02-01-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला आपसामध्ये खूप-खूप रुहानी प्रेमाने रहायचे आहे, कधीही
मतभेदामध्ये यायचे नाही”
प्रश्न:-
प्रत्येक
ब्राह्मण मुलाने आपल्या मनाला कोणती एक गोष्ट विचारली पाहिजे?
उत्तर:-
आपल्या मनाला विचारा - १) मी ईश्वराच्या हृदयामध्ये स्थान मिळवले आहे! २)
माझ्यामध्ये दैवी गुणांची धारणा कितपत आहे? ३) मी ब्राह्मण ईश्वरीय सेवेमध्ये बाधा
तर आणत नाही ना! ४) सदैव क्षीरखंड होऊन राहतो का! आमचे आपसामध्ये एकमत आहे? ५) मी
सदैव श्रीमताचे पालन करतो का?
गीत:-
भोलेनाथ से
निराला…
ओम शांती।
तुम्ही मुले आहात ईश्वरीय संप्रदाय. आधी आसुरी संप्रदाय होता. आसुरी संप्रदायाला हे
माहित नाही की भोलेनाथ कोणाला म्हटले जाते. हे देखील जाणत नाहीत की शिव-शंकर
वेगवेगळे आहेत. शंकर देवता आहेत आणि हे शिव, पिता आहेत. काहीही जाणत नाहीत. आता
तुम्ही आहात ईश्वरीय संप्रदाय अथवा ईश्वरीय फॅमिली. ती आहे आसुरी फॅमिली रावणाची.
किती फरक आहे. आता तुम्ही ईश्वरीय फॅमिलीमध्ये ईश्वराद्वारे शिकत आहात की
एकमेकांमध्ये रुहानी प्रेम कसे असले पाहिजे. एकमेकांमध्ये ब्राह्मण कुळामध्ये हे
रुहानी प्रेम इथूनच भरायचे आहे. ज्यांचे पूर्ण प्रेम नसेल तर त्यांना पद देखील
पूर्ण मिळणार नाही. तिथे तर आहेच एक धर्म, एक राज्य. आपसामध्ये कोणतेही भांडण होत
नाही. इथे तर राजाई राहिलेलीच नाहीये. ब्राह्मणांमध्ये देखील देह-अभिमान
असल्याकारणाने मतभेद होतात. असे मतभेदामध्ये येणारे मग सजा भोगून नंतर पास होतील.
तिथे मग एका धर्मामध्ये राहतात, तर तिथे शांती असते. आता त्या बाजूला आहे आसुरी
संप्रदाय किंवा आसुरी फॅमिली-टाईप. इथे आहे ईश्वरीय फॅमिली-टाईप. भविष्यासाठी दैवी
गुण धारण करत आहेत. बाबा सर्वगुण संपन्न बनवतात. सगळेच काही बनत नाहीत. जे
श्रीमतावर चालतात तेच विजयी माळेचे मणी बनतात. जे बनणार नाहीत ते प्रजेमध्ये येतात.
तिथे तर डीटी गव्हर्मेंट (दैवी शासन) आहे. १०० प्रतिशत प्युरिटी, पीस, प्रॉस्पेरिटी
(पवित्रता, शांती आणि समृद्धी) असते. या ब्राह्मण कुळामध्ये आता दैवी-गुण धारण
करायचे आहेत. काहीजण तर चांगल्या रीतीने धारण करतात आणि इतरांनाही धारण करण्यासाठी
प्रेरणा देत राहतात. ईश्वरीय कुळाचे आपसामध्ये रुहानी प्रेम तेव्हा होईल जेव्हा
देही-अभिमानी बनतील, म्हणून पुरुषार्थ करत राहतात. अंतामध्ये देखील सर्वांची अवस्था
एकरस, एक समान तर असू शकणार नाही. मग सजा खाऊन पद-भ्रष्ट होतील. कमी दर्जाचे पद
मिळवतील. ब्राह्मणांमध्ये देखील जर कोणी आपसामध्ये क्षीरखंड होऊन राहत नसतील,
आपसामध्ये लून-पाणी (खारे-पाणी) होऊन राहतात, दैवी गुण धारण करत नाहीत तर उच्च पद
कसे प्राप्त करू शकतील. लून-पाणी झाल्यामुळे कुठेतरी ईश्वरीय सेवेमध्ये अडचणी
उत्पन्न करत राहतात. ज्याचा परिणाम असा होतो की, ते तितके उच्च पद प्राप्त करू शकत
नाहीत. एका बाजूला पुरुषार्थ करतात क्षीरखंड होण्याचा आणि दुसऱ्या बाजूला माया
लून-पाणी बनवते, ज्यामुळे सेवे ऐवजी डिससर्व्हीस करतात (नुकसान करतात). बाबा बसून
समजावून सांगतात तुम्ही आहात ईश्वरीय फॅमिली. ईश्वराच्या सोबत देखील राहता. कोणी
सोबत राहतात, कोणी दुसऱ्या-दुसऱ्या गावामध्ये राहतात परंतु आहात तर एकत्र ना. बाबा
देखील भारतामध्ये येतात. मनुष्य हे जाणत नाहीत, शिवबाबा केव्हा येतात, येऊन काय
करतात? तुम्हाला आता बाबांकडून परिचय मिळाला आहे. रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला
आता तुम्ही जाणता. दुनियेला हे माहित नाही आहे की हे चक्र कसे फिरते, आता कोणती वेळ
आहे, एकदम घोर अंधारामध्ये आहेत.
तुम्हा मुलांना रचता
बाबांनी येऊन सर्व समाचार ऐकवला आहे. त्याचसोबत हेही समजावून सांगतात की, ‘हे
शाळीग्रामांनो, माझी आठवण करा’. हे शिवबाबा आपल्या मुलांना सांगत आहेत. तुम्हाला
पावन बनण्याची इच्छा आहे ना. बोलावत आला आहात. आता मी आलो आहे. शिवबाबा येतातच -
भारताला पुन्हा शिवालय बनविण्यासाठी, रावणाने वेश्यालय बनवले आहे. स्वतःच गातात की
आम्ही पतित, विशश (विकारी) आहोत. भारत सतयुगामध्ये संपूर्ण निर्विकारी होता.
निर्विकारी देवतांची विकारी मनुष्य पूजा करतात. आणि मग निर्विकारीच विकारी बनतात.
हे कोणालाच ठाऊक नाहीये. पूज्य तर निर्विकारी होते आणि मग पुजारी विकारी बनले आहेत,
तेव्हाच तर बोलावतात - ‘हे पतित-पावन या, येऊन निर्विकारी बनवा’. बाबा म्हणतात - हा
अंतिम जन्म तुम्ही पवित्र बना. मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुमची पापे नष्ट
होतील आणि तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान देवता बनाल; नंतर मग चंद्रवंशी
क्षत्रिय फॅमिली-टाईपमध्ये याल. यावेळी आहात ईश्वरीय फॅमिली-टाईप नंतर मग दैवी
फॅमिलीमध्ये २१ जन्म रहाल. तुम्ही हा अंतिम जन्म या ईश्वरीय फॅमिलीमध्ये व्यतीत करता.
यामध्ये तुम्हाला पुरुषार्थ करून मग सर्वगुण संपन्न बनायचे आहे. तुम्ही पूज्य होता,
खरोखर राज्य करत होता आणि नंतर पुजारी बनला आहात. हे समजावून सांगावे लागेल ना.
भगवान आहेत बाबा. आपण त्यांची मुले आहोत तर फॅमिली झाली ना. गातात देखील - ‘तुम
मात-पिता हम बालक तेरे…’ तर फॅमिली झाली ना. आता बाबांकडून भरभरून सुख मिळते. बाबा
म्हणतात - तुम्ही निश्चितच माझी फॅमिली आहात. परंतु ड्रामा प्लॅन अनुसार रावण
राज्यामध्ये आल्यानंतर मग तुम्ही दुःखी होता तेव्हा मला बोलावता. यावेळी तुम्ही
अचूक फॅमिली आहात. मग तुम्हाला भविष्य २१ जन्मांसाठी वारसा देतो. हा वारसा मग दैवी
फॅमिलीमध्ये २१ जन्म कायम राहील. दैवी फॅमिली सतयुग-त्रेता पर्यंत चालते. आणि मग
रावण राज्य सुरु झाल्यामुळे विसरून जातात की आपण दैवी फॅमिलीचे आहोत.
वाम-मार्गामध्ये गेल्यामुळे आसुरी फॅमिली होते. ६३ जन्म शिडीवरून खाली घसरत आला
आहात. हे सर्व नॉलेज तुमच्या बुद्धीमध्ये आहे. कोणालाही तुम्ही समजावून सांगू शकता.
खरे तर तुम्ही देवी-देवता धर्माचे आहात. सतयुगाच्या आधी होते कलियुग. संगमावर
तुम्हाला मनुष्यापासून देवता बनवले जाते. मध्यभागी आहे संगम. तुम्हाला
ब्राह्मण-धर्मातून मग दैवी-धर्मामध्ये घेऊन जातात. समजावून सांगितले जाते
लक्ष्मी-नारायणाने हे राज्य कसे घेतले. त्यांच्या अगोदर आसुरी राज्य होते आणि मग
दैवी राज्य केव्हा आणि कसे झाले. बाबा म्हणतात कल्प-कल्प संगमावर येऊन तुम्हाला
ब्राह्मण, देवता, क्षत्रिय धर्मामध्ये घेऊन येतो. ही आहे भगवंताची फॅमिली. सर्वजण
म्हणतात - गॉड फादर. परंतु बाबांना न जाणल्याकारणाने अनाथ बनले आहेत; म्हणून बाबा
घोर अंधारापासून प्रकाश करण्यासाठी येतात. आता स्वर्ग स्थापन होत आहे. तुम्ही मुले
शिकत आहात, दैवी गुण धारण करत आहात. हे देखील माहित असले पाहिजे - शिव जयंती साजरी
करता, शिव जयंती नंतर काय असेल? जरूर दैवी राज्याची जयंती झाली असेल ना. हेवनली गॉड
फादर हेवनची (स्वर्गाची) स्थापना करण्यासाठी हेवनमध्ये तर येणार नाहीत. म्हणतात -
‘मी हेल आणि हेवन यांच्या मध्यावर संगमावर येतो’. शिवरात्री म्हणतात ना. तर
रात्रीमध्ये येतो. हे तुम्ही मुलेच समजू शकता. ज्यांना समजते ते इतरांकडूनही धारण
करवून घेतात. हृदयामध्ये देखील तेच स्थान मिळवतात जे मनसा-वाचा-कर्मणा सेवेमध्ये
तत्पर राहतात. जशी-जशी सेवा तितके हृदयामध्ये स्थान मिळवतात. कोणी ऑलराऊंडर सेवाधारी
असतात. सर्व काम शिकले पाहिजे. स्वयंपाक बनविणे, चपाती बनविणे, भांडी घासणे… ही
देखील सेवा आहे ना. फर्स्ट आहे बाबांची आठवण. त्यांच्या आठवणीनेच विकर्म विनाश
होतात. इथे वारसा मिळतो. तिथे सर्वगुण संपन्न असतात. यथा राजा-राणी तथा प्रजा.
दुःखाची गोष्टच नसते. यावेळी सर्व नरकवासी आहेत. सर्वांची उतरती कला आहे. आणि आता
चढती कला होईल. बाबा सर्वाना दुःखातून सोडवून सुखामध्ये घेऊन जातात, म्हणून बाबांना
लिबरेटर म्हटले जाते. इथे तुम्हाला नशा असतो की आपण बाबांकडून वारसा घेत आहोत, लायक
बनत आहोत. लायक तर त्यांना म्हणणार जे इतरांना राजाई पद प्राप्त करण्या लायक बनवतात.
हे देखील बाबांनी समजावून सांगितले आहे की, शिकणारे तर पुष्कळ येतील. असे नाही की
सगळेच ८४ जन्म घेतील. जे थोडे शिकतील ते उशिरा येतील, तर जन्म देखील कमी असतील ना.
कोणी ८०, कोणी ८२, कोणी लवकर येतात, कोणी मागाहून येतात… सर्व काही शिक्षणावर
अवलंबून आहे. साधारण प्रजा शेवटी येईल. त्यांचे ८४ जन्म असू शकत नाहीत. मागाहून येत
राहतात. जो अगदी शेवटी असेल तो त्रेताच्या अंतामध्ये येऊन जन्म घेईल. आणि नंतर
वाम-मार्गामध्ये जातात. घसरणे चालू होते. भारतवासीयांनी कसे ८४ जन्म घेतले आहेत,
त्यांची ही शिडी आहे. हा गोळा आहे ड्रामाच्या रूपामध्ये. जे पावन होते तेच आता पतित
बनले आहेत आणि नंतर पावन देवता बनतात. बाबा जेव्हा येतात तेव्हा सर्वांचे कल्याण
होते, म्हणून याला ऑस्पिशिअस युग म्हटले जाते. बलिहारी बाबांची आहे जे सर्वांचे
कल्याण करतात. सतयुगामध्ये सर्वांचे कल्याण होते, कोणतेही दुःख नव्हते; हे तर
समजावून सांगावे लागेल की आपण ईश्वरीय फॅमिली-टाईपचे आहोत. ईश्वर सर्वांचा पिता आहे.
इथेच तुम्ही ‘मात-पिता’ असे गाता. तिथे तर फक्त फादर म्हटले जाते. इथे तुम्हा
मुलांना माता-पिता मिळतात. इथे तुम्हा मुलांना ॲडॉप्ट केले जाते. फादर क्रिएटर आहेत
तर मदर देखील असेल. नाहीतर क्रिएशन (रचना) कशी होईल. हेवनली गॉड फादर हेवन कसा
स्थापन करतात, हे ना भारतवासी जाणतात, ना विलायतवाले जाणतात. आता तुम्ही जाणता नवीन
दुनियेची स्थापना आणि जुन्या दुनियेचा विनाश, तर जरूर संगमावरच होईल. आता तुम्ही
संगमावर आहात. आता बाबा समजावून सांगतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. आत्म्याने
आठवण करायची आहे - परमपिता परमात्म्याची. ‘आत्मायें और परमात्मा अलग रहे बहुकाल…’ (पूर्ण
करा) सुंदर मिलन कुठे होणार! सुंदर मिलन जरूर इथेच होईल. परमात्मा बाबा इथे येतात,
याला म्हटले जाते कल्याणकारी सुंदर मिलन. जीवनमुक्तीचा वारसा सर्वांना देतात.
जीवनबंधमधून सुटतात. शांतीधाममध्ये तर सर्वजण जातील - आणि नंतर जेव्हा येतात तेव्हा
सतोप्रधान असतात. इतर धर्माचे धर्म स्थापक धर्म स्थापनार्थ येतात. खाली जेव्हा
त्यांची जनसंख्या वाढेल, राज पदासाठी पुरुषार्थ करतील तोपर्यंत कोणतीही भांडणे वगैरे
होत नाहीत. सतोप्रधानापासून रजोमध्ये जेव्हा येतात तेव्हा भांडण-तंटे करायला सुरु
करतात. अगोदर सुख नंतर दुःख. आता तर अगदीच दुर्गती झाली आहे. या कलियुगी दुनियेचा
विनाश आणि नंतर सतयुगी दुनियेची स्थापना होणार आहे. विष्णूपुरीची स्थापना करत आहेत
- ब्रह्माद्वारे. जे जसा पुरुषार्थ करतात त्यानुसार विष्णुपुरी मध्ये येऊन प्रारब्ध
मिळवतात. या खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी समजून घेण्याच्या आहेत. यावेळेस तुम्हा
मुलांना खूप आनंद झाला पाहिजे की आपण स्वयं ईश्वराकडून भविष्य २१ जन्मांचा वारसा
प्राप्त करत आहोत. जितका पुरुषार्थ करून स्वतःला ॲक्युरेट (अचूक) बनवाल… तुम्हाला ॲक्युरेट
(अचूक) बनायचे आहे. घड्याळ देखील लिव्हर आणि सिलेंडर कंपनीचे असते ना. लिव्हर
कंपनीचे घड्याळ एकदम अचूक असते. मुलांमध्ये कितीतरी अचूक बनतात. बरेच अनॲक्युरेट (चुकीचे)
बनतात तर मग पद कमी होते. पुरुषार्थ करून अचूक बनले पाहिजे. आता सर्व अचूक चालत
नाहीत. तदबीर (पुरुषार्थ) करवून घेणारे तर एकच बाबा आहेत. भाग्य बनविण्याच्या
पुरूषार्थामध्ये कमी आहे त्यामुळे मग पद कमी दर्जाचे मिळवतात. श्रीमतावर न
चालल्यामुळे आसुरी गुण न सोडल्यामुळे, योगामध्ये न राहिल्यामुळे हे सर्व काही होते.
योगामध्ये राहत नाहीत तर मग जसे काही पंडित आहेत. योग कमी आहे म्हणून शिवबाबांवर
प्रेम राहत नाही. धारणा देखील कमी होते, तो आनंद होत नाही. चेहराच जसा काही
मुडद्यासारखा असतो. तुमचा चेहरामोहरा तर सदैव हर्षित असला पाहिजे. जसे देवतांचे
असतात. बाबा तुम्हाला किती वारसा देतात. एखादा गरीबाचा मुलगा श्रीमंतांकडे दत्तक
गेला तर त्याला किती आनंद होईल. तुम्ही गरीब होता. आता बाबांनी ॲडॉप्ट केले आहे तर
आनंद झाला पाहिजे ना. आपण ईश्वरीय संप्रदायाचे बनलो आहोत. परंतु भाग्यामध्ये नसेल
तर काय केले जाऊ शकते. पद भ्रष्ट होते. पट्टराणी बनत नाहीत. बाबा येतातच मुळी
पट्टराणी बनविण्याकरिता. तुम्ही मुले कोणालाही समजावून सांगू शकता की ब्रह्मा,
विष्णू, शंकर हे तिघेही शिवाची संतान आहेत. भारताला परत स्वर्ग बनवितात ब्रह्मा
द्वारे. शंकरा द्वारे जुन्या दुनियेचा विनाश होतो, भारतामध्येच शेवटी थोडेसे वाचतात.
प्रलय तर होत नाही, परंतु बहुसंख्य खलास होतात, जणू काही प्रलय होतो. रात्रं-दिवसाचा
फरक पडतो. ते सर्व मुक्तिधाममध्ये निघून जातील. हे पतित-पावन बाबांचेच काम आहे. बाबा
म्हणतात देही-अभिमानी बना. नाही तर मग जुने नातेवाईक आठवत राहतील. सोडले देखील आहे
तरीही बुद्धी जात राहते. नष्टोमोहा नाहीत, याला व्यभिचारी आठवण म्हटले जाते.
सद्गतीला प्राप्त करू शकत नाहीत कारण दुर्गतीवाल्यांची आठवण करत राहतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
बापदादांच्या हृदयामध्ये स्थान मिळविण्यासाठी मनसा-वाचा-कर्मणा सेवा करायची आहे. ॲक्युरेट
आणि ऑलराऊंडर बनायचे आहे.
२) असे देही-अभिमानी
बनायचे आहे की जेणेकरून कोणत्याही जुन्या नातेवाईकांची आठवण येऊ नये. आपसामध्ये
खूप-खूप रुहानी प्रेमाने रहायचे आहे, लून-पाणी व्हायचे नाही.
वरदान:-
विश्व
परिवर्तनाच्या श्रेष्ठ कार्यामध्ये आपले बोट देणारे महान सो निर्माण भव
जसे एखादा स्थूल
पदार्थ बनवतात तर त्यामध्ये सर्व घटक घालतात, जर कमी गोड अथवा मीठ जरी कमी असेल तर
चांगला पदार्थ देखील खाण्यायोग्य बनू शकत नाही. असेच विश्व परिवर्तनाच्या या
श्रेष्ठ कार्यासाठी प्रत्येक रत्नाची आवश्यकता आहे. सर्वांचे सहयोग रुपी बोट पाहिजे.
सर्वजण आपापल्या परीने खूप-खूप अत्यावश्यक, श्रेष्ठ महारथी आहेत; त्यामुळे आपल्या
कार्याच्या श्रेष्ठतेच्या मूल्याला जाणा, सर्व महान आत्मे आहात. परंतु जितके महान
आहात तितके निर्माण देखील बना.
बोधवाक्य:-
आपल्या नेचरला
इझी (सरळ) बनवा तर सर्व कार्य इझी होतील.
अव्यक्त इशारे:- या
अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा.
जीवन जगत असताना, वेळ
नाजूक असताना, सर्व परिस्थिती, समस्या, वायुमंडळ डबल दूषित असताना देखील त्याच्या
प्रभावापासून मुक्त, जीवन जगत असताना या सर्व विविध बंधनांपासून मुक्त राहायचे आहे.
एकही सूक्ष्म बंधन नसावे. असे प्रत्येक ब्राह्मण मुलाला बंधनमुक्त, जीवनमुक्त बनायचे
आहे. संगमयुगावरच या जीवनमुक्त स्थितीच्या प्रारब्धाचा अनुभव करायचा आहे.