02-07-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही इथे आठवणीमध्ये राहून पापे दग्ध करण्याकरिता आलेले आहात, त्यामुळे बुद्धियोग निष्फळ जाणार नाही, या गोष्टीवर पूर्ण लक्ष ठेवायचे आहे”

प्रश्न:-
असा कोणता सूक्ष्म विकार आहे जो अंतिम समयाला देखील संकटात टाकेल?

उत्तर:-
जर सूक्ष्ममध्ये जरी ‘लालच’ हा विकार असेल, कोणतीही गोष्ट लालचेपोटी गोळा करून आपल्याकडे साठवून ठेवली तर तीच अंतिम समयी संकटाच्या रूपामध्ये आठवत राहील म्हणून बाबा म्हणतात - मुलांनो आपल्याजवळ काहीही ठेऊ नका. तुम्हाला तर सर्व संकल्पांना देखील समेटून बाबांच्या आठवणीमध्ये राहण्याची सवय लावायची आहे यासाठी देही-अभिमानी बनण्याचा अभ्यास करा.

ओम शांती।
मुलांना दररोज आठवण करून दिली जाते - देही-अभिमानी बना, कारण बुद्धी इकडे-तिकडे भटकते. अज्ञान काळामध्ये देखील कथा वार्ता ऐकत असताना सुद्धा बुद्धी बाहेर भटकत राहते. इथे देखील भटकते म्हणून बाबा रोज-रोज सांगतात देही-अभिमानी बना. ते (दुनियावाले) तर म्हणतील कि, ‘आम्ही जे सांगतो त्याकडे लक्ष द्या, धारण करा. शास्त्र जे ऐकवतात ते वचन लक्षात ठेवा’. इथे तर बाबा आत्म्यांना समजावून सांगत आहेत, तुम्ही सर्व विद्यार्थी देही-अभिमानी होऊन बसा. शिवबाबा येतात शिकवण्यासाठी. असे कोणतेही कॉलेज नसेल जिथे असे समजतील कि शिवबाबा शिकवण्यासाठी येतात. अशी शाळा असली पाहिजे पुरुषोत्तम संगमयुगावरच. विद्यार्थी बसले आहेत आणि हे देखील समजतात कि परमपिता परमात्मा येतात आम्हाला शिकवण्यासाठी. शिवबाबा येतात आम्हाला शिकवण्यासाठी. सर्वात पहिली गोष्ट सांगतात की, ‘तुम्हाला पावन बनायचे आहे तर मामेकम् (मज एकाची) माझी आठवण करा’, परंतु माया घडोघडी विसरायला लावते म्हणून बाबा सावध करतात. कोणालाही समजावून सांगायचे असेल तरी देखील सर्वात पहिली हि गोष्ट समजावून सांगा कि, ‘भगवान कोण आहेत? भगवान जे ‘पतित पावन आहेत’, ‘दुःखहर्ता - सुखकर्ता आहेत’ ते कुठे आहेत?’ त्यांची आठवण तर सर्वच करतात. ज्यावेळी काही संकटे येतात, तेव्हा म्हणतात ‘भगवान दया करा’. कोणाला वाचवायचे असते तरी देखील म्हणतात कि, ‘हे भगवान’, ‘ओ गॉड’, आम्हाला दुःखातून मुक्त करा’. दुःख तर सर्वांनाच आहे. हे तर पक्के माहित आहे कि सतयुगाला सुखधाम म्हटले जाते, कलियुगाला दुःख धाम म्हटले जाते. हे मुले जाणतात तरी देखील माया विसरायला लावते. हा आठवणीमध्ये बसवण्याचा रिवाज देखील ड्रामामध्ये आहे कारण असे बरेच आहेत जे संपूर्ण दिवस आठवणच करत नाहीत, एक मिनिट देखील आठवण करत नाहीत. मग आठवण करून देण्यासाठी इथे बसवले जाते. आठवण करण्याची युक्ती सांगितली तर पक्के होईल. बाबांच्या आठवणीनेच स्वतःला सतोप्रधान बनवायचे आहे. सतोप्रधान बनण्याची बाबांनी फर्स्टक्लास रियल युक्ती सांगितली आहे. पतित-पावन तर एकच आहेत, ते येऊन युक्ती सांगतात. इथे तुम्ही मुले शांतीमध्ये तेव्हाच बसता जेव्हा बाबांसोबत योग असतो. जर बुद्धिचा योग इकडे-तिकडे गेला म्हणजे शांतीमध्ये नाही आहे, अशांत आहे. जितका वेळ बुद्धीयोग इकडे-तिकडे गेला, तो वेळ निष्फळ झाला, कारण पाप तर नष्ट होणार नाहीत. दुनिया हे जाणत नाही कि पापे कशी नष्ट होतात! या खूप महिन गोष्टी आहेत. बाबांनी सांगितले आहे, माझ्या आठवणीमध्ये बसा, तर जोपर्यंत आठवणीची तार जोडलेली आहे, तितका वेळ सफलता आहे. थोडी जरी बुद्धी इकडे-तिकडे गेली तर तो वेळ वाया गेला, निष्फळ झाला. बाबांचे डायरेक्शन आहे ना कि मुलांनो, माझी आठवण करा. जर आठवण नाही केली तर तो वेळ निष्फळ झाला. त्यामुळे काय होईल? तुम्ही लवकर सतोप्रधान बनणार नाही आणि मग सवयच लागेल. हे होत राहील. आत्मा या जन्मीची पापे तर जाणते. भले कोणी म्हणतात कि आम्हाला आठवत नाहीत, परंतु बाबा म्हणतात कि, वयाच्या तिसऱ्या-चवथ्या वर्षापासूनच्या सर्व गोष्टी आठवणीत असतात. सुरवातीला एवढी पापे होत नाहीत, जितकी नंतर होतात. दिवसेंदिवस क्रिमिनल आय (विकारी दृष्टी) होत जाते. त्रेतामध्ये दोन कला कमी होतात, चंद्राच्या २ कला किती वेळामध्ये कमी होतात? हळू-हळू कमी होत जातात आणि मग १६ कला संपूर्ण हे देखील चंद्राला म्हटले जाते, सूर्याला म्हटले जात नाही. चंद्राची आहे एका महिन्याची गोष्ट, हि तर आहे कल्पाची गोष्ट. दिवसेंदिवस खाली उतरत जातात. परंतु आठवणीच्या यात्रेद्वारे वर चढू शकता. त्या नंतर मग गरजच नाही जी आठवण करावी आणि वर चढावे. सतयुगानंतर पुन्हा उतरायचे आहे. असे देखील नाही की, सतयुगामध्ये देखील जर आठवण केली तर खाली येणारच नाही. ड्रामा नुसार उतरायचेच आहे, त्यामुळे आठवणच करत नाहीत. उतरणे देखील जरुरी आहे, मग आठवण करण्याचा उपाय बाबाच सांगतात कारण वर जायचे आहे. संगमावरच बाबा येऊन शिकवतात कि आता चढती कला सुरु होत आहे. आम्हाला परत आपल्या सुखधामला जायचे आहे. बाबा म्हणतात - आता सुखधाममध्ये जायचे आहे तर माझी आठवण करा. आठवणीनेच तुमची आत्मा सतोप्रधान बनेल.

तुम्ही दुनियेपेक्षा वेगळे आहात, वैकुंठ या दुनियेपेक्षा एकदम वेगळा आहे. वैकुंठ होता, आता नाहीये. कल्पाचे आयुष्य वाढवल्यामुळे विसरले आहेत. आता तुम्हा मुलांना वैकुंठ खूप जवळ दिसत आहे. थोडा वेळ बाकी आहे. आठवणीच्या यात्रेमध्येच कमजोर आहेत त्यामुळे समजतात अजून वेळ बाकी आहे. आठवणीची यात्रा जितकी व्हायला हवी तितकी होत नाही. तुम्ही संदेश पोहोचवता ड्रामाच्या प्लॅन अनुसार, कोणाला संदेश देत नसाल तर जणू सेवा करत नाही. साऱ्या दुनियेमध्ये संदेश तर पोहोचवायचा आहे कि, ‘बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा’. गीतेचे अध्ययन करणारे जाणतात, गीता शास्त्र एकच आहे, ज्यामध्ये हे महावाक्य आहे. परंतु त्यामध्ये ‘श्रीकृष्ण भगवानुवाच’ असे लिहिले आहे मग आठवण कोणाची करायची. भले शिवाची भक्ती करतात परंतु यथार्थ ज्ञान नाहीये ज्यामुळे श्रीमतावर चालतील. यावेळी तुम्हाला मिळते ‘ईश्वरीय मत’, याआधी होते ‘मानवी मत’. दोन्हीमध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. मानवी मत म्हणते - ईश्वर सर्वव्यापी आहे. ईश्वरीय मत म्हणते - नाही. बाबा म्हणतात - ‘मी आलो आहे स्वर्गाची स्थापना करण्यासाठी तर जरूर हा नरक आहे. इथे सर्वांमध्ये ५ विकारांची प्रवेशता आहे. विकारी दुनिया आहे तेव्हाच तर मी येतो निर्विकारी बनविण्यासाठी. जी ईश्वराची मुले बनली, त्यांच्यामध्ये विकार तर असू शकत नाहीत. रावणाचे चित्र दहा डोकी असणारे दाखवतात. कधी कोणी म्हणू शकत नाही की रावणाची सृष्टी निर्विकारी आहे. तुम्ही जाणता आता रावण राज्य आहे, सर्वांमध्ये ५ विकार आहेत. सतयुगामध्ये आहे रामराज्य, कोणताही विकार नाहीत. यावेळी मनुष्य किती दुःखी आहेत. शरीराला किती दुःख होते, हे आहे दुःखधाम, सुखधाममध्ये तर शारीरिक दुःख देखील नसते. इथे तर किती हॉस्पिटल्स भरलेली आहेत, याला स्वर्ग म्हणणे देखील खूप मोठी चूक आहे. तर हे समजून घेऊन इतरांना समजावून सांगायचे आहे, ते (दुनियेतील) शिक्षण काही कोणाला समजावून सांगण्यासाठी नाहीये. परीक्षा पास झाला आणि नोकरीला लागला. इथे तर तुम्हाला सर्वांना संदेश द्यायचा आहे. संदेश फक्त एकटे बाबा थोडाच देणार. जे खूप हुशार आहेत त्यांना टीचर म्हटले जाते, कमी हुशार असतात त्यांना स्टुडंट म्हटले जाते. तुम्हा सर्वांना संदेश द्यायचा आहे, विचारायचे आहे - ‘तुम्ही भगवंताला जाणता का?’ ते तर सर्वांचे पिता आहेत. तर मुख्य गोष्ट आहे बाबांचा परिचय देणे कारण त्यांना कोणीच जाणत नाहीत. उच्च ते उच्च बाबा आहेत साऱ्या विश्वाला पावन बनविणारे. सारे विश्व पावन होते, ज्यामध्ये फक्त भारतच होता. इतर कोणत्या धर्माचा असे म्हणू शकणार नाही की, आम्ही नवीन दुनियेमध्ये आलो आहोत. ते तर समजतात आमच्या आधी कोणीतरी होऊन गेले आहेत. क्राईस्ट देखील जरूर कोणामध्ये तरी येईल. त्यांच्या आधी जरूर कोणीतरी होते. बाबा बसून समजावून सांगत आहेत - ‘मी या ब्रह्मातनामध्ये प्रवेश करतो’. हे देखील कोणी मान्य करत नाहीत की ब्रह्माच्या तनामध्ये येतात. अरे, ब्राह्मण तर जरूर पाहिजेत. ब्राह्मण कुठून येतील. जरूर ब्रह्माद्वारेच तर येतील ना. अच्छा, ब्रह्माच्या पित्या बद्दल कधी ऐकले आहे का? ते आहेत ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर. त्यांचा साकार पिता कोणीच नाही. ब्रह्माचा साकार पिता कोण? कोणीही सांगू शकत नाही. ब्रह्मा प्रसिद्ध आहे. प्रजापिता देखील आहे. जसे निराकार शिवबाबा म्हणतात, त्यांचा पिता कोण सांगा बरं? मग साकार प्रजापिता ब्रह्माचे पिता कोण सांगा? शिवबाबा काही ॲडॉप्ट केलेले नाही आहेत. यांना (ब्रह्मा बाबांना) ॲडॉप्ट केलेले आहे. असे म्हणतील, यांना (ब्रह्मा बाबांना) शिवबाबांनी ॲडॉप्ट केले आहे. विष्णूला शिवबाबांनी ॲडॉप्ट केले आहे, असे म्हणणार नाही. हे तर तुम्ही जाणता ब्रह्मा सो विष्णू बनतात. ॲडॉप्ट तर झाले नाहीत. शंकरासाठी देखील सांगितले आहे, त्यांचा कोणता पार्ट नाही आहे. ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो ब्रह्मा हे ८४ चे चक्र आहे. मग शंकर कुठून आले. त्यांची रचना कुठे आहे. बाबांची तर रचना आहे, ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत आणि ब्रह्माची रचना आहे - सर्व मनुष्य. शंकराची रचना कुठे आहे? शंकरापासून कोणती मानवी दुनिया रचली जात नाही. बाबा येऊन या सर्व गोष्टी समजावून सांगतात तरी देखील मुले सारखे-सारखे विसरतात. प्रत्येकाची बुद्धी नंबरवार आहे ना. जितकी बुद्धी तितकी टिचरची शिकवण धारण करू शकतात. हे आहे बेहदचे शिक्षण. अभ्यासानुसारच नंबरवार पदे मिळवतात. भले शिक्षण एकच आहे मनुष्यापासून देवता बनण्याचे परंतु डिनायस्टी (घराणे) बनते ना. हे देखील बुद्धीमध्ये आले पाहिजे की आपण कोणते पद प्राप्त करणार? राजा बनणे तर मेहनतीचे काम आहे. राजांकडे दास-दासी देखील पाहिजेत. दास-दासी कोण बनतात, हे देखील तुम्ही समजू शकता. नंबरवार पुरुषार्थानुसार प्रत्येकाला दासी मिळत असतील. तर असे शिकायचे नाही ज्याने जन्म-जन्मांतर दास-दासी बनावे लागेल. पुरुषार्थ करायचा आहे उच्च बनण्याचा.

तर खरी शांती बाबांच्या आठवणीमध्ये आहे, थोडी जरी बुद्धी इकडे-तिकडे गेली तर टाईम वेस्ट झाला. कमाई कमी होईल. सतोप्रधान बनू शकणार नाही. हे देखील समजावून सांगितले आहे की, हातांनी काम करत रहा, आणि मनाने बाबांची आठवण करा. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी हिंडणे-फिरणे, हे देखील भले करा. परंतु बुद्धीमध्ये बाबांची आठवण रहावी. जर सोबत कुणी असेल तर झरमुई-झगमुई (व्यर्थ गोष्टी) करायच्या नाहीत. हे तर प्रत्येकाचे मन साक्ष देते. बाबा सांगून ठेवतात, अशा अवस्थेमध्ये फेरी मारा. पाद्री लोक एकदम शांतीने जातात, तुम्ही लोक ज्ञानाच्या गोष्टी काही सारा वेळ तर करणार नाही मग वाणीला शांत ठेवून शिवबाबांच्या आठवणीमध्ये रेस केली पाहिजे. जसे भोजनाच्या वेळी बाबा म्हणतात - ‘आठवणीमध्ये बसून खा, आपला चार्ट बघा’. बाबा (ब्रह्मा बाबा) आपले तर सांगतात की, ‘मी विसरतो. प्रयत्न करतो, बाबांना सांगतो बाबा मी पूर्ण वेळ आठवणीमध्ये राहीन. तुम्ही माझा खोकला बंद करा. शुगर कमी करा. माझ्यावर जी मेहनत करतो, ती मी सांगतो. परंतु मी स्वतःच विसरतो तर खोकला कसा कमी होणार. बाबांसोबत ज्या गोष्टी करतो, त्या सत्य सांगतो’. बाबा (ब्रह्मा बाबा) मुलांना सांगतात, मुले बाबांना सांगत नाहीत, लाज वाटते. झाडू मारताना, जेवण बनविताना शिवबाबांच्या आठवणीमध्ये बनवा तर ताकद येईल. अशी देखील युक्ती पाहिजे, यामध्ये तुमचेच कल्याण होईल मग तुम्ही आठवणीमध्ये बसाल तेव्हा इतरांना देखील आकर्षण होईल. एकमेकांना आकर्षण तर होते ना. जितके तुम्ही जास्त आठवणीमध्ये रहाल तितका सन्नाटा चांगला होईल. एकमेकांचा प्रभाव ड्रामा अनुसार पडतो. आठवणीची यात्रा तर खूप कल्याणकारी आहे, यामध्ये खोटे बोलण्याची गरज नाही. सच्च्या बाबांची मुले आहात तर सच्चे होऊन चालायचे आहे. मुलांना तर सर्व काही मिळते. विश्वाची बादशाही मिळते तर मग लोभ करून दहा-वीस साड्या इत्यादी कशासाठी जमा करता. जर खूप वस्तू जमा करत राहिलात तर मरते वेळी देखील आठवण येईल; यासाठी एक उदाहरण देतात की पत्नीने पतीला म्हटले, ‘काठी सुद्धा सोडून द्या, नाहीतर त्याची देखील आठवण येईल’. कशाचीही आठवण राहता कामा नये. नाहीतर स्वतःलाच संकटात टाकाल. खोटे बोलल्याने १०० पटीने पाप चढते. शिवबाबांचा भंडारा सदैव भरलेला असतो, जास्त राखून ठेवण्याची देखील गरज नाही. ज्यांच्याकडे चोरी होते तर त्यांना सर्व काही दिले जाते. तुम्हा मुलांना बाबांकडून राजाई मिळते. तर काय कपडे इत्यादी मिळणार नाहीत काय! फक्त फालतू खर्च करता कामा नये कारण स्वर्गाच्या स्थापनेमध्ये अबलाच मदत करतात. त्यांचे पैसे असे बरबाद देखील करता कामा नयेत. त्या तुमची पालना करतात तर तुमचे काम आहे त्यांची पालना करणे. नाहीतर १०० पटीने पाप डोक्यावर चढते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांच्या आठवणीमध्ये बसलेले असताना जरा देखील बुद्धी इकडे-तिकडे भटकता कामा नये. सदैव कमाई जमा होत रहावी. आठवण अशी असावी ज्यामुळे सन्नाटा होईल.

२) शरीराला निरोगी ठेवण्यासाठी हिंडा-फिरायला जाता तर आपसामध्ये झरमुई-झगमुई (व्यर्थ गोष्टी) करायच्या नाहीत. वाणीला शांत ठेवून बाबांच्या आठवणीमध्ये रेस करायची आहे. भोजन देखील बाबांच्या आठवणीमध्ये खायचे आहे.

वरदान:-
निश्चय बुद्धी बनून कमजोर संकल्पांच्या जाळ्याला समाप्त करणारे सफलता संपन्न भव

अजून पर्यंत मेजॉरिटी मुले कमजोर संकल्पांना स्वतःच इमर्ज करतात - असा विचार करतात - ‘माहित नाही होईल की नाही होईल, काय होईल…’ हे कमजोर संकल्पच भिंत बनतात आणि सफलता त्या भिंतीच्या आत लपून जाते. माया कमजोर संकल्पांचे जाळे पसरवते, त्याच जाळ्यामध्ये अडकून पडतात त्यामुळे - ‘मी निश्चयबुद्धी विजयी आहे, सफलता माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’ या स्मृतीद्वारे कमजोर संकल्पांना समाप्त करा.

बोधवाक्य:-
तिसरा ज्वालामुखी नेत्र उघडा असेल तर माया शक्तीहीन बनेल.