03-01-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - निराकार बाबा तुम्हाला आपले मत देऊन आस्तिक बनवतात, आस्तिक बनल्यानेच
तुम्ही बाबांचा वारसा घेऊ शकता'’
प्रश्न:-
बेहदची राजाई
प्राप्त करण्यासाठी कोणत्या दोन गोष्टीवर पूर्णपणे अटेंशन दिले पाहिजे?
उत्तर:-
१. शिक्षण आणि २. सेवा. सेवेसाठी लक्षण देखील खूप चांगले पाहिजे. हे शिक्षण खूप
वंडरफुल आहे याद्वारेच तुम्ही राजाई प्राप्त करता. द्वापरपासून धन दान केल्याने
राजाई मिळते परंतु आता तुम्ही शिक्षणानेच प्रिन्स-प्रिन्सेस बनता.
गीत:-
हमारे तीर्थ
न्यारे हैं…
ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांनी गाण्याची एक लाईन ऐकली. तुमचे तीर्थ आहे - घरामध्ये बसून
गुप्तपणे मुक्तिधामला पोहचणे. दुनियेतील तीर्थ तर कॉमन आहेत, तुमचे वेगळे आहे.
मनुष्यांचा बुद्धियोग तर साधु-संत इत्यादींकडे खूपच भटकत राहतो. तुम्हा मुलांना तर
फक्त बाबांचीच आठवण करण्याचे डायरेक्शन मिळते. ते आहेत निराकार पिता. असे नाही की,
निराकाराला मानणारे निराकारी मताचे होतात. दुनियेमध्ये मत-मतांतरे तर खूप आहेत ना.
हे एक निराकारी मत निराकार बाबाच देतात, ज्याद्वारे मनुष्य उच्च ते उच्च पद
जीवनमुक्ती अथवा मुक्ती प्राप्त करतात. या गोष्टींना काहीच जाणत नाहीत, असेच फक्त
म्हणतात की, निराकाराला मानणारे आहोत. अनेकानेक मते आहेत. सतयुगामध्ये तर असते एक
मत. कलियुगामध्ये आहेत अनेक मत. अनेक धर्म आहेत, लाखो-करोडो मते असतील. प्रत्येक
घरामध्ये प्रत्येकाचे आपले मत आहे. इथे तुम्हा मुलांना एकच बाबा उच्च ते उच्च
बनण्याचे उच्च ते उच्च मत देतात. तुमची प्रदर्शनीतील चित्रे पाहून खूप लोक म्हणतात
की हे काय बनवले आहे? मुख्य गोष्ट काय आहे? बोला, हे रचयिता आणि रचनेचे
आदि-मध्य-अंताचे ज्ञान आहे, ज्या ज्ञानाद्वारे आम्ही आस्तिक बनतो. आस्तिक बनल्याने
बाबांकडून वारसा मिळतो. नास्तिक बनल्याने वारसा गमावला आहे. आता तुम्हा मुलांचा धंदा
हाच आहे - नास्तिकला आस्तिक बनविणे. हा परिचय तुम्हाला मिळाला आहे बाबांकडून.
त्रिमूर्तीचे चित्र तर खूप क्लिअर आहे. ब्रह्मा द्वारे ब्राह्मण तर जरूर पाहिजेत
ना. ब्राह्मणांद्वारेच यज्ञ चालतो. हा खूप मोठा यज्ञ आहे. सर्वात पहिले तर हे
समजावून सांगायचे आहे की उच्च ते उच्च बाबा आहेत. सर्व आत्मे भाऊ-भाऊ झालो. सर्व एका
पित्याची आठवण करतात, त्यांना बाबा म्हटले जाते; वारसा देखील रचयिता बाबांकडूनच
मिळतो. रचनेकडून तर मिळू शकत नाही म्हणून सर्वजण ईश्वराची आठवण करतात. आता बाबा
आहेतच स्वर्गाचे रचयिता आणि भारतामध्येच येतात, येऊन हे कार्य करतात. त्रिमूर्तीचे
चित्र तर खूप चांगली वस्तू आहे. हे बाबा, हे दादा. ब्रह्मा द्वारे बाबा सूर्यवंशी
घराण्याची स्थापना करत आहेत. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील’.
संपूर्ण एम ऑब्जेक्ट दिला आहे म्हणून बाबा बॅजेस देखील बनवून घेतात. बोला, थोडक्यात
अगदी दोन शब्दांमध्ये तुम्हाला सांगतो. बाबांकडून सेकंदामध्ये वारसा मिळाला पाहिजे
ना. बाबा आहेतच स्वर्गाचे रचयिता. हे बॅजेस तर खूप चांगली वस्तू आहे. परंतु खूप
देह-अभिमानी मुले समजत नाहीत. यामध्ये संपूर्ण ज्ञान एका सेकंदाचे आहे. बाबा येऊन
भारतालाच स्वर्ग बनवतात. नवीन दुनिया बाबाच स्थापन करतात. हे पुरुषोत्तम संगमयुग
देखील गायलेले आहे. हे संपूर्ण ज्ञान बुद्धि मध्ये टपकत राहिले पाहिजे. कोणाचा योग
आहे तर मग ज्ञान नाही, धारणा होत नाही. सेवा करणाऱ्या मुलांची धारणा चांगली होऊ शकते.
बाबा येऊन मनुष्यांना देवता बनविण्याची सेवा करतात आणि मुले काही सेवा करणार नाहीत
तर ते काय कामाचे? ते हृदयामध्ये स्थान कसे मिळवू शकतील? बाबा म्हणतात - ड्रामामध्ये
रावण राज्यातून सर्वांना सोडविण्याचा पार्ट माझाच आहे. राम राज्य आणि रावण राज्य
भारतामध्येच गायलेले आहे. आता राम कोण आहेत? हे देखील जाणत नाहीत. गातात देखील -
पतित-पावन, भक्तांचे भगवान एक. तर जेव्हा कोणी आत घुसतील तेव्हा सर्वप्रथम बाबांचा
परिचय द्या. व्यक्ती-व्यक्तीला पाहून समजावून सांगायला हवे. बेहदचे बाबा येतातच
बेहदच्या सुखाचा वारसा देण्यासाठी. त्यांना आपले शरीर तर नाही आहे, तर मग वारसा कसा
देतात? स्वतः म्हणतात की, मी या ब्रह्मा तनाद्वारे तुम्हाला शिकवून, राजयोग शिकवून
हे पद प्राप्त करवून देतो. या बॅजेस मध्ये सेकंदाचे स्पष्टीकरण आहे. किती छोटा बॅज
आहे परंतु समजावून सांगणारे खूप देही-अभिमानी पाहिजेत. ते फार कमी आहेत. ही मेहनत
कोणाकडून केली जात नाही म्हणून बाबा म्हणतात, चार्ट ठेवून पहा - संपूर्ण
दिवसभरामध्ये आपण किती वेळ आठवणीमध्ये राहतो? संपूर्ण दिवस ऑफिसमध्ये काम करत असताना
आठवणीमध्ये रहायचे आहे. कर्म तर करायचीच आहेत. इथे योगामध्ये बसवून म्हणतात -
‘बाबांची आठवण करा’. त्यावेळी काही तुम्ही कर्म तर करत नाही. तुम्हाला तर कर्म करत
असताना आठवण करायची आहे. नाहीतर मग बसूनच आठवण करण्याची सवय लागते. कर्म करत असताना
आठवणीमध्ये रहाल तेव्हाच कर्मयोगी म्हणून सिद्ध व्हाल. पार्ट तर जरुर बजावायचा आहे,
यामध्येच माया विघ्न उत्पन्न करते. चार्ट देखील कोणी सच्चाईने लिहीत नाहीत.
कोणी-कोणी लिहितात, अर्धा तास, पाऊण तास आठवणीमध्ये राहिलो. ते देखील पहाटेच
आठवणीमध्ये बसत असतील. भक्ती मार्गामध्ये देखील पहाटे उठून रामाची माळा जपतात. असे
देखील नाही, त्यावेळी एकाच्याच धुन मध्ये राहतात. नाही, इतरही खूप संकल्प येत
राहतील. शक्तिशाली भक्तांची बुद्धी थोडीफार एकाग्र होते. हा तर आहे अजपाजप. नवीन
गोष्ट आहे ना. गीतेमध्ये देखील मनमनाभव शब्द आहे. परंतु श्रीकृष्णाचे नाव दिल्याने
श्रीकृष्णाचीच आठवण करतात, काहीच समजत नाहीत. बॅज सोबत जरूर असावा. बोला, बाबा,
ब्रह्मातनाद्वारे बसून समजावून सांगतात त्या बाबांवर आम्ही प्रेम करतो. मनुष्यांना
तर ना आत्म्याचे, ना परमात्म्याचे ज्ञान आहे. बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही हे ज्ञान
देऊ शकत नाही. हे त्रिमूर्ती शिव सर्वात मुख्य आहेत. बाबा आणि वारसा. या चक्राला
समजणे तर खूप सोपे आहे. प्रदर्शनीमध्ये तर प्रजा लाखोंनी बनत राहते ना. राजे थोडेच
असतात, त्यांची प्रजा तर करोडोंच्या अंदाजामध्ये असते. प्रजा पुष्कळ बनते, बाकी राजा
बनविण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. जे जास्त सेवा करतात ते जरूर उच्च पद प्राप्त
करतील. बऱ्याच मुलांना सेवेची खूप आवड आहे. म्हणतात नोकरी सोडून द्यावी, खाण्यासाठी
तर आहेच. बाबांचे बनलात तर शिवबाबांचीच पालना घेणार. परंतु बाबा म्हणतात - मी
वानप्रस्थ मध्ये प्रवेश केला आहे ना. माता देखील तरुण आहेत तर घरी राहून दोन्ही सेवा
करायच्या आहेत. बाबा प्रत्येकाच्या परिस्थितीला पाहून मत (सल्ला) देतात. लग्न
इत्यादीसाठी जर परवानगी दिली नाही तर मग भांडणे होतील म्हणून प्रत्येकाचा हिशोब
पाहून मत देतात. कुमार आहे तर म्हणतील तू सेवा करू शकतोस. सेवा करून बेहदच्या
बाबांकडून वारसा घे. त्या पित्याकडून तुला काय मिळणार? माती (नष्ट होणारे धन). ते
तर सर्व मातीमध्ये मिसळणार आहे. दिवसें-दिवस वेळ कमी होत जातो. बरेचजण असे समजतात
की, माझ्या संपत्तीचे वारसदार माझी मुले बनतील. परंतु बाबा म्हणतात - काहीच मिळणार
नाही आहे. सारी संपत्ती खाक होणार आहे. ते समजतात मागच्या पिढीतील खातील. श्रीमंताचे
धन नष्ट होण्यामध्ये काही वेळ लागत नाही. मृत्यू तर समोर उभाच आहे. कोणीही वारसा
घेऊ शकणार नाहीत. फार थोडे आहेत जे पूर्णपणे ज्ञान समजावून सांगू शकतात. जास्त सेवा
करणारेच उच्च पद प्राप्त करतील. तर त्यांचा आदर सुद्धा ठेवला पाहिजे,
त्यांच्याद्वारे शिकायचे आहे. २१ जन्मासाठी रिगार्ड ठेवावा लागेल. ऑटोमॅटिक जरूर ते
उच्च पद प्राप्त करतील, तर रिगार्ड तर जिथे-तिथे ठेवायचा आहे. स्वतः देखील समजू शकता,
जे मिळाले ते चांगले आहे, यामध्येच खुश होतात. बेहदच्या राजाईसाठी पूर्णत: अभ्यास
आणि सेवेवर अटेंशन पाहिजे. हे आहे बेहदचे शिक्षण. ही राजधानी स्थापन होत आहे ना. या
शिक्षणाने तुम्ही इथे शिकून तिथे प्रिन्स बनता. कोणीही मनुष्य धन दान करतात तर ते
राजाच्या घरी किंवा श्रीमंताच्या घरी जन्म घेतात. परंतु ते आहे अल्पकाळाचे सुख. तर
या शिक्षणावर खूप अटेंन्शन दिले पाहिजे. सेवेची चिंता लागून राहिली पाहिजे. आपण
आपल्या गावामध्ये जाऊन सेवा करावी. अनेकांचे कल्याण होईल. बाबा जाणतात - सेवेची आवड
अजून तरी कोणामध्ये नाही आहे. लक्षणे सुद्धा चांगली तर असली पाहिजेत ना. असे नाही
की डिस-सर्विस करून जास्तच यज्ञाचे नाव बदनाम करावे आणि आपलेच नुकसान करावे. बाबा
तर प्रत्येक गोष्टीवर चांगल्या रीतीने समजावून सांगतात. मेडल्स इत्यादीसाठी किती
काळजी वाटत असते. मग समजले जाते - ड्रामा अनुसार वेळ लागणार आहे. हे
लक्ष्मी-नारायणाचे ट्रान्स लाईटचे चित्र सुद्धा फर्स्ट क्लास आहे. परंतु मुलांवर आज
बृहस्पतीची दशा तर उद्या मग राहूची दशा बसते. ड्रामामध्ये साक्षी होऊन पार्ट बघायचा
आहे. उच्च पद प्राप्त करणारे फार कमी असतात. होऊ शकते ग्रहचारी निघून जाईल. ग्रहचारी
उतरते तेव्हा मग पुन्हा झेप घेतात. पुरुषार्थ करून आपले जीवन बनवले पाहिजे, नाहीतर
कल्प-कल्पांतरासाठी सत्यानाश होईल. समजाल कल्पापूर्वीप्रमाणे ग्रहचारी आली आहे.
श्रीमतावर चालला नाहीत तर पद देखील मिळणार नाही. उच्च ते उच्च आहे भगवंताचे श्रीमत.
या लक्ष्मी-नारायणाच्या चित्राला तुमच्या शिवाय इतर कोणीही समजू शकणार नाही.
म्हणतील चित्र तर खूप चांगले बनवले आहे, बस्स. तुम्हाला मात्र हे चित्र बघताच
मूलवतन, सूक्ष्मवतन, स्थूलवतन संपूर्ण सृष्टीचे चक्र बुद्धीमध्ये येईल. तुम्ही
नॉलेजफुल बनता - नंबरवार पुरुषार्थानुसार. बाबांना (ब्रह्मा बाबांना) तर हे चित्र
पाहून खूप आनंद होतो. स्टुडंटला तर आनंद झाला पाहिजे ना - आपण शिकून असे बनतो.
अभ्यासानेच उच्च पद मिळते. असे नाही की जे भाग्यामध्ये असेल. पुरुषार्थानेच
प्रारब्ध मिळते. पुरुषार्थ करवून घेणारे बाबा मिळाले आहेत, त्यांच्या श्रीमतावर
चालला नाहीत तर वाईट गती (अवस्था) होईल. सर्वात आधी तर कोणालाही या बॅजवर समजावून
सांगा मग जे लायक असतील ते लगेच म्हणतील - आम्हाला हा मिळू शकतो का? हो, का नाही.
या धर्माचा जो असेल त्याला तीर लागेल (त्याच्या काळजाला भिडेल). त्याचे कल्याण होऊ
शकते. बाबा तर सेकंदामध्ये हातावर बहिश्त देतात, यासाठी तर खूप आनंद झाला पाहिजे.
तुम्ही शिवाच्या भक्तांना हे ज्ञान द्या. बोला, शिवबाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा
तर राजांचाही राजा बनाल’. बस्स, दिवसभर हीच सेवा करा. खास बनारसमध्ये शिवाची मंदिरे
तर खूप आहेत, तिथे चांगली सेवा होऊ शकते. कोणी ना कोणी निघतील. खूप सोपी सेवा आहे.
कोणी करून तर पहा, जेवण तर मिळेलच, सेवा करून पहा. सेंटर तर तिथे आहेतच. पहाटे
मंदिरामध्ये जा, रात्रीचे परत या. सेंटर बनवा. सर्वात जास्त तुम्ही शिवाच्या
मंदिरामध्ये सेवा करू शकता. उच्च ते उच्च आहेच मुळी शिवाचे मंदिर. बॉम्बेमध्ये
बबुलनाथाचे मंदिर आहे. संपूर्ण दिवस तिथे जाऊन सेवा करून अनेकांचे कल्याण करू शकता.
हा बॅज पुरेसा आहे. प्रयत्न तर करून पहा. बाबा म्हणतात - हे बॅज लाखच काय परंतु १०
लाख बनवा. वृद्ध लोक तर खूप चांगली सेवा करू शकतात. पुष्कळ प्रजा बनेल. बाबा फक्त
एवढेच म्हणतात - ‘माझी आठवण करा’, बस्स; मनमनाभव शब्द विसरले आहात. भगवानुवाच आहे
ना. शिवबाबा, श्रीकृष्णाला देखील हे पद प्राप्त करवून देतात. मग दगदग करण्याची काय
गरज आहे. बाबा तर म्हणतात फक्त माझी आठवण करा. तुम्ही सर्वात चांगली सेवा शिवाच्या
मंदिरामध्ये करू शकाल. सेवेच्या सफलतेसाठी देही-अभिमानी अवस्थेमध्ये स्थित होऊन सेवा
करा. ‘दिल साफ तो मुराद हांसिल’. बनारसकरिता तर बाबा खास सल्ला देतात, तिथे
वानप्रस्थींचे आश्रम देखील आहेत. बोला आम्ही ब्रह्माची मुले ब्राह्मण आहोत. बाबा
ब्रह्माद्वारे म्हणतात - ‘माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील, दुसरा कोणताही उपाय
नाही’. पहाटे पासून रात्री पर्यंत शिवाच्या मंदिरामध्ये बसून सेवा करा. प्रयत्न
करून पहा. शिवबाबा स्वतः म्हणतात - माझी मंदिरे तर भरपूर आहेत. तुम्हाला कोणीही
काहीही बोलणार नाही, अजूनच खुश होतील, म्हणतील - ‘हे तर शिवबाबांची खूप महिमा करतात’.
तुम्ही बोला - हे ब्रह्मा, हे ब्राह्मण आहेत, हे काही देवता नाहीत. हे देखील
शिवबाबांची आठवण करून हे पद घेतात. यांच्याद्वारे शिवबाबा म्हणतात - मामेकम् (मज
एकाची) आठवण करा. किती सोपे आहे. वृद्धांचा कोणी इन्सल्ट करणार नाही. बनारसमध्ये
अजून पर्यंत इतकी काही सेवा झालेली नाहीये. बॅजवर किंवा चित्रांवर समजावून सांगणे
खूप सोपे आहे. कोणी गरीब असेल तर बोला - तुम्हाला फ्री देतो, श्रीमंत आहेत तर बोला
- तुम्ही द्याल तर अनेकांच्या कल्याणासाठी आणखी छापतो तर तुमचे देखील कल्याण होईल.
हा तुमचा धंदा सर्वात फास्ट होईल. कोणी प्रयत्न तर करून पहा. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
1) कर्म करताना
आठवणीमध्ये राहण्याची सवय लावायची आहे. सेवेच्या सफलतेसाठी आपली अवस्था देही-अभिमानी
बनवायची आहे. मन स्वच्छ ठेवायचे आहे.
वरदान:-
सर्व समस्यांचा
निरोप समारंभ साजरे करणारे समाधान स्वरूप भव समाधान स्वरूप आत्म्यांची माळा तेव्हा
तयार होईल जेव्हा तुम्ही तुमच्या संपूर्ण स्थितीमध्ये स्थित व्हाल. संपूर्ण
स्थितीमध्ये समस्या लहानपणीचा खेळ अनुभव होतात अर्थात समाप्त होतात. ज्याप्रमाणे
ब्रह्मा बाबांसमोर जेव्हा कोणी समस्या घेऊन येत असे तर समस्यांच्या गोष्टी बोलण्याची
हिंमत सुद्धा होत नसे, त्या गोष्टीच विसरायला होत असत. असेच तुम्ही मुले देखील
समाधान स्वरूप बना तर अर्ध्या कल्पासाठी समस्यांचा निरोप समारंभ होईल. विश्वाच्या
समस्यांचे समाधानच परिवर्तन आहे.
बोधवाक्य:-
जे सदैव
ज्ञानाचे चिंतन करतात ते मायेच्या आकर्षणा पासून वाचतात.
आपल्या शक्तिशाली
मन्साद्वारे सकाश देण्याची सेवा करा:-
आपल्या डबल लाईट फरिश्ता स्वरूपामध्ये स्थित होऊन, साक्षी बनून सर्व पार्ट पाहत
सकाश अर्थात सहयोग द्या कारण तुम्ही सर्वांच्या कल्याणाकरिता निमित्त आहात. हे सकाश
देणे हेच निभावणे आहे, परंतु उच्च स्टेजवर स्थित होऊन सकाश द्या. वाणीच्या सेवे
सोबत मन्सा शुभ भावनांच्या वृत्ती द्वारे सकाश देण्याची सेवा करा.