01-12-24 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
18.01.2003 ओम शान्ति
मधुबन
ब्राह्मण जन्माच्या
स्मृतींद्वारे समर्थ बनून सर्वांना समर्थ बनवा
आज चोहो बाजूच्या
सर्व स्नेही मुलांचे स्नेहाचे गोड-गोड आठवणीचे विभिन्न बोल, स्नेहाच्या मोत्यांच्या
माळा बापदादांकडे अमृतवेळेही अगोदर पोहोचल्या आहेत. मुलांचा स्नेह बापदादांना देखील
स्नेहाच्या सागरामध्ये सामावून घेतो. बापदादांनी पाहिले की प्रत्येक मुलाची स्नेहाची
शक्ति अतूट आहे. ही स्नेहाची शक्ति प्रत्येक मुलाला सहजयोगी बनवत आहे. स्नेहाच्या
आधारावर सर्व आकर्षणांपासून उपराम होऊन पुढे-पुढे जात आहेत. असे एकही मूल बघितलेले
नाही ज्याला बापदादांद्वारे किंवा विशेष आत्म्यांद्वारे अलिप्त आणि प्रेमळ स्नेहाचा
अनुभव झालेला नाही. प्रत्येक ब्राह्मण आत्म्याच्या ब्राह्मण जीवनाचा आदिकाळ
स्नेहाच्या शक्तिद्वारेच झालेला आहे. ब्राह्मण जन्माची ही स्नेहाची शक्ति वरदान
बनून पुढे नेत आहे. तर आजचा दिवस विशेष बाबांच्या आणि मुलांच्या स्नेहाचा दिवस आहे.
प्रत्येकाने मनोमन आपल्या स्नेहाच्या मोत्यांच्या भरपूर माळा बापदादांना घातल्या.
बाकीच्या सर्व शक्ति आजच्या दिवशी मर्ज आहेत परंतु स्नेहाची शक्ति इमर्ज आहे.
बापदादा देखील मुलांच्या स्नेहाच्या सागरामध्ये लवलीन (एकरूप) झाले आहेत.
आजच्या दिवसाला स्मृती
दिवस म्हणता. स्मृती दिवस फक्त ब्रह्माबाबांच्या स्मृतीचा दिवस नाही आहे परंतु
बापदादा म्हणतात आज आणि कायमचेच हे लक्षात ठेवा की, बापदादांनी ब्राह्मण जन्म घेताच
आदि पासून आत्ता पर्यंत कोण-कोणत्या स्मृती दिल्या आहेत. त्या स्मृतींच्या माळा आठवा,
खूप मोठी माळा बनेल. सर्वांना सर्वात पहिली स्मृती कोणती मिळाली? पहिला धडा लक्षात
आहे ना! मी कोण! या स्मृतीनेच नवीन जन्म दिला, वृत्ति, दृष्टी, स्मृतीचे परिवर्तन
केले आहे. अशा स्मृती आठवताच रुहानी (आत्मिक) आनंदाची झलक डोळ्यांमध्ये, मुखामध्ये
येतेच. तुम्ही स्मृतींना आठवता आणि भक्त माळेचा जप करतात. एक जरी स्मृती
अमृतवेलेपासून कर्मयोगी बनण्याच्या वेळेपर्यंत सतत लक्षात जरी राहिली तरीही स्मृती
समर्थ स्वरूप बनवते कारण जशी स्मृती तशीच समर्थी स्वतःच येते त्यामुळे आजच्या
दिवसाला स्मृती दिवसा सोबतच समर्थ दिवसही म्हणतात. ब्रह्मा बाबा समोर येताच, बाबांची
दृष्टी पडताच आत्म्यांमध्ये समर्थी येते (शक्ती येते). सर्व अनुभवी आहेत. सर्व
अनुभवी आहात ना! भले साकार रूपामध्ये बघितले असेल, नाहीतर मग अव्यक्त रूपाच्या
पालनेमध्ये पालना घेत अव्यक्त स्थितीचा अनुभव करता, सेकंदामध्ये हृदयातून बापदादा
म्हटले आणि समर्थी स्वतःच येते; म्हणूनच हे समर्थ आत्म्यांनो, आता अन्य आत्म्यांना
आपल्या समर्थीने (शक्तीद्वारे) समर्थ बनवा. उमंग आहे ना! आहे उमंग, असमर्थ
असणाऱ्याला समर्थ बनवायचे आहे ना! बापदादांनी पाहिले की, चोहो बाजूंना कमजोर
आत्म्यांना समर्थ बनवण्याचा उमंग चांगला आहे.
शिवरात्रीचे
प्रोग्राम धुमधडाक्यात बनवत आहेत. सर्वांना उमंग आहे ना! ज्यांना उमंग आहे - बस्स,
या शिवरात्रीला कमाल (चमत्कार) करणार, त्यांनी हात वर करा. असा चमत्कार ज्यामुळे
गडबड-गोंधळ संपुष्टात येईल. जयजयकार होईल वाह! व्वा समर्थ आत्म्यांनो वाह! सर्व
झोननी प्रोग्राम बनवला आहे ना! पंजाबने देखील बनवला आहे ना! चांगले आहे. भटकणारे
आत्मे, तहानलेले आत्मे, अशांत आत्मे, तर अशा आत्म्यांना ओंजळभर तरी द्या. कितीही
झाले तरी तुमचेच भाऊ-बहिणी आहेत. तर आपल्या भावांवर, आपल्या बहिणींवर दया येते ना!
बघा, आजकाल आपत्तीच्या वेळी परमात्म्याची आठवण करतात परंतु शक्तींना, देवतांमध्ये
देखील गणेश आहे, हनुमान आहे अशा इतरही देवतांची जास्त आठवण करतात, तर ते कोण आहेत?
तुम्हीच आहात ना! तुमची रोज आठवण करतात. हाक मारत आहेत - ‘हे कृपाळू, दयाळू दया करा,
कृपा करा. थोडासा सुख-शांतीचा एक थेंब द्या’. तुमच्याद्वारे एका थेंबाचे तहानलेले
आहेत. तर हे शक्तिंनो, हे देव तुमच्यापर्यंत दु:खी आत्म्यांचा, तहानलेल्या
आत्म्यांचा आवाज पोहोचत नाही आहे का? पोहोचत आहे ना? बापदादा जेव्हा हाक ऐकतात तर
शक्तींची आणि देवांची आठवण करतात. तर दादींनी चांगला प्रोग्राम बनवला आहे, बाबांना
आवडला आहे. स्मृती दिवस तर सदैव आहेच परंतु तरी देखील आजच्या दिवशी स्मृती द्वारे
सर्व समर्थी (सर्व शक्ती) विशेष प्राप्त केल्या आहेत, आता उद्यापासून
शिवरात्रीपर्यंत बापदादा चोहो बाजूंच्या मुलांना म्हणतात की, या विशेष दिवशी हेच
लक्ष्य ठेवा की जास्तीत-जास्त आत्म्यांना मनसा द्वारे, वाणी द्वारे अथवा
संबंध-संपर्काद्वारे कोणत्याही विधीने संदेश रुपी ओंजळ जरूर द्यायची आहे. आपल्या
वरील तक्रारीचे ओझे तर उतरवा. मुले विचार करतात - अजून तरी विनाशाची डेट तर दिसत
नाही आहे, त्यामुळे त्यांच्या तक्रारीची कधीही पूर्तता करू; परंतु नाही, जर
आत्तापासून तक्रारीची पूर्तता केली नाहीत तर ही देखील तक्रार मिळेल की, ‘तुम्ही या
अगोदर का सांगितले नाहीत. आम्ही देखील काही तरी बनवले असते’; नंतर तर फक्त ‘अहो
प्रभू’ म्हणतील; म्हणून त्यांना देखील काही ना काही वारशाची ओंजळ घेऊ द्या. त्यांना
देखील थोडा वेळ द्या. एका थेंबाने तरी तहान भागवा, तहानलेल्यासाठी एक थेंब सुद्धा
खूप महत्वाचा असतो. तर हाच प्रोग्राम आहे ना की उद्यापासून बापदादा सुद्धा हिरवा
झेंडा नाही, नगाडे वाजवत आहेत की, ‘त्या आत्म्यांना, हे तृप्त आत्म्यांनो, संदेश
द्या, संदेश द्या’. कमीत-कमी शिवरात्रीला बाबांच्या बर्थ डे ला तोंड तरी गोड करू
देत की, हां, आम्हाला संदेश मिळाला आहे. ही दिलखुश मिठाई सर्वांना ऐकवा, खायला द्या.
साधारण शिवरात्री साजरी करू नका, काही कमाल (चमत्कार) करून दाखवा. उमंग आहे ना?
पहिल्या लाइनला आहे? खूप धमाल माजवा. कमीत-कमी हे तरी समजू देत की, शिवरात्रीचे इतके
मोठे महत्व आहे. आमच्या बाबांचा जन्म दिवस आहे, ऐकून आनंद तर साजरा करू दे.
बापदादांनी पाहिले आहे की, अमृतवेलेला मेजॉरिटींची आठवण आणि ईश्वरीय प्राप्तींचा नशा
खूप चांगला असतो. परंतु कर्मयोगी स्टेजमध्ये जो अमृतवेलेचा नशा आहे त्यामध्ये फरक
पडतो. कारण काय आहे? कर्म करताना, ‘सोल कॉन्शस’ आणि ‘कर्म कॉन्शस’ दोन्ही असतात.
याची विधी आहे कर्म करताना - ‘मी आत्मा, कोणती आत्मा, ते तर जाणताच, आत्म्याचे जे
वेगवेगळे स्वमान मिळालेले आहेत, अशी आत्मा करावनहार होऊन या कर्मेंद्रियांद्वारे
कर्म करणारी आहे, ही कर्मेंद्रिये कर्मचारी आहेत परंतु कर्मचारींकडून कर्म करवून
घेणारी मी करावनहार आहे, न्यारी (वेगळी) आहे. काय लौकीकमध्ये देखील डायरेक्टर जेव्हा
आपल्या साथीदारांकडून, निमित्त सेवा करणाऱ्यांकडून सेवा करवून घेत असताना,
डायरेक्शन देत असताना, ड्युटी बजावत असताना विसरून जातात का की मी डायरेक्टर आहे
ते? तर स्वतःला करावनहार शक्तिशाली आत्मा आहे, असे समजून कार्य करवून घ्या. ही आत्मा
आणि हे शरीर, हे शरीर करनहार आहे आणि ही आत्मा करावनहार आहे, ही स्मृती मर्ज होऊन
जाते. तुम्हा सर्वांना, जुन्या मुलांना माहीत आहे की ब्रह्मा बाबांनी सुरुवातीला
कोणता अभ्यास केला? एक डायरी पाहिली होती ना. संपूर्ण डायरीमध्ये एकच शब्द - मी
देखील आत्मा, जशोदा देखील आत्मा, ही मुले सुद्धा आत्मा आहेत, आत्मा आहेत, आत्मा
आहेत… हा फाऊंडेशनचा पक्का अभ्यास केला. तर हा पहिला धडा - ‘मी कोण?’ याचा वारंवार
अभ्यास हवा. चेकिंग हवी, असे नाही - ‘मी तर आहेच आत्मा’. अनुभव करा की मी आत्मा
करावनहार बनून कर्म करवून घेत आहे. करनहार वेगळा आहे, करावनहार वेगळा आहे. ब्रह्मा
बाबांचा दुसरा अनुभव देखील ऐकला आहे की, ही कर्मेंद्रिये, कर्मचारी आहेत. तर रोज
रात्रीची कचेरी ऐकली आहे ना! तर मालक बनून या कर्मेंद्रिय रूपी कर्मचारींना हालहवाल
विचारला ना! तर जसा ब्रह्मा बाबांनी हा अभ्यास फाऊंडेशन खूप पक्के केले, म्हणूनच जी
मुले अखेरच्या वेळी देखील सोबत होती त्यांनी काय अनुभव केला? की बाबा कार्य करत
असताना सुद्धा शरीरामध्ये असूनही अशरीरी स्थितीमध्ये चालत-फिरत असल्याचा अनुभव होत
राहिला. भले कर्माचा हिशोब सुद्धा चुकता करावा लागला परंतु साक्षी होऊन, ना स्वतः
कर्माच्या हिशोबाच्या वश राहिले, ना इतरांना कर्माचा हिशोब चुकता होत असल्याची
जाणीव होऊ दिली. तुम्हाला कळले का की ब्रह्मा बाबा अव्यक्त होत आहेत म्हणून, नाही
कळले ना! तर इतके न्यारे, साक्षी, अशरीरी अर्थात कर्मातीत स्टेजचा खूप काळापासून
अभ्यास केला तेव्हा अंतिम समयी सुद्धा त्याच स्वरूपाचा अनुभव झाला. हा खूप काळाचा
अभ्यास कामी येतो. असा विचार करू नका की शेवटच्या क्षणी देहभान सोडून देऊ, नाही,
खूप काळाचा अशरीरीपणाचा, देहापासून न्यारा करावनहार स्थितीचा अनुभव हवा. भले कोणी
तरुण असेल, किंवा वृद्ध असेल, निरोगी असेल, नाहीतर आजारी असेल कोणाचाही कधीही अंतिम
वेळ येऊ शकतो म्हणून खूप काळ साक्षीपणाच्या अभ्यासावर अटेंशन द्या. मग कितीही
नैसर्गिक आपदा येतील परंतु ही अशरीरीपणाची स्टेज तुम्हाला सहजच अलिप्त आणि बाबांचा
प्रिय बनवेल म्हणूनच बापदादा ‘खूप काळ’ या शब्दाला अंडरलाइन करवत आहेत. काहीही होवो,
संपूर्ण दिवसभरामध्ये साक्षीपणाच्या स्टेजचा, करावनहारच्या स्टेजचा, अशरीरीपणाच्या
स्टेजचा अनुभव वारंवार करा, तेव्हाच ‘अंत मते फरिश्ता सो देवता’ बनणे निश्चित आहे.
बाप समान बनायचे असेल तर बाबा निराकार आणि फरिश्ता आहेत, ब्रह्मा बाप समान बनणे
अर्थात फरिश्ता स्टेजमध्ये राहणे. जसे फरिश्ता रूप साकार रूपामध्ये पाहिले, ऐकत
असताना, बोलत असताना, कार्य व्यवहार करताना अनुभव केला की बाबा शरीरामध्ये असूनही
जसे काही न्यारे आहेत (अलिप्त आहेत). कार्याला सोडून अशरीरी बनणे, हे तर थोडा वेळ
होऊ शकते परंतु कार्य करताना, वेळ काढून अशरीरी, पॉवरफुल स्टेजचा अनुभव करत रहा.
तुम्ही सर्व फरिश्ते आहात, बाबांद्वारे या ब्राह्मण जीवनाचा आधार घेऊन संदेश
देण्यासाठी साकारमध्ये कार्य करत आहात. फरिश्ता अर्थात देहामध्ये राहून देहापासून
न्यारे आणि याचे उदाहरण स्वरूप ब्रह्मा बाबांना पाहिले आहे, असंभव नाही आहे. पाहिले
आहे आणि अनुभव केला आहे. जे कोणी निमित्त आहेत, भले आता विस्तार अधिक आहे परंतु
जितकी ब्रह्मा बाबांची नवीन नॉलेज, नवीन जीवन, नवीन दुनिया बनविण्याची जबाबदारी होती,
तितकी आता कोणाचीही नाही आहे. तर सर्वांचे लक्ष्य आहे ब्रह्मा बाप समान बनणे अर्थात
फरिश्ता बनणे. शिवबाबांसमान बनणे अर्थात निराकार स्थितीमध्ये स्थित होणे. अवघड आहे
का? बाबा आणि दादांवर प्रेम आहे ना! तर ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्यासारखे बनणे,
जर संकल्प देखील आहे - बाप समान बनायचेच आहे, तर काहीच अवघड नाही. फक्त वारंवार
अटेंशन द्यायचे आहे. साधारण जीवन नाही. साधारण जीवन जगणारे पुष्कळ आहेत. मोठी-मोठी
कार्य करणारे भरपूर आहेत. परंतु तुमच्यासारखे कार्य, तुम्हा ब्राह्मण आत्म्यांशिवाय
इतर कोणीही करू शकत नाही.
तर आज स्मृतिदिनाला
बापदादा ‘समानतेमध्ये समीप या, समीप या, समीप या’, हे वरदान देत आहेत. सर्व हदचे
किनारे, भले मग संकल्प असो, किंवा बोल असो, किंवा कर्म असो, किंवा संबंध-संपर्क असो
कोणताही हदचा किनारा असो, आपल्या मनाच्या नावेला या हदच्या किनाऱ्यांपासून मुक्त करा.
आतापासून जीवन जगत असताना मुक्त, असा जीवनमुक्तीचा अलौकिक अनुभव खूप काळ करा. अच्छा.
चोहो बाजूच्या मुलांची
पत्रे भरपूर मिळाली आहेत आणि मधुबनवाल्यांचा क्रोधमुक्तचा रिपोर्ट, समाचार देखील
बापदादांपाशी पोहोचला आहे. बापदादा हिंमतीवर खुश आहेत, आणि पुढील काळासाठी सदैव
मुक्त राहण्यासाठी सहनशक्तीचे कवच घालून रहा, तर कोणी कितीही प्रयत्न करेल परंतु
तुम्ही सदैव सेफ रहाल.
असे सर्व दृढ
संकल्पधारी, सदैव स्मृती स्वरूप आत्म्यांना, सदैव सर्व शक्तींना वेळेवर कार्यामध्ये
लावणाऱ्या विशेष आत्म्यांना, सदैव सर्व आत्म्यांसाठी दयाळू असणाऱ्या आत्म्यांना,
सदैव बापदादा समान बनण्याच्या संकल्पाला साकार रूपामध्ये आणणाऱ्या अशा खूप-खूप-खूप
प्रिय आणि न्यारे असणाऱ्या मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
डबल फॉरेनर्सना:-
डबल फॉरेनर्सना नशा आहे. डबल नशा का आहे? कारण समजता की, जसे बाबा दूरदेशचे आहेत ना
तसे आम्ही देखील आहोत, तर आम्ही देखील दूर देशातून आलो आहोत. बापदादांनी डबल विदेशी
मुलांची एक विशेषता बघितली की दिव्याने दिवा लावत अनेक देशांमध्ये बापदादांच्या
जागृत दीपकांची दिवाळी साजरी केली आहे. डबल विदेशींना संदेश देण्याची आवड चांगली आहे.
प्रत्येक ग्रुपमध्ये बापदादांनी पाहिले ३५-४० देशांचे असतात. मुबारक असो. कायम स्वतः
देखील उडत रहा आणि फरिश्ते बनून उडत-उडत संदेश देत रहा. चांगले आहे, बापदादा केवळ
तुम्हा ३५ देशवाल्यांना बघत नाहीत इतरही देशवाल्यांना तुमच्या सोबत बघत आहेत. तर
नंबरवन बाप समान बनणारे आहात ना! नंबर वन की नंबरवार बनणारे आहात? नंबर वन? नंबरवार
नाही ना? नंबरवन बनणे अर्थात प्रत्येक वेळी विन करणारे (जिंकणारे). जे जिंकतात ते
विजयी होतात. तर असे आहात ना? खूपच छान. विजयी आहात आणि सदैव विजयी राहणारे आहात.
बरे, आणि सर्वांना, जिथे-जिथे जाल तिथे ही आठवण करून द्या की, सर्व डबल फॉरेनर्सना
नंबर वन बनायचे आहे.
अच्छा - बापदादा सर्व
मातांना गो-पालाच्या प्रिय मातांना खूप-खूप हृदयापासून प्रेमपूर्वक आठवण देत आहेत
आणि पांडव भले मग ते युथ असो, किंवा प्रवृत्तीवाले असो, पांडव सदैव पांडवपतीचे सोबती
राहिले आहेत, अशा सोबती पांडवांना देखील बापदादा खूप-खूप प्रेमपूर्वक आठवण देत आहेत.
दादींसोबत संवाद:-
आजच्या दिवशी काय आठवते? विल पॉवर्स मिळाल्या ना! विल पॉवर्सचे वरदान आहे. खूप
चांगला पार्ट बजावला आहे, याची मुबारक आहे. सर्वांच्या दुवा तुम्हाला खूप आहेत.
तुम्हाला पाहूनच सगळे खुश होऊन जातात, बोला किंवा नका बोलू. तुम्हाला काही होते ना
तर सगळे असे समजतात आपल्यालाच होत आहे. इतके प्रेम आहे. सर्वांचे आहे. (माझे देखील
सर्वांवर खूप प्रेम आहे). प्रेम तर सर्वांवर खूप आहे, हे प्रेमच सर्वांना चालवत आहे.
धारणा कमी असेल किंवा जास्त असेल, परंतु प्रेम चालवत आहे. खूप छान.
ईशू दादींसोबत संवाद:-
हिने देखील हिशोब चुकता केला. काही हरकत नाही. हिचा सहज पुरुषार्थ, सहज हिशोब चुकता.
सहजच झाले, झोपेतच झाले. विष्णू सारखा आराम मिळाला. अच्छा. तरीही साकार पासून
आतापर्यंत यज्ञ रक्षक बनल्या आहात. तर यज्ञ रक्षक बनण्याच्या दुवा खूप असतात.
सर्व दादी
बापदादांच्या खूप-खूप समीप आहेत. समीप रत्न आहेत आणि सर्वांना दादींचे महत्व आहे.
संघटन देखील चांगले आहे. तुम्हा दादींच्या संघटनेमुळे इतकी वर्षे यज्ञाचे रक्षण केले
आहे आणि करत राहणार. ही एकताच सर्व सफलतेचा आधार आहे. (बाबा मध्यभागी आहेत) बाबांना
मधेच ठेवले आहे, हे अटेंशन खूप चांगले दिले आहे. अच्छा. सर्व ठीक आहे.
वरदान:-
सर्व संबंधांनी
एका बाबांना आपला साथी बनविणारे सहज पुरुषार्थी भव
बाबा स्वतः सर्व
संबंधांनी साथ निभावण्याची ऑफर करतात. जशी वेळ तशा संबंधाने बाबांसोबत रहा आणि सोबती
बनवा. जिथे सदैव सोबत देखील आहे आणि सोबती देखील आहे तिथे काहीही कठीण असू शकत नाही.
जेव्हा कधी स्वतःला एकटे अनुभव कराल तर त्यावेळी बाबांच्या बिंदू रूपाची आठवण करू
नका, प्राप्तींची लिस्ट समोर आणा, वेगवेगळ्या वेळच्या रमणीक अनुभवाच्या गोष्टी
स्मृतीमध्ये आणा, सर्व संबंधाच्या रसाचा अनुभव करा म्हणजे मग मेहनत समाप्त होईल आणि
सहज पुरुषार्थी बनाल.
सुविचार:-
बहुरूपी बनून मायेच्या
बहुरूपांना ओळखा तर मास्टर मायापती बनाल.