04-03-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - ज्यांनी सुरुवातीपासून भक्ती केली आहे, ८४ जन्म घेतले आहेत, ते तुमच्या ज्ञानाला अतिशय आवडीने ऐकतील, इशाऱ्यानेच समजून जातील”

प्रश्न:-
देवी-देवता घराण्यातील जवळची आत्मा आहे की दूरची आत्मा आहे, याची परख काय असेल?

उत्तर:-
जे तुमच्या देवता घराण्यातील आत्मे असतील, त्यांना ज्ञानाच्या सर्व गोष्टी ऐकताच पटतील, ते कधी गोंधळणार नाहीत. जितकी जास्त भक्ती केली असेल तितके जास्त ऐकण्याचा प्रयत्न करतील. तर मुलांनी नाडी पाहून सेवा केली पाहिजे.

ओम शांती।
रुहानी बाबा (आत्मिक पिता) बसून रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत. हे तर मुलांना समजले आहे की, रूहानी बाबा आहेत निराकार, या शरीराद्वारे बसून समजावून सांगतात, आपण आत्मे देखील निराकार आहोत, या शरीराद्वारे ऐकतो. तर आता दोन पिता एकत्र आहेत ना. मुले जाणतात दोन्ही पिता इथे आहेत. तिसऱ्या पित्याला जाणता परंतु त्यांच्यापेक्षाही हे चांगले आहेत, यांच्यापेक्षा ते चांगले आहेत, नंबरवार आहेत ना. तर त्या लौकिकपासून नाते संपून या दोघांशी नाते बाकी राहते. बाबा बसून समजावून सांगत आहेत की, लोकांना कसे समजावून सांगितले पाहिजे. तुमच्याकडे यात्रा-प्रदर्शनीमध्ये तर खूप येतात. हे देखील तुम्ही जाणता ८४ जन्म काही सर्वच तर घेत नसतील. हे कसे माहित होईल की हे ८४ जन्म घेणारे आहेत की १० जन्म घेणारे आहेत की २० जन्म घेणारे आहेत? आता तुम्ही मुले हे तर समजता की ज्यांनी सुरुवातीपासून खूप भक्ती केली असेल, तर त्यांना फळ देखील तितकेच लवकर आणि चांगले मिळेल. थोडी भक्ती केली असेल आणि उशिराने केली असेल तर फळ देखील तितकेच कमी आणि उशिराने मिळेल. हे सेवा करणाऱ्या मुलांसाठी बाबा सांगत आहेत. बोला, तुम्ही भारतवासी आहात तर सांगा देवी-देवतांना मानता? भारतामध्ये या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते ना. जो ८४ जन्म घेणारा असेल, सुरुवातीपासून भक्ती केली असेल तो लगेच समजेल - बरोबर आदि सनातन देवी-देवता धर्म होता, आवडीने ऐकू लागतील. कोणी तर असेच पाहून निघून जातात, काही विचारत सुद्धा नाहीत जणू काही बुद्धीमध्ये घुसतच नाही. तर त्यांच्यासाठी समजले पाहिजे की, हा आता तरी इथला नाही आहे. पुढे चालून समजून देखील घेईल. कोणाची तर समजावून सांगितल्यावर लगेच मान हालेल. बरोबर, या हिशेबाने तर ८४ जन्म ठीक आहेत. म्हणतात - आम्ही कसे समजायचे की पूर्ण ८४ जन्म घेतले आहेत? अच्छा, ८४ नाही तर मग ८२, देवता धर्मामध्ये तर आला असाल. आणि मग पहा एवढे सुद्धा बुद्धीला पटत नसेल तर समजा हा काही ८४ जन्म घेणारा नाहीये. दूरचे (देवी-देवता कुळामध्ये कमी जन्म घेणारे) कमी ऐकतील. जितकी जास्त भक्ती केली असेल ते जास्त ऐकण्याचा प्रयत्न करतील. लगेच समजून जातील. ड्रामा रिपीट होतो ना. सर्वकाही भक्तीवर अवलंबून आहे. यांनी (ब्रह्मा बाबांनी) सर्वात नंबर वन भक्ति केली आहे ना. कमी भक्ती केली असेल तर फळ देखील कमी मिळेल. या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. मंदबुद्धि वाले धारणा करू शकणार नाहीत. हे मेळावे-प्रदर्शनी तर होतच राहील. सर्व भाषांमध्ये निघतील. संपूर्ण दुनियेला समजावून सांगायचे आहे ना. तुम्ही आहात खरे-खरे पैगंबर आणि मेसेंजर. ते धर्म स्थापक तर काहीच करत नाहीत आणि ना काही ते गुरु आहेत. गुरु म्हणतात परंतु ते काही सद्गती दाता थोडेच आहेत. ते जेव्हा येतात, त्यांची संस्थाच नाही तर सद्गती तरी कोणाची करतील. गुरु तो जो सद्गती देईल, दुःखाच्या दुनियेमधून शांतीधाममध्ये घेऊन जाईल. क्राईस्ट इत्यादी काही गुरु नाही आहे, ते केवळ धर्म स्थापक आहेत. त्यांची अजून दुसरी कोणती पोझीशन नाही आहे. पोझीशन तर त्यांची आहे, जे सर्वप्रथम सतोप्रधानमध्ये, नंतर मग सतो, रजो, तमोमध्ये येतात. ते धर्मस्थापक तर केवळ आपला धर्म स्थापन करून पुनर्जन्म घेत राहतील. मग जेव्हा सर्वांची तमोप्रधान अवस्था होते तेव्हा बाबा येऊन सर्वांना पवित्र बनवून घेऊन जातात. पावन बनला की मग पतित दुनियेमध्ये राहू शकत नाही. पवित्र आत्मे निघून जातील मुक्तीमध्ये, आणि नंतर जीवनमुक्तीमध्ये येतील. म्हणतात देखील - ‘ते लिब्रेटर आहेत, गाईड आहेत…’ परंतु याचा देखील अर्थ समजत नाहीत. अर्थ समजले असते तर त्यांना ओळखले असते. सतयुगामध्ये भक्तिमार्गातील शब्द देखील बंद होतात.

हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे, जे सर्वजण आपापला पार्ट बजावत राहतात. सद्गगती तर एकही प्राप्त करू शकत नाही. आता तुम्हाला हे ज्ञान मिळत आहे. बाबा देखील म्हणतात मी कल्प-कल्प, कल्पाच्या संगमयुगावर येतो. याला म्हटले जाते कल्याणकारी संगमयुग, इतर कोणतेही युग कल्याणकारी नाहीये. सतयुग आणि त्रेताच्या संगमाचे काहीही महत्त्व नाही. सूर्यवंशी होऊन गेले की त्यानंतर मग चंद्रवंशी राज्य चालते. मग चंद्रवंशी पासून वैश्यवंशी बनतील तेव्हा चंद्रवंशी भूतकाळात जमा झाले. वैश्यवंशी नंतर कोण बनले, हे माहीतच नसते. चित्र इत्यादी बाकी राहतात त्यामुळे समजतात हे सूर्यवंशी आपले पूर्वज होते, हे चंद्रवंशी होते. ते महाराजा, ते राजा, ते खूप श्रीमंत होते. तरीही ते (चंद्रवंशी) नापास तर झाले ना. या गोष्टी काही शास्त्र इत्यादींमध्ये नाही आहेत. आता बाबा बसून समजावून सांगतात. सर्वजण म्हणतात - ‘आम्हाला लिबरेट करा, पतितापासून पावन बनवा’. सुखासाठी म्हणणार नाहीत कारण शास्त्रांमध्ये सुखासाठी निंदा केली आहे. सर्वजण म्हणतील की, मनाची शांती कशी मिळेल? आता तुम्ही मुले समजता तुम्हाला सुख-शांती दोन्ही मिळतात, जिथे शांती आहे तिथे सुख आहे. जिथे अशांती आहे, तिथे दु:ख आहे. सतयुगामध्ये सुख-शांती आहे, इथे दु:ख-अशांती आहे. हे बाबा बसून समजावून सांगतात. तुम्हाला माया रावणाने किती तुच्छ-बुद्धि बनवले आहे, हा देखील ड्रामा बनलेला आहे. बाबा म्हणतात - मी देखील ड्रामाच्या बंधनामध्ये बांधलेला आहे. माझा पार्टच आत्ता आहे जो बजावत आहे. म्हणतात देखील - बाबा कल्प-कल्प तुम्हीच येऊन आम्हाला भ्रष्टाचारी पतितापासून श्रेष्ठाचारी पावन बनवता. भ्रष्टाचारी बनले आहात रावणा द्वारे. आता बाबा येऊन मनुष्यापासून देवता बनवतात. हे जे गायन आहे त्याचा अर्थ बाबाच येऊन समजावून सांगतात. त्या अकालतख्तावर बसणारे देखील याचा अर्थ समजत नाहीत. बाबांनी तुम्हाला समजावून सांगितला आहे - आत्मे अकाल मूर्त आहेत. आत्म्याचे हे शरीर आहे - रथ, यावर अकाल अर्थात ज्याला काळ खात नाही, ती आत्मा विराजमान आहे. सतयुगामध्ये तुम्हाला काळ खाणार नाही. कधी अकाली मृत्यू होणार नाही. ते आहेच अमरलोक, हे आहे मृत्यूलोक. अमरलोक, मृत्यूलोक याचा देखील अर्थ कोणाला समजत नाही. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला खूप सोपे समजावून सांगतो - फक्त मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुम्ही पावन बनाल’. साधु-संत इत्यादी देखील गातात - ‘पतित-पावन…’ पतित-पावन बाबांना बोलावतात, कुठेही जाल तर हे जरूर म्हणतील - ‘पतित-पावन…’ सत्य तर कधीही लपू शकत नाही. तुम्ही जाणता आता पतित-पावन बाबा आलेले आहेत. आपल्याला रस्ता सांगत आहेत. कल्पापूर्वी देखील सांगितले होते - ‘स्वतःला आत्मा समजून मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुम्ही सतोप्रधान बनाल’. तुम्ही सर्व आशिक आहात मज माशुकचे. ते (या दुनियेतील) आशिक-माशुक तर एका जन्माचे असतात, तुम्ही जन्म-जन्मांतरीचे आशिक आहात. आठवण करत आले आहात - ‘हे प्रभू’. देणारे तर एक बाबाच आहेत ना. मुले सर्वकाही बाबांकडेच मागतील. आत्मा जेव्हा दुःखी होते तेव्हा पित्याची आठवण करते. सुखामध्ये कोणीही आठवण करत नाहीत, दुःखामध्ये आठवण करतात - बाबा येऊन सद्गती द्या. ज्याप्रमाणे गुरूकडे जातात आणि म्हणतात - आम्हाला मूल द्या. ठीक आहे, मूल झाले की मग खूप आनंद होईल. मूल नाही झाले तर म्हणतील ईश्वराची भावी. ड्रामाला तर ते समजतच नाहीत. जर ते ‘ड्रामा’ म्हणत असतील तर मग सर्व ठाऊक असले पाहिजे ना. तुम्ही ड्रामाला जाणता, इतर कोणीही जाणत नाहीत. ना कोणत्या शास्त्रांमध्ये सुद्धा आहे. ड्रामा अर्थात ड्रामा. त्याच्या आदि-मध्य-अंता विषयी ठाऊक असले पाहिजे. बाबा म्हणतात - ‘मी दर ५ हजार वर्षा नंतर येतो. ही चार युगे एकदम समान आहेत. स्वस्तिकाचे देखील महत्त्व आहे ना. खाते पुस्तक जे बनवतात तर त्याच्यावर स्वस्तिका काढतात. हे देखील खाते आहे ना. आपला फायदा कसा होतो, आणि मग घाटा कसा होतो. घाटा होत-होत आता पूर्णच घाटा झाला आहे. हा जय-पराजयाचा खेळ आहे. पैसा आहे आणि हेल्थ देखील आहे तर सुख आहे, पैसा आहे आणि हेल्थ नसेल तर सुख नाही. तुम्हाला हेल्थ-वेल्थ दोन्ही देतो. तर हॅपिनेस आहेच आहे.

जेव्हा कोणी शरीर सोडतात तेव्हा तोंडाने तर म्हणतात की, अमका स्वर्गवासी झाला. परंतु आतून दुःखी होत राहतात. यामध्ये तर अजूनच आनंद झाला पाहिजे; मग त्यांच्या आत्म्याला नरकामध्ये का बोलावता? काहीच समजत नाहीत. आता बाबा येऊन या सर्व गोष्टी समजावून सांगतात. बीज आणि झाडाचे रहस्य समजावून सांगतात. असे झाड तर दुसरे कोणीही बनवू शकणार नाही. हे काही यांनी (ब्रह्मा बाबांनी) बनवलेले नाहीये. यांचा कोणता गुरु नव्हता. जर असता तर त्यांचे अजूनही शिष्य असले असते ना. मनुष्य समजतात यांना कोणत्या तरी गुरुने शिकवले आहे नाहीतर मग म्हणतात - परमात्म्याची शक्ती प्रवेश करते. अरे, परमात्म्याची शक्ती कशी प्रवेश करेल! बिचारे काहीच जाणत नाहीत. बाबा स्वतः बसून सांगतात - ‘मी सांगितले होते, मी साधारण वृद्ध तनामध्ये येतो, येऊन तुम्हाला शिकवतो’. हे (ब्रह्मा बाबा) देखील ऐकतात, लक्ष तर माझ्याकडे आहे. हे देखील स्टुडंट आहेत. हे स्वतःला अजून काहीच म्हणत नाहीत. प्रजापिता तेही स्टुडंट आहेत. भले यांनी विनाश देखील पाहिला परंतु समजले काहीच नाहीत. हळू-हळू समजत गेले. ज्याप्रमाणे तुम्ही समजत जात आहात. बाबा तुम्हाला समजावून सांगतात, तर मधे हे (ब्रह्मा) देखील समजत जातात, अभ्यास करत राहतात. प्रत्येक स्टुडंट अभ्यास करण्याचा पुरुषार्थ करतील. ब्रह्मा, विष्णू, शंकर तर आहेत सूक्ष्मवतनवासी. त्यांचा काय पार्ट आहे, हे देखील कोणीही जाणत नाहीत. बाबा प्रत्येक गोष्ट आपणच समजावून सांगतात. तुम्ही कोणता प्रश्न विचारू शकत नाही. वरती आहेत शिव परमात्मा त्यानंतर मग देवता, त्यांना एकत्र कसे काय करू शकतात. आता तुम्ही मुले जाणता बाबा यांच्यामध्ये (ब्रह्मामध्ये) येऊन प्रवेश करतात म्हणून म्हटले जाते - ‘बापदादा’. बाबा वेगळे आहेत, दादा वेगळे आहेत. ‘बाबा’ - शिव आहेत आणि ‘दादा’ - ब्रह्मा आहेत. वारसा शिवबाबांकडून मिळतो यांच्याद्वारे. ब्राह्मण झाले ब्रह्माची मुले. बाबांनी ड्रामा प्लॅन अनुसार ॲडॉप्ट केले आहे. बाबा म्हणतात नंबर वन भक्त हे (ब्रह्मा) आहेत. ८४ जन्म देखील यांनीच घेतले आहेत. सावळा आणि गोरा यांनाच म्हटले जाते. श्रीकृष्ण सतयुगामध्ये गोरा होता, कलियुगामध्ये सावळा आहे. पतित आहे ना मग पावन बनतो. तुम्ही देखील असे बनता. हे आहे आयरन एजेड वर्ल्ड (कलियुगी दुनिया) ते आहे गोल्डन एजेड वर्ल्ड (सुवर्णयुगी दुनिया). शिडी विषयी कोणालाच माहित नाही आहे, जे शेवटी येतात ते ८४ जन्म थोडेच घेत असतील. ते जरूर कमी जन्म घेतील मग त्यांना शिडीच्या चित्रामध्ये दाखवू कसे शकतो. बाबांनी हे समजावून सांगितले आहे की, सर्वात जास्त जन्म कोण घेतील? आणि सर्वात कमी जन्म कोण घेतील? हे आहे नॉलेज. बाबाच नॉलेजफुल, पतित-पावन आहेत. आदि-मध्य-अंताचे नॉलेज ऐकवत आहेत. ते सर्व नेती-नेती करत आले आहेत. आपल्या आत्म्यालाच जाणत नाहीत तर बाबांना मग कसे जाणतील? तुम्ही आता जाणता - आत्मा अविनाशी आहे, त्यामध्ये ८४ जन्मांचा अविनाशी पार्ट नोंदलेला आहे. इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये किती सारा पार्ट नोंदलेला आहे, जे चांगल्या प्रकारे ऐकतात आणि समजून घेतात तर समजले जाते हे जवळचे आहेत. बुद्धीमध्ये बसत नसेल तर उशिराने येणारा असेल. ज्ञान सांगते वेळी नाडी पाहिली जाते. समजावून सांगणारे देखील नंबरवार आहेत ना. तुमचा हा अभ्यास आहे, राजधानी स्थापन होत आहे. कोणी तर उच्च ते उच्च राजाई पद प्राप्त करतात, कोणी तर प्रजेमध्ये नोकर-चाकर बनतात. बाकी होय, एवढे मात्र आहे की सतयुगामध्ये कोणतेही दुःख नसते. त्याला म्हटलेच जाते सुखधाम, बहिश्त. पास्ट (भूतकाळ) होऊन गेला आहे तेव्हाच तर आठवण करतात ना. मनुष्य समजतात स्वर्ग वर छतावर कुठेतरी असेल. दिलवाडा मंदिरामध्ये तुमचे पूर्ण यादगार उभे आहे. आदि-देव, आदि-देवी आणि मुले खाली योगामध्ये बसली आहेत. वरती राजाई उभी आहे. मनुष्य तर दर्शन करतील, पैसे ठेवतील. समजणार काहीच नाहीत. तुम्हा मुलांना ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे, तुम्ही सर्वात पहिले तर बाबांच्या बायोग्राफीला जाणले आहे मग अजून काय पाहिजे. बाबांना जाणल्यानेच सर्वकाही लक्षात येते तर आनंद झाला पाहिजे. तुम्ही जाणता आता आपण सतयुगामध्ये जाऊन सोन्याचे महाल बनवणार, राज्य करणार. जी सेवाभावी मुले आहेत त्यांच्या बुद्धीमध्ये राहील की, हे स्पिरिचुअल नॉलेज स्पिरिचुअल फादर देत आहेत. स्पिरिचुअल फादर म्हटले जाते आत्म्यांच्या पित्याला. तेच सद्गती दाता आहेत. सुख-शांतीचा वारसा देतात. तुम्ही समजावून सांगू शकता की, ही शिडी आहे भारतवासीयांची जे ८४ जन्म घेतात. तुम्ही येताच आहात अर्ध्यानंतर, तर तुमचे ८४ जन्म कसे काय असू शकतील? सर्वात जास्त जन्म आपण घेतो. या नीट समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. मुख्य गोष्ट आहेच मुळी पतितापासून पावन बनण्यासाठी बुद्धियोग लावायचा आहे. पावन बनण्याची प्रतिज्ञा करून मग जर पतित बनतात तर एकदम हाडेच मोडून पडतात, जसे काही पाचव्या मजल्यावरून खाली कोसळतात. बुद्धीच म्लेंछची (पापीची) होईल, मन आतल्या-आत खात राहील. मुखावाटे काहीच ज्ञान निघणार नाही. म्हणून बाबा म्हणतात सावध रहा. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या ड्रामाला यथार्थ रीतीने समजून मायेच्या बंधनांपासून मुक्त व्हायचे आहे. स्वतःला अकालमूर्त आत्मा समजून बाबांची आठवण करून पावन बनायचे आहे.

२) खरे-खरे पैगंबर आणि मेसेंजर बनून सर्वांना शांतीधाम, सुखधामचा रस्ता सांगायचा आहे. या कल्याणकारी संगमयुगावर सर्व आत्म्यांचे कल्याण करायचे आहे.

वरदान:-
बाबांच्या आणि सेवेच्या स्मृतीद्वारे एकरस स्थितीचा अनुभव करणारे सर्व आकर्षण मुक्त भव

ज्याप्रमाणे सेवकाला नेहमी सेवेची आणि मालकाची आठवण राहते. असे विश्व सेवाधारी, खऱ्या सेवाधारी मुलांना देखील बाबा आणि सेवेच्या व्यतिरिक्त काहीच आठवण राहत नाही, याद्वारेच एकरस स्थितीमध्ये राहण्याचा अनुभव होतो. त्यांना एका बाबांच्या रसाच्या शिवाय बाकी सर्व रस निरस वाटतात. एका बाबांच्या रसाचा अनुभव असल्या कारणामुळे दुसरीकडे कुठेही आकर्षण जाऊ शकत नाही, या एकरस स्थितीचा तीव्र पुरुषार्थच आकर्षणापासून मुक्त बनवतो. हेच श्रेष्ठ ध्येय आहे.

बोधवाक्य:-
नाजूक परिस्थितीच्या पेपरमध्ये पास व्हायचे असेल तर आपल्या नेचरला शक्तिशाली बनवा.

अव्यक्त इशारे - सत्यता आणि सभ्यता रुपी कल्चरला धारण करा:-

जेव्हा पण कोणती असत्य गोष्ट पाहता, ऐकता तर असत्य वायुमंडळ पसरवू नका. बरेचजण म्हणतात - हे पाप कर्म आहे ना, पाप कर्म बघवत नाही परंतु वायुमंडळामध्ये असत्य गोष्टी पसरविणे हे सुद्धा पापच तर आहे. लौकिक परिवारामध्ये देखील जर कोणती अशी गोष्ट बघण्यात किंवा ऐकण्यात येते तेव्हा तीला पसरवले जात नाही. कानाने ऐकले आणि काळजामध्ये लपवले. जर कोणी व्यर्थ गोष्टींचा फैलाव करतात तर ही छोटी-छोटी पापे उडत्या कलेच्या अनुभवाला नाहीसे करतात, त्यामुळे या कर्मांच्या गूढ गतीला समजून घेऊन यथार्थ रूपामध्ये सत्यतेची शक्ती धारण करा.