02-08-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुमचे निजी संस्कार पवित्रतेचे आहेत, तुम्ही रावणाच्या संगामध्ये येऊन पतित बनलात, आता पुन्हा पावन बनून पावन दुनियेचा मालक बनायचे आहे”

प्रश्न:-
अशांतीचे कारण आणि त्याचे निवारण काय आहे?

उत्तर:-
अशांतीचे कारण आहे अपवित्रता. आता ईश्वर पित्याशी प्रतिज्ञा करा कि आम्ही पवित्र बनून पवित्र दुनिया बनवू, आमची सिव्हिल आय (दृष्टी पवित्र) ठेवू, क्रिमिनल (विकारी) बनणार नाही तर अशांती दूर होऊ शकते. तुम्ही शांती स्थापन करण्याच्या निमित्त बनलेली मुले कधी अशांती पसरवू शकत नाहीत. तुम्हाला शांत रहायचे आहे, मायेचा गुलाम बनायचे नाही.

ओम शांती।
बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत कि, गीतेच्या भगवंताने गीता ऐकवली. एकदा ऐकवून नंतर मग निघून जातील. आता तुम्ही मुले गीतेच्या भगवंताकडून त्याच गीतेचे ज्ञान ऐकत आहात आणि राजयोग सुद्धा शिकत आहात. ते लोक तर लिहिलेली गीता वाचून पाठ करतात आणि नंतर लोकांना ऐकवत असतात. ते देखील जर शरीर सोडून दुसऱ्या जन्मामध्ये बाळ बनले मग तर ऐकवू शकणार नाहीत. आता बाबा तुम्हाला गीता ऐकवत राहतात, जोपर्यंत तुम्ही राजाई प्राप्त करता. लौकिक शिक्षक सुद्धा पाठ्यक्रम शिकवतच राहतात. जोपर्यंत पाठ्यक्रम पूर्ण होत नाही तोपर्यंत शिकवत राहतात. पाठ्यक्रम पूर्ण झाल्यानंतर मग हदची कमाई करण्यामध्ये व्यस्त होतात. टीचरकडून शिकले, कमाई केली, वृद्ध झाले, शरीर सोडले, मग पुन्हा जाऊन दुसरे शरीर घेतात. ते लोक गीता ऐकवतात, आता त्यातून काय प्राप्ती होते? हे तर कोणालाच माहित नाही. गीता ऐकवून मग परत दुसऱ्या जन्मामध्ये बाळ बनले तर ऐकवू शकणार नाहीत. जेव्हा मोठे होतील, वयस्कर होतील, गीतापाठी होतील तेव्हा पुन्हा ऐकवतील. इथे बाबा तर एकदाच शांतीधाम मधून येऊन शिकवतात आणि मग निघून जातात. बाबा म्हणतात - ‘तुम्हाला राजयोग शिकवून मी आपल्या घरी निघून जातो’. ज्यांना शिकवतो ते मग येऊन आपले प्रारब्ध भोगतात. आपली कमाई करतात, नंबरवार पुरुषार्थानुसार धारणा करून नंतर निघून जातात. कुठे? नव्या दुनियेमध्ये. हे शिक्षण आहेच नवीन दुनियेसाठी. मनुष्य तर हे जाणत नाहीत कि जुनी दुनिया नष्ट होऊन पुन्हा नवीन स्थापन होणार आहे. तुम्ही जाणता आम्ही राजयोग शिकतोच नवीन दुनियेसाठी. मग ना हि जुनी दुनिया राहणार, ना जुने शरीर राहणार. आत्मा तर अविनाशी आहे. आत्मे पवित्र बनून मग पवित्र दुनियेमध्ये येतात. नवीन दुनिया होती, ज्यामध्ये देवी-देवतांचे राज्य होते ज्याला स्वर्ग म्हटले जाते. ती नवीन दुनिया बनविणारे भगवानच आहेत. ते एका धर्माची स्थापना करतात. कोणा देवता द्वारे करत नाहीत. देवता तर इथे अस्तित्वातच नाहीत. तर जरूर कोणा मनुष्याद्वारेच ज्ञान देतील जे नंतर देवता बनतील. मग तेच देवता पुनर्जन्म घेत-घेत आता ब्राह्मण बनले आहेत. हे रहस्य तुम्ही मुलेच जाणता - भगवान तर आहेत निराकार जे नवीन दुनियेची रचना करतात. आता तर रावण राज्य आहे. तुम्ही विचारता - ‘कलियुगी पतित आहात कि सतयुगी पावन आहात?’ परंतु समजत नाहीत. आता बाबा मुलांना म्हणतात - ‘मी ५ हजार वर्षापूर्वी देखील तुम्हाला समजावून सांगितले होते. मी येतोच तुम्हा मुलांना अर्धा कल्प सुखी बनविण्यासाठी. मग रावण येऊन तुम्हाला दुःखी बनवतो’. हा सुख-दुःखाचा खेळ आहे. कल्पाची आयु ५ हजार वर्षे आहे, तर अर्धी-अर्धी करावी लागेल ना. रावण राज्यामध्ये सर्व देह-अभिमानी विकारी बनतात. या गोष्टी सुद्धा तुम्ही आता समजता, या पूर्वी समजत नव्हता. कल्प-कल्प ज्यांना समजले तेच समजतात. जे देवता बनणारे नाहीत, ते येणारच नाहीत. तुम्ही देवता धर्माचे कलम लावता. जेव्हा ते आसुरी तमोप्रधान बनतात तेव्हा त्यांना दैवी झाडाचे म्हणणार नाही. झाड देखील जेव्हा नवीन होते तेव्हा ते सतोप्रधान होते. आपण त्याची पाने देवी-देवता होतो नंतर मग रजो, तमोमध्ये आलो, जुने, पतित, शूद्र झालो. जुन्या दुनियेमध्ये जुने मनुष्यच राहणार. जुन्याला पुन्हा नवीन बनवावे लागेल. आता देवी-देवता धर्मच प्राय:लोप झाला आहे. बाबा देखील म्हणतात - ‘जेव्हा-जेव्हा धर्माची ग्लानी होते, तेव्हा विचारले जाईल कोणत्या धर्माची ग्लानी होते?’ जरूर म्हणणार आदि सनातन देवी-देवता धर्माची, जो मी स्थापन केला होता. तो धर्मच प्राय:लोप झाला. त्या ऐवजी अधर्म झाला. तर जेव्हा धर्मापासून अधर्माची वृद्धी होत जाते, तेव्हा बाबा येतात. असे म्हणणार नाही धर्माची वृद्धी, धर्म तर प्राय:लोप झाला. बाकी अधर्माची वृद्धी झाली. वृद्धी तर सर्व धर्मांची होते. एका क्राईस्ट पासून ख्रिश्चन धर्माची किती वृद्धी होते. बाकी देवी-देवता धर्म प्राय:लोप झाला. पतित बनल्या कारणाने आपलीच ग्लानी करतात. धर्माचा अधर्म सुद्धा एकाचाच होतो. बाकी सर्व धर्म तर ठीक चालत आहेत. सर्व आपल्या-आपल्या धर्मामध्ये टिकून राहतात. जो आदि सनातन देवी-देवता धर्म निर्विकारी होता, तो विशश (विकारी) बनला आहे. आपण पावन दुनिया स्थापन केली आणि पुन्हा तेच पतित, शूद्र बनतात, अर्थात त्या धर्माची ग्लानी होते. अपवित्र बनतात तर आपली निंदा करतात. विकारामध्ये गेल्याने पतित बनतात स्वतःला देवता म्हणू शकत नाहीत. स्वर्ग बदलून नरक झाला आहे. तर कोणीही वाह-वाह (पावन) नाही आहे. तुम्ही किती घाणेरडे पतित बनले आहात. बाबा म्हणतात - ‘तुम्हाला मी वाह-वाह (पावन) फूल बनवले आणि मग रावणाने तुम्हाला काटा बनवले’. पावन पासून पतित बनले आहात. आपल्या धर्माचीच स्थिती पहायची आहे. बोलावतात देखील कि, आमची हालत तर येऊन पहा, आम्ही किती पतित बनलो आहोत. पुन्हा आम्हाला पावन बनवा. पतितापासून पावन बनविण्यासाठी बाबा येतात तर मग पावन बनले पाहिजे. इतरांना देखील बनवले पाहिजे.

तुम्ही मुले स्वतःला बघत रहा कि आम्ही सर्वगुण संपन्न बनलो आहोत? आमची चलन (वर्तन) देवतांसारखी आहे? देवतांच्या राज्यामध्ये तर विश्वामध्ये शांती होती. आता पुन्हा तुम्हाला शिकविण्यासाठी आलो आहे - विश्वामध्ये शांती कशी स्थापन होईल. तर तुम्हाला देखील शांतीमध्ये रहावे लागेल. शांत होण्याची युक्ती सांगतो कि, ‘माझी आठवण करा तर तुम्ही शांत होऊन, शांतीधाममध्ये निघून जाल’. काही मुले तर शांत राहून इतरांना देखील शांतीमध्ये रहायला शिकवतात. काही अशांती निर्माण करतात. स्वतः अशांत राहतात त्यामुळे इतरांना देखील अशांत बनवतात. शांतीचा अर्थ समजत नाहीत. इथे येतात शांती शिकण्यासाठी आणि मग इथून जातात तर अशांत होतात. अशांती होतेच मुळी अपवित्रतेमुळे. इथे येऊन प्रतिज्ञा करतात - ‘बाबा, मी तुमचाच आहे. तुमच्याकडून विश्वाची बादशाही घ्यायची आहे. मी पवित्र राहून मग विश्वाचा मालक जरूर बनणार’. आणि जेव्हा घरी जातात तर माया वादळामध्ये घेऊन येते. युद्ध आहे ना. मग मायेचे गुलाम बनून पतित बनू इच्छितात. अबलांवर अत्याचार तेच करतात जे प्रतिज्ञा सुद्धा करतात की, ‘आम्ही पवित्र राहू’ आणि मग मायेचा वार झाल्यावर प्रतिज्ञा विसरून जातात. ईश्वरा समोर प्रतिज्ञा केली आहे कि, ‘आम्ही पवित्र बनून पवित्र दुनियेचा वारसा घेणार, आम्ही पवित्र दृष्टी ठेवू, कु-दृष्टी ठेवणार नाही, विकारामध्ये जाणार नाही, विकारी दृष्टी सोडून देऊ’. तरीही माया रावणाकडून हार पत्करतात. तर जे निर्विकारी बनू इच्छितात, त्यांना त्रास देतात म्हणून म्हटले जाते - अबलांवर अत्याचार होतात. पुरुष तर बलवान असतात, स्त्री निर्बल असते. युद्धावर पुरुष जातात कारण बलवान असतात. स्त्री नाजूक असते. तिचे कर्तव्यच वेगळे आहे, ती घर सांभाळते, मुलांना जन्म देऊन त्यांची पालना करते. हे देखील बाबा समजावून सांगतात की, तिथे (सतयुगामध्ये) असतोच एक मुलगा तरी सुद्धा विकाराचे नाव नसते. इथे तर संन्यासी सुद्धा कधी-कधी म्हणतात कि एक मुल तर जरूर असायला हवे - विकारी दृष्टीवाले ठग अशी शिकवण देतात. आता बाबा म्हणतात - यावेळची मुले काय कामाची असणार, जेव्हा विनाश समोर उभा आहे, सर्वच नष्ट होणार. मी आलोच आहे जुन्या दुनियेचा विनाश करण्यासाठी. ती झाली संन्याशांची गोष्ट, त्यांना तर विनाशा बद्दल काही माहित सुद्धा नाही. तुम्हाला बेहदचे बाबा समजावून सांगत आहेत आता विनाश होणार आहे. तुमची मुले वारसदार बनू शकणार नाहीत. तुम्ही समजता आपल्या कुळाची निशाणी असायला हवी परंतु पतित दुनियेची कोणतीही निशाणी राहणार नाही. तुम्ही समजता आपण पावन दुनियेचे होतो, मनुष्य सुद्धा आठवण करतात कारण पावन दुनिया होऊन गेली आहे, ज्याला स्वर्ग म्हटले जाते. परंतु आता तमोप्रधान असल्या कारणाने असे समजू शकत नाहीत. त्यांची दृष्टीच क्रिमिनल (विकारी) आहे, याला म्हटले जाते धर्माची ग्लानी. आदि सनातन धर्मामध्ये अशा गोष्टी असत नाहीत. बोलावत राहतात - ‘पतित-पावन या, आम्ही पतित दुःखी आहोत’. बाबा समजावून सांगत आहेत की, ‘मी तुम्हाला पावन बनवले मग माया रावणामुळे तुम्ही पतित बनला आहात. आता पुन्हा पावन बना’. पावन बनता मग मायेचे युद्ध चालू होते. बाबांकडून वारसा घेण्याचा पुरुषार्थ करत होतो आणि मग मायेने तोंड काळे केले तर मग वारसा कसा मिळणार. बाबा येतात गोरे बनविण्यासाठी. देवता जे गोरे (पावन) होते, तेच काळे (पतित) बनले आहेत. देवतांचीच शरीरे काळी बनवतात, क्राईस्ट, बुद्ध इत्यादींना कधी काळे पाहिले आहे? देवी-देवतांची चित्रे काळी बनवतात. जे सर्वांचे सद्गती दाता परमपिता परमात्मा सर्वांचे पिता आहेत, ज्यांना - ‘हे परमपिता परमात्मा येऊन आम्हाला लिबरेट करा’, असे म्हणतात ते थोडेच असे काळे असू शकतात, ते तर सदैव गोरे एव्हर प्युअर (सदा पावन) आहेत. देवतांना महान आत्मा म्हटले जाते, श्रीकृष्ण तर देवता झाला. आता तर कलियुग आहे, कलियुगामध्ये महान आत्मा कुठून येणार! श्रीकृष्ण तर सतयुगाचा फर्स्ट प्रिन्स होता, त्याच्यामध्ये दैवी गुण होते. आता तर देवता इत्यादी कोणीही नाहीत. साधू-संत पवित्र बनतात तरीही पुनर्जन्म विकारातून घेतात. मग संन्यास घ्यावा लागतो. देवता तर सदैव पवित्र आहेत. इथे रावण राज्य आहे. रावणाला १० तोंडे दाखवतात - ५ स्त्रीची, ५ पुरुषाची. हे देखील समजतात ५ विकार प्रत्येकामध्ये आहेत, देवतांमध्ये तर म्हणणार नाही ना. ते तर आहेच सुखधाम. तिथे देखील रावण असता तर मग ते दुःखधाम झाले असते. मनुष्य समजतात देवता सुद्धा मुलांना जन्म देतात, मग ते देखील विकारी झाले. त्यांना हेच माहीत नाही आहे की, देवतांचे गायनच केले जाते, ‘संपूर्ण निर्विकारी’, तेव्हाच तर त्यांची पूजा केली जाते. संन्याशांची सुद्धा मिशन आहे. फक्त पुरुषांना संन्यास करायला लावून मिशन वाढवतात. बाबा मग प्रवृत्ती मार्गाची नवीन मिशन बनवतात, त्याच सोबत पवित्र बनवतात. मग तुम्ही जाऊन देवता बनणार. तुम्ही इथे संन्यासी बनण्यासाठी आलेले नाही आहात. तुम्ही तर आला आहात विश्वाचा मालक बनण्यासाठी. ते (दुनियावाले) तर मग गृहस्थीमध्ये जन्म घेतात. आणि मग घर सोडून निघून जातात. तुमचे संस्कारच आहेत पवित्रतेचे. आता अपवित्र बनले आहात पुन्हा पवित्र बनायचे आहे. बाबा पवित्र गृहस्थ आश्रम बनवतात. पावन दुनियेला - सतयुग, पतित दुनियेला - कलियुग म्हटले जाते. इथे किती पाप-आत्मे आहेत. सतयुगामध्ये अशा गोष्टी असत नाहीत. बाबा म्हणतात - जेव्हा-जेव्हा भारतामध्ये धर्माची ग्लानी (अधोगती) होते अर्थात देवी-देवता धर्मवाले पतित बनतात तर आपली ग्लानी करतात. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला पावन बनवले पुन्हा तुम्ही पतित बनलात, काही कामाचे राहिला नाहीत. जेव्हा असे पतित बनता तेव्हा पुन्हा पावन बनविण्यासाठी मला यावे लागते. हे ड्रामाचे चक्र आहे जे फिरत राहते. स्वर्गामध्ये जाण्यासाठी मग दैवी गुण देखील हवेत. क्रोध असता कामा नये. क्रोध असेल तर त्यांना देखील असुर म्हटले जाईल. एकदम शांतचित्त अवस्था पाहिजे. क्रोध करतात तर म्हटले जाईल - यांच्यामध्ये क्रोधाचे भूत आहे. ज्यांच्यामध्ये कोणतेही भूत असेल ते देवता बनू शकणार नाहीत. नरापासून नारायण बनू शकणार नाहीत. देवता तर आहेतच निर्विकारी यथा राजा-राणी तथा प्रजा निर्विकारी आहे. भगवान बाबाच येऊन संपूर्ण निर्विकारी बनवतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

१) बाबांसमोर पवित्रतेची प्रतिज्ञा केली आहे तर स्वतःला मायेच्या वारा पासून वाचवत रहा. कधीही मायेचा गुलाम बनायचे नाही. या प्रतिज्ञेला विसरायचे नाही कारण आता पावन दुनियेमध्ये जायचे आहे.

२) देवता बनण्यासाठी अवस्थेला अतिशय शांतचित्त बनवायचे आहे. कोणत्याही भुताला प्रवेश करू द्यायचा नाही. दैवी गुण धारण करायचे आहेत.

वरदान:-
फरिश्ता स्वरूपाच्या स्मृती द्वारे बाबांच्या छत्रछायेचा अनुभव करणारे विघ्न जीत भव

अमृतवेलेला उठताच स्मृतीमध्ये आणा कि, ‘मी फरिश्ता आहे’. ब्रह्मा बाबांना हीच मनपसंत गिफ्ट द्या तर रोज अमृतवेलेला बापदादा तुम्हाला आपल्या मिठीत घेतील, अनुभव कराल कि बाबांच्या मिठीमध्ये, अतींद्रिय सुखामध्ये झोके घेत आहोत. जे फरिश्ता स्वरूपाच्या स्मृतीमध्ये राहतील त्यांच्या समोर कोणतीही परिस्थिती अथवा विघ्न जरी आले तरी बाबा त्यांच्यासाठी छत्रछाया बनतील. तर बाबांची छत्रछाया किंवा प्रेमाचा अनुभव करत विघ्न-जीत बना.

बोधवाक्य:-
सुख स्वरूप आत्मा स्व-स्थितीद्वारे परिस्थितीवर सहज विजय प्राप्त करते.