03-08-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, तुम्ही खरे-खरे राजऋषी, राजयोगी आहात, तुम्हाला राजाईकरिता पवित्र जरूर बनायचे आहे”

प्रश्न:-
कोणत्या गोष्टीवरील (अटेंशन) लक्ष तुम्हाला राजाईकरिता लायक बनवते?

उत्तर:-
जर पूर्णपणे लक्ष अभ्यासावर केंद्रित असेल तर राजाई मिळते. बाबा जे काही सांगतात, ते काळजीपूर्वक ऐकून धारण करा. बाबांनी सांगितले आणि मुलांनी ऐकले, तर राजाई मिळेल. जर ऐकताना जांभई देत असाल अथवा डुलकी काढत असाल, बुद्धी भटकत असेल, तर राजाई गमावून बसाल; त्यामुळे पूर्णतः अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.

गीत:-
हमें उन राहों पर चलना है...

ओम शांती।
रुहानी बाबा रुहानी मुलांप्रती समजावून सांगत आहेत. आज मुलांना ‘हठयोग’ आणि ‘राजयोग’ या विषयी समजावून सांगत आहेत. मुलांना माहीत आहे, ते (दुनियावाले) जे काही शिकवतात, तो सर्व आहे - हठयोग, कारण ते कर्म-संन्यासी आहेत. वास्तविक गृहस्थींनी हठयोग, कर्म-संन्यास शिकता कामा नये. तो तर आहेच निवृत्ती मार्ग. तो धर्मच वेगळा आहे. तुमचा धर्म देवी-देवता धर्म आहे, ज्या देवी-देवतांनी राजयोगाद्वारेच राज्य प्राप्त केले आहे. आता तुम्ही राजऋषी आहात. ऋषी त्यांना म्हटले जाते जे पवित्र राहतात. तुम्ही आता पवित्र आहात. जर पवित्र राहिले नाहीत तर त्यांना ऋषी म्हटले जात नाही. तुम्ही राजाई प्राप्त करण्यासाठी पवित्र बनता. ते काही राजाई प्राप्त करण्यासाठी पवित्र बनत नाहीत. तुम्ही जाणता की, पवित्र दुनियेमध्ये आपल्याला पवित्र राजाई मिळाली होती. भारतामध्येच ५ हजार वर्षांपूर्वी देवी-देवतांचा पूज्य पवित्र प्रवृत्ती मार्ग होता. आता पुजारी पतित बनले आहेत. पतित कसे बनले? ८४ जन्मांचा हिशोब आहे ना. बाबा जो सहज राजयोग शिकवत आहेत, तेच तुम्हाला ८४ जन्मांचा हिशोब सांगतात. संन्यास धर्मवाले, इतर धर्मांविषयी काय जाणणार? हा आहे देवी-देवतांचा प्राचीन धर्म. तो (संन्यास धर्म) आहे नंतरचा धर्म. जे भूतकाळात होऊन गेले आहेत, त्यांना संन्यासी समजू शकणार नाहीत.

तुम्ही जाणता, हठयोग अनेक प्रकारचे आहेत. द्वापर पासून भक्तिमार्गासोबतच हा हठयोग सुरू होतो. आता मग आहे - राजयोग. ते लोक हठयोग तर जन्म-जन्मांतर शिकत आले आहेत. राजयोग तुम्ही एका जन्मामध्येच शिकता. त्यांना जन्म-जन्मांतर पुनर्जन्म घेऊन हठयोग शिकायचाच आहे. तुम्हाला राजयोग शिकण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. हा राजयोग तुम्ही फक्त संगमावरच शिकता. राजाई मिळाली, स्वर्ग झाला की नंतर मग बाकीचे सर्व धर्म नष्ट होतात. तुम्ही राजऋषी आहात. राधे-कृष्ण देखील पवित्र आहेत ना. श्रीकृष्णाला महात्मा देखील म्हणतात. महात्मा पवित्र असतात. तुम्ही देखील आता महात्मा अथवा राजऋषी आहात. महात्मा अर्थात पवित्र, महान आत्मा. या गोष्टी कोणत्याही शास्त्रांमध्ये नाहीत. शास्त्रे तर नंतर बनतात. कथा लिहिल्या प्रमाणे बसून लिहितात. जे भूतकाळात घडून जाते, त्यावरून मग खेळ बनवतात. खरा तर नाहीये. आता बाबा मुलांना प्रॅक्टिकल मध्ये शिकवत आहेत. त्याचा मग इतिहास बनवला आहे. यादव, कौरव, पांडव होते; जरूर संगमावरच तर असतील. संगमयुगाचा इतिहास बसून बनवला आहे. सण देखील सर्व संगमयुगाशीच संबंधित आहेत. रक्षा बंधनाचा सण देखील पवित्रतेवर आधारित आहे. नंतर मग त्याचे यादगार म्हणून प्रथा सुरु झाली. इथे बाबा देखील सर्वांना पवित्र बनवून प्रतिज्ञा करवून घेतात. शीख लोक कडे घालतात, ते देखील पवित्रतेचे प्रतीक आहे. हिंदू लोक जानवे घालतात, हे देखील पवित्रतेचे प्रतीक आहे, परंतु पवित्र मात्र राहत नाहीत. राखी बांधून घेतात, परंतु खरा अर्थ थोडाच समजतात. पूर्वी ब्राह्मण लोक राखी बांधत असत. आता बहीण आपल्या भावाला राखी बांधते, तर भाऊ तिला भेट म्हणून पैसे देतो. हे सर्व आता फॅशन म्हणून रूढ झाले आहे. वास्तविक ही आहे पवित्रतेची गोष्ट. बाबा म्हणतात - मुलांनो, कामविकार महाशत्रू आहे. ते लौकिक ब्राह्मण लोक काही असे समजावत नाहीत. आता बेहदचे बाबा सांगत आहेत - मुलांनो, प्रतिज्ञा करा की आम्ही पवित्र बनणार. कधीही विकारामध्ये जाणार नाही. बोलावता देखील यासाठी की, येऊन पतितांना पावन बनवा. सतयुग-त्रेतामध्ये कोणीही बोलावत नाहीत. ते आहेच रामराज्य. हे आहे रावण राज्य. रामराज्यामध्ये ५ विकार असतही नाहीत. यथा राजा-राणी तथा प्रजा... आता तुम्ही मुले जाणता, आम्ही बाबांकडून स्वर्गाची बादशाही घेत आहोत. या नरकातून जायचे आहे जरूर. बाबा आले आहेत पावन बनवून स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी. तर मग आपण पावन का बनू नये. त्यांचे हठयोग तर अनेक प्रकारचे आहेत. जयपूरच्या म्युझियममध्ये जाऊन बघा, हठयोगींची किती व्हरायटी आहे. त्याने तसेही साध्य तर काहीच होत नाही. शिडी खालीच उतरत जातात (अजूनच पतित बनत जातात).

बाबांनी समजावून सांगितले आहे - भारत जेव्हा पतित बनतो, रावणाचे राज्य असते तेव्हा धरणीकंप होऊ लागतो आणि सोन्याचे महाल इत्यादी सर्व खाली गाडले जातात. महाल इत्यादींना कोणी लुटले थोडेच आहे. त्यांनी (इतर धर्मियांनी) तर फक्त मंदिरांना लुटले आहे. काही दागिने, सोने इत्यादी घेऊन गेले आहेत. दागिन्यांचा सर्वात जास्त छंद तुम्हाला आहे. तुम्ही स्वर्गामध्ये येताच क्षणी दागिने घालता, राज्य करता. इतर धर्मांचे येताच क्षणी राज्य करत नाहीत. तुम्ही बेहदच्या बाबांकडून स्वर्गाच्या बादशाहीचा वारसा घेता. तर हे बाबा बसून समजावून सांगत आहेत, हे काही गीता वाचून तुम्हाला ऐकवत नाहीत. गीतेमध्ये जे काही लिहिले आहे, ते सर्व मी म्हटलेले नाहीये. ते तर मनुष्यांनी माझ्या महावाक्यांचे नंतर बसून धर्मशास्त्र बनवले आहे. मी जे तुम्हाला ऐकवले ते तुम्हीच ऐकले आणि मग जाऊन राजाई केली. तिथे हे ज्ञान राहत नाही. इथे तर बाबा, टीचर बसून तुम्हाला शिकवण देत आहेत. बाबा तर हिंदी मध्येच समजावून सांगतात. इथे सर्व हिंदी-हिंदी म्हणत राहतात ना. जी त्यांची भाषा आहे. वास्तविक प्राचीन भाषा हिंदीच आहे, संस्कृत नाही. ही संस्कृत तर शंकराचार्य आल्या नंतर अस्तित्वात आली आहे. जे येतात ते आपली भाषा चालवतात. बाकी असे नाही की बाबांनी गीता संस्कृतमध्ये ऐकवली आहे. नाही. गुरु नानकांचा स्वतःचा ग्रंथ आहे. त्यांनी शीख धर्म स्थापन केला, त्यांना देखील अवतार मानतात. त्यांच्या धर्मामध्ये राजे देखील असतात. संन्याशांमध्ये काही राज्य नाहीये. बाबांनी समजावून सांगितले आहे, बुद्ध, ख्रिश्चन इत्यादी अगोदर गृहस्थी आत्मे होते. आता गृहस्थी पतित आत्मा काही धर्म स्थापन करू शकत नाही. त्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याने प्रवेश केला, ज्याने धर्म स्थापना केली. विविध प्रकारचे इतरही धर्म तर अनेक आहेत, येऊन आपला छोटा मठ-पंथ स्थापन करतात. झाडाच्या चित्रामध्ये देखील दाखवले आहे ना. तर हठयोग आणि राजयोग यामध्ये खूप अंतर आहे. या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. ज्यांना या गोष्टी समजत नसतील, ते डुलक्या काढतील, जांभया देत राहतील. इथे तर तुम्हाला खजिना मिळतो. खूप जबरदस्त कमाई आहे. तुम्ही रत्नांनी झोळी भरता. तर हे डोळे उघडे ठेऊन ऐकायचे असते. डुलक्या काढत राहाल किंवा बुद्धी बाहेर भटकत राहिली तर ती राजधानी प्राप्त करू शकणार नाही.

तुम्ही आहात राजाई प्राप्त करणारे राजऋषी. बाबा राजधानी स्थापन करतात, श्रीकृष्ण करत नाही. श्रीकृष्ण तर बाबांकडून वारसा घेतात. आता तुमचे पिता आहेत निराकार, ज्यांच्याकडून विश्वाच्या बादशाहीचा वारसा घेत आहात. तुम्ही किती श्रीमंत बनता. इथे एकच पिता येऊन राजयोग शिकवतात. तोही हिंडा-फिरा, खा-प्या, फक्त बाबांची आठवण करा. श्रीमंत जरूर उत्तम प्रतीचे आणि व्यवस्थित खातील. ते तर आपल्या कमाईचे फळ खातात. मालपुवा खा किंवा भाकरी खा. आठवण बाबांची करा. भले काहीही खा. नाहीतर पैसा कशासाठी आहे. बाबा काही मनाई करत नाहीत. फक्त बाबांसोबत योग लावायचा आहे. ही राजाई स्थापन करण्यासाठी काहीच खर्च नाही आहे. ती युद्धे इत्यादीमध्ये किती खर्च होतो. विमानांवर किती खर्च होतो. खाली कोसळतात तर एकदम नष्ट होतात. किती नुकसान होते. तर बाबा म्हणतात - चालता-फिरता बाबांची आठवण करा. स्वदर्शन चक्र फिरवत राहा. आपण ८४ जन्म पूर्ण केले आहेत. आता वतन कडे जाऊया. घरी जाऊन मग येऊन राजाई करणार. तुम्ही ॲक्टर्स आहात ना. ते (या दुनियेतील) चित्रपट तर दोन-अडीच तास चालतात. हे बेहदचे नाटक ५ हजार वर्षे चालते, याला मनुष्यच समजू शकतात. ही दुनिया आहे काट्यांचे जंगल. सर्वात मोठा काटा आहे - कामविकाराचा, जो आदि-मध्य-अंत दुःख देतो. दुसऱ्या नंबरचा काटा आहे - क्रोध. त्याची निशाणी ही महाभारत लढाई पहा. एखाद्या गोष्टींवरून चिडले तर लगेच बॉम्ब्स टाकायला सुरुवात करतील. आता तर असे काही बॉम्ब्स बनवले आहेत काही विचारू नका. सतयुगामध्ये काही युद्ध इत्यादी होत नाही. संगमावरच हे महाभारताचे युद्ध दाखवले आहे. इतर कोणत्याही शास्त्रांमध्ये लढाईची गोष्टच नाहीये. तिथे तर साऱ्या विश्वाचे तुम्ही मालक असता. लढाईची गोष्ट असू शकत नाही. शास्त्रांमध्ये असुरांचे आणि देवतांचे युद्ध दाखवले आहे. परंतु देवता अहिंसक आहेत. तुम्ही योगबलाद्वारे विश्वाचे मालक बनता. हे आहे सायलेन्सचे बळ, यामध्ये तुम्हाला काहीच बोलायचे नाहीये. आठवणीच्या बळाद्वारे तुम्ही बाबांकडून विश्वाची बादशाही घेता. फरक पहा किती आहे. विज्ञानाच्या बळाद्वारे विनाश होतो. त्याच विज्ञानाद्वारे मग तुम्ही सतयुगामध्ये सुख पाहाल. विज्ञानाद्वारे जे संशोधन करतात, ते सुखासाठीच करतात. ते लोक देखील येऊन थोडे-फार ज्ञान घेतील. प्रदर्शनीमध्ये तर सर्व प्रकारचे येतात. पुढे चालून सर्व येतील. तुमच्या या सायलेन्सच्या बळाचा प्रभाव सर्वत्र पसरेल.

तुम्ही प्रश्न विचारता - गीतेचा भगवान कोण? असा प्रश्न कोणी विचारू शकत नाही. जिथे हा प्रश्न लिहिता, तिथे त्यासोबत चित्र देखील द्या. गीतेचा भगवान परमपिता परमात्मा की श्रीकृष्ण, जो पूर्ण ८४ जन्म घेतो. पतितापासून पावन बनविणारे तर बाबाच आहेत. श्रीकृष्णाची आत्मा तर ८४ जन्म घेऊन सावळी बनली आहे. त्या श्रीकृष्णाच्या आत्म्याला बाबा बसून समजावून सांगतात की, ‘तू ८४ जन्म घेतले आहेस. तू आपल्या जन्मांना जाणत नाहीस’. ॲक्टरला माहीत तर असले पाहिजे ना की आपण ८४ जन्म कसे घेतो. संन्याशांचा धर्मच वेगळा आहे. भारतवासीयांना आपल्या धर्मा विषयी माहीत नसल्यामुळे ते बाकीच्या इतर धर्मांमध्ये जात राहतात. एखाद्या गुरूच्या आशीर्वादाने कोणाला धन लाभ झाला तर त्यांच्याच मागे धावत राहतील. आणि जर दिवाळे निघाले तर म्हणतील खुदाची भावी (ईश्वराची मर्जी). मुलगा झाला तर खूप आनंद होईल. अच्छा, १०-१२ दिवसानंतर मुलाचा मृत्यू झाला तर म्हणतील ईश्वराची भावी. याला जिवंत करणे आपल्या हातात नाही. बाबांनी अशी खूप उदाहरणे पाहिलेली आहेत. असे अनेकदा घडते. इथे तर बाबा बसले आहेत. बाबा मुलांना समजावून सांगतात - ‘गोड-गोड मुलांनो, पावन बना’. आठवण आहे, जेव्हा महाभारी महाभारत लढाई लागली होती तेव्हा द्रौपदीने आर्त हाक मारली होती - ‘बाबा, हे दु:शासन आम्हाला विवस्त्र करत आहेत, यांच्यापासून आम्हाला वाचवा’. ५ हजार वर्षांची गोष्ट आहे. या अबलांवर अत्याचार या विषावरूनच (कामविकारा मुळेच) होतात. कितीतरी स्त्रिया देखील अशा असतात ज्या विषाशिवाय राहू शकत नाहीत. त्यांची नावे देखील ठेवली आहेत - शूर्पणखा, पूतना. जे विषासाठी त्रास देतात ते आहेत - कंस, जरासंध, शिशुपाल... या सर्वांचा विनाश तर होणारच आहे. यावेळी आहे आसुरी, रावण राज्य, नंतर मग असेल ईश्वरीय राज्य. या संपूर्ण चक्राला तर तुम्ही जाणले आहे की, आपण कसे ८४ जन्म घेतो. हे तेव्हा विसरायला होते जेव्हा विकारामध्ये जातात. विकारामध्ये जाणाऱ्याचे तोंडच पिवळे पडते. स्वतःच समजतात - हे आपण काय केले. बाबा म्हणतात - मुलांनो, या विषयाच्या गटारामध्ये जाऊ नका. हा तुम्हाला आदि-मध्य-अंत दुःख देणारा आहे. यामध्ये पडू नका. शपथ घ्या की आम्ही कधीही विकारामध्ये जाणार नाही. भगवानुवाच आहे - ‘काम महाशत्रू आहे’. प्रत्येक चित्रामध्ये आधी तर हेच लिहा. ज्ञान सागर, पतित-पावन, गीता ज्ञान दाता शिव भगवानुवाच. म्हणजे मग श्रीकृष्णाचे नाव बुद्धीतून निघून जाईल. आम्हाला गीतेचे भगवान बसून हे सांगत आहेत. तेच ज्ञान आपण घेत आहोत. भगवानच येऊन नवीन दुनिया स्थापन करतात आणि जुन्या दुनियेचा विनाश होतो. ‘रुद्र ज्ञान यज्ञ’ आहे ना. खरेतर आहेत ‘शिवबाबा’, ‘रुद्र बाबा’ म्हणणार नाही. बॉम्बे मध्ये बाबुरीनाथचे देखील मंदिर आहे. आता ‘बबुल’ म्हटले जाते काट्यांना. ‘बाबुरीनाथ’ नाव का ठेवले आहे? हे कोणालाच समजत नाही. चित्र तर ‘शिव’चेच आहे. बाकी तर अनेक नावे ठेवली आहेत. शिवबाबाच येऊन काट्यांच्या जंगलाला फुलांचा बगीचा बनवतात, तेच तुमचे पिता आहेत. त्यांचे नाव आहे - ‘शिव’. शिव परमात्माय नमः, ब्राह्मण देवी-देवताय नमः शब्द अगदी क्लिअर आहेत. आता ते परमपिता परमात्मा बसून या रथा द्वारे समजावून सांगत आहेत. हुबेहूब जसे लौकिक पिता समजावून सांगतात - ‘मुलांनो, आपल्या कुळाला कलंक लावू नका. कोणतेही खराब काम करू नका’. हे बाबा देखील म्हणतात - ‘मुलांनो, विकारामध्ये तर कधीही जाऊ नका. पवित्र बनल्या शिवाय स्वर्गामध्ये उच्च पद प्राप्त करू शकणार नाही’. खूप जबरदस्त कमाई तुम्ही करत आहात. बाकीचे सर्व गमावत आहेत. भले कोणाकडे पदम आहेत. आलिशान बंगले बनवत आहेत. लाखो रुपये खर्च करतात. तुम्ही समजता ते सर्व वेस्ट ऑफ टाईम... आहे. हे काही कामाला येणार नाही, सर्व नष्ट होईल. ते तर समजतात - १०-१२ हजार वर्षे टिकतील. तुम्ही मुले जाणता, मृत्यू तर समोर उभा आहे, डोक्यावर आहे. थोड्यावेळातच हे भूकंप इत्यादी होऊन सर्व डांवाडोल (डळमळीत) होईल. भूकंप इत्यादीमध्ये असंख्य मरतात. आता तर विनाश होणारच आहे. विनाशाचा साक्षात्कार आणि स्थापनेचा साक्षात्कार केला आहे. तो मग या डोळ्यांनी पाहाल. भक्तिमार्गामध्ये किती काही करतात, परंतु कोणीही वैकुंठामध्ये जाऊ शकत नाही. ज्ञानाशिवाय सद्गती होऊ शकत नाही. ही सर्व भक्ती मार्गातील खेळणी आहेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कुळाला कलंकीत करणारे कोणतेही खराब काम करायचे नाही. पवित्र बनण्याची आपणच आपल्याशी शपथ घ्यायची आहे.

२) आता आपला वेळ आणि पैसा वाया घालवायचा नाही. फुलांच्या बगीच्यामध्ये जाण्यासाठी काटे (अवगुण) काढून टाकायचे आहेत.

वरदान:-
अलौकिक खेळ आणि खेळण्यांशी खेळत असतानाही सदैव शक्तिशाली बनणारे अचल-अडोल भव

अलौकिक जीवनामध्ये मायेची विघ्ने येणे हा देखील एक खेळ आहे. जसे शारीरिक शक्तीसाठी खेळ खेळायला लावतात, तसे अलौकिक युगामध्ये परिस्थितींना खेळणी समजून हा अलौकिक खेळ खेळा. त्यांना घाबरू नका अथवा विचलित होऊ नका. सर्व संकल्पांसहित स्वतःला बापदादांवर अर्पण करा म्हणजे मग माया कधीही वार करू शकणार नाही. दररोज अमृतवेलेला साक्षी बनून स्वतःचा सर्व शक्तींनी श्रृंगार करा तेव्हाच अचल-अडोल राहाल.

बोधवाक्य:-
कोणताही सांसारिक समाचार ऐकणे किंवा ऐकवणे - हे देखील स्वतःमध्ये कचरा जमा करणे आहे.

हे अव्यक्त इशारे - अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.

बापदादांचा मुख्य आदेश आहे - निरंतर आठवणीमध्ये राहा आणि मन, वाणी, कर्माने पवित्र बना. संकल्पामध्ये देखील अपवित्रता अथवा अशुद्धता नसावी, याला म्हटले जाते - संपूर्ण पवित्र. जर संकल्पामध्ये देखील जुने अशुद्ध संस्कार टच करत असतील, व्यर्थ संकल्प चालत असतील किंवा स्वप्न येत असतील, तरीही संपूर्ण पवित्र म्हणणार नाही. म्हणून ‘पवित्र-भव’ आणि ‘योगी-भव’ या पहिल्या पाठाला स्वरूपामध्ये आणा, तेव्हाच पित्या समान आणि बाबांच्या समीप येण्यासाठी अधिकारी बनू शकाल.