02-06-24    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   18.01.20  ओम शान्ति   मधुबन


“ब्रह्मा बाबां प्रमाणे त्याग, तपस्या आणि सेवेचे व्हायब्रेशन विश्वामध्ये पसरवा”


आज समर्थ बापदादा आपल्या समर्थ मुलांना बघत आहेत. आजचा दिवस स्मृति दिवस सो समर्थ दिवस आहे. आजचा दिवस मुलांना सर्व शक्ति विलमध्ये देण्याचा दिवस आहे. दुनियेमध्ये अनेक प्रकारच्या ‘विल’ असतात परंतु ब्रह्मा बाबांनी, बाबांकडून प्राप्त झालेल्या सर्व शक्तींची विल मुलांना केली. अशी अलौकिक विल इतर कोणीही करू शकत नाही. बाबांनी ब्रह्मा बाबांना साकारमध्ये निमित्त बनवले आणि ब्रह्मा बाबांनी मुलांना ‘निमित्त भव’चे वरदान देऊन विल केले. हे विल मुलांमध्ये सहजच सर्व शक्तींची अनुभूति करवत रहाते. एक आहे आपल्या पुरुषार्थाची शक्ती आणि हि आहे परमात्म विलद्वारे शक्तींची प्राप्ति. हि प्रभू देन आहे, प्रभू वरदान आहे. हे प्रभू वरदान चालवत आहे, वरदानामध्ये पुरुषार्थाची मेहनत नाही परंतु सहज आणि आपोआप निमित्त बनवून चालवत राहते. समोर थोडेसे होते परंतु बापदादांद्वारे, विशेषत: ब्रह्मा बाबांद्वारे विशेष मुलांना या विल (शक्ती) प्राप्त झालेल्या आहेत आणि बापदादांनी देखील पाहिले कि ज्या मुलांना बाबांनी विल केले त्या सर्व मुलांनी (आदि रत्नांनी आणि सेवेच्या निमित्त मुलांनी) त्या प्राप्त झालेल्या विलला चांगल्या रीतीने कार्यामध्ये लावले. आणि त्या विलच्या कारणाने आज हा ब्राह्मण परिवार दिवसेंदिवस वाढतच जात आहे. मुलांच्या विशेषतेच्या कारणाने हि वृद्धी होणार होती आणि होत आहे.

बापदादांनी पाहिले कि निमित्त बनलेले आणि साथ देणारे अशा दोन्ही प्रकारच्या मुलांच्या दोन विशेषता खूप चांगल्या होत्या. पहिली विशेषता - भले स्थापनेची आदि रत्न असोत, अथवा सेवेची रत्न असोत दोघांमध्ये संगठनची युनिटी अतिशय चांगली होती. कोणामध्येही ‘का, काय, कसे…’ हा संकल्प नाममात्र सुद्धा राहिला नाही. दुसरी विशेषता - एकाने सांगितले दुसऱ्याने मानले. ही एक्स्ट्रा पॉवर्सची विलच्या वातावरणामध्ये विशेषता होती म्हणून सर्व निमित्त बनलेल्या आत्म्यांना एक बाबा आणि बाबाच दिसत राहिले.

बापदादा अशा वेळी निमित्त बनलेल्या मुलांना हृदयापासून प्रेम देत आहेत. बाबांची कमाल तर आहेच परंतु मुलांची कमाल देखील काही कमी नाहीये. आणि त्या वेळचे संघटन, युनिटी कि आपण सर्व एक आहोत, तीच आजही सेवेला वाढवत आहे. का? निमित्त बनलेल्या आत्म्यांचे फाउंडेशन पक्के होते. तर बापदादा देखील आजच्या दिवशी मुलांनी केलेल्या चमत्काराचे कौतुक करत होते. मुलांनी, बाबांना चोहोबाजूंनी प्रेमाच्या माळा घातल्या आणि बाबांनी मुलांच्या कमालचे (चमत्काराचे) गुणगान केले. एवढा वेळ चालायचे आहे, हा विचार केला होता का? किती वेळ झाला? सर्वांच्या मुखातून, मनातून हेच निघत होते, ‘आता निघायचे आहे, आता निघायचे आहे…’. परंतु बापदादा जाणत होते की, अजून अव्यक्त रूपाची सेवा व्हायची आहे. साकारमध्ये एवढा मोठा हॉल बनवला होता का? बाबांचे अति लाडके डबल विदेशी आले होते का? तर विशेष डबल विदेशींचा अव्यक्त पालने द्वारे अलौकिक जन्म होणारच होता, एवढ्या सर्व मुलांना यायचेच होते. म्हणून ब्रह्मा बाबांना आपले साकार शरीर सुद्धा सोडावे लागले. डबल विदेशींना नशा आहे का की आम्ही अव्यक्त पालनेसाठी पात्र आहोत?

ब्रह्मा बाबांचा त्याग ड्रामामध्ये विशेष नोंदलेला आहे. आदि पासून ब्रह्मा बाबांचा त्याग आणि तुम्हा मुलांचे भाग्य नोंदलेले आहे. सर्वात नंबर वन त्यागाचे उदाहरण ब्रह्मा बाबा बनले. त्याग त्याला म्हटले जाते - जे सर्व काही प्राप्त असून देखील त्याग करेल. वेळेनुसार, समस्येनुसार त्याग करणे हा काही श्रेष्ठ त्याग नाहीये. सुरुवातीपासूनच बघा शरीर, मन, धन, संबंध, सर्व प्राप्ति असूनही त्याग केला. शरीराचा सुद्धा त्याग केला, सर्व साधने असूनही स्वतः जुन्या ठिकाणीच राहिले. साधनांचा आरंभ झाला होता. ते असून देखील आपल्या साधनेमध्ये अटळ राहिले. हि ब्रह्मा बाबांची तपस्या तुम्हा सर्व मुलांचे भाग्य बनवून गेली. ड्रामा अनुसार अशा त्यागाच्या उदाहरणरूपामध्ये ब्रह्मा बाबाच बनले आणि याच त्यागाने संकल्प शक्तिच्या सेवेचा विशेष पार्ट बनवला. ज्यामुळे नविन-नविन मुले संकल्प शक्तीद्वारे फास्ट वृद्धीला प्राप्त करत आहेत. तर ऐकली ब्रह्मा बाबांच्या त्यागाची कहाणी.

ब्रह्मा बाबांच्या तपस्येचे फळ तुम्हा मुलांना मिळत आहे. तपस्येचा प्रभाव या मधुबन भूमीमध्ये भरून राहिलेला आहे. सोबत मुले सुद्धा आहेत, मुलांची देखील तपस्या आहे परंतु निमित्त तर ब्रह्माबाबांना म्हणणार. जे कोणी मधुबन तपस्वी भूमीमध्ये येतात तर ब्राह्मण मुले सुद्धा अनुभव करतात कि इथले वायुमंडळ, इथले व्हायब्रेशन सहजयोगी बनविते. योग लावण्यासाठी मेहनत करावी लागत नाही, सहजच लागतो आणि कसेही आत्मे येतात, ते काही ना काही अनुभव करून जातात. ज्ञानाला जरी समजत नसले परंतु अलौकिक प्रेम आणि शांतीचा अनुभव करूनच जातात. काही ना काही परिवर्तन करण्याचा संकल्प करूनच जातात. हा आहे ब्रह्माबाबा आणि ब्राह्मण मुलांच्या तपस्येचा प्रभाव. सोबत सेवेची विधी - भिन्न-भिन्न प्रकारची सेवा मुलांकडून प्रॅक्टिकल मध्ये करवून दाखवली. त्याच विधींना आता विस्तारामध्ये आणत आहात. तर जसे ब्रह्मा बाबांचा त्याग, तपस्या, सेवेचे फळ तुम्हा सर्व मुलांना मिळत आहे. तसे प्रत्येक मुलाने स्वतःच्या त्याग, तपस्या आणि सेवेची व्हायब्रेशन्स विश्वामध्ये पसरवावीत. जसे सायन्सचे बळ आपला प्रभाव प्रत्यक्ष रूपामध्ये दाखवत आहे तसे सायन्सची देखील रचता सायलेन्सचे बळ आहे. सायलेन्सच्या बळाला आता प्रत्यक्ष दाखविण्याची वेळ आहे. सायलेन्सच्या बळाचे व्हायब्रेशन तीव्र गतीने पसरविण्याचे साधन आहे - मन-बुद्धीची एकाग्रता. या एकाग्रतेचा अभ्यास वाढविला पाहिजे. एकाग्रतेच्या शक्तींद्वारेच वायुमंडळ बनवू शकता. हलचलीच्या कारणाने पॉवरफुल व्हायब्रेशन बनू शकत नाही.

बापदादा आज पाहत होते कि एकाग्रतेची शक्ति आता अजून जास्त हवी आहे. सर्व मुलांचा एकच दृढ संकल्प असावा कि, आता आपल्या भाऊ-बहिणींच्या दुःखद घटना परिवर्तन होऊ देत. हृदयापासून दया इमर्ज व्हावी. जर सायन्सची शक्ति हलचल माजवू शकते तर काय इतक्या सर्व ब्राह्मणांची सायलेन्सची शक्ति, दयेच्या भावनेद्वारे अथवा संकल्पाद्वारे हलचलला परिवर्तन करू शकत नाही! जेव्हा करायचेच आहे, व्हायचेच आहे तर या गोष्टीवर विशेष अटेन्शन द्या. जेव्हा तुम्ही ग्रेट-ग्रेट ग्रँड फादरची मुले आहात, तुमचेच सर्व भाऊबंद आहेत, शाखा आहे, परिवार आहे, तुम्हीच भक्तांचे इष्ट देव आहात. हा नशा आहे का कि आम्हीच इष्ट देव आहोत? तर भक्त ओरडत आहेत आणि तुम्ही ऐकत आहात! ते बोलावत आहेत - ‘हे इष्ट देव’, आणि तुम्ही फक्त ऐकत आहात, त्यांना रेस्पॉन्ड (प्रतिसाद) देत नाही आहात? तर बापदादा सांगत आहेत - हे भक्तांचे इष्ट देव, आता हाक ऐका, प्रतिसाद द्या, फक्त ऐकू नका. काय प्रतिसाद द्याल? परिवर्तनाचे वायुमंडळ बनवा. तुमचा प्रतिसाद त्यांना मिळाला नाही कि मग ते सुद्धा निष्काळजी होतात. ओरडतात नंतर चुप्प होऊन जातात.

ब्रह्मा बाबांच्या प्रत्येक कार्यातील उत्साहाला तर पाहिले आहे. जसा सुरुवातीला उमंग होता, चावी पाहिजे. आता देखील ब्रह्माबाबा हेच शिवबाबांना सांगत आहेत - आता घराच्या दरवाज्याची चावी द्या. परंतु सोबत जाणारे तरी तयार पाहिजेत. एकटा काय करणार! तर आता सोबत जायचे आहे ना कि पाठीमागून जायचे आहे? सोबत जायचे आहे ना? तर ब्रह्माबाबा म्हणत आहेत कि, मुलांना विचारा जर बाबांनी चावी दिली तर तुम्ही एव्हररेडी आहात? एव्हररेडी आहात कि रेडी आहात? रेडी नको, एव्हररेडी. त्याग, तपस्या आणि सेवा तिनही पेपरची तयारी झाली आहे? ब्रह्माबाबा हसत आहेत कि प्रेमाचे अश्रू खूप ढाळतात आणि ब्रह्मा बाबा ते अश्रू मोत्या प्रमाणे हृदयामध्ये सामावून सुद्धा घेतात परंतु एक संकल्प जरूर चालतो की सर्व एव्हररेडी केव्हा बनणार! तारीख द्या. तुम्ही म्हणाल की मी (ब्रह्मा बाबा) तर एव्हररेडी आहे, परंतु तुमचे जे सोबती आहेत त्यांना तरी तयार करा कि त्यांना सोडून तुम्ही निघणार आहात का? तुम्ही म्हणाल, ब्रह्माबाबा सुद्धा तर निघून गेले ना! परंतु त्यांना तर ही रचना रचायची होती. फास्ट वृद्धीची जबाबदारी होती. तर सर्व एव्हररेडी आहात, एक नाही? सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे ना कि एकटेच जाणार? तर सर्व एव्हररेडी आहात कि होणार आहात? बोला. कमीतकमी ९ लाख तरी सोबत जाऊ देत. नाही तर राज्य कोणावर करणार? स्वतःवरच राज्य करणार का? तर ब्रह्मा बाबांची हीच सर्व मुलांप्रति शुभ कामना आहे कि एव्हररेडी बना आणि एव्हररेडी बनवा.

आज वतनमध्ये सुद्धा सर्व विशेष आदि रत्न आणि सेवेचे आदि रत्न इमर्ज झाले. ॲडव्हान्स पार्टी म्हणते - ‘आम्ही तर तयार आहोत.’ कोणत्या गोष्टीसाठी तयार आहेत? ते म्हणतात - ‘हा प्रत्यक्षतेचा नगारा वाजवला तर आम्ही सर्व प्रत्यक्ष होऊन नविन सृष्टीच्या रचनेचे निमित्त बनू.’ आम्ही तर आवाहन करत आहोत कि, नविन सृष्टीची रचना करणारे येऊ देत. आता सर्व काम तुमच्यावर अवलंबून आहे. नगारा वाजवा. ‘आले, आले…’ चा नगारा वाजवा. नगारा वाजवता येतो? वाजवायचा तर आहे ना! आता ब्रह्माबाबा सांगत आहेत डेट घेऊन या. तुम्ही लोक सुद्धा म्हणता ना कि डेट शिवाय काम होत नाही. तर, याची देखील डेट ठरवा. डेट ठरवू शकता का? बाबा तर म्हणतात तुम्ही ठरवा. बाबा म्हणतात आजच ठरवा. कॉन्फरन्सची डेट फिक्स केली आहे आणि ही, याची सुद्धा कॉन्फरन्स करा ना! विदेशी काय समजता, डेट फिक्स होऊ शकते? डेट फिक्स करणार? हो का नाही! अच्छा, दादी जानकी सोबत सल्ला-मसलत करून ठरवा. अच्छा.

देश विदेशाच्या चोहो बाजूंचे, बापदादांचे अति समीप, अति प्रिय आणि न्यारे, बापदादा बघत आहेत कि सर्व मुले उत्कटतेने मग्न होऊन लवलीन स्वरूपामध्ये बसले आहेत. ऐकत आहेत आणि मिलनाच्या झुल्यामध्ये झुलत आहेत. दूर नाही आहेत, नजरे समोर देखील नाहीत, परंतु सामावलेले आहेत. तर असे सन्मुख मिलन साजरे करणारे आणि अव्यक्त रूपामध्ये लवलीन मुले, सदैव बाप समान त्याग, तपस्या आणि सेवेचे प्रमाण दाखविणारी सपूत मुले, सदैव एकाग्रतेच्या शक्तिद्वारे विश्वाचे परिवर्तन करणारी विश्व परिवर्तक मुले, सदैव बाप समान तीव्र पुरुषार्थाद्वारे उडणाऱ्या डबल लाईट मुलांना बापदादांची खूप-खूप-खूप प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

राजस्थानचे सेवाधारी:- खूप चांगला सेवेचा चान्स राजस्थानला मिळाला. राजस्थानचे जसे नाव आहे राजस्थान, तर राजस्थानामधून राजे क्वालिटीवाले काढा. प्रजा नाही, राज-घराण्याचे राजे काढा. तेव्हा जसे नाव आहे राजस्थान, तसेच जसे नाव तशी सेवेची क्वालिटी निघेल. आहेत कोणी लपलेले राजे लोक का अजून ढगांच्या आड आहेत? तसे तर जे बिझनेसमन आहेत त्यांच्या सेवेवर विशेष अटेंशन द्या. हे मिनिस्टर आणि सेक्रेटरी तर बदलतच राहतात परंतु बिझनेसमन बाबांसोबत देखील बिझनेस करण्यामध्ये पुढे जाऊ शकतात. आणि बिझनेसमनची सेवा केल्यामुळे त्यांच्या परिवारातील माता देखील सहजच येऊ शकतात. एकट्या माता चालू शकत नाहीत परंतु जर घराचा आधारस्तंभ आला तर परिवार आपोआपच हळू-हळू वाढत जातो म्हणून राजस्थानची राजे क्वालिटी काढायची आहे. ‘असे कोणी नाही आहेत’, असे म्हणू नका. थोडे शोधावे लागेल परंतु आहेत. थोडासा त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागतो. बीझी असतात ना! कोणतीतरी अशी विधी बनवावी लागेल जेणेकरून ते जवळ येतील. बाकी चांगले आहे, सेवेचा चान्स घेतला, प्रत्येक झोन घेतो, हे खूप चांगले जवळ येण्याचे आणि आशीर्वाद घेण्याचे साधन आहे. तुम्हा सर्व लोकांना सर्वजण बघू देत अथवा नाही बघू देत, जाणोत अथवा नाही जाणोत, परंतु जितकी चांगली सेवा होते तर आशीर्वाद आपणहूनच निघतात आणि हे आशीर्वाद खूप लवकर पोहोचतात. हृदयापासूनचे आशीर्वाद आहेत ना! त्यामुळे हृदयापर्यंत लवकर पोहोचतात. बापदादा तर म्हणतात - सर्वात सोपा पुरुषार्थ आहे आशीर्वाद देणे आणि आशीर्वाद घेणे. आशीर्वादांनी जेव्हा खाते भरेल तेव्हा भरपूर झालेल्या खात्यामध्ये माया सुद्धा डिस्टर्ब करणार नाही. जमेचे बळ मिळते. राजी रहा आणि सर्वांना राजी करा (संतुष्ट रहा आणि सर्वांना संतुष्ट करा). प्रत्येकाच्या स्वभावाच्या रहस्याला जाणून राजी करा. असे म्हणू नका हे तर आहेतच नाराज. तुम्ही स्वतः रहस्याला जाणा, त्याच्या नाडीला जाणा आणि मग आशीर्वादांचे औषध द्या. तर सोपे होईल. ठीक आहे ना राजस्थान! राजस्थानच्या टीचर्स उठा. सेवेची मुबारक असो. तर सहज पुरुषार्थ करा, आशीर्वाद देत जा. घेण्याचा संकल्प करू नका, देत जाल तर मिळत जाईल. देणे म्हणजेच घेणे आहे. ठीक आहे ना! असे आहे ना! दात्याची मुले आहात ना! कोणी दिले तर दिले. असे नाही, दाता बनून देत जा तर आपोआप मिळेल. अच्छा.

जे या कल्पामध्ये पहिल्यांदा आले आहेत त्यांनी हात वर करा. अर्धे जुने येतात, अर्धे नविन येतात. अच्छा - मागे बसलेले, कडेला बसलेले सर्व सहजयोगी आहात? सहज-योगी असाल तर एक हात वर करा. अच्छा.

निरोप देतेवेळी:- (बापदादांना रथ-यात्रेचा समाचार ऐकवला) चोहो बाजूंचा यात्रेचा समाचार वेळोवेळी बापदादांकडे येत असतो. अच्छा सर्वजण उमंग-उत्साहाने सेवेचा पार्ट बजावत आहेत. भक्तांना आशीर्वाद मिळत आहेत आणि ज्या भक्तांची भक्ती पूर्ण झाली, त्यांना बाबांचा परिचय मिळणारच आणि परिचितांमुळे जी मुले बनणार आहेत ते सुद्धा दिसून येत राहतील. बाकी सेवा चांगली चाललेली आहे आणि जे काही साधन बनविले आहे ते साधन चांगले सर्वांना आकर्षित करत आहे. आता रिझल्टमध्ये कोण-कोण कोणत्या कॅटेगिरीमध्ये निघेल ते माहिती होईल परंतु भक्तांना देखील तुम्हा सर्वांची नजर-दृष्टी मिळाली, परिचय मिळाला - हे देखील एक चांगले साधन आहे. आता पुढे जाऊन यांची सेवा करून पुढे नेत रहा. जे कोणी रथ यात्रेमध्ये सेवा करत आहेत, अथक बनून सेवा करत आहेत, त्या सर्वांना प्रेमपूर्वक आठवण. बापदादा सर्वांना बघत राहतात आणि सफलता तर जन्मसिद्ध अधिकार आहे. अच्छा.

मॉरिशसमध्ये आपल्या ईश्वरीय विश्व विद्यालयाला ‘नॅशनल युनिटी’ ॲवार्ड प्राईम मिनिस्टरद्वारे मिळाले आहे:- मॉरिशसमध्ये तसेही व्ही. आय. पी. चे कनेक्शन चांगले राहिलेले आहे आणि प्रभाव सुद्धा चांगला आहे म्हणून गुप्त सेवेचे फळ मिळाले आहे तर सर्वांना खास मुबारक. अच्छा, ओम् शांती.

वरदान:-
श्वासोश्वास आठवण आणि सेवेच्या बॅलन्सद्वारे ब्लेसिंग प्राप्त करणारे सदैव प्रसन्नचित्त भव

जसे अटेंशन ठेवता कि आठवणीची लिंक सदैव जोडलेली रहावी तसे सेवेमध्ये सुद्धा सदैव लिंक जोडलेली रहावी. श्वासोश्वास आठवण आणि श्वासोश्वास सेवा असावी - याला म्हणतात बॅलन्स, या बॅलन्समुळे सदैव ब्लेसिंगचा अनुभव करत रहाल आणि हाच आवाज हृदयातून निघेल कि, आशीर्वादांद्वारे पालना होत आहे. मेहनती पासून, युद्धापासून सुटाल. ‘काय, का, कसे’ या प्रश्नांपासून मुक्त होऊन सदैव प्रसन्नचित्त रहाल. आणि मग सफलता जन्मसिद्ध अधिकाराच्या रूपामध्ये अनुभव होईल.

सुविचार:-
बाबांकडून इनाम घ्यायचे असेल तर स्वतःकडून आणि सेवा-साथीदारांकडून निर्विघ्न असल्याचे सर्टिफिकेट सोबत असावे.