02-11-25 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
31.10.2007 ओम शान्ति
मधुबन
“आपल्या श्रेष्ठ
स्वमानाच्या नशेमध्ये राहून असंभवला संभव करत निश्चिंत बादश हा बना”
आज बापदादा आपल्या
चोहो बाजूच्या श्रेष्ठ स्वमानधारी विशेष मुलांना बघत आहेत. प्रत्येक मुलाचा स्वमान
इतका विशेष आहे जो विश्वातील कोणत्याही आत्म्याचा नाही. तुम्ही सर्व विश्वाच्या
आत्म्यांचे पूर्वज देखील आहात आणि पूज्य देखील आहात. साऱ्या सृष्टीच्या वृक्षाच्या
मुळामध्ये तुम्ही आधारमुर्त आहात. साऱ्या विश्वाचे पूर्वज पहिली रचना आहात. बापदादा
प्रत्येक मुलाची विशेषता पाहून आनंदीत होतात. भले छोटा मुलगा आहे, किंवा वयस्कर माता
आहे, नाहीतर प्रवृत्तीवाले आहेत. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या विशेषता आहेत. आजकाल
कितीही मोठ्यात मोठे वैज्ञानिक आहेत, दुनियेच्या हिशोबाने विशेष आहेत जे प्रकृतीजीत
तर बनले, चंद्रावर सुद्धा पोहोचले परंतु इतक्या छोट्याशा ज्योती स्वरूप आत्म्याला
ओळखू शकत नाहीत! आणि इथे छोटासा मुलगा देखील मी आत्मा आहे, ज्योती बिंदुला जाणतो.
अभिमानाने म्हणतो “मी आत्मा आहे”. कितीही मोठे महात्मा आहेत आणि ब्राह्मण माता आहेत,
माता अभिमानाने म्हणतात आम्ही परमात्म्याला प्राप्त केले. प्राप्त केले आहे ना! आणि
महात्मे काय म्हणतात? परमात्म्याला प्राप्त करणे खूप कठीण आहे. प्रवृत्तीवाले
चॅलेंज करतात की, आम्ही सर्व प्रवृत्तीमध्ये राहात असून, एकत्र राहून पवित्र राहतो
आहे कारण आमच्या मध्यभागी बाबा आहेत त्यामुळे दोघेही सोबत राहत असून देखील सहजच
पवित्र राहू शकतो कारण पवित्रता आमचा स्वधर्म आहे. पर धर्म कठीण असतो, स्व धर्म सोपा
असतो. आणि लोक काय म्हणतात? आग आणि कापूस एकत्र राहू शकत नाहीत. खूप कठीण आहे आणि
तुम्ही सर्व काय म्हणता? खूप सोपे आहे. तुम्हा सर्वांचे अगदी सुरुवातीला एक गाणे
होते - ‘कितने भी सेठ, स्वामी है लेकिन एक अल्फ को नही जाना है…’ छोट्याशा बिंदू
आत्म्याला जाणले नाही परंतु तुम्हा सर्व मुलांनी जाणले आहे, प्राप्त केले आहे.
इतक्या निश्चयाने आणि नशेने बोलता, असंभव संभव आहे. बापदादा देखील प्रत्येक मुलाला
विजयी रत्न पाहून हर्षित होतात कारण हिंमत मुलांची मदत बाबांची आहे म्हणून
दुनियेसाठी ज्या असंभव गोष्टी आहेत त्या तुमच्यासाठी सहज आणि संभव झाल्या आहेत. नशा
असतो की आम्ही परमात्म्याची डायरेक्ट मुले आहोत! या नशेमध्ये असल्या कारणाने,
निश्चय असल्या कारणाने परमात्म संतान असल्या कारणाने मायेपासून देखील वाचला आहात.
संतान बनणे अर्थात सहजपणे वाचणे. तर संतान आहात आणि सर्व विघ्नांपासून,
समस्यांपासून वाचलेले आहात.
तर आपल्या इतक्या
श्रेष्ठ स्वमानाला जाणता ना! का सहज आहे? कारण तुम्ही सायलेन्सच्या शक्तीद्वारे,
परिवर्तन शक्तीला कार्यामध्ये लावता. निगेटिव्हला पॉझिटिव्हमध्ये परिवर्तन करता.
माया कितीही समस्येच्या रूपामध्ये येते परंतु तुम्ही परिवर्तनाच्या शक्तीने,
सायलेन्सच्या शक्तीने समस्येला समाधान स्वरूप बनवता. कारणाला निवारणाच्या रूपामध्ये
बदलता. आहे ना एवढी ताकद? कोर्स देखील घेता ना! निगेटिव्हला पॉझिटिव्ह करण्याची विधी
शिकवता. ही परिवर्तन शक्ती बाबांकडून वारशामध्ये मिळाली आहे. एकच शक्ती नाही तर
सर्व शक्तींचा परमात्म वारसा मिळाला आहे, म्हणून बापदादा दररोज विचारतात, रोज मुरली
ऐकता ना! तर रोज बापदादा हेच म्हणतात - बाबांची आठवण करा आणि वारशाची आठवण करा.
बाबांची आठवण देखील सहज का येते? जेव्हा वारशाच्या प्राप्तीची आठवण करता तर बाबांची
आठवण प्राप्ती मुळे सहजच येते. प्रत्येक मुलाला हा रुहानी फखुर (आत्मिक अभिमान) असतो,
मनामध्ये गाणे गातात - ‘पाना था वो पा लिया’. सर्वांच्या हृदयामध्ये आपोआपच हे गाणे
वाजते ना! अभिमान आहे ना! जेवढे या अभिमानामध्ये रहाल तर अभिमानाची निशाणी आहे,
निश्चिंत असणार. जर कोणत्याही प्रकारची संकल्पामध्ये, बोलण्यामध्ये अथवा
संबंध-संपर्कामध्ये चिंता असेल तर याचा अर्थ तो शुद्ध अभिमान नाही आहे. बापदादांनी
निश्चिंत बादशहा बनवले आहे. बोला, निश्चिंत बादशहा आहात? असाल तर हात वर करा जे
निश्चिंत बादशहा आहेत? निश्चिंत आहात की कधी-कधी चिंता वाटते? छान आहे. जेव्हा बाबा
निश्चिंत आहेत, तर मुलांना कसली चिंता आहे.
बापदादांनी तर
सांगितले आहे सर्व चिंता किंवा कोणत्याही प्रकारचे ओझे असेल तर बापदादांना द्या.
बाबा सागर आहेत ना. तर सर्व ओझे सामावून जाईल. कधी बापदादा मुलांचे गाणे ऐकून हसतात.
माहित आहे कोणते गाणे? ‘काय करु, कसे करू…’ कधी-कधी तरी गाता ना. बापदादा तर ऐकत
राहतात. परंतु बापदादा सर्व मुलांना हेच सांगत आहेत - माझ्या गोड मुलांनो, लाडक्या
मुलांनो, साक्षी-दृष्टाच्या स्थितीच्या सीटवर सेट व्हा आणि सीटवर सेट होऊन खेळ पहा,
खूप मजा येईल, वाह! त्रिकालदर्शी स्थितीमध्ये स्थित व्हा. सीटवरून खाली उतरता
म्हणून अपसेट होता. सेट रहा तर अपसेट होणार नाही. कोणत्या तीन गोष्टी मुलांना त्रास
देतात? १. चंचल मन, २. भटकणारी बुद्धी आणि ३. जुने संस्कार. बापदादांना मुलांची एक
गोष्ट ऐकून हसू येते, माहित आहे कोणती गोष्ट आहे? म्हणतात - ‘बाबा, काय करू, माझे
जुने संस्कार आहेत ना!’ बापदादा हसतात. जर म्हणतच आहात, ‘माझे संस्कार’, तर ‘माझे’
बनवलेत ना? मग माझ्यावर तर अधिकार असतोच. जर जुन्या संस्कारांना माझे बनवलेत, तर हे
‘माझे’ जागा तर घेणार ना! काय हे ब्राह्मण आत्मा म्हणू शकते - ‘माझे संस्कार’?
‘माझे-माझे’ म्हटले आहे तर ‘माझे’ने आपली जागा बनवली आहे. तुम्ही ब्राह्मण ‘माझे’
म्हणू शकत नाही. हे पास्ट जीवनाचे संस्कार आहेत. शूद्र जीवनाचे संस्कार आहेत.
ब्राह्मण जीवनाचे नाहीत. तर ‘माझे-माझे’ म्हटले आहे त्यामुळे ते देखील ‘माझे’ या
अधिकाराने बसले आहेत. ब्राह्मण जीवनाचे श्रेष्ठ संस्कार जाणता ना! आणि हे संस्कार
ज्यांना तुम्ही जुने म्हणता, ते देखील जुने नाही आहेत, तुम्हा श्रेष्ठ आत्म्यांचा
जुन्यात जुना संस्कार अनादि आणि आदि संस्कार आहे. हे तर द्वापर, मध्यकाळातील
संस्कार आहेत. तर मध्यकाळातील संस्कारांना बाबांच्या मदतीने नष्ट करा, काही अवघड
नाही आहे. परंतु होते काय? बाबा जे सदैव तुमच्या सोबत कंबाइंड आहेत, त्यांना
कंबाइंड समजून सहयोग घेत नाही, कंबाइंडचा अर्थच आहे वेळेला सहयोगी. परंतु वेळेला
सहयोग न घेतल्या कारणाने मध्यकाळाचे संस्कार महान बनतात.
बापदादा जाणतात की
सर्व मुले प्रेमास पात्र आहेत, अधिकारी आहेत. बाबा जाणतात की प्रेम असल्यामुळेच तर
सगळे पोहोचले आहेत. भले मग विदेशातून आले आहेत, किंवा देशातून आले आहेत, परंतु सगळे
परमात्म प्रेमाच्या आकर्षणाने आपल्या घरामध्ये पोहोचले आहेत. बाप-दादा देखील जाणतात
- प्रेमामध्ये मेजॉरिटी पास आहेत. विदेशातून प्रेमाच्या प्लेनमधून पोहोचले आहात.
बोला, सगळे प्रेमाच्या धाग्यामध्ये बांधून इथे पोहोचला आहात ना! हे परमात्म प्रेम
मनाला आराम देणारे आहे. अच्छा - जे पहिल्यांदा इथे पोहोचले आहेत त्यांनी हात वर करा.
हात हलवा. स्वागत आहे.
आता बापदादांनी जो
होमवर्क दिला होता, लक्षात आहे होमवर्क? लक्षात आहे का? बापदादांकडे बऱ्याच
ठिकाणाहून रिझल्ट आलेला आहे. सर्वांचा रिझल्ट आलेला नाहीये. कोणाचा काही परसेंटमध्ये
सुद्धा आला आहे. परंतु आता काय करायचे आहे? बापदादा काय इच्छितात? बापदादा हेच
इच्छितात की सर्व पूजनीय आत्मे आहात, तर पूजनीय आत्म्यांचे विशेष लक्षण - आशीर्वाद
द्यायचाच आहे. तर तुम्ही सर्व जाणता की, तुम्ही सर्व पूजनीय आत्मे आहात? तर हे
आशीर्वाद देणे अर्थात आशीर्वाद घेणे हे समजले जाते. जे आशीर्वाद देतात, ज्याला
देतात त्याच्या हृदयातून वारंवार देणाऱ्यासाठी आशीर्वाद निघतात. तर हे पूज्य
आत्म्यांनो तुमचा तर निजी संस्कार आहे - आशीर्वाद देणे. अनादि संस्कार आहे -
आशीर्वाद देणे. जेव्हा तुमची जड चित्रे देखील आशीर्वाद देत आहेत तर तुम्हा चैतन्य
पूज्य आत्म्यांचा तर आशीर्वाद देणे हा नॅचरल संस्कार आहे. याला म्हणा - ‘माझा
संस्कार’. मध्य, द्वापरचे संस्कार नॅचरल आणि नेचर झाले आहेत. वास्तविक हे आशीर्वाद
देण्याचे संस्कार नॅचरल नेचर (नैसर्गिक स्वभाव) आहे. जेव्हा कोणाला आशीर्वाद देता,
तेव्हा ती आत्मा किती आनंदीत होते, ते आनंदाचे वायुमंडळ किती सुखदायी असते! तर
ज्यांनी देखील होमवर्क केला आहे त्या सर्वांना, भले आलेले आहेत, किंवा आलेले नाहीत,
परंतु बापदादांच्या समोर आहेत. तर त्यांना बापदादा मुबारक देत आहेत. होमवर्क केला
आहे तर त्याला आपली नॅचरल नेचर (नैसर्गिक स्वभाव) बनवत पुढे देखील करत रहा
इतरांकडूनही करवून घेत रहा. आणि ज्यांनी थोडा-फार केला आहे, नाही जरी केला असेल त्या
सर्वांनी स्वतःला सदैव - ‘मी पूज्य आत्मा आहे’, ‘मी बाबांच्या श्रीमतावर चालणारी
विशेष आत्मा आहे’, या स्मृतिला वारंवार आपल्या स्मृतिमध्ये आणि स्वरूपामध्ये आणा
कारण की प्रत्येकाला जेव्हा विचारतात की तुम्ही काय बनणार आहात? तर सर्व जण म्हणतात
आम्ही लक्ष्मी-नारायण बनणार आहोत. राम-सीतासाठी कोणीही हात वर करत नाही. जेव्हा की
१६ कला बनण्याचे लक्ष्य आहे. तर १६ कला अर्थात परमपूज्य, पूज्य आत्म्याचे कर्तव्यच
आहे - आशीर्वाद देणे. हा संस्कार चालता-फिरता सहज आणि कायमसाठी बनवा. आहातच पूज्य.
आहातच १६ कला. लक्ष्य तर हेच आहे ना!
बापदादा खुश आहेत की
ज्यांनी देखील केले आहे, त्यांनी आपल्या मस्तकामध्ये विजयाचा तिलक बाबांच्या द्वारे
लावला. सोबतच सेवेचे समाचार देखील बापदादांकडे सर्वांकडून, विंग्ज कडून, सेंटर्स
कडून खूप चांगल्या रिझल्ट सहित पोहोचले आहेत. तर एक होमवर्क करण्याबद्दल मुबारक आणि
सोबत सेवेची देखील मुबारक, पद्म-पद्म पटीने आहे. बाबांनी बघितले की गावा-गावांमध्ये
संदेश देण्याची सेवा खूप चांगल्या तऱ्हेने मेजॉरिटी एरियामध्ये केली आहे. तर ही सेवा
देखील दयाळू बनून केली म्हणून सेवेच्या उमंग-उत्साहामध्ये रिझल्ट देखील चांगला
दिसून आला आहे. ही मेहनत नाही केलीत, परंतु बाबांवर प्रेम अर्थात संदेश देण्यावर
प्रेम, तर प्रेमापोटी आवडीने सेवा केली आहे, तर प्रेमाचे रिटर्न सर्व सेवाधारींना
स्वतःच बाबांचे पद्म-पद्मपटीने प्रेम प्राप्त होते आणि होत राहील. सोबतच सर्वांनी
आपल्या लाडक्या दादीची खूप प्रेमाने आठवण करत, दादीला प्रेमाचे रिटर्न देत आहेत, हा
प्रेमाचा सुगंध बापदादांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोहोचला आहे .
आता जे काही
मधुबनमध्ये कार्य चालू आहेत, भले विदेशवाल्यांचे आहे, किंवा भारतीयांचे आहे ते सर्व
कार्य देखील एकमेकांच्या सहयोगाच्या, सन्मानाच्या आधारे खूप छान सफल झाले आहे आणि
पुढे होणारी कार्यें देखील सफल झालेलीच आहेत कारण सफलता तर तुमच्या गळ्यातील हार आहे.
बाबांच्या गळ्यातील देखील हार आहात, बाबांनी आठवण केली होती की कधीही हार खाऊ नका
कारण तुम्ही बाबांच्या गळ्यातील हार आहात. तर गळ्यातील हार कधी हार खाऊ शकत नाही.
तर हार बनायचा आहे की हार खायची आहे? नाही ना! हार बनणे चांगले आहे ना! तर कधीही
हार खाऊ नका. हार खाणारे तर अनेक करोडोंनी आत्मे आहेत, तुम्ही हार बनून गळ्यामध्ये
ओवले गेले आहात. असे आहात ना! तर संकल्प करा, बाबांच्या प्रेमामध्ये माया कितीही
तुफान उत्पन्न करेल परंतु मास्टर सर्वशक्तिवान आत्म्यांच्या समोर तुफान देखील तोहफा
बनेल. हे वरदान नेहमी लक्षात ठेवा. कितीही मोठा पहाड असेल, पहाड बदलून कापूस बनेल.
आता वेळेच्या समीपते नुसार वरदानांना प्रत्येक वेळी अनुभवामध्ये आणा. अनुभवाची
ऑथॉरिटी बना.
जेव्हा पाहिजे तेव्हा
आपली अशरीरी बनण्याची, फरिश्ता स्वरूप बनण्याची एक्सरसाइज करत रहा. आता-आता
ब्राह्मण, आता-आता फरिश्ता, आता-आता अशरीरी, चालता-फिरता, कामकाज करत असताना देखील
एक मिनिट, दोन मिनिटे वेळ काढून अभ्यास करा. चेक करा जो संकल्प केला, तेच स्वरूप
अनुभव केले का? अच्छा.
चोहो बाजूंच्या सदैव
श्रेष्ठ स्वमानधारी, सदैव स्वतःला परमपूज्य आणि पूर्वज अनुभव करणाऱ्या, सदैव स्वतःला
प्रत्येक सब्जेक्ट मध्ये अनुभवी स्वरूप बनविणाऱ्या, सदैव बाबांच्या दिलतख्तनशीन,
भृकुटीचे तख्त नशीन, सदैव श्रेष्ठ स्थितीच्या अनुभवांमध्ये स्थित राहणाऱ्या, चोहो
बाजूंच्या सर्व मुलांना प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
सर्व ठिकाणाहून
सर्वांची पत्रे, ई-मेल्स, समाचार सर्व बापदादांकडे पोहोचले आहे, तर सेवेचे फळ आणि
बळ, सर्व सेवाधारींना प्राप्त आहे आणि होत राहील. प्रेमाची पत्रं देखील खूप येतात,
परिवर्तनाची पत्रं देखील खूप येतात. परिवर्तनाची शक्ती असणाऱ्यांना बापदादा ‘अमर
भव’चे वरदान देत आहेत. ज्या सेवाधारींनी श्रीमताला पूर्ण फॉलो केले आहे, अशा फॉलो
करणाऱ्या मुलांना बापदादा म्हणतात “सदा आज्ञाधारक मुलांनो वाह!” बापदादा हे वरदान
देत आहेत आणि प्रेम करणाऱ्यांनाही अतिशय प्रेमाने ‘हृदयामध्ये सामावणाऱ्या अति
प्रिय आणि मायेच्या अति विघ्नांपासून न्यारे’, असे वरदान देत आहेत. अच्छा.
आता सर्वांच्या
हृदयामध्ये कोणता उमंग येत आहे? एकच उमंग बाप समान बनायचेच आहे. आहे हा उमंग? पांडव,
हात वर करा. बनायचेच आहे. बघूया, बनूया, असे या या करायचे नाही… परंतु बनायचेच आहे.
पक्के. पक्के? अच्छा. प्रत्येकाने आपले ओ. के. चे कार्ड आपल्या टिचरकडे चार्टच्या
रूपामध्ये देत रहा. जास्त काही लिहू नका, बस एक कार्ड घ्या त्यामध्ये ओ. के. लिहा
किंवा लाइन मारा, बस्स. हे तर करू शकता ना. मोठे पत्र नको. अच्छा.
वरदान:-
संगमयुगावर
प्रत्यक्ष फळाद्वारे शक्तिशाली बनणारी सदा समर्थ आत्मा भव
संगमयुगावर जे आत्मे
बेहद सेवेच्या निमित्त बनतात त्यांना निमित्त बनण्याचे प्रत्यक्ष फळ शक्तिची
प्राप्ति होते. हे प्रत्यक्षफळच श्रेष्ठ युगाचे फळ आहे. असे फळ खाणारी शक्तिशाली
आत्मा कोणत्याही परिस्थितीवर सहजच विजय प्राप्त करते. ती समर्थ बाबांसोबत असल्या
कारणाने व्यर्थ पासून सहज मुक्त होते. विषारी सापासमान परिस्थितीवर देखील त्यांचा
विजय होतो म्हणून यादगारमध्ये दाखवतात की श्रीकृष्णाने सापाच्या डोक्यावर (फण्यावर)
डान्स केला.
सुविचार:-
पास विद् ऑनर बनून
पास्टला (भूतकाळाला) पास करा आणि बाबांच्या सदैव पास (जवळ) रहा
अव्यक्त इशारे -
अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा
जसे बापदादा
अशरीरीपासून शरीरामध्ये येतात तसेच मुलांना देखील अशरीरी होऊन शरीरामध्ये यायचे आहे.
अव्यक्त स्थितीमध्ये स्थित होऊन मग व्यक्तमध्ये यायचे आहे. जसे या शरीराला सोडणे आणि
शरीराला घेणे, हा अनुभव सर्वांना आहे. असेच जेव्हा पाहिजे तेव्हा शरीराचे भान सोडून
अशरीरी बना आणि जेव्हा पाहीजे तेव्हा शरीराचा आधार घेऊन कर्म करा. बिलकुल असाच
अनुभव व्हावा जसे हा स्थूल चोला वेगळा (शरीर वेगळे) आहे आणि कपड्याला धारण करणारी
मी आत्मा वेगळी आहे.