03-02-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ अवश्य करायचा आहे, कारण
आठवणीच्या बळाद्वारेच तुम्ही विकर्माजीत बनाल”
प्रश्न:-
असा कोणता
विचार आला तर पुरुषार्थ कमी होईल? खुदाई खिदमतगार मुले (ईश्वरीय मदतगार मुले) कोणती
सेवा करत राहतील?
उत्तर:-
बरीच मुले असे समजतात की, अजून खूप वेळ बाकी आहे, नंतर पुरुषार्थ करू, परंतु
मृत्यूचा काही नियम थोडाच आहे. उद्या-उद्या म्हणत मरून जाल त्यामुळे असे समजू नका
की, अजून खूप वर्षे बाकी आहेत, शेवटी गैलप करू (पुरुषार्थामधील अंतर भरून काढू). असा
विचार अजूनच खाली आणेल. जेवढे होईल तेवढे आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करून,
श्रीमतावर आपले कल्याण करत रहा. रुहानी खुदाई खिदमतगार मुले (आत्मिक ईश्वरीय मदतगार
मुले) आत्म्यांना मुक्त करण्याची, पतितांना पावन बनविण्याची सेवा करत राहतील.
गीत:-
ओम् नमो शिवाय…
ओम शांती।
हे तर मुलांना समजावून सांगितले गेले आहे की, निराकार बाबा साकार शिवाय कोणतेही
कर्म करू शकत नाहीत. पार्ट बजावू शकत नाहीत. रुहानी बाबा येऊन ब्रह्माद्वारे रुहानी
मुलांना समजावून सांगत आहेत. योगबलाद्वारेच मुलांना सतोप्रधान बनायचे आहे आणि नंतर
सतोप्रधान विश्वाचा मालक बनायचे आहे. हे मुलांच्या बुद्धीमध्ये आहे. कल्प-कल्प बाबा
येऊन राजयोग शिकवतात. येऊन ब्रह्माद्वारे आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना
करतात. म्हणजेच मनुष्याला देवता बनवत आहेत. मनुष्य जे देवी-देवता होते ते आता बदलून
शूद्र पतित बनले आहेत. भारत जेव्हा पारसपुरी होता तेव्हा पवित्रता-सुख-शांती सर्व
काही होते. ही ५ हजार वर्षांची गोष्ट आहे. अचूक हिशोब बाबा बसून समजावून सांगत आहेत.
त्यांच्या पेक्षा श्रेष्ठ तर कोणीच नाही. सृष्टी किंवा झाड, ज्याला कल्पवृक्ष
म्हणतात, त्याच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य बाबाच सांगू शकतात. भारताचा जो देवी-देवता
धर्म होता तो आता प्रायः लोप झाला आहे. देवी-देवता धर्म तर आता राहिलेलाच नाही.
देवतांची चित्रे जरूर आहेत. हे तर भारतवासी जाणतात. सतयुगामध्ये लक्ष्मी-नारायणाचे
राज्य होते. भले शास्त्रांमध्ये ही चूक केली आहे की, कृष्णाला द्वापर युगामध्ये
घेऊन गेले आहेत. बाबाच येऊन चुकलेल्यांना पूर्ण रस्ता सांगतात. रस्ता दाखवणारा येतो
तेव्हा सर्व आत्मे मुक्तीधाममध्ये निघून जातात म्हणूनच त्यांना सर्वांचा सद्गती दाता
असे म्हटले जाते. रचयिता एकच असतो. एकच सृष्टी आहे. दुनियेचा इतिहास-भूगोल एकच आहे,
तो रिपीट होत राहतो. सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुग नंतर येते संगमयुग. कलियुगामध्ये
आहेत पतित, सतयुगामध्ये आहेत पावन. सतयुग येईल तेव्हा जरूर कलियुगाचा विनाश होईल.
विनाशाच्या अगोदर स्थापना होईल. सतयुगामध्ये तर स्थापना होणार नाही. भगवान येणारच
तेव्हा जेव्हा पतित दुनिया असेल. सतयुग तर आहेच पावन दुनिया. पतित दुनियेला पावन
दुनिया बनविण्यासाठी भगवंताला यावे लागते. आता बाबा सोप्यात सोपी युक्ती सांगत आहेत
- देहाची सर्व नाती सोडून देही-अभिमानी बनून बाबांची आठवण करा. कोणीतरी एक
पतित-पावन आहे ना. भक्तांना फळ देणारा एकच भगवान आहे. भक्तांना ज्ञान देतात. पतित
दुनियेमध्ये पावन बनविण्यासाठी ज्ञानसागरच येतात. पावन बनता योगाद्वारे.
बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही पावन तर बनवू शकत नाही. या सर्व गोष्टी इतरांना समजावून
सांगण्यासाठी बुद्धीमध्ये पक्क्या केल्या जातात. घरोघरी संदेश द्यायचा आहे. असे
बोलायचे नाही की भगवान आला आहे. खूप युक्तीने समजावून सांगावे लागेल. तुम्ही बोला,
ते आपले पिता आहेत ना. एक आहे लौकिक पिता, दुसरा आहे पारलौकिक पिता. दुःखाच्या वेळी
पारलौकिक पित्याची आठवण करतात. सुखधाममध्ये कोणीही आठवण करत नाहीत. सतयुगामध्ये
लक्ष्मी-नारायणाच्या राज्यामध्ये सुखच सुख होते. प्योरिटी, पीस, प्रॉस्पेरिटी (पवित्रता,
शांती, समृद्धी) होती. बाबांचा वारसा मिळाला मग बोलावतील कशाला. आत्मा जाणते आपण
सुखात आहोत. हे तर कोणीही सांगेल की, तिथे सुखच सुख आहे. बाबांनी दुःखासाठी तर
सृष्टी रचलेली नाहीये. हा पूर्वनियोजित खेळ आहे. ज्यांचा पार्ट शेवटी आहे, २-४ जन्म
घेतात ते जरूर बाकीचा वेळ शांतीमध्ये राहतील. बाकी ड्रामाच्या खेळामधूनच निघून
जातील, असे काही होऊ शकत नाही. खेळामध्ये तर सर्वांना यावे लागेल. एक-दोन जन्म
मिळतात. बाकीचा वेळ जणू काही मोक्षामध्ये आहेत. आत्मा पार्टधारी आहे ना. काही
आत्म्यांना उच्च पार्ट मिळाला आहे कोणाला नीच. हे देखील आता तुम्ही जाणता, गायले
जाते - ईश्वराचा अंत कोणी मिळवू शकत नाही. बाबाच येऊन रचता आणि रचनेच्या
आदि-मध्य-अंताचा अंत सांगतात. जोपर्यंत रचता स्वतः येत नाही तोपर्यंत रचता आणि
रचनेला जाणू शकत नाही. बाबाच येऊन सांगतात. मी साधारण तनामध्ये प्रवेश करतो. मी
ज्याच्यामध्ये प्रवेश करतो तो आपल्या जन्मांना जाणत नाही. त्यांना बसून ८४ जन्मांची
कहाणी ऐकवतो. कोणाच्याही पार्टमध्ये बदल होऊ शकत नाही. हा पूर्वनियोजित खेळ आहे. हे
देखील कोणाच्या बुद्धीमध्ये बसत नाही. बुद्धीमध्ये तेव्हा बसेल जेव्हा पवित्र बनून
समजून घेतील. चांगल्या प्रकारे समजण्यासाठीच ७ दिवसांची भट्टी आहे. भागवत इत्यादी
देखील ७ दिवस ठेवतात. इथे देखील असे लक्षात येते की, कमीत कमी ७ दिवसांशिवाय
कोणालाही समजू शकणार नाही. काहीजणांना तर खूप चांगले समजते. काहीजणांना तर ७ दिवस
समजावून सुद्धा काहीच समजत नाही. बुद्धीमध्ये बसतच नाही. म्हणतात - मी तर ७ दिवस आलो.
माझ्या बुद्धीमध्ये काहीच बसत नाही. उच्च पद प्राप्त करायचे नसेल तर बुद्धीमध्ये
बसणारही नाही. ठीक आहे, तरीही त्याचे कल्याण तर झाले ना. प्रजा तर अशीच बनते. बाकी
राज्य-भाग्य घेणे त्यामध्ये तर गुप्त मेहनत आहे. बाबांची आठवण केल्याने विकर्म
विनाश होतात. तर आता करा किंवा नका करू परंतु बाबांचे डायरेक्शन हेच आहे. आवडत्या
वस्तूची आठवण केली जाते ना. भक्तीमार्गामध्येच गातात - ‘हे पतित-पावन या’. आता ते
मिळाले आहेत, म्हणत आहेत - माझी आठवण करा तर गंज निघून जाईल. बादशाही अशी सहज थोडीच
मिळू शकते. काहीतरी मेहनत करावी लागेल ना. आठवणी मध्येच मेहनत आहे. मुख्य आहेच
आठवणीची यात्रा. जास्त आठवण करणारे कर्मातीत अवस्थेला प्राप्त करतात. पूर्ण आठवण न
केल्याने विकर्म विनाश होणार नाहीत. योगबलाद्वारेच विकर्माजीत बनायचे आहे. यापूर्वी
देखील योगबलाने विकर्मांना जिंकले आहे. लक्ष्मी-नारायण एवढे पवित्र कसे बनले जेव्हा
की कलियुगाच्या अंताला कोणीही पवित्र नाहीये. यामध्ये तर स्पष्ट आहे, हा गीतेच्या
ज्ञानाचा एपिसोड रिपीट होत आहे. “शिव भगवानुवाच - चुका तर होत राहतात ना. बाबाच
येऊन अभुल (निर्दोष) बनवतात. भारताची जी काही ग्रंथ-शास्त्रे आहेत ती सर्व
भक्तिमार्गाची आहेत. बाबा म्हणतात - मी जे सांगितले होते ते कोणालाच माहित नाहीये.
ज्यांना सांगितले होते त्यांनी पद प्राप्त केले. २१ जन्मांचे प्रारब्ध मिळाले
त्यानंतर ज्ञान प्रायः लोप होते. तुम्ही चक्र पूर्ण करून आला आहात. कल्पापूर्वी
ज्यांनी ऐकले आहे तेच येतील. आता तुम्ही जाणता, आपण मनुष्यांना देवता बनविण्याचे
कलम लावत आहोत. हे आहे दैवी झाडाचे कलम. ते लोक मग त्या झाडांची (भौतिक झाडांची)
भरपूर कलमे लावत राहतात. बाबा येऊन फरक सांगतात. बाबा दैवी फुलांचे कलम लावतात. ते
लोक तर जंगलाचे कलम लावत राहतात (वृक्षारोपण करत राहतात). तुम्ही दाखवता सुद्धा -
कौरव काय करत होते, पांडव काय करत होते. त्यांचे काय नियोजन आहे आणि तुमचे काय
नियोजन आहे. ते आपला प्लॅन बनवतात की दुनियेची वृद्धी होऊ नये. कुटुंब नियोजन करावे
जेणेकरून लोकसंख्या जास्त वाढू नये, त्यासाठी खूप मेहनत करत राहतात. बाबा तर
आपल्याला खूप चांगली गोष्ट सांगतात, अनेक धर्म विनाश होतील आणि ते एकच देवी-देवता
धर्माचे कुटुंब स्थापन करतात. सतयुगामध्ये एकच आदि सनातन देवी-देवता धर्माचे कुटुंब
होते बाकी इतकी कुटुंबे नव्हती. भारतामध्ये किती कुटुंबे आहेत. गुजराती कुटुंब,
महाराष्ट्रीय कुटुंब… वास्तविक भारतवासीयांचे एकच कुटुंब असले पाहिजे. अनेक कुटुंब
असतील तर जरूर आपसामध्ये वाद-विवादच होत राहतील. नंतर सिव्हिल वॉर (यादवी युद्ध)
होते. कुटुंबामध्ये सुद्धा गृह युद्ध सुरु होते. ज्याप्रकारे ख्रिश्चनांचे आपले
कुटुंब आहे. त्यांचे सुद्धा आपसामध्ये भांडण लागते. आपसात दोन भाऊ सुद्धा भेटत
नाहीत, पाण्याची सुद्धा वाटणी केली जाते. शीख धर्माच्या लोकांना वाटते की, आपण
आपल्या शीख धर्मियांना जास्त सुख द्यावे, मोह होतो तर प्रयत्न करत राहतात. जेव्हा
अंत येतो तेव्हा मग यादवी युद्धे इत्यादी सर्व गोष्टी घडतात. आपसात भांडायला
सुरुवात करतात. विनाश तर होणारच आहे. भरपूर बॉम्ब्स बनवत राहतात. जेव्हा मोठे युद्ध
लागले होते ज्यामध्ये दोन बॉम्ब सोडले होते, आता तर भरपूर बनवले आहेत. समजून
घेण्याच्या गोष्टी आहेत ना. तुम्ही समजावून सांगायचे आहे - ही तीच महाभारताची लढाई
आहे. ज्या पण मोठ-मोठ्या व्यक्ती आहेत, म्हणतात - जर या युद्धाला थांबवले नाही तर
संपूर्ण दुनियेला आग लागेल. आग तर लागणारच आहे, हे तर तुम्हीच जाणता. बाबा आदि
सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करत आहेत. राजयोग आहेच मुळी सतयुगाचा. तो
देवी-देवता धर्म आता प्रायः लोप झाला आहे. चित्र सुद्धा बनलेली आहेत. बाबा म्हणतात
- कल्पा पूर्वीप्रमाणे जी विघ्न येणार असतील ती येतीलच. अगोदर थोडेच समजून येते.
नंतर समजले जाते कल्पापूर्वी देखील असेच झाले असेल. हा पूर्वनियोजित ड्रामा आहे. या
ड्रामामध्ये आपण बांधले गेलो आहोत. आठवणीच्या यात्रेला विसरायचे नाही, यालाच परीक्षा
म्हटले जाते. आठवणीच्या यात्रेमध्ये थांबू शकत नाही, थकून जातात. एक गाणे आहे ना -
‘रात के राही थक मत जाना…’ याचा अर्थ कोणी समजू शकत नाही. ही आहे आठवणीची यात्रा,
ज्याद्वारे रात्र पूर्ण होऊन दिवस येईल. अर्धे कल्प पूर्ण होऊन मग सुख सुरू होईल.
बाबांनीच ‘मनमनाभव’चा अर्थ देखील समजावून सांगितला आहे. फक्त गीतेमध्ये कृष्णाचे
नाव घातल्यामुळे ती ताकद राहिलेली नाहीये. आता कल्याण तर सर्वांचे होणार आहे.
जणूकाही आपण सर्व मनुष्यमात्रांचे कल्याण करत आहोत. खास भारत आणि त्या नंतर बाकीची
दुनिया. आपण सर्वांचे श्रीमतावर कल्याण करत आहोत. कल्याणकारी जे बनतील तर वारसा
देखील त्यांनाच मिळेल. आठवणीच्या यात्रेशिवाय कल्याण होऊ शकत नाही.
आता तुम्हाला सांगितले
जाते, ते तर बेहदचे पिता आहेत. पित्याकडून वारसा मिळाला होता. भारतवासीयांनीच ८४
जन्म घेतले आहेत. पुनर्जन्माचा देखील हिशोब आहे. कोणालाच समजत नाही की ८४ जन्म कोण
घेतात. स्वतःचे श्लोक इ. लिहून ऐकवत राहतात. गीता तीच आहे, त्यावर अनेक भाष्ये (टीकात्मक
विवेचन) लिहितात. गीते पेक्षाही भागवत मोठा बनवला आहे. गीतेमध्ये ज्ञान आहे.
भागवतामध्ये आहे जीवन कहाणी. वास्तविक गीता मोठी असायला पाहिजे. ज्ञानाचा सागर बाबा
आहेत, त्यांचे ज्ञान तर चालतच राहते. ती गीता तर अर्ध्या तासात वाचून काढतात. आता
तुम्ही हे ज्ञान तर ऐकतच आला आहात. दिवसेंदिवस तुमच्याकडे अनेक लोक येत राहतील.
हळू-हळू येतील. आत्ताच जर मोठे-मोठे राजे आले तर वेळ लागणार नाही. लगेच आवाज पसरेल
म्हणून युक्तीने हळू-हळू हे काम चालत राहते. हे आहेच गुप्त ज्ञान. कोणालाच माहित
नाहीये की हे काय करत आहेत. तुमचे रावणाशी युद्ध कसे आहे, हे तर तुम्हीच जाणता इतर
कोणीही जाणू शकत नाही. भगवानुवाच - तुम्ही सतोप्रधान बनण्यासाठी माझी आठवण करा तर
पापे नष्ट होतील. पवित्र बना तेव्हाच तर सोबत घेऊन जाईन. जीवनमुक्ती सर्वांना
मिळणार आहे. रावण राज्यापासून मुक्ती होईल. तुम्ही लिहिता देखील की, आम्ही शिव-शक्ती
ब्रह्माकुमार-कुमारी परमपिता परमात्म्याच्या श्रीमतावर, ५ हजार वर्षांपूर्वी प्रमाणे
श्रेष्ठाचारी दुनिया स्थापन करणार आहोत. ५ हजार वर्षांपूर्वी श्रेष्ठाचारी दुनिया
होती. हे त्यांच्या बुद्धीमध्ये पक्के केले पाहिजे. मुख्य-मुख्य मुद्दे बुद्धीमध्ये
धारण होतील तेव्हाच आठवणीच्या यात्रेमध्ये राहाल. पत्थर-बुद्धी आहेत ना. काहीजण
समजतात अजून वेळ बाकी आहे नंतर पुरुषार्थ करू. परंतु मृत्यूचा काही नियम थोडाच आहे.
उद्या मेला तर उद्या-उद्या करत मरून जातील. पुरुषार्थ तर केला नाही म्हणून असे समजू
नका की अजून खूप वर्षे बाकी आहेत. शेवटी फरक भरून काढू. असा विचार अजूनच खाली आणेल.
जेवढे होईल तेवढा पुरुषार्थ करत रहा. श्रीमतावर प्रत्येकाला आपले कल्याण करायचे आहे.
आपली तपासणी करायची आहे - मी किती बाबांची आठवण करतो आणि किती सेवा करतो! खुदाई
खिदमतगार (ईश्वरीय मदतगार) तुम्ही आहात ना. तुम्ही आत्म्यांना सैलवेज करता (मदत करता).
आत्मा पतितापासून पावन कशी बनू शकेल त्यासाठी युक्त्या सांगतात. दुनियेमध्ये चांगले
आणि वाईट मनुष्य तर असतातच, प्रत्येकाचा पार्ट आपला-आपला आहे. ही आहे बेहदची गोष्ट.
मुख्य फांद्याच मोजल्या जातात. बाकी पाने तर अनेक आहेत. बाबा समजावून सांगत राहतात
- मुलांनो, मेहनत करा. सर्वांना बाबांचा परिचय द्या बाबांसोबत बुद्धियोग जोडला जाईल.
बाबा सर्व मुलांना म्हणतात, पवित्र बना तर मुक्तिधाममध्ये निघून जाल. दुनियेला
थोडेच ठाऊक आहे की महाभारत लढाई मुळे काय होईल. हा ज्ञान यज्ञ रचला गेला आहे कारण
नवीन दुनिया पाहिजे. आपला यज्ञ पूर्ण होईल तेव्हा सर्व या यज्ञामध्ये स्वाहा होतील.
अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) हा
पूर्वनियोजित ड्रामा आहे त्यामुळे विघ्नांना घाबरायचे नाही. विघ्नांमध्ये आठवणीच्या
यात्रेला विसरून जाऊ नका. लक्षात ठेवा - आठवणीची यात्रा कधीही थांबू नये.
२) पारलौकिक पित्याचा
परिचय सर्वांना देऊन पावन बनवण्याची युक्ती सांगायची आहे. दैवी झाडाचे कलम लावायचे
आहे.
वरदान:-
‘मी पणा’चा
त्याग करून सदैव सेवेमध्ये मग्न राहणारे त्यागमूर्त, सेवाधारी भव
सेवाधारी सेवेमध्ये
सफलतेची अनुभूती तेव्हा करू शकतात जेव्हा ‘मी पणा’चा त्याग होईल. मी सेवा करत आहे,
मी सेवा केली - या सेवाभावाचा त्याग. मी केली नाही परंतु मी करनहार आहे, करावनहार
बाबा आहेत. ‘मी पणा’ बाबांच्या प्रेमामध्ये विरघळून जावा - याला म्हटले जाते
सेवेमध्ये सदैव मग्न राहणारे त्यागमूर्त, सच्चे सेवाधारी. करवून घेणारा करवून घेत
आहे, मी निमित्त आहे. सेवेमध्ये ‘मी पणा’ मिक्स होणे अर्थात मोहताज (परावलंबी) बनणे.
खऱ्या सेवाधारीमध्ये हा संस्कार असू शकत नाही.
बोधवाक्य:-
व्यर्थला
समाप्त करा तर सेवेची ऑफर समोर येईल.
हे अव्यक्त इशारे:-
एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना. एकतेसाठी स्वतःमध्ये
सामावण्याची शक्ती पाहिजे, यामुळे दुसऱ्याचे संस्कार देखील अवश्य शितल होतील. सदैव
एकमेकांमध्ये स्नेहाच्या, श्रेष्ठतेच्या भावनेने संपर्कामध्ये या, गुणग्राही बना
तेव्हाच एकता कायम राहू शकेल. तुमच्या संघटनची शुभ भावना अनेक आत्म्यांना भावनेचे
फळ देण्याच्या निमित्त बनेल. त्यांना नवीन मार्ग मिळेल.