02-03-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, आठवणीमध्ये राहून इतरांकडून आठवणीचा अभ्यास करवून घ्या, योग करवून घेणाऱ्याचा बुद्धियोग इकडे-तिकडे भटकता कामा नये”

प्रश्न:-
कोणत्या मुलांवर फार मोठी जबाबदारी आहे? त्यांनी कोणत्या गोष्टींकडे जरूर लक्ष दिले पाहिजे?

उत्तर:-
जी मुले निमित्त टीचर बनून इतरांचा योग करवून घेतात, त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. जर योग करवून घेतेवेळी बुद्धी बाहेर भटकत असेल तर सेवे ऐवजी डिससर्व्हिस (नुकसान) करतात; त्यामुळे यावर लक्ष ठेवायचे आहे की, माझ्या द्वारे पुण्याचे काम होत रहावे.

गीत:-
ओम् नमः शिवाय…

ओम शांती।
बाबा सर्व मुलांना सर्वप्रथम इथे बसून लक्ष्यामध्ये टिकून राहण्यासाठी दृष्टी देतात की, जसे मी शिवबाबांच्या आठवणीमध्ये बसलो आहे, तुम्ही देखील शिवबाबांच्या आठवणीमध्ये बसा. आता प्रश्न उत्पन्न होतो की, जे योग करून घेण्यासाठी समोर बसले आहेत, ते पूर्ण वेळ शिवबाबांच्या आठवणीमध्ये राहतात का? जेणेकरून इतरांनाही आकर्षण वाटेल. आठवणीमध्ये राहिल्याने खूप शांतीमध्ये राहतील. अशरीरी होऊन शिवबाबांच्या आठवणीमध्ये राहतील तर इतरांना देखील शांतीमध्ये घेऊन जातील, कारण टीचर बनून बसता ना. जर टीचरच योग्य रीतीने आठवणीमध्ये नसतील तर दुसरे राहू शकणार नाहीत. पहिला तर हा विचार केला पाहिजे की, मी जो त्या माशुक बाबांचा आशिक आहे, त्यांच्या आठवणीमध्ये बसलो आहे का? प्रत्येकाने स्वतःला असे विचारायचे आहे. जर बुद्धी इतरत्र जात असेल, देह-अभिमानामध्ये येतात, तर ते जणू सेवा नाही, तर नुकसान करण्यासाठी बसले आहेत. ही गोष्ट समजून घेण्याची आहे ना. सेवा तर काही केली नाही, असेच बसले आहेत तर नुकसानच करतील. टीचरचाच बुध्दीयोग भटकत असेल, तर ते मदत काय करणार. जे टीचर होऊन बसतात त्यांनी स्वतःला विचारायचे आहे की, मी पुण्याचे काम करत आहे का? जर पापाचे काम कराल तर दुर्गतीला प्राप्त व्हाल. पद भ्रष्ट होईल. अशांना जर गादीवर (संदलवर) बसवत असाल, तर तुम्ही देखील जबाबदार आहात. शिवबाबा तर सर्वांना जाणतात. हे बाबा (ब्रह्मा बाबा) देखील सर्वांच्या अवस्थेला जाणतात. शिवबाबा म्हणतील, हे टीचर बनून बसले आहेत आणि यांचा बुद्धियोग तर भटकतो आहे. हे कसली दुसऱ्यांना मदत करणार. तुम्ही ब्राह्मण मुले शिवबाबांचे बनून त्यांच्याकडून वारसा घेण्याच्या निमित्त बनला आहात. बाबा म्हणतात - ‘माझ्या आत्म्यांनो, मामेकम् (मज एकाची) आठवण करा’. टीचर बनून बसता तर आणखीनच चांगल्या रीतीने त्या अवस्थेमध्ये बसा. तसे तर प्रत्येकाला बाबांची आठवण करायची आहे. स्टुडंट आपल्या अवस्थेला समजू शकतात, ते जाणतात की, आपण पास होणार की नाही; टीचर देखील जाणतात. जरी प्रायव्हेट टीचर ठेवतात, ते देखील जाणतात. त्या शिक्षणासाठी (लौकिक शिक्षणासाठी) तर कोणी खास टीचर ठेवू इच्छितात, तर ठेवू शकतात. इथे जर कोणी म्हणेल आम्हाला नेष्ठामध्ये (योगामध्ये) बसवा, तर बाबांच्या आठवणीमध्ये बसायचे आहे. बाबांचा आदेशच आहे की, मामेकम् (मज एकाची) आठवण करा‌. तुम्ही आशिक आहात, चालता-फिरता आपल्या माशूकची आठवण करा. संन्यासी तर ब्रह्मची आठवण करतात‌, समजतात की, आपण ‘ब्रह्म’मध्ये जाऊन विलीन होणार. जे जास्त आठवण करत असतील, त्यांची अवस्था चांगली असेल. प्रत्येकामध्ये काही ना काही तरी विशेषता तर असते ना. म्हणतात की, आठवणीच्या यात्रेमध्ये राहा‌. स्वतः देखील आठवणीमध्ये राहायचे आहे. बाबांकडे काहीजण तर सच्चे देखील आहेत, तर काहीजण खोटे देखील आहेत. स्वत: निरंतर आठवणीमध्ये राहतील, हे तर फार अवघड आहे. काहीजण तर बाबांसोबत एकदम सच्चे होऊन राहतात. हे बाबा (ब्रह्मा बाबा) देखील आपला स्वतःचा अनुभव तुम्हा मुलांना सांगतात की, ‘थोडा वेळ आठवणीमध्ये राहतो आणि मग विसरून जातो’; कारण याच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. कितीतरी असंख्य मुले आहेत. तुम्हा मुलांना हे देखील माहित पडत नाही की, ही मुरली शिवबाबांनी चालवली की ब्रह्माबाबा चालवत आहेत. कारण दोघेही एकत्र आहेत ना. हे (ब्रह्मा बाबा) म्हणतात की, मी देखील शिवबाबांची आठवण करतो. हे बाबा देखील मुलांना नेष्ठा (बैठक योग) करवून घेतात. हे बसतात तर तुम्ही पाहता की, खूप चांगली शांतता पसरते. अनेकांना आकर्षित करतात. पिता आहेत ना. म्हणतात - ‘मुलांनो, आठवणीच्या यात्रेमध्ये राहा’. स्वतः देखील राहायचे आहे, फक्त पंडित बनायचे नाही. आठवणीमध्ये राहिला नाहीत तर शेवटी नापास व्हाल. बाबा-मम्माचे तर उच्च पद आहे, बाकीची तर अजून काही माळा बनलेली नाहीये. एकही मणी संपूर्ण बनलेला नाहीये. पूर्वी माळा बनवित होतो, मुलांना पुढे नेण्यासाठी. परंतु असे दिसून आले आहे की, मायेने अनेकांना नष्ट करून टाकले. सर्व काही सेवेवर अवलंबून आहे. तर जे समोर योग करवून घेण्यासाठी बसतात, त्यांनी समजले पाहिजे की, मला खरा टीचर होऊन बसले पाहिजे. नाही तर सांगितले पाहिजे की, माझी बुद्धी इकडे-तिकडे भटकत असते. मी इथे बसण्याच्या लायकीचा नाही. स्वतःच सांगितले पाहिजे. असे नाही की, कोणीही स्वतःच येऊन बसेल. कोणी असे आहेत जे मुखाने मुरली चालवत नाहीत, परंतु आठवणीमध्ये राहतात. परंतु इथे तर दोन्हीमध्ये हुशार असले पाहिजे. साजन अतिशय प्रिय आहेत, त्यांची तर खूप आठवण केली पाहिजे. यामध्ये मेहनत आहे. बाकी प्रजा बनणे तर सोपे आहे. दास-दासी बनणे काही मोठी गोष्ट नाहीये. ज्ञान धारण करू शकत नाहीत. जसे बघा यज्ञाची भंडारी आहे, सर्वांना फार खूष करते, कोणाला दुःख देत नाही, सर्व तिची महिमा करतात. वाह, शिवबाबांची भंडारी तर नंबरवन आहे. अनेकांच्या मनाला खूष करते. बाबा देखील मुलांच्या मनाला खूष करत आले आहेत. बाबा म्हणतात की, माझी आठवण करा आणि या चक्राला बुद्धीमध्ये ठेवा. आता प्रत्येकाला आपले स्वतःचे कल्याण करायचे आहे. हड्डी सेवा (दिवस-रात्र सेवा) केली पाहिजे. तुम्हाला अतिशय दयाळू बनले पाहिजे. मनुष्य मुक्ती-जीवनमुक्तीसाठी खूप खस्ता खातात. कोणालाच सद्गती विषयी ठाऊकच नाही आहे. समजतात की, जिथून आलो आहोत तिथे परत जायचे आहे. हे नाटक असल्याचे देखील समजतात, परंतु त्यानुसार चालत नाहीत. पाहा, क्लासमध्ये काही ठिकाणी मुसलमान देखील येतात. ते म्हणतात की, आम्ही मूळचे देवी-देवता धर्माचे आहोत, नंतर मग आम्ही मुस्लिम धर्मामध्ये कन्व्हर्ट झालो आहोत. आम्ही ८४ जन्म भोगले आहेत. सिंधमध्ये देखील पाच-सहा मुसलमान येत होते. आता देखील येत आहेत, आता पुढे चालू शकतील की नाही, ते तर पहावे लागेल, कारण माया देखील परीक्षा घेते. कोणी तर पक्के होऊन टिकून राहतात, कोणी टिकू शकत नाहीत. जे मूळचे ब्राह्मण धर्माचे असतील, ज्यांनी ८४ जन्म घेतले असतील, ते तर कधीच डळमळीत होणार नाहीत. बाकी कोणत्या ना कोणत्या कारणाने, विनाकारण निघून जातात. देह-अभिमान देखील खूप येतो. तुम्हा मुलांना तर अनेकांचे कल्याण करायचे आहे. नाही तर काय पद प्राप्त कराल. घरदार सोडले आहे, आपल्या कल्याणासाठी. बाबांवर काही मेहरबानी करत नाही आहात. बाबांचे बनला आहात, तर मग सेवा देखील तशी केली पाहिजे. तुम्हाला तर राजाईचे मेडल मिळते, २१ जन्म सदैव सुखाची राजाई मिळते. फक्त मायेवर विजय प्राप्त करायचा आहे आणि इतरांना देखील शिकवायचे आहे. कोणी नापास देखील होतात. समजतात की, राजाई घेणे तर फार अवघड आहे. बाबा म्हणतात की, असे समजणे ही कमजोरी आहे. बाबांची आणि वारशाची आठवण करणे तर फारच सोपे आहे. मुलांमध्ये राजाई घेण्यासाठी हिंमत येत नाही, तर ते भेकडा सारखे बसून राहतात. ना स्वतः घेत, ना दुसऱ्यांना घेऊ देत. तर परिणाम काय होईल? बाबा समजावून सांगत आहेत की, रात्रं-दिवस सेवा करा. काँग्रेसच्या लोकांनी देखील मेहनत केली. किती संघर्ष केला, तेव्हाच तर परकीयांकडून राज्य परत घेतले. तुम्हाला रावणाकडून राज्य घ्यायचे आहे. तो तर सर्वांचा शत्रू आहे. दुनियेला माहित नाही आहे की, आपण रावणाच्या मतावर चालत आहोत, त्यामुळे दुःखी आहोत. कोणालाही खरे, कायमचे मनाचे सुख थोडेच आहे. शिवबाबा म्हणतात, मी तुम्हा मुलांना कायमचे सुखी बनविण्यासाठी आलो आहे. आता श्रीमतावर चालून श्रेष्ठ बनायचे आहे. जे काही भारतवासी आहेत, ते आपल्या धर्माला विसरून गेले आहेत. यथा राजा-राणी तथा प्रजा. आता तुम्हा मुलांना समज मिळाली आहे (ज्ञान मिळाले आहे) की, सृष्टीचे चक्र कसे फिरत आहे. ते देखील वारंवार विसरून जातात. बुद्धीमध्ये राहतच नाही. भले ब्राह्मण तर पुष्कळ बनतात, परंतु बरेचजण कच्चे असल्यामुळे विकारामध्ये देखील जातात. ते म्हणतात आम्ही बी.के. आहोत, परंतु तसे नाही आहेत. बाकी जे पूर्ण रीतीने आदेशावर चालतात, आप समान बनवित राहतात, तेच उच्च पद प्राप्त करू शकतील. विघ्न तर पडणारच. अमृत पिता-पिता मग जाऊन विघ्न टाकतात. हे देखील गायन आहे, त्यांचे काय पद असेल? बऱ्याच मुली तर विकारासाठी मार देखील खातात; कोणी मग म्हणते की, ‘बाबा, हे थोडे दु:ख सहन करेन. माझा माशुक तर बाबा आहेत ना. मार खात असताना देखील मी शिवबाबांची आठवण करते’. त्या अपार आनंदामध्ये राहतात. असे अपार आनंदामध्ये राहिले पाहिजे. बाबांकडून आम्ही वारसा घेत आहोत, इतरांना देखील आम्ही आप समान बनवत राहतो.

बाबांच्या बुद्धीमध्ये तर हे शिडीचे चित्र खूपच असते. याला खूप महत्त्व देतात. जी मुले विचार सागर मंथन करून अशी चित्रे बनवतात, तर बाबा देखील त्यांचे आभार मानतात किंवा असे म्हटले जाईल की, बाबांनी त्या मुलाला टच केले. शिडी फार चांगली बनविली आहे. तुम्ही ८४ जन्मांना जाणल्याने साऱ्या सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणले आहे. हे फर्स्टक्लास चित्र आहे. त्रिमूर्ती, गोळ्याच्या चित्रा पेक्षाही या चित्रामध्ये खूप चांगले ज्ञान आहे. आता आपण चढत आहोत. किती सोपे आहे. बाबा येऊन लिफ्ट देतात (पुढे जाण्यासाठी मदत करतात). तुम्ही शांतीने बाबांकडून वारसा घेत आहात. शिडी विषयीचे ज्ञान फार चांगले आहे. समजावून सांगायचे आहे की, तुम्ही हिंदू थोडेच आहात, तुम्ही तर देवी-देवता धर्माचे आहात. जर असे म्हणाले की, ‘आम्ही थोडेच ८४ जन्म घेतले आहेत’. ‘अरे, असे का समजत नाहीत की, आम्हीच ८४ जन्म घेतले आहेत. आणि मग आठवण करा, म्हणजे मग तुम्ही पहिल्या नंबरमध्ये याल‌’. जर आपल्या कुळातील असेल तर असा प्रश्नच विचारणार नाही की, सगळे थोडेच ८४ जन्म घेतील? अरे तुम्ही असे का समजता की, आम्ही उशिरा आलो आहोत. बाबा सर्व मुलांना म्हणतात, ‘तुम्ही भारतवासीयांनीच ८४ जन्म घेतले आहेत. आता परत आपला वारसा घ्या, स्वर्गामध्ये चला’. तुम्ही मुले योगामध्ये बसतात. तेव्हा शिडीची आठवण करा, तर खूप मजेत राहाल. आम्ही ८४ जन्म पूर्ण केले आहेत. आता आम्ही परत घरी जात आहोत. किती आनंद होतो. सेवा करण्याचा देखील उत्साह असला पाहिजे. समजावून सांगण्याच्या युक्त्या देखील खूप मिळत आहेत. शिडीच्या चित्रावर समजावून सांगा. चित्र तर सर्व पाहिजेत ना. त्रिमूर्तीचे चित्र देखील पाहिजे. बाबा सांगतात देखील की, तुम्ही माझ्या भक्तांकडे जा, त्यांना हे ज्ञान ऐकवा. ते तुम्हाला मंदिरामध्येच भेटतील. मंदिरांमध्ये देखील या शिडीच्या चित्रावर तुम्ही समजावून सांगू शकता. पूर्ण दिवसभर बुद्धीमध्ये हे असावे की, आपण बाबांचा परिचय द्यावा, कोणाचे तरी कल्याण करावे. दिवसेंदिवस बुद्धीचे कुलूप उघडत जाईल. ज्यांना वारसा घ्यायचा असेल, ते येतील. दिवसेंदिवस शिकत देखील राहतात, कितीतरी जणांवर ग्रहचारी बसते, तर मग बाबांना समजावून सांगावे लागते. ते असे समजत नाहीत की, आपल्यावर ग्रहचारी बसली आहे, त्यामुळे आपल्याकडून सेवा होत नाही. सारी जबाबदारी तुम्हा मुलांवर आहे. आप समान ब्राह्मण बनवित रहा. सेवेमध्ये व्यस्त राहिल्यामुळे खूप आनंद होतो. अनेकांचे कल्याण होते. बाबांना मुंबईमध्ये सेवा करण्यासाठी खूप मजा वाटत असे. नवीन-नवीन भरपूर येत असतं. बाबांना तर खूप इच्छा होते की आपणही सेवा करावी. मुलांना देखील असे दयाळू बनले पाहिजे. सेवेला लागले पाहिजे. मनामध्ये हे असले पाहिजे की, जोपर्यंत मी कोणाला आप समान बनवत नाही, तोपर्यंत भोजन करणार नाही. पहिले पुण्य तर करू दे. पाप-आत्म्याला पुण्य-आत्मा बनवून मगच भाकरी खाईन. तर सेवेमध्ये गुंतून राहिले पाहिजे. कोणाचे जीवन सफल करावे तेव्हाच भाकरी खावी. आप समान ब्राह्मण बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मुलांसाठी मासिक निघत आहे, परंतु बी. के. तेवढे वाचत नाहीत. ते समजतात की, आम्हाला थोडेच वाचायचे आहे, हे तर बाहेरील लोकांसाठी आहे. बाबा म्हणतात - बाहेरचे तर टीचर शिवाय काहीच समजणार नाहीत. हे मासिक ब्रह्माकुमार-कुमारींसाठी आहे, तर ते वाचून ताजेतवाने व्हावे, परंतु ते वाचत नाहीत. सर्व सेंटर्सवाल्यांना विचारतात की, सर्व मासिके कोण वाचतात? मासिक वाचून काही समजतात का? कितपत ठीक आहे? मासिक काढणाऱ्यांना देखील शाबासकी दिली पाहिजे की, तुम्ही फार चांगले मासिक लिहिले आहे, तुमचे आभारी आहोत. मेहनत करायची आहे, मासिक वाचायचे आहे. हे मुलांना रिफ्रेश होण्यासाठी आहे. परंतु मुले वाचत नाहीत. ज्यांचे नाव प्रसिद्ध आहे त्यांना सर्वजण बोलावतात की, बाबा, भाषण करण्यासाठी आमच्याकडे अमक्याला पाठवा. मग बाबा समजावून सांगतात की, स्वतः भाषण करणे जाणत नाहीत, म्हणूनच तर मागणी करत आहेत. तर सेवाभावी असणाऱ्यांचा किती आदर केला पाहिजे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) राजाईचे मेडल घेण्यासाठी सर्वांच्या मनाला खूष करायचे आहे. अतिशय दयाळू बनून आपले आणि सर्वांचे कल्याण करायचे आहे. हड्डी सेवा करायची आहे.

२) देह-अभिमानामध्ये येऊन डिससर्विस करायची नाही. नेहमी पुण्याचे काम करायचे आहे. आप समान ब्राह्मण बनविण्याची सेवा करायची आहे. सेवाभावी (सेवेमध्ये तत्पर) असणाऱ्यांचा नेहमी आदर ठेवायचा आहे.

वरदान:-
मनन शक्तीद्वारे वेस्टच्या वेटला (ओझ्याला) नष्ट करणारे सदा शक्तिशाली भव

आत्म्यावर वेस्टचेच वेट (भार) आहे. वेस्ट संकल्प, वेस्ट वाणी, वेस्ट कर्म यामुळे आत्मा भारी होते. आता या ओझ्याला नाहीसे करा. या ओझ्याला नष्ट करण्यासाठी सदैव सेवेमध्ये बिझी रहा, मनन शक्तीला वाढवा. मनन शक्तीद्वारे आत्मा शक्तिशाली बनेल. जसे भोजन पचल्यामुळे रक्त बनते आणि मग ते शक्तीचे काम करते, अगदी तसेच मनन केल्याने आत्म्याची शक्ती वाढते.

बोधवाक्य:-
जे आपल्या स्वभावाला सरळ बनवतात त्यांचा समय व्यर्थ जात नाही.

हे अव्यक्त इशारे:- “निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा” जो निश्चय-बुद्धी असेल तो निश्चिंत असेल, त्याला कोणत्याही प्रकारचे चिंतन अथवा चिंता असणार नाही. ‘काय झाले? का झाले? असे होता नये’ - हे व्यर्थ चिंतन आहे. निश्चय-बुद्धी निश्चिंत असणारा कधीही व्यर्थ चिंतन करणार नाही. सदैव स्व-चिंतनामध्ये राहणारा स्व-स्थिती द्वारे परिस्थितीवर विजय प्राप्त करतो.