01-11-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही या रूहानी युनिव्हर्सिटीचे स्टुडंट आहात, तुमचे काम आहे साऱ्या
युनिव्हर्सला बाबांचा मेसेज देणे”
प्रश्न:-
आता तुम्ही
मुले कोणती दवंडी पिटवता आणि कोणती गोष्ट सर्वांना सांगता?
उत्तर:-
तुम्ही दवंडी पिटता की, ही नवीन दैवी राजधानी पुन्हा स्थापन होत आहे. अनेक धर्मांचा
आता विनाश होणार आहे. तुम्ही सर्वांना सांगता की, सर्वांनी निश्चिंत रहा, हा
इंटरनॅशनल रोला (आंतरराष्ट्रीय घोटाळा) आहे. युद्ध जरूर होणार आहे, त्यानंतर दैवी
राजधानी येईल.
ओम शांती।
ही आहे रुहानी युनिव्हर्सिटी. साऱ्या विश्वामध्ये जे काही आत्मे आहेत,
युनिव्हर्सिटीमध्ये आत्मेच शिकतात. युनिव्हर्स अर्थात विश्व. आता कायद्यानुसार
युनिव्हर्सिटी शब्द तुम्हा मुलांचा आहे. ही आहे रूहानी युनिव्हर्सिटी. भौतिक
युनिव्हर्सिटी असतच नाही. ही एकच गॉडफादरली युनिव्हर्सिटी आहे. सर्व आत्म्यांना
लेसन मिळतो. तुमचा हा संदेश कोणत्या ना कोणत्या प्रकारे सर्वांपर्यंत जरूर पोहोचला
पाहिजे, संदेश द्यायचा आहे ना आणि हा संदेश खूप सोपा आहे. मुले जाणतात ते आपले
बेहदचे बाबा आहेत, ज्यांची सर्व जण आठवण करतात. असे देखील म्हणता येईल की ते आमचे
बेहदचे माशुक आहेत, जे काही विश्वामध्ये जीव आत्मे आहेत ते सर्व त्या माशुकची आठवण
जरूर करतात. हे पॉईंटस् चांगल्या प्रकारे धारण करायचे आहेत. ज्यांची फ्रेश-बुद्धी
असेल ते चांगल्या रीतीने धारण करू शकतील. युनिव्हर्स मध्ये जे काही आत्मे आहेत त्या
सर्वांचा पिता एकच आहे. युनिव्हर्सिटीमध्ये तर मनुष्यच शिकतील ना. आता तुम्ही मुले
हे देखील जाणता - आपणच ८४ जन्म घेतो. ८४ लाखाचा तर प्रश्नच नाही. युनिव्हर्स मध्ये
जे काही आत्मे आहेत, ते सर्व यावेळी पतित आहेत. ही आहेच छी-छी दुनिया, दुःखधाम. तिला
सुखधाममध्ये घेऊन जाणारे एक बाबाच आहेत, त्यांना लिबरेटर देखील म्हटले जाते. तुम्ही
साऱ्या युनिव्हर्सचे अर्थात विश्वाचे मालक बनता ना. बाबा सर्वांसाठी सांगतात हा
मेसेज देऊन या. बाबांची सर्वजण आठवण करतात, त्यांना गाईड, लिबरेटर, मर्सीफुल (दयाळू)
देखील म्हणतात. अनेक भाषा आहेत ना. सर्व आत्मे त्या एकालाच बोलावतात. तर ते एकच
साऱ्या युनिव्हर्सचे टीचर देखील झाले ना. बाबा तर आहेतच परंतु हे कोणाला माहित नाही
आहे की, ते आम्हा सर्व आत्म्यांचे टीचर देखील आहेत, गुरु देखील आहेत. सर्वांना
मार्गदर्शन देखील करतात. या बेहदच्या गाईडला फक्त तुम्ही मुलेच जाणता. तुम्हा
ब्राह्मणांशिवाय इतर कोणीही जाणत नाहीत. आत्म्याला देखील तुम्हीच जाणले आहे की आत्मा
काय चीज आहे. दुनियेमध्ये तर एकही मनुष्य नाही, खास भारत आणि बाकी सारी दुनिया
कोणालाही हे माहित नाही आहे की, भले म्हणतात - ‘भ्रकुटी के बीच चमकता है अजब सितारा’.
परंतु समजत काहीच नाहीत. आता तुम्ही जाणता आत्मा तर अविनाशी आहे. ती कधी लहान-मोठी
होत नाही. जशी तुमची आत्मा आहे, बाबा देखील तसेच बिंदू आहेत. लहान-मोठे नाहीत. ते
देखील आत्मा आहेत फक्त परम आत्मा आहेत, सुप्रीम आहेत. बरोबर सर्व आत्मे परमधाममध्ये
राहणारे आहेत. इथे येतात पार्ट बजावण्याकरिता. मग आपल्या परमधामला जाण्याचा प्रयत्न
करतात. परमपिता परमात्म्याची सर्वजण आठवण करतात कारण आत्म्यांना परमपित्यानेच मुक्ती
मध्ये पाठवले होते तर त्यांचीच आठवण करतात. आत्माच तमोप्रधान बनली आहे. आठवण का
करतात? हे देखील माहित नाही आहे. जसे छोटे मूल म्हणते - “बाबा”, बस्स. त्याला बाकी
काहीच माहित नाही. तुम्ही देखील बाबा-मम्मा म्हणता, जाणत काहीच नाही. भारतामध्ये
एकच नॅशनॅलिटी होती (राष्ट्रीयत्व होते), त्याला डीटी नॅशनॅलिटी (दैवी राष्ट्रीयत्व)
म्हटले जात होते. मग नंतर इतरही त्यामध्ये सामील झाले आहेत. आता किती असंख्य झाले
आहेत, म्हणून इतकी भांडणे इत्यादी होतात. जिथे-जिथे खूप घुसले आहेत. तिथून त्यांना
बाहेर काढण्याचा प्रयत्न करत राहतात. खूप तंटे झाले आहेत. अंध:कार देखील खूप झाला
आहे. काहीतरी मर्यादा असली पाहिजे ना. ॲक्टर्सची मर्यादा असते ना. हा देखील
पूर्व-नियोजित खेळ आहे. यामध्ये जितके म्हणून ॲक्टर्स आहेत, त्यांची संख्या
कमी-जास्त होऊ शकत नाही. जेव्हा सर्व ॲक्टर्स स्टेजवर येतात मग त्यांना परतही जायचे
आहे. जे काही ॲक्टर्स राहिलेले असतील, ते देखील येत राहतील. भले कितीही कंट्रोल
इत्यादी करण्यासाठी डोकेफोड करत असतात, परंतु कंट्रोल करू शकत नाहीत. बोला, आम्ही
बी.के. असा बर्थ कंट्रोल करतो (जन्म दर कमी करतो) जे एकूण ९ लाखच शिल्लक राहतील. मग
सारी जनसंख्याच कमी होईल. आम्ही तुम्हाला खरे सांगतो; आता स्थापना करत आहोत. नवीन
दुनिया, नवीन झाड जरूर छोटेच असेल. इथे तर हे कंट्रोल करू शकणार नाहीत कारण जास्तच
तमोप्रधान होत जातात. वृद्धी होत जाते. ॲक्टर्स जे पण येणारे आहेत, इथेच येऊन शरीर
धारण करतील. या गोष्टींना कोणीही समजत नाही. शुरुड-बुद्धी (तीक्ष्ण-बुद्धी) असणारे
समजतात राजधानीमध्ये तर विविध प्रकारचे पार्टधारी असतात. सतयुगामध्ये जी राजधानी
होती ती पुन्हा स्थापन होत आहे. ट्रान्सफर होतील. तुम्ही आता तमोप्रधानापासून
सतोप्रधान क्लासमध्ये ट्रान्सफर होत आहात. जुन्या दुनियेमधून नवीन दुनियेमध्ये जात
आहात. तुमचे शिक्षण या दुनियेसाठी नाही आहे. अशी युनिव्हर्सिटी दुसरी कोणती असूच
शकत नाही. गॉड फादरच म्हणतात - मी तुम्हाला अमरलोकसाठी शिकवत आहे. हा मृत्यूलोक
नष्ट होणार आहे. सतयुगामध्ये या लक्ष्मी-नारायणाची राजधानी होती. ही कशी स्थापना
झाली, हे कोणालाच माहित नाही आहे.
बाबा नेहमी म्हणतात
जिथे तुम्ही भाषण करता तर हे लक्ष्मी-नारायणाचे चित्र जरूर ठेवा. यामध्ये तारीख
देखील जरूर लिहिलेली असावी. तुम्ही समजावून सांगू शकता की, नवीन विश्वामध्ये
सुरुवातीपासून १२५० वर्षे पर्यंत या डिनायस्टीचे (घराण्याचे) राज्य होते. जसे
म्हणतात ना - ख्रिश्चन डिनायस्टीचे (ख्रिश्चन घराण्याचे) राज्य होते. एकाच्या मागून
दुसरा असे येत राहतात. तर जेव्हा ही देवता डिनायस्टी होती (देवता घराणे होते) तेव्हा
दुसरे कोणीच नव्हते. आता पुन्हा ही डिनायस्टी स्थापन होत आहे. बाकी सर्वांचा विनाश
होणार आहे. युद्ध देखील समोर उभे आहे. भागवत इत्यादीमध्ये यावर देखील कथा लिहिली आहे.
लहानपणी या कथा इत्यादी ऐकत होतो. आता तुम्ही जाणता ही राजाई कशी स्थापन होते. जरूर
बाबांनीच राजयोग शिकवला आहे. जे पास होतात ते विजयीमाळेचे मणी बनतात इतर कोणीही या
माळे बद्दल जाणत नाहीत. तुम्हीच जाणता. तुमचा प्रवृत्ती मार्ग आहे. वरती बाबा उभे
आहेत, त्यांना आपले शरीर नाहीये. मग ब्रह्मा-सरस्वती सो लक्ष्मी-नारायण. पहिले
पाहिजेत पिता मग जोडी. रुद्राक्षाचे मणी असतात ना. नेपाळमध्ये एक वृक्ष आहे, जिथून
हे रुद्राक्षाचे मणी येतात. त्यामध्ये खरे देखील असतात. जितका आकार लहान तितकी
किंमत जास्त. आता तुम्ही अर्थाला समजले आहात. ही विष्णूची विजय माळा अर्थात रुंडमाळा
बनते. ते लोक तर फक्त माळा फिरवत राम-राम करत राहतील, अर्थ काहीच नाही. माळेचा जप
करतात. इथे तर बाबा म्हणतात - माझी आठवण करा. हा आहे अजपाजाप. तोंडाने काहीच बोलायचे
नाहीये. गाणे देखील स्थूल झाले ना. मुलांनी तर फक्त बाबांची आठवण करायची आहे. नाही
तर मग गाणी इत्यादी आठवत राहतील. इथे मूळ गोष्टच आहेच आठवणीची. तुम्हाला आवाजापासून
परे जायचे आहे. बाबांचे डायरेक्शन आहेच मुळी - मनमनाभव. बाबा असे थोडेच म्हणतात की,
गाणी गा, ओरडत रहा. माझी महिमा गायन करण्याची देखील गरज नाही. हे तर तुम्ही जाणता
ते ज्ञानाचे सागर, सुख-शांतीचे सागर आहेत. मनुष्य जाणत नाहीत. अशीच नावे ठेवली आहेत.
तुमच्याशिवाय इतर कोणीही जाणत नाही. बाबाच येऊन आपले नाव-रूप इत्यादी सांगतात - ‘मी
कसा आहे, तुम्ही आत्मे कसे आहात!’ तुम्ही खूप मेहनत करता - पार्ट बजावण्याकरिता.
अर्धा कल्प भक्ती केली आहे, मी तर असा पार्टमध्ये येत नाही. मी सुख-दुःखापासून
न्यारा आहे. तुम्ही दुःख भोगता आणि मग तुम्हीच सुख भोगता - सतयुगामध्ये. तुमचा
पार्ट माझ्या पेक्षाही उच्च आहे. मी तर अर्धे कल्प तिथेच वानप्रस्थमध्ये आरामात
बसून राहतो. तुम्ही मला बोलावत राहता. असे नाही की मी तिथे बसून तुमची हाक ऐकतो.
माझा पार्टच या वेळेचा आहे. ड्रामाच्या पार्टला मी जाणतो. आता ड्रामा पूर्ण झाला आहे,
मला जाऊन पतितांना पावन बनविण्याचा पार्ट बजावायचा आहे बाकी कोणती गोष्ट नाही.
मनुष्य समजतात परमात्मा सर्वशक्तिमान आहे, अंतर्यामी आहे. सर्वांच्या मनामध्ये
काय-काय चालते, ते जाणतात. बाबा म्हणतात - असे काही नाही आहे. तुम्ही जेव्हा
पूर्णपणे तमोप्रधान बनता तेव्हा ॲक्युरेट वेळी मला यावे लागते. साधारण तनामध्येच
येतो. येऊन तुम्हा मुलांना दुःखातून सोडवतो. एका धर्माची स्थापना ब्रह्मा द्वारे,
अनेक धर्मांचा विनाश शंकरा द्वारे.… हाहाकारा नंतर जयजयकार होईल. किती हाहाकार
होणार आहे. संकटांमध्ये मरत राहतील. नॅचरल कॅलॅमिटीज (नैसर्गिक आपत्ती) देखील खूप
मदत करते. नाही तर मनुष्य खूप रोगी, दुःखी होतील. बाबा म्हणतात - मुले दुःखी होऊन
जागेवर पडून राहू नयेत म्हणून नॅचरल कॅलॅमिटीज देखील अशी जोराने येते जी सर्वांना
एकदम नष्ट करून टाकते. बॉम्बस् तर काहीच नाही आहेत, नॅचरल कॅलॅमिटीज खूप मदत करते.
भूकंपामध्ये प्रचंड प्रमाणात माणसे नष्ट होतील. पाण्याच्या एक-दोन लाटा आल्या आणि
हे संपले. समुद्राला देखील जरूर उधाण येईल. धरतीला गिळून टाकेल, १०० फूट पाण्याची
लाट जर आली तर काय होईल. हा आहे हाहाकारचा सीन. असे दृश्य पाहण्यासाठी हिंमत पाहिजे.
मेहनत देखील करायची आहे, निर्भय सुद्धा बनायचे आहे. तुम्हा मुलांमध्ये अजिबात
अहंकार असता कामा नये. देही-अभिमानी बना. देही-अभिमानी होऊन राहणारे खूप गोड असतात.
बाबा म्हणतात - मी तर आहे निराकार आणि विचित्र. इथे येतो - सेवा करण्याकरिता. माझी
बढाई (महिमा) बघा किती करतात. ज्ञानाचा सागर…, ओ बाबा आणि मग म्हणतात पतित
दुनियेमध्ये या. तुम्ही निमंत्रण तर खूप चांगले देता. असे देखील म्हणत नाही की,
स्वर्गामध्ये येऊन सुख तर पहा. म्हणतात - ‘हे पतित-पावन आम्ही पतित आहोत, आम्हाला
पावन बनविण्याकरिता या’. निमंत्रण पहा कसे आहे. एकदम तमोप्रधान पतित दुनिया आणि मग
पतित शरीरामध्ये बोलावतात. खूप चांगले निमंत्रण देतात भारतवासी! ड्रामाचे रहस्यच असे
आहे. यांना (ब्रह्मा बाबांना) देखील थोडेच माहीत होते की, आपला अनेक जन्मांतील
अंताचा जन्म आहे. बाबांनी प्रवेश केला तेव्हा सांगितले. बाबांनी प्रत्येक गोष्टीचे
रहस्य सांगितले आहे. ब्रह्माला वन्नी (पत्नी) बनायचे आहे. बाबा स्वतः म्हणतात -
‘माझी ही वन्नी आहे’. मी यांच्यामध्ये प्रवेश करून यांच्याद्वारे तुम्हाला माझे
बनवतो. ही खरी-खरी मोठी आई झाली आणि ती ॲडॉप्टेड आई झाली. तुम्ही यांना माता-पिता
म्हणू शकता. शिवबाबांना फक्त बाबाच म्हणता येईल. हे आहेत ब्रह्मा बाबा. आई गुप्त आहे.
ब्रह्मा आहे आई परंतु शरीर पुरुषाचे आहे. हे तर सर्वांना सांभाळू शकणार नाहीत
म्हणून या मुलीला ॲडॉप्ट केले आहे, नाव ठेवले आहे - मातेश्वरी. हेड झाली ना. ड्रामा
अनुसार एकच सरस्वती आहे. बाकी दुर्गा, काली इत्यादी सर्व अनेक नावे आहेत. आई-वडील
तर एकच असतात ना. तुम्ही सर्व आहात मुले. गायन देखील आहे ब्रह्माची मुलगी - सरस्वती.
तुम्ही ब्रह्माकुमार-कुमारी आहात ना. तुमची अनेक नावे आहेत. या सर्व गोष्टी
तुमच्यामध्ये देखील नंबरवार समजतील. शिक्षणामध्ये देखील नंबरवार तर असतात ना. एक
दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही. ही राजधानी स्थापन होत आहे. हा पूर्व-नियोजित ड्रामा
आहे. याला विस्ताराने समजून घ्यायचे आहे. पुष्कळ पॉईंटस् आहेत. बॅरिस्टरी शिकतात मग
त्यांच्यामध्ये देखील नंबरवार असतात. काही बॅरिस्टर तर २-३ लाख कमवतात. कोणी तर बघा
कपडे सुद्धा फाटलेले घालतात. यामध्ये देखील असेच आहे.
तर मुलांना सांगितले
गेले आहे की, हा इंटरनॅशनल रोला आहे. आता तुम्ही समजता की सर्वांनी निश्चिंत रहा.
युद्ध तर जरूर होणारच आहे. तुम्ही दवंडी पिटता की, नवीन दैवी राजधानी पुन्हा स्थापन
होत आहे. अनेक धर्मांचा विनाश होईल. किती क्लियर आहे. प्रजापिता ब्रह्मा द्वारे ही
प्रजा रचली जाते. म्हणतात - ही माझी मुखवंशावळी आहे. तुम्ही मुखवंशावळी ब्राह्मण
आहात. ते कुखवंशावळी ब्राह्मण आहेत. ते आहेत पुजारी, तुम्ही आता पूज्य बनत आहात.
तुम्ही जाणता हम सो देवता पूज्य बनत आहोत. तुमच्यावर आता लाईटचा ताज नाही आहे. तुमची
आत्मा जेव्हा पवित्र बनेल तेव्हा हे शरीर सोडून देईल. या शरीरावर तुम्हाला लाईटचा
ताज दाखवू शकत नाही, शोभणार नाही. यावेळी तुम्ही आहात गायन लायक. यावेळी कोणाचीही
आत्मा पवित्र नाहीये, त्यामुळे यावेळी कोणावरही लाईट असता कामा नये. लाईट
सतयुगामध्ये असते. दोन कला कमी असणाऱ्यांना देखील ही लाईट दाखवता कामा नये. अच्छा.
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आपली स्थिती
अशी अचल आणि निर्भय बनवायची आहे जेणेकरून अंतिम विनाशाच्या दृश्याला पाहू शकाल.
मेहनत करायची आहे देही-अभिमानी बनण्याची.
२) नवीन राजधानीमध्ये
उच्च पद घेण्यासाठी पूर्णतः अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे आहे. पास होऊन विजयी
माळेचा मणी बनायचे आहे.
वरदान:-
नेहमी भगवान
आणि भाग्याच्या स्मृतीमध्ये राहणारे सर्वश्रेष्ठ भाग्यवान भव
संगमयुगावर चैतन्य
रूपामध्ये स्वयं भगवान मुलांची सेवा करत आहेत. भक्ती मार्गामध्ये सर्व भगवंताची सेवा
करतात परंतु इथे चैतन्य ठाकूरांची सेवा स्वयं भगवान करतात. अमृतवेलेला उठवतात, भोग
लावतात, झोपवतात, रेकॉर्डवर (गाण्यावर) झोपणारे आणि रिगार्ड ठेवून (आदर ठेऊन) उठणारे,
असे लाडके आणि सर्व श्रेष्ठ भाग्यवान आपण ब्राह्मण आहोत - याच भाग्याच्या आनंदामध्ये
नेहमी झोके घेत रहा. फक्त बाबांचे लाडके बना, मायेचे नको. जे मायेचे लाडके बनतात ते
खूप बालिश खेळ करतात.
बोधवाक्य:-
आपल्या
हर्षितमुख चेहऱ्याद्वारे सर्व प्राप्तींची अनुभूती करविणे हीच खरी सेवा आहे.
अव्यक्त इशारे:-
अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा.
अशरीरी बनणे अर्थात
आवाजापासून परे जाणे. शरीर आहे तर आवाज आहे. शरीरापासून परे (दूर) व्हाल तर
सायलेन्स. एका सेकंदामध्ये सेवेच्या संकल्पामध्ये यावे आणि एका सेकंदामध्ये
संकल्पापासून परे स्वरूपामध्ये स्थित व्हावे. कामा प्रती शारीरिक भानामध्ये यावे
पुन्हा सेकंदामध्ये अशरीरी व्हावे; जेव्हा ही ड्रिल पक्की होईल तेव्हा सर्व
परिस्थितींचा सामना करू शकाल.