03-12-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आठवणीच्या यात्रेमध्ये निष्काळजी बनू नका, आठवणी द्वारेच आत्मा पावन बनेल, बाबा आले आहेत सर्व आत्म्यांची सेवा करून त्यांना शुद्ध बनविण्याकरिता’’

प्रश्न:-
कोणती स्मृती कायमची राहीली तर खाणे-पिणे शुद्ध होईल?

उत्तर:-
जर स्मृती राहील की, आपण बाबांकडे आलो आहोत सचखंड मध्ये जाण्यासाठी किंवा मनुष्या पासून देवता बनण्यासाठी तर खाणे-पिणे शुद्ध होईल कारण देवता कधी अशुद्ध पदार्थ खात नाहीत. जेव्हा आपण सत्य बाबांकडे आलो आहोत सचखंड, पावन दुनियेचा मालक बनण्यासाठी तर पतित (अशुद्ध) बनू शकत नाही.

ओम शांती।
रुहानी (आत्मिक) बाबा रुहानी मुलांना विचारत आहेत - ‘मुलांनो, तुम्ही जेव्हा इथे बसता तेव्हा कोणाची आठवण करता?’ आपल्या बेहदच्या बाबांची. ते कुठे आहेत? त्यांना बोलावले जाते ना - ‘हे पतित-पावन!’ आजकाल संन्यासी देखील म्हणत राहतात - ‘पतित-पावन सिताराम’ अर्थात पतितांना पावन बनविणारे राम या. हे तर मुले समजतात पावन दुनिया सतयुगाला, पतित दुनिया कलियुगाला म्हटले जाते. आता तुम्ही कुठे बसले आहात? कलियुगाच्या अंतामध्ये म्हणून बोलावतात बाबा येऊन आम्हाला पावन बनवा. आपण कोण आहोत? आत्मा. आत्म्यालाच पवित्र बनायचे आहे. आत्मा पवित्र बनते तर शरीर देखील पवित्र मिळते. आत्मा पतित बनल्याने शरीर देखील पतित मिळते. हे शरीर तर मातीचा पुतळा आहे. आत्मा तर अविनाशी आहे. आत्मा या कर्मेंद्रियांद्वारे म्हणते, बोलावते - ‘आम्ही खूप पतित बनलो आहोत, आम्हाला येऊन पावन बनवा’. बाबा पावन बनवतात. ५ विकार रुपी रावण पतित बनवतो. बाबांनी आता स्मृती दिली आहे - आपण पावन होतो मग असे ८४ जन्म घेत-घेत आता अंतिम जन्मामध्ये आहोत. हे जे मनुष्य सृष्टी रुपी झाड आहे, बाबा म्हणतात - ‘मी याचे बीज रूप आहे, मला बोलावतात - हे परमपिता परमात्मा, हे गॉड फादर, आम्हाला मुक्त करा’. प्रत्येक जण स्वतःसाठी म्हणतात - मला सोडवा देखील आणि पंडा बनून घरी शांतीधामला घेऊन जा. संन्याशी इत्यादी देखील म्हणतात, शाश्वत शांती कशी मिळेल? आता शांतीधाम तर आहे घर. जिथून आत्मे पार्ट बजावण्यासाठी येतात. तिथे तर फक्त आत्मेच आहेत शरीरे नाहीत. आत्मे नंगे अर्थात बिना शरीराचे राहतात. नंगेचा अर्थ असा नाही की कपडे घातल्या शिवाय राहणे. नाही, शरीरा शिवाय आत्मे नंगे (अशरीरी) राहतात. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तुम्ही आत्मे तिथे मूलवतनमध्ये बिना शरीराचे राहता, त्याला निराकारी दुनिया म्हटले जाते.

मुलांना शिडीच्या चित्रावर समजावून सांगितले गेले आहे की, कसे आपण शिडी उतरत आलो आहोत. सर्व मिळून जास्तीतजास्त ८४ जन्म लागले आहेत. मग कोणी एक जन्म सुद्धा घेतात. आत्मे वरून येतच राहतात. आता बाबा म्हणतात - ‘मी आलो आहे पावन बनविण्याकरिता’. शिवबाबा ब्रह्मा द्वारे तुम्हाला शिकवतात. शिवबाबा आहेत आत्म्यांचे पिता आणि ब्रह्माला आदि देव म्हटले जाते. या दादामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) बाबा कसे येतात, हे तुम्ही मुलेच जाणता. मला बोलावतात देखील - ‘हे पतित-पावन या’. आत्म्यांनी या शरीराद्वारे बोलावले आहे. मुख्य आत्मा आहे ना. हे आहेच दुःखधाम. इथे कलियुगामध्ये बघा बसल्या-बसल्या अचानक मृत्यू होतो, तिथे असे कोणी आजारीच पडत नाहीत. नावच आहे स्वर्ग. किती सुंदर नाव आहे. म्हटल्यानेच मन खुश होते. ख्रिश्चन देखील म्हणतात क्राईस्टच्या ३ हजार वर्षांपूर्वी पॅराडाईज होता. इथे भारतवासींना तर काहीच माहिती नाही आहे कारण त्यांनी खूप सुख पाहिले आहे तर खूप दुःखही बघत आहेत. तमोप्रधान बनले आहेत. ८४ जन्म देखील यांचे आहेत. अर्ध्या कल्पानंतर मग इतर धर्माचे येतात. आता तुम्ही समजता अर्धा कल्प देवी-देवता होते तर तेव्हा दुसरा कोणताही धर्म नव्हता. नंतर मग त्रेतामध्ये जेव्हा राम राज्य आले तेव्हा देखील इस्लामी-बौद्धी नव्हते. मनुष्य तर एकदम घोर अंधारामध्ये आहेत. म्हणतात दुनियेचा कालावधी लाखो वर्ष आहे, म्हणून मनुष्य गोंधळतात की कलियुग अजून छोटा बच्चा आहे. तुम्ही आता समजता कलियुग पूर्ण होऊन आता सतयुग येईल म्हणून तुम्ही आले आहेत बाबांकडून स्वर्गाचा वारसा घेण्याकरिता. तुम्ही सर्व स्वर्गवासी होता. बाबा येतातच स्वर्ग स्थापन करण्यासाठी. तुम्हीच स्वर्गामध्ये येता, बाकी सर्व घरी शांतिधाममध्ये निघून जातात. ते आहे स्वीट होम, आत्मे तिथे निवास करतात. मग इथे येऊन पार्टधारी बनतात. बिना शरीराची तर आत्मा बोलूही शकणार नाही. तिथे शरीर नसल्याकारणाने आत्मे शांती मध्ये राहतात. मग अर्धाकल्प आहे देवी-देवता, सूर्यवंशी-चंद्रवंशी. नंतर मग द्वापर कलियुगामध्ये असतात मनुष्य. देवतांचे राज्य होते मग आता ते कुठे गेले? कोणालाच माहित नाही. हे नॉलेज आता तुम्हाला बाबांकडून मिळते. दुसऱ्या कोणत्या मनुष्यामध्ये हे नॉलेज असत नाही. बाबाच येऊन मनुष्यांना हे नॉलेज देतात, ज्याद्वारेच मनुष्यापासून देवता बनतात. तुम्ही इथे आलेच आहात मुळी मनुष्या पासून देवता बनण्याकरिता. देवतांचे खाणे-पिणे अशुद्ध असत नाही, ते कधी विडी इत्यादी पित नाहीत. इथल्या पतित मनुष्यांची तर गोष्टच विचारू नका - काय-काय खात असतात! आता बाबा समजावून सांगत आहेत - ‘हा भारत अगोदर सचखंड होता. जरूर सत्य बाबांनी स्थापन केला असेल. बाबांनाच ट्रूथ म्हटले जाते. बाबाच म्हणतात - मीच या भारताला सचखंड बनवितो. तुम्ही सच्चे देवता कसे बनू शकता, ते देखील तुम्हाला शिकवतो. भरपूर मुले इथे येतात त्यासाठी म्हणून ही घरे इत्यादी बनवावी लागतात. शेवट पर्यंत बनत राहतील, भरपूर बनतील. घरे खरेदी सुद्धा करतात. शिवबाबा ब्रह्मा द्वारे कार्य करतात. ब्रह्मा झाले काळे कारण हा अनेक जन्मांतील अंतिम जन्म आहे ना. हा मग गोरा बनेल. कृष्णाचे देखील चित्र गोरे आणि काळे आहे ना. म्युझियममध्ये मोठी-मोठी खूप चांगली चित्रे आहेत, ज्याच्यावर तुम्ही कोणालाही चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकता. इथे बाबा म्युझियम बनवत नाहीत, याला म्हटले जाते टॉवर ऑफ सायलेन्स. तुम्ही जाणता आपण शांतीधाम आपल्या घरी जातो. आपण तिथले रहिवासी आहोत मग इथे येऊन शरीर घेऊन पार्ट बजावतो. मुलांना सर्व प्रथम हा निश्चय झाला पाहिजे की, हे कोणी साधु-संत शिकवत नाही आहेत. हे दादा तर सिंधचे राहणारे होते; परंतु यांच्यामध्ये जे प्रवेश करून बोलतात - ते आहेत ज्ञानाचे सागर. त्यांना कोणी जाणतही नाहीत. म्हणतात देखील गॉड फादर. परंतु म्हणतात त्यांना नाव-रूपच नाही आहे. ते निराकार आहेत. त्यांचा कोणता आकार नाही. आणि मग म्हणतात ते सर्वव्यापी आहेत. अरे परमात्मा कुठे आहे? म्हणतील - ‘ते सर्वव्यापी आहेत, सर्वांमध्ये आहेत’. अरे, प्रत्येकामध्ये आत्मा बसली आहे, सर्व भाऊ-भाऊ आहेत ना, मग घटा-घटा मध्ये परमात्मा कुठून आला? असे म्हणता येणार नाही की, प्रत्येकामध्ये परमात्मा देखील आहे आणि आत्मा देखील आहे. परमात्मा बाबांना बोलवतात - ‘बाबा, येऊन आम्हा पतितांना पावन बनवा’. तुम्ही मला बोलावता हा धंदा, ही सेवा करण्यासाठी. आम्हा सर्वांना येऊन शुद्ध बनवा. पतित दुनियेमध्येच मला निमंत्रण देता, म्हणता - ‘बाबा, आम्ही पतित आहोत’. बाबा तर पावन दुनिया बघत सुद्धा नाहीत. पतित दुनियेमध्येच तुमची सेवा करण्यासाठी आले आहेत. आता हे रावण राज्य नष्ट होईल. बाकी तुम्ही जे राजयोग शिकता ते जाऊन राजांचेही राजा बनता. तुम्हाला अगणित वेळा शिकवले आहे आणि ५ हजार वर्षानंतर तुम्हालाच शिकवतील. सतयुग-त्रेताची राजधानी आता स्थापन होत आहे. पहिले आहे ब्राह्मण कुळ. प्रजापिता ब्रह्मा गायले जातात ना. ज्यांना एडम आदि देव म्हणतात. हे कोणालाच माहिती नाही. असे बरेच आहेत जे इथे येऊन ऐकून मग मायेच्या अधीन होतात. पुण्य आत्मा बनता-बनता पाप आत्मा बनतात. माया खूप शक्तिशाली आहे. सर्वांना पाप-आत्मा बनवते. इथे एकही पवित्र-आत्मा, पुण्य-आत्मा नाही आहे. पवित्र आत्मे देवी-देवताच होते, जेव्हा सर्व पतित बनतात तेव्हा बाबांना बोलावतात. आता हे आहे रावण राज्य पतित दुनिया, याला म्हटले जाते काट्यांचे जंगल. सतयुगाला म्हटले जाते गार्डन ऑफ फ्लॉवर्स (फुलांचा बगीचा). मुगल गार्डनमध्ये किती फर्स्टक्लास सुंदर-सुंदर फुले असतात. अकची (धोतऱ्याची) फुले देखील मिळतील परंतु त्याचा अर्थ कोणालाच समजत नाही, शिवावर धोतऱ्याचे फूल का वाहतात? हे देखील बाबा बसून समजावून सांगतात. मी जेव्हा शिकवतो तर त्यांच्यामध्ये कोणी फर्स्टक्लास मोगरा, कोणी रतन ज्योत, कोणी धोतरा असे देखील आहेत. नंबरवार तर आहेत ना. तर याला म्हटलेच जाते दुःख धाम, मृत्यूलोक. सतयुग आहे अमरलोक. या गोष्टी कोणत्या शास्त्रांमध्ये नाही आहेत. शास्त्र तर या दादाने (ब्रह्मा बाबांनी) वाचली आहेत, बाबा काही शास्त्र तर शिकवणार नाहीत. बाबा तर स्वतः सद्गती दाता आहेत. फारफार तर गीतेचा संदर्भ देतात. सर्वशास्त्रमई शिरोमणी गीता भगवंताने गायली आहे परंतु भगवान कोणाला म्हटले जाते, हेच भारतवासींना माहित नाही. बाबा म्हणतात - ‘मी निष्काम सेवा करतो, तुम्हाला विश्वाचे मालक बनवतो, मी बनत नाही. स्वर्गामध्ये तुम्ही माझी आठवण करत नाही’. ‘दुःख में सिमरण सब करे, सुख में करे न कोय…’ याला दुःख आणि सुखाचा खेळ म्हटले जाते. स्वर्गामध्ये दुसरा कोणताही धर्म असतच नाही. सर्व येतातच नंतर. तुम्ही जाणता आता या जुन्या दुनियेचा विनाश होणार, नैसर्गिक आपत्ती, वादळे जोरदारपणे येतील. सर्वकाही नष्ट होईल.

तर बाबा आता येऊन अडाण्या पासून बुद्धिवान बनवतात. बाबांनी किती धन दौलत दिली होती, सर्व गेले कुठे? आता किती दिवाळखोर बनले आहेत. भारत जो सोन्याची चिडिया होता तो आता काय बनला आहे? आता पुन्हा पतित-पावन बाबा आले आहेत राजयोग शिकवत आहेत. तो आहे हठयोग, हा आहे राजयोग. हा राजयोग दोघांसाठीही आहे, तो हठयोग केवळ पुरुषच शिकतात. आता बाबा म्हणतात पुरुषार्थ करा, विश्वाचे मालक बनून दाखवा. आता या जुन्या दुनियेचा विनाश तर होणारच आहे, थोडा वेळ बाकी आहे, ही लढाई अंतिम लढाई आहे. ही लढाई सुरू होईल तर थांबू शकणार नाही. ही लढाई सुरूच तेव्हा होईल जेव्हा तुम्ही कर्मातीत अवस्थेला प्राप्त कराल आणि स्वर्गामध्ये जाण्यासाठी लायक बनाल. बाबा तरीही म्हणतात या आठवणीच्या यात्रेमध्ये निष्काळजी बनू नका, यामध्येच माया विघ्न आणते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1) कर्मातीत अवस्थेला प्राप्त करण्यासाठी किंवा स्वर्गामध्ये उच्च पदाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी आठवणीच्या यात्रेमध्ये तत्पर राहायचे आहे, निष्काळजी बनायचे नाही.

वरदान:-
आपल्या मस्तकावर नेहमी बाबांच्या आशीर्वादांचा हात अनुभव करणारे मास्टर विघ्न-विनाशक भव गणेशाला विघ्न विनाशक म्हटले जाते. विघ्न विनाशक तेच बनतात ज्यांच्यामध्ये सर्व शक्ती आहेत. सर्व शक्तींना वेळे नुसार कार्यामध्ये लावाल तर विघ्न थांबू शकत नाही. कितीही रूपामध्ये माया येईल परंतु तुम्ही नॉलेजफुल बना. नॉलेजफुल आत्मा कधी मायेकडून हार खाऊ शकत नाही. जेव्हा मस्तकावर बापदादांच्या आशीर्वादांचा हात आहे तर विजयाचा तिलक लागलेलाच आहे. परमात्म्याचा हात आणि साथ विघ्न विनाशक बनवतो.

बोधवाक्य:-
स्वतःमध्ये गुणांना धारण करून इतरांना गुणदान करणारे गुणमूर्त आहेत.