04-01-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही अशरीरी बनून जेव्हा बाबांची आठवण करता तेव्हा तुमच्यासाठी ही दुनियाच नाहीशी होते, देह आणि दुनियेचे विस्मरण झाले आहे”

प्रश्न:-
बाबांद्वारे सर्व मुलांना ज्ञानाचा तिसरा नेत्र कशाकरिता मिळाला आहे?

उत्तर:-
स्वतःला आत्मा समजून, बाबा जे आहेत जसे आहेत, त्याच रूपामध्ये आठवण करण्याकरिता तुम्हाला तिसरा नेत्र मिळाला आहे. परंतु हा तिसरा नेत्र तेव्हा काम करतो जेव्हा तुम्ही पूर्ण योगयुक्त रहाल अर्थात एका बाबांवर खरे प्रेम असेल. कोणाच्याही नावा-रूपामध्ये अडकलेले नसाल. बाबांवरील प्रेमामध्येच माया अडथळे निर्माण करते. यातच मुले धोका खातात.

गीत:-
मरना तेरी गली में…

ओम शांती।
या गाण्याचा अर्थ तुम्हा ब्राह्मण मुलांशिवाय इतर कोणीही समजू शकत नाही. जशी वेद-शास्त्रे इत्यादी बनवली आहेत परंतु जे काही वाचतात त्याचा अर्थ समजू शकत नाहीत म्हणून बाबा म्हणतात - ‘मी ब्रह्मा मुखाद्वारे सर्व वेद-शास्त्रांचे सार समजावून सांगतो’; तसेच या गाण्यांचा अर्थ देखील कोणीही समजू शकत नाहीत, बाबाच यांचा अर्थ सांगतात. आत्मा जेव्हा शरीरापासून न्यारी होते तेव्हा दुनियेपासून सर्व संबंध तुटून जातो. गाणे देखील म्हणते - ‘स्वतःला आत्मा समजून अशरीरी बनून बाबांची आठवण करा तर ही दुनियाच नाहीशी होते. हे शरीर या पृथ्वीवर आहे, आत्मा या शरीरातून निघून जाते तर मग त्यावेळी जणू त्यांच्यासाठी मनुष्य सृष्टीच नाही आहे. आत्मा नंगी (अशरीरी) बनून जाते. मग जेव्हा शरीरामध्ये येते तेव्हा पार्ट सुरू होतो. मग एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये जाऊन प्रवेश करते. परत महतत्वामध्ये जायचे नाहीये. उडून दुसऱ्या शरीरामध्ये जाते. इथे या आकाश तत्वामध्येच त्यांना पार्ट बजावायचा आहे. मूल वतनमध्ये जायचे नाहीये. जेव्हा शरीर सोडतात तेव्हा ना हे कर्म-बंधन राहत, ना ते कर्म-बंधन राहत. शरीरापासूनच वेगळे होतात ना. मग दुसरे शरीर घेतात तर ते कर्म-बंधन सुरू होते. या गोष्टी तुमच्या शिवाय इतर कोणीही मनुष्य जाणत नाहीत. बाबांनी समजावून सांगितले आहे सगळे एकदमच अज्ञानी आहेत. परंतु असे कोणी स्वतःला समजतात थोडेच. स्वतःला किती हुशार समजतात, पीस प्राइज (शांती पुरस्कार) देत राहतात. हे देखील तुम्ही ब्राह्मण कुलभूषण चांगल्या रीतीने समजावून सांगू शकता. ते तर जाणतच नाहीत की ‘पीस’ (शांती) कशाला म्हटले जाते? कोणी तर महात्म्यांकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जातात की, मनाची शांती कशी मिळेल? असे म्हणतात मात्र की, दुनियेमध्ये शांती कशी काय होईल! असे म्हणणार नाहीत की, निराकारी दुनियेमध्ये शांती कशी होईल? ते तर आहेच शांतीधाम. आपण आत्मे शांतीधाम मध्ये राहतो परंतु हे तर मनाची शांती म्हणतात. ते जाणत नाहीत की शांती कशी मिळेल? शांतीधाम तर आपले घर आहे. इथे शांती कशी मिळू शकते? हो, सतयुगामध्ये सुख, शांती, संपत्ती सर्व काही आहे, ज्याची स्थापना बाबा करतात. इथे तर किती अशांती आहे. हे सर्व आता तुम्ही मुलेच समजता. सुख, शांती, संपत्ती भारतामध्येच होती. तो वारसा होता बाबांचा आणि दुःख, अशांती, गरीबी हा वारसा आहे रावणाचा. या सर्व गोष्टी बेहदचे बाबा बसून मुलांना समजावून सांगतात. बाबा परमधाममध्ये राहणारे नॉलेजफुल आहेत, जे सुखधामचा वारसा आम्हाला देतात. ते आम्हा आत्म्यांना स्पष्ट करून सांगत आहेत. हे तर जाणता नॉलेज असते आत्म्यामध्ये. त्यांनाच ज्ञानाचा सागर म्हटले जाते. ते ज्ञानाचे सागर या शरीराद्वारे जगाचा इतिहास-भूगोल समजावून सांगतात. दुनियेचे काही आयुर्मान तर असले पाहिजे ना. दुनिया तर आहेच. फक्त नवीन दुनिया आणि जुनी दुनिया म्हटले जाते. हे देखील मनुष्यांना माहीत नाही. नवीन दुनियेपासून जुनी दुनिया होण्यामध्ये किती वेळ लागतो?

तुम्ही मुले जाणता कलियुगानंतर सतयुग जरूर येणार आहे म्हणून कलियुग आणि सतयुगाच्या संगमावर बाबांना यावे लागते. हे देखील तुम्ही जाणता परमपिता परमात्मा ब्रह्माद्वारे नवीन दुनियेची स्थापना, शंकरा द्वारे विनाश करतात. त्रिमूर्तीचा अर्थच हा आहे - स्थापना, विनाश, पालना. ही तर कॉमन गोष्ट आहे. परंतु या गोष्टी तुम्ही मुले विसरून जाता. नाहीतर तुम्हाला खूप खुशी राहील. निरंतर आठवण राहिली पाहिजे. बाबा आम्हाला आता नव्या दुनियेसाठी लायक बनवत आहेत. तुम्ही भारतवासीच लायक बनता, अजून कोणी नाही. हो, जे बाकी इतर धर्मांमध्ये कन्व्हर्ट झाले आहेत, ते येऊ शकतात. पुन्हा या धर्मामध्ये कन्व्हर्ट होतील, जसे त्या धर्मामध्ये झाले होते. हे सर्व नॉलेज तुमच्या बुद्धीमध्ये आहे. लोकांना समजावून सांगायचे आहे ही जुनी दुनिया आता बदलते आहे. महाभारत लढाई देखील जरूर सुरु होणार आहे. यावेळीच बाबा येऊन राजयोग शिकवतात. जे राजयोग शिकतात, ते नवीन दुनियेमध्ये जातील. तुम्ही सर्वांना सांगू शकता की, उच्च ते उच्च आहेत भगवान, नंतर मग ब्रह्मा-विष्णू-शंकर, मग इथे या, मुख्य आहे जगत अंबा, जगत पिता. बाबा येतात देखील इथेच ब्रह्माच्या तनामध्ये, प्रजापिता ब्रह्मा तर इथे आहे ना. ब्रह्मा द्वारे स्थापना काही सूक्ष्म वतनमध्ये तर होणार नाही ना. इथेच होते. हे व्यक्त पासून अव्यक्त बनतात. हे राजयोग शिकून मग विष्णूची दोन रूपे बनतात. दुनियेचा इतिहास-भूगोल समजून घ्यावा लागेल ना. मनुष्यच समजतील. दुनियेचा मालकच दुनियेचा इतिहास-भूगोल समजावू शकतो. ते नॉलेजफुल, पुनर्जन्म रहीत आहेत. हे नॉलेज कोणाच्याही बुद्धिमध्ये नाही आहे. पारखण्यासाठी देखील बुद्धी हवी ना. काही डोक्यात शिरते आहे की असेच बसले आहेत, नाडी बघितली पाहिजे. एक ‘अजमल खॉं’ प्रसिद्ध वैद्य होऊन गेला आहे. असे म्हणतात बघताच क्षणी त्यांना आजारा विषयी समजत असे. आता तुम्हा मुलांना देखील समजायला हवे की, हे लायक आहेत कि नाही? बाबांनी मुलांना ज्ञानाचा तिसरा नेत्र दिला आहे, ज्याने तुम्ही स्वतःला आत्मा समजून, बाबा जे आहेत, जसे आहेत, त्यांना त्याच रूपामध्ये आठवण करता. परंतु अशी बुद्धी त्यांची असेल जे पूर्णत: योगयुक्त असतील, ज्यांची बाबांसोबत प्रीत-बुद्धी असेल. सर्वच काही असे नाही आहेत ना. एकमेकांच्या नावा-रूपामध्ये अडकून पडतात. बाबा म्हणतात - प्रेम तर माझ्यावर करा ना. माया अशी आहे जी प्रेम करू देत नाही. माया सुद्धा बघते माझा ग्राहक जातोय तर एकदम नाका-कानाला धरून पकडते. मग जेव्हा धोका खातात तेव्हा समजतात मायेकडून धोका खाल्ला. मायाजीत, जगतजीत बनू शकणार नाहीत, उच्च पद मिळवू शकणार नाही. यातच मेहनत आहे. श्रीमत म्हणते - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा’; तर तुमची जी पतित-बुद्धी आहे ती पावन बनेल. परंतु बऱ्याच जणांना खूप अवघड वाटते. यामध्ये एकच विषय आहे - अलफ आणि बे (बाबा आणि बादशाही). बस दोन शब्द सुद्धा लक्षात ठेवू शकत नाही! बाबा म्हणतात अलफची आठवण करा तर स्वतःच्या देहाची, दुसऱ्यांच्या देहाची आठवण करत राहतात. बाबा म्हणतात देहाला बघत असताना सुद्धा तुम्ही माझी आठवण करा. आत्म्याला आता तिसरा नेत्र मिळाला आहे मला बघण्याचा-समजण्याचा, त्याचा वापर करा. तुम्ही मुले आता त्रिनेत्री, त्रिकालदर्शी बनता. परंतु त्रिकालदर्शी देखील नंबरवार आहेत. ज्ञान धारण करणे काही कठीण नाही आहे. खूप चांगल्या रीतीने समजतात परंतु योगबळ कमी आहे, देही-अभिमानीपणा खूप कमी आहे. थोड्या गोष्टीवरून क्रोध, राग येतो, पडत राहतात. उठतात, पडतात. आज उठले उद्या पुन्हा खाली पडतात. देह-अभिमान मुख्य आहे मग बाकीचे विकार लोभ, मोह इत्यादीमध्ये अडकतात. देहामध्ये देखील मोह असतो ना. मातांमध्ये मोह जास्त असतो. आता बाबा त्यापासून सोडवतात. तुम्हाला बेहदचे बाबा मिळाले आहेत मग मोह का ठेवता? त्यावेळी चेहरा, संभाषण माकडा प्रमाणे असते. बाबा म्हणतात - नष्टो मोहा बना, निरंतर माझी आठवण करा. पापांचे ओझे डोक्यावर खूप आहे, ते कसे उतरणार? परंतु माया अशी आहे, आठवण करू देणार नाही. भले कितीही डोके आपटा परंतु माया बुद्धीला सारखी उडवून लावते. किती प्रयत्न करतात की, आपण अति प्रिय बाबांचीच महिमा करत रहावी. बाबा, बस्स तुमच्याजवळ आलो की आलो, परंतु परत विसरून जातात. बुद्धी दुसरीकडे निघून जाते. हा नंबर वनमध्ये जाणारा देखील पुरुषार्थी आहे ना.

मुलांच्या बुद्धीमध्ये हे लक्षात राहिले पाहिजे की, आपण गॉड फादरली स्टुडंट आहोत. गीतेमध्ये देखील आहे - भगवानुवाच, मी तुम्हाला राजांचाही राजा बनवतो. फक्त शिवाच्या ऐवजी श्रीकृष्णाचे नाव टाकले आहे. वास्तविक शिवबाबांची जयंती संपूर्ण दुनियेमध्ये साजरी केली पाहिजे. शिवबाबा सर्वांना दुःखापासून लिब्रेट (मुक्त) करून गाईड बनून घेऊन जातात. हे तर सर्वजण मानतात की ते लिब्रेटर, गाईड आहेत. सर्वांचे पतित-पावन पिता आहेत, सर्वांना शांतीधाम-सुखधाममध्ये घेऊन जाणारे आहेत तर त्यांची जयंती का नाही साजरी करत? भारतवासीच साजरी करत नाहीत म्हणूनच भारताची ही वाईट गती झाली आहे. मृत्यू देखील वाईट पद्धतीने होतो. ते तर असे काही बॉम्ब बनवतात, गॅस पसरला आणि संपला, जसा काही क्लोरोफॉर्म दिला जातो. हे देखील त्यांना बनवायचेच आहे. बंद होणे अशक्य आहे. जे कल्पापूर्वी झाले होते ते आता रिपीट होईल. या मुसळांद्वारे (मिसाईल्स द्वारे) आणि नैसर्गिक आपत्तीद्वारे जुन्या दुनियेचा विनाश झाला होता, तर आताही होईल. विनाशाची वेळ जेव्हा होईल तेव्हा ड्रामा प्लॅन अनुसार कृतीमध्ये येणारच. ड्रामा विनाश जरूर करवेल. रक्ताच्या नद्या इथे वाहतील. गृहयुद्धामध्ये एकमेकांना मारून टाकतात ना. तुमच्यातही फार थोडे जाणतात की ही दुनिया बदलत आहे. आता आपण सुखधामला जात आहोत. तर सदैव ज्ञानाच्या अतींद्रिय सुखामध्ये रहायला हवे. जितके आठवणीमध्ये रहाल तितके सुख वाढत जाईल. छी-छी (विकारी) देहापासून नष्टोमोहा होत जाल. बाबा फक्त एवढेच सांगतात अलफची (बाबांची) आठवण करा तर बे बादशाही तुमची आहे. सेकंदामध्ये बादशाही, बादशहाला मूल झाले तर मूल जणू बादशहा झाले ना. तर बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करत रहा आणि चक्राची आठवण करा तर चक्रवर्ती महाराजा बनाल’; म्हणून गायले जाते सेकंदामध्ये जीवनमुक्ती, सेकंदामध्ये बेगर टू प्रिन्स. किती चांगले आहे. तर श्रीमतावर चांगल्या रीतीने चालले पाहिजे. पावलो-पावली सल्ला घ्यायचा असतो.

बाबा समजावून सांगत आहेत - ‘गोड मुलांनो, ट्रस्टी बनून रहा तर मोह नष्ट होईल. परंतु ट्रस्टी बनणे काही मावशीचे घर नाहीये. हे (ब्रह्मा बाबा) स्वतः ट्रस्टी बनले आहेत, मुलांना देखील ट्रस्टी बनवतात. हे काहीही घेतात का? म्हणतात तुम्ही ट्रस्टी होऊन सांभाळा. ट्रस्टी बना म्हणजे मग मोह नष्ट होतो. म्हणतात देखील - सर्व काही ईश्वरानेच दिले आहे. आणि मग काही नुकसान होते किंवा कोणाचा मृत्यू होतो तेव्हा मग आजारी पडतात. मिळते तेव्हा आनंद होतो. जर का असे म्हणता - ईश्वराने दिले आहे तर मग कोणी मेल्यावर रडण्याची काय गरज आहे? परंतु माया काही कमी नाहीये, मावशीचे घर थोडेच आहे. यावेळी बाबा म्हणतात - ‘तुम्ही मला बोलावले आहे की, या पतित दुनियेमध्ये आम्ही राहू इच्छित नाही, आम्हाला पावन दुनियेमध्ये घेऊन चला, सोबत घेऊन चला’, परंतु याचा अर्थच समजत नाहीत. पतित-पावन येईल तर जरूर शरीरे नष्ट होतील ना, तेव्हाच तर आत्म्यांना घेऊन जातील. तर अशा बाबांसोबत प्रीत-बुद्धी असायला हवी. एकाशीच प्रेम ठेवायचे आहे, त्यांचीच आठवण करायची आहे. मायेची वादळे तर येतील. कर्मेंद्रियांद्वारे कोणतेही विकर्म करता कामा नये. ते नियमबाह्य ठरते. बाबा म्हणतात - ‘मी येऊन या शरीराचा आधार घेतो. हे यांचे शरीर आहे ना. तुम्हाला आठवण बाबांची करायची आहे’. तुम्ही जाणता ब्रह्मा देखील ‘पिता’, शिव सुद्धा ‘पिता’ आहेत. विष्णू आणि शंकराला पिता म्हणणार नाही. शिव आहेत निराकार पिता. प्रजापिता ब्रह्मा आहेत साकारी पिता. आता तुम्ही साकार द्वारा निराकार बाबांकडून वारसा घेत आहात. दादा (शिव-आजोबा) यांच्यामध्ये प्रवेश करतात तेव्हा म्हणता आजोबांचा वारसा पित्याद्वारे (ब्रह्मा द्वारे) आम्ही घेतो. दादा (ग्रँड फादर) आहेत निराकार, पिता आहेत साकार. या अद्भुत नवीन गोष्टी आहेत ना. त्रिमूर्ती दाखवतात परंतु समजत नाहीत, ‘शिव’ला काढून टाकले आहे. बाबा किती चांगल्या-चांगल्या गोष्टी समजावून सांगतात तर आनंद झाला पाहिजे - आपण त्यांचे स्टुडंट आहोत. बाबा आमचे पिता, टीचर, सद्गुरु आहेत. आता तुम्ही दुनियेचा इतिहास-भूगोल बेहदच्या बाबांकडून ऐकत आहात आणि मग इतरांना ऐकवता. हे ५ हजार वर्षांचे चक्र आहे. कॉलेजच्या मुलांना जगाचा इतिहास-भूगोल समजावून सांगितला पाहिजे. ८४ जन्मांची शिडी काय आहे, भारताची चढती कला आणि उतरती कला कशी होते, हे समजावून सांगायचे आहे. सेकंदामध्ये भारत स्वर्ग बनतो मग ८४ जन्मामध्ये भारत नरक बनतो. या तर खूपच सोप्या समजण्याच्या गोष्टी आहेत. भारत गोल्डन एज पासून आयर्न एज मध्ये कसा आला आहे - हे तर भारतवासीयांना समजावून सांगितले पाहिजे. टीचर्स ना देखील समजावून सांगितले पाहिजे. ते आहे भौतिक नॉलेज, हे आहे रूहानी नॉलेज. ते मनुष्य देतात, हे गॉड फादर देतात. ते आहेत मनुष्य सृष्टीचे बीज रूप, तर त्यांच्याजवळ मनुष्य सृष्टीचेच नॉलेज असेल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या छी-छी (विकारी) देहापासून पूर्णत: नष्टोमोहा बनून ज्ञानाच्या अतिंद्रिय सुखामध्ये रहायचे आहे. बुद्धीमध्ये रहावे आता ही दुनिया बदलत आहे आम्ही आपल्या सुखधाममध्ये जात आहोत.

२) ट्रस्टी बनून सर्वकाही सांभाळत असताना आपला मोह नष्ट करायचा आहे. एका बाबांशी खरी प्रीत ठेवायची आहे. कर्मेंद्रियांकडून कधीही कोणते विकर्म करायचे नाही.

वरदान:-
ब्रह्मा बाप समान श्रेष्ठ ते श्रेष्ठ तस्वीर बनविणारे परोपकारी भव

श्रेष्ठ स्मृती आणि श्रेष्ठ कर्माद्वारे भाग्याचे चित्र तर सर्व मुलांनी बनवले आहे, आता फक्त लास्ट टचिंग आहे संपूर्णतेची किंवा ब्रह्मा बाप समान श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनण्याची; यासाठी परोपकारी बना अर्थात स्वार्थ भावापासून कायम मुक्त रहा. प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक सहयोगी संघटन मध्ये जितका निस्वार्थपणा असेल तितकेच पर-उपकारी बनू शकाल. कायम स्वतःला भरपूर अनुभव कराल. कायम प्राप्ती स्वरूपाच्या स्थितीमध्ये स्थित रहाल. स्वयं प्रती काहीही स्वीकार करणार नाही.

बोधवाक्य:-
सर्वस्व त्यागी बनल्यानेच साधेपणाचा आणि सहनशीलतेचा गुण येईल.

आपल्या शक्तिशाली मनसाद्वारे सकाश देण्याची सेवा करा:-

ही सकाश देण्याची सेवा निरंतर करू शकता, यामध्ये तब्येत किंवा वेळेचा प्रश्नच नाही. दिवस-रात्र या बेहदच्या सेवेमध्ये लागू शकता. जसे ब्रह्मा बाबांना पाहिले, रात्रीचे देखील डोळे उघडले आणि बेहदची सकाश देण्याची सेवा होत राहिली, असे फॉलो फादर करा. आता तुम्ही मुले बेहदला सकाश द्याल तर जवळचे आपोआपच सकाश घेत राहतील. ही बेहदची सकाश दिल्याने आपोआप वायुमंडळ बनेल.