03-05-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - स्वतःला राजतिलक देण्यायोग्य बनवा, जितके अभ्यास कराल, श्रीमतावर चालाल
तर राजतिलक मिळेल”
प्रश्न:-
कोणत्या
स्मृतीमध्ये राहिलात तर रावणपणाची स्मृती (विकारांची स्मृती) विसरायला होईल?
उत्तर:-
कायम ही स्मृती रहावी की आपण पती-पत्नी नाही, आपण आत्मा आहोत, आपण मोठ्या बाबांकडून
(शिवबाबां कडून) छोट्या बाबांद्वारे (ब्रह्मा बाबांद्वारे) वारसा घेत आहोत. ही
स्मृती रावणपणाच्या स्मृतीला विसरायला लावेल. जेव्हा स्मृती आली आहे की आपण एका
पित्याची मुले आहोत तर रावणपणाची स्मृती नष्ट होते. ही देखील पवित्र राहण्यासाठी
खूप चांगली युक्ती आहे. परंतु यामध्ये मेहनत पाहिजे.
गीत:-
तुम्हें पाके
हमने…
ओम शांती।
रूहानी बाबा बसून रूहानी मुलांना समजावून सांगत आहेत. बघा, सर्वजण तिलक इथे (भृकुटीमध्ये)
लावतात. या जागेवर एक तर आत्म्याचा निवास आहे, दुसरे मग राजतिलक देखील इथेच दिला
जातो. ही आत्म्याची निशाणी तर आहेच. आता आत्म्याला बाबांकडून वारसा पाहिजे स्वर्गाचा.
विश्वाचा राज्य-तिलक पाहिजे. सूर्यवंशी-चंद्रवंशी महाराजा-महाराणी बनण्यासाठी
शिकतात. हे शिकणे अर्थात आपल्यासाठी आपल्याला राजतिलक देणे आहे. तुम्ही इथे आलाच
आहात शिकण्यासाठी. आत्मा जी इथे निवास करते ती म्हणते - ‘बाबा, आम्ही तुमच्याकडून
विश्वाचे स्वराज्य अवश्य प्राप्त करणार. प्रत्येकाने आपल्या स्वतःसाठी आपला
पुरुषार्थ करायचा आहे. असे म्हणतात - ‘बाबा, आम्ही असे सपूत बनून दाखवू. तुम्ही
आमच्या वर्तनाकडे बघत रहा की आम्ही कसे चालतो. तुम्ही देखील जाणू शकता की, आम्ही
स्वतःसाठी राजतिलक देण्यायोग्य बनलो आहोत का नाही? तुम्हा मुलांना बाबांचा सपूत
बनून दाखवायचे आहे. बाबा आम्ही तुमचे नाव जरूर प्रसिद्ध करणार. आम्ही तुमचे मदतगार
म्हणजेच स्वतःचे मदतगार बनून भारतावर आमचे राज्य करणार. भारतवासी म्हणतात ना - आमचे
राज्य आहे. परंतु त्या बिचाऱ्यांना माहितच नाहीये की, आता आपण विषय वैतरणी नदीमध्ये
पडून आहोत. आम्हा आत्म्याचे राज्य काही नाही आहे. आता तर आत्मा उलटी लटकलेली आहे.
खायला सुद्धा मिळत नाही. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा बाबा म्हणतात आता
तर माझ्या मुलांना खाण्यासाठी देखील मिळत नाही आहे, आता मी जाऊन त्यांना राजयोग
शिकवतो. तर बाबा येतात राजयोग शिकविण्यासाठी. बेहदच्या बाबांची आठवण करतात. ते
आहेतच नवीन दुनिया रचणारे. बाबा पतित-पावन देखील आहेत, ज्ञान-सागर देखील आहेत. हे
तुमच्या शिवाय आणखी कोणाच्याही बुद्धीमध्ये नाही. हे फक्त तुम्ही मुलेच जाणता -
बरोबर आमचे बाबा ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर आहेत. ही महिमा पक्की लक्षात ठेवा,
विसरू नका. बाबांची महिमा आहे ना. ते बाबा पुनर्जन्म रहित आहेत. कृष्णाची महिमा
एकदम वेगळी आहे. प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंटची महिमा तर वेग-वेगळी असते ना. बाबा
म्हणतात - मला देखील या ड्रामामध्ये उच्च ते उच्च पार्ट मिळालेला आहे. ड्रामामध्ये
ॲक्टर्सना माहिती असले पाहिजे ना की हा बेहदचा ड्रामा आहे, याचा कालावधी किती आहे.
जर जाणत नसतील तर त्यांना अडाणी म्हणणार. परंतु असे कोणी समजतात थोडेच. बाबा येऊन
विरोधाभास सांगतात की मनुष्य कोणापासून काय होतात. आता तुम्ही समजू शकता, लोकांना
तर अजिबातच माहित नाही आहे की ८४ जन्म कसे घेतले जातात. भारत किती उच्च होता, चित्र
आहेत ना. सोमनाथ मंदिरामधून किती धन लुटून घेऊन गेले. किती धन होते. आता तुम्ही मुले
इथे बेहदच्या बाबांना भेटण्यासाठी आला आहात. मुले जाणतात बाबांकडून राज-तिलक
श्रीमतावर घेण्यासाठी आलो आहोत. बाबा म्हणतात - पवित्र जरूर बनावे लागेल.
जन्म-जन्मानंतर विषय वैतरणी नदी मध्ये गटांगळ्या खाऊन थकला नाही आहात काय! म्हणतात
देखील - ‘आम्ही पापी आहोत, मुझ निर्गुण हारे में कोई गुण नाही’; तर जरूर कधीतरी गुण
होते जे आता नाही आहेत.
आत्ता तुम्हाला समजले
आहे - आपण विश्वाचे मालक, सर्व गुणसंपन्न होतो. आता कोणते गुण नाही राहिले आहेत. हे
देखील बाबा समजावून सांगतात. मुलांचे रचयिता आहेतच बाबा. तर बाबांनाच सर्व मुलांची
दया येते. बाबा म्हणतात - माझा देखील ड्रामामध्ये हा पार्ट आहे. किती तमोप्रधान बनले
आहेत. खोटेपणा, पाप, भांडणे काय-काय चालू आहे. सर्व भारतवासी मुले विसरली आहेत की
आपण कधीतरी विश्वाचे मालक डबल सिरताज होतो. बाबा त्यांना आठवण करून देत आहेत, तुम्ही
विश्वाचे मालक होता मग तुम्ही ८४ जन्म घेत आले आहात. तुम्ही आपल्या ८४ जन्मांना
विसरले आहात. आश्चर्य आहे, ८४ च्या ऐवजी ८४ लाख जन्म देऊन टाकले आहेत आणि मग कल्पाचा
कालावधी सुद्धा लाखो वर्षे म्हणतात. घोर अंधारामध्ये आहेत ना. किती खोटारडेपणा आहे.
भारतच सचखंड होता, भारतच झूठ खंड आहे. झूठ खंड कोणी बनवला, सचखंड कोणी बनवला - हे
कोणालाच माहिती नाही. रावणाला बिलकुलच जाणत नाहीत. भक्त लोक रावणाला जाळतात. कोणी
धार्मिक व्यक्ती असेल, त्यांना तुम्ही सांगा की, ‘मनुष्य हे काय-काय करतात. सतयुग
ज्याला हेवन पॅराडाइज म्हणता तिथे सैतान रावण कुठून आला. तिथे नरकातील मनुष्य कसे
असू शकतील’. तर समजतील हे तर खरोखर चुकीचे आहे. तुम्ही रामराज्याच्या चित्रावर
समजावून सांगू शकता, यामध्ये रावण कुठून आला? तुम्ही समजावून सांगता देखील परंतु
समजत नाहीत. कोणी विरळाच निघतो. तुम्ही किती थोडे आहात ते देखील पुढे चालून बघायचे
आहे, किती जण टिकतात.
तर बाबांनी समजावून
सांगितले आहे - आत्म्याची छोटी निशाणी देखील इथेच दाखवतात. मोठी निशाणी आहे
राज-तिलक. आता बाबा आलेले आहेत. स्वतःला मोठा तिलक कसा द्यायचा आहे, तुम्ही
स्वराज्य कसे प्राप्त करू शकता? तो मार्ग सांगतात. त्याचे नाव ठेवले आहे - राजयोग.
शिकवणारे आहेत बाबा. श्रीकृष्ण थोडाच बाबा होऊ शकतो. तो तर लहान मुलगा आहे मग
राधेसोबत स्वयंवर होते तेव्हा एक मुलगा होईल. बाकी श्रीकृष्णाला इतक्या राण्या
इत्यादी दाखवल्या आहेत हे तर सर्व खोटे आहे ना. परंतु याची देखील ड्रामामध्ये नोंद
आहे, अशा गोष्टी तरी देखील ऐकाल. आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की, कसे आपण
आत्मे वरून पार्ट बजावण्यासाठी येतो. एक शरीर सोडून दुसरे घेतो. हे तर खूप सोपे आहे
ना. मुलगा जन्माला आला, त्याला शिकवतात - असे बोल. तर शिकवल्यामुळे शिकतो. तुम्हाला
बाबा काय शिकवतात? फक्त म्हणतात - बाबा आणि वारशाची आठवण करा. तुम्ही गाता देखील -
‘तुम मात-पिता…’ आत्मा गाते ना खरोखर भरभरून सुख मिळते. तुम्ही मुले जाणता शिवबाबा
आपल्याला शिकवत आहेत. इथे तुम्ही शिवबाबांकडे आला आहात. भागीरथ तर मनुष्याचा रथ आहे
ना. यामध्ये परमपिता परमात्मा विराजमान होतात, परंतु रथाचे नाव काय आहे? आता तुम्ही
जाणता नाव आहे - ब्रह्मा; कारण ब्रह्माद्वारे ब्राह्मण रचतात ना. पहिले तर असतातच
ब्राह्मण शेंडी नंतर मग देवता. आधी तर ब्राह्मण पाहिजेत म्हणून विराट रूप देखील
दाखवले आहे. तुम्ही ब्राह्मणच मग देवता बनता. बाबा खूप चांगल्या रीतीने समजावून
सांगतात, तरी देखील विसरतात. बाबा म्हणतात - मुलांनो, कायम हे लक्षात ठेवा की, आपण
पती-पत्नी नाही, आपण आत्मा आहोत. आपण मोठ्या बाबांकडून (शिवबाबांकडून) छोट्या
बाबांद्वारे (ब्रह्मा बाबांद्वारे) वारसा घेत आहोत तर रावणपणाची स्मृती विसरायला
होईल. ही पवित्र राहण्याची खूप चांगली युक्ती आहे. बाबांकडे खूप जोडपी येतात, दोघेही
म्हणतात - बाबा. जेव्हा की स्मृती आली आहे आपण एका पित्याची मुले आहोत तर मग
रावणपणाची स्मृती विसरायला झाली पाहिजे, यासाठी मेहनत केली पाहिजे. मेहनती शिवाय तर
काहीच होऊ शकत नाही. आपण बाबांचे बनलो आहोत, त्यांचीच आठवण करतो. बाबा देखील
म्हणतात - माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. ८४ जन्मांची कहाणी देखील एकदम सोपी
आहे. बाकी मेहनत आहे बाबांची आठवण करण्यामध्ये. बाबा म्हणतात - पुरुषार्थ करून
कमीत-कमी आठ तास तरी आठवण करा. एक तास, अर्धा तास… क्लासमध्ये याल तर स्मृती येईल
की, बाबा आपल्याला हे शिकवत आहेत. आता तुम्ही बाबांच्या सन्मुख आहात ना. बाबा,
‘बाळांनो, बाळांनो’ असे म्हणत समजावून सांगत राहतात. तुम्ही मुले ऐकता. बाबा
म्हणतात - ‘हिअर नो इविल…’ ही देखील आत्ताचीच गोष्ट आहे.
आता तुम्ही मुले जाणता
आपण ज्ञानसागर बाबांच्या सन्मुख आलो आहोत. ज्ञान-सागर बाबा तुम्हाला साऱ्या सृष्टीचे
ज्ञान ऐकवत आहेत. मग कोणी घेवो अथवा न घेवो, ते तर त्यांच्यावर अवलंबून आहे. बाबा
येऊन आता आपल्याला ज्ञान देत आहेत. आपण आता राजयोग शिकत आहोत. तर मग कोणतेही
शास्त्र इत्यादी भक्तीचा अंशही राहणार नाही. भक्तीमार्गामध्ये कणभर सुद्धा ज्ञान
नाहीये, आणि ज्ञानमार्गामध्ये मग कणभर सुद्धा भक्ती नाहीये. ज्ञानसागर जेव्हा येतील
तेव्हा ते ज्ञान ऐकवतील. त्यांचे ज्ञान आहेच सद्गती करिता. सद्गती दाता आहेतच एक,
ज्यांनाच भगवान म्हटले जाते. सर्वजण एकाच पतित-पावनला बोलावतात मग दुसरा कोणी असू
कसा शकतो. आता बाबांद्वारे तुम्ही मुले सत्य गोष्टी ऐकत आहात. बाबांनी म्हटले -
‘मुलांनो, मी तुम्हाला किती श्रीमंत बनवून गेलो होतो. ५००० वर्षांची गोष्ट आहे.
तुम्ही डबल मुकुटधारी होता, पवित्रतेचा सुद्धा ताज होता; मग जेव्हा रावण राज्य सुरु
होते तेव्हा तुम्ही पुजारी बनता’. आता बाबा शिकविण्यासाठी आले आहेत त्यांच्या
श्रीमतावर चालायचे आहे, इतरांना देखील समजावून सांगायचे आहे. बाबा म्हणतात - मला हे
शरीर लोन घ्यावे लागते. ब्रह्मा बाबा म्हणतात - ‘महिमा सर्व त्या एकाचीच आहे, मी तर
त्यांचा रथ आहे. बैल नाही. बलिहारी सर्व तुमची आहे, बाबा तुम्हाला ऐकवतात, मी मध्ये
ऐकतो. मला एकट्यालाच कसे ऐकवतील. तुम्हाला ऐकवतात तेव्हा मी देखील ऐकतो’. हे (ब्रह्मा
बाबा) देखील पुरुषार्थी स्टुडंट आहेत. तुम्ही देखील स्टुडंट आहात. हे देखील शिकत
आहेत. बाबांच्या आठवणीमध्ये राहतात. किती आनंदामध्ये राहतात. लक्ष्मी-नारायणाला
बघून आनंद होतो - आपण हे बनणार आहोत. तुम्ही इथे आलाच आहात स्वर्गाचे
प्रिन्स-प्रिन्सेस बनण्याकरिता. राजयोग आहे ना. एम ऑब्जेक्ट देखील आहे. शिकवणारा
देखील बसला आहे मग इतका आनंद का होत नाही. आतून खूप आनंद झाला पाहिजे. बाबांकडून
आपण कल्प-कल्प वारसा घेतो. इथे ज्ञान-सागराकडे येतो, पाण्याची तर काही गोष्टच नाही.
हे तर बाबा सन्मुख समजावून सांगत आहेत. तुम्ही देखील हे (देवता) बनण्यासाठी शिकत
आहात. मुलांना खूप आनंद झाला पाहिजे की, आता आपण आपल्या घरी जात आहोत. आता जे जितके
शिकतील तितके उच्च पद प्राप्त करतील. प्रत्येकाला स्वतःचा पुरुषार्थ करायचा आहे.
निराश होऊ नका. खूप मोठी लॉटरी आहे. समजत असताना देखील मग आश्चर्यवत् भागन्ती होऊन
शिक्षणाला सोडून देतात. माया किती प्रबळ आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) स्वतःला
राज-तिलक देण्यायोग्य बनवायचे आहे. सपूत मुलगा बनून पुरावा द्यायचा आहे. वर्तन खूप
रॉयल ठेवायचे आहे. बाबांचा पूर्णपणे मदतगार बनायचे आहे.
२) आपण स्टुडंट आहोत,
भगवान आपल्याला शिकवत आहेत, याच आनंदामध्ये शिक्षण शिकायचे आहे. कधीही
पुरुषार्थामध्ये निराश व्हायचे नाही.
वरदान:-
आपल्या
अधिकाराच्या शक्तीद्वारे त्रिमूर्ती रचनेला सहयोगी बनविणारे मास्टर रचता भव
त्रिमूर्ती शक्ती (मन,
बुद्धी, संस्कार) या शक्ती तुम्हा मास्टर रचत्याची रचना आहे. यांना आपल्या
अधिकाराच्या शक्तीने सहयोगी बनवा. जसे राजा स्वतः कार्य करत नाही, करवून घेतो,
करणारे राज्य कारभारी वेगळे असतात. तशी आत्मा देखील करावनहार आहे, करनहार या विशेष
त्रिमूर्ती शक्ती आहेत. तर ‘मास्टर रचयिता’ या वरदानाला स्मृतीमध्ये ठेवून
त्रिमूर्ती शक्तींना आणि साकार कर्मेंद्रियांना योग्य मार्गावर चालवा.
बोधवाक्य:-
अव्यक्त
पालनेच्या वरदानाचा अधिकार घेण्यासाठी स्पष्टवादी बना.
अव्यक्त इशारे -
रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:-
पवित्रता म्हणजे केवळ
ब्रह्मचर्य नाही, ते तर फाउंडेशन आहे परंतु त्यासोबत आणखी चार देखील आहेत. क्रोध आणि
इतर जे साथीदार आहेत, त्या महाभूतांचा त्याग, त्याचसोबत त्यांची जी छोटी-छोटी
मुले-बाळे अंश मात्र, वंश मात्र आहेत, त्यांचा देखील त्याग करा तेव्हा म्हणणार
प्युरीटीची रुहानी रॉयल्टी धारण केली आहे.