02-04-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
प्रश्न:-
या वंडरफुल
दुकानदाराची कॉपी कोणीच करू शकत नाही, असे का?
उत्तर:-
कारण हे स्वतःच सर्व खजिन्यांचे भांडार आहेत. ज्ञानाचा, सुखाचा, शांतीचा, पवित्रतेचा
सर्व गोष्टींचा सागर आहे, ज्याला जे पाहिजे ते मिळू शकते. निवृत्ती मार्गवाल्यांकडे
हे सामान मिळू शकत नाही. कोणीही स्वतःला बाप समान सागर म्हणू शकत नाहीत.
गीत:-
तुम्हें पाके
हमने…
ओम शांती।
आता मुले बसली आहेत बेहदच्या बाबांसमोर. यांना बेहदचे पिता देखील म्हटले जाईल तर
बेहदचे दादा देखील म्हटले जाईल आणि मग बेहदची मुले बसली आहेत आणि बाबा बेहदचे ज्ञान
देत आहेत. हदच्या गोष्टी आता निघून गेल्या आहेत. आता बाबांकडून बेहदचा वारसा घ्यायचा
आहे. हे एकच दुकान आहे. लोकांना ठाऊक नाहीये की आपल्याला काय पाहिजे आहे. बेहदच्या
बाबांचे दुकान तर खूप मोठे आहे. त्यांना म्हटले जाते सुखाचा सागर, पवित्रतेचा सागर,
आनंदाचा सागर, ज्ञानाचा सागर… कोणताही दुकानदार असतो तर त्याच्याकडे खूप व्हरायटी
असते (अनेक प्रकारच्या वस्तू असतात). तर हे आहेत बेहदचे बाबा. यांच्याकडे देखील
व्हरायटी प्रकारचे सामान आहे. काय-काय आहे? बाबा ज्ञानाचा सागर आहेत, सुखाचा,
शांतीचा सागर आहेत. त्यांच्याकडे हे वंडरफुल, अलौकिक सामान आहे. आणि गायले देखील
जाते - सुख-कर्ता. हे एकच दुकान आहे आणखी तर कोणाचे असे दुकान नाही आहे.
ब्रह्मा-विष्णू-शंकराकडे कोणते सामान आहे? काहीच नाही. सर्वात अत्युच्च सामान आहे
बाबांकडे, म्हणून त्यांची महिमा गायली जाते - ‘त्वमेव माताश्च पिता…’ अशी महिमा कधी
कोणाची गायली जात नाही. मनुष्य शांतीसाठी किती भटकत असतात. कोणाला औषध पाहिजे,
कोणाला आणखी काही पाहिजे. ती सर्व हदची दुकाने आहेत. सगळ्या दुनियेमध्ये सर्वांकडे
हदच्या वस्तू आहेत. हे एकच पिता आहेत ज्यांच्याकडे बेहदच्या वस्तू आहेत म्हणून
त्यांची महिमा देखील गातात की, पतित-पावन आहेत, लिबरेटर आहेत, ज्ञानाचा सागर,
आनंदाचा सागर आहेत. हे सर्व व्हरायटी वक्खर (सामान) आहे. लिस्ट काढाल तर खूप होईल.
ज्या बाबांकडे या वस्तू आहेत तर त्यावर मुलांचा देखील हक्क आहे. परंतु हे कोणाच्याच
बुद्धीमध्ये येत नाही की जेव्हा अशा बाबांची आपण मुले आहोत तर बाबांच्या वस्तूंचे
आपण मालक असले पाहिजे. बाबा येतात देखील भारतामध्येच. बाबांकडे ज्या सर्व वस्तू
आहेत - त्या जरूर घेऊन येतील. त्यांच्याकडे घेण्याकरिता तर आपण जाऊ शकत नाही. बाबा
म्हणतात - मलाच यावे लागते. कल्प-कल्प, कल्पाच्या संगमावर मी येऊन तुम्हाला सर्व
गोष्टी देतो. मी जे तुम्हाला सामान देतो, ते पुन्हा कधीही मिळू शकत नाही.
अर्ध्याकल्पासाठी तुमची भंडारे भरपूर होतात. अशी कोणती अप्राप्त वस्तू असत नाही
ज्याच्यासाठी बोलवावे लागेल. ड्रामा प्लॅन अनुसार तुम्ही सर्वजण वारसा घेऊन मग
हळू-हळू शिडी उतरता. पुनर्जन्म देखील जरूर घ्यावा लागेल. ८४ जन्म देखील घ्यायचे
आहेत. ८४ चे चक्र म्हणतात परंतु अर्थ समजत नाहीत. ८४ च्या ऐवजी ८४ लाख जन्म म्हणतात.
माया चूक करायला लावते. हे आता तुम्ही समजता मग पुन्हा हे तर सर्व विसरून जाणार.
यावेळी सामान घेतात, सतयुगामध्ये राजाई करतात. परंतु त्यांना हे माहीत नाहीये की ही
राजाई आपल्याला कोणी दिली? लक्ष्मी-नारायणाचे राज्य कधी होते? स्वर्गाचे सुख गायले
देखील जाते. सर्व प्रकारचे सुख देतात. यापेक्षा जास्त कोणतेही सुख असत नाही. मग ते
सुख देखील प्राय:लोप होते. अर्ध्या कल्पा नंतर रावण येऊन सर्व सुख हिसकावून घेतो.
कोणावर चिडतात तर त्याला म्हणतात - तुमची तर कला कायाच नष्ट झाली आहे (गुण आणि
शरीरच नष्ट झाले आहे). तुम्ही देखील जे सर्व गुण संपन्न, १६ कला संपूर्ण होता. त्या
सर्व कला नष्ट झाल्या आहेत. एक बाबांव्यतिरिक्त इतर कोणाचीही इतकी महिमा नाहीये.
म्हणतात ना - पैसा असेल तर लाडकाना फिरून या (लाडकाना सिंध प्रांत मधील एक शहर).
तुम्ही विचार करा की
स्वर्गामध्ये किती अकिचार धन-संपत्ती होती. आता ते थोडेच आहे. सर्व नष्ट होते. धर्म
भ्रष्ट, कर्म भ्रष्ट बनतात. तर धन-संपत्ती देखील नाहीशी होते आणि मग पतन होऊ लागते.
बाबा समजावून सांगत आहेत - तुम्हाला इतके धन दिले, तुम्हाला हिऱ्या सारखे बनवले. मग
तुम्ही धन-संपत्ती कुठे गमावली? आता पुन्हा बाबा म्हणतात की आपला वारसा, पुरुषार्थ
करून पुन्हा घ्या. तुम्ही जाणता की बाबा आम्हाला पुन्हा स्वर्गाची बादशाही देत आहेत
आणि म्हणत आहेत की, ‘माझ्या मुलांनो, माझी आठवण करा तर तुमच्यावर जी कट (गंज) चढलेली
आहे, ती निघून जाईल. मुले म्हणतात , बाबा आम्ही विसरून जातो. हे काय? कन्या जेव्हा
लग्न करते तर पतीला कधी विसरते का! मुले कधी आपल्या वडिलांना विसरतात का? बाबा तर
दाता आहेत. मुलांना वारसा घ्यायचा असेल तर जरूर आठवण करावी लागेल. बाबा समजावून
सांगत आहेत - गोड-गोड सिकीलध्या मुलांनो (लाडक्या मुलांनो), आठवणीच्या यात्रेमध्ये
रहाल तर विकर्म विनाश होतील दुसरा कोणताही उपाय नाही. भक्तिमार्गामध्ये तीर्थयात्रा,
गंगा स्नान इत्यादी जे करत आला आहात त्यामुळे तर शिडी खाली उतरतच आला आहात. वर काही
चढू सुद्धा शकणार नाही. कायदाच नाही. सर्वांची उतरती कलाच आहे. हे जे म्हणतात की,
अमका मुक्तीमध्ये गेला, हे खोटे बोलतात. असे परत कोणीही जाऊ शकत नाही. बाबा आले
आहेत तुम्हाला १६ कला संपूर्ण बनविण्या करिता. तुम्हीच गात होता की, ‘मज निर्गुण
हारे मे…’ आता तुम्ही जाणता की, बाबा गुणवान बनवत आहेत. आपणच गुणवान, पूज्य होतो.
आपणच वारसा घेतला होता. ५ हजार वर्षे झाली. बाबा देखील म्हणतात की तुम्हाला वारसा
देऊन गेलो होतो. शिवजयंती, रक्षाबंधन, दसरा इत्यादी साजरे देखील करतात तरीही काहीच
समजत नाहीत. सर्व काही विसरून जातात. मग बाबा येऊन आठवण करून देतात. तुम्हीच होता,
मग तुम्हीच राज्य-भाग्य गमावले आहे. बाबा म्हणतात - आता ही सारी जुनी दुनिया
जडजडीभुत झाली आहे. दुनिया तर हीच आहे. हाच भारत नवीन होता, आता जुना झाला आहे.
स्वर्गामध्ये नेहमी सुख असते. मग द्वापर पासून जेव्हा दुःखाची सुरुवात होते तेव्हा
ही वेद-शास्त्रे इत्यादी बनतात. भक्ती करता-करता जेव्हा तुम्ही भक्ती पूर्ण कराल
तेव्हाच तर भगवान येतील ना. ब्रह्माचा दिवस, ब्रह्माची रात्र. अर्धे-अर्धे असेल ना.
ज्ञान आहे - दिवस, भक्ती आहे - रात्र. त्यांनी तर कल्पाचा कालावधी उलटा-सुलटा केला
आहे.
तर सर्वप्रथम तुम्ही
सर्वांना बसून बाबांची महिमा ऐकवा. बाबा ज्ञानाचे सागर, शांतीचे सागर आहेत.
श्रीकृष्णाला असे थोडेच म्हणता येईल की, निराकार पतित-पावन, सुखाचा सागर… नाही,
त्यांची महिमाच वेगळी आहे. रात्रं-दिवसाचा फरक आहे. शिवाला म्हटलेच जाते - ‘बाबा’.
‘श्रीकृष्ण बाबा’ हा शब्दच शोभत नाही. किती मोठी चूक आहे. मग छोटया-छोट्या चुका करत
१०० टक्के विसरून गेले आहेत. बाबा म्हणतात - संन्याशांकडून कधी असा सौदा मिळू शकणार
नाही. ते तर आहेतच निवृत्ती मार्गवाले. तुम्ही आहात प्रवृत्ती मार्गवाले. तुम्ही
संपूर्ण निर्विकारी होता, व्हाईसलेस वर्ल्ड होते (निर्विकारी दुनिया होती). हे आहे
विशश वर्ल्ड (विकारी दुनिया). मग असे म्हणतात - सतयुगामध्ये मुले जन्माला येत नाहीत
काय? तिथे देखील विकार तर होता. अरे, ती आहेच संपूर्ण निर्विकारी दुनिया. संपूर्ण
निर्विकारी आहेत मग विकारी कसे असू शकतील? मग सतयुगामध्ये इतके सर्व मनुष्य असतील,
हे असे कसे होऊ शकते. तिथे इतके मनुष्य थोडेच असतात. भारत सोडून इतर कोणतेही खंड
असणार नाहीत. ते म्हणतात देखील की, आम्ही हे मान्य करू शकत नाही. दुनिया तर सदैव
भरलेली असते, काहीच समजत नाहीत. बाबा समजावून सांगतात की, भारत गोल्डन एज्ड होता.
आता तर आयरन एज्ड पत्थर-बुद्धी आहे. आता तुम्हा मुलांनी ड्रामाला समजून घेतले आहे.
गांधीजी इत्यादी सर्वांना रामराज्य असावे असे वाटत होते. परंतु दाखवतात की महाभारत
लढाई झाली. बस्स, आणि मग सारा खेळ खलास. मग पुढे काय झाले? काहीच दाखवलेले नाही.
बाबा बसून हे सर्व काही समजावून सांगतात. हे तर एकदम सोपे आहे. शिवजयंती साजरी
करतात - तर जरूर शिवबाबा येतात. ते आहेत हेवनली गॉड फादर तर जरूर हेवनचे गेट
उघडण्यासाठी येतील. येतील देखील तेव्हाच, जेव्हा हेल (नरक) असेल. हेवनचे द्वार
उघडून मग नरकाचा दरवाजा बंद करतील. हेवनचे द्वार उघडेल तर जरूर सर्वजण हेवन मध्येच
येतील. या गोष्टी काही डिफिकल्ट नाही आहेत. महिमा फक्त एका बाबांची आहे. शिवबाबांचे
एकच दुकान आहे. ते आहेत बेहदचे बाबा. बेहदच्या बाबांकडून भारताला स्वर्गाचे सुख
मिळते. बेहदचे बाबा स्वर्ग स्थापन करतात. बरोबर बेहदचे सुख होते. मग आपण हेलमध्ये
का पडलो आहोत? हे कोणीच जाणत नाही. बाबा समजावून सांगत आहेत की, तुम्हीच तर होता आणि
मग तुम्हीच कोसळला आहात (अधोगती झाली आहे). देवतांनाच तर ८४ जन्म घ्यावे लागतात. आता
येऊन पतित बनले आहेत. त्यांनाच मग पावन बनायचे आहे. बाबांचा देखील जन्म आहे तर
रावणाचा देखील जन्म असतो. हे कोणालाच माहीत नाही. कोणालाही जर विचाराल की, रावणाला
केव्हा पासून जाळत आले आहात? तर म्हणतील - ते तर अनादि चालत आले आहे. ही सर्व रहस्ये
बाबाच समजावून सांगतात. त्या बाबांच्या एकाच हट्टीची (दुकानाची) महिमा आहे.
सुख-शांती-पवित्रता कधीही मनुष्याकडून मनुष्याला मिळू शकत नाही. फक्त एकालाच थोडीच
शांती मिळाली होती. हे खोटे बोलतात की अमक्याकडून शांती मिळाली. अरे, शांती तर
मिळणार आहे - शांतीधाममध्ये. इथे तर एकाला शांती मिळेल आणि मग दुसरा अशांत करेल तर
तो शांतीमध्ये राहू शकणार नाही. सुख-शांती-पवित्रता या सर्व गोष्टींचे व्यापारी एक
शिवबाबाच आहेत. येऊन त्यांच्याशी कोणी व्यापार करावा. त्यांना म्हटलेच जाते सौदागर,
पवित्रता, सुख-शांती, संपत्ती सर्व काही त्यांच्याकडे आहे. अप्राप्त कोणतीही वस्तू
नाही. स्वर्गाचे तुम्ही राज्य प्राप्त करता. बाबा तर देण्यासाठी आले आहेत, घेणारे
घेता-घेता थकून जातात. मी येतोच मुळी देण्यासाठी आणि तुम्ही घेण्यामध्ये थंड पडता.
मुले म्हणतात, बाबा मायेची वादळे येतात. हो, पद देखील खूप उच्च मिळवायचे आहे.
स्वर्गाचे मालक बनत आहात, ही काही कमी गोष्ट आहे का! तर मेहनत करायची आहे.
श्रीमतावर चालत रहा. वक्खर (सामान) जे मिळते ते मग इतरांना देखील द्यावे लागेल. दान
करावे लागेल. पवित्र बनायचे असेल तर ५ विकारांचे दान जरूर द्यायचे आहे. मेहनत करायची
आहे. बाबांची आठवण करायची आहे, तेव्हाच गंज उतरेल. मुख्य आहे - आठवण. प्रतिज्ञा भले
करा की बाबा आम्ही कधीही विकारामध्ये जाणार नाही, कधी कोणावर क्रोध करणार नाही.
परंतु आठवणीमध्ये जरूर राहायचे आहे. नाही तर इतकी सर्व पापे नष्ट कशी होतील. बाकी
नॉलेज तर खूप सोपे आहे. ८४ जन्मांचा फेरा कसा पूर्ण केला, हे तुम्ही कोणालाही
समजावून सांगू शकता. बाकी आठवणीच्या यात्रेमध्येच मेहनत आहे. भारताचा प्राचीन योग
प्रसिद्ध आहे. कोणते ज्ञान देतात? मनमनाभव अर्थात मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर
तुमची विकर्म विनाश होतील. तुम्ही गात देखील होता की, तुम्ही जेव्हा याल तेव्हा
आम्ही इतर सर्व संग तोडून एक तुमच्याशीच संग जोडणार. तुमच्यावर बलिहार जाणार.
तुमच्या शिवाय दुसऱ्या कोणाचीही आठवण करणार नाही. प्रतिज्ञा केली आहे तर मग विसरता
कशाला? म्हणतात देखील - ‘हथ कार डे दिल यार डे…’ कर्मयोगी तर तुम्ही आहात. धंदा
इत्यादी करत असताना बुध्दीचा योग बाबांसोबत लावायचा आहे. माशुक बाबा स्वतः म्हणतात,
तुम्हा आशिकांनी अर्धा कल्प माझी आठवण केली आहे. आता मी आलो आहे, तर माझी आठवण करा.
ही आठवणच वारंवार विसरून जाता, यामध्येच मेहनत आहे. कर्मातीत अवस्था झाली तर मग हे
शरीरच सोडावे लागेल. जेव्हा राजधानी स्थापन होईल तेव्हा तुम्ही कर्मातीत अवस्थेला
प्राप्त कराल. आता तर सर्व पुरुषार्थी आहेत. सर्वात जास्त मम्मा-बाबा आठवण करतात.
सूक्ष्मवतनमध्ये देखील ते पाहण्यात येतात.
बाबा म्हणतात - ‘मी
ज्यांच्यामध्ये प्रवेश करतो, तो त्यांचा अनेक जन्मांतील अंताचा जन्म आहे. ते देखील
पुरुषार्थ करत आहेत. कर्मातीत अवस्थेमध्ये एवढ्यात कोणीही पोहोचू शकत नाही.
कर्मातीत अवस्था आली तर मग हे शरीर राहू शकणार नाही. बाबा तर खूप चांगल्या रीतीने
समजावून सांगतात. आता सर्व समजून घेणाऱ्याच्या बुद्धीवर अवलंबून आहे. हेवनली गॉड
फादर एकच आहेत. त्यांच्याकडेच ज्ञानाचे सारे वक्खर (सामान) आहे. तेच जादूगार आहेत.
इतर कोणाकडूनही सुख-शांती-पवित्रतेचा वारसा मिळू शकत नाही. बाबा खूप चांगल्या रीतीने
समजावून सांगतात. मुलांनी धारण करून मग इतरांकडूनही धारणा करवून घ्यायची आहे. जितकी
धारणा करतात तितका वारसा घेतात. दिवसें-दिवस खूप तरावटी माल (ताजातवाना माल)
तुम्हाला मिळतो. लक्ष्मी-नारायण पहा किती गोड आहेत. त्यांच्यासारखे गोड बनले पाहिजे.
अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. बाकी कोणत्याही सत्संगामध्ये असे म्हटले
जाते का? ही आपली एकदम नवीन भाषा आहे, ज्याला स्पिरिच्युअल नॉलेज म्हटले जाते. अच्छा!
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाबांकडून
जे सुख-शांती-पवित्रतेचे वक्खर (सामान) मिळाले आहे, ते सर्वांना द्यायचे आहे. पहिले
विकारांचे दान देऊन पवित्र बनायचे आहे आणि मग अविनाशी ज्ञान धनाचे दान करायचे आहे.
२) देवतांसारखे गोड
बनायचे आहे. बापदादांसोबत जी प्रतिज्ञा केली आहे, ती कायम लक्षात ठेवायची आहे आणि
बाबांच्या आठवणीमध्ये राहून विकर्म देखील नष्ट करायची आहेत.
वरदान:-
‘निमित्त’पणाच्या स्मृतीद्वारे आपल्या प्रत्येक संकल्पावर लक्ष ठेवणारे निवारण
स्वरूप भव
निमित्त बनलेल्या
आत्म्यांवर सर्वांची नजर असते त्यामुळे निमित्त बनणाऱ्यांना विशेष आपल्या प्रत्येक
संकल्पावर लक्ष ठेवावे लागेल. जर निमित्त बनलेली मुले देखील कोणते कारण ऐकवत असतील
तर त्यांना फॉलो करणारे देखील अनेक कारणे ऐकवतात. निमित्त बनणाऱ्यांमध्ये जर काही
कमी-कमजोरी असेल तर ती कधीही लपून राहू शकत नाही म्हणून विशेषत: आपले संकल्प, वाणी
आणि कर्म यावर लक्ष ठेऊन निवारण स्वरूप बना.
बोधवाक्य:-
ज्ञानी तू
आत्मा ते आहेत ज्यांच्यामध्ये आपले गुण किंवा विशेषतांचा देखील अभिमान नसेल.
हे अव्यक्त इशारे -
महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.
मधुरतेचा गुण
जीवनामध्ये तेव्हा येईल जेव्हा आपल्या किंवा दुसऱ्याच्या झालेल्या गोष्टींना न पाहता
आपल्या मधील संस्कारांना सरळ आणि नम्रचित बनवाल. सरळपणा असणाऱ्या आत्म्याचा गुणच
मधुरता आहे. त्यांच्या डोळ्यांमधून मधुरता, मुखावाटे मधुरता आणि वर्तनामधून मधुरता
प्रत्यक्ष रूपामध्ये दिसून येते. मधुरता आणि नम्रता, या दोन विशेष धारणांद्वारे सदा
विश्वकल्याणकारी, महादानी, वरदानी बनाल आणि सहजच स्नेहाचा प्रत्यक्ष पुरावा देऊ
शकाल.