03-03-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही रुप बसंत आहात, तुमच्या मुखातून सदैव ज्ञान रत्नेच निघाली पाहिजेत, कधीही कोणी नवीन व्यक्ती आली तर तिला बाबांचा परिचय करून द्या”

प्रश्न:-
आपल्या अवस्थेला एकरस बनविण्याचे साधन कोणते आहे?

उत्तर:-
संगतीची काळजी घ्या तर अवस्था एकरस बनत जाईल. नेहमी चांगल्या सेवाभावी स्टुडंटची संगत केली पाहिजे. जर कोणी ज्ञान आणि योगाच्या व्यतिरिक्त उलट्या गोष्टी करत असतील, मुखातून रत्नांच्या ऐवजी पत्थर काढत असतील तर त्यांच्या संगतीपासून नेहमी जपून राहिले पाहिजे.

गीत:-
रात के राही...

ओम शांती।
ज्ञान आणि विज्ञान. याला म्हणतात अल्फ आणि बे (बाबा आणि बादशाही). बाबा अल्फ आणि बे चे ज्ञान देतात. दिल्लीमध्ये विज्ञान भवन आहे परंतु ते कोणीही अर्थ जाणत नाहीत. ज्ञान आणि योग विषयी तुम्ही मुले जाणता. योगाद्वारे आम्ही पवित्र बनतो, ज्ञानाद्वारे आमचे वस्त्र (आत्मा) रंगते. आम्ही साऱ्या चक्राला जाणतो. योगाच्या यात्रेकरिता देखील हे ज्ञान मिळते. ते (दुनियावाले) काही योगासाठी ज्ञान देत नाहीत. ते तर स्थूलमध्ये ड्रिल (व्यायाम) इत्यादी शिकवतात. ही आहे सूक्ष्म आणि मूळ गोष्ट. गाणे देखील त्याच्याशी संबंधित आहे. बाबा म्हणतात - ‘माझ्या मुलांनो, हे मूलवतनच्या प्रवाशांनो, पतित-पावन बाबाच सर्वांचे सद्गती दाता आहेत. तेच सर्वांना घरी जाण्याचा मार्ग सांगतील. तुमच्याकडे मनुष्य येतात हे ज्ञान समजून घेण्यासाठी. कोणाकडे येतात? प्रजापिता ब्रह्माकुमार-ब्रह्माकुमारींकडे येतात तर तुम्ही त्यांना विचारले पाहिजे की, ‘तुम्ही कोणाकडे आला आहात?’ मनुष्य, साधू, संत, महात्म्यांकडे जातात. त्यांचे नाव देखील असते - अमके महात्मा जी. इथे तर नावच आहे प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी. बी. के. तर पुष्कळ आहेत. तुम्हाला विचारायचे आहे - ‘कोणाकडे आला आहात? प्रजापिता ब्रह्मा तुमचा कोण लागतो?’ ते तर सर्वांचे पिता झाले ना. काहीजण म्हणतात - तुमच्या महात्मा जी, गुरुजींचे दर्शन करायचे आहे. बोला, ‘तुम्ही गुरू कसे काय म्हणता? नावच ठेवले आहे - ‘प्रजापिता ब्रह्माकुमारी’ तर ते पिता झाले ना, गुरू नाही’. प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी म्हणजेच यांचा कोणी पिता आहे. तो तर तुमचा देखील पिता झाला. असे म्हणा की, आम्ही बी. कें. च्या पित्याला भेटू इच्छितो. प्रजापित्याचे नाव कधी ऐकले आहे का? इतके मुलगे आणि मुली आहेत. पित्या विषयी माहित होईल तेव्हाच तर समजेल ना की, बेहदचे पिता आहेत. प्रजापिता ब्रह्माचा देखील जरुर कोणी पिता असेल. तर कोणीही आले तर त्यांना विचारायचे आहे की, ‘कोणाकडे आला आहात?’ बोर्डवर काय लिहीले आहे? जेव्हा की एवढी सारी सेंटर्स आहेत. इतके सारे ब्रह्माकुमार-कुमारी आहेत तर जरुर पिता असेल. गुरू असू शकणार नाही. पहीले तर हे बुद्धितून काढून टाका, आणि असे समजा की हे घर आहे, कोणत्या परिवारामध्ये आलो आहे. आम्ही प्रजापिता ब्रह्माची संतान आहोत तर जरूर तुम्ही देखील असाल. अच्छा, हा ब्रह्मा मग कोणाचा मुलगा आहे? ब्रह्मा, विष्णू, शंकराचा रचयिता तर परमपिता परमात्मा शिव आहेत. ते आहेतच बिंदू. त्यांचे नाव आहे - शिव. ते आमचे आजोबा आहेत. तुमची आत्मा देखील त्यांची संतान आहे. ब्रह्माची तुम्ही देखील संतान आहात. तर तुम्ही असे म्हणा की, आम्ही बापदादांना भेटू इच्छितो. त्यांना असे समजावून सांगितले पाहिजे जेणेकरून त्यांची बुद्धि बाबांकडे जाईल. त्यांना समजले पाहिजे की आपण कोणाकडे आलो आहोत. प्रजापिता ब्रह्मा आपले पिता आहेत. ते (शिवबाबा) आहेत सर्व आत्म्यांचे पिता. तर पहिले हे समजून घ्या की, आपण कोणाकडे आलो आहोत. असे युक्तीने समजावून सांगायचे आहे जेणेकरून त्यांना माहीत होईल की, ही सर्व शिवबाबांची मुले आहेत, ही एक फ़ॅमिली आहे. त्यांना पित्याचा आणि आजोबांचा परिचय मिळेल. तुम्ही समजावून सांगू शकता की, सर्वांचे सद्गती दाता निराकार बाबा आहेत. ते प्रजापिता ब्रह्मा द्वारे सर्वांची सद्गती करतात. त्यांना सर्वजण बोलावतात. बघत आहात ना - कितीतरी मुले आहेत जी येऊन बाबांकडून वारसा घेत आहेत. अगोदर त्यांना पित्याचा परिचय मिळावा म्हणजे मग समजतील की आपण बाप-दादांना भेटण्यासाठी आलो आहोत. बोला, आम्ही त्यांना बाप-दादा म्हणतो. नॉलेजफुल, पतित-पावन ते शिवबाबा आहेत ना. आणि मग हे समजावून सांगितले पाहिजे की, भगवान, सर्वांचे सद्गती दाता निराकार आहेत, ते ज्ञानाचा सागर आहेत. सर्व बी.के. ब्रह्मा द्वारे बेहदचा वारसा घेत आहेत. तर तो समजेल की हे ब्रह्माकुमार-कुमारी शिवबाबांची संतान आहेत, तेच सर्वांचे पिता आहेत. भगवान एकच आहे. तेच आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करतात. ते स्वर्गाचे रचयिता, सर्वांचे पिता देखील आहेत, टीचर सुद्धा आहेत, गुरू देखील आहेत. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगतात अर्थात त्रिकालदर्शी बनवतात. ज्याला पाहून असे वाटेल की, हे ज्ञान समजण्याच्या लायक आहेत, तर त्यांना हे समजावून सांगितले पाहिजे. पहिल्यांदा हे विचारा - तुमचे पिता किती आहेत? लौकिक आणि पारलौकिक. पिता तर सर्वव्यापी असू शकत नाही. लौकिक पित्याकडून हा वारसा मिळतो, पारलौकिककडून हा-हा वारसा मिळतो. तर मग त्यांना सर्वव्यापी कसे काय म्हणू शकता. तर आता हे शब्द लिहून घ्या आणि धारण करा. हे जरूर सांगावे लागते. सांगणारे तुम्ही आहात. हे घर आहे, आमचा कोणी गुरू नाही. तुम्ही बघता हे सर्व ब्रह्माकुमार-कुमारी आहेत. वारसा आम्हाला निराकार शिवबाबाच देतात जे सर्वांचे सद्गती दाता आहेत. ब्रह्माला सर्वांचा सद्गती दाता पतित-पावन लिबरेटर (मुक्तिदाता) म्हटले जाऊ शकत नाही. ही शिवबाबांचीच महिमा आहे जे कोणी येतील त्यांना हेच समजवून सांगा की, हे सर्वांचे बाप-दादा आहे. तेच बाबा स्वर्गाचे रचयिता आहेत. ब्रह्मा द्वारे विष्णूपुरीची स्थापना करतात. असे तुम्ही कोणालाही सांगाल ना तर मग बाबांकडे येण्याची गरजच राहणार नाही. त्यांना तर सवय झाली आहे, म्हणतील गुरूजींचे दर्शन करायचे आहे… भक्तीमार्गामध्ये गुरूची खूप महिमा करतात. वेद शास्त्र यात्रा इत्यादी सर्व गुरूच शिकवतात. तुम्हाला समजावून सांगायचे आहे की, मनुष्य गुरू होऊ शकत नाही. ते सर्व आहेत भक्तीमार्गाची शास्त्रे वाचणारे. त्याला शास्त्रांचे ज्ञान म्हटले जाते, ज्याला तत्त्वज्ञान म्हणतात. इथे आम्हाला ज्ञान सागर बाबा शिकवत आहेत. हे स्पिरिच्युअल नॉलेज (अध्यात्मिक ज्ञान) आहे. ज्ञान सागर काही ब्रह्मा-विष्णू-शंकराला म्हणू शकत नाही तर मग मनुष्याला तरी कसे काय म्हणू शकतो. ज्ञानाची ऑथॉरिटी मनुष्याला असू शकत नाही. शास्त्रांची ऑथॉरिटी देखील परमपिता परमात्म्याला म्हटले जाते. दाखवतात की, परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारे सर्व वेद-शास्त्रांचे सार समजावून सांगतात. बाबा म्हणतात - ‘मला कोणीही जाणतच नाहीत तर वारसा कुठून मिळेल’. बेहदचा वारसा बेहदच्या पित्याकडूनच मिळतो. आता हे बाबा काय करत आहेत? ही होळी आणि धूलिवंदन आहे ना. ज्ञान आणि विज्ञान फक्त दोन शब्द आहेत. ‘मनमनाभव’चे देखील ज्ञान देतात. माझी आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील. तर हे ज्ञान विज्ञान आहे - होळी आणि धूलिवंदन. लोकांना ज्ञान नसल्या कारणाने ते तर एकमेकांच्या तोंडावर धूळ टाकतात. आहेत देखील असेच. गति-सद्गती कोणाचीही होत नाही. धूळच तोंडावर टाकतात. ज्ञानाचा तिसरा डोळा कोणालाच नाहीये. दंतकथा ऐकत आले आहेत. यालाच म्हटले जाते अंधश्रद्धा.

आता तुम्हा आत्म्यांना ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. तुम्हा मुलांनी बाबांकडून वारसाच्या प्राप्तीसाठी सर्वांना सल्ला द्यायचा आहे म्हणजे त्यांना माहित होईल. हा वारसा ब्रह्मा द्वारे घेत आहोत, इतर कोणाकडूनही मिळू शकत नाही. सगळ्या सेंटर्सवर हे नाव लिहिलेले आहे - ‘प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी’. जर ‘गीता पाठशाळा’ असे नाव लिहिले तर ती सर्वसामान्य गोष्ट होते. आता तुम्ही देखील बी. के. लिहा तर बाबांचा परिचय देऊ शकाल. लोक बी. के. हे नाव ऐकून घाबरतात त्यामुळे गीता पाठशाळा नाव लिहितात. परंतु यात घाबरण्याचे काही कारण नाही. बोला हे घर आहे. तुम्ही जाणता कोणाच्या घरी आलो आहोत? या सर्वांचा पिता आहे प्रजापिता ब्रह्मा. भारतवासी प्रजापिता ब्रह्माला मानतात. ख्रिश्चन देखील समजतात की, आदि-देव होऊन गेले आहेत, ज्यांची हे मनुष्यमात्र वंशावळी आहेत. बाकी ते ख्रिश्चन मानतील तर आपल्या क्राइस्टलाच; क्राइस्टला, बुद्धाला पिता समजतात. वंशावळ आहे ना. खरे तर बाबांनी ब्रह्मा द्वारे आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना केली आहे. ते झाले ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर. पहिले बाबांचा परिचय द्यायचा आहे. ते म्हणतील - आम्ही तुमच्या बाबांना भेटू इच्छितो. तर बोला, वारसा शिवबाबांकडून मिळतो, ब्रह्मा बाबांकडून नाही. तुमचा पिता कोण आहे? गीतेचा भगवान कोण आहे? आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना कोणी केली? पित्याचे नाव घेतल्याने समजतील की, ही सर्व ब्रह्माकुमार-कुमारी शिवबाबांची मुले आहेत. शिवबाबांकडून गति अथवा सद्गतीचा वारसा ब्रह्मा द्वारे मिळतो. ते यावेळी आम्हाला जीवनमुक्ती देत आहेत. बाकीचे सर्व मुक्तीमध्ये निघून जातील. हे ज्ञान तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. कोणीही आले तर त्यांना समजावून सांगा की, कोणाला भेटू इच्छिता? ते तर आमचे देखील आणि तुमचे देखील पिता आहेत. कोणी गुरू-गोसावी नाहीत. हे तर तुम्ही समजता. जसे तुम्ही होळी, धूलिवंदन करता. नाही तर होळी, धूलिवंदनाचा काही अर्थ निघत नाही. ज्ञानाने वस्त्र (आत्मा) रंगवतात. आत्मा या शरीरामध्ये आहे. ती पवित्र बनल्यावर शरीर देखील पवित्र मिळेल. हे शरीर काही पवित्र नाहीये. हे नष्ट होणार आहे. गंगास्नान शरीराला घालतात परंतु पतित-पावन एका बाबांशिवाय दुसरे कोणीही नाही. पतित आत्मा बनते तर आत्मा पाण्याच्या स्नानाने पावन होऊ शकत नाही. हे कोणालाच माहित नाहीये. ते तर आत्मा सो परमात्मा म्हणतात. आत्मा निर्लेप आहे. आता जे हुशार बनले आहेत, तेच धारण करु शकतात आणि इतरांना करवू शकतात. ज्या मुलांच्या मुखातून सदैव रत्नेच बाहेर पडतात, त्यांना रुप-बसंत म्हटले जाते. ज्ञान विज्ञाना व्यतिरिक्त बाकी जी काही आपसामध्ये देवाण-घेवाण करतात तर जसे दगडच मारतात. सेवे ऐवजी डिससर्व्हिस (नुकसान) करतात. ६३ जन्म एकमेकांना दगड मारत आलात. आता बाबा म्हणतात - तुम्ही ज्ञान विज्ञानाच्या गोष्टी करुन मनाला खुश करायचे आहे. झरमुई झगमुईच्या गोष्टी (परचिंतनाच्या व्यर्थ गोष्टी) ऐकता कामा नयेत. हे ज्ञान आहे ना. दगड तर सारी दुनिया एकमेकांना मारत आहे.

तुम्ही मुले तर रुप-बसंत आहात. तुम्हाला ज्ञान विज्ञानाशिवाय ना काही ऐकायचे आहे, ना ऐकवायचे आहे. जे उलट्या गोष्टी करतात त्यांची संगतच खराब आहे. जे खूप सेवा करणारे आहेत, त्यांचा संग तारणारा आहे... काही ब्राह्मण रूप-बसंत आहेत, कोणी ब्राह्मण बनून उलट्या-सुलट्या गोष्टी करतात. अशांची संगत करता कामा नये नाहीतर अजूनच नुकसान करतील. बाबा वारंवार सावध करतात. एकमेकांमध्ये उलट्या-सुलटया गोष्टी कधीही करु नका. नाहीतर आपला देखील सत्यानाश, दुसऱ्याचा देखील सत्यानाश करतात; त्यामुळे मग पद भ्रष्ट होते. बाबा किती सोपे करून सांगतात. छंद असला पाहिजे, ‘बाबा, आम्ही जाऊन अनेकांना हे ज्ञान देतो’. तीच बाबांची खरी मुले आहेत. सेवाभावी मुलांची बाबा देखील महिमा करतात. त्यांची संगत केली पाहिजे. कोण-कोण चांगल्या विद्यार्थ्यांची संगत ठेवतात, बाबांना विचारा, तर बाबा सांगू शकतात की, कोणाची संगत केली पाहिजे, कोण बाबांच्या हृदयामध्ये स्थान मिळवलेले आहेत, ते बाबा लगेच सांगतील. सेवा करणाऱ्यांविषयी बाबांना देखील आदर आहे. कोणी-कोणी तर सेवा देखील करु शकत नाहीत. अशी बऱ्याच जणांची अवस्था वाईट संगत मिळाल्यामुळे वर-खाली होते. हो, कोणी स्थूल सेवेमध्ये चांगले आहेत, ते देखील चांगला वारसा प्राप्त करतात. अल्फ आणि बे (बाबा आणि बादशाही) समजणे तर खूप सोपे आहे. कोणालाही फक्त एवढेच सांगा - बाबांची आणि वारसाची आठवण करा. बस्स, शब्दच मुळी दोन आहेत - अल्फ आणि बे. हे तर अगदी सोपे आहे. कोणीही आले तर त्यांना फक्त एवढेच सांगा - बाबांचा आदेश आहे मामेकम् (मज एकाची) आठवण करा, बस्स. सर्वात मोठा पाहुणचार हा आहे. बाबा म्हणतात - माझी आठवण करा तर तुम्हाला स्वर्गाचा वारसा मिळेल. प्रत्येक सेंटरवर असे नंबरवार आहेत. कोणी तर हे ज्ञान डिटेलमध्ये समजावून सांगू शकतात. जर समजावून सांगू शकत नसाल तर फक्त एवढे सांगा. कल्पापूर्वी देखील बाबांनी सांगितले होते की, मामेकम् (मज एकाची) आठवण करा इतर कोणत्याही देहधारी देवता इत्यादीची देखील आठवण करू नका. बाकी झरमुई झगमुई (परचिंतन), ‘अमके असे म्हणतात, असे करतात…’ असे काहीही करु नका. हे बाबांनी तुम्हाला होळी आणि धूलिवंदनाचे खाऊ घातले. बाकी रंग इत्यादी लावणे तर आसुरी मनुष्यांचे काम आहे. कोणी कोणाची निंदा ऐकवत असेल तर ऐकता कामा नये. बाबा किती चांगल्या गोष्टी सांगतात - मनमनाभव, मध्याजी भव. कोणीही आले तर त्यांना समजावून सांगा - शिवबाबा सर्वांचे पिता आहेत, ते तर म्हणतात - माझी आठवण करा तर स्वर्गाचा वारसा मिळेल. गीतेचे भगवान देखील तेच आहेत. मृत्यू समोर उभा आहे. तर तुम्हा मुलांचे काम आहे सेवा करणे. बाबांची आठवण करून देणे. हा आहे महान मंत्र, ज्याद्वारे राजधानीचा तिलक मिळेल. किती सोपी गोष्ट आहे बाबांची आठवण करा आणि करवून द्या तर बेडा पार होईल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) हुशार बनून सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे. मुखावाटे कधीही दगड (अपशब्द) बोलून डिससर्व्हिस करायची नाही. ज्ञान-योगा शिवाय दुसरी कोणतीही चर्चा करायची नाही.

२) जे रुप-बसंत आहेत, सेवाभावी आहेत त्याचीच संगत करायची आहे. जो उलट्या-सुलट्या गोष्टी ऐकवतो त्याची संगत करायची नाही.

वरदान:-
नॉलेज द्वारे रावणाच्या बहुरूपांना जाणून त्याच्या आकर्षणापासून मुक्त राहणारे हिंमतवान भव

ज्या मुलांनी नॉलेज द्वारा रावणाच्या बहुरूपांना चांगल्या प्रकारे जाणले आहे, त्यांच्याकडे तो आजूबाजूलाही फिरकू देखील शकत नाही. भले सोन्याचे असो, नाहीतर हिऱ्याचे रूप धारण केलेले असो परंतु त्याच्या आकर्षणामध्ये येणार नाहीत. अशा सच्चा सीता बनून मर्यादेच्या आत राहण्याचे लक्ष ठेवून, हिंमतवान बना. म्हणजे मग ही रावणाची बहुसेना वार करण्याऐवजी तुमची सहयोगी बनेल. प्रकृतीची ५ तत्वे आणि ५ विकार परिवर्तित होऊन तुमच्या सेवेसाठी हजर होतील.

बोधवाक्य:-
सेवेमध्ये सफलता प्राप्त करायची असेल तर ‘निर्माणचित्त’ची विशेषता धारण करा.

हे अव्यक्त इशारे - “निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा”

विजयी बनण्याचे फाउंडेशन आहे - ‘निश्चय’; जर फाउंडेशन पक्के असेल तर बिल्डिंग हलू शकत नाही, निश्चिंत राहतात. जर फाउंडेशन कच्चे असेल तर थोडेजरी वादळ आले, थोडीजरी धरणी हादरली तरी भय वाटेल की, ही आपली बिल्डिंग कोसळणार तर नाही ना किंवा भेगा तर पडणार नाहीत ना. परंतु निश्चयाचे फाउंडेशन पक्के असेल तर निर्भय आणि निश्चिंत राहतील.