03-11-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा आले आहेत व्हाईसलेस दुनिया बनविण्याकरिता, तुमचे कॅरॅक्टर (चारित्र्य) सुधारण्यासाठी, तुम्ही भाऊ-भाऊ आहात तर तुमची दृष्टी अतिशय शुद्ध असली पाहिजे”

प्रश्न:-
तुम्ही मुले निश्चिंत बादशहा आहात तरी देखील तुम्हाला एक मुख्य काळजी अवश्य असायला हवी - ती कोणती?

उत्तर:-
आपण पतितापासून पावन कसे बनावे - ही आहे मुख्य काळजी. असे होऊ नये की बाबांचे बनूनही मग बाबांसमोर सजा खावी लागेल. सजे पासून वाचण्याची काळजी रहावी, नाही तर त्यावेळी खूप लाज वाटेल. बाकी तुम्ही निश्चिंत बादशहा आहात, सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे. ज्याला समजते तर तो बेहदचा मालक बनतो, ज्याला समजत नाही तर ते त्याचे नशीब. तुम्हाला त्याची चिंता नाही.

ओम शांती।
रूहानी बाबा ज्यांचे नाव शिव आहे, ते बसून आपल्या मुलांना समजावून सांगत आहेत. रुहानी पिता सर्वांचे एकच आहेत. सर्वप्रथम ही गोष्ट समजावून सांगायची आहे म्हणजे मग पुढचे समजावून सांगणे सोपे होईल. जर बाबांचा परिचयच मिळाला नाही तर मग प्रश्न करत राहतील. सर्वप्रथम तर हा निश्चय पक्का करून घ्यायचा आहे. साऱ्या दुनियेला हेच ठाऊक नाही आहे की गीतेचा भगवान कोण आहे. ते श्रीकृष्णासाठी म्हणतात; आपण म्हणतो - परमपिता परमात्मा शिव गीतेचे भगवान आहेत. तेच ज्ञानाचे सागर आहेत. मुख्य आहे सर्व शास्त्र मई शिरोमणी गीता. भगवंतासाठीच म्हणतात - ‘हे प्रभू तेरी गत मत न्यारी’. श्रीकृष्णासाठी असे म्हणणार नाहीत. बाबा जे सत्य आहेत ते जरूर सत्यच सांगतील. दुनिया पहिली नवीन सतोप्रधान होती. आता दुनिया जुनी तमोप्रधान आहे. दुनियेला बदलविणारे एक बाबाच आहेत. बाबा दुनियेला कसे बदलतात ते देखील समजावून सांगितले पाहिजे. आत्मा जेव्हा सतोप्रधान बनेल तेव्हा दुनिया देखील सतोप्रधान स्थापन होईल. सर्वात अगोदर तुम्हा मुलांना अंतर्मुखी बनायचे आहे. जास्त बडबड करायची नाही. आतमध्ये (प्रदर्शनीमध्ये) येतात तर खूप चित्रे पाहून विचारतच राहतात. सर्वात आधी एकच गोष्ट समजावून सांगितली पाहिजे. जास्त विचारण्याची संधीच मिळू नये. बोला, पहिले तर एका गोष्टीवर निश्चय पक्का करा मग पुढचे सांगतो; त्यानंतर मग तुम्ही पुढे ८४ च्या चक्रावर सांगण्यासाठी घेऊन येऊ शकता. बाबा म्हणतात - मी यांच्या अनेक जन्मांच्या अंताला प्रवेश करतो. यांनाच (ब्रह्मा बाबांनाच) बाबा म्हणतात - तू आपल्या जन्मांना जाणत नाहीस. बाबा आपल्याला प्रजापिता ब्रह्मा द्वारे समजावून सांगतात. सर्वप्रथम अल्फ वरच समजावून सांगतात. अल्फ समजल्याने मग कोणता संशय राहणार नाही. बोला - बाबा सत्य आहेत, ते कधी असत्य ऐकवणार नाहीत. बेहदचे बाबाच राजयोग शिकवतात. शिवरात्री गायली जाते तर जरूर शिव इथे आले असतील ना. जसे श्रीकृष्ण जयंती देखील इथे साजरी करतात. म्हणतात - मी ब्रह्मा द्वारे स्थापना करतो. त्या एका निराकार पित्याचीच सर्व मुले आहेत. तुम्ही देखील त्यांची संतान आहात आणि प्रजापिता ब्रह्माची देखील संतान आहात. प्रजापिता ब्रह्मा द्वारे स्थापना केली आहे तर जरूर ब्राह्मण-ब्राह्मणी असतील. बहिण-भाऊ झाले, यामध्ये पवित्रता असते. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना पवित्र राहण्याची ही आहे युक्ती. बहिण-भाऊ आहोत तर कधी क्रिमिनल दृष्टी (विकारी दृष्टी) असता कामा नये. २१ जन्म दृष्टी सुधारते. बाबाच मुलांना शिकवण देतील ना. कॅरॅक्टर (चारित्र्य) सुधारतात. आता संपूर्ण दुनियेचे कॅरॅक्टर सुधारणार आहे. या जुन्या पतित दुनियेमध्ये कसलेच कॅरॅक्टर (चारित्र्य) नाहीये. सर्वांमध्ये विकार आहेत. ही आहेच पतित विशश (पतित विकारी) दुनिया. मग व्हाइसलेस दुनिया कशी बनेल? बाबांशिवाय कोणीही बनवू शकणार नाही? आता बाबा पवित्र बनवत आहेत. या आहेत सर्व गुप्त गोष्टी. आपण आत्मा आहोत, आत्म्याला परमात्मा बाबांना भेटायचे आहे. सर्व पुरुषार्थ करतातच भगवंताला भेटण्यासाठी. भगवान एक निराकार आहेत. लिबरेटर, गाईड देखील परमात्म्यालाच म्हटले जाते. इतर कोणत्याही धर्मस्थापकांना लिबरेटर, गाईड म्हणता येणार नाही. परमपिता परमात्माच येऊन लिबरेट करतात अर्थात तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनवतात. गाईड (मार्गदर्शन) देखील करतात तर सगळ्यात पहिली ही एकच गोष्ट त्यांच्या बुद्धीमध्ये पक्की करा. जर समजत नसेल तर सोडून द्या. जर ‘अल्फ’ (बाबाच) समजत नसेल तर ‘बे’ (बादशाही) विषयी सांगून काय फायदा, भले त्यांना जाऊ देत. तुम्ही गोंधळून जाऊ नका. तुम्ही निश्चिंत बादशहा आहात. असुरांची विघ्ने पडणारच आहेत. हा आहेच रुद्र ज्ञान यज्ञ. तर सर्वप्रथम बाबांचा परिचय द्यायचा आहे. बाबा म्हणतात - मनमनाभव. जितका पुरुषार्थ कराल त्यानुसार पद प्राप्त कराल. आदि सनातन देवी-देवता धर्माचे राज्य स्थापन होत आहे. या लक्ष्मी-नारायणाची डिनायस्टी (घराणे) आहे. इतर धर्म स्थापक काही डिनायस्टी स्थापन करत नाहीत. बाबा तर येऊन सर्वांना मुक्त करतात. मग आपापल्या वेळे अनुसार बाकी इतर धर्मस्थापकांना येऊन आपापला धर्म स्थापन करायचा आहे. वृद्धी होणार आहे. पतित बनायचेच आहे. पतितापासून पावन बनविणे हे तर बाबांचेच काम आहे. ते (इतर धर्मस्थापक) तर येऊन केवळ धर्म स्थापन करतात. त्यात काही मोठेपणाची गोष्टच नाहीये. महिमा आहेच एकाची. ते तर क्राइस्टसाठी किती करतात. त्यांना देखील हे समजावून सांगितले पाहिजे की लिबरेटर, गाईड तर एक गॉडफादरच आहेत. क्राईस्टच्या मागून तर ख्रिश्चन धर्माचे आत्मे येत राहतात, खाली उतरत राहतात. दुःखातून सोडविणारे तर एक बाबाच आहेत. हे सर्व पॉईंट्स बुद्धीमध्ये चांगल्या रीतीने धारण करायचे आहेत. एका गॉडलाच मर्सीफुल (दयाळू) म्हटले जाते. एकही मनुष्य कोणावर मर्सी (दया) करत नाही. मर्सी (दया) असते बेहदची. एक बाबाच सर्वांवर दया करतात. सतयुगामध्ये सर्वजण सुख-शांतीमध्ये राहतात. दुःखाची गोष्टच नाही. मुले ‘अल्फ’ या एका गोष्टीवर कोणाचा निश्चय पक्का करून घेत नाहीत, बाकी इतर गोष्टींमध्ये जातात (बाकीच्याच गोष्टी सांगत बसतात) आणि मग म्हणतात गळाच खराब झाला. सर्वप्रथम बाबांचा परिचय द्यायचा आहे. तुम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये जाऊच नका. बोला, बाबा तर खरे तेच सांगतील ना. आम्हा बी. कें. ना बाबाच सांगतात. ही सर्व चित्रे त्यांनीच (बाबांनीच) बनवून घेतली आहेत, यामध्ये शंका येता कामा नये. संशय बुद्धी विनशन्ती. पहिले तुम्ही स्वतःला आत्मा समजून बाबांना आठवण करा तर विकर्म विनाश होतील. दुसरा कोणताही उपाय नाही. पतित-पावन तर एक बाबाच आहेत ना. बाबा म्हणतात - देहाचे सर्व संबंध सोडून मामेकम् (मज एकाची) आठवण करा. बाबा ज्यांच्यामध्ये प्रवेश करतात, त्यांना देखील मग पुरुषार्थ करून सतोप्रधान बनायचे आहे. बनणार तर पुरुषार्थाद्वारेच आणि मग ब्रह्मा आणि विष्णूचे कनेक्शन देखील सांगतात. बाबा तुम्हा ब्राह्मणांना राजयोग शिकवतात तर तुम्ही विष्णुपुरीचे मालक बनता. मग तुम्हीच ८४ जन्म घेऊन अंताला शूद्र बनता. मग पुन्हा बाबा येऊन शूद्रापासून ब्राह्मण बनवतात. दुसरे कोणीही असे समजावून सांगू शकणार नाही. सर्वात पहिली गोष्ट आहे बाबांचा परिचय देणे. बाबा म्हणतात - मलाच पतितांना पावन बनविण्यासाठी इथे यावे लागते. असे नाही की वरून प्रेरणा देतो. यांचे (ब्रह्मा बाबांचे) नावच आहे - ‘भागीरथ’. तर जरूर यांच्यामध्येच प्रवेश करतील. हा आहे देखील अनेक जन्मांच्या अंताचा जन्म. पुन्हा सतोप्रधान बनतात. त्यासाठी बाबा युक्ती सांगतात की, स्वतःला आत्मा समजून मामेकम् (मज एकाची) आठवण करा. मीच सर्वशक्तिमान आहे. माझी आठवण केल्याने तुमच्यामध्ये शक्ती येईल. तुम्ही विश्वाचे मालक बनाल. हा लक्ष्मी-नारायणाचा वारसा यांना बाबांकडून मिळाला आहे. कसा मिळाला ते समजावून सांगतात. प्रदर्शनी, म्युझियम इत्यादी ठिकाणी देखील तुम्ही सांगा की अगोदर ही एक गोष्ट समजून घ्या, नंतर इतर गोष्टींमध्ये जा. हे समजणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर तुम्ही दुःखातून सुटू शकणार नाही. अगोदर तुमचा निश्चय जोपर्यंत पक्का होत नाही तोपर्यंत काहीच समजू शकणार नाही. यावेळी आहेच भ्रष्टाचारी दुनिया. देवी-देवतांची दुनिया श्रेष्ठाचारी होती. अशा प्रकारे समजावून सांगायचे आहे. लोकांची नाडी (अवस्था) देखील पाहिली पाहिजे; काही समजते आहे की फक्त तवाई (वेड्यासारखा) उभा आहे? जर तवाई असेल तर मग सोडून दिले पाहिजे. वेळ वाया घालवता कामा नये. चात्रकाला, पात्र व्यक्तीला पारखण्यासाठी देखील बुद्धी पाहिजे. जो समजणारा असेल त्याचा चेहराच बदलून जाईल. सर्वप्रथम तर आनंदाची गोष्ट सांगायची आहे. बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा मिळतो ना. बाबा जाणतात आठवणीच्या यात्रेमध्ये मुले खूप आळशी आहेत. बाबांची आठवण करण्याची मेहनत करायची आहे. त्यामध्येच माया खूप विघ्न आणते. हा देखील खेळ बनलेला आहे. बाबा बसून समजावून सांगतात की, कसा हा खेळ पूर्व-नियोजित आहे. दुनियेतील मनुष्य तर थोडेसुद्धा जाणत नाहीत.

बाबांच्या आठवणीमध्ये राहिल्याने तुम्ही कोणालाही समजावून सांगताना देखील एकाग्र व्हाल, नाहीतर काही ना काही कमी काढत राहतील. बाबा म्हणतात - तुम्ही जास्त काही त्रास घेऊ नका. स्थापना तर जरूर होणारच आहे. भावीला कोणीही टाळू शकत नाही. उल्हासामध्ये राहिले पाहिजे. बाबांकडून आपण बेहदचा वारसा घेत आहोत. बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. खूप प्रेमाने बसून समजावून सांगायचे आहे. बाबांची आठवण करत असताना प्रेमामध्ये अश्रू आले पाहिजेत. बाकीची सगळी नाती आहेत कलियुगी. हे आहे रूहानी बाबांचे नाते. हे तुमचे अश्रू देखील विजयी माळेचे मणी बनतात. असे फार थोडे आहेत - जे असे प्रेमाने बाबांची आठवण करतात. प्रयत्न करून जितके शक्य होईल आपला वेळ काढून आपल्या भविष्याला श्रेष्ठ बनवले पाहिजे. प्रदर्शनीमध्ये इतकी जास्त मुले असता कामा नये. ना इतक्या चित्रांची आवश्यकता आहे. एक नंबरचे चित्र आहे - गीतेचे भगवान कोण? त्याच्या बाजूला लक्ष्मी-नारायणाचे, आणि मग शिडीचे. बस्स. बाकी इतक्या साऱ्या चित्रांची काही गरज नाही. तुम्हा मुलांनी जितके शक्य होईल आठवणीच्या यात्रेला वाढवायचे आहे. मुख्य चिंता हीच करायची आहे की पतितापासून पावन कसे बनावे! बाबांचे बनून आणि मग बाबांसमोर जाऊन सजा खावी लागणे ही तर अगदीच दुर्दैवाची गोष्ट आहे. आता जर आठवणीच्या यात्रेवर राहिला नाहीत तर मग बाबांसमोर सजा खाते वेळी खूपच लाज वाटेल. सजा भोगावी लागता कामा नये, याची जास्त काळजी घ्यायची आहे. तुम्ही ‘रूप’ देखील आहात, ‘बसंत’ देखील आहात. बाबा देखील म्हणतात - मी ‘रुप’ देखील आहे, तर ‘बसंत’ देखील आहे. छोटीशी बिंदू आहे आणि मग ज्ञानाचा सागर देखील आहे. तुमच्या आत्म्यामध्ये सर्व ज्ञान भरत आहेत. ८४ जन्मांचे सारे रहस्य तुमच्या बुद्धीमध्ये आहे. तुम्ही ज्ञानाचे स्वरूप बनून ज्ञानाची वर्षा करता. ज्ञानाचे एक-एक रत्न किती अमूल्य आहे, याचे मूल्य कोणीही करू शकत नाही म्हणून बाबा म्हणतात - पद्मा-पदम भाग्यशाली. तुमच्या चरणांवर पद्मांची निशाणी सुद्धा दाखवतात, याला कोणीही समजू शकत नाही. मनुष्य पद्मपती नाव ठेवतात. समजतात की यांच्याकडे पुष्कळ धन आहे. ‘पद्मपती’ असे एक सरनेम देखील ठेवतात. बाबा सर्व गोष्टी समजावून सांगतात. आणि मग पुन्हा म्हणतात - मुख्य गोष्ट आहे की बाबांची आणि ८४ च्या चक्राची आठवण करा. हे नॉलेज भारतवासीयांकरिताच आहे. तुम्हीच ८४ जन्म घेता. ही देखील समजून घेण्याची गोष्ट आहे. इतर कोणत्याही संन्याशाला स्वदर्शन चक्रधारी म्हणणार नाही. देवतांना देखील म्हणता येणार नाही. देवतांना ज्ञानच असत नाही. तुम्ही म्हणाल आमच्यामध्ये संपूर्ण ज्ञान आहे, या लक्ष्मी-नारायणामध्ये नाही आहे. बाबा तर यथार्थ गोष्टी समजावून सांगतात ना.

हे ज्ञान अतिशय अद्भुत आहे. तुम्ही किती गुप्त स्टुडंट आहात. तुम्ही म्हणाल आम्ही पाठशाळेमध्ये जातो, स्वयं भगवान आम्हाला शिकवतात. एम ऑब्जेक्ट काय आहे? आम्ही असे (लक्ष्मी-नारायण) बनणार. मनुष्य ऐकून आश्चर्यचकित होतील. आम्ही आमच्या हेड ऑफिसमध्ये जातो. काय शिकता? मनुष्यापासून देवता, गरिबापासून प्रिन्स बनण्याचे शिक्षण शिकत आहात. तुमची चित्रे देखील फर्स्टक्लास आहेत. धन-दान देखील नेहमी पात्र असणाऱ्याला केले जाते. असे पात्र असणारे तुम्हाला कुठे मिळतील? शिवाच्या, लक्ष्मी-नारायणाच्या, राम-सीतेच्या मंदिरांमध्ये. तिथे जाऊन तुम्ही त्यांची सेवा करा. आपला वेळ वाया घालवू नका. गंगेवर देखील जाऊन तुम्ही समजावून सांगा - पतित-पावनी गंगा आहे की परमपिता परमात्मा आहेत? सर्वांची सद्गती हे पाणी करेल की बेहदचे पिता करतील? तुम्ही यावर चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकता. विश्वाचा मालक बनण्याचा रस्ता सांगता. ज्ञानाचे दान करता, कवडी समान मनुष्याला हिऱ्या समान विश्वाचा मालक बनवता. भारत विश्वाचा मालक होता ना. तुम्हा ब्राह्मणांचे देवतांपेक्षाही उत्तम कुळ आहे. हे बाबा (ब्रह्मा बाबा) तर समजतात - मी बाबांचा एकटाच सिकीलधा बच्चा आहे. बाबांनी माझे हे शरीर लोनवर घेतले आहे. तुमच्याशिवाय इतर कोणीही या गोष्टी समजू शकणार नाहीत. बाबा माझ्यावर आरूढ झालेले आहेत. मी बाबांना खांद्यावर बसवले आहे अर्थात शरीर दिले आहे की सेवा करा. त्याचा मोबदला मग ते किती देतात. जे मला सर्वात उंचावर खांद्यावर चढवतात. नंबर वनमध्ये घेऊन जातात. पित्याला मुले प्रिय वाटतात, तर त्यांना खांद्यावर चढवून बसवतात ना. आई मुलाला फक्त कडेपर्यंत घेते, पिता तर खांद्यावर बसवतात. पाठशाळेला कधी कल्पना म्हटले जात नाही. शाळेमध्ये इतिहास-भूगोल शिकवतात तर काय ती कल्पना झाली? हा देखील जगाचा इतिहास-भूगोल आहे ना. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) अतिशय प्रेमाने रुहानी बाबांची आठवण करायची आहे. आठवणीमध्ये प्रेमाचे अश्रू आले तर ते अश्रू विजयी माळेचे मणी बनतील. आपला वेळ भविष्य प्रारब्ध बनविण्यामध्ये सफल करायचा आहे.

२) अंतर्मुखी होऊन सर्वांना ‘अल्फ’चा परिचय द्यायचा आहे, जास्त बडबड करायची नाहीये. एकच काळजी असावी की असे कोणतेही काम आपल्याकडून होऊ नये ज्याची सजा खावी लागेल.

वरदान:-
‘रुहानी यात्री आहे’ - याच स्मृतीद्वारे सदा उपराम, न्यारे आणि निर्मोही भव

रूहानी यात्री नेहमी आठवणीच्या यात्रेमध्ये पुढे जात राहतात, ही यात्रा नेहमीच सुखदायी आहे. जे रूहानी यात्रेमध्ये तत्पर राहतात, त्यांना दुसरी कोणतीच यात्रा करण्याची आवश्यकता नाही. या यात्रेमध्ये सर्व यात्रा सामावलेल्या आहेत. मनाने अथवा तनाने भटकणे बंद होते. तर नेहमी हीच स्मृती रहावी की आपण रुहानी यात्री आहोत, यात्रीचा कोणातही मोह नसतो. त्यांना सहजच उपराम, न्यारे अथवा निर्मोही बनण्याचे वरदान मिळते.

बोधवाक्य:-
नेहमी वाह बाबा, वाह भाग्य आणि वाह मीठा परिवार - हेच गाणे गात रहा.

अव्यक्त इशारे:- अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा.

जसे बाबांना सर्व रूपांमध्ये अथवा सर्व नात्यांनी जाणणे आवश्यक आहे, तसेच बाबांद्वारे स्वतःला देखील जाणणे आवश्यक आहे. जाणणे अर्थात मानणे. मी जो आहे, जसा आहे, तसा मानून चालाल तर देहामध्ये विदेही, व्यक्तमध्ये असतानाही अव्यक्त, चालता-फिरता फरिश्ता अथवा कर्म करत असताना कर्मातीत स्थिती बनेल.