02-02-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“शिव
भगवानुवाच - गोड मुलांनो, तुम्ही माझी आठवण करा आणि माझ्यावर प्रेम करा कारण मीच
तुम्हाला कायमचे सुखी बनविण्याकरिता आलो आहे”
प्रश्न:-
ज्या
मुलांकडून चुका होत राहतात त्यांच्या मुखातून कोणते शब्द आपोआप निघून जातात?
उत्तर:-
‘नशिबात जे असेल ते मिळेल. स्वर्गामध्ये तर जाणारच आहे’. बाबा म्हणतात - हे शब्द
पुरुषार्थी मुलांचे नाहीत. उच्च पद मिळविण्याचाच पुरुषार्थ करायचा आहे. उच्च पद
देण्यासाठी जर का बाबा आलेले आहेत तर मग चुका करू नका.
गीत:-
बचपन के दिन
भुला न देना...
ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांनी गाण्याच्या ओळीचा अर्थ समजून घेतला. तुम्ही आता जिवंतपणीच
बेहदच्या पित्याचे बनले आहात. सारे कल्प तर हदच्या पित्याचे बनले आहात. आता फक्त
तुम्ही ब्राह्मण मुलेच बेहदच्या पित्याची बनला आहात. तुम्ही जाणता बेहदच्या
पित्याकडून आपण बेहदचा वारसा घेत आहोत. जर बाबांना सोडले तर बेहदचा वारसा मिळू
शकणार नाही. भले तुम्ही समजावून सांगता परंतु थोडक्यात काही कोणी संतुष्ट होत नाही.
मनुष्याला धन हवे असते. धना शिवाय सुख असू शकत नाही. धनही पाहिजे, शांती देखील
पाहिजे, निरोगी काया देखील पाहिजे. तुम्ही मुलेच जाणता की, दुनियेमध्ये आज काय आहे,
उद्या काय होणार आहे. विनाश तर समोर उभा आहे. इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये या गोष्टी
नाहीत. आणि समजले जरी की, विनाश समोर उभा आहे, तरी देखील करायचे काय आहे, तेच
त्यांना समजणार नाही. तुम्ही मुले समजता कधीही युद्ध होऊ शकते, थोडीशी ठिणगी जरी
पडली तरी विस्फोट होण्यासाठी वेळ लागणार नाही. मुले जाणतात ही जुनी दुनिया नष्ट झाली
की झाली म्हणूनच आता लवकरात लवकर बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. बाबांची सदैव आठवण
करत राहाल तर खूप हर्षित राहाल. देह-अभिमानामध्ये आल्यामुळे बाबांना विसरून दुःख
घेता. जितकी बाबांची आठवण कराल तेवढे बेहदच्या पित्याकडून सुख घ्याल. इथे तुम्ही
आलाच आहात असे लक्ष्मी-नारायण बनण्यासाठी. राजा-राणीचे नोकर-चाकर आणि प्रजेचे
नोकर-चाकर बनणे - यामध्ये खूप फरक आहे ना. आत्ताचा पुरुषार्थ मग कल्प-कल्पांतरासाठी
कायमस्वरूपी होतो. शेवटी सर्वांना साक्षात्कार होईल - आपण किती पुरुषार्थ केला आहे?
आता देखील बाबा म्हणतात - आपल्या अवस्थेला बघत रहा. अतिशय गोड बाबा ज्यांच्याकडून
स्वर्गाचा वारसा मिळतो, त्यांची आपण किती आठवण करतो. तुमचे सर्व काही आठवणीवरच
अवलंबून आहे. जेवढी आठवण कराल तेवढा आनंद देखील होईल. वाटेल की, आता आपण जवळ येऊन
पोहोचलो आहोत. काही जण थकूनही जातात, समजत नाही ध्येय अजून किती दूर आहे. पोहोचलो
तर केलेली मेहनत देखील सफल होईल. आत्ता ज्या ध्येयाकडे तुम्ही जात आहात, हे दुनिया
जाणत नाहीये. दुनियेला तर हे देखील ठाऊक नाहीये की भगवान कोणाला म्हटले जाते.
म्हणतात देखील भगवान. आणि मग म्हणतात - दगड-धोंड्यामध्ये आहे.
आता तुम्ही मुले जाणता
आपण बाबांचे बनलो आहोत. आता बाबांच्याच मतावर चालायचे आहे. भले परदेशात आहात, तिथे
राहत असतानाही फक्त बाबांची आठवण करायची आहे. तुम्हाला श्रीमत मिळत आहे. आठवणी
शिवाय आत्मा तमोप्रधानापासून सतोप्रधान बनू शकत नाही. तुम्ही म्हणता - ‘बाबा, आम्ही
तुमच्याकडून पूर्ण वारसा घेऊ’. जसा आमचे मम्मा-बाबा वारसा घेतात, आम्ही देखील
पुरुषार्थ करून त्यांच्या गादीवर अवश्य बसणार. मम्मा-बाबा, राज-राजेश्वरी बनतात तर
आम्ही देखील बनणार. परीक्षा तर सर्वांसाठी एकच आहे. तुम्हाला फार थोडे शिकवले जाते
फक्त बाबांची आठवण करा. याला म्हटले जाते सहज राजयोगाचे बळ. तुम्ही समजता योगाने
खूप बळ मिळते. समजतात आपण कोणते विकर्म केले तर खूप सजा खावी लागेल. आपण पद भ्रष्ट
होऊ. आठवणीमध्येच माया विघ्न आणते; गायले जाते - ‘सतगुरू का निंदक ठौर न पाये’ (सद्गुरुचा
निंदक उच्च पद प्राप्त करू शकत नाही). ते तर म्हणतात ‘गुरुचा निंदक…’ निराकारा विषयी
कोणालाच माहिती नाहीये. गायले देखील जाते - भक्तांना फळ देणारा आहे भगवान. साधू-संत
इत्यादी सर्व भक्त आहेत. भक्तच गंगा स्नान करण्यासाठी जातात. भक्त भक्तांना थोडेच
फळ देतील. भक्त जर भक्तांना फळ देत असतील तर मग भगवंताची आठवण कशाला करायची? हा
आहेच भक्तिमार्ग. सर्व भक्त आहेत. भक्तांना फळ देणारे आहेत भगवान. असे नाही की
जास्ती भक्ती करणारे थोडी भक्ती करणार्यांना फळ देतील. नाही. भक्ती म्हणजे भक्ती.
रचना, रचनेला वारसा कसा देणार? वारसा रचयित्याकडूनच मिळतो. यावेळी सर्व आहेत भक्त.
जेव्हा ज्ञान मिळते तेव्हा मग भक्ती आपोआपच सुटते. ज्ञान जिंदाबाद होते.
ज्ञानाशिवाय सद्गती कशी होणार. सर्वजण आपला हिशोब चुकता करून निघून जातात. तर आता
तुम्ही मुले जाणता विनाश समोर उभा आहे. त्याअगोदर पुरुषार्थ करून बाबांकडून पूर्ण
वारसा घ्यायचा आहे.
तुम्ही जाणता आपण
पावन दुनियेमध्ये जात आहोत, जे ब्राह्मण बनतील तेच निमित्त बनतील. ब्रह्मा मुख
वंशावळी ब्राह्मण बनल्याशिवाय तुम्ही बाबांकडून वारसा घेऊ शकत नाही. बाबा मुलांना
रचतातच मुळी वारसा देण्यासाठी. शिवबाबांचे तर आपण आहोतच. सृष्टी रचतात मुलांना वारसा
देण्याकरिता. शरीरधारीलाच वारसा देतील ना. आत्मे तर वर राहतात. तिथे तर वारशाचा अथवा
प्रारब्धाचा प्रश्नच नाही. तुम्ही आता पुरुषार्थ करून प्रारब्ध घेत आहात, जे
दुनियेला ठाऊक सुद्धा नाहीये. आता वेळ खूप समीप येत आहे. बॉम्ब्स काही ठेवण्यासाठी
बनवलेले नाहीत. खूप तयारी होत आहे. आता बाबा आपल्याला आदेश देत आहेत की, माझी आठवण
करा. नाहीतर मग शेवटी खूप रडावे लागेल. राज-विद्येच्या परीक्षेमध्ये कोणी नापास
होतात तर रागामध्ये जाऊन बुडून मरतात. इथे तर रागावण्याची गोष्टच नाही. शेवटी
तुम्हाला खूप साक्षात्कार होतील. आपण काय-काय बनणार आहोत ते देखील माहिती होईल.
बाबांचे काम आहे पुरुषार्थ करवून घेणे. मुले म्हणतात - ‘बाबा, आम्ही कर्म करत असताना
आठवण करायचे विसरून जातो’, आणि मग काही जण म्हणतात - ‘आम्हाला आठवण करण्यासाठी
फुरसतच मिळत नाही’; तर बाबा म्हणतात - ‘ठीक आहे, वेळ काढून आठवणीमध्ये बसा. बाबांची
आठवण करा’. आपापसामध्ये जेव्हा भेटता तेव्हा सुद्धा हाच प्रयत्न करा की, आपण बाबांची
आठवण कशी करावी. एकत्र मिळून बसल्याने तुम्ही चांगली आठवण कराल, मदत मिळेल. मुख्य
गोष्ट आहे - बाबांची आठवण करणे. कोणी परदेशामध्ये जातात, तिथे देखील फक्त एक गोष्ट
लक्षात ठेवा. बाबांच्या आठवणीद्वारेच तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. बाबा
म्हणतात - फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा - बाबांची आठवण करा. योगबलाने सर्व पापे भस्म
होतील. बाबा म्हणतात - मनमनाभव. माझी आठवण करा तर विश्वाचे मालक बनाल. मुख्य गोष्टच
आहे आठवणीची. कुठेही जाण्याची गरजच नाही. घरामध्ये रहा, फक्त बाबांची आठवण करा.
पवित्र बनला नाहीत तर आठवण करू शकणार नाही. असे थोडेच आहे की, सगळेच क्लासमध्ये
येऊन शिकतील. मंत्र घेतला, मग भले कुठेही जा. सतोप्रधान बनण्याचा रस्ता तर बाबांनी
सांगितलेलाच आहे. तसे तर सेंटरवर आल्यामुळे नवीन-नवीन पॉईंट्स ऐकत रहाल. जर कोणत्या
कारणामुळे येऊ शकत नसाल, पाऊस पडत असेल, कर्फ्यू लागलेला असेल, कोणीही बाहेर पडू
शकत नसतील तर मग काय करणार? बाबा म्हणतात - काही हरकत नाही. असे नाही की, शिवाच्या
मंदिरामध्ये जाऊन जल अर्पण करावेच लागेल. कुठेही राहत असताना तुम्ही आठवणीमध्ये रहा.
चालता-फिरता आठवण करा, इतरांनाही हेच सांगा की बाबांची आठवण केल्याने विकर्म विनाश
होतील आणि देवता बनाल. शब्दच दोन आहेत - रचता बाबांकडूनच वारसा घ्यायचा आहे. रचता
एकच आहेत. ते किती सोपा रस्ता सांगत आहेत. बाबांची आठवण करण्याचा मंत्र मिळाला. बाबा
म्हणतात - हे बालपण विसरू नका. जर बाबांना विसरलात तर आज हसत आहात उद्या रडावे
लागेल. बाबांकडून पूर्ण वारसा घेतला पाहिजे. असे बरेच जण आहेत, जे म्हणतात
स्वर्गामध्ये तर जाणार ना, जे भाग्यात असेल... त्यांना काही पुरुषार्थी म्हणणार नाही.
मनुष्य पुरुषार्थ करतातच मुळी उच्च पद प्राप्त करण्यासाठी. आता जेव्हा की बाबांकडून
उच्च पद मिळत आहे तर चुका कशाला करायच्या? शाळेमध्ये जे शिकणार नाहीत त्यांना
शिकलेल्यांसमोर चाकरी करावी लागेल. बाबांची पूर्ण आठवण केली नाहीत तर प्रजेमध्ये
जाऊन नोकर-चाकर बनाल, यामध्ये थोडाच आनंद झाला पाहिजे. मुले सन्मुख येऊन रिफ्रेश
होऊन जातात. बऱ्याच जणी बंधनात असलेल्या आहेत, हरकत नाही, घरात बसून बाबांची आठवण
करत रहा. किती समजावून सांगतात, मृत्यू समोर उभा आहे, अचानकच युद्ध सुरु होईल. असे
दिसून येत आहे की, युद्ध जणू काही सुरु झाले की झाले. रेडिओ वरून देखील सर्व काही
माहिती होते. म्हणतात - थोडीजरी गडबड केलीत तर आम्ही असे करू. अगोदरच सांगून ठेवतात.
बॉम्ब्सचा अभिमान खूप आहे. बाबा देखील म्हणतात - मुले तर अजून योगबलामध्ये हुशार
झालेली नाहीत. आणि युद्ध सुरू होईल, असे ड्रामा अनुसार होणारच नाही. मुलांनी अजून
पूर्ण वारसा घेतलेलाच नाहीये. अजून पूर्ण राजधानी स्थापन झालेली नाहीये. थोडा वेळ
पाहिजे. पुरुषार्थ करवून घेत राहतात. माहित नाही कोणत्याही वेळी काहीही होईल, विमान
कोसळते, रेल्वे घसरते. मृत्यु किती सहज उभा आहे. धरणीकंप देखील होत राहतात. सर्वात
जास्त काम करायचे आहे भूकंपाला. धरणी हलेल तेव्हाच तर सर्व घरे इत्यादी कोसळतील.
मृत्यू येण्या अगोदर बाबांकडून पूर्ण वारसा घ्यायचा आहे, म्हणून अतिशय प्रेमाने
बाबांची आठवण करायची आहे. बाबा तुमच्या शिवाय आमचे दुसरे कोणीही नाही. फक्त बाबांची
आठवण करत रहा. जसे छोट्या मुलांना बसून समजावून सांगतात तसे बाबा किती सोप्या
पद्धतीने समजावून सांगत आहेत. दुसरा आणखी कोणताही त्रास देत नाही, फक्त आठवण करा आणि
काम-चितेवर बसून तुम्ही जे जळून मेले आहात, आता ज्ञान-चितेवर बसून पवित्र बना.
तुम्हाला माणसे विचारतात की, तुमचा उद्देश काय आहे? बोला, शिवबाबा जे सर्वांचे पिता
आहेत ते म्हणत आहेत - मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील आणि
तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. कलियुगामध्ये सर्व तमोप्रधान आहेत. सर्वांचे
सद्गती दाता एक बाबाच आहेत.
आता बाबा म्हणतात -
फक्त माझी आठवण करा तर गंज निघून जाईल. हा एवढा संदेश तर देऊ शकता ना. स्वतः आठवण
कराल तेव्हाच इतरांनाही आठवण करून देऊ शकाल. स्वतः आठवण करत असतील तर इतरांना आवडीने
सांगतील, नाही तर मनापासून सांगू शकणार नाहीत. बाबा समजावून सांगत आहेत - कुठेही
असाल जितके शक्य असेल, फक्त आठवण करा. जो भेटेल त्याला हीच शिकवण द्या - मृत्यू
समोर उभा आहे. बाबा म्हणतात - तुम्ही सर्व तमोप्रधान पतित बनला आहात. आता माझी आठवण
करा,पवित्र बना. आत्माच पतित बनली आहे. सतयुगामध्ये असतेच पावन-आत्मा. बाबा म्हणतात
आठवणीद्वारेच आत्मा पावन बनेल, दुसरा कोणताही उपाय नाही. हा संदेश सर्वांना देत रहा
तरी देखील अनेकांचे कल्याण कराल, अजून कोणताच त्रास देत नाहीत. सर्व आत्म्यांना
पावन बनविणारे पतित-पावन बाबाच आहेत. सर्वात उत्तम ते उत्तम पुरुष बनविणारे आहेत
बाबा. जे पूज्य होते तेच मग पुजारी बनले आहेत. रावण राज्यामध्ये आपण पुजारी बनलो
आहोत, राम राज्यामध्ये पूज्य होतो. आता रावण राज्याचा अंत आहे, आपण बाबांची आठवण
केल्याने पुजारीपासून पुन्हा पूज्य बनत आहोत. इतरांनाही रस्ता सांगायचा आहे, वृद्ध
मातांनी देखील सेवा केली पाहिजे. मित्र-नातेवाईकांना देखील संदेश द्या. सत्संग,
मंदिरे इत्यादी देखील अनेक प्रकारची आहेत. तुमचा तर आहे एकच प्रकार. फक्त बाबांचा
परिचय द्यायचा आहे. शिवबाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुम्ही
स्वर्गाचे मालक बनाल. निराकार शिवबाबा सर्वांचे सद्गती दाता बाबा, आत्म्यांना
म्हणतात - माझी आठवण करा तर तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. हे तर समजावून
सांगायला सोपे आहे ना. वृद्ध माता देखील सेवा करू शकतात. मुख्य गोष्टच ही आहे.
लग्नसमारंभाला कुठेही जा, कानामध्ये ही गोष्ट ऐकवा. गीतेचे भगवान म्हणतात - माझी
आठवण करा. ही गोष्ट सर्वांना खूप आवडेल. जास्त बोलण्याची गरजच नाही. फक्त बाबांचा
संदेश द्यायचा आहे की बाबा म्हणतात - माझी आठवण करा. अच्छा, असे समजा ईश्वर प्रेरणा
करत आहे. स्वप्नामध्ये साक्षात्कार होतात. आवाज ऐकू येतो की, ‘बाबा म्हणतात - माझी
आठवण करा तर तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल’. तुम्ही स्वतः देखील फक्त
एवढेच चिंतन करत रहा तर जीवन रुपी नौका पार होईल. आपण प्रत्यक्षात बेहदच्या पित्याचे
बनलो आहोत आणि बाबांकडून २१ जन्मांचा वारसा घेत आहोत तर आनंद झाला पाहिजे. बाबांना
विसरल्यामुळेच त्रास होतो. बाबा किती सोपे करून सांगतात की, स्वतःला आत्मा समजून
बाबांची आठवण करा तर आत्मा सतोप्रधान बनेल. सर्वांना समजेल की यांना मार्ग तर राईट
मिळाला आहे. हा रस्ता कधी कोणीही सांगू शकणार नाही. जर ते म्हणाले की, शिवबाबांची
आठवण करा तर मग साधू इत्यादींच्या जवळ कोण जाईल. अशी वेळ येईल जे तुम्ही घराबाहेर
सुद्धा पडू शकणार नाही. बाबांची आठवण करता-करता शरीर सोडाल. अन्तकाल जो शिवबाबा
सिमरे… सो फिर नारायण योनि वल-वल उतरे, (अंतकाळात जो शिवबाबांचे स्मरण करेल, तो मग
नारायण योनीमध्ये जन्माला येईल), लक्ष्मी-नारायणाच्या डिनायस्टीमध्ये घराण्यामध्ये
येतील ना. प्रत्येक जन्मामध्ये राजाई पद प्राप्त करतील. बस्स, फक्त बाबांची आठवण करा
आणि प्रेम करा. आठवणी शिवाय प्रेम कसे करणार. सुख मिळते म्हणून प्रेम केले जाते.
दुःख देणाऱ्यावर प्रेम केले जात नाही. बाबा म्हणतात मी तुम्हाला स्वर्गाचा मालक
बनवतो म्हणून माझ्यावर प्रेम करा. बाबांच्या मतावर चालले पाहिजे ना. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आनंदात
राहण्यासाठी आठवणीची मेहनत करायची आहे. आठवणीचे बळ आत्म्याला सतोप्रधान बनवणारे आहे.
प्रेमाने एका बाबांची आठवण करायची आहे.
२) उच्च पद प्राप्त
करण्यासाठी अभ्यासावर पूर्णपणे लक्ष द्यायचे आहे. असे नाही जे नशिबामध्ये असेल, चुका
करणे सोडून, पूर्ण वारशाचे अधिकारी बनायचे आहे.
वरदान:-
हदच्या
जबाबदाऱ्यांना बेहदमध्ये परिवर्तन करणारे स्मृती स्वरूप नष्टोमोहा भव
नष्टोमोहा बनण्यासाठी
फक्त आपल्या स्मृती स्वरूपाला परिवर्तन करा. मोह तेव्हा होतो जेव्हा ही स्मृती असते
की, आपण गृहस्थी आहोत, आमचे घर आहे, आमचे नातेवाईक आहेत. आता या हदच्या जबाबदारीला
बेहदच्या जबाबदारीमध्ये परिवर्तन करा. बेहदची जबाबदारी निभवाल तर हदची जबाबदारी
आपोआप पूर्ण होईल. परंतु जर बेहदच्या जबाबदारीला विसरून फक्त हदची जबाबदारी निभावत
असाल तर त्याने अजूनच बिघडवून टाकता कारण ते कर्तव्य मोह उत्पन्न करते म्हणून आपल्या
स्मृती स्वरूपाला परिवर्तन करून नष्टोमोहा बना.
बोधवाक्य:-
अशी वेगाने
झेप घ्या जेणेकरून गोष्टी रुपी ढग सेकंदामध्ये क्रॉस होतील.
हे अव्यक्त इशारे:-
एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना.
कधीही कार्याच्या
सफलतेच्या दोन श्रेष्ठ भुजा आहेत - १) आपसामधील विश्वास आणि २) एकता, जिथे संगठीत
रूपामध्ये सर्वांचे एकमत आहे, आपसामध्ये एकमेकांप्रती विश्वास आहे, तिथे सफलता
गळ्यातील हार आहे. संस्कार भिन्न-भिन्न आहेत आणि असतीलही परंतु जर कोणाचा संस्कार
वाद घालणारा असेल तर दुसऱ्याने टाळी वाजवायची नाही. प्रत्येकाने स्वतःला चेंज करावे
तेव्हाच एकता कायम राहू शकते.