02-11-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - संगमयुग हे भाग्यशाली बनण्याचे युग आहे, यामध्ये तुम्ही जेवढा पाहिजे तेवढा आपल्या भाग्याचा तारा चमकवू शकता”

प्रश्न:-
१:- आपल्या पुरुषार्थाला वेगवान करण्याचे सोपे साधन कोणते आहे?

उत्तर:-
फॉलो फादर करत चाला तर पुरुषार्थ वेगाने होईल. बाबांनाच बघा, आई तर गुप्त आहे. फॉलो फादर केल्यामुळेच बाप समान श्रेष्ठ बनाल त्यामुळे काटेकोरपणे फॉलो करत रहा.

प्रश्न:-
२:- बाबा कोणत्या मुलांना बुद्धू (मठ्ठ) समजतात?

उत्तर:-
ज्यांना बाबांना भेटल्याचा सुद्धा आनंद होत नाही - ते म्हणजे बुद्धू झाले ना. असे बाबा, जे विश्वाचा मालक बनवतात, त्यांची संतान बनल्यानंतर सुद्धा आनंद होत नसेल तर बुद्धूच म्हणणार ना.

ओम शांती।
तुम्ही गोड-गोड मुले आहात भाग्यशाली तारे. तुम्ही जाणता - आपण शांतीधामची देखील आठवण करतो, बाबांची देखील आठवण करतो. बाबांची आठवण केल्यामुळे आम्ही पवित्र बनून घरी निघून जाणार. इथे बसून हा विचार करता ना. बाबा बाकी काहीच त्रास देत नाहीत. जीवनमुक्तीला तर कोणी जाणतही नाहीत. ते सर्व पुरुषार्थ करतात मुक्तीसाठी, परंतु मुक्तीचा अर्थ समजत नाहीत. कोणी म्हणतात आम्ही ब्रह्ममध्ये लीन होणार, परत येणारच नाही. त्यांना हे माहीतच नाही आहे की, आपल्याला या सृष्टी चक्रामध्ये अवश्य यायचेच आहे. आता तुम्ही मुले या गोष्टींना समजता. तुम्हा मुलांना माहीत आहे की आपण स्वदर्शन चक्रधारी लकी तारे आहोत. लकी म्हटले जाते भाग्यशाली असणाऱ्याला. आता तुम्हा मुलांना बाबाच भाग्यशाली बनवतात. जसा पिता तशी मुले असतात. कोणी पिता श्रीमंत असतात, कोणी पिता गरीब सुद्धा असतात. तुम्ही मुले जाणता आम्हाला तर बेहदचे बाबा मिळाले आहेत, जो जितके लकी (भाग्यशाली) बनू इच्छितो तेवढे बनू शकतो, जितका श्रीमंत बनू इच्छितो तेवढे बनू शकतो. बाबा म्हणतात - जे पाहिजे ते पुरुषार्थ करून घ्या. सर्व काही पुरुषार्थावर अवलंबून आहे. पुरुषार्थ करून जितके उच्च पद घ्यायचे असेल ते घेऊ शकता. सर्वात उच्च ते उच्च पद आहे या लक्ष्मी-नारायणाचे. आठवणीचा चार्ट देखील जरूर ठेवायचा आहे कारण तमोप्रधानापासून सतोप्रधान जरूर बनायचेच आहे. बुद्धू बनून असेच बसायचे नाहीये. बाबांनी समजावून सांगितले आहे - जुनी दुनिया आता नवीन होणार आहे. बाबा येतातच नव्या सतोप्रधान दुनियेमध्ये घेऊन जाण्याकरिता. ते आहेत बेहदचे बाबा, बेहद सुख देणारे. समजावून सांगत आहेत की, सतोप्रधान बनल्यानेच तुम्ही बेहदचे सुख प्राप्त करू शकाल. सतो बनलात तर कमी सुख मिळेल. रजो बनलात तर त्याच्यापेक्षा कमी सुख मिळेल. बाबा सर्व हिशोब सांगून टाकतात. तुम्हाला अथाह धन मिळते, अथाह सुख मिळते. बेहदच्या बाबांकडून वारसा मिळविण्यासाठी आठवणी व्यतिरिक्त इतर कोणताही उपाय नाही. जितकी बाबांची आठवण कराल, तितके आठवणीमुळे आपोआप दैवी गुणसुद्धा येतील. सतोप्रधान बनायचे असेल तर दैवी गुण देखील अवश्य पाहिजेत. आपली तपासणी आपणच करायची आहे. जितके उच्च पद मिळवू इच्छिता ते आपल्या पुरुषार्थाने मिळवू शकता. शिकविणारा टीचर तर बसलेला आहे. बाबा म्हणतात - ‘कल्प-कल्प तुम्हाला असेच समजावून सांगतो. दोनच शब्द आहेत - मनमनाभव, मध्याजीभव’. बेहदच्या बाबांना ओळखून जाता. ते बेहदचे बाबाच बेहदचे ज्ञान देणारे आहेत. पतितापासून पावन बनण्याचा मार्ग देखील ते बेहदचे बाबाच समजावून सांगतात. तर बाबा जे समजावून सांगतात ती काही नवीन गोष्ट नाहीये. गीतेमध्ये देखील लिहिलेले आहे - पिठात मीठा प्रमाणे आहे. स्वतःला आत्मा समजा. देहाचे सर्व धर्म विसरून जा. तुम्ही सुरुवातीला अशरीरी होता, आता अनेक मित्र-नातेवाईकांच्या बंधनामध्ये अडकले आहात. सर्व तमोप्रधान आहेत आता पुन्हा सतोप्रधान बनायचे आहे. तुम्ही जाणता तमोप्रधानापासून पुन्हा आम्ही सतोप्रधान बनतो मग मित्र-नातलग इत्यादी सर्व पवित्र बनतील. जितका जो कल्पापूर्वी सतोप्रधान बनला आहे, तेवढाच पुन्हा बनेल. त्यांचा पुरुषार्थच तसा असेल. आता फॉलो कोणाला केले पाहिजे. गायन आहे फॉलो फादर. जसे हे (ब्रह्मा बाबा) बाबांची आठवण करतात, पुरुषार्थ करतात, तर त्यांना फॉलो करा. पुरुषार्थ करवून घेणारे तर बाबा आहेत. ते स्वतः काही पुरुषार्थ करत नाहीत, ते पुरुषार्थ करवून घेतात. आणि म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो फॉलो फादर’. मदर-फादर गुप्त आहेत ना. मदर गुप्त आहे, फादर तर दिसून येतात. हे व्यवस्थित समजून घ्यायचे आहे. असे उच्च पद मिळवायचे असेल तर बाबांची चांगल्या प्रकारे आठवण करा, जसे हे फादर (ब्रह्माबाबा) करतात. हे फादरच सर्वोच्च पद प्राप्त करतात. हे खूप उच्च होते आणि मग यांच्याच अनेक जन्मांच्या शेवटच्याही शेवटी मी प्रवेश केला आहे. हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा, विसरू नका. खूप जणांना माया विसरायला लावते. तुम्ही म्हणता आम्ही नरापासून नारायण बनतो, ती युक्ती सुद्धा बाबा सांगतात तुम्ही कसे बनू शकाल. हे देखील जाणता सगळेच काही बिनचूक फॉलो करणार नाहीत. एम-ऑब्जेक्ट बाबा सांगतात - फॉलो फादर. आत्ताचेच गायन आहे. बाबा देखील आत्ता तुम्हा मुलांना ज्ञान देतात. स्वतःला संन्याशांचे अनुयायी म्हणतात, परंतु ते तर चुकीचे आहे ना, फॉलो करतच नाहीत. ते सर्व आहेत ब्रह्म ज्ञानी, तत्त्व ज्ञानी. त्यांना काही ईश्वर ज्ञान देत नाहीत. त्यांना तत्त्व किंवा ब्रह्म ज्ञानी म्हटले जाते परंतु तत्त्व किंवा ब्रह्म त्यांना ज्ञान देत नाही, त्यांचे सर्व आहे शास्त्रांचे ज्ञान. इथे तुम्हाला बाबा ज्ञान देतात, ज्यांना ज्ञानाचा सागर म्हटले जाते. हे व्यवस्थित नमूद करून ठेवा. तुम्ही विसरून जाता ही तर अंतःकरणामध्ये चांगल्या प्रकारे धारण करण्याची गोष्ट आहे (मनामध्ये कोरून ठेवण्यासारखी गोष्ट आहे). बाबा रोज-रोज म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो, स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा, आता परत जायचे आहे’. पतित तर जाऊ शकणार नाहीत. एक तर योगबलाने पवित्र व्हायचे आहे नाही तर मग शिक्षा भोगून जाल. सर्वांचे हिशोब जरूर चुकतू होणार आहेत. बाबांनी समजावून सांगितले आहे - तुम्ही आत्मे खरे तर परमधाममध्ये राहणारे आहात; मग इथे सुख आणि दुःखाचा पार्ट बजावला आहे. सुखाचा पार्ट आहे - राम राज्यामध्ये आणि दुःखाचा पार्ट आहे रावण राज्यामध्ये. रामराज्य स्वर्गाला म्हटले जाते, तिथे पूर्णत: सुख आहे. गातात देखील स्वर्गवासी आणि नरकवासी. तर हे चांगल्या रितीने धारण करायचे आहे. जितके-जितके तमोप्रधानापासून सतोप्रधान बनत जाल, तितका तुम्हाला आतून आनंद देखील होईल. जेव्हा रजोमध्ये द्वापरयुगामध्ये होता तेव्हा देखील तुम्ही आनंदी होता. तुम्ही इतके दुःखी, विकारी नव्हता. आता इथे तर किती विकारी दुःखी आहेत. तुम्ही आपल्या मोठ्यांकडे बघा, किती विकारी दारूडे आहेत. दारू फार वाईट गोष्ट आहे. सतयुगामध्ये तर आहेतच शुद्ध आत्मे मग खाली उतरता-उतरता एकदम घाणेरडे होतात म्हणून याला रौरव नरक म्हटले जाते. दारू अशी गोष्ट आहे, जी भांडणे, मारामाऱ्या, नुकसान होण्यासाठी वेळ लागत नाही. या वेळी मनुष्याची बुद्धी जणू भ्रष्ट झालेली आहे. माया अतिशय वाईट आहे. बाबा सर्वशक्तीमान, सुख देणारे आहेत. तशीच मग माया अतिशय दुःख देणारी आहे. कलियुगामध्ये मनुष्याची काय अवस्था होते, एकदम जडजडीभूत (एकदम कष्टदायी) अवस्था होते. काहीही समजत नाही, जणूकाही पत्थर-बुद्धी आहेत. हा देखील ड्रामा आहे ना. कोणाच्या नशीबात नसेल तर मग बुद्धी अशी होते. बाबा ज्ञान तर खूप सोपे करून सांगतात. ‘मुलांनो-मुलांनो’, म्हणत समजावत राहतात. माता देखील म्हणतात - ‘आम्हाला ५ लौकिक मुले आहेत आणि एक पारलौकिक मुलगा आहे, जो आम्हाला सुखधामला घेऊन जाण्यासाठी आला आहे’. त्यांना आपला पिता देखील समजतात आणि आपला पुत्र देखील समजतात. जादूगार झाला ना. बाबा जादूगार तर मुले सुद्धा जादूगार बनतात. म्हणतात - शिवबाबा तर आमचा मुलगा सुद्धा आहे. तर बाबांना फॉलो करून असे बनले पाहिजे. स्वर्गात यांचे राज्य होते ना. शास्त्रांमध्ये या गोष्टीच नाहीत. या भक्तीमार्गातील शास्त्रांविषयी देखील ड्रामामध्ये आधीच नोंदलेले आहे. तरीही पुन्हा असतील. हे देखील बाबा समजावून सांगतात; शिकवणारा शिक्षक तर पाहिजे ना. पुस्तके थोडीच शिक्षक बनू शकतात? मग तर शिक्षकाची आवश्यकताच राहणार नाही. ही पुस्तके वगैरे सतयुगामध्ये असत नाहीत.

बाबा समजावून सांगत आहेत - ‘तुम्ही आत्म्याला तर समजता ना. आत्म्यांचे पिता देखील जरूर आहेत. जेव्हा कोणी येतात तेव्हा सर्वजण म्हणतात - ‘हिन्दू-मुस्लिम भाई-भाई’, अर्थ काहीच समजत नाहीत. ‘भाई-भाई’, याचा अर्थ तर समजला पाहिजे ना. जरूर त्यांचा पिता देखील असेल. इतका कवडीचा सुद्धा समजूतदारपणा राहिलेला नाहीये. भगवानुवाच - ‘हा अनेक जन्मांतील शेवटचा जन्म आहे’. अर्थ किती स्पष्ट आहे. काही निंदा करत नाहीत. बाबा तर रस्ता सांगतात. जो नंबरवन तोच शेवटचा. गोरे तेच सावळे बनतात. तुम्ही देखील समजता आम्ही गोरे होतो मग असे बनणार. बाबांची आठवण केल्यामुळेच असे बनाल. हे आहे रावण राज्य. राम राज्याला म्हटले जाते शिवालय. सीतेचा राम, त्याने तर त्रेतामध्ये राज्य केले आहे, ही देखील समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. दोन कला कमी म्हटल्या जातात. सतयुग आहे उच्च, त्याची आठवण करतात. त्रेता आणि द्वापरची इतकी आठवण करत नाहीत. सतयुग आहे नवी दुनिया आणि कलियुग आहे जुनी दुनिया. १०० टक्के सुख आणि १०० टक्के दुःख. ते त्रेता आणि द्वापर आहेत सेमी, म्हणून मुख्य सतयुग आणि कलियुगाचे गायन आहे. बाबा सतयुग स्थापन करत आहेत. आता तुमचे काम आहे पुरुषार्थ करणे. सतयुग निवासी बनणार की त्रेता निवासी बनणार? द्वापरमध्ये मग खाली उतरता (पतन होते). तरी देखील आहात तर देवी-देवता धर्माचे. परंतु पतित बनल्यामुळे स्वतःला देवी-देवता म्हणू शकत नाही. तर बाबा गोड-गोड मुलांना रोज-रोज समजावून सांगतात. मुख्य गोष्ट आहेच मुळी ‘मनमनाभव’ची. तुम्हीच नंबरवन बनता. ८४ चे चक्र पूर्ण करून शेवटी येता आणि पुन्हा नंबरवनमध्ये जाता; तर आता बेहदच्या बाबांची आठवण करायची आहे. ते आहेत बेहदचे बाबा. पुरुषोत्तम संगमयुगावरच बेहदचे बाबा येऊन २१ पिढ्या स्वर्गाचे सुख तुम्हाला देतात. पिढी जेव्हा पूर्ण होते तेव्हा तुम्ही आपणहून शरीर सोडता. योगबल आहे ना. नियमच असा रचलेला आहे, याला म्हटले जाते योगबल. तिथे (स्वर्गामध्ये) ज्ञानाचा काही प्रश्नच येत नाही. आपोआप तुम्ही वृद्ध होता. तिथे कोणती रोगराई इत्यादी असत नाही. लंगडे किंवा कुबडे असत नाहीत. सदैव निरोगी असतात. तिथे दुःखाचे नामोनिशाणही नसते. नंतर थोडी-थोडी कला कमी होते. आता मुलांनी बेहदच्या बाबांकडून उच्च वारसा मिळविण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. पास विथ ऑनर झाले पाहिजे ना. सर्वच काही उच्च पद प्राप्त करू शकत नाहीत. जे सेवाच करत नाहीत ते पद काय प्राप्त करणार. म्युझियममध्ये मुले किती सेवा करतात, न बोलावता लोकं येतात. याला विहंग मार्गाची सेवा म्हटले जाते. माहीत नाही, याहून देखील अजून कोणती विहंग मार्गाची सेवा निघेल. दोन-चार मुख्य चित्रे नक्की बरोबर असावीत. त्रिमूर्ती, झाड, गोळा, शिडी - ही मोठी-मोठी चित्रे तर प्रत्येक ठिकाणी खूप मोठ्या आकारामध्ये असावीत. जेव्हा मुले हुशार होतील तेव्हाच तर सेवा होईल ना. सेवा तर होणारच आहे. गावामध्ये सुद्धा सेवा करायची आहे. माता शिकलेल्या जरी नसल्या तरीही बाबांचा परिचय देणे तर खूप सोपे आहे. पूर्वी स्त्रिया शिकत नव्हत्या. मुसलमानांच्या राज्यात एक डोळा उघडून बाहेर पडत होत्या. हे बाबा (ब्रह्मा बाबा) खूप अनुभवी आहेत. बाबा म्हणतात मी हे सर्व जाणत नाही. मी तर वर राहतो. या सर्व गोष्टी हे ब्रह्मा तुम्हाला ऐकवतात. हे अनुभवी आहेत, मी तर मनमनाभवच्या गोष्टीच ऐकवतो आणि सृष्टी चक्राचे रहस्य समजावून सांगतो, जे हे (ब्रह्मा) जाणत नाहीत. हे आपला अनुभव वेगळा सांगतात. मी त्या गोष्टींमध्ये जात नाही. माझा पार्ट आहे फक्त तुम्हाला मार्ग दाखवणे. मी पिता, शिक्षक, गुरू आहे. शिक्षक बनून तुम्हाला शिकवतो, बाकी यामध्ये कृपा इत्यादीचा काही प्रश्नच येत नाही. शिकवतो आणि मग सोबत घेऊन जाणार आहे. या शिक्षणामुळेच सद्गती होते. मी आलोच आहे तुम्हाला घेऊन जाण्याकरिता. ‘शिव’ची वरात प्रसिद्ध आहे. शंकराची वरात नसते. ‘शिव’ची वरात आहे, सर्व आत्मे नवरदेवाच्या मागून जातात ना. या सर्व आहेत भक्तीणी, मी आहे भगवान. तुम्ही मला बोलावलेच आहे पावन बनवून सोबत घेऊन जाण्याकरिता. तर मी तुम्हा मुलांना सोबत घेऊनच जाणार. हिशोब चुकता करवून घेऊनच जायचे आहे.

बाबा घडो-घडी सांगतात - मनमनाभव. बाबांची आठवण करा तर वारसा देखील जरूर आठवेल. विश्वाची बादशाही मिळते ना. त्यासाठी पुरुषार्थ देखील तसा करायचा आहे. तुम्हा मुलांना काही कोणता त्रास देत नाही. मी जाणतो, तुम्ही खूप दुःख पाहिले आहे. आता तुम्हाला कोणताही त्रास देत नाही. भक्तीमार्गामध्ये आयुष्य देखील कमी असते. अकाली मृत्यू होतो, तर किती ‘अरे देवा’ असे म्हणत ओरडत राहतात. किती दुःख सहन करतात. डोकेच खराब होते. आता बाबा म्हणतात - ‘फक्त माझी आठवण करत रहा’. स्वर्गाचा मालक बनायचे असेल तर दैवी गुण देखील धारण करायचे आहेत. पुरुषार्थ नेहमी उच्च बनण्यासाठी केला जातो - आपणही लक्ष्मी-नारायण बनावे. बाबा म्हणतात - ‘मी सूर्यवंशी-चंद्रवंशी दोन्ही धर्म स्थापन करतो’. ते नापास होतात म्हणून क्षत्रिय म्हटले जातात. युद्धाचे मैदान आहे ना. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-

१) सुखधामच्या वारशाचा पूर्ण अधिकार घेण्याकरिता संगमयुगावर रूहानी जादूगार बनून बाबांना देखील आपला मुलगा बनवायचे आहे. पूर्णपणे समर्पण व्हायचे आहे.

२) स्वदर्शन चक्रधारी बनून स्वतःला भाग्यशाली तारा बनवायचे आहे. विहंग मार्गाच्या सेवेचे निमित्त बनून उच्च पद घ्यायचे आहे. गावा-गावात (खेडोपाडी) सेवा करायची आहे. या सोबतच आठवणीचा चार्ट सुद्धा नक्की ठेवायचा आहे.

वरदान:-
दृढ संकल्पाच्या आगकाडीने आत्मिक बॉम्बची आतिशबाजी करणारे सदा विजयी भव

आजकाल आतिशबाजीसाठी बॉम्ब बनवतात परंतु तुम्ही दृढ संकल्पाच्या आगकाडीने आत्मिक बॉम्बची आतिशबाजी करा ज्यामुळे जुने सर्व समाप्त होईल. ते लोक तर आतिशबाजी मध्ये पैसे गमावतील आणि तुम्ही कमवाल. ती ‘आतिशबाजी’ आहे आणि तुमची आहे ‘उडत्या कलेची बाजी’. यामध्ये तुम्ही विजयी बनता. त्यामुळे डबल फायदा मिळवा, जाळा देखील आणि कमवा देखील - ही विधी अमलात आणा.
 

बोधवाक्य:-
एखाद्या विशेष कार्यामध्ये मदतगार बनणे म्हणजेच आशीर्वादांची लिफ्ट घेणे (आशीर्वाद प्राप्त करणे) आहे.