्रीनाथ द्वारेला जाऊन दर्शन करतात. परंतु त्यांचे दर्शन
केल्याने काय होणार. त्याला म्हटले जाते - पुतळ्याची पूजा. त्याच्यामध्ये आत्मा तर
नाही आहे. बाकी ५ तत्वांचा पुतळा बनला आहे तर जणू काही मायेची आठवण करण्यासारखे झाले.
५ तत्वांची प्रकृती बनली आहे ना. त्यांची आठवण केल्याने काय होणार? प्रकृतीचा आधार
तर सर्वांना आहे परंतु तिथे (सतयुगामध्ये) आहे सतोप्रधान प्रकृती. इथे आहे
तमोप्रधान प्रकृती. बाबांना सतोप्रधान प्रकृतीचा आधार कधीही घ्यावा लागत नाही. इथे
तर सतोप्रधान प्रकृती काही मिळू शकणार नाही. हे जे साधु-संत आहेत त्यांच्यासाठी बाबा
म्हणतात, ‘या सर्वांचा उद्धार मला करावा लागतो. मी निवृत्ती मार्गामध्ये येतच नाही.
हा आहे प्रवृत्ती मार्ग. सर्वांना सांगतो पवित्र बना’. तिथे तर नाव-रुप इत्यादी
सर्व काही बदलून जाते. तर मग बाबा समजावून सांगत आहेत - ‘पहा हे नाटक कसे बनलेले आहे.
एकाचे फिचर्स (वैशिष्ट्ये) दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाहीत. इतके करोडो आहेत, सर्वांची
फिचर्स वेगवेगळी आहेत. कोणी कितीही काही करो तरी देखील एकाचे फिचर्स दुसऱ्याशी मेळ
खाऊ शकत नाहीत. याला म्हटले जाते प्रकृतीचा चमत्कार, अद्भुत. स्वर्गाला वंडर (अद्भुत)
म्हटले जाते ना. किती सुंदर आहे. मायेची ७ वंडर्स, आणि बाबांचे आहे एक वंडर. ती सात
वंडर्स (आश्चर्ये) तराजूच्या एका पारड्यात ठेवा, आणि हे एक वंडर दुसऱ्या पारड्यात
ठेवा तरी देखील हेच पारडे भारी होईल. एकीकडे ज्ञान, दुसरीकडे भक्ती ठेवा तर ज्ञानाचे
पारडेच खूप भारी होईल. आता तुम्हाला समजते आहे भक्ती शिकवणारे तर अनेक आहेत. ज्ञान
देणारे फक्त एक बाबाच आहेत. तर बाबा बसून मुलांना शिकवतात, शृंगार करतात. बाबा
म्हणतात, पवित्र बना; तर म्हणतात - नाही, आम्ही तर घाणेरडे (विकारी) बनणार. गरुड
पुराणामध्ये देखील विषय वैतरणी नदी दाखवतात ना. विंचू, सरडा, सर्प इत्यादी सर्व
एकमेकांना दंश करत असतात. बाबा म्हणतात - तुम्ही किती अनाथ बनता. तुम्हा मुलांनाच
बाबा समजावून सांगतात. बाहेरच्या कोणालाही जर हे थेट सांगाल तर ते एकदम नाराज होतील.
खूप युक्तीने समजावून सांगायचे असते. बऱ्याच मुलांना व्यवस्थित बोलण्याची सुद्धा
अक्कल नसते. लहान मुले एकदम निरागस असतात म्हणूनच त्यांना महात्मा म्हटले जाते. कुठे
श्रीकृष्ण महात्मा आणि कुठे हे संन्यासी निवृत्त मार्गवाले महात्मा म्हणवून घेणारे.
तो आहे प्रवृत्ती मार्ग. ते कधीच विकारातून जन्म घेत नाहीत. त्यांना म्हटलेच जाते
श्रेष्ठाचारी. आता तुम्ही श्रेष्ठाचारी बनत आहात. मुले जाणतात इथे बापदादा दोघेही
एकत्र आहेत, हे नक्कीच चांगलाच शृंगार करणार. सर्वांना मनात वाटते आहे ना - ज्यांनी
या मुलांचा असा शृंगार केला आहे तर आम्ही का नाही त्यांच्याकडे जायचे, म्हणून मग
तुम्ही इथे (मधुबनला) रिफ्रेश होण्यासाठी येता. मनामध्ये ओढ निर्माण होते, बाबांकडे
येण्याची. ज्यांना संपूर्ण निश्चय असतो ते तर म्हणतील की, ‘पाहिजे तर मारा, किंवा
आणखी काहीही करा, आम्ही कधीही साथ सोडणार नाही’. काही जण तर बिना कारणाचे सुद्धा
सोडून देतात. हा देखील ड्रामाचा पूर्वनियोजित खेळ आहे. सोडचिठ्ठी किंवा घटस्फोट
देतात.
बाबा जाणतात हे रावणाचे वंशज आहेत. कल्प-कल्प असे होत आले आहे. मग कोणी परत येतात.
बाबा समजावून सांगत आहेत - हात सोडल्याने पद कमी होते. सन्मुख येतात, प्रतिज्ञा
करतात - ‘आम्ही अशा बाबांना कधीही सोडणार नाही’. परंतु माया रावण सुद्धा काही कमी
नाहीये. पटकन आपल्याकडे ओढून घेते. मग जेव्हा सन्मुख येतात तेव्हा समजावून सांगितले
जाते. बाबा छडी थोडीच मारतील. बाबा तरीही प्रेमानेच समजावून सांगतील, तुला माया
मगरीने गिळंकृत करून टाकले असते, चांगले झाले जे सुटका करून आलास. घायाळ झालात तर
पद कमी होईल. जे सदैव एकरस अवस्थेमध्ये राहतील ते कधीही मागे हटणार नाहीत. कधीही
हात सोडणार नाहीत. इथून बाबांना सोडून देऊन माया रावणाचे बनतात तर मग माया अजूनच
जोराने खाऊन टाकते. बाबा म्हणतात - ‘तुमचा किती ज्ञान शृंगार करतो’. समजावून
सांगितले जाते - चांगल्या पद्धतीने वागा, कोणालाही दुःख देऊ नका. रक्ताने देखील
लिहून देतात आणि पुन्हा जसेच्या तसे बनतात. माया अतिशय कठोर आहे. काना-नाकाला पकडून
खूप हैराण करते. आता तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र देत आहेत तर कधीही विकारी दृष्टी
जाता कामा नये. विश्वाचा मालक बनायचे असेल तर थोडी मेहनत सुद्धा करावी लागेल ना. आता
तुमची आत्मा आणि शरीर दोन्ही तमोप्रधान आहेत. भेसळ पडली आहे ना. या भेसळीला भस्म
करण्यासाठी बाबा म्हणतात, ‘माझी आठवण करा’. तुम्ही बाबांची आठवण करू शकत नाही, लाज
वाटत नाही काय? आठवण केली नाहीत तर मायेची भुते तुम्हाला खाऊन टाकतील. तुम्ही किती
घाणेरडे (विकारी) बनले आहात, रावण राज्यामध्ये एकही कोणी असा नाही की जो विकारातून
जन्मला नसेल. तिथे (सतयुगामध्ये) या विकाराचे नाव सुद्धा नाही, रावणच नाही. रावण
राज्य सुरु होतेच द्वापर पासून. पावन बनविणारे एक बाबाच आहेत. बाबा म्हणतात -
‘मुलांनो, हा एक जन्म पवित्र बनायचे आहे नंतर मग विकाराचा प्रश्नच राहत नाही’. ती
आहेच निर्विकारी दुनिया. तुम्ही जाणता हे पवित्र देवी-देवता होते मग ८४ जन्म
घेत-घेत खाली आले आहेत (पतन झाले आहे). आता पतित आहेत म्हणून बोलावतात - ‘शिवबाबा,
आम्हाला या पतित दुनियेमधून सोडवा’. आता जेव्हा बाबा आले आहेत तेव्हा तुम्हाला
माहित झाले आहे की हे पतित काम आहे. आधी समजत नव्हता कारण तुम्ही रावण राज्यामध्ये
होता. आता बाबा म्हणतात - ‘सुखधाममध्ये जायचे असेल तर विकारी बनणे सोडून द्या’.
अर्धा कल्प तुम्ही विकारी बनले आहात. डोक्यावर पापांचे ओझे खूप आहे आणि तुम्ही खूप
शिव्या देखील दिल्या आहेत. बाबांना शिव्या दिल्यामुळे खूप पाप चढते, हा देखील
ड्रामामध्ये पार्ट आहे. तुमच्या आत्म्याला देखील ८४ जन्मांचा पार्ट मिळालेला आहे,
तो बजावायचाच आहे. प्रत्येकाला आपला पार्ट बजावायचा आहे, मग तुम्ही रडता कशासाठी!
सतयुगामध्ये कोणी रडत नाही. आणि मग ज्ञानाची दशा पूर्ण होते तेव्हा पुन्हा तेच
रडगाणे सुरु होते. मोहजीतची कथा देखील तुम्ही ऐकली आहे. हा तर एक खोटा दृष्टांत
बनविला आहे. सतयुगामध्ये कोणाचाही अकाली मृत्यू होत नाही. मोहजीत बनविणारे तर एक
बाबाच आहेत. परमपिता परमात्म्याचे तुम्ही वारस बनता, जे तुम्हाला विश्वाचे मालक
बनवतात. स्वतःला विचारा - आम्ही आत्मे त्यांचे वारसदार आहोत का? बाकी भौतिक
शिक्षणामध्ये काय ठेवले आहे! आजकाल तर पतित मनुष्यांचे तोंड सुद्धा बघता कामा नये
आणि मुलांनाही दाखवता कामा नये. नेहमी बुद्धीमध्ये ठेवा की आम्ही संगमयुगावर आहोत.
एका बाबांचीच आठवण करतो आणि सर्व दिसत असूनही पाहत नाही. आम्ही नवीन दुनियेलाच पाहतो.
आम्ही देवता बनतो त्या नवीन नात्यांनाच पाहतो. जुन्या नात्यांना दिसत असून देखील
पाहत नाही. हे सर्व नष्ट होणार आहे. आम्ही एकटे आलो होतो आणि एकटेच जाणार. बाबा
सोबत घेऊन जाण्यासाठी फक्त एकदाच येतात. यालाच शिवबाबांची वरात म्हटले जाते.
शिवबाबांची संतान तर सर्वच मुले आहेत. बाबा विश्वाची बादशाही देतात, मनुष्यापासून
देवता बनवतात. आधी विष ओकत होतो, आता अमृत ओकत आहोत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) स्वतःला
संगमयुग निवासी समजून चालायचे आहे. जुन्या नात्यांना दिसत असूनही पहायचे नाही.
बुद्धीमध्ये रहावे की, आम्ही एकटे आलो होतो, एकटेच जायचे आहे.
२) आत्मा आणि शरीर
दोघांनाही कांचन (पवित्र) बनविण्यासाठी ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राने पाहण्याचा
अभ्यास करायचा आहे. विकारी दृष्टी नष्ट करून टाकायची आहे. ज्ञान आणि योगाद्वारे आपला
शृंगार करायचा आहे.
वरदान:-
मनमनाभव होऊन अलौकिक
विधीद्वारे मनोरंजन साजरे करणारे बाप समान भव
संगमयुगावर यादगार
साजरे करणे अर्थात बाप समान बनणे. हा या संगमयुगावरील विशेष उत्सव आहे. भरपूर साजरा
करा परंतु बाबांसोबत मिलनाचा आनंद घेत साजरा करा. फक्त मनोरंजनाच्या रूपामध्ये नाही
परंतु मनमनाभव स्थितीमध्ये राहून मनोरंजन साजरे करा. अलौकिक विधीद्वारे अलौकिकतेचे
मनोरंजन अविनाशी होते. संगमयुगी दीपमाळेची विधी आहे - - जुने हिशोब संपवून टाकणे,
प्रत्येक संकल्प, प्रत्येक क्षण नवीन अर्थात अलौकिक असावा. जुने संकल्प,
संस्कार-स्वभाव, आचरण हे सर्व रावणाचे कर्ज आहे याला एकाच दृढ संकल्पाने समाप्त करा.
बोधवाक्य:-
बाह्य
गोष्टींकडे पाहण्याऐवजी स्वतःला आणि बाबांना पहा.