03-03-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - या बेहदच्या नाटकाला सदैव लक्षात ठेवा तर अपार खुशी राहील, या नाटकामध्ये जे चांगले पुरुषार्थी आणि अनन्य आहेत, त्यांची पूजा देखील जास्त होते”

प्रश्न:-
कोणती स्मृती दुनियेतील सर्व दुःखांपासून मुक्त करते, हर्षित राहण्याची युक्ती कोणती आहे?

उत्तर:-
सदैव स्मृती रहावी की आता आपण भविष्य नवीन दुनियेमध्ये जात आहोत. भविष्याच्या आनंदामध्ये रहा तर दुःख विसरून जाल. विघ्नांच्या दुनियेमध्ये विघ्न तर येणारच परंतु स्मृती रहावी की या दुनियेमध्ये आपण बाकी थोडे दिवस आहोत तर हर्षित रहाल.

गीत:-
जाग सजनियाँ जाग…

ओम शांती।
हे गाणे खूप चांगले आहे. गाणे ऐकल्यानेच वरपासून खाल पर्यंत ८४ जन्मांचे रहस्य बुद्धीमध्ये येते. हे देखील मुलांना समजावून सांगितले आहे की तुम्ही जेव्हा वरून येता तेव्हा व्हाया सूक्ष्म वतनमधून येत नाही. आता व्हाया सूक्ष्मवतनमधून जायचे आहे. बाबा आत्ताच सूक्ष्मवतन दाखवतात. सतयुग-त्रेतामध्ये या ज्ञानाचा प्रश्नच राहत नाही. ना कोणती चित्रे इत्यादी आहेत. भक्तीमार्गामध्ये तर अथाह चित्रे आहेत. देवी इत्यादींची पूजा देखील खूप होते. दुर्गा, काली, सरस्वती तर एकच आहे परंतु नावे किती ठेवली आहेत. जे चांगला पुरुषार्थ करत असतील, अनन्य असतील त्यांची पूजा देखील जास्त होईल. तुम्ही जाणता आपणच पूज्य पासून पुजारी बनून बाबांची आणि आपली पूजा करतो. हे (ब्रह्माबाबा) देखील नारायणाची पूजा करत होते ना. वंडरफुल खेळ आहे. जसे नाटक बघितल्यावर आनंद होतो ना, तसे हे देखील बेहदचे नाटक आहे, याला कोणीही जाणत नाहीत. तुमच्या बुद्धीमध्ये आता साऱ्या ड्रामाचे रहस्य आहे. या दुनियेमध्ये किती अथाह दुःख आहे. तुम्ही जाणता आता थोडा वेळ बाकी आहे, आपण जात आहोत नवीन दुनियेमध्ये. भविष्याची खुशी राहते तर मग हे दुःख विसरायला होते. मुले लिहितात - ‘बाबा, खूप विघ्ने येतात, खूप तोटा होतो’. बाबा म्हणतात - काहीही विघ्न येऊ देत, आज लखपती आहात, उद्या कखपती बनता. तुम्हाला तर भविष्याच्या खुशीमध्ये रहायचे आहे. ही आहेच रावणाची आसुरी दुनिया. चालता-चालता कोणते ना कोणते विघ्न येईल. या दुनियेमध्ये बाकी थोडे दिवस आहेत मग आपण अथाह सुखामध्ये जाणार. बाबा (ब्रह्माबाबा) म्हणतात ना - ‘काल सावळा होतो, गावातील मुलगा होतो, आता बाबा मला नॉलेज देऊन गोरा बनवत आहेत’. तुम्ही जाणता बाबा बिजरूप आहेत, सत आहेत, चैतन्य आहेत. त्यांना सुप्रीम सोल म्हटले जाते. ते उच्च ते उच्च राहणारे आहेत, पुनर्जन्मामध्ये येत नाहीत. आपण सर्व जन्म-मरणामध्ये येतो, ते रिझर्व्ह (आरक्षित) आहेत. त्यांना तर अंतामध्ये येऊन सर्वांची सद्गती करायची आहे. तुम्ही भक्तीमार्गामध्ये जन्म-जन्मांतर गात आले आहात - ‘बाबा, तुम्ही याल तेव्हा आम्ही तुमचेच बनणार. माझे तर एक बाबा दुसरे ना कोणी. मी बाबांसोबतच जाणार’. ही आहे दुःखाची दुनिया. भारत किती गरीब आहे. बाबा म्हणतात - ‘मी भारतालाच श्रीमंत बनवले होते मग रावणाने नरक बनवला आहे’. आता तुम्ही मुले बाबांच्या सन्मुख बसले आहात. गृहस्थ व्यवहारामध्ये देखील खूपजण राहतात. सर्वांनाच काही इथे बसायचे नाहीये. गृहस्थ व्यवहारामध्ये रहा, भले रंगीत कपडे घाला, कोण म्हणते पांढरे कपडे घाला. बाबांनी कधी कुणाला सांगितलेले नाहीये. तुम्हाला चांगले वाटत नाही म्हणून तुम्ही सफेद कपडे घातले आहेत. इथे भले तुम्ही पांढरे वस्त्र घालून राहता, परंतु रंगीत कपडे घालणारे, त्या ड्रेसमध्ये देखील खूप जणांचे कल्याण करू शकतात. माता आपल्या पतीला देखील समजावून सांगते - ‘भगवानुवाच आहे - पवित्र बनायचे आहे’. देवता पवित्र आहेत तेव्हाच तर त्यांच्यासमोर डोके टेकवतात. पवित्र बनणे तर चांगले आहे ना. आता तुम्ही जाणता सृष्टीचा अंत आहे. जास्त पैसे काय करणार. आज-काल किती डाके घालतात, लाचखोरी किती वाढली आहे. हे आत्ताचे गायन आहे - ‘किनकि दबी रही धुल में… सफली होगी उसकी, जो धनी के नाम खर्चे…’ धनी तर आता सन्मुख आहेत. हुशार मुले आपले सर्व काही धनीच्या नावावर सफल करतात.

मनुष्य तर सर्व पतित, पतितांना दान करतात. इथे तर पुण्य आत्म्यांकडून दान घ्यायचे आहे. ब्राह्मणांशिवाय इतर कोणाशीही कनेक्शन नाही. तुम्ही आहात पुण्य-आत्मे. तुम्ही पुण्याचेच काम करता. ही घरे बनवतात, त्यामध्ये देखील तुम्हीच राहता. पापाची तर कोणती गोष्टच नाही. जे काही पैसे आहेत - भारताला स्वर्ग बनविण्यासाठी खर्च करत असता. आपल्या पोटाला देखील पट्टी बांधून म्हणतात - बाबा, आमची एक वीट जरी यामध्ये लावाल तर तिथे आम्हाला महाल मिळेल. मुले किती हुशार आहेत. दगडाच्या बदल्यात सोने मिळते. वेळच फार थोडा बाकी आहे. तुम्ही किती सेवा करत आहात. प्रदर्शनी, मेळे वाढत जात आहेत. फक्त मुली हुशार झाल्या पाहिजेत. बेहदच्या बाबांच्या बनत नाहीत, मोह सोडत नाहीत. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला स्वर्गामध्ये पाठवले होते, आता पुन्हा तुम्हाला स्वर्गासाठी तयार करत आहे. जर श्रीमतावर चालाल तर उच्च पद प्राप्त कराल’. या गोष्टी इतर कोणीही समजावून सांगू शकणार नाही. संपूर्ण सृष्टी चक्र तुमच्या बुद्धीमध्ये आहे - मूलवतन, सूक्ष्मवतन आणि स्थूलवतन. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, स्व-दर्शन चक्रधारी बना, इतरांना देखील समजावून सांगत रहा’. हा धंदा बघा कसा आहे. आपणही श्रीमंत, स्वर्गाचा मालक बनायचे आहे आणि इतरांना देखील बनवायचे आहे. बुद्धीमध्ये हेच राहिले पाहिजे - कोणाला कसा रस्ता सांगावा? ड्रामा अनुसार जे पास्ट झाले तो ड्रामा. सेकंद बाय सेकंद जे होते, त्याला आपण साक्षी होऊन बघतो. मुलांना बाबा दिव्य दृष्टीने साक्षात्कार देखील करवितात. पुढे चालून तुम्ही खूप साक्षात्कार कराल. मनुष्य दुःखामध्ये त्राही-त्राही करत राहतील आणि तुम्ही आनंदाने टाळ्या वाजवत रहाल. आपण मनुष्यापासून देवता बनत आहोत तर जरूर नवीन दुनिया पाहिजे. त्यासाठी हा विनाश समोर उभा आहे. हे तर चांगले आहे ना. लोकांना वाटते की, आपसामध्ये कोणी भांडण-तंटे करू नयेत, शांती व्हावी. बस्स. परंतु हे तर ड्रामामध्ये नोंदलेले आहे. दोन माकडे आपसामध्ये भांडली, लोणी मधल्यामध्ये तिसऱ्यालाच मिळाले. तर आता बाबा म्हणतात - ‘मज पित्याची आठवण करा आणि सर्वांना रस्ता दाखवा’. रहायचे देखील साधारण आहे, खायचे देखील साधारण आहे. कधी-कधी पाहुणचार देखील केला जातो. ज्या भंडाऱ्यातून खातात, तर म्हणतात - ‘बाबा, हे सर्व तुमचे आहे’. बाबा म्हणतात - ‘ट्रस्टी होऊन सांभाळा. बाबा, सर्वकाही तुम्हीच दिलेले आहे असे भक्तीमार्गामध्ये फक्त बोलायचे म्हणून बोलत होता. आता मी तुम्हाला म्हणतो ट्रस्टी बना. आता मी सन्मुख आहे. मी देखील ट्रस्टी बनून मग तुम्हाला ट्रस्टी बनवितो. जे काही कराल ते विचारून करा’. बाबा प्रत्येक गोष्टीमध्ये सल्ला देत राहतील. बाबा, घर बांधू, असे करू, बाबा म्हणतील भले करा. परंतु पाप-आत्म्यांना मुळीच द्यायचे नाही. मुलगी जर ज्ञानामध्ये चालत नाही, लग्न करू इच्छिते तर काय करू शकतो. बाबा तर समजावून सांगतात - तू का अपवित्र बनतेस, परंतु कोणाच्या भाग्यामध्ये नाही तर मग पतित बनतात. अनेक प्रकारच्या केसेस देखील होत असतात. पवित्र राहत असताना देखील माया थप्पड मारते, घाणेरडे (विकारी) बनतात. माया खूप प्रबळ आहे. तर ते देखील कामवश होतात, तर मग म्हटले जाते - ड्रामाची भावी. या क्षणापर्यंत जे काही झाले कल्पापूर्वी देखील झाले होते. नथिंग न्यू. चांगले काम करण्यामध्ये विघ्न आणते, काही नवीन गोष्ट नाहीये. आपल्याला तर तन-मन-धनाने भारताला जरूर स्वर्ग बनवायचे आहे. सर्वकाही बाबांवर स्वाहा करणार. तुम्ही मुले जाणता - आपण श्रीमतावर या भारताची रूहानी सेवा करत आहोत. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की, आम्ही आपले राज्य पुन्हा स्थापन करत आहोत. बाबा म्हणतात - हे रुहानी हॉस्पिटल कम युनिव्हर्सिटी तीन पावले पृथ्वीवर उघडा, ज्यामुळे मनुष्य एव्हरहेल्दी, वेल्दी बनेल. पृथ्वीची तीन पावले सुद्धा कोणी देत नाही. म्हणतात बी. के. जादू करतील, भाऊ-बहिण बनवतील. तुमच्यासाठी ड्रामामध्ये युक्ती खूप चांगली रचली आहे. भाऊ-बहिण कधी कु-दृष्टी ठेऊ शकत नाहीत. आजकाल दुनियेमध्ये इतकी घाण आहे, काही विचारू नका. तर जशी बाबांना दया आली, तशी तुम्हा मुलांना देखील दया आली पाहिजे. जसे बाबा नरकाला स्वर्ग बनवत आहेत, असे तुम्हा दयाळू मुलांना देखील बाबांचे मदतगार बनायचे आहे. पैसे असतील तर हॉस्पिटल कम युनिव्हर्सिटी उघडत जा. यामध्ये जास्त खर्चाचा तर काही प्रश्नच नाही. फक्त चित्रे ठेवा. ज्यांनी कल्पापूर्वी ज्ञान घेतले असेल, त्यांचे कुलूप उघडत जाईल. ते येत राहतील. शिकण्यासाठी दूर-दूरवरून किती मुले येतात. बाबांनी असे देखील पाहिले आहेत, रात्री एका गावातून निघतात, सकाळी सेंटरवर येऊन पोहोचतात आणि झोळी भरून जातात. झोळी अशी देखील असू नये जी गळतच राहील. ते मग काय पद मिळवतील! तुम्हा मुलांना तर खूप आनंद झाला पाहिजे. बेहदचे बाबा आम्हाला बेहदचा वारसा देण्यासाठी शिकवतात. किती सोपे ज्ञान आहे. बाबा म्हणतात जे एकदम पत्थर-बुद्धी आहेत त्यांना पारस-बुद्धी बनवायचे आहे. बाबांना (ब्रह्मा बाबांना) तर खूप आनंद होत असतो. हे गुप्त आहेत ना. ज्ञान देखील गुप्त आहे. मम्मा-बाबा हे लक्ष्मी-नारायण बनतात तर मग आपण कमी दर्जाचे बनणार काय! आम्ही देखील सेवा करणार. तर हा नशा राहिला पाहिजे. आपण आपली राजधानी योगबलाने स्थापन करत आहोत. आता आपण स्वर्गाचे मालक बनतो. तिथे मग हे ज्ञान असणार नाही. हे ज्ञान आता या वेळेसाठी आहे. अच्छा !

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) शहाणे बनून आपले सर्व काही धणीच्या नावावर सफल करायचे आहे. पतितांना दान करायचे नाही. ब्राह्मणांशिवाय इतर कोणाशीही कनेक्शन ठेवायचे नाही.

२) बुद्धीरुपी झोळीमध्ये कोणते असे छिद्र असू नये ज्यामधून ज्ञान गळून जात राहील. बेहदचे बाबा बेहदचा वारसा देण्यासाठी शिकवत आहेत, या गुप्त आनंदामध्ये रहायचे आहे. बाप समान दयाळू बनायचे आहे.

वरदान:-
संपन्नते द्वारे संतुष्टतेचा अनुभव करणारे सदा हर्षित, विजयी भव

जे सर्व खजिन्यांनी संपन्न आहेत ते सदा संतुष्ट आहेत. संतुष्टता अर्थात संपन्नता. जसे बाबा संपन्न आहेत म्हणून महिमा करताना ‘सागर’ शब्द वापरतात, तशी तुम्ही मुले देखील मास्टर सागर अर्थात संपन्न बना तर सदैव आनंदामध्ये नाचत रहाल. आतमध्ये आनंदाशिवाय आणखी काहीही येऊ शकत नाही. स्वयं संपन्न असल्यामुळे तुम्हाला कोणाचाही त्रास होणार नाही. कोणत्याही प्रकारचा गोंधळ अथवा विघ्न एखाद्या खेळाप्रमाणे अनुभव होईल, समस्या मनोरंजनाचे साधन बनेल. निश्चय-बुद्धी असल्या कारणाने सदैव हर्षित आणि विजयी व्हाल.

बोधवाक्य:-
नाजूक परिस्थितींना घाबरू नका, त्यातून धडा शिकून स्वतःला परिपक्व बनवा.

मातेश्वरीजींची अनमोल महावाक्ये:-
“परमात्मा गुरु, शिक्षक आणि पित्याच्या रूपामध्ये भिन्न-भिन्न नात्यांचा वारसा देतात”

आता बघा, परमात्मा तीन रूपे धारण करून वारसा देतात. ते आपले पिता देखील आहेत, शिक्षक देखील आहेत तर गुरु देखील आहेत. आता पित्यासोबत पित्याचे नाते आहे, शिक्षकासोबत शिक्षकाचे नाते आहे आणि गुरूकडून गुरुचे नाते आहे. जर पित्याला सोडचिठ्ठी दिलीत तर मग वारसा कसा मिळणार? जेव्हा पास होऊन शिक्षकाकडून सर्टिफिकेट घ्याल तेव्हाच शिक्षकाची सोबत मिळेल. जर बाबांचा प्रामाणिक आणि आज्ञाधारक मुलगा बनून डायरेक्शनप्रमाणे चालला नाहीत तर तुमचे भविष्य प्रारब्ध बनणार नाही. आणि मग पूर्ण सद्गतीला देखील प्राप्त करू शकणार नाही, ना पुढे कधी बाबांकडून पवित्रतेचा वारसा घेऊ शकणार. परमात्म्याची प्रतिज्ञा आहे - जर तुम्ही तीव्र पुरुषार्थ कराल तर तुम्हाला १०० पटीने फायदा देईन. फक्त म्हणायचे म्हणून नाही, त्यांच्याशी नाते देखील तेवढे घट्ट पाहिजे. अर्जुनाला देखील हुकूम केला होता की, सर्वांना मारून टाक, निरंतर माझी आठवण कर. परमात्मा तर समर्थ आहेत, सर्वशक्तीवान आहेत, ते आपले वचन अवश्य पाळतील, परंतु तेव्हा जेव्हा मुले देखील बाबांना दिलेले वचन पाळतील; जेव्हा सर्वांमधून बुद्धियोग तोडून एका परमात्म्यासोबत जोडाल तेव्हाच त्यांच्याकडून संपूर्ण वारसा मिळेल.

अव्यक्त इशारे - सत्यता आणि सभ्यता रुपी कल्चरला (संस्कृतीला) धारण करा:-

जोशमध्ये येऊन जर कोणी सत्यतेला सिद्ध करत असेल तर जरूर त्यामध्ये काही ना काही असत्यता सामावलेली आहे. काही मुलांची ही भाषाच झाली आहे - ‘मी अगदी खरे बोलतो, १०० टक्के सत्य बोलतो’; परंतु सत्याला सिद्ध करण्याची आवश्यकता नसते. ‘सत्य’, हा एक असा सूर्य आहे जो लपू शकत नाही, भले कोणी कितीही भिंती समोर आणू देत परंतु सत्यतेचा प्रकाश कधीही लपू शकत नाही. सभ्यता पूर्वक बोल, सभ्यता पूर्वक व्यवहार, यानेच सफलता मिळते.