02-01-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - बाबांचा पार्ट ॲक्युरेट आहे, ते आपल्या वेळेवर येतात, जराही फरक पडू शकत
नाही, त्यांच्या येण्याचे यादगार शिवरात्री खूप धुमधडाक्यात साजरी करा”
प्रश्न:-
कोणत्या
मुलांची विकर्म पूर्णत: नष्ट होऊ शकत नाहीत?
उत्तर:-
ज्यांचा योग ठीक नाही, बाबांची आठवण रहात नाही तर मग विकर्म विनाश होऊ शकत नाहीत.
योगयुक्त नसल्यामुळे इतकी सद्गती होत नाही, पापे राहून जातात मग पद देखील कमी होते.
योग नाही त्यामुळे नावा-रूपामध्ये अडकून राहतात, त्यांच्याच गोष्टी आठवत राहतात, ते
देही-अभिमानी राहू शकत नाहीत.
गीत:-
यह कौन आया आज
सवेरे सवेरे…
ओम शांती।
सकाळ किती वाजता होते? बाबा सकाळी किती वाजता येतात? (कोणी म्हटले ३ वाजता, कोणी
म्हटले ४, कोणी म्हणाले संगमावर, कोणी म्हणाले १२ वाजता) बाबा ॲक्युरेट विचारत आहेत.
१२ ला तर तुम्ही सकाळ म्हणू शकत नाही. १२ वाजून एक सेकंद झाला, एक मिनिट झाले तर
ए.एम. अर्थात सकाळ सुरू झाली. ही अचूक सकाळ आहे. ड्रामामध्ये यांचा पार्ट एकदम ॲक्युरेट
आहे. सेकंदाचा देखील उशीर होऊ शकत नाही, हा ड्रामा अनादि बनलेला आहे. १२ वाजून एक
सेकंद जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ए.एम. म्हणणार नाही, ही बेहदची गोष्ट आहे. बाबा
म्हणतात - मी येतो पहाटे. विलायत वाल्यांचे ए.एम., पी. एम. ॲक्युरेट असते. त्यांची
बुद्धी तरीही चांगली आहे. ते इतके सतोप्रधान सुद्धा बनत नाहीत, तर तमोप्रधान सुद्धा
बनत नाहीत. भारतवासीच १०० टक्के सतोप्रधान आणि मग १०० टक्के तमोप्रधान बनतात. तर
बाबा अतिशय ॲक्युरेट आहेत. पहाटे अर्थात १२ वाजून एक मिनिट, सेकंदाचा हिशोब ठेवत
नाहीत. सेकंड पास झाल्याचे माहितही पडत नाही. आता या गोष्टी तुम्ही मुलेच समजता.
दुनिया तर अगदीच घोर अंधारामध्ये आहे. सर्व भक्त बाबांची दुःखामध्ये आठवण करतात -
‘पतित-पावन या’. परंतु ते कोण आहेत? केव्हा येतात? हे काहीही जाणत नाहीत. मनुष्य
असूनही ॲक्युरेट काहीच जाणत नाहीत कारण पतित तमोप्रधान आहेत. काम विकार देखील किती
तमोप्रधान आहे. आता बेहदचे बाबा ऑर्डिनेंस (वटहुकूम) काढतात - ‘मुलांनो, कामजीत
जगतजीत बना’. आत्ता जर पवित्र बनला नाहीत तर विनाशाला कारण व्हाल. तुम्ही पवित्र
बनल्याने अविनाशी पद प्राप्त कराल. तुम्ही राजयोग शिकत आहात ना. स्लोगनमध्ये देखील
लिहितात - “बी होली, बी योगी.” वास्तविक लिहिले पाहिजे - ‘बी राजयोगी’. योगी तर
कॉमन अक्षर आहे. ब्रह्मतत्वाशी योग लावतात, ते देखील योगी ठरतात. मूल पित्याशी,
पत्नी पतीशी योग लावते परंतु हा तुमचा आहे राजयोग. बाबा राज योग शिकवतात म्हणून
‘राजयोग’ लिहिणे योग्य आहे. बी होली अँड राजयोगी (पवित्र आणि राजयोगी बना).
दिवसेंदिवस सुधारणा तर होतच राहतात. बाबा देखील म्हणतात - ‘आज तुम्हाला गुह्य ते
गुह्य गोष्ट ऐकवतो’. आता शिवाची जयंती सुद्धा येणार आहे. शिवजयंती तर तुम्हाला
चांगल्या रीतीने साजरी करायची आहे. शिवजयंतीला तर खूप चांगल्या रीतीने सेवा करायची
आहे. ज्यांच्याकडे प्रदर्शनी आहे, सर्वजण आपापल्या सेंटरवर अथवा घरी शिवजयंती
चांगल्या रीतीने साजरी करा आणि लिहा - ‘शिवबाबा गीता ज्ञान दाता बाबांकडून बेहदचा
वारसा घेण्याचा रस्ता येऊन शिका.’ भले दिवे इत्यादी देखील पेटवा. घराघरात शिवजयंती
साजरी केली पाहिजे. तुम्ही ज्ञानगंगा आहात ना. तर प्रत्येकाकडे गीता पाठशाळा असायला
हवी. घरोघरी गीता तर वाचतात ना. पुरुषांपेक्षा देखील माता भक्तीमध्ये शक्तीशाली
असतात. अशी कुटुंबे (परिवार) देखील असतात जिथे गीता वाचतात. तर घरामध्ये देखील
चित्र ठेवली पाहिजेत. लिहा की, ‘येऊन बेहदच्या बाबांकडून पुन्हा वारसा घ्या’.
हा शिवजयंतीचा उत्सव
वास्तविक तुमची खरी दिवाळी आहे. जेव्हा शिवपिता येतात तर घर-घर प्रकाशाने उजळून
निघते. या उत्सवाला भरपूर पणत्या इत्यादी पेटवून रोषणाई करून साजरे करा. तुम्ही खरी
दिवाळी साजरी करता. फायनल तर होणार आहे सतयुगामध्ये. तिथे घरोघरी प्रकाशच प्रकाश
असेल अर्थात प्रत्येक आत्म्याची ज्योत जागृत असते. इथे तर अंध:कार आहे. आत्मे
आसुरी-बुद्धीवाले बनले आहेत. तिथे आत्मे पवित्र असल्याने दैवी बुद्धी असते. आत्माच
पतित, आत्माच पावन बनते. आता तुम्ही वर्थ नॉट ए पेनी पासून पाउंड बनत आहात (कवडी
तुल्य पासून हिरे तुल्य बनत आहात). आत्मा पवित्र झाल्याने शरीर देखील पवित्र मिळेल.
इथे आत्मा अपवित्र आहे तर शरीर आणि दुनिया सुद्धा अपवित्र आहे. या गोष्टींना तुमच्या
मधून कोणी थोडे आहेत जे यथार्थ रित्या समजतात आणि त्यांना आंतरिक खुशी होते.
नंबरवार पुरुषार्थ तर करत राहतात. ग्रहचारी देखील असते. कधी राहूची ग्रहचारी बसते
तर आश्चर्यवत् भागंती होतात. बृहस्पतीची दशा बदलून नेमकी राहूची दशा बसते. काम
विकारामध्ये गेला आणि राहूची दशा बसली. मल्लयुद्ध असते ना. तुम्ही मातांनी पाहिले
नसेल कारण माता असतात गृहिणी . आता तुम्हाला माहित आहे मधमाशीला गृहिणी अर्थात घर
बनविणारी म्हणतात. घर बनविण्यात चांगली निपुण आहे, म्हणून गृहिणी नाव आहे. किती
मेहनत करते. ती देखील उत्तम मेस्त्री आहे. दोन-तीन खोल्या बनवते. ३-४ किडे घेऊन येते.
तशा तुम्ही देखील ब्राह्मणी आहात. भले १-२ बनवा, हवे तर १०-१२ जणांना बनवा, हवे तर
१०० ना, हवे तर ५०० बनवा. मंडप इत्यादी बनवता, हे देखील घर बनविणे झाले ना.
त्यामध्ये बसून सर्वांना भूं-भूं करता, तर मग कोणी ज्ञान समजून किड्यापासून
ब्राह्मण बनतात, कोणी सडलेले निघतात अर्थात या धर्माचे नाही आहेत. या धर्माचे
असणाऱ्यांनाच पूर्णपणे टच होईल. तुम्ही तर तरीही मनुष्य आहात ना. तुमची ताकद तर
त्यांच्यापेक्षा (मधमाशी पेक्षा) जास्ती आहे. तुम्ही २ हजार लोकांमध्ये सुद्धा भाषण
करू शकता. पुढे जाऊन ४-५ हजारांच्या सभेतही तुम्ही जाल. मधमाशी सोबत तुमची तुलना
केली आहे. आज-काल संन्यासी लोक देखील बाहेर विदेशामध्ये जाऊन म्हणतात - आम्ही
भारताचा प्राचीन राजयोग शिकवतो. आजकाल माता देखील भगवी वस्त्रे धारण करून जातात,
फॉरेनर्सची फसवणूक करतात. त्यांना म्हणतात भारताचा प्राचीन राजयोग भारतामध्ये येऊन
शिका. तुम्ही असे थोडेच म्हणाल की, भारतामध्ये येऊन शिका. तुम्ही तर फॉरेनमध्ये जाल
तेव्हा मग तिथेच बसून समजावून सांगाल - हा राजयोग शिका तर स्वर्गामध्ये तुमचा जन्म
होईल. यामध्ये युनिफॉर्म इत्यादी बदलण्याचा प्रश्नच नाही. इथेच देहाचे सर्व संबंध
विसरून स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. बाबाच लिब्रेटर गाईड आहेत, सर्वांना
दुःखापासून लिब्रेट करतात.
आत्ता तुम्हाला
सतोप्रधान बनायचे आहे. तुम्ही सुरुवातीला गोल्डन एजमध्ये होता, आता आयर्न एजमध्ये
आहात. संपूर्ण विश्व, सर्व धर्मवाले आयर्न एजमध्ये आहेत. कोणत्याही धर्माचा भेटला
तर त्याला सांगायचे आहे - ‘बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा तर
तुम्ही पावन बनाल, मग मी सोबत घेऊन जाईन’. बस्स, इतकेच बोला, जास्ती नाही. हे तर
खूप सोपे आहे. तुमच्या शास्त्रांमध्ये देखील आहे की घरोघरी संदेश दिला. एक कोणी
राहून गेला तर त्याने तक्रार केली की, मला कोणी सांगितले नाही. बाबा आले आहेत, तर
सर्वत्र दवंडी पिटायला हवी. एके दिवशी नक्कीच सर्वांना माहीत पडेल की,
शांतीधाम-सुखधामाचा वारसा देण्याकरिता बाबा आलेले आहेत. बरोबर जेव्हा देवी-देवता
धर्म होता तेव्हा इतर कोणताही धर्म नव्हता. सर्वजण शांतीधाममध्ये होते. अशा प्रकारे
विचार चालले पाहिजेत, स्लोगन बनवली पाहिजेत. बाबा म्हणतात - ‘देहा सहित सर्व
संबंधांना सोडा. स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा तर आत्मा पवित्र बनेल’.
आता आत्मे अपवित्र आहेत. आता सर्वांना पवित्र बनवून बाबा गाईड बनून परत घेऊन जातील.
सर्वजण आपापल्या सेक्शनमध्ये निघून जातील. मग देवी-देवता धर्मवाले नंबरवार येतील.
किती सोपे आहे. हे तर बुद्धीमध्ये धारण झाले पाहिजे. जे सेवा करतात, ते लपून राहू
शकत नाहीत. डिस-सर्विस करणारे देखील लपू शकत नाहीत. सेवायोग्य असणाऱ्यालाच तर
बोलावतात. जे काहीच ज्ञान ऐकवू शकत नाहीत त्यांना थोडेच बोलावतील. ते तर अजूनच नाव
बदनाम करतील. म्हणतील बी.के. असे असतात का? पूर्ण रिस्पॉन्ड (शंकांचे निरसन) सुद्धा
करत नाहीत. तर नाव बदनाम झाले ना. शिवबाबांचे नाव बदनाम करणारे उच्च पद मिळवू शकत
नाहीत. जसे इथेही काहीजण तर करोडपती आहेत, पदमपती सुद्धा आहेत, कोणी तर बघा उपाशी
मरत आहेत. असे गरीब सुद्धा येऊन प्रिन्स बनतील. आता तुम्ही मुलेच जाणता तोच
श्रीकृष्ण जो स्वर्गाचा प्रिन्स होता तो मग गरीब बनतो, पुन्हा बेगर टू प्रिन्स बनेल.
हा गरीब होता ना, थोडे-फार कमावले - ते देखील तुम्हा मुलांसाठी. नाहीतर तुमची पालना
कशी होईल? या सर्व गोष्टी शास्त्रांमध्ये थोड्याच आहेत. शिवबाबाच येऊन सांगतात.
बरोबर हा गावातील मुलगा होता. नाव काही श्रीकृष्ण नव्हते. ही आत्म्याची गोष्ट आहे
म्हणून मनुष्य गोंधळलेले आहेत. तर बाबांनी समजावून सांगितले आहे शिवजयंतीला
प्रत्येक घराघरामध्ये चित्रांवर सेवा करा. लिहा की, बेहदच्या पित्याकडून २१
जन्मांसाठी स्वर्गाची बादशाही सेकंदामध्ये कशी मिळते, ते येऊन समजून घ्या. जसे
दिवाळीला लोक अनेक दुकाने मांडून बसतात, तुम्हाला मग अविनाशी ज्ञान रत्नांचे दुकान
मांडून बसायचे आहे. तुमचे किती छान सजवलेले दुकान असेल. मनुष्य दिवाळीला करतात
तुम्ही मग शिवजयंतीला करा. जे शिवबाबा सर्वांचा आत्मारुपी दीपक जागृत करतात,
तुम्हाला विश्वाचा मालक बनवतात. ते तर लक्ष्मीकडे विनाशी धन मागतात आणि इथे जगत
अंबेकडून तुम्हाला विश्वाची बादशाही मिळते. हे रहस्य तुम्हाला बाबा समजावून सांगतात.
बाबा काही शास्त्रे थोडीच वापरतात. बाबा म्हणतात मी नॉलेजफुल आहे ना. हो, हे जाणतात
की, अमकी-अमकी मुले सेवा खूप छान करतात म्हणून आठवण येते. बाकी असे नाही की
प्रत्येकाच्या अंतर्मनाला जाणतो. हो, काही वेळा समजते - हा पतित आहे, संशय येतो.
त्यांचा चेहराच निराश होतो तर वरून बाबा सुद्धा संदेश पाठवतात की, यांना विचारा. हे
देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. जे काहीजणांनाच सांगतात, बाकी असे नाही की
सर्वांसाठी सांगतील. असे तर अनेक आहेत, काळे तोंड करतात. जे करतील ते स्वतःचेच
नुकसान करतील. खरे सांगितल्याने काही फायदा होईल, सांगितले नाही तर अजूनच नुकसान
करतील. समजले पाहिजे बाबा आम्हाला गोरे बनविण्यासाठी आले आहेत आणि आम्ही मग तोंड
काळे करतो! ही आहेच काट्यांची दुनिया. मनुष्य काटे आहेत. सतयुगाला म्हटले जाते
गार्डन ऑफ अल्लाह (ईश्वरीय बगीचा) आणि हे आहे फॉरेस्ट (जंगल) म्हणून बाबा म्हणतात -
जेव्हा-जेव्हा धर्माची ग्लानी होते, तेव्हा मी येतो. फर्स्ट नंबर श्रीकृष्ण पहा आणि
मग ८४ जन्मानंतर कसा बनतो. आता सर्वजण आहेत तमोप्रधान. आपसामध्ये भांडत राहतात. हे
सर्व ड्रामामध्ये आहे. मग स्वर्गामध्ये हे काहीच नसेल. मुद्दे तर अनेक आहेत, नोट
केले पाहिजेत. जसे बॅरिस्टर लोक देखील पॉईंट्सचे बुक ठेवतात ना. डॉक्टर लोक देखील
पुस्तक ठेवतात, त्यामध्ये बघून औषधे देतात. तर मुलांना किती चांगल्याप्रकारे अभ्यास
केला पाहिजे, सेवा केली पाहिजे. बाबांनी एक नंबरचा मंत्र दिला आहे - मनमनाभव. बाबा
आणि वारशाची आठवण करा तर स्वर्गाचे मालक बनाल. शिवजयंती साजरी करतात; परंतु
शिवबाबांनी काय केले? जरूर स्वर्गाचा वारसा दिला असेल. त्याला ५ हजार वर्षे झाली.
स्वर्गापासून नरक, नरका पासून स्वर्ग बनेल.
बाबा समजावून सांगत
आहेत - ‘मुलांनो, योगयुक्त बना तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे लक्षात
येईल. परंतु योग ठीक नाही आहे, बाबांची आठवण राहत नाही तर काही समजू शकत नाहीत.
विकर्म सुद्धा विनाश होऊ शकत नाहीत. योगयुक्त नसल्याने तितकीशी सद्गती देखील होत
नाही, पापे राहून जातात. मग पद देखील कमी होते. असे अनेक आहेत, योग अजिबातच नाहीये,
नावा-रूपामध्ये अडकून राहतात, त्यांचीच आठवण येत राहिली तर विकर्म विनाश कशी होतील?
बाबा म्हणतात - देही-अभिमानी बना. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) शिवजयंतीवर
अविनाशी ज्ञान रत्नांचे दुकान काढून सेवा करायची आहे. घर-घर प्रकाशित करून सर्वांना
बाबांचा परिचय द्यायचा आहे.
२) खऱ्या बाबांसोबत
खरे होऊन राहायचे आहे, कोणतेही विकर्म करून लपवायचे नाही. असे योगयुक्त बनायचे आहे,
जेणेकरून कोणतेही पाप राहून जाऊ नये. कोणाच्याही नावा-रुपामध्ये अडकून पडायचे नाही.
वरदान:-
‘मी’पणाच्या
भानाला नाहीसे करणारे ब्रह्मा बाप समान श्रेष्ठ त्यागी भव
नात्यांचा त्याग,
वैभवाचा त्याग ही काही मोठी गोष्ट नाहीये परंतु प्रत्येक कार्यामध्ये, संकल्पामध्ये
देखील इतरांना पुढे ठेवण्याची भावना असणे अर्थात ‘मी’पणाला नाहीसे करणे; ‘आधी तुम्ही’
म्हणणे… हा आहे श्रेष्ठ त्याग. यालाच म्हटले जाते स्वतःच्या भानाला नष्ट करणे. जसे
ब्रह्मा बाबांनी कायम मुलांना पुढे ठेवले. “मी पुढे राहू” यामध्ये देखील कायम त्यागी
राहिले, याच त्यागामुळे सर्वात पुढे अर्थात पहिल्या नंबरमध्ये जाण्याचे फळ मिळाले.
तर फॉलो फादर.
बोधवाक्य:-
पटकन कोणाचा
दोष काढणे - हे देखील दुःख देणे आहे.
आपल्या शक्तिशाली
मनसाद्वारे सकाश देण्याची सेवा करा:-
जसे उंच टॉवर वरून
सकाश देतात, लाईट-माईट पसरवतात. असे तुम्ही मुले देखील आपली उच्च स्थिती अथवा उच्च
स्थानावर बसून कमीतकमी ४ तास विश्वाला लाईट आणि माईट द्या. जसे सूर्य देखील विश्वाला
प्रकाश तेव्हाच देऊ शकतो जेव्हा उंचावर असतो. तर साकार सृष्टीला सकाश देण्यासाठी
उच्च स्थान निवासी बना.