02-10-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - सर्वात गोड शब्द ‘बाबा’ आहे, तुमच्या मुखातून सदैव बाबा-बाबा निघत रहावे, सर्वांना शिवबाबांचा परिचय देत रहा”

प्रश्न:-
सतयुगामध्ये कोणताही मनुष्यच तर काय परंतु प्राणी देखील आजारी पडत नाहीत, असे का?

उत्तर:-
कारण संगमयुगावर बाबा सर्व आत्म्यांचे आणि बेहद सृष्टीचे असे काही ऑपरेशन करतात, ज्यामुळे आजाराचे नामो-निशाणही राहत नाही. बाबा आहेत अविनाशी सर्जन. आता जी सारी सृष्टी आजारी आहे, या सृष्टीमध्ये मग दुःखाचे नामो-निशाणही राहणार नाही. इथल्या दुःखांपासून वाचण्यासाठी खूप-खूप बहाद्दूर बनायचे आहे.

गीत:-
तुम्हे पाके हमने…

ओम शांती।
डबल देखील म्हणू शकता, डबल ओम् शांती. आत्मा स्वतःचा परिचय देत आहे. मी शांत स्वरूप आत्मा आहे. आमचे निवासस्थान शांतीधाममध्ये आहे आणि बाबांची आपण सर्व संतान आहोत. सर्व आत्मे ओम् म्हणतात, तिथे आपण सर्व भाऊ-भाऊ आहोत मग इथे भाऊ-बहीणी बनतो. आता भाऊ-बहिणी पासून नात्याची सुरुवात होते. बाबा समजावून सांगतात सर्व माझी मुले आहेत, ब्रह्माची देखील तुम्ही संतान आहात म्हणून भाऊ-बहीणी झालात. तुमचे आणखी कोणतेही नाते नाही. प्रजापित्याची संतान ब्रह्माकुमार-कुमारी आहात. जुन्या दुनियेला चेंज करण्यासाठी या वेळीच येतात. बाबा ब्रह्मा द्वारेच पुन्हा नवीन सृष्टी रचतात. ब्रह्मा सोबत देखील नाते आहे ना. युक्ती देखील किती छान आहे. सर्व ब्रह्माकुमार-कुमारी आहेत. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे आणि आपल्याला भाऊ-बहीणी समजायचे आहे. क्रिमिनल आय (विकारी दृष्टी) असता कामा नये, इथे तर कुमार-कुमारी जस-जसे मोठे होत जातात तर डोळे विकारी बनत जातात आणि मग विकारी कृत्य करतात. क्रिमिनल ॲक्ट (विकारी कृत्य) होते रावण राज्यामध्ये. सतयुगामध्ये विकारी कृत्य होत नाही. क्रिमिनल (विकारी) हा शब्दच असत नाही. इथे तर विकारी कृत्य खूप आहे. त्यासाठी मग कोर्ट इत्यादी देखील आहे. तिथे (सतयुगामध्ये) कोर्ट इत्यादी असत नाही. वंडर आहे ना. ना जेल, ना पोलीस, ना चोर इत्यादी असतात. या सर्व आहेत दुःखाच्या गोष्टी, ज्या इथे होत आहेत म्हणून मुलांना सांगितले गेले आहे, हा तर खेळ आहे सुख आणि दुःखाचा, हार आणि जीत चा. याला देखील तुम्हीच समजता. गायले गेले आहे - ‘माया से हारे हार है’ (माये समोर हरतो त्याचा पराभव होतो), बाबा येऊन मायेवर अर्ध्या कल्पासाठी विजय मिळवून देतात. मग अर्धा कल्प हार खावी लागते. ही काही नवीन गोष्ट नाहीये. हा तर सामान्य पै-पैशाचा खेळ आहे; पुन्हा तुम्ही माझी आठवण करता तर आपले राज्य-भाग्य अर्ध्या कल्पासाठी परत घेता. रावणराज्यामध्ये मला विसरून जाता. रावण शत्रू आहे, त्याला दरवर्षी भारतवासीच जाळतात. ज्या देशामध्ये जास्त भारतवासी असतील तिथे देखील जाळत असतील. असे म्हणतील हा भारतवासीयांच्या धर्माचा उत्सव आहे. दसरा साजरा करतात तर मुलांनी समजावून सांगायचे आहे - ती तर हदची गोष्ट आहे. रावणराज्य तर आता साऱ्या विश्वावर आहे. केवळ लंकेवरच नाही. विश्व तर खूप मोठे आहे ना. बाबांनी समजावून सांगितले आहे ही सारी सृष्टी सागरावर उभी आहे. मनुष्य म्हणतात - खाली एक बैल किंवा गाय आहे, ज्याच्या शिंगावर सृष्टी उभी आहे आणि जेव्हा थकतात तेव्हा बदलते. आता अशी काही गोष्ट तर नाही आहे. पृथ्वी तर पाण्यावर उभी आहे, चारही बाजूंनी पाणीच पाणी आहे. तर आता साऱ्या दुनियेमध्ये रावण राज्य आहे मग राम अथवा ईश्वरीय राज्य बनविण्यासाठी बाबांना यावे लागते. फक्त ईश्वर म्हटल्याने देखील म्हणतात की, ईश्वर तर सर्वशक्तिमान आहे, सर्व काही करू शकतात. उगाच फालतू महिमा होते. इतके प्रेम असत नाही. इथे ईश्वराला पिता म्हटले जाते. बाबा म्हटल्याने वारसा मिळण्याची गोष्ट होते. शिवबाबा म्हणतात - नेहमी बाबा-बाबा म्हटले पाहिजे. ईश्वर अथवा प्रभू इत्यादी शब्द विसरायला झाले पाहिजेत. बाबांनी सांगितले आहे - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा’. प्रदर्शनी इत्यादीमध्ये देखील जेव्हा समजावून सांगता तर वारंवार शिवबाबांचा परिचय द्या. एक शिवबाबाच उच्च ते उच्च आहेत, ज्यांना गॉडफादर म्हटले जाते. बाबा शब्द सर्वात गोड आहे. शिवबाबा, शिवबाबा असे मुखातून निघते. मुख तर मनुष्याचेच असेल. गाईचे मुख थोडेच असू शकते. तुम्ही आहात शिवशक्ती. तुमच्या मुखकमलातून ज्ञान अमृत निघते. तुमचे नाव प्रसिद्ध करण्यासाठी गोमुख म्हटले आहे. गंगेसाठी असे म्हणणार नाहीत. मुखकमलातून अमृत आता निघत आहे. ज्ञान अमृत पिले तर मग विष पिऊ शकत नाही. अमृत पिल्यामुळे तुम्ही देवता बनता. आता मी आलो आहे - असुरांना देवता बनविण्यासाठी. तुम्ही आता दैवी संप्रदाय बनत आहात. संगमयुग केव्हा आणि कसे होते, हे देखील कोणाला ठाऊक नाही आहे. तुम्ही जाणता आपण ब्रह्माकुमार-कुमारी पुरुषोत्तम संगम-युगी आहोत. बाकी जे कोणी आहेत ते सर्व कलियुगी आहेत. तुम्ही किती थोडेजण आहात. झाडाचे देखील नॉलेज तुम्हालाच आहे. झाड आधी छोटे असते मग त्याची वृद्धी होते. मुलांचा जन्मदर कमी कसा करता येईल यासाठी किती शोध लावतात. परंतु ‘नर चाहत कुछ और, भई कुछ और की और’ (मनुष्याला एक गोष्ट घडावी असे वाटते आणि देवाला दुसरीच गोष्ट मान्य असते). सर्वांचा मृत्यू तर होणारच आहे. जर आता पीक खूप चांगले असेल, आणि पाऊस पडून किती नुकसान करतो. नॅचरल कॅलॅमिटीज (नैसर्गिक आपत्तीला) कोणी समजू शकत नाही. कोणत्याही गोष्टीचा ठिकाणा थोडाच असतो. कुठे पीक आलेले असेल आणि गारा पडल्या तर किती नुकसान होते. पाऊस आला नाही तरी सुद्धा नुकसान, याला नैसर्गिक आपत्ती म्हटले जाते. या तर पुष्कळ येणार आहेत, यापासून वाचण्यासाठी खूप बहाद्दूर झाले पाहिजे. कोणाचे ऑपरेशन होत असेल, तर बरेचजण ते पाहू देखील शकत नाहीत, बघताच बेशुद्ध पडतात. आता या साऱ्या छी-छी (विकारी) दुनियेचे ऑपरेशन होणार आहे. बाबा म्हणतात मी येऊन सर्वांचे ऑपरेशन करतो. संपूर्ण सृष्टी रोगी आहे. अविनाशी सर्जन देखील नाव बाबांचेच आहे. ते साऱ्या विश्वाचे ऑपरेशन करतील, ज्यामुळे मग विश्वामध्ये राहणाऱ्यांना कधी दुःख होणार नाही. किती मोठे सर्जन आहेत. आत्म्यांचे सुद्धा ऑपेरेशन, आणि बेहद सृष्टीचे देखील ऑपरेशन करणारे आहेत. तिथे मनुष्यच तर काय पशु देखील आजारी पडत नाहीत. बाबा समजून सांगतात - माझा आणि मुलांचा काय पार्ट आहे. याला म्हटले जाते रचनेच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान जे तुम्हीच घेत आहात. मुलांना तर सर्वात आधी याचा आनंद झाला पाहिजे.

आज सतगुरुवार आहे, नेहमी सत्य बोलले पाहिजे. व्यापारामध्ये देखील म्हणतात ना - खरे बोला. फसवणुकीच्या गोष्टी करू नका. तरी देखील प्रलोभना मध्ये येऊन थोडासा जास्त दर सांगून सौदा करतील. खरे तर कधी कोण बोलतच नाहीत. खोटेच खोटे बोलतात म्हणून सत्याची आठवण करतात. म्हणतात ना - ‘सत नाम संग है’. आता तुम्ही जाणता बाबा जे सत्य आहेत, तेच आम्हा आत्म्यांसोबत येतील. आता सत् च्या सोबत तुम्हा आत्म्यांचा संग झाला आहे तर तुम्हीच सोबत जाणार. तुम्ही मुले जाणता शिवबाबा आलेले आहेत, ज्याला ट्रूथ म्हटले जाते. ते आम्हा आत्म्यांना पवित्र बनवून एकदाच सोबत घेऊन जातील. सतयुगामध्ये असे म्हणत नाहीत की, ‘राम-राम संग है’ किंवा ‘सत् नाम संग है’. नाही. बाबा म्हणतात आता मी तुम्हा मुलांजवळ आलो आहे, डोळ्यांच्या पापण्यांवर बसवून घेऊन जातो. हे स्थूल डोळे नाहीत, तिसरा नेत्र. तुम्ही जाणता यावेळेस बाबा आलेले आहेत - सोबत घेऊन जातील. शंकराची वरात नाही, ही शिवाच्या मुलांची वरात आहे. ते पतींचेही पती आहेत. असे म्हणतात तुम्ही सर्व ब्राइड्स (वधू) आहात. मी आहे ब्राइडग्रूम (नवरदेव). तुम्ही सर्व आशिक आहात, मी आहे माशूक. माशूक एकच असतो ना. तुम्ही अर्ध्या कल्पापासून मज माशूकचे आशिक आहात. आता मी आलो आहे सर्व आहेत भक्तिणी. भक्तांची रक्षा करणारा आहे भगवान. आत्मा भक्ती करते शरीरासोबत. सतयुग-त्रेता मध्ये भक्ती असत नाही. भक्तीचे फळ सतयुगामध्ये भोगता, जे आता मुलांना देत आहेत. ते तुमचे माशूक आहेत, जे तुम्हाला सोबत घेऊन जातील मग तुम्ही आपल्या पुरुषार्था अनुसार जाऊन राज्य-भाग्य घ्याल. हे कुठेही लिहिलेले नाही. म्हणतात की, शंकराने पार्वतीला अमरकथा ऐकवली. तुम्ही सर्व आहात पार्वती. मी आहे कथा ऐकविणारा अमरनाथ. अमरनाथ एकालाच म्हटले जाते. उच्च ते उच्च बाबा आहेत, त्यांना तर आपला देह नाही आहे, म्हणतात की, ‘मी अमरनाथ तुम्हा मुलांना अमरकथा ऐकवतो’. शंकर-पार्वती इथे कुठून आले. ते तर आहेतच सूक्ष्मवतनमध्ये, जिथे सूर्य-चंद्राचा प्रकाश देखील नसतो.

सत्य बाबा आता तुम्हाला सत्य कथा ऐकवत आहेत. बाबांशिवाय सत्य कथा कोणी ऐकवू शकत नाही. हे देखील समजता विनाश होण्यासाठी वेळ लागतो. किती मोठी दुनिया आहे, कितीतरी असंख्य घरे इत्यादी कोसळून नष्ट होतील. भूकंपामध्ये किती नुकसान होते. कित्येक जण मरतात. बाकी तुमचे छोटेसे झाड असेल. दिल्ली परिस्तान बनेल. एकाच परीस्तानामध्ये लक्ष्मी-नारायणाचे राज्य चालते. किती मोठे-मोठे महाल बनत असतील. बेहदची जागीर (इस्टेट) मिळते ना. तुम्हाला काहीच खर्च करावा लागत नाही. बाबा म्हणतात यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) काळामध्ये धान्य किती स्वस्त होते. तर सतयुगामध्ये किती स्वस्त असेल. दिल्ली इतके मोठे तर प्रत्येकाचे घर आणि जमीन इत्यादी असेल. गोड्या नद्यांच्या काठी तुमचे राज्य चालेल. प्रत्येकाकडे काय असणार नाही. सदैव मुबलक अन्न उपलब्ध असेल. तिथली फळे-फुले देखील बघता ना, किती मोठी-मोठी असतात. तुम्ही शुबी रस पिऊन येता. म्हणत होते - तिथे माळी आहे. आता माळी तर जरूर वैकुंठामध्ये अथवा नदीकाठी असेल. तिथे किती थोडे असतील. कुठे आताचे इतके करोड, तिथे मात्र नऊ लाख असतील आणि सर्व काही तुमचे असेल. बाबा अशी राजाई देतात जी आपल्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आकाश, धरती इत्यादी सर्वांचे तुम्ही मालक असता. गाणे देखील मुलांनी ऐकले. अशा प्रकारची सहा-आठ गाणी जी आहेत जी ऐकल्यानेच आनंदाचा पारा चढतो. बघा अवस्थेमध्ये काही गडबड असेल, तर गाणे चालू करा. ही आहेत आनंदाची गाणी. तुम्ही तर अर्थ देखील जाणता. स्वतःला हर्षितमुख ठेवण्यासाठी बाबा अनेक युक्त्या सांगतात. मुले बाबांना लिहितात - ‘बाबा, इतकी खुशी राहत नाही. मायेची वादळे येतात’. अरे, मायेची वादळे आली - तुम्ही संगीत वाजवा. वातावरण आनंदी बनविण्यासाठी मोठ-मोठ्या मंदिरांमध्ये देखील फाटकावर संगीत वाजवले जाते. मुंबईमध्ये माधवबाग मध्ये लक्ष्मी-नारायणाच्या मंदिराच्या फाटकावरच संगीत वाजत असते. तुम्हाला म्हणतात - ही सिनेमातील गाणी का लावता? त्यांना काय माहिती ही सुद्धा ड्रामा अनुसार उपयोगी पडणारी चीज आहे. याचा अर्थ तर तुम्ही मुले समजता. ही ऐकल्याने देखील तुम्ही आनंदी व्हाल. परंतु मुले विसरून जातात. घरामध्ये देखील कोणी दुःखी असेल तरी देखील गाणी ऐकून आनंदी होतील. ही (गाणी) खूप मौल्यवान चीज आहे. कुणाच्या घरामध्ये भांडण चालत असेल तर बोला - ‘भगवानुवाच काम महा शत्रू आहे. यावर विजय प्राप्त केल्याने आपण विश्वाचे मालक बनू मग फुलांची वर्षा होईल, जयजयकार होईल. सोन्याच्या फुलांची बरसात होईल’. आता तुम्ही काट्यांपासून सोन्याचे फूल बनत आहात ना. मग तुमचे अवतरण होईल, फुले बरसत नाहीत परंतु तुम्ही फूल बनून येता. लोकांना वाटते सोन्याच्या फुलांची बरसात होते. एक राजकुमार परदेशामध्ये गेला, तिथे पार्टी दिली होती, त्याच्यासाठी सोन्याची फुले बनविली होती. सर्वांवर त्याची उधळण केली. आनंदाच्या भरात इतका पाहुणचार केला. खऱ्याखुऱ्या सोन्याची बनवली होती. बाबा (ब्रह्मा बाबा) त्यांच्या स्टेट इत्यादीला देखील चांगल्या रीतीने जाणतात. वास्तविक तुम्ही फूल बनून येता. तुम्ही सोन्याची फुले वरून उतरता. तुम्हा मुलांना विश्वाच्या बादशाहीची केवढी मोठी लॉटरी मिळत आहे. जसे लौकिक पिता मुलांना म्हणतात - तुमच्यासाठी हे घेऊन आलो आहे तर मुले किती आनंदित होतात. बाबा देखील म्हणतात - तुमच्यासाठी बहिश्त (स्वर्ग) घेऊन आलो आहे. तुम्ही तिथे राज्य करणार तर किती आनंद झाला पाहिजे. कोणाला छोटीशी सौगात देतात तर म्हणतात - ‘बाबा, तुम्ही तर आम्हाला विश्वाची बादशाही देता, त्यासमोर ही सौगात काय आहे. अरे शिवबाबांची यादगार सोबत राहील तर शिवबाबांची आठवण राहील आणि तुम्हाला पद्म मिळतील. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सत् च्या सोबत परत जायचे आहे त्यामुळे नेहमी सत्यवादी होऊन रहायचे आहे. कधीही खोटे बोलायचे नाही.

२) आपण ब्रह्मा बाबांची मुले आपसामध्ये भाऊ-बहीणी आहोत, त्यामुळे कोणतेही क्रिमिनल ॲक्ट (विकारी कृत्य) करायचे नाही. भाऊ-भाऊ आणि भाऊ-बहिण या व्यतिरिक्त इतर कोणत्याही नात्याचे भान राहू नये.

वरदान:-
आठवणीच्या बळाने आपल्या आणि दुसऱ्याच्या श्रेष्ठ पुरुषार्थाच्या गती-विधिला जाणणारे मास्टर त्रिकालदर्शी भव

जसे सायन्सवाले पृथ्वीवरून स्पेस मध्ये जाणाऱ्यांच्या प्रत्येक गति-विधिला जाणू शकतात. तसे तुम्ही त्रिकालदर्शी मुले सायलेन्स अर्थात आठवणीच्या बळाने आपल्या आणि दुसऱ्यांच्या श्रेष्ठ पुरुषार्थाच्या किंवा स्थितीच्या गती-विधिला स्पष्टपणे जाणू शकता. दिव्य बुद्धी बनल्यामुळे, आठवणीच्या शुद्ध संकल्पामध्ये स्थित झाल्यामुळे ‘त्रिकालदर्शी भव’चे वरदान प्राप्त होते आणि नवीन-नवीन प्लॅन प्रॅक्टिकलमध्ये आणण्यासाठी स्वतः इमर्ज होतात.

बोधवाक्य:-
सर्वांचे सहयोगी बना तर स्नेह स्वतः प्राप्त होत राहील.

अव्यक्त इशारे:- स्वयं प्रति आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा. कोणीही असे म्हणू शकत नाही की आम्हाला तर सेवेचा चान्स मिळत नाही. कोणी बोलू शकत नाहीत तर मनसा वायुमंडळाद्वारे सुखाची वृत्ती, सुखमय स्थिती द्वारे सेवा करा. तब्येत ठीक नसेल तर घरी बसून देखील सहयोगी बना, फक्त मनसामध्ये शुद्ध संकल्पांचा स्टॉक जमा करा, शुभ भावनांनी संपन्न बना.