03-09-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - सत्य पंडा आलेले आहेत तुम्हाला खरी-खरी यात्रा शिकविण्यासाठी, तुमच्या
यात्रेमध्ये मुख्य आहे पवित्रता, आठवण करा आणि पवित्र बना”
प्रश्न:-
तुम्हा
मेसेंजर अथवा पैगंबरच्या मुलांना कोणत्या एका गोष्टीव्यतिरिक्त इतर कोणत्याही
गोष्टीमध्ये आरग्यु करायचे (वादविवाद करायचा) नाही आहे?
उत्तर:-
तुम्ही मेसेंजरची मुले सर्वांना हाच मेसेज द्या की स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची
आठवण करा तर या योग-अग्नीद्वारे तुमची विकर्म विनाश होतील. हीच फिकीर ठेवा, बाकी
इतर गोष्टींमध्ये जाण्यामध्ये काहीच फायदा नाही. तुम्हाला फक्त सर्वांना बाबांचा
परिचय द्यायचा आहे, ज्यामुळे ते आस्तिक बनतील. जेव्हा रचता बाबांना समजून घेतील
तेव्हा मग रचनेला समजणे सोपे होईल.
गीत:-
हमारे तीर्थ
न्यारे हैं...
ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुले जाणतात की आपण खरे तीर्थवासी आहोत. खरा पंडा आणि आपण त्यांची
मुले जी आहोत ती देखील खऱ्या तीर्थावर जात आहोत. हा आहे झूठ-खंड अथवा पतित खंड. आता
सच-खंड अथवा पावन खंडामध्ये जात आहोत. मनुष्य यात्रेवर जातात ना. कोणत्या-कोणत्या
खास यात्रा भरतात, जिथे कोणी कधीही जाऊ शकतात. ही देखील यात्रा आहे, यामध्ये जायचे
तेव्हा असते जेव्हा खरा पंडा स्वतः येतील. ते येतात कल्प-कल्पाच्या संगमावर. यामध्ये
ना थंडी, ना गरमीची गोष्ट आहे. ना धक्के खाण्याची कोणती गोष्ट आहे. ही तर आहे
आठवणीची यात्रा. त्या यात्रांवर संन्यासी सुद्धा जातात. खरी-खरी यात्रा करणारे जे
असतात ते पवित्र राहतात. तुमच्यामध्ये सर्वजण यात्रेवर आहेत. तुम्ही ब्राह्मण आहात.
खरे-खरे ब्रह्माकुमार-कुमारी कोण आहेत? जे कधीही विकारामध्ये जात नाहीत. पुरुषार्थी
तर जरूर आहेत. मनसा संकल्प भले येतील, मुख्य आहेच विकाराची गोष्ट. कोणी विचारले
निर्विकारी ब्राह्मण किती आहेत तुमच्याकडे? बोला, हे विचारण्याची गरजच नाही. या
गोष्टींमुळे तुमचे काय पोट भरणार. तुम्ही यात्री बना. यात्रा करणारे किती आहेत, हे
विचारल्याने कोणताही फायदा नाही आहे. ब्राह्मण तर कोणी खरे देखील आहेत, तर खोटे
देखील आहेत. आज खरे आहेत, उद्या खोटे बनतात. विकारामध्ये गेला तर ब्राह्मण नाही झाला.
मग शूद्रचा शुद्रच झाला. आज प्रतिज्ञा करतात उद्या विकारामध्ये पडून असुर बनतात. आता
या गोष्टी किती म्हणून समजावून सांगत बसायच्या. यामुळे काही पोट तर भरणार नाही अथवा
तोंडही गोड होणार नाही. इथे आम्ही बाबांची आठवण करतो आणि बाबांच्या रचनेच्या
आदि-मध्य-अंताला जाणतो. बाकी इतर गोष्टींमध्ये काहीही ठेवलेले नाही आहे. बोला, ‘इथे
बाबांची आठवण शिकवली जाते आणि पवित्रता आहे मुख्य’. जो आज पवित्र बनून मग पुन्हा
अपवित्र बनतो, तर तो ब्राह्मणच राहिलेला नाही. तो हिशोब कुठेपर्यंत बसून तुम्हाला
ऐकवणार. असे तर पुष्कळ मायेच्या तुफानामध्ये कोसळून जात असतील, म्हणून ब्राह्मणांची
माळा बनू शकत नाही. आम्ही तर पैगंबरची मुले पैगाम ऐकवतो, मेसेंजरची मुले मेसेज देतो.
स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा तर या योग-अग्नीद्वारे विकर्म विनाश होतील.
हीच फिकीर ठेवा. बाकी प्रश्न तर मनुष्य खंडीभर विचारतील. एक गोष्ट सोडून बाकी इतर
कोणत्याही गोष्टीमध्ये जाण्यात काहीच फायदा नाही. इथे तर हे जाणून घ्यायचे आहे की,
नास्तिक पासून आस्तिक, अनाथ पासून सनाथ कसे बनायचे, जेणेकरून धनी कडून वारसा मिळेल
- हे विचारा. बाकी सर्वजण पुरुषार्थी तर आहोत. विकाराच्या गोष्टीमध्येच खूप जण फेल
होतात. खूप दिवसानंतर पत्नीला बघतात तर मग काही विचारूच नका. कोणाला तर दारूची सवय
असते, तीर्थांवर जातील तर दारू अथवा बिडीची ज्यांना सवय असेल ते त्याच्या शिवाय राहू
शकणार नाहीत. लपवून सुद्धा पीत राहतात. आपण काय करू शकतो. खूप जण आहेत जे खरे बोलत
नाहीत. लपवत राहतात.
बाबा मुलांना युक्त्या
सांगतात की कसे युक्तीने उत्तर दिले पाहिजे. एका बाबांचाच परिचय द्यायचा आहे,
ज्यामुळे मनुष्य आस्तिक बनतील. पहिले जोपर्यंत बाबांना जाणून घेत नाहीत तोपर्यंत
कोणताही प्रश्न विचारणेच फालतू आहे. असे पुष्कळ येतात, समजत काहीच नाहीत. केवळ ऐकत
राहतात, फायदा काहीही नाही. बाबांना लिहितात - ‘हजार-दोन हजार आले’, त्यातून एक-दोन
समजून घेण्यासाठी येत असतात. ‘अमकी-अमकी मोठी व्यक्ती नियमित येत असते’, मी समजून
जातो, त्यांना जो परिचय मिळायला हवा आहे तो मिळालेला नाहीये. पूर्ण परिचय मिळेल
तेव्हाच तर समजतील हे तर बरोबर सांगत आहेत, आम्हा आत्म्यांचा पिता परमपिता परमात्मा
आहे, ते शिकवत आहेत. म्हणतात - ‘स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा. हा अंतिम जन्म
पवित्र बना’. जे पवित्र राहत नाहीत ते ब्राह्मण नाहीत, शूद्र आहेत. युद्धाचे मैदान
आहे. झाड वाढत राहील आणि वादळे सुद्धा येतील. अनेक पाने गळत राहतील. कोण मोजत बसणार
की खरे ब्राह्मण कोण आहेत? खरे ते जे कधीही शूद्र बनत नाहीत. जरा सुद्धा दृष्टी जाऊ
नये. शेवटी कर्मातीत अवस्था होते. खूप उच्च ध्येय आहे. मनसामध्ये देखील येता कामा
नये, ती अवस्था शेवटी होणार आहे. यावेळी एकाचीही अशी अवस्था नाही आहे. यावेळी सगळे
पुरुषार्थी आहेत. वर-खाली होत राहतात. मुख्य दृष्टीचीच गोष्ट आहे. आपण आत्मा आहोत,
या शरीराद्वारे पार्ट बजावत आहोत - हा अभ्यास पक्का झाला पाहिजे. जोपर्यंत रावण
राज्य आहे, तोपर्यंत युद्ध चालत राहील. शेवटाला कर्मातीत अवस्था होईल. पुढे जाऊन
तुम्हाला फिलिंग येईल (जाणीव होत जाईल), समजत जाल. आता तर झाड खूप छोटे आहे, वादळे
येतात, पाने गळून पडतात. जे कच्चे आहेत ते गळून जातात. प्रत्येकाने स्वतःला विचारा
- माझी अवस्था कितपत आहे? बाकी जे प्रश्न विचारतात त्या गोष्टींमध्ये जास्त जाऊच नका.
बोला, आम्ही बाबांच्या श्रीमतावर चालत आहोत. ते बेहदचे बाबा येऊन बेहदचे सुख देतात
अथवा नवीन दुनियेची स्थापना करतात. तिथे सुखच असते. जिथे मनुष्य राहतात त्यालाच
दुनिया म्हटले जाते. निराकारी दुनियेमध्ये आत्मे आहेत ना. हे कोणाच्याच बुद्धीमध्ये
नाहीये की आत्मा कशी बिंदू आहे. हे देखील अगोदरच कोणा नवीन येणाऱ्याला सांगायचे नाही.
सर्वात आधी तर हे समजावून सांगायचे आहे - बेहदचे बाबा बेहदचा वारसा देत आहेत. भारत
पावन होता, आता पतित आहे. कलियुगा नंतर पुन्हा सतयुग येणार आहे. हे तर बी.के. शिवाय
दुसरे कोणीही सांगू शकणार नाही. ही आहे नवीन रचना. बाबा शिकवत आहेत - हे विश्लेषण
लक्षात राहिले पाहिजे. काही अवघड गोष्ट नाहीये, परंतु माया विसरायला लावते, विकर्म
करायला लावते. अर्ध्याकल्पापासून विकर्म करण्याची सवय लागून राहिली आहे. त्या सर्व
आसुरी सवयी नष्ट करायच्या आहेत. बाबा स्वतः सांगतात - सर्वजण पुरुषार्थी आहेत.
कर्मातीत अवस्था प्राप्त करण्यासाठी खूप वेळ लागतो. ब्राह्मण कधी विकारामध्ये जात
नाहीत. युद्धाच्या मैदानामध्ये चालता-चालता हार पत्करतात. या प्रश्नांचा काही फायदा
नाही. पहिले आपल्या बाबांची तर आठवण करा. आम्हाला शिवबाबांनी कल्पापूर्वी प्रमाणे
आदेश दिला आहे की, ‘स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा’. हे तेच युद्ध आहे. पिता
एकच आहे, श्रीकृष्णाला काही पिता म्हणणार नाही. श्रीकृष्णाचे नाव घातले आहे. चुकीला
बरोबर करणारे बाबाच आहेत, तेव्हाच तर त्यांना ट्रुथ (सत्य) म्हटले जाते ना. यावेळी
तुम्ही मुलेच साऱ्या सृष्टीच्या रहस्याला जाणता. सतयुगामध्ये आहे डीटी डिनायस्टी (दैवी
कुळ). रावण राज्यामध्ये मग आहे आसुरी डिनायस्टी. संगमयुग स्पष्ट करून दाखवायचे आहे,
हे आहे पुरुषोत्तम संगमयुग. त्या बाजूला देवता, या बाजूला असुर. बाकी त्यांचे काही
युद्ध झालेले नाही आहे. युद्ध तुम्हा ब्राह्मणांचे आहे विकारांसोबत, याला देखील
युद्ध म्हणणार नाही. सर्वात मोठा आहे काम विकार, हा महाशत्रू आहे. यावर विजय
प्राप्त केल्यानेच तुम्ही जगतजीत बनाल. या विषासाठीच अबला मार खातात. अनेक प्रकारची
विघ्ने पडतात. मूळ गोष्ट आहे पवित्रतेची. पुरुषार्थ करता-करता, वादळे येता-येता
तुमचा विजय होईल. माया थकून जाईल. कुस्तीमध्ये जे पैलवान असतात, ते लगेच सामना
करतात. त्यांचा धंदाच आहे चांगल्या रीतीने लढून विजय प्राप्त करणे. पैलवानचे खूप
नाव होते. इनाम मिळते. तुमची तर ही आहे गुप्त गोष्ट.
तुम्ही जाणता आपण
आत्मे पवित्र होतो. आता अपवित्र बनलो आहोत पुन्हा पवित्र बनायचे आहे. हाच मेसेज
सर्वांना द्यायचा आहे आणि काही प्रश्न विचारले, तर तुम्हाला त्या गोष्टींमध्ये
जायचेच नाहीये. तुमचा आहेच रुहानी धंदा. आम्हा आत्म्यांमध्ये बाबांनी ज्ञान भरले
होते, त्यानंतर प्रारब्ध प्राप्त केली, ज्ञान संपून गेले. आता पुन्हा बाबा ज्ञान
भरत आहेत. बाकी नशेमध्ये रहा, बोला बाबांचा मेसेज देत आहोत की, ‘बाबांची आठवण करा
तर कल्याण होईल’. तुमचा धंदाच हा रुहानी आहे. सर्वात पहिली गोष्ट हीच आहे की बाबांना
जाणून घ्या. बाबाच ज्ञानाचा सागर आहेत. ते काही पुस्तकातले थोडेच ऐकवतात. जे डॉक्टर
ऑफ फिलॉसॉफी इत्यादी बनतात, ते लोक पुस्तके वाचतात. भगवान तर नॉलेजफूल आहेत. त्यांना
सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज आहे. ते काही शिकले आहेत का? ते तर सर्व
वेद-शास्त्र इत्यादींना जाणतात. बाबा म्हणतात - माझा पार्ट आहे तुम्हाला नॉलेज
समजावून सांगण्याचा. ज्ञान आणि भक्ती यातील फरक इतर कोणीही सांगू शकणार नाही. ही आहे
ज्ञानाची शिकवण. भक्तीला ज्ञान म्हटले जात नाही. सर्वांचे सद्गती दाता एक बाबाच
आहेत. वर्ल्डची हिस्ट्री जरूर रिपीट होणार. जुन्या दुनियेनंतर पुन्हा नवीन दुनिया
जरूर येणार आहे. तुम्ही मुले जाणता बाबा आम्हाला पुन्हा शिकवत आहेत. बाबा म्हणतात -
माझी आठवण करा, सर्व भर यावर द्यायचा आहे. बाबा जाणतात, खूप चांगली-चांगली नावाजलेली
मुले या आठवणीच्या यात्रेमध्ये खूप कमजोर आहेत आणि जी नावाजलेली नाहीत, बंधनात आहेत,
गरीब आहेत तीच खूप जास्त आठवणीच्या यात्रेमध्ये राहतात. प्रत्येकाने आपल्या मनाला
विचारावे - मी बाबांची किती वेळ आठवण करतो? बाबा म्हणतात - मुलांनो, जितके होईल
तितके तुम्ही माझी आठवण करा. आतून खूप हर्षित रहा. स्वयं भगवान शिकवत आहेत तर किती
आनंद झाला पाहिजे. बाबा म्हणतात - तुम्ही पवित्र आत्मे होता मग शरीर धारण करून
पार्ट बजावता-बजावता पतित बनला आहात. आता पुन्हा पवित्र बनायचे आहे. पुन्हा तोच दैवी
पार्ट बजावायचा आहे. तुम्ही दैवी धर्माचे आहात ना. तुम्हीच ८४ चे चक्र फिरला आहात.
सगळेच सूर्यवंशी थोडेच ८४ जन्म घेतात. मागाहून येत राहतात ना. नाहीतर पटकन सगळे
येतील. सकाळी लवकर उठून बुद्धीने काही काम करतील तर समजून जातील. मुलांनीच विचार
सागर मंथन करायचे आहे शिवबाबा तर करत नाहीत. ते तर म्हणतात - ड्रामा अनुसार जे काही
ऐकवतो, असेच समजा कल्पापूर्वी प्रमाणे जे समजावून सांगितले होते, तेच समजावून
सांगितले. मंथन तुम्ही करता. तुम्हीच इतरांना समजावून सांगायचे आहे, ज्ञान द्यायचे
आहे. हे ब्रह्मा देखील मंथन करतात. बी. के. ना मंथन करायचे आहे, शिवबाबांना नाही.
मुख्य गोष्ट आहे कोणाशीही जास्ती बोलायचे नाही. शास्त्रवादी आपसामध्ये वाद-विवाद
खूप करतात, तुम्हाला वाद-विवाद करायचा नाहीये. तुम्हाला केवळ संदेश द्यायचा आहे.
पहिले तर फक्त एका मुख्य गोष्टीवर समजावून सांगा आणि लिहून घ्या. सर्वप्रथम हा धडा
शिकवा की, कोण शिकवत आहेत, ते लिहा. ही गोष्ट तुम्ही शेवटी घेता म्हणून संशय येत
राहतो. निश्चय-बुद्धी न बनल्याकारणाने समजत नाहीत. केवळ म्हणतात - गोष्ट तर बरोबर
आहे. सर्वात अगोदर मुख्य गोष्ट हीच आहे - रचता बाबांना समजून घ्या नंतर रचनेचे
रहस्य समजून घेणे. मुख्य गोष्ट - गीतेचा भगवान कोण? तुमचा विजय सुद्धा यामध्ये
होणार आहे. सर्वप्रथम कोणता धर्म स्थापन झाला? जुन्या दुनियेला नवीन दुनिया कोण
बनवतात? बाबाच आत्म्यांना नवीन ज्ञान ऐकवतात, ज्यामुळे नवीन दुनिया स्थापन होते.
तुम्हाला बाबा आणि रचनेची ओळख मिळते. पहिल्यांदा तर ‘अल्फ’ विषयी (बाबांविषयी) पक्के
करवा तर बे बादशाही आहेच. बाबांकडूनच वारसा मिळतो. बाबांना जाणले आणि वारशाचा
अधिकारी बनला. बाळ जन्म घेते, आई-वडिलांना बघितले आणि बस पक्के होऊन जाईल.
आई-वडिलांशिवाय इतर कोणाजवळ जाणार देखील नाही कारण आईकडून दूध मिळते. हे देखील
ज्ञानाचे दूध मिळते. माता-पिता आहेत ना. या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत, लगेच कोणाला
समजू शकणार नाहीत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) खरा-खरा
पवित्र ब्राह्मण बनायचे आहे, कधी शूद्र (पतित) बनण्याचा मनसामध्ये देखील विचार येऊ
नये, थोडीसुद्धा दृष्टी जाऊ नये, अशी अवस्था बनवायची आहे.
२) बाबा जे शिकवत
आहेत, ते विश्लेषण लक्षात ठेवायचे आहे. विकर्म करण्याच्या ज्या आसुरी सवयी लागलेल्या
आहेत, त्यांना नष्ट करायचे आहे. पुरुषार्थ करत-करत संपूर्ण पवित्रतेच्या उच्च
ध्येयाला प्राप्त करायचे आहे.
वरदान:-
कारणाचे
निवारण करून चिंता आणि भीती यापासून मुक्त राहणारे मास्टर सर्वशक्तिमान भव
वर्तमान समयी
अल्पकालीन सुखासोबत चिंता आणि भीती या दोन गोष्टी तर आहेतच. जिथे चिंता आहे तिथे
चैन (आराम) असू शकत नाही. जिथे भय आहे तिथे शांती असू शकत नाही. तर सुखासोबत ही
दुःख, अशांतीची कारणे सुद्धा आहेतच. परंतु तुम्ही सर्व शक्तींच्या खजिन्यांनी
संपन्न मास्टर सर्वशक्तिमान मुले दुःखाच्या कारणाचे निवारण करणारे, प्रत्येक
समस्येचे समाधान करणारे समाधान स्वरूप आहात त्यामुळे चिंता आणि भीती यापासून मुक्त
आहात. कोणतीही समस्या तुमच्या समोर खेळ खेळण्यासाठी येते, घाबरवण्यासाठी नाही.
बोधवाक्य:-
आपल्या
वृत्तीला श्रेष्ठ बनवा तर तुमची प्रवृत्ती आपोआप श्रेष्ठ होईल.
अव्यक्त इशारे:- आता
लगनच्या (उत्कटतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा.
समयानुसार आता सर्व
ब्राह्मण आत्म्यांना समीप घेऊन येत ज्वाला स्वरूपाचे वायुमंडळ बनविण्याची सेवा करा,
त्यासाठी मग भट्ट्या करा किंवा आपसामध्ये संघटित होऊन रुहरिहान करा परंतु ज्वाला
स्वरूपाचा अनुभव करा आणि करवा, या सेवेला लागा तेव्हा छोट्या-छोट्या गोष्टी सहजच
परिवर्तित होतील.