03-06-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - विश्वाचा मालक बनविणाऱ्या बाबांची अतिशय आवडीने आठवण करा, आठवणीद्वारेच तुम्ही सतोप्रधान बनाल’’

प्रश्न:-
कोणत्या एका गोष्टीवर जर पूर्ण लक्ष असेल तर बुद्धीचे कपाट उघडेल (आणखी चांगले लक्षात येईल)?

उत्तर:-
अभ्यासावर. स्वयं भगवान शिकवत आहेत त्यामुळे मुरली क्लास कधीही चुकवता कामा नये. जोपर्यंत जगायचे आहे, तोपर्यंत अमृत प्यायचे आहे. पूर्णतः अभ्यासावर लक्ष द्यायचे आहे, गैरहजर रहायचे नाही. जिकडून मिळेल तिकडून मुरली शोधून जरूर वाचायची आहे. मुरली मधून दररोज नवीन-नवीन पॉईंट्स निघत राहतात, ज्यामुळे तुमचे कपाट (बुद्धीचे दरवाजेच) उघडतील.

ओम शांती।
शिव भगवानुवाच शाळीग्रामांप्रती. हे तर संपूर्ण कल्पामध्ये एकदाच होते, हे देखील केवळ तुम्हीच जाणता इतर कोणीही जाणू शकत नाही. मनुष्य, या रचयिता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला अजिबात जाणत नाहीत. तुम्ही मुलेच जाणता की, स्थापनेमध्ये विघ्न तर पडणारच आहेत, यालाच म्हटले जाते - ज्ञान-यज्ञ. बाबा समजावून सांगत आहेत की, या जुन्या दुनियेमध्ये तुम्ही जे काही पाहत आहात ते सर्व स्वाहा होणार आहे. तर मग त्यामध्ये मोह ठेवता कामा नये. बाबा येऊन शिकवतात नवीन दुनियेसाठी. हे आहे पुरुषोत्तम संगमयुग. हा आहे विशश आणि व्हाईसलेसचा (विकारी आणि निर्विकारीचा) संगम, जेव्हा की परिवर्तन होणार आहे. नवीन दुनियेला म्हटले जाते व्हाईसलेस वर्ल्ड (निर्विकारी दुनिया). आदि सनातन देवी-देवता धर्मच होता. हे तर मुले जाणतात की, हे पॉईंट्स समजून घेण्यासारखे आहेत. बाबा रात्रं-दिवस सांगत असतात - ‘मुलांनो, तुम्हाला गुह्य ते गुह्य गोष्टी ऐकवतो’. जोपर्यंत बाबा आहेत, अभ्यास चालूच राहणार आहे. त्यानंतर मग हा अभ्यास देखील बंद होईल. या गोष्टींना तुमच्या शिवाय इतर कोणीही जाणत नाहीत. तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत जे फक्त बापदादाच जाणतात. किती पतन होते, किती त्रास होतो. असे नाही की, सगळेच सदैव पवित्र राहू शकतात. पवित्र राहत नाहीत तर मग सजा खावी लागते. माळेचे मणीच पास विद् ऑनर्स होतात. आणि मग प्रजा देखील बनते. या खूप समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. तुम्ही कोणालाही समजावून सांगितले तर ते लगेच थोडेच समजू शकतात. वेळ लागतो. ते देखील जितके बाबा समजावू शकतात, तितके तुम्ही नाही. रिपोर्ट इत्यादी जे येतात, त्याला बाबाच जाणतात - ‘अमका विकारामध्ये गेला, असे झाले…’ नाव तर सांगू शकत नाही. नाव सांगितले तर मग त्यांच्याशी कोणी बोलणे देखील पसंत करणार नाही. सर्व तिरस्काराच्या दृष्टीने पाहतील, मनातून उतरतील. सगळी केलेली कमाई नाहीशी होईल. हे तर ज्याने धोका खाल्ला तोच जाणे आणि बाबा जाणे. या खूप गुप्त गोष्टी आहेत.

तुम्ही म्हणता - अमका भेटला, त्याला खूप चांगले समजावून सांगितले, ते सेवेमध्ये मदत करू शकतात. परंतु ते देखील जेव्हा सन्मुख येतील तेव्हा ना. समजा गव्हर्नरला तुम्ही चांगल्या रीतीने समजावून सांगितलेत परंतु ते थोडेच इतर कोणाला समजावून सांगू शकतील. आणि जर त्यांनी कोणाला समजावून सांगितले तर मानणार नाहीत. ज्याला समजायचे असेल त्यालाच समजणार. दुसऱ्या कोणाला थोडेच समजावून सांगू शकाल. तुम्ही मुले समजावून सांगता की, हे तर काट्यांचे जंगल आहे, याला आम्ही मंगल बनवितो. ‘मंगलम् भगवान् विष्णू’, म्हणतात ना. हे श्लोक इत्यादी सर्व भक्ती मार्गाचे आहेत. मंगल तेव्हा होते जेव्हा विष्णूचे राज्य असते. विष्णू अवतरण देखील दाखवतात. बाबांनी (ब्रह्मा बाबांनी) सर्व काही पाहिलेले आहे. अनुभवी आहेत ना. सर्व धर्मवाल्यांना चांगल्या रीतीने जाणतात. बाबा ज्या तनामध्ये येतील तर त्याची पर्सनॅलिटी देखील पाहिजे ना. म्हणूनच बाबा म्हणतात - अनेक जन्मांच्या अंतामध्ये, जेव्हा की हा (ब्रह्मा बाबा) इथला खूप मोठा अनुभवी बनतो, तेव्हा मी यांच्यामध्ये प्रवेश करतो. ते देखील साधारण, पर्सनॅलिटीचा अर्थ हा नाही की राजा-राजवाडा असावा. नाही, याला (ब्रह्मा बाबांना) तर खूप अनुभव आहे. याच्या रथामध्ये येतो, अनेक जन्मांच्या अंतामध्ये.

तुम्हाला समजावून सांगावे लागेल की, ही राजधानी स्थापन होत आहे. माळा बनते. ही राजधानी कशी स्थापन होत आहे, कोणी राजा-राणी, कोणी काय बनतात. या सर्व गोष्टी एकाच दिवसामध्ये तर कोणी समजू शकणार नाही. बेहदचे बाबाच बेहदचा वारसा देतात. भगवान येऊन समजावून सांगतात तरी देखील फार मुश्किलीने थोडेजण पवित्र बनतात. हे देखील समजण्या करीता वेळ पाहिजे. किती सजा खातात. सजा खाऊन देखील प्रजा बनतात. बाबा समजावून सांगत आहेत - ‘मुलांनो, तुम्हाला खूप-खूप गोड देखील बनायचे आहे. कोणालाही दुःख द्यायचे नाही’. बाबा येतातच सर्वांना सुखाचा रस्ता सांगण्यासाठी, दुःखा पासून सोडविण्यासाठी. तर मग ते स्वतः कोणाला कसे बरे दुःख देतील. या सर्व गोष्टी तुम्ही मुलेच जाणता. बाहेरचे खूप मुश्किलीने समजतात.

जे कोणी नातेवाईक इत्यादी आहेत त्या सर्वांमधून मोह काढून टाकायचा आहे. घरामध्ये रहायचे आहे परंतु निमित्त मात्र. हे तर बुद्धीमध्ये आहे की ही सारी दुनिया नष्ट होणार आहे. परंतु हा विचार देखील कोणाला राहत नाही. जी अनन्य मुले आहेत ती समजतात, ती देखील आता शिकण्याचा पुरुषार्थ करत राहतात. बरेच नापास देखील होतात. मायेची फिरकी खूप चालते. ती देखील खूप बलवान आहे. परंतु या गोष्टी दुसऱ्या कोणाला थोडेच सांगू शकता. तुमच्याकडे येतात, समजून घेऊ इच्छितात की, इथे काय चालते, इतके रिपोर्ट्स इत्यादी कशासाठी येतात? आता या लोकांच्या तर बदल्या होत राहतात, तर मग एका-एकाला बसून समजावून सांगावे लागेल. मग म्हणतात, ही तर खूप चांगली संस्था आहे. राजधानी स्थापनेच्या गोष्टी अतिशय गुह्य आणि गोपनीय आहेत. बेहदचे बाबा मुलांना मिळाले आहेत तर किती हर्षित झाले पाहिजे. मी विश्वाचा मालक, देवता बनतो तर माझ्यामध्ये दैवी गुण देखील जरूर पाहिजेत. एम ऑब्जेक्ट तर समोर उभे आहे. हे आहेत नवीन दुनियेचे मालक. हे तुम्हीच समजता. आम्ही शिकतो, बेहदचे बाबा जे नॉलेजफुल आहेत, ते आम्हाला शिकवतात; अमरपुरी अथवा स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी आम्हाला हे नॉलेज मिळते. येतील तेच ज्यांनी कल्प-कल्प राज्य घेतले आहे. कल्पापूर्वी प्रमाणे आम्ही आमची राजधानी स्थापन करत आहोत. ही माळा बनत आहे, नंबरवार. ज्याप्रमाणे स्कूलमध्ये देखील जे चांगले शिकतात त्यांना स्कॉलरशिप मिळते ना. त्या आहेत हदच्या गोष्टी, तुम्हाला मिळतात बेहदच्या गोष्टी. तुम्ही जे बाबांचे मदतगार बनता, तेच उच्च पद प्राप्त करता. खरेतर मदत स्वतःलाच करायची आहे. पवित्र बनायचे आहे. सतोप्रधान होतो, पुन्हा बनायचे आहे जरूर. बाबांची आठवण करायची आहे, उठता-बसता, चालता-फिरता बाबांची आठवण करू शकता. जे बाबा आपल्याला विश्वाचे मालक बनवितात, त्यांची अतिशय आवडीने आठवण करायची आहे. परंतु माया सोडत नाही. अनेक प्रकारचे वेगवेगळे रिपोर्ट्स लिहितात - ‘बाबा, आम्हाला मायेचे विकल्प खूप येतात’. बाबा म्हणतात - ‘युद्धाचे मैदान आहे ना. ५ विकारांवर विजय प्राप्त करायचा आहे.’ बाबांची आठवण केल्याने तुम्ही देखील समजता आपण सतोप्रधान बनतो. बाबा येऊन समजावून सांगतात, भक्ती मार्गवाले कोणीही जाणत नाहीत. हे तर शिक्षण आहे. बाबा म्हणतात - ‘तुम्ही पावन कसे बनाल!’ तुम्ही पावन होता, पुन्हा बनायचे आहे. देवता पावन आहेत ना. मुले जाणतात, आम्ही विद्यार्थी शिकत आहोत. भविष्यामध्ये मग सूर्यवंशी राज्यामध्ये येऊ. त्याच्यासाठी पुरुषार्थ देखील चांगल्या रीतीने करायचा आहे. सर्व काही मार्कांवर अवलंबून आहे. युद्धाच्या मैदानामध्ये फेल झाल्याने चंद्रवंशीमध्ये निघून जातात. त्यांनी मग युद्धाचे नाव ऐकून धनुष्यबाण इत्यादी दाखवले आहेत. तिथे काय बाहुबळाची लढाई होती का, जे धनुष्यबाण इत्यादी चालवतील! परंतु तसे काहीही नाहीये. पूर्वी धनुष्यबाणांनी युद्ध होत असे. आता पर्यंत देखील त्याच्या निशाण्या आहेत. काहीजण तीर चालविण्यामध्ये खूप तरबेज असतात. आता या ज्ञानामध्ये लढाई इत्यादीचा काही प्रश्नच येत नाही.

तुम्ही जाणता शिवबाबाच ज्ञानाचे सागर आहेत, ज्यांच्याद्वारे आपण हे पद प्राप्त करतो. आता बाबा म्हणतात - देहासहीत देहाच्या सर्व नात्यांमधून मोह काढून टाकायचा आहे. हे सर्व जुने आहे. नवीन दुनिया, गोल्डन एजड भारत होता. नाव किती प्रसिद्ध होते. प्राचीन योग, कधी आणि कोणी शिकवला? हे कोणालाच माहीत नाही. जोपर्यंत स्वतः येऊन समजावून सांगणार नाहीत. ही एक नवीन गोष्ट आहे. कल्प-कल्प जे होत आले आहे, ते मग रिपीट होणार. त्यामध्ये बदल होऊ शकत नाही. बाबा म्हणतात - आता हा अंतिम जन्म पवित्र राहिल्याने मग २१ जन्म तुम्हाला कधी अपवित्र व्हायचे नाहीये. बाबा किती चांगल्या रीतीने समजावून सांगतात तरी देखील सर्व एकसमान थोडेच शिकतात. रात्रं-दिवसाचा फरक आहे. येतात शिकण्यासाठी मग काहीजण शिकून गायब होतात. जे चांगल्या रीतीने समजतात ते आपला अनुभव देखील ऐकवतात की, ‘आपण ज्ञानामध्ये कसे आलो, मग आपण पवित्रतेची प्रतिज्ञा कशी केली…’ बाबा म्हणतात - ‘पवित्रतेची प्रतिज्ञा करून मग एकदा जरी पतित बनलात तर केलेली कमाई नष्ट होईल.’ मग ते आतून खात राहील. कोणालाही म्हणू शकणार नाहीत की, ‘बाबांची आठवण करा’. मूळ गोष्ट तर विकारासाठीच विचारतात. तुम्हा मुलांना हा अभ्यास नियमितपणे शिकायचा आहे. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला नवीन-नवीन गोष्टी ऐकवतो’. तुम्ही आहात स्टुडंट्स, तुम्हाला स्वयं भगवान शिकवितात! भगवंताचे तुम्ही स्टुडंट्स आहात. अशा उच्च ते उच्च अभ्यासाला तर एक दिवस सुद्धा चुकविता कामा नये. एक दिवस जरी मुरली ऐकली नाही तर मग गैरहजेरी लागते. चांगले-चांगले महारथी देखील मुरली चुकवतात. ते समजतात, आम्ही तर सर्वकाही जाणतो, मुरली नाही वाचली तर काय झाले! अरे, गैरहजेरी लागेल, नापास व्हाल. बाबा स्वतः म्हणतात - ‘मी रोज असे चांगले-चांगले पॉईंट्स ऐकवतो जे वेळेला समजावून सांगण्यासाठी खूप उपयोगी पडतील.’ जर ऐकलेच नाहीत तर मग कार्यामध्ये कसे वापराल. जोपर्यंत जगायचे आहे अमृत प्यायचे आहे. शिकवण धारण करायची आहे. गैरहजर तर कधीही राहता कामा नये. जिथून मिळेल तिथून शोधून काढून, कोणाकडून मागून घेऊन सुद्धा मुरली वाचली पाहिजे. आपली घमेंड असता कामा नये. अरे, भगवान पिता शिकवत आहेत, मग तर एकही दिवस चुकवता कामा नये. असे काही पॉईंट्स निघतात जे तुमच्या किंवा कोणाच्याही बुद्धीचे दरवाजे उघडू शकतात. आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे, कसा पार्ट चालतो, हे समजायला वेळ लागतो. अंतामध्ये केवळ हेच आठवणीत राहील की, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. परंतु आता समजावून सांगावे लागते. अखेरची हीच अवस्था आहे, बाबांची आठवण करत-करत निघून जायचे आहे. आठवणीद्वारेच तुम्ही पवित्र बनता. किती बनले आहात ते तर तुम्हीच समजू शकता. अपवित्र असणाऱ्याला नक्कीच कमी बळ मिळेल. मुख्य रत्न आठच आहेत जी पास विद ऑनर होतात. ते काहीच सजा खात नाहीत. या खूप महीन गोष्टी आहेत. किती उच्च शिक्षण आहे. स्वप्नामध्ये देखील नसेल की आपण देवता बनू शकतो. बाबांची आठवण केल्यानेच तुम्ही पद्मापद्म भाग्यशाली बनता. याच्या समोर तर तो धंदा इत्यादी काहीच कामाचा नाही. कोणतीही वस्तू कामाला येणार नाहीये. तरी देखील करावे तर लागतेच. हा विचार कधीही येता कामा नये की, आम्ही शिवबाबांना देतो. अरे, तुम्ही तर पद्मा-पद्मपती बनता. देण्याचा विचार आला तर ताकद कमी होते. मनुष्य ईश्वर अर्थ दान-पुण्य करतात घेण्यासाठी. ते देणे थोडेच झाले. भगवान तर दाता आहेत ना. दुसऱ्या जन्मामध्ये कितीतरी देतात. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. भक्ती मार्गामध्ये आहे अल्पकाळाचे सुख, तुम्ही बेहदच्या बाबांकडून बेहद सुखाचा वारसा प्राप्त करता. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) जोपर्यंत जगायचे आहे, अमृत प्यायचे आहे, दिलेली शिकवण धारण करायची आहे. स्वयं भगवान शिकवत आहेत, त्यामुळे एकही दिवस मुरली चुकवायची नाही.

२) पद्मांची कमाई जमा करण्यासाठी निमित्त मात्र घरामध्ये राहत असताना, कामकाज करत असताना एका बाबांच्या आठवणीमध्ये रहायचे आहे.

वरदान:-
प्रसन्नतेच्या रूहानी पर्सनॅलिटीद्वारे सर्वांना अधिकारी बनविणारे गायन आणि पूजन योग्य भव

जे सर्वांकडून संतुष्टतेचे सर्टिफिकेट घेतात ते नेहमी प्रसन्न राहतात, आणि याच प्रसन्नतेच्या रूहानी पर्सनॅलिटीमुळे नामीग्रामी अर्थात गायन आणि पूजन योग्य बनतात. तुम्हा शुभचिंतक, प्रसन्नचित्त राहणाऱ्या आत्म्यांद्वारे सर्वांना जी खुशीची, आधाराची, हिंम्मतीच्या पंखाची, उमंग-उत्साहाची प्राप्ती होते - ही प्राप्ती कोणाला अधिकारी बनविते आणि कोणी भक्त बनतात.

बोधवाक्य:-
बाबांकडून वरदान प्राप्त करण्याचे सहज साधन आहे - हृदयापासून स्नेह.