03-09-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला कोणत्याही पतित देहधारींवर प्रेम करायचे नाहीये कारण तुम्ही
पावन दुनियेमध्ये जात आहात, एका बाबांवरच प्रेम करायचे आहे”
प्रश्न:-
तुम्हा मुलांना
कोणत्या गोष्टीचा कंटाळा येता कामा नये आणि का?
उत्तर:-
तुम्हाला आपल्या या जुन्या शरीराचा थोडासुद्धा कंटाळा येता कामा नये कारण हे शरीर
अतिशय मौल्यवान आहे. आत्मा या शरीरामध्ये बसून बाबांची आठवण करून खूप मोठी लॉटरी
घेत आहे. बाबांच्या आठवणीमध्ये रहाल तर आनंदाचा खुराक मिळत राहील.
ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांनो, आता दूरच्या देशाचे रहिवासी आणि दूरच्या देशाचे पॅसेंजर्स
(प्रवासी) आहात. आपण आत्मे आहोत आणि आता खूप दूरच्या देशामध्ये जाण्याचा पुरुषार्थ
करत आहोत. हे फक्त तुम्ही मुलेच जाणता की आपण आत्मे दूरच्या देशाचे रहिवासी आहोत आणि
दूरच्या देशामध्ये राहणाऱ्या बाबांना देखील बोलावतो की, येऊन आम्हाला देखील तिकडे
दूरच्या देशामध्ये घेऊन जा. आता दूरच्या देशामध्ये राहणारे बाबा तुम्हा मुलांना तिथे
घेऊन जातात. तुम्ही रूहानी पॅसेंजर्स आहात कारण या शरीरासोबत आहात ना. आत्माच
प्रवास करेल. शरीर तर इथेच सोडून देईल. बाकी आत्माच यात्रा करेल. आत्मा कुठे जाईल?
आपल्या रूहानी दुनियेमध्ये. ही आहे जिस्मानी दुनिया, ती आहे रूहानी दुनिया. मुलांना
बाबांनी समजावून सांगितले आहे की आता घरी परत जायचे आहे, जिथून पार्ट बजावण्यासाठी
इथे आलो आहोत. हा खूप मोठा मंडप अथवा स्टेज आहे. स्टेजवर ॲक्ट करून पार्ट बजावून मग
सर्वांना परत जायचे आहे. नाटक जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच तर जाणार ना. आता तुम्ही
इथे बसले आहात, तुमचा बुद्धियोग घर आणि राजधानीमध्ये आहे. हे तर अगदी पक्के लक्षात
ठेवा कारण हे तर गायन आहे - ‘अन्त मति सो गति’. आता इथे तुम्ही शिकत आहात, तुम्ही
जाणता - भगवान शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत. ईश्वर तर या पुरुषोत्तम संगमयुगाशिवाय
कधी शिकवणार देखील नाहीत. संपूर्ण ५ हजार वर्षांमध्ये निराकार ईश्वर पिता एकदाच
येऊन शिकवतात. हा तर तुम्हाला पक्का निश्चय आहे. अभ्यास देखील किती सोपा आहे, आता
घरी जायचे आहे. त्या घरावर तर साऱ्या दुनियेचे प्रेम आहे. मुक्तिधामला तर सर्वच जाऊ
इच्छितात परंतु त्याचा अर्थ देखील समजत नाहीत. मनुष्यांची बुद्धी यावेळी कशी आहे आणि
तुमची बुद्धी आता कशी बनली आहे, किती फरक आहे. तुमची आहे स्वच्छ बुद्धी, नंबरवार
पुरुषार्थानुसार. साऱ्या विश्वाच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान तुम्हाला चांगल्या
प्रकारे आहे. तुमच्या हृदयामध्ये हे आहे की आम्हाला आता पुरुषार्थ करून नरापासून
नारायण जरूर बनायचे आहे. इथून पहिले तर आपल्या घरी जाणार ना. तर आनंदाने जायचे आहे.
जसे सतयुगामध्ये देवता आनंदाने एक शरीर सोडून दुसरे घेतात, तसेच या जुन्या शरीराला
देखील आनंदाने सोडायचे आहे. याला कंटाळून जायचे नाही कारण हे अतिशय मौल्यवान शरीर
आहे. या शरीराद्वारेच आत्म्याला बाबांकडून लॉटरी मिळते. आपण जोपर्यंत पवित्र बनत
नाही तोपर्यंत घरी जाऊ शकणार नाही. बाबांची आठवण करत राहिलो तरच त्या योगबलाने
पापांचे ओझे उतरेल. नाहीतर खूप शिक्षा भोगावी लागेल. पवित्र तर जरूर बनायचे आहे.
लौकिक नात्यामध्ये देखील मुले कोणते वाईट विकारी काम करतात तर वडील रागात येऊन
काठीने देखील मारतात कारण बेकायदा (मर्यादा तोडून) पतित बनतात. कोणासोबत बेकायदेशीर
(अनैतिक) प्रेम असेल तरी देखील आई-वडिलांना आवडत नाही. हे बेहदचे पिता मग म्हणतात
तुम्हा मुलांना तर इथे रहायचे नाही आहे. आता तुम्हाला जायचे आहे नव्या दुनियेमध्ये.
तिथे विकारी पतित कोणी असत नाही. एकच पतित-पावन बाबा येऊन तुम्हाला असे पावन बनवतात.
बाबा स्वतः म्हणतात - ‘माझा जन्म दिव्य आणि अलौकिक आहे, इतर कोणतीही आत्मा
माझ्याप्रमाणे शरीरामध्ये प्रवेश करू शकत नाही’. भले धर्म स्थापक जे येतात त्यांची
आत्मा देखील प्रवेश करते परंतु ती गोष्टच वेगळी आहे. मी तर येतोच सर्वांना परत घेऊन
जाण्यासाठी. ते (धर्मस्थापक) तर वरून खाली उतरतात आपला पार्ट बजावण्यासाठी. मी तर
सर्वांना घेऊन जातो, आणि मग सांगतो की तुम्ही सर्वप्रथम नव्या दुनियेमध्ये कसे
उरतणार. त्या नवीन दुनिया सतयुगामध्ये कोणीही बगळा असत नाही. बाबा तर येतातच
बगळ्यांच्यामध्ये. आणि मग तुम्हाला हंस बनवतात. तुम्ही आता हंस बनले आहात, मोतीच
वेचता. सतयुगामध्ये तुम्हाला ही रत्ने मिळणार नाहीत. इथे तुम्ही ही ज्ञान रत्ने
वेचून हंस बनता. बगळ्यापासून तुम्ही हंस कसे बनता, हे बाबा बसून समजावतात. आता
तुम्हाला हंस बनवतात. देवतांना हंस, असुरांना बगळा म्हणणार. आता तुम्ही कचरा सोडून
मोती वेचता.
तुम्हालाच पद्मा-पदम
भाग्यशाली म्हणतात. तुमच्या पावलांवर छाप लागतो पद्मांचा. शिवबाबांना तर पायच नाही
आहेत जे पद्म होऊ शकतील. ते तर तुम्हाला पद्मा-पदम भाग्यशाली बनवतात. बाबा म्हणतात
मी तुम्हाला विश्वाचा मालक बनविण्यासाठी आलो आहे. या सर्व गोष्टी चांगल्या रीतीने
समजून घ्यायच्या आहेत. मनुष्य हे तर समजतात ना की, स्वर्ग होता. परंतु स्वर्ग केव्हा
होता मग पुन्हा कसा होईल, ते काहीच माहीत नाही आहे. तुम्ही मुले आता प्रकाशात आले
आहात. ते सर्व आहेत अंधारामध्ये. हे लक्ष्मी-नारायण विश्वाचे मालक केव्हा आणि कसे
बनले, हे माहीतच नाही आहे. ५ हजार वर्षांची गोष्ट आहे. बाबा बसून समजावून सांगत
आहेत - ‘जसे तुम्ही पार्ट बजावण्यासाठी येता, तसा मी देखील येतो’. तुम्ही निमंत्रण
देऊन बोलावता - ‘ओ बाबा, आम्हा पतितांना येऊन पावन बनवा’. इतर कोणालाही असे कधीही
म्हणणार नाही, आपल्या धर्मस्थापकाला देखील असे म्हणणार नाहीत की, येऊन सर्वांना
पावन बनवा. क्राईस्ट किंवा बुद्धाला थोडेच ‘पतित-पावन’ म्हणणार. गुरु तो, जो सद्गती
करेल. ते तर येतात, त्यांच्या मागाहून सर्वांना खाली उतरायचे आहे. इथून परत जाण्याचा
रस्ता सांगणारे, सर्वांची सद्गती करणारे अकाल मूर्त एक बाबाच आहेत. वास्तविक
‘सद्गुरु’ शब्दच योग्य आहे. तरीही तुमच्या सर्वांपेक्षा योग्य शब्द शिख लोक बोलतात.
मोठ-मोठ्या आवाजात बोलतात - ‘सद्गुरु अकाल’. अगदी जोरदारपणे सूर लावतात - ‘सद्गुरु
अकाल मूर्त’ म्हणतात. ‘मूर्त’च (प्रत्यक्षच झाले) नसतील तर मग ते सद्गुरु तरी कसे
बनतील, सद्गती कसे देतील? ते सद्गुरु स्वतःच येऊन आपला परिचय देतात - ‘मी
तुमच्यासारखा जन्म घेत नाही’. इतर सर्व शरीरधारी तर बसून ऐकवतात. तुम्हाला अशरीरी
रूहानी बाबा बसून समजावून सांगतात. रात्रं-दिवसाचा फरक आहे. यावेळी मनुष्य जे काही
करतात ते चुकीचेच करतात कारण रावणाच्या मतावर आहेत ना. प्रत्येकामध्ये ५ विकार आहेत.
आता रावण राज्य आहे, या गोष्टी बाबा बसून डिटेलमध्ये समजावून सांगतात. नाहीतर
दुनियेच्या पूर्ण चक्रा विषयी माहित कसे होईल. हे चक्र कसे फिरते, कळले तर पाहिजे
ना. तुम्ही असे देखील म्हणत नाही की, बाबा आम्हाला समजावून सांगा. बाबा आपणहून
समजावून सांगत राहतात. तुम्हाला एकही प्रश्न विचारावा लागत नाही. भगवान तर पिता आहे.
पित्याचे काम आहे, सर्वकाही आपणहून ऐकविणे, आपणहून सर्वकाही करणे. मुलांना शाळेमध्ये
वडील आपणच नेऊन बसवतात. नोकरीला लावतात मग त्याला म्हणतात ६० वर्षानंतर हे सर्व
सोडून ईश्वराचे भजन कर. वेद-शास्त्र इत्यादी वाच, पूजा कर. तुम्ही अर्धा कल्प पुजारी
बनलात मग अर्ध्या कल्पासाठी पूज्य बनता. पवित्र कसे बनावे, याकरिता किती सोपे करून
समजावून सांगितले जाते. मग भक्ती एकदम सुटून जाते. ते (दुनियावाले) सर्व भक्ती करत
आहेत आणि तुम्ही ज्ञान घेत आहात. ते रात्रीमध्ये आहेत तुम्ही दिवसामध्ये जाता
अर्थात स्वर्गामध्ये. गीतेमध्ये लिहिलेले आहे - ‘मनमनाभव’, हा शब्द तर प्रसिद्ध आहे.
गीता वाचणारे समजू शकतात, खूप सोपे करून लिहिलेले आहे. संपूर्ण आयुष्य गीता वाचत आले
आहेत, परंतु काहीच समजत नाहीत. आता तेच गीतेचे भगवान बसून शिकवतात तर पतिता पासून
पावन बनता. आता आपण ईश्वराकडून गीता ऐकतो आणि मग इतरांना ऐकवतो, पावन बनतो.
बाबांचे महावाक्य आहे
ना - ‘हा तोच सहज राजयोग आहे’. मनुष्य किती अंधश्रद्धेमध्ये बुडालेले आहेत, तुमचे
तर बोलणेच ऐकून घेत नाहीत. ड्रामा अनुसार त्यांचे देखील जेव्हा भाग्य उदयास येईल
तेव्हाच तुमच्याकडे येऊ शकतील. तुमच्यासारखे भाग्य इतर कोणत्याही धर्मवाल्यांचे असत
नाही. बाबांनी सांगितले आहे - ‘हा तुमचा देवी-देवता धर्म खूप सुख देणारा आहे’.
तुम्ही देखील समजता - बाबा बरोबर सांगत आहेत. शास्त्रांमध्ये तर तिथे (सतयुगामध्ये)
देखील कंस-रावण इत्यादी दाखवले आहेत. तिथल्या सुखा विषयी तर कोणाला माहितीच नाही आहे.
भले देवतांची पूजा करतात परंतु बुद्धीमध्ये काहीही येत नाही. आता बाबा म्हणतात -
‘मुलांनो, माझी आठवण करता?’ असे कधी ऐकले आहे का की, पिता मुलांना म्हणेल की
‘तुम्ही माझी आठवण करा’. लौकिक पिता कधी अशी आठवण करण्याचा पुरुषार्थ करवून घेतात
का? हे बेहदचे बाबा बसून समजावून सांगतात. तुम्ही साऱ्या विश्वाच्या आदि-मध्य-अंताला
जाणून चक्रवर्ती राजा बनाल. आधी तुम्ही जाल घरी. नंतर मग पार्टधारी बनून यायचे आहे.
आता कोणाला कळणार देखील नाही की ही नवीन आत्मा आहे की जुनी आत्मा आहे. नवीन
आत्म्याचा नामाचार जरूर होतो (प्रसिद्ध होते). आता देखील पहा कोणा-कोणाचे नाव किती
प्रसिद्ध होते. पुष्कळ मनुष्य येतात. बसल्या-बसल्या विनासायास येतात. तर तो प्रभाव
पडतो. बाबा देखील यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) विनासायास येतात तर तो प्रभाव
पडतो. ती देखील नवीन आत्मा येते तर जुन्यांवर प्रभाव पडतो. शाखा-उपशाखा निघत जातात
तर त्यांची महिमा होते. कोणालाही माहित नसते की हे इतके प्रसिद्ध का आहेत? नवी आत्मा
असल्याने त्यांच्यामध्ये आकर्षण असते. आता तर बघा किती ढिगाने खोटे भगवान बनले आहेत,
म्हणूनच गायन आहे - ‘सत्याची नाव हलते-डुलते परंतु बुडत नाही’. वादळे खूप येतात
कारण भगवान नावाडी आहे ना. मुले देखील डगमगतात, नावेला वादळे खूप घेरतात. इतर
सत्संगामध्ये तर पुष्कळजण जातात परंतु तिथे कधी वादळे इत्यादीची गोष्ट येत नाही. इथे
अबलांवर किती अत्याचार होतात परंतु तरी देखील स्थापना तर होणारच आहे. बाबा बसून
समजावून सांगत आहेत - ‘हे आत्म्यांनो, तुम्ही किती जंगली काटे बनले आहात, दुसऱ्यांना
काटे लावता (दुःख देता) तर तुम्हाला देखील काटा लागतो’. प्रतिसाद तर प्रत्येक
गोष्टीचा मिळतोच. तिथे दुःखाच्या कोणत्याही घाणेरड्या गोष्टी असत नाहीत म्हणून
त्याला म्हटलेच जाते - स्वर्ग. मनुष्य ‘स्वर्ग’ आणि ‘नरक’ म्हणतात; परंतु समजत
नाहीत. म्हणतात - अमका स्वर्गामध्ये गेला, असे म्हणणे देखील वास्तविक चुकीचे आहे.
निराकारी दुनियेला काही स्वर्ग म्हटले जात नाही. ते आहे मुक्तिधाम. हे मग म्हणतात -
स्वर्गामध्ये गेला.
आता तुम्ही जाणता -
हे मुक्तिधाम आत्म्यांचे घर आहे; जसे इथे घर असते. भक्तिमार्गामध्ये जे खूप श्रीमंत
असतात, ते तर किती सुंदर मंदिरे बांधतात. शिवाचे मंदिर पहा कसे बांधले आहे.
लक्ष्मी-नारायणाचे देखील मंदिर बनवतात तर खरे दागिने इत्यादी किती असतात. खूप धन
असते. आता तर खोटे झाले आहे. तुम्ही देखील आधी किती खरे दागिने घालत होता. आता तर
गव्हर्मेंटच्या भीतीने खरे लपवून खोटे घालत राहतात. तिथे तर आहे सत्यच सत्य. असत्य
काहीच असत नाही. इथे खरे असूनही लपवून ठेवतात. दिवसेंदिवस सोने महाग होत राहते. तिथे
तर आहेच स्वर्ग. तुम्हाला सर्वकाही नवे मिळेल. नव्या दुनियेमध्ये सर्वकाही नवे,
अमाप धन होते. आता तर पहा प्रत्येक गोष्ट किती महाग झाली आहे. आता तुम्हा मुलांना
मुलवतन पासून सर्व रहस्य समजावून सांगितले आहे. मुलवतनचे रहस्य बाबांशिवाय कोण
समजावून सांगेल! तुम्हाला देखील मग टीचर बनायचे आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये देखील भले
रहा. कमलपुष्प समान पवित्र रहा. इतरांना देखील आप समान बनवाल तर खूप उच्च पद
प्राप्त करू शकता. इथे (मधुबनमध्ये) राहणाऱ्यांपेक्षाही ते उच्च पद मिळवू शकतात.
नंबरवार तर आहेतच, बाहेर राहून देखील विजयी माळेमध्ये ओवले जाऊ शकतात. साप्ताहिक
कोर्स करून मग भले विदेशात जा नाहीतर अजून कुठेही जा. साऱ्या दुनियेला संदेश देखील
मिळणार आहे. बाबा आले आहेत, फक्त म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा’. ते
बाबाच लिब्रेटर आहेत, गाईड आहेत. तिथे तुम्ही जाल तर वर्तमानपत्रात देखील खूप नाव
होईल. इतरांना देखील ही खूप सोपी गोष्ट वाटेल - आत्मा आणि शरीर दोन गोष्टी आहेत.
आत्म्यामध्येच मन-बुद्धी आहे, शरीर तर जड आहे. पार्टधारी आत्मा बनते. विशेषतावाली
चीज आत्मा आहे तर आता बाबांची आठवण करायची आहे. इथे राहणारे इतकी आठवण करत नाहीत,
जितकी बाहेरचे करतात. जे खूप आठवण करतात आणि आप समान बनवत राहतात, काट्यांना फूल
बनवत राहतात, ते उच्च पद मिळवतात. तुम्ही समजता आधी आम्ही देखील काटे होतो. आता
बाबांनी ऑर्डिनन्स (वटहुकूम) काढला आहे - काम महाशत्रू आहे, यावर विजय प्राप्त
केल्याने तुम्ही जगतजीत बनाल. परंतु लिहिल्याने कोणी समजतात थोडेच. आता बाबांनी
समजावून सांगितले आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) कायम ज्ञान
रत्न वेचणारे हंस बनायचे आहे, मोतीच वेचायचे आहेत. कचरा सोडून द्यायचा आहे.
प्रत्येक पावलागणिक पद्मांची कमाई जमा करून पद्मा-पदम भाग्यशाली बनायचे आहे.
२) उच्च पद प्राप्त
करण्यासाठी टीचर बनून अनेकांची सेवा करायची आहे. कमलपुष्प समान पवित्र राहून आप
समान बनवायचे आहे. काट्यांना फूल बनवायचे आहे.
वरदान:-
‘तुझे-माझे’च्या गोंधळाला समाप्त करून दयेची भावना इमर्ज करणारे मर्सीफुल भव
वेळोवेळी किती आत्मे
दुःखाच्या लाटेमध्ये येतात. प्रकृतीमध्ये थोडीजरी खळबळ माजली, आपत्ती आली तर अनेक
आत्मे तडफडतात, मर्सी, दया मागतात. तर अशा आत्म्यांची हाक ऐकून दयेची भावना इमर्ज
करा. पूज्य स्वरूप, दयाळूपणाचे रूप धारण करा. स्वतःला संपन्न बनवा तेव्हा ही दुःखाची
दुनिया पूर्ण होईल. आता परिवर्तनाच्या शुभ भावनेची लाट तीव्र-गतीने पसरवा तेव्हा
‘तुझे-माझे’चा गोंधळ समाप्त होईल.
बोधवाक्य:-
व्यर्थ
संकल्पांच्या हातोडीने समस्येचे दगड फोडण्या ऐवजी छलांग मारून समस्या रूपी डोंगराला
पार करणारे बना.