02-09-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - जसा तुम्हाला निश्चय आहे की, ईश्वर सर्वव्यापी नाहीत, ते आमचे पिता आहेत,
हे इतरांनाही समजावून सांगून त्यांचा निश्चय पक्का करा आणि मग त्यांच्याकडून
ओपिनियन घ्या”
प्रश्न:-
बाबा आपल्या
मुलांना कोणती गोष्ट विचारतात, जे दुसरे कोणीही विचारू शकत नाही?
उत्तर:-
बाबा जेव्हा मुलांना भेटतात तेव्हा विचारतात - मुलांनो, या आधी तुम्ही केव्हा भेटले
आहात? ज्या मुलांना समजले आहे ते लगेच सांगतात - ‘होय बाबा, आम्ही ५००० वर्षांपूर्वी
तुम्हाला भेटलो होतो’. ज्यांना समजलेले नाही, ते मग गोंधळून जातात. असा प्रश्न
विचारण्याची बुद्धी दुसऱ्या कोणाला होणार देखील नाही. बाबाच तुम्हाला साऱ्या कल्पाचे
रहस्य समजावून सांगतात.
ओम शांती।
रूहानी मुलांप्रती रूहानी बेहदचे बाबा समजावून सांगत आहेत - ‘इथे तुम्ही बाबांसमोर
बसले आहात. घरामधून याच विचाराने निघता की आम्ही शिवबाबांकडे जातोय, जे ब्रह्माच्या
रथामध्ये येऊन आम्हाला स्वर्गाचा वारसा देत आहेत’. आपण स्वर्गामध्ये होतो मग ८४ चे
चक्र फिरून आता नरकामध्ये येऊन पडलो आहोत. दुसऱ्या कोणत्याही सत्संगामध्ये कोणाच्या
बुद्धीमध्ये या गोष्टी नसतील. तुम्ही जाणता, आपण शिवबाबांकडे जातो जे या रथामध्ये
येऊन शिकवतात देखील. ते आम्हा आत्म्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी आले आहेत. बेहदच्या
बाबांकडून जरूर बेहदचा वारसा मिळणार आहे. हे तर बाबांनी समजावून सांगितले आहे की मी
सर्वव्यापी नाही. सर्वव्यापक तर ५ विकार आहेत. तुमच्यामध्ये देखील ५ विकार आहेत
त्यामुळे तुम्ही महान दुःखी झाले आहात. ईश्वर सर्वव्यापी नाही, आता हा ओपिनियन जरूर
लिहून घ्यायचा आहे. तुम्हा मुलांना तर पक्का निश्चय आहे की ईश्वर पिता सर्वव्यापी
नाहीत. बाबा, सुप्रीम पिता आहेत, सुप्रीम शिक्षक, गुरु देखील आहेत. बेहदचे सद्गती
दाता आहेत. तेच शांती देणारे आहेत. आणखी दुसऱ्या कोणत्या ठिकाणी असा विचार कोणी करत
नाही की काय मिळणार आहे. फक्त कनरस - रामायण, गीता इत्यादी जाऊन ऐकतात. बुद्धीमध्ये
अर्थ काहीच नाही. आधी आपण परमात्मा सर्वव्यापी आहे असे म्हणत होतो. आता बाबा
समजावून सांगतात हे तर असत्य आहे. खूप मोठी निंदेची गोष्ट आहे. तर हा ओपिनियन देखील
खूप जरुरी आहे. आजकाल ज्यांच्याकडून तुम्ही ओपनिंग वगैरे करून घेता, ते लिहितात,
‘ब्रह्माकुमारी चांगले काम करत आहेत. खूप चांगले स्पष्टीकरण देतात. ईश्वराला
प्राप्त करण्याचा मार्ग सांगतात, यामुळे लोकांच्या मनावर चांगला प्रभाव पडतो’. बाकी
हा ओपिनियन कोणीही लिहून देत नाहीत की, ‘दुनियेतील मनुष्य हे जे म्हणतात की, ईश्वर
सर्वव्यापी आहे, ही खूप मोठी चूक आहे’. ईश्वर तर पिता, टीचर, गुरु आहेत. एकतर ही
मुख्य गोष्ट आहे, दुसरे मग असा ओपिनियन पाहिजे की, ‘या स्पष्टीकरणा वरून आम्ही असे
समजतो की गीतेचे भगवान श्रीकृष्ण नाहीत. भगवान काही कोणा मनुष्याला किंवा देवताला
म्हटले जात नाही. भगवान एक आहेत, ते पिता आहेत. त्या बाबांकडूनच शांती आणि सुखाचा
वारसा मिळतो’. अशा प्रकारचे ओपिनियन घ्यायचे आहेत. आत्ता तुम्ही जे ओपिनियन घेता ते
काही कामाचे लिहीतच नाहीत. हां, एवढे मात्र लिहितात की, इथे खूप चांगले शिक्षण
देतात. बाकी मुख्य गोष्ट ज्यामध्येच तुमचा विजय होणार आहे, ते लिहून घ्या की, ‘या
ब्रह्माकुमारी सत्य सांगतात की ईश्वर सर्वव्यापी नाही आहे. ते तर पिता आहेत, तेच
गीतेचे भगवान आहेत. बाबा येऊन भक्ती मार्गातून मुक्त करून ज्ञान देतात’. हा देखील
ओपिनियन जरुरी आहे की, ‘पतित-पावनी पाण्याची गंगा नाही, परंतु एक बाबा आहेत’. अशा
प्रकारचे ओपिनियन जेव्हा लिहितील तेव्हाच तुमचा विजय होईल. अजून वेळ बाकी आहे. आता
तुमची जी सेवा चालते, इतका खर्च होतो, हे तर तुम्ही मुलेच एकमेकांना मदत करत आहात.
बाहेरच्या लोकांना तर काही माहिती सुद्धा नाही. तुम्हीच आपल्या तन-मन-धनाने खर्च
करून स्वतःसाठी राजधानी स्थापन करत आहात. जो करेल त्याला मिळेल. जे करत नाहीत
त्यांना मिळणार देखील नाही. कल्प-कल्प तुम्हीच करता. तुम्हीच निश्चय बुद्धी बनता.
तुम्ही समजता की बाबा, पिता देखील आहेत, शिक्षक देखील आहेत, गीतेचे ज्ञान देखील
यथार्थ रीतीने ऐकवतात. भक्तिमार्गामध्ये भले गीता ऐकत आले आहात परंतु राज्य थोडेच
प्राप्त झाले आहे. ईश्वरीय मत बदलून आसुरी मत झाले आहे. कॅरॅक्टर (चारित्र्य)
बिघडून पतित बनले आहात. कुंभमेळ्यामध्ये किती करोडोंच्या संख्येने मनुष्य जातात.
जिथे-जिथे पाणी बघतात, तिथे जातात. असे समजतात पाण्यानेच पावन होणार. आता पाणी तर
सर्व ठिकाणाहून नद्यांमधून वाहतच असते. याने कोणी पावन बनू शकतो काय! पाण्यामध्ये
स्नान केल्याने आपण पतिता पासून पावन बनून देवता बनणार का? आता तुम्ही समजता याने
कोणीही पावन बनू शकत नाहीत. ही आहे चूक. तर या ३ गोष्टींवर ओपिनियन घेतले पाहिजे.
आता फक्त म्हणतात - ‘संस्था चांगली आहे’, त्यामुळे बऱ्याचजणांच्या डोक्यामध्ये जे
भ्रम आहेत की ब्रह्माकुमारींमध्ये जादू आहे, पळवून नेतात - हे विचार दूर होतात कारण
आवाज तर खूप पसरला आहे ना. परदेशापर्यंत हा आवाज गेला होता की यांना (ब्रह्मा
बाबांना) १६१०८ राण्या पाहिजेत, त्यांना ४०० मिळाल्या आहेत; कारण त्यावेळेस
सत्संगामध्ये ४०० जण येत होते. खूप जणांनी विरोध केला, पिकेटिंग (धरणे) देखील करत
होते, परंतु बाबांसमोर कोणाचेही चालू शकले नाही. सर्व म्हणत होते हा जादूगार मग आला
कुठून. आणि वंडर बघा, बाबा तर कराचीमध्ये होते. आपण होऊन सारा जमाव एकत्र मिळून
पळून आला. कुणालाच कळले नाही की आपल्या घरातून कसे पळून गेले. हा देखील विचार नाही
केला की इतके सर्वजण कुठे जाऊन राहतील. मग लगेच बंगला घेतला. तर जादूची गोष्ट झाली
ना. आता देखील म्हणत राहतात की, या जादूगारीणी आहेत, ब्रह्माकुमारींकडे जाल तर मग
परत येणार नाही, हे पती-पत्नीला भाऊ-बहीणी बनवतात, हे ऐकून मग कितीतरी येतच नाहीत.
आता तुमची प्रदर्शनी इत्यादी पाहून त्या ज्या गोष्टी बुद्धीमध्ये बसल्या आहेत, त्या
दूर होत आहेत. बाकी बाबांना जे ओपिनियन पाहिजे, तो कोणी लिहीत नाहीत. बाबांना तो
ओपिनियन पाहिजे. असे लिहावे की, गीतेचे भगवान श्रीकृष्ण नाहीत. सर्व दुनिया समजते
की श्रीकृष्ण भगवानुवाच. परंतु श्रीकृष्ण तर पूर्ण ८४ जन्म घेतात. शिवबाबा आहेत
पुनर्जन्म रहीत. तर यामध्ये खूप जणांचा ओपिनियन पाहिजे. गीता ऐकणारे तर पुष्कळ आहेत
आणि मग जेव्हा बघतील की, हे तर वर्तमानपत्रांमध्ये देखील आले आहे की गीतेचे भगवान
परमपिता परमात्मा शिव आहेत. तेच पिता, टीचर, सर्वांचे सद्गती दाता आहेत. शांती आणि
सुखाचा वारसा फक्त त्यांच्याकडून मिळतो. बाकी तुम्ही आता मेहनत करता, उद्घाटन करून
घेता, फक्त लोकांच्या भ्रामक कल्पना दूर होतात, स्पष्टीकरण चांगले मिळते. बाकी बाबा
जो म्हणतात तो ओपिनियन लिहावा. मुख्य ओपिनियन हा आहे. बाकी फक्त सल्ला देतात - ‘ही
संस्था खूप चांगली आहे’. याने काय होणार. होय, पुढे चालून जेव्हा विनाश आणि स्थापना
जवळ येईल तेव्हा तुम्हाला हे ओपिनियन देखील मिळतील. समजून घेऊन लिहितील. आता
तुमच्याजवळ येऊ तर लागले आहेत ना. आता तुम्हाला ज्ञान मिळाले आहे - एका बाबांची मुले
आपण सर्व भाऊ-भाऊ आहोत. हे कुणालाही समजावून सांगणे तर खूप सोपे आहे. सर्व
आत्म्यांचे पिता एक सुप्रीम बाबा आहेत. त्यांच्याकडून जरूर सुप्रीम बेहदचे पद देखील
मिळाले पाहिजे. ते तर ५ हजार वर्षांपूर्वी तुम्हाला मिळाले होते. ते लोक तर
कलियुगाची आयु लाखों वर्षांची आहे असे म्हणतात; आणि तुम्ही ५००० वर्षे म्हणता, किती
फरक आहे.
बाबा समजावून सांगत
आहेत ५००० वर्षांपूर्वी विश्वामध्ये शांती होती. हे एम ऑब्जेक्ट समोर उभे आहे.
यांच्या राज्यामध्ये विश्वामध्ये शांती होती. ही राजधानी आपण पुन्हा स्थापन करत
आहोत. पूर्ण विश्वामध्ये सुख-शांती होती. कोणत्या दुःखाचे नावही नव्हते. आता तर
अपार दुःख आहे. आपण हे सुख-शांतीचे राज्य स्थापन करत आहोत, आपल्याच तन-मन-धनाने
गुप्त रीतीने. बाबा देखील गुप्त आहेत, नॉलेज देखील गुप्त आहे, तुमचा पुरुषार्थ
देखील गुप्त आहे, म्हणून बाबा गाणे-कविता इत्यादी सुद्धा पसंत करत नाहीत. तो आहे
भक्तीमार्ग. इथे तर गप्प रहायचे आहे, शांतीने चालता-फिरता बाबांची आठवण करायची आहे
आणि सृष्टी चक्राला बुद्धीमध्ये फिरवायचे आहे. आता आपला हा अंतिम जन्म आहे, जुन्या
दुनियेमध्ये. मग आपण नवीन दुनियेमध्ये पहिला जन्म घेणार. आत्मा पवित्र जरूर पाहिजे.
आता तर सर्व आत्मे पतित आहेत. तुम्ही आत्म्याला पवित्र बनविण्यासाठी बाबांसोबत योग
लावता. बाबा स्वतः म्हणतात - मुलांनो, देहा सहीत देहाच्या सर्व संबंधांना सोडा. बाबा
नवीन दुनिया तयार करत आहेत, त्यांची आठवण करा तर तुमची पापे नष्ट होतील. अरे, बाबा
जे तुम्हाला विश्वाची बादशाही देतात, अशा बाबांना तुम्ही विसरून कसे जाता! ते
म्हणतात - ‘मुलांनो, फक्त हा अंतिम जन्म पवित्र बना. आता या मृत्यू लोकाचा विनाश
समोर उभा आहे. हा विनाश देखील हुबेहूब ५००० वर्षांपूर्वी असाच झाला होता. हे तर
आठवते आहे ना’. आपले राज्य होते तेव्हा दुसरा कोणताही धर्म नव्हता. बाबांकडे कोणीही
आले तर त्यांना विचारतात - आधी कधी भेटले आहात? कोणी मग ज्यांना समजले आहे ते
ताबडतोब सांगतात - ५००० वर्षांपूर्वी. जे नवीन येतात ते गोंधळून जातात. बाबा समजून
जातात की ब्राह्मणीने नीट समजावून सांगितलेले नाहीये. मग म्हणतात विचार करा, तर
आठवेल. ही गोष्ट तर दुसरे कोणीही विचारू शकणार नाही. विचारण्याची बुद्धी सुद्धा
होणार नाही. तो काय जाणणार या गोष्टींना. पुढे चालून तुमच्याजवळ पुष्कळजण येऊन
ऐकतील, जे या कुळाचे असतील. दुनिया तर बदलणार आहे जरूर. चक्राचे रहस्य तर समजावून
सांगितले आहे. आता नवीन दुनियेमध्ये जायचे आहे. जुन्या दुनियेला विसरून जा. वडील
जेव्हा नवीन घर बांधतात तर बुद्धी त्यामध्ये जाते. जुन्या घरामध्ये मग मोह राहत नाही.
ही तर आहे बेहदची गोष्ट. बाबा नवीन दुनिया स्वर्ग स्थापन करत आहेत त्यामुळे आता या
जुन्या दुनियेला बघत असताना देखील पाहू नका. मोह नवीन दुनियेमध्ये असावा. या जुन्या
दुनियेपासून वैराग्य. ते (संन्यासी लोक) तर हठयोगाने हदचा संन्यास करून जंगलामध्ये
जाऊन बसतात. तुमचे तर आहे साऱ्या जुन्या दुनियेपासून वैराग्य, यामध्ये तर अथाह दुःख
आहे. नवीन सतयुगी दुनियेमध्ये अपार सुख आहे तर जरूर त्याची आठवण करणार. इथे सर्व
दुःख देणारे आहेत. आई-वडील इत्यादी सर्वजण विकारामध्ये ढकलतात. बाबा म्हणतात - ‘काम
महा शत्रू आहे, त्यावर विजय प्राप्त केल्यानेच तुम्ही जगतजीत बनाल’. हा राजयोग बाबा
शिकवतात, ज्याद्वारे आपण हे पद प्राप्त करतो. तुम्ही बोला - आम्हाला स्वप्नामध्ये
भगवान म्हणतात - ‘पावन बना तर स्वर्गाची राजाई मिळेल’. तर आता मी एक जन्म अपवित्र
बनून माझे राज्य गमावणार थोडेच. या पवित्रतेच्या गोष्टीवरच भांडण होते. द्रौपदी ने
पुकारले, ‘हा दु:शासन मला विवस्त्र करत आहे’. हा देखील खेळ दाखवतात की, द्रौपदीला
श्रीकृष्ण २१ साड्या देतात. आता बाबा बसून समजावतात किती दुर्गती झाली आहे. अपार
दुःख आहे ना. सतयुगामध्ये अपार सुख होते. आता मी आलो आहे - अनेक अधर्मांचा विनाश आणि
एका सत् धर्माची स्थापना करण्यासाठी. तुम्हाला राज्य-भाग्य देऊन वानप्रस्थमध्ये
निघून जाणार. अर्धा कल्प मग माझी गरजच भासणार नाही. तुम्ही कधी आठवण देखील करणार
नाही. तर बाबा समजावून सांगत आहेत - ‘तुमच्यासाठी सर्वांच्या मनामध्ये जे उलटे
व्हायब्रेशन आहे ते निघून जाऊन आता ठीक होत आहे’. बाकी मुख्य गोष्ट आहे - ओपिनियन
लिहून घ्या कि, ‘ईश्वर सर्वव्यापी नाही आहे’. त्याने तर येऊन राजयोग शिकवला आहे’.
‘पतित-पावन’ देखील बाबाच आहेत. पाण्याच्या नद्या थोडेच पावन बनवू शकतील. पाणी तर
सर्व ठिकाणी असते. आता बेहदचे बाबा म्हणतात - ‘स्वतःला आत्मा समजा. देहासहित देहाचे
सर्व संबंध सोडा’. आत्माच एक शरीर सोडून दुसरे घेते. ते (दुनियावाले) मग असे
म्हणतात - ‘आत्मा निर्लेप आहे’. ‘आत्मा सो परमात्मा’, या आहेत भक्तिमार्गातील गोष्टी.
मुले म्हणतात - ‘बाबा, आठवण कशी करावी?’ अरे, स्वतःला आत्मा समजता ना. आत्मा किती
छोटा बिंदू आहे तर त्यांचे पिता देखील इतकेच छोटे असणार. ते पुनर्जन्मामध्ये येत
नाहीत. हे ज्ञान बुद्धीमध्ये आहे. बाबांची आठवण का नाही येणार. चालता-फिरता बाबांची
आठवण करा. ठीक आहे, बाबांचे मोठे रूपच समजा. परंतु आठवण तर एकाचीच करायची आहे ना,
तर तुमची पापे नष्ट होतील. दुसरा तर कोणता उपाय सुद्धा नाही. जे समजतात ते म्हणतात
- ‘बाबा तुमच्या आठवणीने आम्ही पावन बनून पावन दुनिया, विश्वाचे मालक बनतो तर आम्ही
का नाही आठवण करणार’. एकमेकांना देखील आठवण करून द्यायची आहे तर पापे नष्ट होतील.
अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) जसे बाबा
आणि नॉलेज गुप्त आहे, तसा पुरुषार्थ देखील गुप्त करायचा आहे. गाणी-कविता इत्यादीं
ऐवजी गप्प राहणे चांगले आहे. शांतीमध्ये चालता-फिरता बाबांची आठवण करायची आहे.
२) जुनी दुनिया बदलत
आहे त्यामुळे यामधून ममत्व काढून टाकायचे आहे, याला बघत असताना देखील बघायचे नाही.
बुद्धी नवीन दुनियेमध्ये लावायची आहे.
वरदान:-
ब्राह्मण
जन्माच्या विशेषतेला नॅचरल नेचर बनविणारे सहज पुरुषार्थी भव
ब्राह्मण जन्म देखील
विशेष, तर ब्राह्मण धर्म आणि कर्म देखील विशेष अर्थात सर्वश्रेष्ठ आहे कारण
ब्राह्मण कर्मामध्ये फॉलो साकार ब्रह्मा बाबांना करतात. तर ब्राह्मणांची नेचरच
विशेष नेचर आहे, साधारण अथवा मायावी नेचर ब्राह्मणांची नेचर नाही. फक्त हेच
स्मृतीस्वरूपामध्ये रहावे की, ‘मी विशेष आत्मा आहे’, ही नेचर जेव्हा नॅचरल होईल
तेव्हा बाप समान बनणे सहज अनुभव कराल. स्मृती स्वरूप सो समर्थी स्वरूप बनाल - हाच
सोपा पुरुषार्थ आहे.
बोधवाक्य:-
पवित्रता आणि
शांतीची लाईट चारही दिशांना पसरविणारेच लाईट हाऊस आहेत.