03-11-24    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   25.10.2002  ओम शान्ति   मधुबन


“ब्राह्मण जीवनाचा आधार - प्युरिटीची रॉयल्टी”


आज स्नेहाचे सागर आपल्या स्नेही मुलांना पाहत आहेत. चोहो बाजूंची स्नेही मुले रुहानी (आत्मिक) सूक्ष्म धाग्यामध्ये बांधले गेलेले आपल्या स्वीट होममध्ये पोहोचले आहेत. जशी मुले स्नेहाने ओढली जाऊन पोहोचली आहेत तसे बाबा देखील मुलांच्या स्नेहाच्या धाग्यामध्ये बांधलेले मुलांच्या समोर पोहोचले आहेत. बापदादा पाहत आहेत की, चोहो बाजूंची मुले देखील दूर बसूनही स्नेहामध्ये एकरूप झाली आहेत. समोरच्या मुलांना देखील पाहत आहेत आणि दूर बसलेल्या मुलांना पाहून देखील हर्षित होत आहेत. हा रुहानी अविनाशी स्नेह, परमात्म स्नेह, आत्मिक स्नेह साऱ्या कल्पामध्ये आत्ता अनुभव करत आहात.

बापदादा प्रत्येक मुलाची पवित्रतेची रॉयल्टी पाहत आहेत. ब्राह्मण जीवनाची रॉयल्टी आहेच मुळी प्युरिटी. तर प्रत्येक मुलाच्या मस्तकावर रुहानी रॉयल्टीची निशाणी - प्युरिटीचा लाईटचा ताज बघत आहेत. तुम्ही देखील सर्व आपल्या प्युरिटीचा ताज, रुहानी रॉयल्टीचा ताज पाहत आहात का? मागे असणारे सुद्धा बघत आहेत ना? किती शोभिवंत ताजधारी सभा आहे. हो ना पांडव? ताज चमकत आहे ना! अशी सभा बघत आहात ना! कुमारी, ताजधारी कुमारी आहात ना! बापदादा बघत आहेत की मुलांची रॉयल फॅमिली किती श्रेष्ठ आहे! आपल्या अनादि रॉयल्टीला आठवा, जेव्हा तुम्ही आत्मे परमधाममध्ये असता तेव्हा देखील आत्मा रूपामध्ये सुद्धा तुमची रुहानी रॉयल्टी विशेष आहे. सर्वच आत्मे लाईटच्या रूपामध्ये आहेत परंतु तुमची चमक सर्व आत्म्यांमध्ये श्रेष्ठ आहे. आठवत आहे ना परमधाम? अनादि काळापासून तुमची झलक फलक (तेजस्वीपणा आणि नशा) अद्वितीय आहे. जसे आकाशामध्ये बघितले असेल सर्व चांदण्या चमकत असतात, सर्व लाईटच आहेत परंतु सर्व ताऱ्यांमधून काही विशेष ताऱ्यांची चमक वेगळी आणि सुंदर असते. अगदी तसेच सर्व आत्म्यांमध्ये तुम्हा आत्म्यांची चमक रुहानी रॉयल्टी, प्युरिटीची चमक अद्वितीय आहे. आठवते आहे ना? मग आदि काळामध्ये या, आदि काळाला आठवा तर आदि काळामध्ये देखील देवता स्वरूपामध्ये रुहानी रॉयल्टीची पर्सनॅलिटी किती विशेष होती? साऱ्या कल्पामध्ये देवता स्वरूपाची रॉयल्टी आणखी कोणाची राहिली आहे? रुहानी रॉयल्टी, प्युरिटीची पर्सनॅलिटी लक्षात आहे ना! पांडवांच्या सुद्धा लक्षात आहे का? आठवले का? मग मध्य काळामध्ये या; तर मध्यकाळ द्वापर पासून तुमची जी पूज्यनिय चित्र बनवतात, त्या चित्रांची रॉयल्टी आणि पूजेची रॉयल्टी द्वापर पासून आतापर्यंत कोणत्या चित्राची आहे? चित्र तर खूप जणांची आहेत परंतु अशी विधिपूर्वक पूजा इतर कोणत्या आत्म्यांची आहे? भले धर्मपिता आहेत, नेते आहेत, अभिनेते आहेत, चित्रे तर सर्वांची बनतात परंतु चित्रांची रॉयल्टी आणि पूजेची रॉयल्टी कोणाची पाहिली आहे? डबल फॉरेनर्सनी आपली पूजा पाहिली आहे? तुम्ही लोकांनी पाहिली आहे की फक्त ऐकले आहे? अशी विधिपूर्वक पूजा आणि चित्रांची चमक, रुहानियत दुसऱ्या कोणाचीही झालेली नाही आणि ना होणार. का बरे? प्युरिटीची रॉयल्टी आहे. प्युरिटीची पर्सनॅलिटी आहे. अच्छा, बघितली स्वतःची पूजा? बघितली नसेल तर पाहून घ्या. आता शेवटी संगमयुगावर या तर संगमावर सुद्धा साऱ्या विश्वामध्ये प्युरिटीची रॉयल्टी ब्राह्मण जीवनाचा आधार आहे. प्युरिटी नाही तर प्रभु प्रेमाचा अनुभव सुद्धा नाही. सर्व परमात्म प्राप्तींचा अनुभव नाही. ब्राह्मण जीवनाची पर्सनॅलिटी प्युरिटी आहे आणि प्युरिटीच रुहानी रॉयल्टी आहे. तर आदि-अनादि, आदि-मध्य आणि अंत साऱ्या कल्पामध्ये ही रुहानी रॉयल्टी चालत आलेली आहे.

तर स्वतःच स्वतःला पहा - आरसा तर तुम्हा सर्वांकडे आहे ना? आरसा आहे? बघू शकता? तर बघा - ‘माझ्यामध्ये प्युरिटीची रॉयल्टी किती पर्सेंटमध्ये आहे? माझ्या चेहऱ्यावरून प्युरिटीची झलक (पवित्रतेचे तेज) दिसून येते का? वर्तनामध्ये प्युरिटीची फलक (पवित्रतेची नशा) दिसून येते का? फलक अर्थात नशा. वर्तनामध्ये ती फलक अर्थात रुहानी नशा दिसून येतो का?’ बघितले स्वतःला? बघायला कितीसा वेळ लागतो? सेकंदच ना? तर सर्वांनी पाहिले स्वतःला?

कुमारीं सोबत:- झलक फलक (ते तेज आणि नशा) आहे? चांगले आहे, सर्वांनी उठा, उभे रहा. (कुमारी लाल पट्टा लावून बसल्या आहेत, ज्यावर लिहिले आहे - ‘एकव्रता’) सुंदर वाटते ना. एकव्रताचा अर्थच आहे प्युरिटीची रॉयल्टी. तर एकव्रतेचा पाठ पक्का केला आहे! तिथे जाऊन कच्चा होऊ द्यायचा नाही. आणि कुमार ग्रुप उठा. कुमारांचा ग्रुप सुद्धा चांगला आहे. कुमारांनी मनामध्ये प्रतिज्ञेचा पट्टा बांधला आहे, यांनी (कुमारींनी) तर बाहेरून पण बांधला आहे. प्रतिज्ञेचा पट्टा बांधला आहे की सदैव अर्थात निरंतर प्युरिटीच्या पर्सनॅलिटीमध्ये राहणारे कुमार आहात? असे आहे ना? बोला, जी हां. ना जी की हां जी? की तिथे जाऊन पत्र लिहिणार पट्टा थोडा ढिला झाला आहे! असे करू नका. जोपर्यंत ब्राह्मण जीवन जगायचे आहे तोपर्यंत संपूर्ण पवित्र रहायचेच आहे. असा वायदा आहे का? जर पक्का वायदा असेल तर हात हलवा. टी. व्ही. मध्ये तुमचे फोटो निघत आहेत. जो ढिला होईल ना त्याला हे चित्र पाठवणार! त्यामुळे ढिले होऊ नका, पक्के रहा. हां पक्के आहेत, पांडव तर पक्के असतात. पक्के पांडव, खूप छान.

प्युरिटीची वृत्ती आहे - शुभ भावना, शुभ कामना. कोणी कसाही असेल परंतु पवित्र वृत्ती अर्थात शुभ भावना, शुभ कामना आणि पवित्र दृष्टी अर्थात सदैव प्रत्येकाला आत्मिक रूपामध्ये पाहणे किंवा फरिश्ता रूपामध्ये पाहणे. तर वृत्ती, दृष्टी आणि तिसरे आहे कृती अर्थात कर्मामध्ये, तर कर्मामध्ये देखील सदैव प्रत्येक आत्म्याला सुख देणे आणि सुख घेणे. ही आहे प्युरिटीची निशाणी. वृत्ती, दृष्टी आणि कृती तिन्हीमधे ही धारणा असावी. कोणी काहीही करत असेल, दुःख जरी देत असेल, इन्सल्ट सुद्धा करत असेल, परंतु आपले कर्तव्य काय आहे? काय दुःख देणाऱ्याला फॉलो करायचे आहे की बापदादांना फॉलो करायचे आहे? फॉलो फादर आहे ना! तर ब्रह्मा बाबांनी दुःख दिले का सुख दिले? सुख दिले ना! तर तुम्हा मास्टर ब्रह्मा अर्थात ब्राह्मण आत्म्यांना काय करायचे आहे? कोणी दुःख दिले तर तुम्ही काय करणार? दुःख देणार? नाही देणार? खूप दुःख दिले तर? खूप शिव्या दिल्या, खूप अपमान केला, तर थोडेतरी फील होईल (वाईट वाटेल) की नाही? कुमारी तुम्हाला वाईट वाटेल का? थोडेसे. तर फॉलो फादर. हा विचार करा की माझे कर्तव्य काय आहे! त्याचे कर्तव्य पाहून आपले कर्तव्य विसरू नका. तो शिव्या देत आहे, तुम्ही सहनशीलतेची देवी, सहनशीलतेचा देव बना. तुमच्या सहनशीलतेमुळे शिव्या देणारे सुद्धा तुमची गळा भेट घेतील. सहनशीलतेमध्ये इतकी शक्ती आहे, परंतु थोडा वेळ सहन करावे लागते. तर सहनशीलतेचे देव आणि देवी आहात ना? आहात? नेहमी हे लक्षात ठेवा - ‘मी सहनशीलतेचा देवता आहे’, ‘मी सहनशीलतेची देवी आहे’. तर देवता अर्थात देणारा दाता, कोणी शिव्या देतो, आदर ठेवत नाही - हा तर कचरा आहे ना की चांगली वस्तू आहे? तर तुम्ही घेता कशाला? कचरा घेतला जातो का? कोणी तुम्हाला कचरा दिला तर तुम्ही घ्याल का? नाही घेणार ना. तर तुमचा आदर करत नाही, इन्सल्ट करतो, शिवी देतो, तुम्हाला डिस्टर्ब करतो, तर हे काय आहे? या चांगल्या गोष्टी आहेत का? तर मग तुम्ही घेता कशाला? थोडेसे तरी घेताच आणि नंतर विचार करता घ्यायला नको होते. तर आता घ्यायचे नाही. घेणे अर्थात मनामध्ये धारण करणे, फील करणे (वाईट वाटणे). तर आपल्या अनादि काळातील, आदि काळातील, मध्य काळातील, संगम काळातील, संपूर्ण कल्पातील प्युरिटीच्या रॉयल्टीला, पर्सनॅलिटीला आठवा. कोणी काहीही करू दे तुमच्या पर्सनॅलिटीला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हा रुहानी नशा आहे ना? आणि डबल फॉरेनर्सना तर डबल नशा आहे ना! डबल नशा आहे ना? सर्व गोष्टींचा डबल नशा. प्युरिटीचा सुद्धा डबल नशा, सहनशील देवी-देवता बनण्याचा देखील डबल नशा. आहे ना डबल? फक्त अमर रहा. ‘अमर भव’चे वरदान कधीही विसरू नका.

अच्छा - जे प्रवृत्तीवाले अर्थात युगल; तसे राहतात सिंगल, परंतु म्हणताना युगल म्हटले जाते, ते उठा. उभे रहा. युगल तर खूप आहेत, कुमार, कुमारी तर थोडे आहेत. कुमारांपेक्षा तर युगल खूप आहेत. तर युगलमूर्त तुम्हा सर्वांना बापदादांनी प्रवृत्तीमध्ये राहण्याचे डायरेक्शन का दिले आहे? तुम्हाला युगल म्हणून राहण्याची सूट का दिली आहे? प्रवृत्तीमध्ये राहण्याची सूट का दिली आहे, माहित आहे का? कारण युगल रूपामध्ये राहून या महामंडलेश्वरांना पायावर झुकवायचे आहे. आहे इतकी हिम्मत? ते लोक म्हणतात की, ‘एकत्र राहून पवित्र राहणे अवघड आहे’ आणि तुम्ही काय म्हणता? कठीण आहे की सोपे आहे? (खूप सोपे आहे) पक्के आहे? का कधी इझी, कधी लेझी? म्हणून बापदादांनी ड्रामा नुसार तुम्हा सर्वांना दुनियेच्या समोर, विश्वाच्या समोर एक उदाहरण बनवले आहे. चॅलेंज करण्याकरिता. तर प्रवृत्तीमध्ये राहत असून देखील निवृत्त, अपवित्रतेपासून निवृत्त राहू शकता ना? तर चॅलेंज करणारे आहात ना? तुम्ही सर्व चॅलेंज करणारे आहात, थोडे-थोडे घाबरत तर नाही ना, चॅलेंज तर केले परंतु माहित नाही काय होईल! तर चॅलेंज करा विश्वाला कारण नवीन गोष्ट हीच आहे की, एकत्र राहून देखील स्वप्नात सुद्धा अपवित्रतेचा संकल्प येऊ नये, हीच संगमयुगातील ब्राह्मण जीवनाची विशेषता आहे. तर असे विश्वाच्या शोकेस मधील तुम्ही उदाहरण आहात, सॅम्पल म्हणा एक्झाम्पल म्हणा. तुम्हाला पाहूनच सर्वांमध्ये ताकद येईल की आम्ही सुद्धा बनू शकतो. ठीक आहे ना? शक्तींनो बरोबर आहे ना? पक्के आहात ना? कच्चे पक्के असे तर नाही ना? पक्के. बापदादा देखील तुम्हाला पाहून खुश आहेत. मुबारक असो. पहा किती आहेत? खूप छान.

बाकी राहिल्या टीचर्स. टीचर्स शिवाय तर गती नाही. टीचर्स उठा. अच्छा - पांडव सुद्धा चांगले-चांगले आहेत. व्वा! टीचर्सची विशेषता आहे की प्रत्येक टीचरच्या फिचर मधून फ्युचर दिसावे (चेहऱ्यावरून भविष्य दिसावे). किंवा प्रत्येक टीचरच्या फिचर मधून फरिश्ता स्वरूप दिसावे. अशा टीचर्स आहात ना! तुम्हा फरिश्त्यांना पाहून आणखीन फरिश्ते बनावेत. पहा किती टीचर्स आहेत. फॉरेन ग्रुपमध्ये टीचर्स खूप आहेत. आता तर थोड्या आल्या आहेत. ज्या आलेल्या नाहीत त्यांची देखील बापदादा आठवण करत आहेत. चांगले आहे, आता टीचर्स मिळून हा प्लॅन बनवा की, आपल्या चलन आणि चेहेऱ्यातून बाबांना प्रत्यक्ष कसे करता येईल? दुनियावाले म्हणतात - परमात्मा सर्वव्यापी आहे आणि तुम्ही म्हणता - नाही. परंतु बापदादा म्हणतात की आता समयानुसार प्रत्येक टीचरमध्ये बाबा प्रत्यक्ष दिसून आले म्हणजे सर्वव्यापीच दिसतील ना! ज्याला पहावे त्याच्यामध्ये बाबाच दिसावेत. आत्मा, परमात्म्या समोर लपून जावी आणि परमात्माच दिसून यावेत. असे होऊ शकते का? अच्छा याची डेट कोणती? डेट तर फिक्स व्हायला हवी ना? तर याची डेट कोणती आहे? किती वेळ हवा? (आतापासून चालू करणार) चालू करणार, चांगली हिम्मत आहे, किती वेळ हवा? २००२ तर चालू आहे; आता दोन हजार कधी पर्यंत? तर टीचर्सना हेच अटेंशन ठेवायचे आहे की बस्स, आता मी बाबांमध्ये एकरूप झालेली दिसून यावी. माझ्याद्वारे बाबा दिसून यावेत. प्लॅन बनवणार ना! डबल विदेशी मिटिंग करण्यामध्ये तर हुशार आहेत? आता ही मिटिंग करा, ही मिटिंग केल्याशिवाय जायचे नाही की कसे आम्हा एकेका मधून बाबा दिसून येतील. आता ब्रह्माकुमारी दिसून येतात, ब्रह्माकुमारी खूप चांगल्या आहेत परंतु यांचे बाबा किती चांगले आहेत, ते दिसून यावे. तेव्हाच तर विश्व परिवर्तन होणार ना! तर डबल विदेशी या प्लॅनला प्रॅक्टिकलमध्ये सुरु करणार ना! करणार? पक्के. अच्छा. तर तुमची दादी आहे ना, त्यांची आशा पूर्ण होईल. ठीक आहे ना? अच्छा.

पहा, डबल विदेशी किती सेवाधारी आहात, तुमच्यामुळे सर्वांना प्रेमपूर्वक आठवण मिळत आहे. बापदादांना देखील डबल विदेशींवर जास्त तर नाही म्हटले जाणार परंतु स्पेशल प्रेम आहे. का प्रेम आहे? कारण डबल विदेशी आत्मे जे सेवेच्या निमित्त बनले आहेत, ते विश्वाच्या कानाकोपऱ्यामध्ये बाबांचा संदेश पोहोचवण्याच्या निमित्त बनले आहेत. नाही तर विदेशातील चोहो बाजूचे आत्मे तहानलेले राहीले असते. आता बाबांना दोष तर देणार नाहीत की, ‘भारतामध्ये आले, विदेशामध्ये का संदेश दिला नाही’. तर बाबांना दोषमुक्त ठेवण्यासाठी निमित्त बनले आहात. आणि जनकला (जानकी दादींना) तर उमंग खूप आहे, कोणताही देश राहून जायला नको. चांगले आहे. बाबांना दोष तरी देणार नाहीत ना! परंतु तुम्ही (दादी जानकी) साथीदारांना खूप थकवता. थकवतात ना! जयंती, थकवत नाहीत? परंतु या थकण्यामध्ये देखील आनंद सामावलेला असतो. सुरुवातीला असे वाटते की, हे काय पुन्हा-पुन्हा करायचे आहे, परंतु जेव्हा भाषण करून आशीर्वाद घेऊन येता ना तेव्हा चेहेरा बदलून जातो. छान आहे, दोन्ही दादींमध्ये उमंग-उत्साह वाढविण्याची विशेषता आहे. या शांत बसू शकत नाहीत. सेवा अजून राहिली तर आहे ना? जर नकाशा घेऊन पाहाल मग भारतामध्ये असो किंवा विदेशामध्ये जर नकाशामध्ये एक-एक स्थानाला टिक करत जाल तर दिसून येईल की अजूनही बाकी आहेत म्हणून बापदादा खुश देखील होतात आणि सांगत सुद्धा आहेत की जास्त थकवू नका. तुम्ही सर्व सेवेमध्ये खुश आहात ना! आता या कुमारी सुद्धा टीचर बनतील ना. ज्या टीचर आहेत त्या तर आहेतच परंतु ज्या टीचर नाहीत त्या टीचर बनून कोणते ना कोणते सेंटर सांभाळतील ना. हॅन्ड्स बनणार ना! डबल विदेशी मुलांना दोन्ही कामे करण्याचा अभ्यास तर आहेच. नोकरी सुद्धा करतात सेंटर सुद्धा सांभाळतात, म्हणून बापदादा डबल मुबारक सुद्धा देतात. अच्छा.

चोहो बाजूच्या अति स्नेही, अति समीप सदैव आदि काळापासून आता पर्यंत रॉयल्टीचे अधिकारी, सदैव आपल्या चेहेऱ्यामधून आणि वर्तनामधून प्युरिटीची झलक दाखविणाऱ्या, सदैव स्वतःला सेवा आणि आठवणीमध्ये तीव्र पुरुषार्था द्वारे नंबरवन बनविणाऱ्या, सदैव बाप समान सर्व शक्ती, सर्वगुण संपन्न स्वरूपामध्ये राहणाऱ्या, अशा सर्व बाजूंच्या प्रत्येक मुलाला बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

विदेशच्या मुख्य टीचर्स बहिणींसोबत संवाद:- सर्वांनी सेवेचे चांगले-चांगले प्लॅन बनवले आहेत ना; कारण सेवा समाप्त होईल तेव्हा तुमचे राज्य येणार. तर सेवेचे साधन सुद्धा जरुरी आहे. परंतु सेवा मनसा देखील असावी, वाचा देखील असावी, एकत्र हवी. सेवा आणि स्व-उन्नती दोन्ही सोबत हवे. अशी सेवा सफलतेला समीप आणते. तर सेवेच्या निमित्त तर आहातच आणि सर्व आपापल्या ठिकाणी सेवा तर चांगली करतही आहात. बाकी आता जे काम दिले आहे, त्याचा प्लॅन बनवा. त्यासाठी काय-काय स्वतःमध्ये किंवा सेवेमध्ये वृद्धी व्हायला हवी, ॲडिशन हवे, त्याचा प्लॅन बनवा. बाकी बापदादा सेवाधारींना पाहून खुश तर होतातच. सर्व सेवाकेंद्रांची चांगली उन्नती होत आहे ना! उन्नती होतेय ना? चांगले आहे. ठीक चालले आहे ना. होत आहे आणि होत राहणार आहे. आता फक्त जे वेग-वेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहेत, त्यांचे संघटन करून त्यांना पक्के करा. प्रॅक्टिकल प्रमाण सर्वांना समोर दाखवा. भले तुम्ही कोणतीही सेवा करत असाल, वेग-वेगळे प्लॅन बनवता, करत देखील आहात, चांगले चालत सुद्धा आहात, आता त्या सर्वांचा एक ग्रुप समोर आणा. जेणेकरून सेवेचा पुरावा सर्व ब्राह्मण परिवारासमोर येईल. ठीक आहे ना! बाकी सगळे ठीक आहात, एकदम मस्त आहात. अच्छा. ओम् शांती.
 

वरदान:-
तीन स्मृतींच्या तिलकाद्वारे श्रेष्ठ स्थिती बनविणारे अचल-अडोल भव

बापदादांनी सर्व मुलांना तीन स्मृतींचा तिलक दिला आहे, एक ‘स्व’ची स्मृती नंतर ‘बाबां’ची स्मृती आणि श्रेष्ठ कर्मासाठी ‘ड्रामा’ची स्मृती. ज्यांना या तीन स्मृती सदैव आहेत त्यांची स्थिती देखील श्रेष्ठ आहे. आत्म्याच्या स्मृती सोबत बाबांची स्मृती आणि बाबांसोबत ड्रामाची स्मृती अति आवश्यक आहे; कारण कर्मामध्ये जर ड्रामाचे ज्ञान असेल तर स्थिती कधीही वर-खाली होणार नाही. ज्या काही वेगवेगळ्या परिस्थिती येतात, त्यामध्ये अचल-अडोल रहाल.
 

सुविचार:-
दृष्टीला अलौकीक, मनाला शीतल आणि बुद्धीला दयाळू बनवा.