04-01-26    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   30.11.2008  ओम शान्ति   मधुबन


फुलस्टॉप लावून, संपूर्ण पवित्रतेची धारणा करून, मनसा सकाश द्वारे सुख-शांतीची ओंजळ देण्याची सेवा करा


आज बापदादा चोहो बाजूंच्या महान मुलांना बघत आहेत. कोणती महानता केली? ज्याला दुनिया असंभव म्हणते त्याला सहज संभव करून दाखवले, ते आहे पवित्रतेचे व्रत. तुम्ही सर्वांनी पवित्रतेचे व्रत धारण केले आहे ना! बापदादांकडून परिवर्तनाच्या दृढ संकल्पाचे व्रत घेतले आहे. व्रत घेणे अर्थात वृत्तीचे परिवर्तन करणे. कोणती वृत्ति परिवर्तन केली? संकल्प केला की, आम्ही सर्व भाऊ-भाऊ आहोत, या वृत्ति परिवर्तनासाठी भक्तिमध्ये देखील कितीतरी गोष्टींमध्ये व्रत घेतात परंतु तुम्ही सर्वांनी बाबांसमोर दृढ संकल्प केला कारण ब्राह्मण जीवनाचे फाउंडेशन आहे पवित्रता आणि पवित्रतेद्वारेच परमात्म प्रेम आणि सर्व प्रकारच्या परमात्म प्राप्ती होत आहेत. महात्मा ज्याला कठीण समजतात, असंभव समजतात आणि तुम्ही पवित्रतेला स्वधर्म समजता. बापदादा बघत आहेत कितीतरी चांगली-चांगली मुले आहेत ज्यांनी संकल्प केला आणि दृढ संकल्पाद्वारे प्रॅक्टिकलमध्ये परिवर्तन दाखवत आहेत. अशा चोहो बाजूंच्या महान मुलांना बापदादा खूप-खूप मनापासून आशीर्वाद देत आहेत.

तुम्ही देखील सर्व जण मन-वचन-कर्म, वृत्ति दृष्टी द्वारे पवित्रतेचा अनुभव करत आहात ना! पवित्रतेची वृत्ति अर्थात प्रत्येक आत्म्याप्रति शुभ भावना, शुभ कामना. दृष्टी द्वारे प्रत्येक आत्म्याला आत्मिक स्वरूपामध्ये बघणे, स्वतःला देखील सहज सदैव आत्मिक स्थितीमध्ये अनुभव करणे. ब्राह्मण जीवनाचे महत्व मन-वचन-कर्माची पवित्रता आहे. पवित्रता नसेल तर ब्राह्मण जीवनाचे जे गायन आहे - सदैव पवित्रतेच्या बळाने स्वतःच स्वतःला सुद्धा आशीर्वाद देतात, कोणते आशीर्वाद देतात? पवित्रतेद्वारे सदैव स्वतः देखील आनंदी असल्याचा अनुभव करतात आणि दुसऱ्यांना देखील आनंद देतात. पवित्र आत्म्याला विशेष तीन वरदाने मिळतात - १) स्वतः स्वतःला वरदान देतात, ज्यामुळे सहजच बाबांचा प्रिय बनतो. २) वरदाता बाबांचा निअरेस्ट आणि डिअरेस्ट बच्चा बनतो (सर्वात जवळचा आणि प्रिय मुलगा बनतो) त्यामुळे बाबांचे आशीर्वाद स्वतः प्राप्त होतात आणि सदैव प्राप्त होतात. ३) जे कोणी ब्राह्मण परिवाराचे विशेष निमित्त बनलेले आहेत, त्यांच्याद्वारे देखील आशीर्वाद मिळत राहतात. तिघांच्या आशीर्वादांनी सदैव उडत राहतो आणि उडवत राहतो. तर तुम्ही सर्वांनी स्वतःला विचारा, स्वतःला चेक करा तर पवित्रतेचे बळ आणि पवित्रतेचे फळ सदैव अनुभव करता? सदैव रुहानी नशा, मनामध्ये अभिमान असतो? कधी-कधी काही-काही मुले जेव्हा अमृतवेलेला मिलन साजरे करतात, रुहरिहान करतात तर माहिती आहे काय म्हणतात? पवित्रतेद्वारे जे अतींद्रिय सुखाचे फळ मिळते ते कायमचे टिकत नाही. कधी असते, कधी नसते कारण पवित्रतेचे फळच अतींद्रिय सुख आहे. तर स्वतःला विचारा मी कोण आहे? सदैव अतींद्रिय सुखाच्या अनुभूतिमध्ये राहतो की कधी-कधी? स्वतःला काय म्हणवता? सर्व जण आपले नाव लिहिता तर काय लिहिता? बी.के. अमका…, बी.के. अमकी आणि स्वतःला मास्टर सर्वशक्तीवान म्हणता. सर्व जण मास्टर सर्वशक्तीवान आहात ना! जे समजतात आम्ही मास्टर सर्वशक्तीवान आहोत, सदैव, कधी-कधी नाही, त्यांनी हात वर करा. सदैव? बघा, विचार करा, सदैव आहात? डबल फॉरेनर्स हात वर करत नाही आहेत, थोडे हात वर करत आहेत. टीचर्स हात वर करा, आहात सदैव? असेच हात वर करू नका, जे सदैव आहेत, त्या सदैव वाल्यांनी हात वर करा. फार थोडे आहेत. पांडव हात वर करा, मागचे हात वर करा, फार थोडे आहेत. सर्व सभा हात वर करत नाही आहे. अच्छा मास्टर सर्वशक्तीवान आहात तर त्यावेळी शक्ती कुठे जातात? मास्टर आहात, याचा अर्थच आहे, मास्टर तर पित्यापेक्षाही श्रेष्ठ असतो. तर चेक करा - अवश्य प्युरिटीच्या फाउंडेशनमध्ये काही कमजोरी असेल. कोणती कमजोरी आहे? मनामध्ये अर्थात संकल्पामध्ये कमजोरी आहे, शब्दांमध्ये कमजोरी आहे की कर्मामध्ये कमजोरी आहे, की स्वप्नामध्ये देखील कमजोरी आहे; कारण पवित्र आत्म्याचे मन-वचन-कर्म, संबंध-संपर्क, स्वप्न स्वतः शक्तिशाली असते. जेव्हा व्रत घेतले आहे, वृत्तीला बदलण्याचे, तर मग कधी-कधी का? काळाला बघत आहात, काळाची हाक, भक्तांची हाक, आत्म्यांची हाक ऐकत आहात आणि अचानकचा पाठ तर सर्वांना पक्का आहे. तर फाउंडेशनची कमजोरी अर्थात पवित्रतेची कमजोरी. जर बोलण्यामध्ये देखील शुभ भावना, शुभ कामना नसेल, पवित्रतेच्या विपरीत आहे तर ते देखील संपूर्ण पवित्रतेचे जे सुख आहे अतींद्रिय सुख, त्याचा अनुभव होऊ शकत नाही कारण की ब्राह्मण जीवनाचे लक्ष्यच आहे असंभवला संभव करणे. त्यामध्ये जितके आणि तितके शब्द येत नाहीत. जितके पाहिजे तितके नाही आहे. तर उद्या अमृतवेलेला विशेष प्रत्येकाने स्वतःला चेक करा, दुसऱ्याचा विचार करू नका, दुसऱ्याला बघू नका, परंतु स्वतःला चेक करा की किती परसेंटेज मध्ये पवित्रतेचे व्रत निभावत आहोत? चार गोष्टी चेक करा - एक वृत्ति, दुसरे - संबंध-संपर्कामध्ये शुभ भावना, शुभ कामना, ‘हा तर आहेच असा’, असे नको. परंतु त्या आत्म्याप्रति सुद्धा शुभ भावना. जेव्हा तुम्ही सर्वांनी स्वतःला विश्व परिवर्तक मानले आहे, आहात ना सगळे? स्वतःला समजता का की, आपण विश्व परिवर्तक आहोत? हात वर करा. यामध्ये तर खूप चांगले हात वर उचलले आहेत, मुबारक असो. परंतु बापदादा तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारत आहेत? प्रश्न विचारू? जर तुम्ही विश्व परिवर्तक आहात तर विश्व परिवर्तनामध्ये ही प्रकृति, ५ तत्व देखील येतात, त्यांना परिवर्तन करू शकता आणि स्वतःला अथवा साथीदारांना, परिवाराला परिवर्तन करू शकत नाही? विश्व परिवर्तक अर्थात आत्म्यांना, प्रकृतीला, सर्वांना परिवर्तन करणे. तर आपला केलेला वायदा आठवा, सर्वांनी बाबांसोबत कितीदा तरी वायदा केला आहे परंतु बापदादा हेच पाहत आहेत की काळ खूप वेगाने जवळ येत आहे, सर्वांची हाक खूप वाढत आहे, तर हाक ऐकणारे आणि परिवर्तन करणारे उपकारी आत्मे कोण आहेत? तुम्हीच आहात ना!

बापदादांनी यापूर्वी देखील सांगितले आहे, पर-उपकारी अथवा विश्व-उपकारी बनण्यासाठी तीन शब्द नष्ट करावे लागतील - ओळखता तर आहात. ओळखण्यामध्ये तर हुशार आहात, बापदादा जाणतात सर्व जण हुशार आहेत. एक पहिला शब्द आहे - ‘परचिंतन’, दुसरा आहे - ‘परदर्शन’ आणि तिसरा आहे - ‘परमत’, या तीनही ‘पर’ शब्दांना नष्ट करून, ‘पर-उपकारी’ बनाल. हे तीन शब्दच विघ्न रूप बनतात. लक्षात आहे ना! काही नवीन गोष्ट नाही आहे. तर उद्या चेक करा अमृतवेलेला, बापदादा देखील फेरी मारतात, बघतील काय करत आहात? कारण आता आवश्यकता आहे - समयानुसार, आवाहनानुसार प्रत्येक दुःखी आत्म्याला मनसा सकाश द्वारे सुख शांतीची ओंजळ देण्याची. कारण काय आहे? बापदादा कधी-कधी मुलांना अचानक बघतात, काय करत आहेत? कारण मुलांवर प्रेम तर आहे ना, आणि मुलांसोबत जायचे आहे, एकटे जायचे नाही आहे. सोबत जाणार ना! सोबत येणार? हे पुढे बसलेले हात वर करत नाही आहेत? नाही येणार? येणार आहात ना! बापदादा देखील मुलांमुळे वाट पाहत आहेत, ॲडव्हान्स पार्टी तुमच्या दादी, तुमचे विशेष पांडव, तुम्हा सर्वांचीच प्रतीक्षा करत आहेत, त्यांनी देखील मनामध्ये पक्का वायदा केला आहे की आम्ही सर्व जण सोबत जाणार. थोडे नाही, सगळेच्या सगळे सोबत जाणार. तर उद्या अमृतवेलेला स्वतःला चेक करा की, कोणत्या गोष्टीची कमी आहे? तुमच्या मनसामध्ये, वाणीमध्ये किंवा कर्मणामध्ये काही कमी आहे का? एकदा बापदादांनी सर्व सेंटर्सवर फेरी मारली होती. सांगू काय बघितले? कोणत्या गोष्टीची कमी आहे? तर हेच दिसून आले की एका सेकंदामध्ये परिवर्तन करून फुलस्टॉप लावणे, याची कमी आहे. जोपर्यंत फुलस्टॉप लावाल तोपर्यंत माहित नाही काय-काय होऊन जाते. बापदादांनी ऐकवले आहे की, एक शेवटच्या वेळेतील शेवटचा क्षण असेल ज्यामध्ये फुलस्टॉप लावावा लागेल. परंतु काय बघितले? लावायचा आहे फुलस्टॉप परंतु लागतो क्वामा, दुसऱ्यांच्या गोष्टी आठवतात, हे का होते, असे काय होते, यामध्ये आश्चर्याची मात्रा लागते. तर फुलस्टॉप लागत नाही परंतु क्वामा, आश्चर्याची मात्रा आणि ‘का’ च्या प्रश्नांची क्यू लागते. तर याला चेक करा. जर फुलस्टॉप लावण्याची सवय नसेल तर अंत मती सो गति श्रेष्ठ होणार नाही. उच्च होणार नाही म्हणून बापदादा होमवर्क देत आहेत की, खास उद्या अमृतवेलेला चेक करा आणि चेंज करावे लागेल. तर आता १८ जानेवारीपर्यंत सेकंदामध्ये फुलस्टॉप लावण्याचा वारंवार अभ्यास करा. जानेवारी महिन्यामध्ये सर्वांना बाप समान बनण्याचा उमंग येतो ना, तर १८ जानेवारीमध्ये सर्वांनी आपली चिट्ठी लिहून बॉक्समध्ये टाकायची आहे की, १८ तारखेपर्यंत काय रिझल्ट होता? फुलस्टॉप लागला की आणखी मात्रा लागल्या? पसंत आहे? पसंत आहे? मान हलवा कारण की बापदादांचे मुलांवर खूप प्रेम आहे, एकटे जाऊ इच्छित नाहीत, तर काय करणार? आता वेगाने तीव्र पुरुषार्थ करा. आता ढिला-ढाला पुरुषार्थ सफलता देऊ शकणार नाही.

प्युरिटीला पर्सनॅलिटी, रियल्टी, रॉयल्टी म्हटले जाते. तर आपल्या रॉयल्टीला आठवा. अनादि रूपामध्ये देखील तुम्ही आत्मे बाबांसोबत आपल्या देशामध्ये विशेष आत्मे आहात. जसे आकाशामध्ये विशेष तारे तेजस्वी असल्याचे दिसतात तसे तुम्ही अनादि रूपामध्ये विशेष तारे तेजस्वी आहात. तर आपल्या अनादि काळातील रॉयल्टीला आठवा. नंतर मग सतयुगामध्ये जेव्हा येता तर देवता रूपातील रॉयल्टीला आठवा. सर्वांच्या डोक्यावर रॉयल्टीच्या लाईटचा ताज आहे. अनादि, आदि किती रॉयल्टी आहे. मग द्वापरमध्ये याल तरी देखील तुमच्या चित्रांसारखी रॉयल्टी इतर कोणाचीच नाहीये. नेत्यांची, अभिनेत्यांची, धर्म आत्म्यांची चित्रे (पुतळे) बनतात परंतु तुमच्या चित्रांची (मुर्त्यांची) पूजा आणि तुमच्या चित्रांची विशेषता किती रॉयल आहे. चित्रांना पाहूनच सर्व जण आनंदीत होतात. चित्रांच्या द्वारे देखील किती आशीर्वाद घेतात. तर ही सर्व रॉयल्टी पवित्रतेची आहे. पवित्रता ब्राह्मण जीवनाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. पवित्रतेची कमतरता नाहीशी झाली पाहिजे. असे नाही की, होऊन जाईल, त्यावेळी वैराग्य येईल तर होऊन जाईल, गोष्टी खूप छान-छान ऐकवतात. बाबा, तुम्ही काळजी करू नका, होऊन जाईल. परंतु बापदादांना या जानेवारी महिन्यापर्यंत स्पेशल पवित्रतेमध्ये प्रत्येकाला संपन्न करायचे आहे. पवित्रता केवळ ब्रह्मचर्यच नाही, व्यर्थ संकल्प देखील अपवित्रता आहे. व्यर्थ बोल, व्यर्थ बोल रोबचे (संतापाचे), ज्याला म्हटले जाते क्रोधाचा अंश संताप, तो देखील समाप्त व्हावा. संस्कार असे बनवा जेणेकरून तुम्हाला दुरूनच पाहून पवित्रतेची व्हायब्रेशन्स घेतील; कारण तुमच्यासारखी पवित्रता, जी रिझल्ट मध्ये आत्मा देखील पवित्र, शरीर देखील पवित्र, डबल पवित्रता प्राप्त आहे.

जेव्हा पण कोणताही बच्चा पहिल्यांदा येतो तर बाबांचे कोणते वरदान मिळते? लक्षात आहे? ‘पवित्र भव’, ‘योगी भव’. तर दोन्ही गोष्टी - एक ‘पवित्रता’ आणि दुसरे ‘फुलस्टॉप’, योगी. पसंत आहे? बापदादा अमृतवेलेला फेरी मारतील, सेंटर्सवर देखील फेरी मारतील. बाप-दादा तर एका सेकंदामध्ये चोहो बाजूंना फेरी मारू शकतात. तर या जानेवारी, अव्यक्ती महिन्याचा एखादा नवीन प्लॅन बनवा. मनसा सेवा, मनसा स्थिती आणि अव्यक्त कर्म, बोल यांना वाढवा. तर १८ जानेवारीला बापदादा सर्वांचा रिझल्ट बघतील. प्रेम आहे ना, १८ जानेवारीला अमृतवेलेपासून प्रेमाच्याच गोष्टी करता. सर्व जण उलाहना देतात (तक्रार करतात) की, बाबा अव्यक्त का झाले? तर बाबा देखील तक्रार करत आहेत की, साकारमध्ये असताना बाप समान कधीपर्यंत बनाल?

तर आज थोडेसे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. प्रेम देखील करत आहेत, फक्त लक्षच वेधून घेत नाही आहेत, प्रेम सुद्धा आहे कारण बाबांची हीच इच्छा आहे की माझा एकही मुलगा मागे राहू नये. प्रत्येक कर्मासाठीचे श्रीमत चेक करा, अमृतवेलेपासून रात्रीपर्यंत प्रत्येक कर्मासाठी जे काही श्रीमत मिळाले आहे ते चेक करा. मजबूत आहात ना! सोबत यायचे आहे ना! यायचे असेल तर हात वर करा. यायचे आहे? अच्छा, टीचर्स? मागे बसलेले, खुर्चीवाले, पांडव हात वर करा. तर समान बनाल तेव्हाच तर हातामध्ये हात देऊन याल ना! करायचेच आहे, बनायचेच आहे, हा दृढ संकल्प करा. १५-२० दिवस ही दृढता राहते नंतर मग हळू-हळू थोडासा निष्काळजीपणा येतो. तर निष्काळजीपणाला नष्ट करा. असे बघितले आहे की, जास्तीत जास्त एक महिना फुल उमंग असतो, दृढता असते आणि एका महिन्यानंतर थोडा-थोडा निष्काळजीपणा सुरु होतो. तर आता हे वर्ष समाप्त होईल, तर काय समाप्त करणार? वर्ष समाप्त करणार की वर्षाच्या सोबत जी काही संकल्पामध्ये देखील, धारणेमध्ये देखील कमजोरी आहे, त्याला समाप्त कराल? करणार ना! हात वर करायला लावत नाही? तर ऑटोमॅटिक मनामध्ये हे गाणे वाजले पाहिजे - ‘अब घर चलना है’. फक्त जायचे नाहीये परंतु राज्यामध्ये देखील यायचे आहे. अच्छा, जे बापदादांना भेटण्यासाठी पहिल्यांदाच आले आहेत, त्यांनी हात वर करा, उठून उभे रहा.

तर पहिल्या वेळी आलेल्यांना विशेष मुबारक देत आहेत. लेट आला आहात, टू लेट नाही आला आहात. परंतु तीव्र पुरुषार्थाचे वरदान सदैव लक्षात ठेवा, तीव्र पुरुषार्थ करायचाच आहे. करणार, र र करायचे नाही, करायचेच आहे. लास्ट सो फास्ट आणि फर्स्ट यायचे आहे. अच्छा.

चोहो बाजूंच्या महान पवित्र आत्म्यांना बापदादांचे विशेष हृदयापासून आशीर्वाद, हृदयापासून प्रेम आणि हृदयामध्ये एकरूप होण्याबद्दल मुबारक असो. बापदादा जाणतात की जेव्हा पण पधरामणी होते तर विविध साधनांद्वारे ई-मेल किंवा पत्राने चोहो बाजूंची मुले प्रेमपूर्वक आठवण पाठवतात आणि बापदादांना ऐकवण्यापूर्वी कोणी देईल, त्याच्या अगोदरच सर्वांची प्रेमपूर्वक आठवण पोहोचते कारण की अशी जी सिकीलधी आठवण करणारी मुले आहेत त्यांचे कनेक्शन खूप फास्ट पोहोचते, तुम्ही लोकं तीन-चार दिवसानंतर समोर भेटता परंतु त्यांची प्रेमपूर्वक आठवण जे खरे पात्र आत्मे आहेत त्यांची त्याच क्षणी बापदादांकडे प्रेमपूर्वक आठवण पोहोचते. तर ज्यांनी पण मनात देखील आठवण केली, साधन मिळाले नाही, त्यांची देखील प्रेमपूर्वक आठवण पोहोचली आहे, आणि बापदादा प्रत्येक मुलाला पदम-पदम-पदम पटीने प्रेमपूर्वक आठवणीचा प्रतिसाद देत आहेत.

बाकी चोहो बाजूंना आता दोन शब्दांची लात-तात लावा (तीव्रतेने लक्ष द्या) - एक फुलस्टॉप आणि दुसरे संपूर्ण पवित्रता सर्व ब्राह्मण परिवारामध्ये पसरवायची आहे. जे कमजोर आहेत त्यांना देखील सहयोग देऊन बनवा. हे खूप मोठे पुण्य आहे. सोडून देऊ नका, ‘हा तर आहेच असा’, ‘हा तर बदलणारच नाही’, असा शाप देऊ नका, पुण्याचे काम करा. बदलून दाखवणार, बदलायचेच आहे. त्यांच्या आशा वाढवा, पडलेल्याला अजून पाडू नका, आधार द्या, शक्ति द्या. तर चोहो बाजूंना भाग्यशाली आनंदी असणाऱ्या आणि आनंद वाटणाऱ्या मुलांना खूप-खूप प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
चेकिंग करण्याच्या विशेषतेला आपला असली संस्कार बनविणारे महान आत्मा भव

जो पण संकल्प कराल, शब्द बोलाल, कर्म कराल, संबंध अथवा संपर्कामध्ये याल तर फक्त एवढे चेकिंग करा की, हे बाप समान आहे! अगोदर पडताळून पहा आणि मग प्रॅक्टिकलमध्ये आणा. जसे स्थूलमध्ये देखील बऱ्याच आत्म्यांचे संस्कार असतात, अगोदर चेक करतील नंतर स्वीकार करतील. असे तुम्ही महान पवित्र आत्मे आहात, तर चेकिंगची मशिनरी वेगवान करा. याला आपला निजी संस्कार (असली संस्कार) बनवा - हीच सर्वात मोठी महानता आहे.

सुविचार:-
संपूर्ण पवित्र आणि योगी बनणे हेच प्रेमाचे रिटर्न देणे आहे.

अव्यक्त इशारे:- या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा. आता ज्या काही परिस्थिती येत आहेत किंवा येणार आहेत, प्रकृतीची पाचही तत्वे चांगलेच हादरवून टाकण्याचा प्रयत्न करतील; परंतु जीवनमुक्त विदेही अवस्थेची अभ्यासू आत्मा अचल-अडोल पास विद ऑनर होऊन सर्व गोष्टी सहजच पार करेल. त्यामुळे निरंतर कर्मयोगी, निरंतर सहज योगी, निरंतर मुक्त आत्म्याचे संस्कार आत्तापासूनच अनुभवामध्ये आणायचे आहेत.