02-03-25 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
15.10.2004 ओम शान्ति
मधुबन
“एकाला प्रत्यक्ष
करण्यासाठी एकरस स्थिती बनवा, स्वमानामध्ये रहा, सर्वांना सन्मान द्या”
आज बापदादा प्रत्येक
मुलाच्या मस्तकामध्ये तीन भाग्याचे तारे चमकत असलेले बघत आहेत. एक परमात्म पालनेचे
भाग्य, परमात्म शिक्षणाचे भाग्य, परमात्म वरदानांचे भाग्य. असे तीन तारे सर्वांच्या
मस्तकामध्ये बघत आहेत. तुम्ही देखील आपल्या भाग्याच्या चमकत असलेल्या ताऱ्यांना बघत
आहात का? दिसतात का? असे श्रेष्ठ भाग्याचे तारे साऱ्या विश्वामध्ये इतर कोणाच्याही
मस्तकामध्ये चमकत असलेले दिसणार नाहीत. हे भाग्याचे तारे तर सर्वांच्या मस्तकामध्ये
चमकत आहेत, परंतु त्याच्या तेजामध्ये कुठे-कुठे अंतर दिसून येत आहे. कोणाचे तेज खूप
शक्तिशाली आहे, कोणाचे तेज मध्यम आहे. भाग्य विधात्याने सर्व मुलांना एक सारखे
भाग्य दिले आहे. कोणाला स्पेशल दिलेले नाहीये. पालना देखील एकसमान, शिक्षण देखील
एकत्र, वरदान देखील सर्वांना सारखेच मिळाले आहे. साऱ्या विश्वाच्या
काना-कोपऱ्यामध्ये अभ्यास नेहमी तोच एकसमान असतो. हे तर नवलच आहे की एकच मुरली, एकच
डेट आणि अमृतवेलेची वेळ देखील आपापल्या देशाच्या हिशोबाने देखील एकच असते, वरदान
सुद्धा एकच असते. स्लोगन सुद्धा एकच असते. फरक असतो का? अमेरिका आणि लंडनमध्ये फरक
असतो का? नसतो ना. तर मग हा फरक कशामुळे?
बापदादा अमृतवेलेची
पालना चोहोबाजूंना एकसारखीच करतात. निरंतर आठवणीची विधी देखील सर्वांना एकच मिळते,
मग नंबरवार का? विधी एक आणि सिद्धीच्या प्राप्तीमध्ये अंतर का? बापदादांचे
चोहोबाजूंच्या मुलांवर प्रेम देखील एक सारखेच आहे. बापदादांच्या प्रेमामध्ये भले
पुरुषार्थानुसार क्रमवारीमध्ये लास्ट नंबर देखील असेल परंतु बापदादांचे प्रेम लास्ट
नंबर असणाऱ्यावर देखील तितकेच आहे. लास्ट नंबरवर प्रेमा सोबतच अजूनच दया सुद्धा आहे
की, हा लास्ट देखील फास्ट, फर्स्ट होऊ दे. तुम्ही सर्व जे दुरून-दुरून पोहोचला आहात,
कसे पोहोचला आहात? परमात्म प्रेमाच्या ओढीने आणले आहे ना! प्रेमाच्या धाग्यामध्ये
ओढले गेलात. तर बापदादांचे सर्वांवर प्रेम आहे. तर असे समजता की प्रश्न उत्पन्न होतो
की, माझ्यावर प्रेम आहे की कमी आहे? बापदादांचे प्रेम प्रत्येक मुलावर एकमेकांपेक्षा
जास्त आहे. आणि हे परमात्म प्रेमच सर्व मुलांच्या विशेष पालनेचा आधार आहे.
प्रत्येकजण काय समजता - माझे प्रेम बाबांवर जास्त आहे की दुसऱ्याचे प्रेम जास्त आहे,
माझे कमी आहे? असे समजता? असे समजता ना की माझे प्रेम आहे? माझे प्रेम आहे, असे आहे
ना? पांडव असे आहे? प्रत्येकजण म्हणेल “माझे बाबा”, असे कोणी म्हणणार नाहीत की,
‘सेंटर इंचार्जचे बाबा, दादींचे बाबा, जानकी दादींचे बाबा’, म्हणाल असे? नाही.
‘माझे बाबा’, म्हणाल. जर ‘माझे’ म्हटले आणि बाबांनी देखील ‘माझे’ म्हटले, बस एक
‘माझे’ शब्दानेच मुले बाबांची बनली आणि बाबा मुलांचे बनले. मेहनत करावी लागली काय?
मेहनत केलीत? थोडी-थोडी? नाही केली? कधी-कधी तर वाटते? नाही वाटत? लागते. मग मेहनत
करावी लागते तेव्हा काय करता? थकून जाता का? हृदयापासून, प्रेमाने म्हणा - “माझे
बाबा”, तर मेहनत प्रेमामध्ये बदलून जाईल. ‘माझे बाबा’, म्हटल्यानेच बाबांपर्यंत
आवाज पोहोचतो आणि बाबा एक्स्ट्रा मदत देतात. परंतु आहे हृदयापासूनचा सौदा, केवळ
तोंडी सौदा नाही आहे. हृदयापासूनचा सौदा आहे. तर हृदयापासून सौदा करण्यामध्ये हुशार
आहात ना? येतो ना? मागे बसलेल्यांना असा सौदा करता येतो का? तेव्हा तर पोहोचला आहात.
परंतु सर्वात दूरदेशवाले कोण आहेत? अमेरिका? अमेरिकावाले दूरदेशवाले आहात की बाबा
दूरदेशवाले आहेत? अमेरिका तर या दुनियेमध्ये आहे. बाबा तर दुसऱ्या दुनियेमधून येतात.
तर सर्वात दूरदेशीचे कोण आहेत? अमेरिका नाही. सर्वात दूरदेशवाले बापदादा आहेत. एक
आकारी वतनमधून येतात, एक परमधाममधून येतात, तर अमेरिका त्याच्या पुढे काय आहे?
काहीच नाही.
तर आज दूरदेशी बाबा
या साकार दुनियेतील दूरदेशीच्या मुलांना भेटत आहेत. नशा आहे ना? आज आमच्यासाठी
बापदादा आलेले आहेत! भारतवासी तर बाबांचे आहेतच परंतु डबल विदेशींना पाहून बापदादा
विशेष खुश होतात. का खुश होतात? बापदादांनी पाहिले आहे भारतामध्येच तर बाबा आलेले
आहेत त्यामुळे भारतवासीयांना हा नशा जास्त आहे परंतु डबल फॉरेनर्सवर प्रेम यासाठी
आहे की, भिन्न-भिन्न कल्चर (संस्कृती) असताना देखील ब्राह्मण संस्कृतीमध्ये
परिवर्तित झाले. झाले ना? आता तर हा संकल्प येत नाही ना की, हे भारताचे कल्चर आहे,
आमचे कल्चर तर वेगळे आहे? नाही. आता बापदादा रिझल्ट मध्ये बघतात, सर्व एका कल्चरचे
(एकाच संस्कृतीवाले) झाले आहेत. भले कोणत्याही ठिकाणचे आहेत, साकार शरीरासाठी देश
भिन्न-भिन्न आहेत परंतु आत्मा ब्राह्मण कल्चरची आहे; आणखी एक गोष्ट बापदादांना डबल
फॉरेनर्सची खूप चांगली वाटते, माहिती आहे कोणती? (लवकर सेवा करु लागले आहेत) अजून
सांगा? (नोकरी सुद्धा करतात, सेवा सुद्धा करतात) असे तर इंडियामध्ये देखील करतात.
इंडियामध्ये सुद्धा नोकरी करतात. (काही जरी झाले तरी सच्चाईने आपली कमजोरी सांगून
टाकतात, स्पष्टवादी आहेत) अच्छा, इंडिया स्पष्टवादी नाही आहे का?
बापदादांनी हे बघितले
की भले दूर राहतात परंतु बाबांवरील प्रेमामुळे प्रेमामध्ये मेजॉरिटी पास आहेत.
भारताचे तर भाग्य आहेच परंतु दूर राहून प्रेमामध्ये सर्व पास आहेत. जर बापदादांनी
विचारले तर प्रेमामध्ये परसेंटेज आहे काय? बाबांवरील प्रेमाच्या सब्जेक्टमध्ये
परसेंटेज आहे का? जे समजतात की, आपण प्रेमामध्ये १०० टक्के आहोत त्यांनी हात वर करा.
(सर्वांनी हात वर केला) अच्छा - १०० टक्के? भारतवासी हात वर करत नाही आहेत? बघा,
भारताला तर सर्वात मोठे भाग्य मिळाले आहे की बाबा भारतामध्येच आलेले आहेत. यामध्ये
बाबांना अमेरिका पसंत पडली नाही, परंतु भारत पसंत पडला. ही (अमेरिकेची गायत्री बहिण)
समोर बसली आहे म्हणून अमेरिका म्हणत आहेत. परंतु दूर असून देखील प्रेम चांगले आहे.
प्रॉब्लेम येतात देखील परंतु तरी देखील ‘बाबा-बाबा’ म्हणत आलेला प्रॉब्लेम सोडवतात.
प्रेमामध्ये तर
बापदादांनी देखील पास केले आहे आणि आता कशामध्ये पास व्हायचे आहे? व्हायचे देखील आहे
ना! आहे देखील आणि व्हायचे देखील आहे. तर वर्तमान वेळेप्रमाणे बापदादा हेच इच्छितात
की प्रत्येक मुलामध्ये स्व-परिवर्तनाच्या शक्तीची परसेंटेज, जसे प्रेमाच्या
शक्तीमध्ये सर्वांनी हात वर केला, सर्वांनी हात वर केलात ना! तर तेवढीच
स्व-परिवर्तनाची गती तीव्र (वेगवान) आहे का? यामध्ये अर्धा हात वर करणार की पूर्ण
करणार? कोणता हात वर करणार? परिवर्तन करता देखील परंतु वेळ लागतो. वेळेच्या समीपते
नुसार स्व-परिवर्तनाची शक्ती अशी तीव्र झाली पाहिजे जसे कागदावर बिंदू लावला तर किती
वेळात लागतो? किती वेळ लागतो? बिंदू लावण्यासाठी किती वेळ लागतो? सेकंद सुद्धा लागत
नाही. बरोबर आहे ना! तर अशी तीव्रगति आहे? यामध्ये हात वर करायला लावायचे का?
यामध्ये अर्धा हात वर होईल. काळाची गती वेगवान आहे, स्व-परिवर्तनाची शक्ती अशी
तीव्र असावी आणि जेव्हा परिवर्तन म्हणता तर ‘परिवर्तन’ शब्दाच्या अगोदर पहिला ‘स्व’
शब्द कायम लक्षात ठेवा. परिवर्तन नाही, स्व-परिवर्तन. बापदादांना लक्षात आहे की,
मुलांनी बाबांसोबत एका वर्षासाठी प्रतिज्ञा केली होती की, ‘संस्कार परिवर्तनाने
संसार परिवर्तन करु’. लक्षात आहे? वर्ष साजरे केले होते - संस्कार परिवर्तनाने
संसार परिवर्तन. तर संसाराची गती तर अति मध्ये जात आहे. परंतु ‘संस्कार परिवर्तन’
याची गती तितकी फास्ट आहे? तसेही फॉरेनची विशेषताच आहे - सर्वसाधारणपणे परदेशी
फास्ट चालतात, फास्ट कार्य करतात. तर बाबा विचारत आहेत की, संस्कार परिवर्तनामध्ये
फास्ट आहात? तर बापदादा आता स्व-परिवर्तनाची गती तीव्र पाहू इच्छितात. सर्वजण
विचारता ना! बापदादांची काय इच्छा आहे? आपसामध्ये रुहरिहान करता ना, तर एकमेकांना
विचारता बापदादांची काय इच्छा आहे? तर बापदादांची ही इच्छा आहे. सेकंदामध्ये बिंदू
लागावा. जसा कागदावर बिंदू लागतो ना, त्याही पेक्षा फास्ट, परिवर्तनामध्ये जे
अयथार्थ आहे त्यामध्ये बिंदू लागावा. बिंदू लावता येतो का? येतो ना! परंतु कधी-कधी
क्वेश्चन मार्क होतो. लावता बिंदू आणि बनतो क्वेश्चन मार्क. ‘हे का, हे काय?’ हे
‘का’ आणि ‘काय’… हे बिंदूला क्वेश्चन मार्कमध्ये बदलतात. बापदादांनी या अगोदर सुद्धा
सांगितले आहे - ‘व्हाय-व्हाय’ करू नका, काय करा? ‘फ्लाई’ किंवा ‘वाह! वाह!’ करा
किंवा फ्लाय करा. ‘व्हाय-व्हाय’ करू नका. ‘व्हाय-व्हाय’ लगेच करता येते ना! येते
ना? जेव्हा ‘व्हाय’ येईल ना तर त्याला ‘वाह! वाह!’ करा. कोणी काहीही करत असेल,
म्हणत असेल; ‘वाह! ड्रामा वाह!’. हे असे का करतात, हे असे का बोलतात, नाही. यांनी
केले तर मी करणार, असे नाही.
आजकाल बापदादांनी
पाहिले आहे, सांगू. परिवर्तन करायचे आहे ना! तर आजकाल रिझल्टमध्ये भले फॉरेनमध्ये
असो नाहीतर इंडियामध्ये दोन्ही बाजूला एकाच गोष्टीची लाट आहे, ती कोणती? ‘असे झाले
पाहिजे, हे मिळाले पाहिजे, असे यांनी केले पाहिजे… मी जो विचार करतो, म्हणतो ते झाले
पाहिजे…’. तर पाहिजे, पाहिजे हा जो संकल्पामध्ये देखील होतो ना, हा वेस्ट थॉट,
बेस्ट बनू देत नाही. बापदादांनी सर्वांचा थोड्या वेळाचा वेस्टचा चार्ट नोट केला आहे.
चेक केला आहे. बापदादांकडे तर पॉवरफुल मशिनरी आहे ना. तुमच्या सारखा कॉम्प्युटर नाही
आहे, तुमचा कॉम्प्युटर शिवी देखील देतो. परंतु बापदादांकडे चेकिंग करण्याची अतिशय
वेगवान मशिनरी आहे. तर बापदादांनी पाहिले की, मेजॉरिटींचा वेस्ट संकल्प पूर्ण
दिवसभरामध्ये मध्ये-मध्ये चालत असतो. काय होते या वेस्ट संकल्पाचे वजन खूप जास्त
होते आणि बेस्ट थॉट्सचे वजन कमी होते. तर हे जे मधे-मधे वेस्ट थॉट्स चालतात ते
बुद्धीला भारी करतात. पुरुषार्थाला भारी करतात, ओझे आहे ना तर ते आपल्याकडे खेचतात
त्यामुळे शुभ संकल्प जे स्व-उन्नतीची लिफ्ट आहेत, शिडी देखील नाही परंतु लिफ्ट आहे
ते कमी असल्या कारणाने, मेहनतवाली शिडी चढावी लागते. बस्स, केवळ दोन शब्द लक्षात
ठेवा - वेस्टला नष्ट करण्यासाठी अमृतवेलेपासून रात्रीपर्यंत दोन शब्द संकल्पामध्ये,
बोलण्यामध्ये आणि कर्मामध्ये, कार्यामध्ये वापरा. प्रत्यक्ष आचरणामध्ये आणा. ते दोन
शब्द आहेत - ‘स्वमान’ आणि ‘सन्मान’. स्वमानामध्ये रहायचे आहे आणि सन्मान द्यायचा आहे.
कोणी कसाही आहे, मला सन्मान द्यायचा आहे. सन्मान द्यायचा आहे, स्वमानामध्ये स्थित
रहायचे आहे. दोन्हीचा बॅलन्स पाहिजे. कधी स्वमानामध्ये जास्त राहता, कधी सन्मान
देण्यामध्ये कमी पडता. असे नाही की कोणी सन्मान देईल तरच मी सन्मान देईन, नाही. मला
‘दाता’ बनायचे आहे. शिव शक्ती पांडव सेना दात्याची मुले दाता आहात. तो देईल तर मी
देईन, हा तर बिझनेस झाला, दाता नाही झाला. तर तुम्ही बिझनेसमन आहात की दाता आहात?
दाता कधी घेणारा नसतो. आपल्या वृत्ती आणि दृष्टीमध्ये हेच लक्ष्य ठेवा - ‘मला’,
दुसऱ्यांना नाही, ‘मला’ सदैव प्रत्येकाप्रती अर्थात सर्वांप्रति भले मग अज्ञानी
असेल, नाहीतर ज्ञानी असेल, अज्ञानींच्या प्रति तरीही शुभ भावना ठेवता परंतु ‘ज्ञानी
तू आत्म्यां’च्या प्रति आपसामध्ये प्रत्येक वेळी शुभ-भावना, शुभ-कामना रहावी. वृत्ती
अशी बनावी, दृष्टी अशी बनावी. बस दृष्टीमध्ये जसा स्थूल बिंदू आहे, कधी बिंदू गायब
होतो का! डोळ्यांमधून जर बिंदू गायब झाला तर काय बनाल? पाहू शकाल? तर जसे
डोळ्यांमध्ये बिंदू आहेत, तसे आत्मा किंवा बाबा बिंदू डोळ्यांमध्ये सामावलेले
असावेत. जसे दृष्टीतील बिंदू कधी गायब होत नाही, तसा आत्मा किंवा बाबांच्या स्मृतीचा
बिंदू वृत्तीमधून, दृष्टीमधून गायब होऊ नये. फॉलो फादर करायचे आहे ना! तर जसा
बाबांच्या दृष्टी किंवा वृत्तीमध्ये प्रत्येक मुलासाठी स्वमान आहे, सन्मान आहे तसाच
आपल्या दृष्टी-वृत्तीमध्ये स्वमान, सन्मान असावा. सन्मान दिल्याने जे मनामध्ये येते
की, ‘याने बदलले पाहिजे, असे करता कामा नये, हे असे झाले पाहिजे’; तर हे काही शिकवण
दिल्याने होणार नाही परंतु सन्मान द्या तर जो मनामध्ये संकल्प असतो ना की, ‘असे
व्हावे, हा बदलावा, याने असे करावे’, ते तसे करु लागतील. वृत्तीने बदलतील, बोलल्याने
बदलणार नाहीत. तर काय कराल? ‘स्वमान’ आणि ‘सन्मान’, दोन्ही लक्षात राहील ना की फक्त
स्वमान लक्षात राहील? सन्मान देणे अर्थात सन्मान घेणे. कोणालाही मान देणे म्हणजे
समजा माननीय बनणे आहे. आत्मिक प्रेमाची निशाणी आहे - दुसऱ्याच्या कमतरतेला आपल्या
शुभ भावना, शुभ कामनेने परिवर्तन करणे. बापदादांनी आता शेवटचा संदेश सुद्धा पाठवला
होता की, वर्तमान समयी आपले स्वरूप मर्सिफुल बनवा, दयाळू. लास्ट जन्मामध्ये देखील
तुमची जड चित्रे (मुर्त्या) मर्सिफुल बनून भक्तांवर दया करत आहेत. जर चित्रे इतकी
मर्सिफुल आहेत तर चैतन्यमध्ये कसे असतील? चैतन्य तर दयेची खाण आहेत. दयेची खाण बना.
जे कोणी येतील दया, हीच प्रेमाची निशाणी आहे. करायचे आहे ना? की फक्त ऐकायचे आहे?
करायचेच आहे, बनायचेच आहे. तर बापदादा काय इच्छितात, याचे उत्तर देत आहेत. प्रश्न
करता ना, तर बापदादा उत्तर देत आहेत.
वर्तमान समयी
सेवेमध्ये वृद्धी चांगली होत आहे, भले मग भारतामध्ये असो, किंवा फॉरेनमध्ये परंतु
बापदादांना हे हवे आहे की, आता अशी एखादी निमित्त आत्मा तयार करा जी काही विशेष
कार्य करून दाखवेल. असा एखादा सहयोगी बनावा जो आतापर्यंत तुम्ही जे करू इच्छिता, ते
करून दाखवेल. प्रोग्राम्स तर खूप केले आहेत, जिथे-जिथे प्रोग्राम केले आहेत त्या
सर्व प्रोग्राम्ससाठी सर्वांना बापदादा शुभेच्छा देत आहेत. आता आणखी काही नवीनता
दाखवा. जे तुमच्या वतीने तुमच्या सारखे बाबांना प्रत्यक्ष करतील, ‘परमात्म्याची
शिकवण आहे’, असे शब्द मुखातून निघतील, ‘बाबा-बाबा’ शब्द अंतःकरणापासून निघतील.
सहयोगी बनतात, परंतु आता एक गोष्ट जी राहिलेली आहे की, ‘हेच एक आहेत, हेच एक आहेत,
हेच एक आहेत…’ हा आवाज पसरावा. ब्रह्माकुमारी काम चांगले करत आहेत, करू शकतात,
इथपर्यंत तर आले आहेत परंतु ‘हेच एक आहेत’ आणि ‘परमात्म ज्ञान आहे’. बाबांना
प्रत्यक्ष करणारा बेधडकपणे बोलावा. तुम्ही बोलता - ‘परमात्मा कार्य करवून घेत आहेत,
परमात्म्याचे कार्य आहेत’; परंतु त्यांनी म्हणावे की, ज्या परमात्म पित्याला सर्वजण
बोलावत आहेत, त्यांचेच हे ज्ञान आहे. आता हा अनुभव करवा. जसे तुमच्या हृदयामध्ये
नेहमी काय असते? ‘बाबा, बाबा, बाबा…’ असा कोणता ग्रुप निघावा. चांगले आहे, करू शकतो,
इथपर्यंत तर ठीक आहे. परिवर्तन झाले आहे. परंतु अखेरचे परिवर्तन आहे - एक आहे, एक
आहे, एक आहे. ते तेव्हाच होईल जेव्हा ब्राह्मण परिवार एकरस स्थितीवाला होईल. अजूनही
स्थिती बदलत राहते. एकरस स्थिती एकाला प्रत्यक्ष करेल. बरोबर आहे ना! तर डबल
फॉरेनर्स उदाहरण बना. सन्मान देण्यामध्ये, स्वमानामध्ये राहण्यामध्ये उदाहरण बना,
नंबर घ्या. चोहो बाजूला जसा मोहजीत परिवाराचा दृष्टांत सांगतात ना, ज्यामध्ये शिपाई
देखील, नोकर देखील सर्व मोहजीत. तसे कुठेही जाल अमेरिकेला जाल, ऑस्ट्रेलियामध्ये
जाल, प्रत्येक देशामध्ये एकरस, एकमत, स्वमानामध्ये राहणारे, सन्मान देणारे, यामध्ये
नंबर घ्या. घेऊ शकता ना?
चोहो बाजूचे बाबांच्या
नयनामध्ये सामावलेले, नयनातील नूर असणाऱ्या मुलांना, सदैव एकरस स्थितीमध्ये स्थित
राहणाऱ्या मुलांना, सदैव भाग्याचा तारा चमकणाऱ्या भाग्यवान मुलांना, सदैव स्वमान आणि
सन्मान एकत्र ठेवणाऱ्या मुलांना, सदैव पुरुषार्थाची तीव्र गती ठेवणाऱ्या मुलांना
बापदादांची प्रेमपूर्वक आठवण, आशीर्वाद आणि नमस्ते.
वरदान:-
खऱ्या
साथीदाराची सोबत घेणारे सर्वांपासून न्यारे, प्यारे निर्मोही भव
रोज अमृतवेलेला सर्व
नात्यांचे सुख बापदादांकडून घेऊन इतरांना दान करा. सर्व सुखांचे अधिकारी बनून
इतरांनाही बनवा. कोणतेही काम असेल त्यामध्ये साकार साथीदाराची आठवण येऊ नये, सर्वात
पहिली बाबांची आठवण यावी कारण खरा मित्र बाबा आहेत. खऱ्या साथीदाराची सोबत घ्याल तर
सहजच सर्वांपासून न्यारे आणि प्यारे (वेगळे आणि प्रिय) बनाल. जे प्रत्येक
कार्यामध्ये सर्व नात्यांनी एका बाबांची आठवण करतात ते सहजच निर्मोही बनतात. त्यांना
कोणा विषयीही आकर्षण अर्थात ओढ राहत नाही त्यामुळे मायेकडून हार देखील होऊ शकत नाही.
सुविचार:-
मायेला पाहण्यासाठी
किंवा जाणण्यासाठी त्रिकालदर्शी आणि त्रिनेत्री बना तेव्हाच विजयी बनाल.
अव्यक्त इशारे -
सत्यता आणि सभ्यता रुपी कल्चरला धारण करा:-
सत्यतेची निशाणी
सभ्यता आहे. जर तुम्ही सच्चे आहात, सत्यतेची शक्ती तुमच्यामध्ये असेल तर सभ्यतेला
कधीही सोडू नका, सत्यतेला सिद्ध करा परंतु सभ्यतापूर्वक. जर सभ्यतेला सोडून
असभ्यतेमध्ये येऊन सत्याला सिद्ध करू इच्छिता तर ते सत्य सिद्ध होणार नाही.
असभ्यतेची निशाणी आहे जिद्द आणि सभ्यतेची निशाणी आहे निर्मान (विनम्र). सत्यतेला
सिद्ध करणारा सदैव स्वतः निर्मान होऊन (नम्रतेने) सभ्यतापूर्वक व्यवहार करेल.