02-12-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला आपल्या दिव्याचा सांभाळ स्वतःच करायचा आहे, वादळांपासून
वाचण्यासाठी ज्ञान-योगाचे घृत जरूर पाहिजे”
प्रश्न:-
कोणता
पुरुषार्थ, गुप्त बाबांकडून गुप्त वारसा मिळवून देतो?
उत्तर:-
अंतर्मुख अर्थात गप्प राहून बाबांची आठवण कराल तर गुप्त वारसा मिळेल. आठवणीमध्ये
असताना शरीर सुटले तर खूपच चांगले, यामध्ये कोणताही त्रास नाही. आठवणी सोबतच
ज्ञान-योगाची सेवा देखील करायची आहे, जर करू शकत नसाल तर कर्मणा सेवा करा. अनेकांना
सुख द्याल तर आशीर्वाद मिळतील. वागणे आणि बोलणे देखील अतिशय सात्विक असले पाहिजे.
गीत:-
निर्बल से
लड़ाई बलवान की…
ओम शांती।
बाबांनी समजावून सांगितले आहे की, जेव्हा अशा प्रकारची गाणी ऐकता तर प्रत्येकाने
स्वतःवरच विचार सागर मंथन करायचे असते. हे तर मुले जाणतात - मनुष्याचा मृत्यू होतो
तेव्हा बारा दिवस दिवा पेटवून ठेवतात. तुम्ही तर मरण्याकरिता तयारी करत आहात आणि
आपली ज्योत पुरुषार्थ करून स्वतःच प्रज्वलित करत आहात. पुरुषार्थ देखील माळेमध्ये
येणारेच करतात. प्रजा या माळेमध्ये येत नाही. असा पुरुषार्थ केला पाहिजे जे आपण
विजयी माळेमध्ये प्रथम यावे. कुठे माया मांजरीने वादळ निर्माण करून विकर्म बनवू नये
ज्यामुळे दिवा विझला जाईल. आता यामध्ये ज्ञान आणि योग दोन्हीचे बळ पाहिजे. योगा
सोबत ज्ञान देखील जरुरी आहे. प्रत्येकाने स्वतःच्या दिव्याचा सांभाळ करायचा आहे.
शेवटपर्यंत पुरुषार्थ चालणारच आहे. शर्यत चालू आहे तर खूप जपायचे आहे की, कुठे
ज्योत मंद होऊ नये, विझून जाऊ नये; आणि म्हणूनच योग आणि ज्ञानाचे घृत रोज घालावे
लागते. योगबळाची ताकद नसेल तर पुरुषार्थामध्ये धाव घेऊ शकणार नाही. मागे राहतात.
शाळेमध्ये जे विषय असतात, त्यामध्ये बघतात की, आपण या विषयामध्ये हुशार नाही आहोत
तर त्या हिशोबाने जोराने तयारी करतात. इथे देखील असेच आहे. स्थूल सेवेचा विषय देखील
खूप चांगला आहे. अनेकांचे आशीर्वाद मिळतात. काही मुले ज्ञानाची सेवा करतात.
दिवसेंदिवस सेवेमध्ये वृद्धी होत जाईल. एखाद्या श्रीमंताची सहा-आठ देखील दुकाने
असतात. सर्वच दुकाने काही एकसारखी चालत नाहीत. कोणामध्ये कमी ग्राहक, कोणामध्ये
जास्त असतात. तुमचा असा देखील एक दिवस येणार आहे अशी वेळ येणार आहे जेव्हा रात्रीची
सुद्धा फुरसत मिळणार नाही. सर्वांना माहिती होईल की ज्ञानसागर बाबा आलेले आहेत -
अविनाशी ज्ञान रत्नांनी झोळी भरत आहेत; मग पुष्कळ मुले येतील, काही विचारू नका. जसे
एकमेकांना सांगतात ना की, इथे ही वस्तू खूप चांगली स्वस्त मिळते. तुम्ही मुले देखील
जाणता हे राज योगाचे शिक्षण अतिशय सोपे आहे. सर्वांना या ज्ञान रत्नांविषयी माहिती
होईल तर येत राहतील. तुम्ही ही ज्ञान आणि योगाची सेवा करता. जे ही ज्ञान-योगाची सेवा
करू शकत नाहीत तर मग कर्मणा सेवेचे देखील मार्क्स आहेत. सर्वांचे आशीर्वाद मिळतील.
एक-दोघांना सुख द्यायचे असते. ही तर खूपच स्वस्त खाण आहे. ही अविनाशी हिरे-माणकांची
खाण आहे. आठ रत्नांची माळा बनवतात ना. पूजा देखील करतात परंतु कोणालाच माहित नाही
आहे की, ही माळा कोणाची बनलेली आहे.
तुम्ही मुले जाणता
की, कसे आपणच पूज्य सो पुजारी बनतो. हे अतिशय वंडरफुल नॉलेज आहे जे दुनियेमध्ये
कोणीही जाणत नाहीत. आता तुम्हा लकी स्टार्स मुलांनाच हा निश्चय आहे की आपण स्वर्गाचे
मालक होतो, आता नरकाचे मालक बनलो आहोत; स्वर्गाचे मालक असणार तेव्हा पुनर्जन्म
देखील तिथेच घेणार. आता पुन्हा आम्ही स्वर्गाचे मालक बनत आहोत. तुम्हा
ब्राह्मणांनाच या संगमयुगाची माहिती आहे. दुसऱ्या बाजूला सारी दुनिया आहे
कलियुगामध्ये. युग तर वेगवेगळे आहे ना. सतयुगामध्ये असाल तेव्हा पुनर्जन्म
सतयुगामध्येच घ्याल. आता तुम्ही संगमयुगावर आहात. तुमच्या पैकी जर कोणी शरीर सोडले
तर संस्कारानुसार पुन्हा इथेच येऊन जन्म घेतील. तुम्ही ब्राह्मण आहात संगमयुगातील.
ते शूद्र आहेत कलियुगातील. हे नॉलेज देखील तुम्हाला या संगमावरच मिळते. तुम्ही बी.
के. ज्ञानगंगा प्रॅक्टिकल मध्ये आता संगमयुगामध्ये आहात. आता तुम्हाला रेस करायची
आहे. दुकान सांभाळायचे आहे. ज्ञान-योगाची धारणा नसेल तर दुकान सांभाळू शकणार नाही.
सेवेचा मोबदला तर बाबा देणारच आहेत. यज्ञ रचला जातो तेव्हा तऱ्हे-तऱ्हेचे ब्राह्मण
लोक येतात. मग कोणाला जास्त दक्षिणा मिळते, कोणाला कमी मिळते. आता या परमपिता
परमात्म्याने रुद्र ज्ञान यज्ञ रचला आहे. आपण आहोत ब्राह्मण. आपला धंदाच आहे
मनुष्याला देवता बनविणे. असा यज्ञ आणखी कोणता असत नाही, जिथे कोणी म्हणतील की, आम्ही
या यज्ञाद्वारे मनुष्यापासून देवता बनत आहोत. आता याला रुद्र ज्ञान यज्ञ अथवा
पाठशाळा देखील म्हटले जाते. ज्ञान आणि योगाने प्रत्येक मुलगा देवी-देवता पद प्राप्त
करू शकतो. बाबा माहिती सुद्धा देतात - तुम्ही परमधामवरून बाबांसोबत आला आहात. तुम्ही
म्हणणार - ‘आम्ही परमधाम निवासी आहोत’. यावेळी बाबांच्या मतावर आम्ही स्वर्गाची
स्थापना करत आहोत. जे स्थापना करतील तेच जरूर मालक बनतील. तुम्ही जाणता या
दुनियेमध्ये आपण मोस्ट लकीएस्ट (सर्वात जास्त भाग्यवान), ज्ञान सूर्य, ज्ञान चंद्रमा
आणि ज्ञान सितारे आहोत. बनविणारे आहेत - ज्ञानसागर. ते सूर्य, चंद्र, तारे तर
स्थूलमध्ये आहेत ना. त्यांच्यासोबत आपली तुलना आहे. तर आपण देखील मग ज्ञान सूर्य,
ज्ञान चंद्रमा, ज्ञान सितारे होणार. आपल्याला असे बनविणारे आहेत - ज्ञानाचे सागर.
नाव तर पडणार ना. ज्ञान सूर्य अथवा ज्ञानसागराची आपण मुले आहोत. ते काही इथले
रहिवासी नाही आहेत. बाबा म्हणतात - ‘मी येतो तुम्हाला आप समान बनवितो’. ज्ञान सूर्य,
ज्ञान सितारे तुम्हाला इथेच बनायचे आहे. तुम्ही जाणता बरोबर आपण भविष्यामध्ये पुन्हा
इथेच स्वर्गाचे मालक बनणार. सर्व काही पुरुषार्थावर अवलंबून आहे. आपण मायेवर विजय
प्राप्त करणारे योद्धे आहोत. ते लोक मग मनाला वश करण्यासाठी किती हठयोग इत्यादी
करतात. तुम्ही तर हठयोग इत्यादी करू शकणार नाही. बाबा म्हणतात - ‘तुम्हाला कोणतीही
तसदी घ्यायची नाहीये, फक्त एवढेच सांगतो - तुम्हाला माझ्याजवळ यायचे आहे म्हणून माझी
आठवण करा. मी तुम्हा मुलांना घेऊन जाण्यासाठी आलो आहे’. असे दुसरा कोणताही मनुष्य
म्हणू शकणार नाही. भले स्वतःला ईश्वर म्हणतील परंतु स्वतःला गाईड म्हणू शकणार नाहीत.
बाबा म्हणतात - ‘मुख्य पंडा काळांचाही काळ मी आहे’. एक सत्यवान-सावित्रीची कहाणी आहे
ना! तिचे दैहिक प्रेम असल्यामुळे दुःखी होत होती. तुम्हाला तर आनंद होतो. मी तुमच्या
आत्म्याला घेऊन जाणार, तुम्ही कधी दु:खी होणार नाही. जाणता आपले बाबा आले आहेत
स्वीट होममध्ये घेऊन जाण्याकरिता. ज्याला मुक्तिधाम, निर्वाणधाम म्हटले जाते. असे
म्हणतात - ‘मी सर्व काळांचाही काळ आहे’. तो काळ तर एका आत्म्याला घेऊन जातो, मी तर
किती मोठा काळ आहे. ५००० वर्षांपूर्वी देखील मी गाईड बनून सर्वांना घेऊन गेलो होतो.
साजण सजणींना परत घेऊन जातात तर त्यांची आठवण करावी लागेल.
तुम्ही जाणता आता आपण
शिकत आहोत मग पुन्हा इथे येणार. अगोदर स्वीट होममध्ये जाणार मग नंतर खाली येणार.
तुम्ही मुले स्वर्गाचे तारे आहात. आधी नरकाचे होता. ‘तारे’, मुलांना म्हटले जाते.
लकी सितारे नंबरवार पुरुषार्थानुसार आहेत. तुम्हाला आजोबांची मालमत्ता मिळते. खाण
खूप जबरदस्त आहे आणि ही खाण एकदाच बाहेर येते. त्या खाणी तर भरपूर आहेत ना. बाहेर
येतच राहतात. कोणी बसून शोधेल तर पुष्कळ आहेत. ही तर एकदाच आणि एकच खाण मिळते -
अविनाशी ज्ञान रत्नांची. ती पुस्तके (शास्त्रे) तर पुष्कळ आहेत. परंतु त्यांना रत्न
म्हणणार नाही. बाबांना ज्ञानाचा सागर म्हटले जाते. अविनाशी ज्ञान रत्नांची निराकारी
खाण आहे. या रत्नांनी आपण झोळी भरत राहतो. तुम्हा मुलांना आनंद झाला पाहिजे.
प्रत्येकाला अभिमान देखील असतो. दुकानात जेव्हा धंदा जास्त होतो तर प्रसिद्धी देखील
होते. इथे प्रजा देखील बनवत आहात तर वारसदार देखील बनवत आहात. इथून रत्नांची झोळी
भरून मग जाऊन दान द्यायचे आहे. परमपिता परमात्माच ज्ञान सागर आहेत जे ज्ञान रत्नांनी
झोळी भरतात. बाकी तो काही समुद्र नाही ज्यातून दाखवतात की रत्नांच्या थाळ्या भरून
देवतांना देतात. त्या सागरातून काही रत्न मिळत नाहीत. ही ज्ञान रत्नांची गोष्ट आहे.
ड्रामा अनुसार मग तुम्हाला रत्नांच्या खाणी देखील मिळतात. तिथे अमाप हिरे-माणके
असतील, ज्यांची मग भक्तिमार्गामध्ये मंदिरे इत्यादी बनवतील. भूकंप वगैरे झाल्यामुळे
मग सर्व आत गाडले जाते. तिथे महाल वगैरे तर खूप बनतात, एकच तर नाही. इथे देखील
राजांची एकमेकांशी खूप स्पर्धा होते. तुम्ही मुले जाणता - हुबेहूब कल्पा
पूर्वीप्रमाणे घर बांधले होते पुन्हा तसेच बांधणार. तिथे तर अगदी सहज रीतीने घरे
इत्यादी बनत असतील. सायन्स खूप मदत करते. परंतु तिथे ‘सायन्स’ हा शब्द असणार नाही.
सायन्सला हिंदीमध्ये विज्ञान म्हणतात. आजकाल तर ‘विज्ञान भवन’ असे देखील नाव ठेवले
आहे. ‘विज्ञान’ शब्द ज्ञानाला देखील लागू होतो. ज्ञान आणि योगाला विज्ञान म्हणणार.
ज्ञानाद्वारे रत्न मिळतात, योगाद्वारे आपण एव्हर हेल्दी बनतो. हे ज्ञान आणि योगाचे
नॉलेज आहे ज्याद्वारे मग वैकुंठातील मोठ-मोठे भवन बनतील. आपण आता या सर्व नॉलेजला
जाणतो. तुम्ही जाणता आपण भारताला स्वर्ग बनवत आहोत. तुमचे या देहाशी काहीही ममत्व
नाही आहे. आपण आत्मे या शरीराला सोडून स्वर्गामध्ये जाऊन नवीन शरीर घेणार. तिथे
देखील समजतात एक जुने शरीर सोडून जाऊन नवीन घेणार. तिथे कोणतेही दुःख अथवा शोक होत
नाही. नवीन शरीर घेतले तर चांगलेच आहे. आपल्याला बाबा असे बनवत आहेत, जसे
कल्पापूर्वी देखील बनलो होतो. आपण मनुष्यापासून देवता बनत आहोत. बरोबर कल्पापूर्वी
देखील अनेक धर्म होते. गीतेमध्ये यातले काहीच नाही आहे. गायले जाते - आदि सनातन
देवी-देवता धर्माची स्थापना ब्रह्माद्वारे. अनेक धर्मांचा विनाश कसा होतो, ते तर
तुम्ही समजावून सांगू शकता. आता स्थापना होत आहे. बाबा आलेच होते तेव्हा, जेव्हा
देवी-देवता धर्म लोप झाला होता. मग परंपरा कशी चालली असेल. या खूप सोप्या गोष्टी
आहेत. विनाश कशाचा झाला? अनेक धर्मांचा. तर आता अनेक धर्म आहेत ना. यावेळेस अंत आहे,
सर्व ज्ञान बुद्धीमध्ये राहिले पाहिजे. असे तर नाही, शिवबाबाच समजावून सांगतात; हे
बाबा (ब्रह्मा बाबा) काहीच सांगत नाहीत काय. यांचा देखील पार्ट आहे, ब्रह्माचे
देखील श्रीमत गायले गेले आहे. श्रीकृष्णासाठी तर श्रीमत म्हणत नाहीत. तिथे तर सर्व
‘श्री’ आहेत, त्यांना कोणाच्या मताची (सल्ल्याची) आवश्यकताच नाही. इथे ब्रह्माचे
देखील मत मिळते. तिथे तर यथा राजा-राणी तथा प्रजा - सर्वांचेच श्रेष्ठ मत आहे. जरूर
कोणी दिले असेल. देवता आहेत श्रीमतवाले. श्रीमताद्वारेच स्वर्ग बनतो, आसुरी मतामुळे
नरक बनला आहे. श्रीमत आहे शिवाचे. या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी सोप्या आहेत. ही
सर्व दुकाने शिवबाबांची आहेत. आपण मुले चालविणारी आहोत. जे दुकान चांगले चालवतात,
त्यांचे नाव होते. हुबेहूब जसे दुकानदारीमध्ये होते. परंतु हा व्यापार कोणी विरळाच
करेल. व्यापार तर सर्वांना करायचा आहे. छोटी मुले देखील ज्ञान आणि योगाचा व्यापार
करू शकतात. शांतीधाम आणि सुखधाम - बस्स, बुद्धीमध्ये त्यांचीच आठवण करायची आहे. ते
लोक राम-राम म्हणतात. इथे गप्प बसून आठवण करायची आहे, काहीच बोलायचे नाही. शिवपुरी,
विष्णुपुरी खूप सोपी गोष्ट आहे. स्वीट होम, स्वीट राजधानी लक्षात आहे. ते (साधू-संत)
देतात स्थूल मंत्र, हा आहे सूक्ष्म मंत्र. अति सूक्ष्म आठवण आहे. केवळ याची आठवण
केल्याने आपण स्वर्गाचे मालक बनतो. जप इत्यादी देखील काहीच नाही फक्त आठवण करायची
आहे. काहीच आवाज करावा लागत नाही. गुप्त बाबांकडून गुप्त वारसा आपण गप्प राहून,
अंतर्मुख होऊन प्राप्त करतो. याच आठवणीमध्ये असताना शरीर सुटले तर खूप चांगले आहे.
काहीच त्रास नाही, ज्यांना आठवण टिकत नाही त्यांनी आपला अभ्यास करावा. सर्वांना
सांगा - ‘बाबांनी सांगितले आहे - माझी आठवण करा तर अंत मति सो गती. आठवणीनेच विकर्म
विनाश होतील आणि मी स्वर्गामध्ये पाठवेन’. शिवबाबांसोबत बुद्धी योग लावणे खूप सोपे
आहे. पथ्य देखील सर्व इथेच करायचे आहे. सतोप्रधान बनत आहोत तर सर्व काही सात्विक
असले पाहिजे - वागणे सात्विक, बोलणे सात्विक. हे आहे स्वतः सोबत बोलणे. जोडीदाराशी
प्रेमाने बोलायचे आहे. गाण्यामध्ये देखील आहे ना - ‘पियू-पियू बोल सदा अनमोल…’
तुम्ही आहात रूप-बसंत
(ज्ञान स्वरूप होऊन ज्ञानाची वर्षा करणारे). आत्मा रूप बनते. ज्ञानाचा सागर बाबा
आहेत तर जरूर येऊन ज्ञानच ऐकवतील. बाबा म्हणतात - ‘मी एकदाच येऊन शरीर धारण करतो’.
ही काही कमी जादूगिरी नाहीये! बाबा देखील रूप-बसंत आहेत. परंतु निराकार तर बोलू शकत
नाहीत म्हणून शरीर घेतले आहे. परंतु ते पुनर्जन्मामध्ये येत नाहीत. आत्मे तर
पुनर्जन्मा मध्ये येतात.
तुम्ही मुले बाबांवर
बलीहार जाता तर बाबा म्हणतात - मग आता मोह ठेवायचा नाही. काहीही आपले समजायचे नाही.
मोह काढून टाकण्यासाठीच बाबा युक्ती रचतात. पावला-पावलावर बाबांना विचारावे लागते.
माया अशी आहे जी थप्पड मारते. पूर्ण बॉक्सिंग आहे, बरेचजण तर फटका खाऊन मग उभे
राहतात. लिहिता देखील - ‘बाबा, मायेने थप्पड मारले, तोंड काळे केले’. जणूकाही चौथ्या
मजल्यावरून खाली पडला. क्रोध केला तर तिसऱ्या मजल्यावरून पडला. या नीट समजून
घेण्याच्या गोष्टी आहेत. आता बघा, मुले टेपची (मुरलीच्या कॅसेटची) देखील मागणी करत
राहतात. बाबा, टेप पाठवून द्या. आम्ही ॲक्युरेट मुरली ऐकतो. हा देखील प्रबंध
करण्यात येत आहे. खूप जण ऐकतील तर अनेकांची कवाडे (बुद्धीचे दरवाजे) उघडतील. खूप
जणांचे कल्याण होईल. कोणी मनुष्य कॉलेज काढतात तर त्यांना दुसऱ्या जन्मामध्ये जास्त
शिक्षण मिळते. बाबा देखील म्हणतात - टेप रेकॉर्डर खरेदी करा म्हणजे अनेकांचे कल्याण
होईल. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) सतोप्रधान
बनण्यासाठी अतिशय कडक पथ्य पाळून चालायचे आहे. आपले खाणे-पिणे, बोलणे-चालणे सर्व
सात्विक ठेवायचे आहे. बाप समान रूप-बसंत बनायचे आहे.
२) अविनाशी
ज्ञानरत्नांच्या निराकारी खाणीमधून आपली झोळी भरून अपार आनंदामध्ये रहायचे आहे आणि
इतरांना देखील या रत्नांचे दान द्यायचे आहे.
वरदान:-
नष्टोमोहा
बनून दुःख अशांतीच्या नामोनिशाणालाही समाप्त करणारे स्मृती स्वरूप भव
जे सदैव एकाच
स्मृतीमध्ये राहतात, त्यांची स्थिती एकरस होते. एकरस स्थितीचा अर्थ आहे एकाच सोबत
सर्व नाती, सर्व प्राप्तींच्या रसाचा अनुभव करणे. जे बाबांना सर्व नात्यांनी आपले
बनवून स्मृती स्वरूप राहतात ते सहजच नष्टोमोहा बनतात. जे नष्टोमोहा आहेत त्यांना कधी
कमावण्याची, धन सांभाळण्याची, कोणाच्या आजारपणामध्ये… दुःखाची लहर येऊ शकत नाही.
नष्टोमोहा अर्थात दुःख अशांतीचे नामोनिशाण नसावे. सदैव निश्चिंत.
बोधवाक्य:-
क्षमाशील ते
आहेत जे दयाळू बनून सर्वांना आशीर्वाद देत राहतील.