02-08-26    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   17.02.2011  ओम शान्ति   मधुबन


“मनसा सेवेद्वारे आत्म्यांना अंचली देण्याची सेवा करत, दीर्घकाळपर्यंत तीव्र पुरुषार्थ करून एव्हररेडी राहा, तेव्हा च माळेतील मणी बनाल”


आज स्नेहाचे सागर आपल्या लाडक्या मुलांना भेटण्यासाठी आले आहेत. मुलांनी आठवण केली, ‘माझे बाबा या’, तर बाबा म्हणतात - ‘माझ्या लाडक्या मुलांनो’, प्रेमामध्ये असे काही आकर्षण आहे जे प्रत्येक मुलाने बाबांना आपले बनवले आणि बाबांनी प्रत्येक मुलाला ‘माझ्या बाळा’ म्हणत स्वतःमध्ये सामावून घेतले. कमाल आहे, मुलांनी म्हटले, ‘माझे बाबा’ तर ‘माझे’ या शब्दामध्ये इतके प्रेम भरलेले आहे की बाबांनी देखील म्हटले, ‘माझी मुले’, प्रेम कशा प्रकारे सर्व काही बदलून टाकते. प्रत्येक मुलाच्या मस्तकावर आज प्रेमाच्या लहरी तरंगत आहेत, हे पाहून बापदादा हर्षित होत आहेत. ‘प्रेम’ मनाला आपले बनविण्याचे साधन आहे. तर प्रत्येक मुलाच्या मनात आज प्रेमाच्या लहरी तरंगत असताना पाहून बापदादा देखील आनंदित होत आहेत.

आत्ता लगेच ५ मिनिटांसाठी एक ड्रिल बापदादा सर्वांकडून करून घेत आहेत. आपल्या मनसा शक्तीद्वारे सृष्टीमध्ये जे काही तुमचे भक्त अथवा अनेक दुःखी, अशांत आत्मे तुमची आठवण करत आहेत - ‘अहो आमचे पूर्वज, आम्हाला थोड्या वेळासाठी तरी शांती द्या, थोडीशी सुखाची अंचली द्या, वाचवा’, अशा आत्म्यांना इथे बसून इमर्ज करा, आवाज ऐकू येत आहे ना! वाचवा, वाचवा..., तर अशा आत्म्यांना आपल्या मनसा शक्तीद्वारे सुख-शांतीची किरणे पोहोचवा. ही मनसा सेवा संपूर्ण दिवसभर वारंवार करत राहा कारण बाबांसोबत तुम्ही मुले देखील विश्व सेवक आहात. संपूर्ण दिवस वाणीद्वारे जसे सेवेसाठी निमित्त बनता, तसेच मधून-मधून मनसा सेवेचा देखील अभ्यास करत चला. यामध्ये तुमचा स्वतःचा देखील फायदा आहे, कारण जर तुमचे मन सदैव सेवेत बिझी राहीले तर तुमच्या मनामध्ये माया जी मध्ये-मध्ये फालतू संकल्प अथवा व्यर्थ संकल्प निर्माण करते, त्यापासून तुम्ही वाचाल. यासाठी वेगळी मेहनत करावी लागणार नाही. आता बापदादा विचारत आहेत की, ‘तुम्ही कसे आहात?’ तर काय उत्तर देता? ‘पुरुषार्थ चालू आहे परंतु कधी-कधी...!’ निरंतर पुरुषार्थ करत नाही आहात. तर बापदादा आता सर्व मुलांचा हा रेकॉर्ड पाहू इच्छित आहेत की, हा ‘कधी-कधी’ शब्द जो आहे तो नाहीसा व्हावा. हे होऊ शकते काय, हा ‘कधी-कधी’ संपुष्टात येईल का? वेळेवर तयार व्हाल? होत आहोत, व्हायचेच आहे..., या ऐवजी आता एव्हररेडी बनू शकता? का? एव्हररेडी राहण्याचा अभ्यास मायाजीत, मनजीत, जगतजीत हे संस्कार देखील दीर्घकाळापासून घडवाल, तेव्हा कुठे अंतिम समयी देखील हा दीर्घकाळाचा अभ्यास विजयी बनवून तुम्हाला विशेष माळेतील मणी बनवेल. पास विथ ऑनर बनाल. पास नाही, पास विथ ऑनर. तर बोला, एवढी हिंमत आहे ना! पास विथ ऑनर तर व्हायचेच आहे ना? जे द्वापर पासून आतापर्यंत पूज्य बनतात अर्थात माळेतील मणी बनतात तर स्वतःला माळेतील मणी बनविण्याचा शुद्ध संकल्प आहे ना!

बापदादा देखील दररोज अमृतवेलेला आपल्या माळेतील मण्यांना पाहतात आणि विशेष मिलन साजरे करतात. तर तुम्ही सर्व स्वतःला माळेतील मण्यांपैकी एक समजता ना. तशीही १६ हजारांची देखील दुसरी माळ आहे, परंतु तरी देखील ती दुसरी माळ झाली. विशेष माळा जी गायन आणि पूजन योग्य बनते, ती आहे - पहिली माळा. तर आज बापदादा त्या मण्यांना पाहत होते कारण ब्रह्मा बाबांसोबत विशेष राज्य अधिकारी साथीदार तेच बनतात. तर आज ब्रह्मा बाबा आपल्या आत्ताच्या तीव्र पुरुषार्थी आणि भविष्यातील राज्य अधिकारी, तख्तावर तर दोनच बसतात, परंतु राज्याचे साथीदार जे आहेत त्यांची पहिली माळा आहे. तर स्वतःला चेक केले आहे का?

बापदादांसोबत तर जाणार कारण आता तुम्हा सर्वांची रिटर्न जर्नी आहे. जर जायचेच आहे, तर बाबांसोबतच जायचे आहे, एकट्याने जायचे नाही. तर सोबत जाणारे जवळचे मणी कोणते असतील? जे दीर्घकाळ तीव्र पुरुषार्थ करणारे पुरुषार्थी असतील. पुरुषार्थी नाही, कधी-कधी वाले नाही. दीर्घकाळवालेच पित्या समान असणारेच राज्य अधिकारी बनतील. तर काय समजता? तीव्र पुरुषार्थ आहे? जे समजतात मी तीव्र पुरुषार्थींच्या लाईनमध्ये आहे, ते हात वर करतील. तीव्र पुरुषार्थी, मोठा हात वर करा, छोटा हात वर करतात. अच्छा, बरेच जण हात वर करत आहेत. पुन्हा उंच हात वर करा, असा अर्धवट नाही. अच्छा.

बापदादा तर दररोज मुलांचा चार्ट पाहतात. मेजॉरिटी तीव्र पुरुषार्थी देखील आहेत परंतु ‘कधी-कधी’ हा शब्द सुद्धा सोबत जोडत असतात. परंतु बाबा का सांगत आहेत? अटेन्शन प्लीज, सूक्ष्म संकल्पामध्ये देखील खळबळ नसावी. दीर्घकाळचे अचल, अडोल, शुद्ध संकल्पधारी बनायचेच आहे. कित्येक मुले खूप गोड-गोड रूहरिहान करतात, म्हणतात - ‘बाबा, आम्ही तयार होऊनच जाऊ कारण समय जितका समीप येईल, भयग्रस्त परिस्थिती निर्माण होईल तेव्हा वैराग्य तर ऑटोमॅटिकली येईलच. परंतु मग तुमचा शिक्षक कोण झाला? समय की बाबा? समय तर तुमची रचना आहे. तर बाबा आता इशारा देत आहेत की दीर्घकालीन तीव्र पुरुषार्थ अंतसमयी पास विथ ऑनर बनवेल. पास तर सर्वच होतील; परंतु पास विथ ऑनर बनणारा हा दीर्घकाळ निरंतर तीव्र पुरुषार्थ करणारा असणे आवश्यक आहे त्यामुळे आजची तारीख नोट करून ठेवा, आता देखील, ‘कधी-कधी, समथिंग, होऊन जाऊ, करूच…’ हे शब्द पुढे देखील चालत राहू नयेत. बाबांचे प्रेम तर सदैव आहेच. शेवटच्या मण्यावर देखील बाबांचे प्रेम आहे. का? मनापासून ‘माझे बाबा’ तर म्हटले; आजचे मोठ-मोठे आत्मे ‘माझे बाबा’ म्हणत नाहीत, परंतु तो (शेवटचा मणी) ‘माझे बाबा’ तर मानतो म्हणून बाबांचे प्रेम तर त्याच्यावरही आहे. बाबांचे प्रेम तर मुलांवर सदैवच आहे, शेवटपर्यंत सुद्धा आहे, अगदी शेवटच्या मुलावरही आहे. प्रेमानेच तुम्हाला बाबांचे बनवले आहे. बापदादांनी हे देखील सांगितले आहे की, मेजॉरिटी मुलांचे प्रेम आहे आणि राहील; परंतु केवळ प्रेमच नाही, शक्ती देखील हवी. तीव्र पुरुषार्थ देखील हवा.

बापदादांचा तर मुलांवर विश्वास आहे ना. म्हणून आतापासूनच, अशा मुलांना पदम-पदमपटीने मुबारक देत आहेत. वाह मुलांनो वाह! हिंमतवान आहात. तुमची हिंमत आणि बाबांची मदत तर असणारच. आता एक गोष्ट करा. जे आपल्या मनाला बिझी ठेवण्यासाठी, जसे अगोदर बाबांनी सांगितले सेकंदामध्ये स्टॉप, बिंदू आहे, बिंदू लावायचा आहे आणि सर्वांना बिंदू रूपामध्ये पाहायचे आहे. जेव्हा बघतानाच जर बिंदू रूपामध्ये पहाल तर दुसरा कोणताही संकल्प तुमच्या मनामध्ये चालणार नाही. मनसा सेवेचे अटेन्शन ठेवा, इतके दुःखी आत्मे जे ओरडत आहेत, त्यांना किरणे देण्याच्या सेवेमध्ये एक्स्ट्रा मनाला व्यस्त करा. मनसा सेवा अतिशय श्रेष्ठ सेवा आहे. दुःखी असणाऱ्यांचा देखील फायदा आणि तुमचा स्वतःचा देखील फायदा. डबल फायदा आहे. जसे वाचा द्वारे सेवा करता आणि सेवा वाढतही जाते, मनापासून करता, संख्या देखील वाढत जाते, सेंटर्स देखील वाढत जातात, वाचेची सेवा मेजॉरिटींची ठीक आहे. सर्वांची नाही, मेजॉरिटींची. तशी आता मनाने विशेषत: आत्म्यांना अंचली देण्याची सेवा देखील करत राहा. मनाला फ्री सोडू नका. कोणत्या ना कोणत्या सेवेमध्ये मनाद्वारे शक्ती देण्याची, मुखाद्वारे वाणीची सेवा, कर्मामध्ये गुणांद्वारे सेवा, संबंध-संपर्कामध्ये आनंद देण्याची सेवा, या भिन्न-भिन्न सेवांमध्ये मनाला बिझी ठेवा; कारण साऱ्या विश्वामध्ये रिचेस्ट आत्मे कोणते आहेत? तुम्हीच आहात ना! किती खजिने मिळाले आहेत? तर प्रत्येक खजिन्याद्वारे सेवा करा. खजिन्याला जितके सेवेमध्ये वापराल, तितके खजिने वाढत जातील म्हणून जसे आता स्व सेवेच्या बाबतीत अटेन्शन देता, तसेच दुःखी आत्म्यांची, आपल्या भक्तांची मनसाद्वारे किरणे देण्याची सेवा देखील संपूर्ण दिवसभरामध्ये अटेन्शन देऊन करा; खूप ओरडत आहेत, तुम्हाला ऐकू येत नाही. मेजॉरिटी प्रत्येक घरामध्ये कोणते ना कोणते दुःखाचे कारण आहे. अशा दुःखी लोकांना सुख देणारे कोण? बोला, कोण आहे? तुम्हीच तर आहात. तर या मनसा सेवेला संपूर्ण दिवसभरामध्ये चेक करा की, किती वेळ केली? जसे स्वतःसाठी वेळ देता, तसेच मनसा सेवेसाठी किती वेळ दिला? दयाळू आहात ना. तर दुःखी असणाऱ्यांवर दया करा. तुमचे एक गाणे देखील आहे ना, ‘ओ माँ बाप दुःखियों पर रहम करो’. बापदादांना खूप आवाज ऐकावे लागतात. तुम्हा लोकांना कमी ऐकू येतात परंतु आता ऐका. ते तुमच्याशिवाय अजून कुठे जातील, तुमचेच तर भाऊ-बहिणी आहेत. तर स्वतःचा देखील फायदा करा, मनाला व्यस्त ठेवा आणि दुःखी असणाऱ्यांचे दुःख हरण करा. आक्रोश करत आहेत, मन आक्रोश करत आहे. बापदादा तर ऐकत असतात, तर बाबा मुलांची आठवण करत आहेत - ‘ओ माझ्या लाडक्या मुलांनो, अतिप्रिय मुलांनो आता दयाळू रूप धारण करा’. आपल्या ब्राह्मणांमध्ये देखील एकमेकांचे सहयोगी बना. भले मग संस्कार कसाही असो, परंतु तुमचे काम काय आहे? संस्कारांशी टक्कर देणे की त्यांना देखील संस्कारांची टक्कर होण्यापासून सोडवणे. तुमचे टायटल देखील आहे ना, ‘दुःख हर्ता, सुख कर्ता’. बाबांचे साथीदार आहात ना. बाबांच्या साथीदारांनी काय संकल्प केला आहे? या विश्वाला दुःख-अशांती पासून परिवर्तित करून सुख-शांती प्रस्थापित करायचीच आहे. करायची आहे ना! हात वर करा. करायची आहे ना? की फक्त बघत बसायचे आहे; होत आहे, परंतु आता बदल घडवून आणायचाच आहे. भले मग ती ब्राह्मण आत्मा असो, बघत बसू नका की, ‘हे असे करत आहेत’ परंतु त्यांना देखील वाणी आणि मनसा संकल्पाद्वारे परिवर्तित करा; करायला नको का! बापदादा ऐकत असतात, बापदादांपर्यंत गोष्ट पोहोचवली, जेव्हा गोष्ट बाबांवर सोपवली तर आता स्वतः बाबांच्या डायरेक्शन अनुसार चाला, जबाबदार बापदादा आणि त्यांची साथीदार मुरब्बी मुले, निमित्त बनलेली मुले आहेत. तर सदैव आपल्या मनाला व्यर्थ संकल्पांऐवजी आता दुःखी आत्म्यांना, भले मग ते ब्राह्मण असोत अथवा कोणीही असोत, डिस्टर्ब आत्म्याला सहयोग द्या. सहयोगी बना. अच्छा.

नवीन मुले जी पहिल्यांदा आली आहेत त्यांना एक सेकंदामध्ये १० मिनिटांचे काम करायचे आहे. जरासुद्धा वेळ व्यर्थ घालवू नका, अटेन्शन द्या. आपला पुरुषार्थ तीव्र करून जितके पुढे जाऊ इच्छिता तितके पुढे जाऊ शकता. ही तुम्हा सर्वांना सर्व ब्राह्मणांच्या वतीने, बाबांच्या वतीने शुभ भावना, शुभ कामना आहे. अच्छा. (सर्व मधुबन निवासी उठा)

मधुबनवाले जर नसते तर तुमचे आदरातिथ्य कोणी केले असते. आरामात येता, खाता, पिता, रिफ्रेश होता, तर मधुबन वाल्यांसाठी टाळ्या वाजवा. बापदादा जाणतात की जागा कमी असल्यामुळे मधुबनवाल्यांना थोडे लांब बसून ऐकावे लागते. ही देखील सेवा आहे, मधुबनवाल्यांची ही देखील एक सेवा आहे. दुसऱ्यांना सुख देणे, सुखदाता झालात ना. तर मधुबनवाल्यांचे काम आहे सुख देणे आणि सुख घेणे; कारण आता जे कोणी येतात त्यांच्या अनुभवांवरून तुम्ही अनुभव ऐकवता, त्या अनुभवाने एकमेकांचा फायदा होतो. अनेक फायदे होतात परंतु वेळ कमी असल्यामुळे कमी ऐकवतात. परंतु मधुबनवाल्यांचे टायटल काय झाले? सुख देणे आणि सुख घेणे. सुखदात्याची मुले फॉलो फादर करणारी आहेत. अच्छा.

आता या वेळी जे आले आहेत त्यांच्यामध्ये जे रेग्युलर मुरली ऐकतात; असे कोणी आहेत जे मुरली ऐकत नाहीत, त्यांनी हात वर करा. असा कोणीही नाही. अच्छा. त्यांनी उठून उभे राहा जे वाचत नाहीत अथवा ऐकत नाहीत. थोडे आहेत. काही हरकत नाही परंतु आता जो काही वेळ बाकी मिळाला आहे तेवढ्या वेळामध्ये बाबांचे महावाक्य जरूर ऐका अथवा वाचा. बापदादा परमधाम मधून येतात, सूक्ष्मवतन मधून ब्रह्मा बाबा येतात, आणि येऊन महावाक्य उच्चारण करतात, त्यामुळे मुरली एक दिवस सुद्धा कधीही मिस करू नका. मिस कराल तर आपले बापदादांचे दिलतख्त निसटून जाईल. म्हणून जे कोणी मुरली मिस करतात त्यांनी हे समजून जावे की, आपण तीन तख्तांचे मालक नाही, दोन तख्तांचे मालक देखील यथाशक्ती बनू. म्हणून मुरली, मुरली, मुरली, कारण मुरलीमध्ये रोजची डायरेक्शन्स असतात, चारही सब्जेक्ट विषयी डायरेक्शन्स असतात, तर रोजची डायरेक्शन्स घ्यायची आहेत ना. तर जेपण कोणी मुरली मिस करत असतील, कारणे-अकारणे त्यांनी आपला प्रोग्राम बनवावा की कशी मुरली ऐकावी. काही ना काही उपाय शोधून काढा. आजकाल विज्ञानाची साधने तुमच्यासाठीच निघाली आहेत. ब्रह्मा बाबांमध्ये प्रवेशतेच्या १०० वर्षांपूर्वी हे विज्ञान निघाले आहे, ते तुमच्या देखील कामी येणार आहे त्यामुळे त्याचा वापर करा, फायदा उठवा. अच्छा, समोर बसलेल्या अथवा कुठूनही ऐकणाऱ्या मुलांना बापदादांची अंतःकरणापासून, उत्कटपणे प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

सेवेचा टर्न यु.पी. बनारसचा आहे:- यु.पी. वर ब्रह्मा बाबांचे, जगत अंबेचे खूप प्रेम राहिले आहे. ब्रह्मा बाबा जितके यु.पी. मध्ये आले आहेत तितकेच बॉम्बे मध्येही आले आहेत, परंतु यु.पी.मध्ये देखील आले आहेत. तर ज्या ठिकाणी ब्रह्मा बाबांचे पाऊल पडले, ते स्थान किती भाग्यवान आहे. लखनऊ आणि कानपूर दोन्ही या भाग्याचे अधिकारी बनले आहेत. बॉम्बे देखील बनले आहे परंतु आता यु.पी.चा टर्न आहे. डायरेक्ट मम्मा आणि बाबांच्या शिक्षणाचे थेंब यु.पी. मध्ये पडले आहेत. आता यु.पी. ने पुढे काय करायचे आहे? वाणीद्वारे जत्रांमध्ये सेवा तर करता परंतु आजच्या समयानुसार बापदादा जे सांगत आले आहेत, या पूर्वी देखील सांगितले आहे की, वारसदार आणि नावाजलेले माईक, नावाजलेले याचा अर्थ असा आहे की त्यांच्या बोलण्याचा प्रभाव ऐकणाऱ्यांवर पडणारा असावा, असे माईक तयार करा. असे वारसदार असलेल्यांचा ग्रुप प्रत्येक सेंटरवर असावा. यु.पी. मध्ये किती सेंटर्स आहेत, भरपूर आहेत ना! तर इतके वारसदार काढले पाहिजेत. हिशोब करा किती सेंटर्स आहेत आणि किती वारसदार बनले आहेत? आणि जेवढे बनायला हवेत तेवढे बनले आहेत की अजून बनवायचे बाकी आहेत? जर बनवायचे असतील तर वेळेचा काही भरवसा नाही, लवकरात लवकर वारसदार आणि माईक काढा, ज्यांच्या आवाजाने अनेक आत्म्यांच्या भाग्याची रेषा उजळेल कारण तुम्ही तर खूप सेवा केली आहे, जे जुने आहेत त्यांनी तर खूप सेवा केली आहे. आता सेवा करून घ्या. करणारे तयार करा. करू शकता ना! हात वर करा टीचर्स. अच्छा. टीचर्स देखील पुष्कळ आहेत. तर इतकेच तयार करा. प्रत्येक सेंटर भले मग ते छोटे असो अथवा मोठे सेंटर असो, सेंटरच्या लिस्टमध्ये जे आहेत त्यांनी आपले प्रमाण जरूर द्यायचे आहे कारण काळाचा काहीच भरवसा नाही. कधीही काहीही होऊ शकते म्हणून बापदादा जे पण सर्व झोन येतात, अथवा आलेले नाहीत, सर्व झोनला हेच सांगत आहेत की आता पुढे जा. क्लासेस तर चालत राहतात, संख्या देखील वाढत राहते परंतु आता निमित्त बनणारे तयार करा आणि असे तयार करण्यासाठी बापदादांनी पाहिले आहे, प्रत्येक झोनमध्ये असे आत्मे आहेत जे निमित्त बनू शकतात. तर यु.पी. एकतर भक्तांचे कल्याण करा, भक्त म्हणवणारे भले थोडे आहेत, परंतु भक्त देखील आहेत. त्यांना भक्तीचे फळ मिळवून द्या. खूप मेहनत करतात. बापदादांनी पाहिले आहे की प्रत्येकजण आपल्या पुरुषार्थामध्ये पुढे जातही आहेत परंतु अजूनही पुढे जाण्याची मार्जिन आहे. करत आहात, असे नाही की, करत नाही आहात. करत देखील आहात परंतु थोडा अजून स्पीड वाढवा. चांगले आहात आणि चांगली सेवा करता. सर्व दादी देखील तुम्हा लोकांना मुबारक देतात. पांडव देखील किती येतात. पांडव देखील कमी नाहीत. अनेक अशा सेवा आहेत ज्या फक्त पांडवच करू शकतात म्हणून पांडवांना देखील बापदादा आणि सर्व मधुबन निवासी मुबारक देत आहेत. अच्छा.

वरदान:-
बुद्धीरूपी पाऊल मर्यादेच्या रेषेच्या आत ठेवणारे सर्व प्राप्ती संपन्न शक्तिशाली भव

जी मुले बुद्धीरूपी पाऊल जरासुद्धा मर्यादेच्या रेषेबाहेर काढत नाहीत ती लकी आणि लव्हली बनतात. त्यांना कधीही कोणतेही विघ्न अथवा वादळ, अडचण, उदासी येऊ शकत नाही. जर येत असेल तर समजले पाहिजे की, जरुर बुद्धीरूपी पाऊल मर्यादेच्या रेषे बाहेर काढले आहे. रेषे बाहेर निघणे अर्थात फकीर बनणे म्हणून कधीही फकीर अर्थात मागणारे नाहीत, सर्व प्राप्ती संपन्न शक्तिशाली बना.

सुविचार:-
जे सदैव न्यारे आणि बाबांचे प्यारे आहेत ते सेफ राहतात.

हे अव्यक्त इशारे - अपवित्रतेच्या बीजाला सुद्ध ा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.

दृढता सफलतेची चावी आहे. सफलता तुम्हा मुलांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, म्हणून दृढतेला यूज करा, निष्काळजी बनू नका, ‘होऊन जाईल, करेन…’ असा विचार करू नका. दृढ संकल्पाद्वारे मनातील व्यर्थ संकल्पांना नष्ट करून विजयी बना.