02-09-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही विश्वामध्ये शांती स्थापन करण्याच्या निमित्त आहात, त्यामुळे
तुम्ही कधीही अशांत होता कामा नये”
प्रश्न:-
बाबा कोणत्या
मुलांना फर्मानबरदार (आज्ञाधारक) मुले म्हणतात?
उत्तर:-
बाबांचा जो मुख्य आदेश आहे की, ‘मुलांनो, अमृतवेलेला उठून बाबांची आठवण करा, या
मुख्य आदेशाचे पालन करतात, पहाटे स्नान इत्यादी करून फ्रेश होऊन ठरलेल्या वेळेवर
आठवणीच्या यात्रेमध्ये राहतात, बाबा त्यांना सपूत अथवा आज्ञाधारक म्हणतात, तेच जाऊन
राजा बनतील. कपूत मुले झाडू मारतील.
ओम शांती।
याचा अर्थ तर मुलांना समजावून सांगितला आहे. ओम् अर्थात मी आत्मा आहे. असे सर्वजण
म्हणतात - जीव आत्मा आहे जरूर आणि सर्व आत्म्यांचे एक पिता आहेत. शरीरांचे पिता
वेगवेगळे असतात. हे देखील मुलांच्या बुद्धीमध्ये आहे, हदच्या पित्याकडून हदचा आणि
बेहदच्या पित्याकडून बेहदचा वारसा मिळतो. आता यावेळी मनुष्यांना वाटते की,
विश्वामध्ये शांती व्हावी. जर चित्रांवरून समजावून सांगायचे असेल तर शांतीसाठी
कलियुग अंत आणि सतयुग आदिच्या संगमावर घेऊन आले पाहिजे. ही आहे सतयुग नवीन दुनिया,
त्यामध्ये एक धर्म असतो तर पवित्रता-शांती-सुख असते. त्याला म्हटले जाते हेवन. हे
तर सर्वजण मानतील. नवीन दुनियेमध्ये सुख असते, दुःख असू शकत नाही. कोणालाही समजावून
सांगणे खूप सोपे आहे. शांती आणि अशांतीची गोष्ट इथे विश्वामध्येच होत असते. ते तर
आहेच निर्वाणधाम, जिथे शांती-अशांतीचा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही. मुले जेव्हा
भाषण करतात तेव्हा सर्वप्रथम विश्वामध्ये शांतीची गोष्टच उचलून धरली पाहिजे. मनुष्य
शांतीसाठी खूप प्रयत्न करतात, त्यांना पारितोषिके देखील मिळत असतात. वास्तविक इथे
पळापळ करण्याची गोष्टच नाही. बाबा म्हणतात - फक्त आपल्या स्वधर्मामध्ये टीका तर
विकर्म विनाश होतील. स्वधर्मामध्ये टिकाल तर शांती होईल. तुम्ही आहातच सदैव शांत
पित्याची मुले. हा वारसा त्यांच्याकडून मिळतो. त्याला काही मोक्ष म्हणणार नाही.
मोक्ष तर भगवंताला देखील मिळू शकत नाही. भगवंताला देखील पार्टमध्ये जरूर यायचे आहे.
म्हणतात - ‘कल्प-कल्प, कल्पाच्या संगमयुगावर मी येतो’. तर भगवंताला देखील मोक्ष नाही
तर मग मुलांना मोक्ष कसा मिळू शकतो. या गोष्टी संपूर्ण दिवसभर विचार सागर मंथन
करण्याच्या आहेत. बाबा तर तुम्हा मुलांनाच समजावून सांगतात. तुम्हा मुलांना समजावून
सांगण्याची प्रॅक्टिस जास्त आहे. शिवबाबा समजावून सांगतात तर तुम्ही ब्राह्मणच समजू
शकता. विचार सागर मंथन तुम्हाला करायचे आहे. सेवेवर तुम्ही मुले आहात. तुम्हाला तर
खूप समजावून सांगायचे असते. दिवस-रात्र सेवेमध्ये असता. म्युझियममध्ये पूर्ण दिवस
येतच राहतील. काही ठिकाणी रात्रीचे दहा-अकरा वाजेपर्यंत देखील येतात. काही ठिकाणी
पहाटे ४ वाजल्यापासूनच सेवा करायला चालू करतात. हे तर घर आहे, जेव्हा इच्छा असेल
तेव्हा बसू शकता. सेंटर्सवर तर बाहेरून दुर-दुरहून येतात तर वेळ निश्चित करावा लागतो.
इथे तर कोणत्याही वेळी मुले उठू शकतात. परंतु अशावेळी तर शिकायचे नाही जेव्हा मुले
उठतील आणि आणि डुलक्या घेतील म्हणून पहाटेची वेळ ठेवली जाते. जे स्नान इत्यादी करून
फ्रेश होतात आणि तरीही वेळेवर येत नाहीत तर त्यांना आज्ञाधारक म्हणू शकत नाही.
लौकिक पित्याला देखील सपूत आणि कपूत मुले असतात ना. बेहदच्या पित्याला देखील असतात.
सपूत जाऊन राजा बनतील, कपूत जाऊन झाडू मारतील. सर्व माहिती तर होते ना.
श्रीकृष्ण
जन्माष्टमीवर देखील समजावून सांगितले आहे. श्रीकृष्णाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा तर
स्वर्ग आहे. एकच राज्य असते. विश्वामध्ये शांती असते. स्वर्गामध्ये फार थोडे मनुष्य
असतील. ती आहेच नवीन दुनिया. तिथे अशांती असू शकत नाही. शांती तेव्हा असते जेव्हा
एक धर्म असतो. जो धर्म बाबा स्थापन करतात. नंतर जेव्हा बाकीचे इतर धर्म येतात तर
अशांती होते. तिथे तर आहेच शांती, १६ कला संपूर्ण आहेत ना. चंद्र देखील जेव्हा
संपूर्ण असतो तेव्हा किती सुंदर दिसतो, त्याला फुल मून (पौर्णिमा) म्हटले जाते.
त्रेतामध्ये ३/४ म्हणणार, खंडित झाला ना. दोन कला कमी झाल्या. संपूर्ण शांती
सतयुगामध्ये असते. सृष्टी जेव्हा २५ टक्के जुनी होते तेव्हा काही ना काही गडबड तर
होणारच. दोन कला कमी झाल्यामुळे सौंदर्य कमी झाले. स्वर्गामध्ये तर एकदम शांती,
नरकामध्ये एकदम अशांती. ही वेळ आहे जेव्हा मनुष्य विश्वामध्ये शांतीची अपेक्षा
करतात, या आधी असा आवाज नव्हता की विश्वामध्ये शांती असावी. आता आवाज उठला आहे कारण
आता विश्वामध्ये शांती स्थापित होत आहे. आत्म्याला वाटते की, विश्वामध्ये शांती असली
पाहिजे. मनुष्य तर देह-अभिमानामध्ये असल्या कारणाने फक्त म्हणत राहतात - विश्वामध्ये
शांती असावी. ८४ जन्म आता पूर्ण झाले आहेत. हे बाबाच येऊन समजावून सांगतात.
बाबांचीच आठवण करतात. ते कधी, कोणत्या रूपामध्ये येऊन स्वर्गाची स्थापना करतील,
त्यांचे नावच आहे हेवनली गॉडफादर. हे कोणालाच माहिती नाही - हेवन (स्वर्ग) कसा
रचतात. श्रीकृष्ण तर रचू शकत नाही. त्याला म्हटले जाते देवता. मनुष्य देवतांना नमन
करतात. त्यांच्यामध्ये दैवी गुण आहेत म्हणून देवता म्हटले जाते. चांगले गुण
असणाऱ्याला म्हणतात ना - हा तर जसा की देवता आहे. भांडण-तंटा करणाऱ्याला म्हटले जाते
- हा तर जसा की असुर आहे. मुले जाणतात आपण बेहद बाबांच्या समोर बसलो आहोत. तर
मुलांचे आचरण किती चांगले असले पाहिजे. अज्ञान काळामध्ये देखील बाबांनी (ब्रह्माबाबांनी)
बघितलेले आहे की, ६-७ कुटुंबे एकत्र राहतात, एकदम क्षीरखंड होऊन चालत आहेत. काही
ठिकाणी तर घरामध्ये फक्त दोघे असतील तरी देखील भांडण करत राहतील. तर तुम्ही आहात
ईश्वरीय संतान. अतिशय क्षीरखंड होऊन राहिले पाहिजे. सतयुगामध्ये क्षीरखंड असतात, इथे
तुम्ही क्षीरखंड व्हायला शिकता तर खूप प्रेमाने राहिले पाहिजे. बाबा म्हणतात -
स्वतःची तपासणी करा की आपण कोणते विकर्म तर केले नाही ना? कोणाला दुःख तर दिले नाही
ना? असे कोणी बसून स्वतःची तपासणी करत नाहीत. ही खूप समजून घेण्याची गोष्ट आहे.
तुम्ही मुले आहात विश्वामध्ये शांती स्थापन करणारी. जर घरामध्येच अशांती निर्माण
करत असाल तर मग शांती कशी स्थापन कराल. लौकिक पित्याला मुलगा जेव्हा त्रास देतो तर
म्हणतील - हा तर मेलेला बरा. एखादी सवय लागते तर ती मग पक्की होते. हेच समजत नाहीत
की, आपण तर बेहदच्या पित्याची मुले आहोत, आपल्याला तर विश्वामध्ये शांती स्थापन
करायची आहे. शिवबाबांची मुले आहात आणि जर अशांत होत असाल तर शिवबाबांकडे या. ते तर
हिरा आहेत, ते तुम्हाला लगेच युक्ती सांगतील - अशा प्रकारे शांती होऊ शकते. शांतीचा
तोडगा देतील. असे खूप आहेत ज्यांचे आचरण दैवी घराण्यासारखे नाही आहे. तुम्ही आता
तयार होत आहात गुल-गुल दुनियेमध्ये जाण्यासाठी. ही आहेच घाणेरडी दुनिया वेश्यालय,
याची तर घृणा येते. विश्वामध्ये शांती असेल तर ती नवीन दुनियेमध्ये असेल. संगमावर
असू शकत नाही. इथे शांत बनण्याचा पुरुषार्थ करत आहात. पूर्ण पुरुषार्थ केला नाहीत
तर मग सजा खावी लागेल. माझ्यासोबत तर धर्मराज आहे ना. जेव्हा हिशोब चुकता होण्याची
वेळ येईल तेव्हा खूप मार खाल. कर्माचा भोग जरूर आहे. आजारी पडतात, तो देखील कर्मभोग
आहे ना. बाबांच्यावर तर कोणीही नाही. समजावून सांगतात - मुलांनो, गुल-गुल बना तर
उच्च पद प्राप्त कराल. नाहीतर काहीच फायदा नाही. ईश्वर पिता ज्यांची अर्धाकल्प आठवण
केली जर त्यांच्याकडून वारसा घेतला नाही तर तुम्ही मुले काय कामाची. परंतु ड्रामा
अनुसार हे देखील जरूर होणार आहे. तर समजावून सांगण्याच्या युक्त्या खूप आहेत.
विश्वामध्ये शांती तर सतयुगामध्ये होती, जिथे या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते.
युद्ध देखील जरूर होईल कारण अशांती आहे ना. श्रीकृष्ण पुन्हा सतयुगामध्ये येईल.
म्हणतात की, कलियुगामध्ये देवतांची सावली पडू शकत नाही. या गोष्टी आता तुम्ही मुलेच
ऐकत आहात. तुम्ही जाणता शिवबाबा आपल्याला शिकवत आहेत. धारणा करायची आहे, यामध्ये
पूर्ण आयुष्यच जाते. म्हणतात ना - पूर्ण आयुष्यभर समजावून सांगितले तरी देखील समजत
नाहीत.
बेहदचे बाबा म्हणतात
- सर्वप्रथम मुख्य गोष्ट तर समजावून सांगा की ज्ञान वेगळे आणि भक्ती वेगळी गोष्ट आहे.
अर्धा कल्प आहे दिवस, अर्धा कल्प आहे रात्र. शास्त्रांमध्ये कल्पाचे आयुष्यच उलटे
लिहिले आहे. तर अर्धे-अर्धे सुद्धा होऊ शकत नाही. तुमच्यामध्ये देखील कोणी शास्त्र
इत्यादी वाचलेले नसतील तर ते चांगले आहे. वाचलेले असतील तर संशय घेतील, प्रश्न
विचारत राहतील. खरेतर जेव्हा वानप्रस्थ अवस्था होते तेव्हा भगवंताची आठवण करतात,
कोणाच्या ना कोणाच्या सल्ल्यानुसार, मग जसे गुरु शिकवतील. भक्ती देखील शिकवतात. असा
कोणीही नाही जो भक्ती शिकवत नाही. त्यांच्यामध्ये भक्तीची ताकद आहे तेव्हाच तर इतके
फॉलोअर्स बनतात. फॉलोअर्सना भक्त-पुजारी म्हणणार. इथे सर्वजण आहेत पुजारी. तिथे
पुजारी कोणी असत नाही. भगवान कधी पुजारी बनत नाही. अनेक पॉईंट्स समजावून सांगितले
जातात, हळूहळू तुम्हा मुलांमध्ये देखील समजावून सांगण्याची ताकद येत जाईल.
आता तुम्ही सांगता
श्रीकृष्ण येत आहेत. सतयुगामध्ये जरूर श्रीकृष्ण असेल. नाहीतर जगाचा इतिहास-भूगोल
कसा रिपीट होणार. फक्त एक श्रीकृष्ण तर असणार नाही, यथा राजा-राणी तथा प्रजा असेल
ना. यामध्ये देखील समजून घेण्याची गोष्ट आहे. तुम्ही मुले समजता आपण तर बाबांची
संतान आहोत. बाबा वारसा देण्यासाठी आले आहेत. स्वर्गामध्ये काही सगळेच तर येणार
नाहीत. ना त्रेतामध्ये सगळे येऊ शकणार. झाडाची हळू-हळू वृद्धी होत राहते. मनुष्य
सृष्टी रुपी झाड आहे. तिथे आहे आत्म्यांचे झाड. इथे ब्रह्माद्वारे स्थापना, मग शंकरा
द्वारे विनाश आणि मग पालना… हे शब्द देखील याच क्रमानुसार बोलले पाहिजेत. मुलांच्या
बुद्धीमध्ये हा नशा आहे, हे सृष्टी चक्र कसे चालते. रचना कशी होते. आता नवीन छोटी
रचना आहे ना. ही जशी बाजोली (कोलांटी उडीचा खेळ) आहे. प्रथम अनेक शूद्र आहेत, मग
बाबा येऊन रचना रचतात - ब्रह्माद्वारे ब्राह्मणांची. ब्राह्मण बनतात शेंडी. शेंडी
आणि पाय आपसामध्ये एकत्र येतात. आधी ब्राह्मण पाहिजे. ब्राह्मणांचे युग खूप छोटे
असते. त्या नंतर आहेत देवता. हे वर्णांचे चित्र देखील चांगले कामाचे आहे. हे चित्र
समजावून सांगण्यासाठी खूप सोपे आहे. व्हरायटी मनुष्यांचे व्हरायटी रूप आहे. समजावून
सांगताना किती मजा येते. जेव्हा ब्राह्मण आहेत तेव्हा सर्व धर्म आहेत. शुद्रांपासून
ब्राह्मणांचे सॅपलिंग (कलम) लागते. मनुष्य तर झाडाचे कलम लावतात. बाबा देखील कलम
लावतात जिथे विश्वामध्ये शांती असेल. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) सदैव हे
लक्षात ठेवायचे आहे की आपण ईश्वरीय संतान आहोत. आपल्याला क्षीरखंड होऊन रहायचे आहे.
कोणालाही दुःख द्यायचे नाही.
२) आपली आतून तपासणी
करायची आहे आपल्याकडून कोणते विकर्म तर होत नाही ना! अशांत होण्याची किंवा अशांती
पसरविण्याची सवय तर नाही आहे?
वरदान:-
पवित्रतेच्या
शक्तीद्वारे सदा सुखाच्या संसारामध्ये राहणारे बेगमपूरचे बादशहा भव
सुख-शांतीचे फाउंडेशन
पवित्रता आहे. जी मुले मन-वचन-कर्म तिन्हीमध्ये पवित्र बनतात तेच हायनेस आणि
होलीनेस (महान आणि परमपावन) असतात. जिथे पवित्रतेची शक्ती आहे तिथे सुख-शांती
स्वतःच आहे. पवित्रता ही सुख-शांतीची माता आहे. पवित्र आत्मे कधीही उदास होऊ शकत
नाहीत. ते बेगमपूरचे बादशहा आहेत त्यांचा ताज (मुकुट) देखील न्यारा आणि तख्त (सिंहासन)
देखील न्यारे आहे. लाईटचा ताज पवित्रतेचीच निशाणी आहे.
बोधवाक्य:-
‘मी आत्मा आहे,
शरीर नाही’ - याचे चिंतन करणे हेच स्व-चिंतन आहे.
अव्यक्त इशारे:- आता
लगनच्या (उत्कटतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा.
पॉवरफुल योग अर्थात
उत्कटतेचा अग्नी; ज्वालारूपी आठवणच भ्रष्टाचाराच्या, अत्याचाराच्या अग्नीला समाप्त
करेल आणि सर्व आत्म्यांना सहयोग देईल, याद्वारेच बेहदची वैराग्य वृत्ती प्रज्वलित
होईल. आठवणीचा अग्नी एका बाजूने त्या अग्नीला समाप्त करेल आणि दुसऱ्या बाजूने
आत्म्यांना परमात्म संदेशाची, शितल स्वरूपाची अनुभूती करवेल; याद्वारेच आत्मे
पापांच्या आगीतून मुक्त होऊ शकतील.