02-06-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो - तुम्ही
आहात रूहानी पंडे, तुम्हाला गृहस्थ व्यवहार सांभाळत असताना, कमलपुष्प समान बनून
आठवणीची यात्रा करायची आहे आणि करवून घ्यायची आहे”
प्रश्न:-
बाबा , मुलांचा
कोणता शृंगार करतात? कोणत्या शृंगारासाठी मनाई करतात?
उत्तर:-
बाबा म्हणतात
- ‘गोड मुलांनो, मी तुमचा रूहानी शृंगार करायला आलो आहे, तुम्ही कधीही या शरीराचा
शृंगार करू नका. तुम्ही गरीब आहात, तुम्हाला फॅशनची आवड असता कामा नये. दुनिया खूप
वाईट आहे त्यामुळे जरा सुद्धा शारीरिक फॅशन करू नका’.
गीत:-
आखिर वह दिन
आया आज...
ओम शांती।
बेहदचे बाबा
बसून बेहदच्या मुलांना समजावून सांगत आहेत. बेहद अर्थात ज्याला कोणतीही हद नाही.
किती असंख्य मुले आहेत. एवढ्या असंख्य मुलांचे एकच पिता आहेत ज्यांना रचयिता म्हटले
जाते. ते (या दुनियेतील) आहेत हदचे पिता, हे आहेत बेहदच्या आत्म्यांचे पिता. ते
आहेत हदचे देहधारी पिता, हे आहेत बेहदच्या आत्म्यांचे एकच पिता. ज्यांची
भक्तिमार्गामध्ये सर्व आत्मे आठवण करतात. तुम्ही मुले जाणता की, भक्तीमार्ग देखील
आहे आणि सोबतच रावण राज्य सुद्धा आहे. आता मनुष्य बोलावतात की आम्हाला
रावण-राज्यामधून राम-राज्यामध्ये घेऊन चला. बाबा समजावून सांगत आहेत - पहा
देवी-देवता जे भारताचे मालक होते, ते आता नाहीयेत. ते कोण होते, हे देखील आता तुम्ही
मुलेच जाणता. आपणच सतयुगी सूर्यवंशी घराण्याचे मालक होतो. राजा-राणी तर असतात ना.
तुम्हा मुलांना आता स्मृती आली आहे. बाबा आलेले आहेत - आम्हा मुलांना राज्य-भाग्याचा
वारसा देण्यासाठी, विश्वाचा मालक बनविण्यासाठी. बाबा म्हणतात आता सर्वजण
भक्तिमार्गामध्ये आहेत, भक्तिमार्गालाच रावण राज्य म्हटले जाते. ज्ञानमार्ग फक्त एक
बाबाच तुम्हा मुलांना शिकवतात. त्या बेहदच्या पित्याची भक्तिमार्गामध्ये सर्वजण
आठवण करतात. आता तुम्हाला २१ जन्मांसाठी ज्ञानाची राजधानी मिळत आहे. मग अर्धा-कल्प
तुम्ही मला बोलावणारच नाही. ‘हाय राम’, ‘हाय प्रभू’, म्हणण्याची गरजच उरणार नाही.
‘हाय राम’ असे तेव्हा बोलतात जेव्हा दुःखी असतात. तुम्हाला तर तिथे दुःखच नसते. आता
तुम्ही जाणता हा देखील खेळ बनलेला आहे. अर्धा-कल्प आहे ज्ञानाचा दिवस, अर्धा-कल्प
आहे भक्तीची रात्र. भक्ती आपल्याला खाली आणते. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये शिडीचे
नॉलेज जरूर असायला हवे. बाबा समजावून सांगत आहेत की, हे ८४ जन्मांचे चक्र आहे, या
चक्राला जाणून घेतल्याने तुम्ही चक्रवर्ती राजा बनाल, म्हणून बाबा चित्रे देखील
बनवून घेत आहेत ज्यावरून सिद्ध होईल की आपण या चक्राला जाणल्याने २१ जन्मांसाठी
राज्य-भाग्य प्राप्त करतो.
आता तुम्ही बरेच झाला
आहात. खूप मोठी रूहानी शक्ती सेना बनली आहे. तुम्ही सर्व पंडे आहात. बाबा देखील पंडा
आहेत. त्यांना म्हटले जाते - गाईड (मार्गदर्शक). पंडा शब्द शुभ आहे. यात्रेला घेऊन
जाणारे पंडे असतात. यात्री जातात तेव्हा त्यांना एक गाईड दिला जातो की यांना हे
सर्व दाखवा. तीर्थयात्रेसाठी देखील पंडे मिळतात. बाबा म्हणतात - जन्मजन्मांतर
तीर्थयात्रा करत आला आहात. अमरनाथला जातात, तीर्थक्षेत्रांवर जातात. परिक्रमा करतात.
तिथे जातेवेळी मग त्याचीच आठवण राहते. घरदार, काम-धंदा या सर्वांमधून मन दूर निघून
जाते. इथे तुम्हाला सांगितले जाते की आपल्या घर-गृहस्थीमध्ये राहून काम-धंदा देखील
करत राहा आणि या गुप्त यात्रेवर राहा. हे किती सुंदर आहे. जेवढा मोठा धंदा करायचा
आहे तेवढा करा. कोणाला मनाई देखील केलेली नाहीये. भले आपली राजाई सुद्धा सांभाळा.
राजा जनकाला देखील सेकंदामध्ये जीवनमुक्ती मिळाली. तुम्हाला बाहेरील कोणत्या यात्रा
इत्यादी ठिकाणी जाण्याची, दगदग करण्याची गरज नाही. आपल्या घरदाराची देखील पूर्ण
काळजी घेतली पाहिजे. जी हुशार चांगली मुले आहेत, ती समजतात आपल्याला घर-गृहस्थीमध्ये
राहत असताना कमलपुष्प समान राहायचे आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये वैतागून जाता कामा नये.
कुमार, कुमारी तर जणू संन्यासीच आहेत, त्यांच्यात विकार नाहीत. ५ विकारांपासून दूर
आहेत. आता तुम्ही मुले जाणता की आपला शृंगारच वेगळ्या प्रकारचा आहे, त्यांचा (दुनियावाल्यांचा)
वेगळा आहे. त्यांचा तमोप्रधान शृंगार आहे, तुमचा आहे सतोप्रधान शृंगार, ज्याद्वारे
तुम्हाला सतोप्रधान सूर्यवंशी राजाईमध्ये जायचे आहे. बाबा तुम्हा मुलांना समजावून
सांगत आहेत - तमोप्रधान दैहिक शृंगार अजिबात करायचा नाही. दुनिया खूप वाईट आहे.
गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना फॅशनेबल बनू नका. फॅशन आकर्षित करते. या काळात
सौंदर्य ही काही चांगली गोष्ट राहिलेली नाही. काळे असाल तर चांगलेच आहे. कोणी पंजा
मारणार नाही (त्रास देणार नाही). सुंदर असणाऱ्यांच्या मागेच तर फिरत असतात.
श्रीकृष्णाला सुद्धा सावळा दाखवतात. तुम्हाला गोरे बनायचे आहे शिवबाबांकडून. ते गोरे
बनतात पावडर इत्यादी लावून. किती फॅशन झाली आहे, काही विचारूच नका. श्रीमंतांचा तर
सत्यानाश अटळ आहे. गरीब चांगले आहेत. गावागावांत जाऊन गरिबांचे कल्याण करायचे आहे,
परंतु आवाज करणारे (पुढाकार घेणारे) अधिकारी व्यक्ती देखील पाहिजेत. तुम्ही सर्व
गरीब आहात ना. इथे कोणी श्रीमंत आहे का? तुम्ही पाहा कसे सामान्य रीतीने बसला आहात.
मुंबईमध्ये फॅशन बघाल तर काय-काय चालले आहे. बाबांकडे भेटायला येतात तर त्यांना
सांगतो - ‘तू हा देहाचा शृंगार केला आहेस, आता येशील तेव्हा तुला ज्ञान शृंगार करेन,
ज्याने तू २१ जन्मांसाठी स्वर्गातील परी बनशील’. कायमचे सुखी बनाल. ना कधी रडावे
लागणार, ना दुःख होणार. आता तुम्ही हा दैहिक शृंगार करणे सोडून द्या. तुमचा आम्ही
ज्ञान रत्नांनी असा फर्स्ट क्लास शृंगार करू की विचारूच नका. जर माझ्या मतावर (श्रीमतावर)
चाललात तर तुम्हाला पट्टराणी बनवेन. हे तर चांगले आहे ना. तुम्हा सर्व भारतवासीयांना
या तमोप्रधान आसुरी दुनियेतील नरकातून सोडवून स्वर्गाची महाराणी बनवतो.
तुम्ही मुले समजता की
आज आपण सफेद वेशात आहोत, दुसऱ्या जन्मामध्ये स्वर्गात सोन्याच्या चमच्याने दूध पिऊ.
ही तर खूप छी-छी (घाणेरडी) दुनिया आहे. स्वर्ग तर स्वर्गच आहे, विचारूच नका. इथे
तुम्ही गरीब आहात. भारत गरीब आहे. बेगर टू प्रिन्स गायले गेले आहे. या भारतामध्येच
पुन्हा जन्म घ्याल. बाबांनी आम्हाला स्वर्गाचा मालक बनवले होते, रात्रं-दिवसाचा फरक
आहे. अतिशय गरीब ज्यांना खाण्यासाठीही काही नसते, त्यांनाच दान दिले जाते. भारतच
अतिशय गरीब आहे. बिचाऱ्यांना हे माहीतही नाही की यावेळी सर्वजण तमोप्रधान आहेत.
दिवसेंदिवस शिडी खालीच उतरत जातात. आता कोणीही शिडी चढू शकत नाही. १६ कलांपासून १४
कला, मग १२ कला... खालीच उतरत येतात. हे लक्ष्मी-नारायण देखील पहिले १६ कला संपूर्ण
होते, नंतर मग १४ कलांमध्ये उतरतात ना. हे देखील व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. शिडी
उतरता-उतरता अगदीच पतित बनले आहेत. मग स्वर्गाचा मालक कोण बनवणार? ही वर्ल्डची
हिस्ट्री-जिओग्राफी रिपीट होते. हे देखील सर्वजण म्हणतात परंतु आता कोणती हिस्ट्री
रिपीट होणार, हे कोणीही जाणत नाही. शास्त्रांमध्ये तर लिहून ठेवले आहे की, सतयुगाचे
आयुष्य लाखो-करोडो वर्षे आहे. विचारा सतयुग कधी येणार? तर म्हणतील अजून ४० हजार
वर्षे बाकी आहेत. तुम्ही सिद्ध करून सांगता की, कल्पाचे आयुष्यच मुळी ५ हजार वर्षे
आहे. ते (दुनियावाले) तर मग फक्त सतयुगालाच लाखो वर्षे देऊन टाकतात. घोर अंधार आहे
ना. तर मनुष्य कसे मानणार की भगवान आले असतील. ते समजतात की भगवान तेव्हा येतील
जेव्हा कलियुगाचा अंत होईल. आता तुम्ही मुले या सर्व गोष्टी समजता. विनाश समोर उभा
आहे. मुलांना समजावून सांगितले जाते की, विनाशापूर्वी बाबांकडून वारसा घ्या, परंतु
कुंभकर्णासारखे झोपी गेले आहेत. तर बिचारे हाय-हाय करत मरतील. तुमचा जयजयकार होईल.
विनाशामध्ये हाय-हायच होते. विपरीत-बुद्धी असणारे हाय-हायच करतील. आता तुम्ही आहात
सत्य बाबांची सत्य संतान. नरकाचा विनाश झाल्याशिवाय स्वर्ग कसा बनणार. तुम्ही
म्हणाल ही तर महाभारत लढाई आहे. त्याद्वारेच स्वर्गाचे दरवाजे उघडणार आहेत. मनुष्य
तर काहीच जाणत नाहीत. तुमच्या बुद्धीमध्ये आहे - आपल्याला आता दैवी स्वराज्याचे लोणी
मिळत आहे. ते आपापसात भांडत राहतील. आहेत ते देखील मनुष्य, तुम्ही देखील मनुष्य
परंतु ते आहेत आसुरी संप्रदायाचे, तुम्ही आहात दैवी संप्रदायाचे. बाबा मुलांना
सन्मुख समजावून सांगतात. तुम्हा मुलांना मनातून आनंद होत असतो. अनेक वेळा तुम्ही अशी
राजधानी मिळवली आहे, जशी आता तुम्ही मिळवत आहात. ते दोन बोके (अमेरिका-रशिया)
आपापसात भांडतात. लोणी तुम्हाला मिळते - साऱ्या विश्वाच्या बादशाहीचे. तुम्ही इथे
येताच विश्वाचे मालक बनण्यासाठी. तुम्ही जाणता - आपण बाबांसोबत योग लावून कर्मातीत
अवस्था प्राप्त करू. ते आपापसात लढतील, आम्ही विश्वाची बादशाही मिळवूनच राहू. ही तर
कॉमन गोष्ट आहे. ते बाहुबळावाले विश्वाची बादशाही घेऊ शकणार नाहीत. तुम्ही योगबलाने
विश्वाचे मालक बनता. तुमचा आहेच अहिंसा परमो दैवी धर्म. दोन्ही प्रकारच्या हिंसा
तिथे असत नाहीत. काम-कटारीची हिंसा सर्वात वाईट आहे जी तुम्हाला आदि-मध्य-अंत दुःख
देते. हे कोणालाच माहीत नाहीये की, रावण राज्य कधी असते. आता बोलवतात - ‘येऊन
आम्हाला पावन बनवा’, तर जरूर कधीकाळी पावन होते ना. भारतवासी मुलेच बोलावतात -
दुःखातून लिबरेट करा (मुक्त करा), शांतीधाम मध्ये घेऊन चला. दुःख हरण करून सुख द्या.
श्रीकृष्णाला ‘हरी’ देखील म्हणतात. बाबा, आम्हाला हरीच्या दारी घेऊन चला. हरीचे
द्वार आहे - कृष्णपुरी. ही आहे - कंसपुरी. ही कंसपुरी आम्हाला पसंत नाहीये. माया
मच्छिंद्राचा खेळ दाखवतात. हे तर तुम्ही जाणता की रावणाचे राज्य द्वापर पासून सुरू
होते. देवता जे पावन होते ते पतित होण्यास सुरुवात होते, याच्या खुणा देखील
जगन्नाथपुरी मध्ये आहेत. दुनियेमध्ये खूप घाण पसरलेली आहे. आता आपण तर त्या सर्व
गोष्टींमधून निघून परिस्तानमध्ये जात आहोत. यासाठी जबरदस्त हिंमत आणि शौर्याची गरज
आहे. बाबांचे बनून पतित थोडेच बनायचे आहे. ते समजतात पती-पत्नी एकत्र राहतील आणि आग
लागणार नाही, हे होऊच शकत नाही म्हणूनच गोंधळ घालतात की इथे पती-पत्नीला भाऊ-बहिण
बनवले जाते. असे तर कुठे लिहिलेले नाहीये. माहीत नाही इथे कोणती जादू आहे. अरे
तुम्ही ब्रह्माकुमारींकडे जाल आणि बस तुम्हाला तिथे बांधूनच ठेवतील. अशा प्रकारे
तिथे भडकवत राहतात. ही देखील ड्रामामध्ये नोंद आहे. ज्यांचा पार्ट असेल ते कसेही
करून येतील, यामध्ये घाबरण्याचे कारण नाही. शिवबाबा तर ज्ञानाचे सागर, पतित-पावन
सर्वांचे सद्गती दाता आहेत. ब्रह्मा द्वारा पतितापासून पावन बनवतात. हे शब्द असे
मोठ्या अक्षरात लिहिलेले असावेत जेणेकरून कोणीही येऊन वाचू शकेल. पवित्रतेवरुनच
कितीतरी विघ्ने आणतात.
बाबा म्हणतात -
मुलांनो, कोणत्याही देहधारीमध्ये मोहाची आसक्ती असता कामा नये. जर कुठे मोहापोटी
आसक्ती असेल तर अडकून पडाल. इथे तर ‘अम्मा मरे तो भी हलूआ खाना…’. बाबा समोर बसवून
विचारतात - उद्या तुमचे कोणी मरून गेले तर रडणार तर नाही ना? डोळ्यात अश्रू आले तर
नापास झालात. एक शरीर सोडून दुसरे घेतले, यात रडण्यासारखे काय आहे? दुसरे कोणी ऐकले
तर म्हणेल - काहीतरी चांगले शुभ तर बोला. अरे, चांगलेच बोलतोय. सतयुगामध्ये रडणे
असतच नाही, हे तुमचे जीवन त्यांच्या पेक्षाही उच्च आहे. तुम्ही आहात सर्वांना
रडण्यापासून वाचविणारे, मग तुम्ही कसे रडणार? आम्हाला पतींचाही पती (परमेश्वर)
मिळाले आहेत जे आम्हाला स्वर्गात घेऊन जातात. मग नरकात पाडणाऱ्यासाठी आम्ही का रडावे!
बाबा किती गोड-गोड गोष्टी ऐकवतात, वारसा घेण्यासाठी. या वेळी भारताचे किती अकल्याण
झाले आहे. बाबा येऊन कल्याण करतात. भारताला मगध देश म्हणतात. सिंध प्रांतासारखे
फॅशनेबल इतर कोणीच नसतात. परदेशातून फॅशन शिकून येतात. आजकाल हेअर स्टाईलवर मुली
किती खर्च करतात. त्यांना म्हटले जाते ‘नरकाच्या पऱ्या’. बाबा तुम्हाला स्वर्गाच्या
पऱ्या बनवतात. म्हणतात आमच्यासाठी तर इथेच स्वर्ग आहे, हे सुख तर घेऊ दे. उद्या काय
होईल, आम्हाला काय माहीत. असे अनेक विचार करणारे लोक येतात. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) सच्चा-सच्चा
रूहानी पंडा बनून सर्वांना घराचा (मुक्तीधामाचा) मार्ग दाखवायचा आहे. शरीर निर्वाह
अर्थ धंदा करत असताना आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे. कार्य-व्यवहारामध्ये
कंटाळायचे नाही.
२) ज्ञान शृंगार करून
स्वतःला स्वर्गाची परी बनवायचे आहे. या तमोप्रधान दुनियेमध्ये दैहिक शृंगार करायचा
नाही. कलियुगी फॅशन सोडून द्यायची आहे.
वरदान:-
बालक’ आणि
‘मालक’पणाच्या बॅलन्सद्वारे युक्तीयुक्त चालणारे सफलतामूर्त भव
जितके शक्य होईल तितके
सेवेच्या संबंधात बालकपण, आपल्या पुरुषार्थाच्या स्थितीमध्ये मालकपण, संपर्क आणि
सेवेत बालकपण, आठवणीची यात्रा आणि मंथन करण्यामध्ये मालकपण, साथीदार आणि संघटनमध्ये
बालकपण आणि वैयक्तिकमध्ये मालकपण - असे बॅलन्सने चालणे म्हणजेच युक्तियुक्त चालणे
होय. याने प्रत्येक कार्यात सहजच यश प्राप्त होते, स्थिती एकरस राहते आणि सहजच
सर्वांचे स्नेही बनतात.
बोधवाक्य:-
विचार करणे आणि
कर्म करणे एकसमान असावे तेव्हाच म्हटले जाईल - विल पॉवर असणारी (इच्छाशक्ती असणारी)
शक्तिशाली आत्मा.
हे अव्यक्त इशारे -
सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.
हर्षित राहण्याचा गुण
पुरुषार्थामध्ये खूप मदतगार बनू शकतो, परंतु जसा चेहरा हर्षित राहतो तशी आत्मा
देखील सदैव हर्षित राहावी, हा नॅचरल गुण आत्म्यामध्ये आणायचा आहे. सदैव हर्षित
राहाल तर मायेचे कोणतेही आकर्षण आकर्षित करणार नाही, ही बाबांची गॅरंटी आहे. परंतु
सदैव हर्षित राहण्यासाठी आपल्या रूहानी शानमध्ये (आत्मिक रुबाबा मध्ये) रहा आणि
सहनशील बनून साक्षीदृष्टा बनून मायेच्या खेळाला बघा.