02-05-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - एकांतामध्ये बसून स्वतःशी गोष्टी करा की, मी अविनाशी आत्मा आहे,
बाबांकडून ऐकत आहे, ही प्रॅक्टिस करा”
प्रश्न:-
जी मुले
आठवणीमध्ये निष्काळजी आहेत, त्यांच्या मुखातून कोणते बोल निघतात?
उत्तर:-
ते असे म्हणतात - आम्ही तर शिवबाबांची मुले आहोतच. आठवणीमध्येच राहतो. परंतु बाबा
म्हणतात या सर्व थापा आहेत, निष्काळजीपणा आहे. यामध्ये तर पुरुषार्थ करायचा आहे,
पहाटे उठून स्वतःला आत्मा समजून बसायचे आहे. रुहरिहान करायची आहे. आत्माच बोलते. आता
तुम्ही देही-अभिमानी बनता. देही-अभिमानी मुलेच आठवणीचा चार्ट ठेवतील; फक्त
ज्ञानाच्या बढाया मारणार नाहीत.
गीत:-
मुखड़ा देख ले
प्राणी…
ओम शांती।
रुहानी मुलांना समजावून सांगितले आहे की प्राण आत्म्याला म्हटले जाते. आता बाबा
आत्म्यांना समजावून सांगतात, ही गाणी तर भक्तिमार्गाची आहेत. हे तर फक्त त्याचे सार
समजावून सांगितले जाते. आता तुम्ही जेव्हा इथे बसता तर स्वतःला आत्मा समजा. देहाचे
भान सोडायचे आहे. आपण आत्मा खूप छोटा बिंदू आहोत. मीच या शरीराद्वारे पार्ट बजावते.
हे आत्म्याचे ज्ञान कोणालाही नाही. हे बाबा समजावून सांगतात, स्वतःला आत्मा समजा -
‘मी छोटीशी आत्मा आहे. आत्माच या शरीराद्वारे सर्व पार्ट बजावते’, म्हणजे मग
देह-अभिमान निघून जाईल. ही आहे मेहनत. आपण आत्मे या साऱ्या नाटकातील ॲक्टर्स आहोत.
उच्च ते उच्च ॲक्टर आहेत परमपिता परमात्मा. बुद्धीमध्ये असते की ते देखील अगदी छोटा
बिंदू आहेत, त्यांची महिमा किती जबरदस्त आहे. ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर आहेत.
परंतु आहे छोटा बिंदू. आपण आत्मे देखील छोटा बिंदू आहोत. आत्म्याला दिव्यदृष्टी
शिवाय बघू शकत नाही. या सर्व नवीन-नवीन गोष्टी आता तुम्ही ऐकत आहात. दुनियेला काय
माहित तुमच्यामध्ये देखील असे थोडे आहेत जे यथार्थ रीतीने समजतात आणि बुद्धीमध्ये
असते की आपण आत्मा छोटा बिंदू आहोत. आपले पिता या ड्रामामध्ये मुख्य ॲक्टर आहेत.
उच्च ते उच्च ॲक्टर बाबा आहेत, मग अमके-तमके येतात. तुम्ही जाणता बाबा ज्ञानाचा
सागर आहेत परंतु शरीराशिवाय तर ज्ञान ऐकवू शकत नाहीत. शरीराद्वारेच बोलू शकतात.
अशरीरी झाल्यामुळे कर्मेंद्रिये वेगळी होतात. भक्तीमार्गामध्ये तर देहधारींचीच आठवण
करतात. परमपिता परमात्म्याचे नाव, रूप, देश, काळ काहीच जाणत नाहीत. फक्त एवढेच
म्हणतात परमात्मा नावा-रुपा पासून न्यारा आहे. बाबा समजावून सांगतात - ड्रामा
अनुसार तुम्ही जे नंबरवन सतोप्रधान होता, तुम्हालाच मग सतोप्रधान बनायचे आहे.
तमोप्रधानापासून सतोप्रधान बनण्यासाठी तुम्हाला पुन्हा ही अवस्था मजबूत ठेवायची आहे
की, आपण आत्मा आहोत, आत्मा या शरीराद्वारे बोलते. तिच्यामध्ये ज्ञान आहे. हे ज्ञान
आणखी कोणाच्याही बुद्धीमध्ये नाहीये की आपल्या आत्म्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट
अविनाशी नोंदलेला आहे. हे खूप नवीन-नवीन पॉईंट्स आहेत. एकांतामध्ये बसून स्वतः सोबत
अशा प्रकारे गोष्टी करायच्या आहेत - ‘मी आत्मा आहे, बाबांकडून ऐकत आहे, धारणा मज
आत्म्यामध्ये होते. मज आत्म्यामध्येच पार्ट भरलेला आहे. मी आत्मा अविनाशी आहे’. असे
आतमध्ये घोटले पाहिजे. आपल्याला तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे आहे. देह-अभिमानी
मनुष्याला आत्म्याचे सुद्धा ज्ञान नाही आहे, किती मोठी-मोठी पुस्तके स्वतःजवळ
ठेवतात. अहंकार किती आहे. ही आहेच तमोप्रधान दुनिया. उच्च ते उच्च आत्मा तर कोणीच
नाही आहे. तुम्ही जाणता आता आपल्याला तमोप्रधानापासून सतोप्रधान बनण्याचा पुरुषार्थ
करायचा आहे. या गोष्टीला आतमध्ये घोटायचे आहे. ज्ञान ऐकवणारे तर खूप आहेत. परंतु
आठवण नाही आहे. आतमध्ये ती अंतर्मुखता असली पाहिजे. आपल्याला बाबांच्या आठवणीने
पतितापासून पावन बनायचे आहे, फक्त पंडित बनायचे नाहीये. यावर एक पंडिताचे उदाहरण
देखील आहे - मातांना म्हणत असे राम-राम म्हटल्याने पार व्हाल… तर असे गप्पिष्ट
बनायचे नाही. असे खूप आहेत.
ज्ञान खूप छान
सांगतात, परंतु योग नाहीये. पूर्ण दिवस देह-अभिमानामध्ये राहतात. नाहीतर बाबांना
चार्ट पाठवला पाहिजे की, ‘मी इतके वाजता उठतो, इतकी आठवण करतो’. काहीच समाचार देत
नाहीत. ज्ञानाच्या खूप गप्पा मारतात. योग नाही आहे. भले मोठ्या-मोठ्यांना ज्ञान
देतात, परंतु योगामध्ये कच्चे आहेत. पहाटे उठून बाबांची आठवण करायची आहे. बाबा,
तुम्ही किती मोस्ट बिलवेड आहात. कसा हा विचित्र ड्रामा बनलेला आहे. हे रहस्य कोणीही
जाणत नाहीत. ना आत्म्याला, ना परमात्म्याला जाणत. यावेळी मनुष्य पशु पेक्षाही वाईट
बनला आहे. आपण देखील असेच होतो. मायेच्या राज्यामध्ये किती दुर्दशा होते. हे ज्ञान
तुम्ही कोणालाही देऊ शकता. बोला - तुम्ही आत्मा आता तमोप्रधान आहात, तुम्हाला
सतोप्रधान बनायचे आहे. सर्वात आधी तर स्वतःला आत्मा समजा. गरिबांसाठी तर अजूनच सोपे
आहे. श्रीमंतांची तर खूप लफडी असतात.
बाबा म्हणतात - मी
येतोच मुळी साधारण तनामध्ये. ना खूप गरीब, ना खूप श्रीमंत. आता तुम्ही जाणता
कल्प-कल्प बाबा येऊन आपल्याला हीच शिकवण देतात की, पावन कसे बनायचे. बाकी तुमच्या
धंदा इत्यादीमध्ये जी कटकट आहे, त्यासाठी बाबा आलेले नाहीत. तुम्ही तर बोलवताच की
‘हे पतित पावन या’; तर बाबा पावन बनण्याची युक्ती सांगतात. हे ब्रह्मा स्वतः देखील
काहीच जाणत नव्हते. ॲक्टर असून ड्रामाच्या आदि-मध्य-अंताला जाणत नाहीत तर त्यांना
काय म्हणाल. आपण आत्मे या सृष्टी चक्रामध्ये ॲक्टर आहोत, हे देखील कोणी जाणत नाहीत.
भले असे म्हणतात आत्मा मूल वतनमध्ये निवास करते परंतु अनुभवाने म्हणत नाहीत. तुम्ही
तर आता प्रॅक्टिकलमध्ये जाणता - आपण आत्मे मूलवतनचे रहिवासी आहोत. आपण आत्मे अविनाशी
आहोत. तर हे बुद्धीमध्ये लक्षात राहिले पाहिजे. पुष्कळ जणांचा अजिबातच योग नाहीये.
देह-अभिमानामुळे मग चुका देखील खूप होतात. मूळ गोष्ट आहेच - देही-अभिमानी बनणे. हा
ध्यास लागून राहिला पाहिजे की आपल्याला सतोप्रधान बनायचे आहे. ज्या मुलांना
सतोप्रधान बनण्याचा ध्यास असतो, त्यांच्या मुखातून कधी कटू वचन निघणार नाहीत. कोणती
चूक झाली तर लगेच बाबांना रिपोर्ट देतील - ‘बाबा, माझ्याकडून ही चूक झाली. क्षमा करा’.
लपवणार नाहीत. लपवल्यामुळे त्यामध्ये अजूनच वृद्धी होते. बाबांना समाचार देत रहा.
बाबा लिहून पाठवतील - तुमचा योग ठीक नाही. हीच पावन बनण्याची मुख्य गोष्ट आहे.
तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये ८४ जन्मांची कहाणी आहे. जितके होईल बस्स हीच काळजी
लागून रहावी की, सतोप्रधान बनायचे आहे. देह-अभिमानाला सोडायचे आहे. तुम्ही आहात
राजऋषी. हठयोगी कधी राजयोग शिकवू शकत नाहीत. राजयोग बाबाच शिकवतात. ज्ञान देखील
बाबाच देतात. बाकी आता यावेळी आहे तमोप्रधान भक्ती. बाबा ज्ञान फक्त संगमावरच येऊन
ऐकवतात. बाबा आले आहेत तर भक्ती नष्ट होणार आहे, ही दुनिया सुद्धा नष्ट होणार आहे.
ज्ञान आणि योगाद्वारे सतयुगाची स्थापना होते. भक्ती गोष्टच वेगळी आहे. मनुष्य मग
म्हणतात सुख-दुःख इथेच आहे. आता तुम्हा मुलांवर खूप मोठी जबाबदारी आहे. आपले कल्याण
करण्यासाठी योजना आखत रहा. हे देखील समजावून सांगितले आहे - पावन दुनिया आहे
शांतीधाम आणि सुखधाम. हे आहे अशांतीधाम, दुःखधाम. पहिली मुख्य गोष्टच आहे - योगाची.
योग नसेल तर ज्ञानाच्या फक्त पंडिता सारख्या बढाया मारणे आहे. आजकाल तर
रिद्धी-सिद्धी देखील खूप प्रचलित आहे, परंतु याच्याशी ज्ञानाचे काहीही कनेक्शन नाही.
मनुष्य किती खोट्या गोष्टींमध्ये अडकून पडले आहेत. पतित आहेत. बाबा स्वतः म्हणतात
मी पतित दुनिया, पतित शरीरामध्ये येतो. पावन तर इथे कोणीच नाहीये. हे (ब्रह्मा बाबा)
काही स्वतःला भगवान म्हणत नाहीत. हे तर असे म्हणतात - मी देखील पतित आहे, पावन होईन
तेव्हा फरिश्ता बनणार. तुम्ही देखील पवित्र फरिश्ता बनाल. तर मुख्य गोष्ट हीच आहे
की आपण पावन कसे बनावे. आठवण करणे खूप जरुरी आहे. जी मुले आठवणीमध्ये निष्काळजी
आहेत ती म्हणतात - आम्ही तर शिवबाबांची मुले आहोतच. आठवणीमध्येच आहोत. परंतु बाबा
म्हणतात या सर्व थापा आहेत. निष्काळजीपणा आहे. यामध्ये तर पुरुषार्थ करायचा आहे
पहाटे उठून स्वतःला आत्मा समजून बसायचे आहे. रूहरीहान करायची आहे (आत्मिक गप्पा
मारायच्या आहेत). आत्माच बोलते ना. आता तुम्ही देही-अभिमानी बनता. जो एखाद्याचे
कल्याण करतो तर त्याची महिमा देखील केली जाते ना. ती असते देहाची महिमा. ही तर आहे
निराकार परमपिता परमात्म्याची महिमा. याला देखील तुम्हीच समजता. ही शिडी दुसऱ्या
कोणाच्या बुद्धीमध्ये थोडीच असेल. आपण ८४ जन्म कसे घेतो, खाली उतरत येतो. आता तर
पापाचा घडा भरला आहे, तो साफ कसा होणार? म्हणून बाबांना बोलावतात. तुम्ही आहात
पांडव संप्रदाय. धार्मिक देखील आणि राजकारणी देखील आहात. बाबा सर्व धर्मांची गोष्ट
समजावून सांगतात. दुसरा कोणीही समजावून सांगू शकत नाही. बाकी ते धर्म स्थापन करणारे
काय करतात, त्यांच्या मागोमाग तर इतरांना देखील खाली यावे लागते. बाकी ते काही
मोक्ष थोडाच देतात. बाबाच शेवटी येऊन सर्वांना पवित्र बनवून परत घेऊन जातात, म्हणून
त्या एका शिवाय अजून दुसऱ्या कोणाचीही महिमा नाही आहे. ब्रह्माची किंवा तुमची
कोणतीही महिमा नाही. बाबा आले नसते तर तुम्ही देखील काय केले असते. आता बाबा
तुम्हाला चढत्या कलेमध्ये घेऊन जातात. गातात देखील - ‘तेरे भाने सर्व का भला’. परंतु
अर्थ थोडाच समजतात. महिमा तर खूप करतात.
आता बाबांनी समजावून
सांगितले आहे - अकाल तर आत्मा आहे, त्याचे हे तख्त आहे. आत्मा अविनाशी आहे. कधीही
काळ खात नाही. आत्म्याला एक शरीर सोडून दुसरा पार्ट बजावायचा आहे. बाकी घेऊन
जाण्यासाठी थोडाच काळ येतो. तुम्हाला कोणाच्या शरीर सोडण्याचे दुःख होत नाही. शरीर
सोडून दुसरा पार्ट बजावण्यासाठी गेला, रडण्याची काय गरज आहे. आपण आत्मा भाऊ-भाऊ
आहोत. हे देखील तुम्ही आत्ता जाणता. गातात - ‘आत्मायें परमात्मा अलग रहे बहुकाल…’
बाबा कुठे येऊन भेटतात. हे देखील जाणत नाहीत. आता तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे
स्पष्टीकरण मिळते. केव्हापासून ऐकतच आले आहात. कोणते पुस्तक इत्यादी थोडेच घेतात.
फक्त समजावून सांगण्यासाठी संदर्भ देतात. बाबा सत्य आहेत तर सत्य रचना रचतात. सत्य
सांगतात. सत्यामुळे जय, असत्यामुळे पराजय. सत्य बाबा सत्य खंडाची स्थापना करतात.
रावणापुढे तुम्ही खूप हार खाल्ली आहे. हा सर्व खेळ बनलेला आहे. आता तुम्ही जाणता
आपले राज्य स्थापन होत आहे मग हे सर्व असणार नाहीत. हे तर सर्व मागाहून आलेले आहेत.
हे सृष्टीचक्र बुद्धीमध्ये ठेवणे किती सोपे आहे. जी पुरुषार्थी मुले आहेत ती
एवढ्याने खुश होणार नाहीत की, आम्ही ज्ञान तर खूप चांगले ऐकवतो. त्याचसोबत योग आणि
मॅनर्स देखील धारण करतील. तुम्हाला खूप-खूप गोड बनायचे आहे. कोणालाही दुःख द्यायचे
नाही. प्रेमाने समजावून सांगितले पाहिजे. पवित्रतेवरून देखील किती भांडणे होतात. ती
देखील ड्रामा अनुसार होतात. हा पूर्व नियोजित ड्रामा आहे ना. असे नाही की
ड्रामामध्ये असेल तर मिळेल. नाही, मेहनत करायची आहे. देवतांसारखे दैवी गुण धारण
करायचे आहेत. लुन पाणी (खारट पाणी) बनायचे नाही. बघितले पाहिजे आपण उलटे वर्तन करून
बाबांची इज्जत तर घालवत नाही ना? ‘सद्गुरु का निंदक ठौर न पाये’ (सद्गुरूची निंदा
करणारा उच्च पद प्राप्त करू शकत नाही. हे तर सत्य पिता आहेत, सत्य टीचर आहेत.
आत्म्याला आता आठवण राहते. बाबा ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर आहेत. जरूर ज्ञान देऊन
गेलो आहे तेव्हाच तर गायन होते. यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) आत्म्यामध्ये कोणते
ज्ञान होते का? आत्मा काय आहे, ड्रामा काय आहे - कोणीही जाणत नाहीत. जाणायचे तर
मनुष्यांनाच आहे ना. रुद्र यज्ञ रचतात तेव्हा आत्म्यांची पूजा करतात, त्यांची पूजा
चांगली का दैवी शरीरांची पूजा चांगली? हे शरीर तर पाच तत्वांचे आहे त्यामुळे एका
शिवबाबांची पूजाच अव्यभिचारी पूजा आहे. आता त्या एकाकडूनच ऐकायचे आहे; म्हणून म्हटले
जाते - ‘हियर नो इविल…’ कोणतीही निंदात्मक गोष्ट ऐकू नका. माझ्या एका कडूनच ऐका. हे
आहे अव्यभिचारी ज्ञान. मुख्य गोष्ट आहेच - जेव्हा देह-अभिमान नष्ट होईल तेव्हाच
तुम्ही शीतल बनाल. बाबांच्या आठवणीमध्ये रहाल तर मुखातून उलटे-सुलटे बोल बोलणार
नाहीत, कु-दृष्टी जाणार नाही. दिसत असताना जसे काही तुम्ही बघणार नाही. आमचा
ज्ञानाचा तिसरा नेत्र उघडलेला आहे. बाबांनी येऊन त्रिनेत्री, त्रिकालदर्शी बनवले आहे.
आता तुम्हाला तिन्ही काळांचे, तिन्ही लोकांचे ज्ञान आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) ज्ञान
ऐकविण्यासोबतच योगामध्ये देखील रहायचे आहे. चांगले मॅनर्स धारण करायचे आहेत. खूप
गोड बनायचे आहे. मुखावाटे कधीही कटू वचन काढायचे नाही.
२) अंतर्मुखी बनून
एकांतामध्ये बसून आपणच आपल्याशी रूहरीहान करायची आहे. पावन बनण्याच्या युक्त्या
शोधून काढायच्या आहेत. पहाटे उठून बाबांची अतिशय प्रेमाने आठवण करायची आहे.
वरदान:-
वायरलेस सेट
द्वारे विनाश काळामध्ये अंतिम डायरेक्शनला कॅच करणारे व्हाईसलेस भव विनाशाच्या वेळी
अंतिम डायरेक्शन्सना कॅच करण्यासाठी व्हाईसलेस-बुद्धी पाहिजे. जसे ते लोक वायरलेस
सेट द्वारे एकमेकांपर्यंत आवाज पोहोचवितात. इथे आहे व्हाईसलेस ची वायरलेस. या
वायरलेसद्वारे तुम्हाला आवाज येईल की या सुरक्षित स्थानावर पोहोचा. जी मुले
बाबांच्या आठवणीमध्ये राहणारी व्हाईसलेस आहेत, ज्यांना अशरिरी बनण्याचा अभ्यास आहे
ते विनाशामध्ये विनाश होणार नाहीत परंतु स्वेच्छेने शरीर सोडतील.
बोधवाक्य:-
योगाला बाजूला
करून कर्मामध्ये बिझी होणे - हाच निष्काळजीपणा आहे.
अव्यक्त इशारे -
रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:- प्युरीटीची रॉयल्टी अर्थात
एकव्रता बनणे (एक बाबा दुसरा न कोई) या ब्राह्मण जीवनामध्ये संपूर्ण पावन बनण्यासाठी
‘एकव्रता’ हा पाठ पक्का करा. वृत्तीमध्ये शुभ भावना, शुभकामना असावी, दृष्टीद्वारे
प्रत्येकाला आत्मिक रूपामध्ये किंवा फरिश्ता रूपामध्ये बघा. कर्माद्वारे प्रत्येक
आत्म्याला सुख द्या आणि सुख घ्या. कोणी दुःख दिले, शिवी दिली, अपमान केला तरीही
तुम्ही सहनशील देवी, सहनशील देवता बना.