02-10-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आठवणीमध्ये राहून प्रत्येक कार्य कराल तर अनेकांना तुमचा साक्षात्कार होत राहील”

प्रश्न:-
संगमयुगावर कोणत्या विधीने आपल्या अंतःकरणाला शुद्ध (पवित्र) बनवू शकतो?

उत्तर:-
आठवणीमध्ये राहून भोजन बनवा आणि आठवणीमध्ये खाल तर अंतःकरण शुद्ध होईल. संगमयुगावर तुम्हा ब्राह्मणांद्वारे बनविलेले पवित्र भोजन देवतांना देखील खूप पसंत आहे. ज्यांना ब्रह्मा भोजनाची कदर असते ते ताट धुऊन देखील पितात. माहिमा देखील खूप आहे. आठवणीमध्ये राहून बनविलेले भोजन खाल्ल्याने ताकद मिळते, अंतःकरण शुद्ध होते.

ओम शांती।
संगमावरच बाबा येतात. दररोज मुलांना सांगावे लागते की, रुहानी बाबा रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत. असे का म्हणतात की, ‘मुलांनो, स्वतःला आत्मा समजा?’ मुलांना याची आठवण राहावी की खरोखर बेहदचे बाबा आहेत, आम्हा आत्म्यांना शिकवतात. सेवेसाठी भिन्न-भिन्न पॉईंट्सवर समजावून सांगतात. मुले म्हणतात सेवा नाही आहे, आम्ही बाहेर राहून सेवा कशी करायची? बाबा सेवेच्या खूपच सोप्या युक्त्या सांगतात. सोबत चित्र असावे. रघुनाथाचे काळे चित्र देखील असावे, गोरे देखील असावे. श्रीकृष्णाचे किंवा श्री नारायणाचे चित्र गोरे देखील असावे, काळे देखील असावे. भले मग छोटे चित्र जरी असले तरी चालेल. श्रीकृष्णाचे अगदी छोटे चित्र देखील बनवतात. तुम्ही मंदिराच्या पुजाऱ्याला देखील विचारू शकता - ‘खरे तर हे गोरे असताना तुम्ही यांना काळे का बनविले आहे?’ वास्तविक शरीर काही काळे असत नाही ना. तुमच्याकडेही खूप चांगले गोरे-गोरे असतात, परंतु यांना काळे का बनविले आहे? हे तर तुम्हा मुलांना समजावून सांगितले आहे की आत्मा कसे भिन्न-भिन्न नाव-रूप धारण करत खाली उतरते. जेव्हापासून काम चितेवर चढते तेव्हापासून काळी बनते. जगत नाथ किंवा श्रीनाथद्वारेमध्ये पुष्कळ यात्रेकरू येतात, तुम्हाला निमंत्रण देखील मिळते. तुम्ही बोला, ‘आम्ही श्रीनाथाच्या ८४ जन्मांची जीवन कहाणी ऐकवतो. बंधू आणि भगिनींनो येऊन ऐका’. असे भाषण इतर कोणीही करू सुद्धा शकणार नाहीत. तुम्ही समजावून सांगू शकता हे काळे का बनले आहेत? प्रत्येकाला पावन पासून पतित जरूर बनायचे आहे. देवता जेव्हा वाम मार्गामध्ये गेले आहेत तेव्हा त्यांना काळे बनवले आहे. काम-चितेवर बसल्यामुळे आयरन एज्ड (कलियुगी) बनतात. आयरन (लोखंडाचा) कलर काळा असतो, सोन्याचा गोल्डन, त्यांना म्हणणार गोरे. तेच परत ८४ जन्मानंतर काळे बनतात. शिडीचे चित्र देखील जरूर सोबत असावे. शिडीचे चित्र देखील मोठे असावे म्हणजे कोणीही लांबूनही व्यवस्थित पाहू शकतील आणि तुम्ही समजावून सांगाल की भारताची अशी गती झाली आहे. लिहिले देखील आहे - ‘उत्थान आणि पतन’. मुलांना सेवेची खूप आवड असली पाहिजे. समजावून सांगायचे आहे की, हे दुनियेचे चक्र कसे फिरते, गोल्डन एज, सिल्व्हर एज, कॉपर एज (सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग)... आणि मग हे पुरुषोत्तम संगमयुग देखील दाखवायचे आहे. भले जास्त चित्रे घेऊ नका. शिडीचे चित्र तर मुख्य भारतासाठी आहे. तुम्ही समजावून सांगू शकता आता पुन्हा तुम्ही पतिता पासून पावन कसे बनू शकता. पतित-पावन तर एक बाबाच आहेत. त्यांची आठवण केल्याने सेकंदामध्ये जीवनमुक्ती मिळते. तुम्हा मुलांना हे सारे ज्ञान आहे. बाकी तर सर्व अज्ञान निद्रेमध्ये झोपलेले आहेत. भारत ज्ञानामध्ये होता तेव्हा खूप श्रीमंत होता. आता भारत अज्ञानामध्ये आहे तर किती गरीब झाला आहे. ज्ञानी मनुष्य आणि अज्ञानी मनुष्य असतात ना. देवी-देवता आणि मनुष्य तर प्रसिद्ध आहेत. देवता आहेत सतयुग-त्रेतामध्ये आणि मनुष्य आहेत द्वापर-कलियुगामध्ये. मुलांच्या बुद्धीमध्ये नेहमी हे आले पाहिजे की सेवा कशी करावी? ते देखील बाबा समजावून सांगत राहतात. शिडीचे चित्र समजावून सांगण्यासाठी खूप चांगले आहे. बाबा म्हणतात गृहस्थ व्यवहारामध्ये रहा. शरीर निर्वाहासाठी धंदा इत्यादी तर करायचाच आहे. भौतिक शिक्षण देखील शिकायचे आहे. बाकी जो वेळ मिळेल त्यात सेवेचा विचार चालला पाहिजे - आपण इतरांचे कल्याण कसे करावे? इथे (मधुबनमध्ये) तर तुम्ही अनेकांचे कल्याण करू शकत नाही. इथे तर येताच बाबांची मुरली ऐकण्यासाठी. यातच जादू आहे. बाबांना जादूगार म्हणतात ना. गातात देखील - ‘मुरली तेरे में है जादू…’. तुमच्या मुखाद्वारे जी मुरली वाजते त्यामध्ये जादू आहे. मनुष्यापासून देवता बनतात. बाबांशिवाय असा कुणी जादूगार असतही नाही. गायन देखील आहे - ‘मनुष्य से देवता किये करत न लागी वार’. जुन्या दुनियेपासून नवीन दुनिया जरूर होणारच आहे. जुन्या दुनियेचा विनाश देखील जरूर होणार आहे. यावेळी तुम्ही राजयोग शिकत आहात तर जरूर राजा देखील बनायचे आहे. आता तुम्ही मुले समजता ८४ जन्मानंतर पुन्हा पहिल्या नंबरचा जन्म पाहिजे कारण वर्ल्डची हिस्ट्री-जिओग्राफी रिपीट होते. सतयुग-त्रेता जे होऊन गेले आहे ते पुन्हा जरूर रिपीट होणार आहे.

तुम्ही इथे बसले आहात तरी देखील बुद्धीमध्ये हे लक्षात ठेवायचे आहे की आम्ही परत जातो आणि मग सतोप्रधान देवी-देवता बनतो. त्यांना देवता म्हटले जाते. आता तर मनुष्यांमध्ये दैवी गुण नाही आहेत. तर सेवा तुम्ही कुठेही करू शकता. कितीही कामधंदा इत्यादी असो, गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना देखील कमाई करत रहायची आहे. यामध्ये मुख्य गोष्ट आहे पवित्रतेची. प्युरिटी आहे तर पीस-प्रॉस्पेरिटी (शांतता आणि समृद्धी) आहे. संपूर्ण पवित्र बनलात तर मग इथे राहू शकत नाही कारण आपल्याला शांतीधामला जरूर जायचे आहे. आत्मा प्युअर (पवित्र) बनली की मग आत्म्याला या जुन्या शरीरासोबत रहायचे नाही आहे. हे तर अपवित्र आहे ना. पाच तत्वेच अपवित्र आहेत. शरीर देखील या पाच तत्वांनीच बनते. याला मातीचा पुतळा म्हटले जाते. पाच तत्वांचे शरीर एकदा नष्ट होते, दुसरे बनते. आत्मा तर कायम असतेच. आत्मा काही बनणारी गोष्ट नाहीये. शरीर आधी किती छोटे मग किती मोठे होते. किती ऑर्गन्स मिळतात ज्याद्वारे आत्मा सर्व पार्ट बजावते. ही दुनियाच वंडरफुल आहे. सर्वात वंडरफुल आहेत बाबा, जे आत्म्यांना परिचय देतात. मी आत्मा किती छोटी आहे. आत्माच प्रवेश करते. प्रत्येक गोष्ट वंडरफुल आहे. प्राण्यांची शरीरे इत्यादी कशी बनतात, आश्चर्य आहे ना. आत्मा तर सर्वांमध्ये तीच छोटी आहे. हत्ती किती मोठा असतो, त्याच्यामध्ये इतकी छोटी आत्मा जाऊन बसते. बाबा तर मनुष्य जन्माची गोष्ट समजावून सांगतात. मनुष्य किती जन्म घेतात? ८४ लाख जन्म तर काही नाही आहेत. समजावून सांगितले आहे - जितके धर्म आहेत तितकी व्हरायटी बनते. प्रत्येक आत्मा किती फीचर्सचे शरीर घेते, वंडर आहे ना. मग जेव्हा चक्र रिपीट होते, प्रत्येक जन्मामध्ये फीचर्स, नाव, रूप इत्यादी बदलतात. असे म्हणणार नाही कृष्ण काळा, कृष्ण गोरा. नाही, त्याची आत्मा आधी गोरी होती मग ८४ जन्म घेत-घेत काळी बनते. तुमची देखील आत्मा भिन्न-भिन्न फीचर्स, भिन्न-भिन्न शरीरे घेऊन पार्ट बजावते. हा देखील ड्रामा आहे.

तुम्हा मुलांना कधी कशाचीही चिंता वाटता कामा नये. सर्व ॲक्टर्स आहेत. एक शरीर सोडून दुसरे घेऊन परत पार्ट बजावायचाच आहे. प्रत्येक जन्मामध्ये नाती इत्यादी बदलत जातात. तर बाबा समजावून सांगत आहेत की हा पूर्वनियोजित ड्रामा आहे. आत्मा ८४ जन्म घेत-घेत तमोप्रधान बनली आहे, आता पुन्हा आत्म्याला सतोप्रधान बनायचे आहे. पावन तर जरूर बनायचे आहे. पावन सृष्टी होती, आता पतित आहे आता पुन्हा पावन बनणार आहे. सतोप्रधान, तमोप्रधान शब्द तर आहेत ना. सतोप्रधान सृष्टी मग सतो, रजो, तमो सृष्टी बनते. आता जे तमोप्रधान बनले आहेत तेच परत सतोप्रधान कसे बनणार? पतिता पासून पावन कसे बनणार, पावसाच्या पाण्याने तर पावन बनणार नाहीत. पावसामुळे तर मनुष्यांचा मृत्यू देखील होतो. पूर येतो तेव्हा कित्येकजण बुडून मरतात. आता बाबा समजावून सांगत राहतात हे सर्व खंड राहणार नाहीत. नॅचरल कॅलॅमिटीज (नैसर्गिक आपदा) देखील मदत करतील, अनेक मनुष्य, प्राणी इत्यादी वाहून जातात. असे नाही की पाण्याने पावन बनतात, ते तर शरीर नष्ट होते. शरीराला तर पतितापासून पावन बनायचे नाही आहे. पावन बनायचे आहे आत्म्याला. ते पतित-पावन तर एक बाबाच आहेत. भले ते (दुनियेतील गुरु) जगद्गुरु म्हणून संबोधले जातात परंतु गुरुचे तर काम आहे सद्गती देणे, आणि सद्गती दाता तर एक बाबाच आहेत. सद्गुरु बाबाच सद्गती देतात. बाबा तर समजावून खूप सांगत राहतात, हे (ब्रह्मा बाबा) देखील ऐकतात ना. गुरु लोक देखील शिष्याला शिकवण्यासाठी बाजूला बसवतात. हे देखील त्यांच्या बाजूला बसतात. बाबा समजावून सांगतात तर हे देखील समजावून सांगत असतील ना म्हणून गुरु ब्रह्मा नंबरवनमध्ये जातात. शंकरासाठी तर असे म्हणतात - नेत्र उघडताच भस्म करून टाकतात मग त्यांना गुरुसुद्धा म्हटले जाणार नाही. तरी देखील बाबा म्हणतात - ‘मुलांनो, मामेकम् (मज एकाची) आठवण करा’. बरीच मुले म्हणतात - ‘इतक्या काम-धंद्याच्या चिंतेमध्ये असतो, मग आम्ही स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण कशी करणार?’ बाबा समजावून सांगतात की, भक्तीमार्गामध्ये देखील तुम्ही - ‘हे ईश्वर’, ‘हे भगवान’ म्हणून आठवण करता ना. आठवण तेव्हा करता जेव्हा कोणते दुःख येते. मृत्यूच्या वेळी देखील म्हणतात ‘राम-राम’ म्हण. बऱ्याच अशा संस्था आहेत ज्या रामाच्या नावाचे दान देतात. जसे तुम्ही ज्ञानाचे दान देता आणि ते म्हणतात - राम बोला, राम बोला. तुम्ही देखील म्हणता शिवबाबांची आठवण करा. ते तर शिवाला जाणतही नाहीत. असेच ‘राम-राम’ म्हणतात. आता जेव्हा परमात्मा सर्वांमध्ये आहे असे म्हणतात तर मग हे तरी का म्हणतात की, ‘राम म्हणा’? बाबा बसून समजावून सांगतात रामाला अथवा कृष्णाला परमात्मा म्हटले जात नाही, त्यांना देवता म्हटले जाते, त्यांच्या देखील कला कमी होत जातात. प्रत्येक गोष्टीची कला कमी तर होतेच होते. कपडा देखील आधी नवीन, नंतर जुना होतो.

तर बाबा इतक्या साऱ्या गोष्टी समजावून सांगतात तरी देखील पुन्हा म्हणतात - ‘माझ्या गोड-गोड रूहानी मुलांनो, स्वतःला आत्मा समजा. सिमर-सिमर सुख पाओ’. इथे तर दुःखधाम आहे. बाबांची आणि वारशाची आठवण करा. आठवण करता-करता अथाह सुख मिळेल. कलह-क्लेश, रोगराई इत्यादी जे काही आहे सर्वांपासून सुटका होईल. तुम्ही २१ जन्मांसाठी निरोगी बनता. ‘कलह-क्लेष मिटें सब तन के, जीवनमुक्ति पद पाओ’. असे गातात परंतु कृतीमध्ये आणत नाहीत. आता बाबा तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये समजावून सांगत आहेत - बाबांची आठवण कराल तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, सुखी व्हाल. शिक्षा भोगून भाकरीचा तुकडा खाणे चांगले नाही. सर्वांना ताजी भाकरी आवडते. आजकाल तर तेलच वापरले जाते. तिथे (स्वर्गामध्ये) तर तुपाच्या नद्या वाहतात. तर मुलांनी बाबांची आठवण करायची आहे. बाबा असे देखील म्हणत नाहीत की इथे बसून बाबांची आठवण करा. नाही, चालता-फिरता, हिंडताना शिवबाबांची आठवण करायची आहे. नोकरी इत्यादी सुद्धा करायची आहे. बुद्धीमध्ये बाबांची आठवण राहिली पाहिजे. लौकिक पित्याची मुले नोकरी इत्यादी करत असतात तरीही आठवण राहते ना. कोणीही जर विचारले तर ते आपण कोणाची मुले आहोत ते लगेच सांगतील. पित्याच्या प्रॉपर्टीची देखील आठवण असते. तुम्ही देखील बाबांची मुले बनले आहात तर प्रॉपर्टी देखील लक्षात आहे. बाबांची देखील आठवण करायची आहे इतर कुणाशीही संबंध नाही. सारा पार्ट आत्म्यामध्येच नोंदलेला आहे जो इमर्ज होतो. या ब्राह्मण कुळामध्ये तुमचा जो कल्प-कल्प पार्ट चालत आला आहे तोच इमर्ज होत राहतो. बाबा म्हणतात - जेवण बनवा, मिठाई बनवा, शिवबाबांची आठवण करत रहा. शिवबाबांची आठवण करत बनवाल तर मिठाई खाणाऱ्याचे देखील कल्याण होईल. कुठे साक्षात्कार देखील होऊ शकतो. ब्रह्माचा देखील साक्षात्कार होऊ शकतो. शुद्ध अन्नाचे सेवन केले तर तुम्हाला ब्रह्माचा, श्रीकृष्णाचा, शिवाचा साक्षात्कार घडू शकतो. ब्रह्मा आहेत इथे. ब्रह्माकुमार-कुमारींचे नाव तर होते ना. अनेकांना साक्षात्कार होत राहतील कारण बाबांची आठवण करता ना. बाबा युक्त्या तर खूपच सांगतात. ते तोंडाने राम-राम म्हणतात, तुम्हाला मुखावाटे काहीच बोलायचे नाहीये. जसे ते लोक समजतात गुरुनानकांना भोग लावत आहोत, तुम्ही देखील समजता आम्ही शिवबाबांना भोग लावण्यासाठी बनवत आहोत. शिवबाबांची आठवण करत बनवाल तर अनेकांचे कल्याण होऊ शकते. त्या भोजनामध्ये ताकद येते, म्हणून बाबा भोजन बनविणाऱ्यांना देखील म्हणतात - शिवबाबांची आठवण करून बनवता का? लिहिलेले देखील आहे - ‘शिवबाबांची आठवण आहे?’ आठवणीमध्ये राहून बनवाल तर खाणाऱ्यांना देखील ताकद मिळेल, अंतःकरण शुद्ध होईल. ब्रह्मा भोजनाचे गायन देखील आहे ना. ब्राह्मणांनी बनवलेले भोजन देवता देखील पसंत करतात. हे देखील शास्त्रांमध्ये आहे - ब्राह्मणांनी बनवलेले भोजन खाल्ल्यामुळे बुद्धी शुद्ध होते, ताकद मिळते. ब्रह्मा भोजनाची खूप महिमा आहे. ब्रह्मा भोजनाची ज्यांना कदर असते, ते ताट धुवून देखील पितात, असे भोजन खूप श्रेष्ठ समजतात. भोजनाशिवाय तर कोणी राहू शकत नाही. दुष्काळामध्ये तर उपाशीपोटी मरतात. आत्माच भोजन खाते, या ऑर्गन्स द्वारे स्वाद आत्माच घेते, चांगले-वाईट हे आत्म्याने म्हटले ना. हे खूप स्वादिष्ट आहे, शक्तीवाले आहे. पुढे चालून जस-जशी तुमची उन्नती होत जाईल तसे भोजन देखील तुम्हाला असे मिळत राहील. म्हणून बाबा मुलांना म्हणतात - ‘शिवबाबांची आठवण करून भोजन बनवा’. बाबा जे समजावून सांगतात त्याला अमलात आणले पाहिजे ना.

तुम्ही आहात माहेरी, जाणार आहात सासरी. सूक्ष्मवतनमध्ये देखील आपसात भेटतात. भोग घेऊन जातात. देवतांना भोग लावतात ना. देवता येतात तुम्ही ब्राह्मण तिथे जाता. तिथे मैफिल भरते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कोणत्याही गोष्टीची चिंता करायची नाही कारण हा ड्रामा एकदम ॲक्युरेट बनलेला आहे. यामध्ये सर्व ॲक्टर्स आपापला पार्ट बजावत आहेत.

२) ‘जीवनमुक्त’ पद प्राप्त करण्यासाठी किंवा सदा सुखी बनण्यासाठी आतमध्ये बाबांचीच आठवण करायची आहे. मुखावाटे काहीही बोलायचे नाही. भोजन बनवताना किंवा खाते वेळी बाबांच्या आठवणीमध्ये जरूर रहायचे आहे.

वरदान:-
स्वार्थ, ईर्षा आणि चिडचिडेपणापासून मुक्त राहणारे क्रोध मुक्त भव

कोणताही विचार भले मांडा, सेवेसाठी स्वतःला ऑफर करा. परंतु विचाराच्या मागे त्या विचारांना इच्छेच्या रूपामध्ये बदलू नका. जेव्हा संकल्प इच्छेच्या रूपामध्ये बदलतो तेव्हा चिडचिडेपणा येतो. परंतु निस्वार्थ होऊन विचार मांडा, स्वार्थ ठेवून नाही. मी म्हटले आहे तर व्हायलाच पाहिजे - असा विचार करू नका, ऑफर करा, ‘का, कशासाठी’मध्ये येऊ नका, नाहीतर ईर्षा-घृणा हे एक-एक त्यांचे सोबती देखील येतील. स्वार्थ किंवा इर्षेमुळे देखील क्रोध उत्पन्न होतो, आता यापासून देखील मुक्त बना.

बोधवाक्य:-
शांतिदूत बनून सर्वांना शांती देणे - हेच तुमचे ऑक्युपेशन (व्यवसाय) आहे.