04-07-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोड मुलांनो - कलंगीधर बनण्यासाठी आपली अवस्था अचल-अडोल बनवा, जेवढे तुमच्यावर कलंक लागतात, तेवढे तुम्ही कलंगीधर बनता

प्रश्न:-
बाबांची आज्ञा काय आहे? कोणत्या मुख्य आज्ञेवर चालणारी मुले दिल तख्तनशीन बनतात?

उत्तर:-
बाबांची आज्ञा आहे - गोड मुलांनो, तुम्हाला कोणाशीही कट-कट करायची नाही. शांतीमध्ये रहायचे आहे. जर कोणाला तुमची गोष्ट आवडत नसेल तर तुम्ही चूप रहा. एकमेकांना त्रास देऊ नका. बापदादांचे दिल तख्तनशीन तेव्हा बनू शकता जेव्हा तुमच्यामध्ये कोणतेही भूत नसेल, मुखावाटे कधीही कटू वचन निघत नसेल, गोड बोलणे जीवनाची धारणा बनावी.

ओम शांती।
भगवानुवाच, आत्म-अभिमानी भव - सर्वात आधी जरूर म्हणावे लागेल. ही आहे मुलांसाठी सावधानी. बाबा म्हणतात कि, मी बाळांनो-बाळांनो म्हणतो तेव्हा आत्म्यांनाच बघतो, शरीर तर जुनी जुत्ती आहे, हे सतोप्रधान बनू शकत नाही. सतोप्रधान शरीर तर सतयुगातच मिळणार. आता तुमची आत्मा सतोप्रधान बनत आहे. शरीर तर तेच जुने आहे. आता तुम्हाला आपल्या आत्म्याला सुधारायचे आहे. पवित्र बनायचे आहे. सतयुगामध्ये शरीर सुद्धा पवित्र मिळेल. आत्म्याला शुद्ध करण्यासाठी एका बाबांची आठवण करायची असते. बाबा देखील आत्म्याला पाहतात. केवळ पाहून आत्मा शुद्ध बनणार नाही. ते तर जेवढी बाबांची आठवण कराल तेवढे शुद्ध होत जाणार. हे तर तुमचे काम आहे. बाबांची आठवण करत-करत सतोप्रधान बनायचे आहे. बाबा तर आलेच आहेत रस्ता सांगण्यासाठी. हे शरीर तर शेवट पर्यंत जुनेच राहणार. ही तर केवळ कर्मेंद्रिये आहेत, ज्याच्याशी आत्म्याचे कनेक्शन आहे. आत्मा गुल-गुल (फूल) बनते मग कर्तव्ये देखील चांगली करते. तिथे (सतयुगामध्ये) पशु-पक्षी देखील चांगले-चांगले असतात. इथे चिमणी माणसाला बघून उडून जाते, तिथे तर असे सुंदर-सुंदर पक्षी तुमच्या मागे-पुढे फिरत राहतील ते देखील नियमबद्धपणे. असे नाही घरामध्ये घुसतील, घाण करून जातील. नाही, खूप नियमबद्ध दुनिया असते. पुढे जाऊन तुम्हाला सगळे साक्षात्कार होत राहतील. आता मार्जिन (वेळ) तर खूप शिल्लक आहे. स्वर्गाची महिमा तर अपरंपार आहे, बाबांची महिमा देखील अपरंपार आहे, तर बाबांच्या प्रॉपर्टीची महिमा देखील अपरंपार आहे. मुलांना किती नशा चढला पाहिजे. बाबा म्हणतात - मी त्या आत्म्यांची आठवण करतो, जे सेवा करतात ते ऑटोमॅटिकली आठवतात. आत्म्यामध्ये मन-बुद्धी आहे ना. समजतात की आम्ही फर्स्ट नंबरची सेवा करतो कि सेकण्ड नंबरची करतो. हे सर्व नंबरवार समजतात. काहीजण तर म्युझियम बनवतात, प्रेसिडेंट, गव्हर्नर इत्यादींकडे जातात. जरूर चांगल्या रीतीने समजावून सांगत असतील. सर्वांमध्ये आपला-आपला गुण आहे. कोणामध्ये चांगले गुण असतील तर म्हटले जाते हा किती गुणवान आहे. जे सेवाभावी असतील ते नेहमी गोड बोलणार. कधीही कटू बोलू शकणार नाहीत. जे कटू बोलणारे आहेत त्यांच्यामध्ये भूत (विकार) आहे. देह-अभिमान आहे नंबरवन, मग त्याच्यामागून इतर भूते प्रवेश करतात.

मनुष्य बदचलन (गैरवर्तन) सुद्धा खूप करतात. बाबा म्हणतात त्या बिचाऱ्यांचा दोष नाही. तुम्हाला अशी मेहनत करायची आहे जशी कल्पापूर्वी केली होती, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा मग हळू-हळू संपूर्ण विश्वाचा लगाम तुमच्या हातामध्ये येणार आहे. ड्रामाचे चक्र आहे, कालावधी देखील बरोबर सांगतात. बाकी खूप कमी वेळ राहिला आहे. ते लोक स्वातंत्र्य देतात तर दोन तुकडे करून टाकतात, जेणेकरून आपसात भांडत रहावे. नाहीतर त्यांचा दारू-गोळा इत्यादी कोण घेणार. हा देखील त्यांचा व्यापार आहे ना. ड्रामा अनुसार ही देखील त्यांची चतुराई आहे. इथे देखील तुकडे-तुकडे केले आहेत. ते म्हणतात हा तुकडा आम्हाला मिळावा , पूर्ण वाटप केले गेलेले नाही, या भागात पाणी जास्त जाते, शेती भरपूर होते, या भागात पाणी कमी आहे. आपसात भांडतात, मग गृहयुद्ध सुरु होते. भांडणे तर खूप होतात. तुम्ही जेव्हा बाबांची मुले बनले आहात तर तुम्ही देखील शिव्या खाता. बाबांनी समजावून सांगितले होते - आता तुम्ही कलंगीधर बनता. जसे बाबा शिव्या खातात, तुम्ही सुद्धा शिव्या खाता. हे तर जाणता कि या बिचाऱ्यांना माहित नाही आहे कि, हे विश्वाचे मालक बनतात. ८४ जन्मांची गोष्ट तर खूप सोपी आहे. आपेही पूज्य, आपेही पुजारी देखील तुम्हीच बनता. कोणाच्या बुद्धीमध्ये धारणा होत नाही, हा सुद्धा ड्रामामध्ये त्यांचा असा पार्ट आहे, काय करू शकतो. कितीही डोके आपटा परंतु वर चढू शकत नाहीत. तदबीर (पुरुषार्थ) तर करवून घेतला जातो परंतु त्यांच्या तकदीरमध्ये (भाग्यात) नसते. राजधानी स्थापन होत आहे त्यामध्ये सर्व प्रकारचे पाहिजेत, असे समजून शांतीमध्ये राहिले पाहिजे. कोणाशीही कट-कट करण्याची गरजच नाही. प्रेमाने समजवावे लागते - असे करू नका. हे आत्मा ऐकते, याने आणखीनच पद कमी होईल. कोणा-कोणाला चांगली गोष्ट समजावून सांगितली तरीही अशांत होतात, तर सोडून दिले पाहिजे. स्वतःच जर असा असेल तर एकमेकांना त्रास देत राहतील. हे शेवटपर्यंत होत राहणार. माया देखील दिवसेंदिवस प्रबळ होत जाते. महारथींसोबत माया देखील महारथी होऊन लढते. मायेची वादळे येतात तर मग बाबांना आठवण करण्याची प्रॅक्टिस होते, एकदम जसे अचल-अडोल राहतात. समजतात माया हैराण करणार. घाबरायचे नाही. कलंगीधर बनणाऱ्यांवर कलंक लागतात, यामध्ये नाराज होता कामा नये. वृत्तपत्रपत्रवाले काहीही विरुद्ध छापतात कारण पवित्रतेची गोष्ट आहे. अबलांवर अत्याचार होणार. अकासुर-बकासुर नावे देखील आहेत. स्त्रियांची नावे सुद्धा पुतना, शूर्पणखा आहेत.

आता मुले सर्वात आधी महिमा देखील बाबांची ऐकवतात. बेहदचे बाबा म्हणतात - तुम्ही आत्मा आहात. हे ज्ञान बाबांशिवाय कोणीही देऊ शकत नाही. रचता आणि रचनेचे ज्ञान, हे आहे शिक्षण, ज्याने तुम्ही स्वदर्शन चक्रधारी बनून चक्रवर्ती राजा बनता. अलंकार देखील तुमचे आहेत परंतु तुम्ही ब्राह्मण पुरुषार्थी आहात म्हणून हे अलंकार विष्णूला दिले आहेत. या सर्व गोष्टी - आत्मा काय आहे, परमात्मा कोण आहे, कोणीही सांगू शकत नाही. आत्मा कुठून आली, कशी निघून जाते, कधी म्हणतात डोळ्यावाटे गेली, कधी म्हणतात भृकुटीतून गेली, कधी म्हणतात मस्तकातून निघून गेली. हे तर कोणी जाणू शकत नाही. आता तुम्ही जाणता - आत्मा शरीर असे सोडेल, बसल्या-बसल्या बाबांच्या आठवणीमध्ये देहाचा त्याग करणार. बाबांकडे तर आनंदाने जायचे आहे. जुने शरीर आनंदाने सोडायचे आहे. जसे सापाचे उदाहरण आहे. जनावरांमध्ये जी अक्कल आहे, तेवढी सुद्धा अक्कल मनुष्यांमध्ये नाही. ते संन्यासी इत्यादी तर फक्त दृष्टांत देतात. बाबा म्हणतात - तुम्हाला असे बनायचे आहे जसे भुंगा किड्याचे परिवर्तन करतो, तुम्हाला देखील मनुष्य रुपी किड्याला परिवर्तीत करायचे आहे. फक्त दृष्टांत द्यायचा नाही परंतु प्रॅक्टिकलमध्ये करायचे आहे. आता तुम्हा मुलांना परत घरी जायचे आहे. तुम्ही बाबांकडून वारसा घेत आहात तर आतून आनंद झाला पाहिजे. ते तर वारशाला जाणतही नाहीत. शांती तर सर्वांना मिळते, सर्वजण शांतीधाम मध्ये जातात. बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही सर्वांची सद्गती करत नाहीत. हे देखील समजावून सांगायचे आहे की, तुमचा निवृत्ती मार्ग आहे, तुम्ही तर ब्रह्ममध्ये लिन होण्याचा पुरुषार्थ करता. बाबा तर प्रवृत्ती मार्ग बनवतात. हि खूप गूढ गोष्ट आहे. पहिले तर कोणालाही अल्फ आणि बे हेच शिकवावे लागते. बोला - तुम्हाला दोन पिता आहेत - हदचे आणि बेहदचे. हदच्या पित्याकडे जन्म घेता विकारातून. किती अपार दुःख असतात. सतयुगामध्ये तर अपार सुख आहे. तिथे तर जन्मच लोण्या प्रमाणे होतो. कोणतीही दुःखाची गोष्ट नाही. नावच आहे स्वर्ग. बेहदच्या बाबांकडून बेहदच्या बादशाहीचा वारसा मिळतो. आधी आहे सुख, नंतर आहे दुःख. आधी दुःख नंतर सुख म्हणणे चुकीचे आहे. अगोदर नवीन दुनिया स्थापन होते, जुनी थोडीच स्थापन होते. जुने घर कधी कोणी बनवते का. नवीन दुनियेमध्ये तर रावण असणार नाही. हे देखील बाबा समजावून सांगतात तर बुद्धीमध्ये युक्त्या असाव्यात. बेहदचे बाबा बेहदचे सुख देतात. कसे देतात, या, येऊन ऐका तर आम्ही समजावून सांगू. सांगण्याची देखील युक्ती पाहिजे. दुःखधामच्या दुःखाचा सुद्धा तुम्ही साक्षात्कार घडवा. किती अथाह दुःख आहेत, अपरंपार दुःख आहेत. नावच आहे दुःखधाम. याला कोणीही सुखधाम म्हणू शकत नाही. सुखधाममध्ये कृष्ण राहतो. श्रीकृष्णाच्या मंदिराला सुद्धा सुखधाम म्हणतात. तो सुखधामचा मालक होता, ज्याची मंदिरांमध्ये आता पूजा होते. आता हे बाबा (ब्रह्मा बाबा) लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरामध्ये जातील तर म्हणतील - ओहो! हे तर आम्ही बनत आहोत. यांची पूजा थोडीच करणार. नंबरवन बनतो तर सेकंड, थर्डची पूजा का करावी. आपण तर सूर्यवंशी बनतो. लोकांना थोडेच माहित आहे. ते तर सर्वांनाच भगवान म्हणत राहतात. अंध:कार किती आहे. तुम्ही किती चांगल्या रीतीने समजावून सांगता. वेळ तर लागतो, जितका कल्पापूर्वी लागला होता, लवकर काहीही करू शकत नाही. हिऱ्या समान जन्म तुमचा हा आताचा आहे. देवतांचा देखील हिऱ्या समान जन्म म्हणणार नाही. ते काही ईश्वरीय परिवारामध्ये थोडेच आहेत. हा आहे तुमचा ईश्वरीय परिवार. तो आहे दैवी परिवार. किती नवीन-नवीन गोष्टी आहेत. गीतेमध्ये तर पिठात मीठ असल्याप्रमाणे आहे. श्रीकृष्णाचे नाव घालून किती मोठी चुक केली आहे. बोला, तुम्ही देवतांना देवता म्हणता मग श्रीकृष्णाला भगवान का म्हणता? विष्णू कोण आहे? हे देखील तुम्हीच समजता. मनुष्य तर ज्ञानाशिवाय अशीच पूजा करतात. प्राचीन देखील देवी-देवता आहेत जे स्वर्गामध्ये होऊन गेले आहेत. सतो, रजो, तमोमध्ये सर्वांना यायचे आहे. यावेळी सर्व तमोप्रधान आहेत. मुलांना पॉईंट्स तर भरपूर समजावून सांगतात. बॅजवर सुद्धा तुम्ही चांगले समजावून सांगू शकता. बाबा आणि शिकविणाऱ्या टिचरची आठवण करावी लागेल. परंतु मायेशी सुद्धा किती संघर्ष चालतो. खूप चांगले-चांगले पॉईंट्स निघत राहतात. जर ऐकले नाहीत तर ऐकवू कसे शकणार. मोठ-मोठे महारथी खूपदा बाहेर इकडे-तिकडे जातात तर मुरली मिस करतात, पुन्हा वाचत नाहीत. पोट भरलेले आहे. बाबा म्हणतात किती गुह्य-गुह्य गोष्टी तुम्हाला ऐकवतो, ज्या ऐकून धारण करायच्या आहेत. धारणा झाली नाही तर कच्चे रहाल. बरीच मुले सुद्धा विचार सागर मंथन करून छान-छान पॉइंट्स ऐकवतात. बाबा बघतात, ऐकतात जशी ज्याची अवस्था तसे ते पॉईंट्स काढू शकतात. जे पॉईंट्स कधी यांनी (ब्रह्मा बाबांनी) ऐकवले नाहीत ते सेवाभावी मुले काढतात. सेवाच करत राहतात. मासिकामध्ये देखील चांगले पॉईंट्स लिहितात.

तर तुम्ही मुले विश्वाचे मालक बनता. बाबा किती श्रेष्ठ बनवतात, गाण्यामध्ये सुद्धा आहे ना - सारे विश्व की बागड़ोर तुम्हारे हाथ में होगी. कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. हे लक्ष्मी-नारायण विश्वाचे मालक होते ना. त्यांना शिकवणारे जरूर बाबाच असणार. हे देखील तुम्ही समजावून सांगू शकता - त्यांनी राज्यपद मिळवले कसे? मंदिराच्या पुजाऱ्यालाही हे माहित नाही. तुम्हाला तर अथाह आनंद झाला पाहिजे. तुम्ही हे सुद्धा समजावून सांगू शकता कि, ईश्वर सर्वव्यापी नाही. यावेळी तर ५ भूते (विकार) सर्वव्यापी आहेत. प्रत्येकामध्ये हे विकार आहेत. मायेची ५ भूते आहेत. माया सर्वव्यापी आहे. तुम्ही मग ईश्वराला सर्वव्यापी म्हणता. हे तर चुकीचे आहे ना. ईश्वर सर्वव्यापी होऊ कसे शकतात. ते तर बेहदचा वारसा देतात. काट्यांना फूल बनवतात. समजावून सांगण्याची प्रॅक्टिस सुद्धा मुलांनी केली पाहिजे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) जेव्हा कोणी अशांती पसरवत असेल किंवा त्रास देत असेल तर तुम्हाला शांत रहायचे आहे. जर समजावून सांगून सुद्धा कोणी आपल्यामध्ये सुधारणा करत नसेल तर म्हणणार - यांचे नशीब; कारण राजधानी स्थापन होत आहे.

२) विचार सागर मंथन करून ज्ञानाचे नवीन-नवीन पॉइंट्स काढून सेवा करायची आहे. बाबा मुरलीमध्ये रोज ज्या गूढ गोष्टी ऐकवतात, त्या कधीही मिस करायच्या नाहीत.

वरदान:-
पवित्रतेला आदि अनादि विशेष गुणाच्या रूपामध्ये सहज अंगिकारणार े पूज्य आत्मा भव

पुज्यनीय बनण्याचा विशेष आधार पवित्रतेवर आहे. जितकी सर्व प्रकारची पवित्रता धारण करता तितके सर्व प्रकारचे पुज्यनीय बनता. जे विधिपूर्वक आदि अनादि पवित्रतेला विशेष गुणाच्या रूपामध्ये धारण करतात तेच विधिपूर्वक पुजले जातात. जे ज्ञानी आणि अज्ञानी आत्म्यांच्या संपर्कामध्ये येत पवित्र वृत्ती, दृष्टी, व्हायब्रेशन द्वारा यथार्थ संपर्क-संबंध निभावतात, स्वप्नामध्ये देखील ज्यांची पवित्रता खंडीत होत नाही - तेच विधिपूर्वक पूज्य बनतात.

बोधवाक्य:-
व्यक्त मध्ये राहून अव्यक्त फरिश्ता बनून सेवा करा तर विश्वाच्या कल्याणाचे कार्य तीव्र गतीने संपन्न होईल.