04-03-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो, तुमचा धंदा आहे मनुष्यांना जागे करणे, रस्ता सांगणे, जेवढे तुम्ही
देही-अभिमानी बनून बाबांचा परिचय द्याल, तेवढे कल्याण होईल”
प्रश्न:-
गरीब मुले
आपल्या कोणत्या विशेषतेच्या आधारे श्रीमंतांपेक्षाही पुढे निघून जातात?
उत्तर:-
गरीबांमध्ये दान-पुण्य करण्यावर खूप श्रद्धा असते. गरीब भक्ती देखील खूप प्रेमाने
करतात. साक्षात्कार देखील गरिबांनाच होतो. श्रीमंतांना आपल्या धनाचा अभिमान असतो,
त्यांच्याकडून जास्त पाप होते; त्यामुळे गरीब मुलेच श्रीमंतांपेक्षाही पुढे निघून
जातात.
गीत:-
ओम नमः शिवाय...
ओम शांती।
‘तुम मात-पिता हम बालक तेरे…’ ही तर जरूर परमपिता परमात्म्याचीच महिमा गायली गेली
आहे. ही तर स्पष्ट महिमा आहे, कारण ते रचयिता आहेत. लौकिक माता-पिता देखील मुलाचे
रचयिता आहेत. पारलौकिक पित्याला देखील रचता म्हटले जाते. बंधू, सहाय्यक… भरपूर महिमा
गातात. लौकिक पित्याची एवढी महिमा नाहीये. परमपिता परमात्म्याची महिमाच वेगळी आहे.
मुले देखील महिमा करतात - ज्ञानाचा सागर आहेत, नॉलेजफुल आहेत. त्यांच्यामध्ये सारे
ज्ञान आहे. हे नॉलेज काही शरीर निर्वाहाच्या शिक्षणाचे नाही आहे. त्यांना ज्ञानाचा
सागर, नॉलेजफुल म्हटले जाते. तर जरूर त्यांच्याकडे ज्ञान आहे, परंतु कोणते ज्ञान?
हे सृष्टीचक्र कसे फिरत आहे, त्याचे ज्ञान आहे. तर तेच ज्ञान-सागर पतित-पावन आहेत.
कृष्णाला कधी पतित-पावन किंवा ज्ञानाचा सागर म्हणत नाहीत. त्यांची महिमा फारच वेगळी
आहे. दोघेही भारताचे निवासी आहेत. शिवबाबांची देखील भारतामध्येच महिमा आहे. शिवजयंती
देखील इथे साजरी करतात. कृष्णाची जयंती देखील साजरी करतात. गीता जयंती सुद्धा साजरी
करतात. मुख्य ३ जयंत्या आहेत. आता प्रश्न निर्माण होतो की, पहिली जयंती कोणाची झाली
असेल? शिवबाबांची की श्रीकृष्णाची? मनुष्य तर बाबांना पूर्णपणे विसरून गेले आहेत.
कृष्णाची जयंती मोठ्या धुमधडाक्याने, प्रेमाने साजरी करतात. शिवजयंती विषयी एवढे
कोणाला माहित नाही आहे, ना गायन आहे. शिवाने येऊन काय केले. त्यांच्या बायोग्राफी
विषयी (चरित्राविषयी) कोणालाच माहिती नाही आहे. कृष्णाच्या तर भरपूर गोष्टी
लिहिलेल्या आहेत. गोपिकांना पळविले, हे केले. कृष्णाच्या चरित्राचे खास एक मासिक
देखील निघत आहे. शिवाचे चरित्र इत्यादी काहीच नाही आहे. कृष्णाची जयंती कधी झाली?
मग गीतेची जयंती कधी झाली? कृष्ण जेव्हा मोठा होईल तेव्हाच तर ज्ञान ऐकवेल.
कृष्णाच्या बालपणा विषयी तर दाखवतात की, त्याला टोपलीमध्ये ठेवून नदी ओलांडून पलीकडे
घेऊन गेले. तर मोठेपणी दाखवतात की, रथावर उभा आहे, सुदर्शन चक्र फिरवत आहे. १६-१७,
वर्षाचा असेल. बाकीची चित्रे बालपणीची दाखवली आहेत. मग आता गीता कधी ऐकवली. त्यावेळी
तर ऐकवली नसेल; जेव्हा की त्यांच्याविषयी लिहितात की, अमकीला पळवले, असे केले.
त्यावेळी तर ज्ञान शोभणार देखील नाही. ज्ञान तर जेव्हा वृद्ध होतील, तेव्हा एकवेल.
गीता देखील काही काळा नंतर ऐकवली असेल. आता शिवाने काय केले, काहीच ठाऊक नाही.
अज्ञान निद्रेमध्ये झोपी गेले आहेत. बाबा म्हणतात कि, माझ्या बायोग्राफी विषयी (चरित्रा
विषयी) तर कोणालाच माहिती नाही आहे. मी काय केले? मलाच पतित-पावन म्हणतात. मी येतो,
तर सोबत गीता आहे, मी साधारण वृद्ध अनुभवी तनामध्ये येतो. शिवजयंती तुम्ही
भारतामध्येच साजरी करता. कृष्ण जयंती, गीता जयंती, या ३ मुख्य जयंत्या आहेत. रामाची
जयंती तर नंतर होते. यावेळी जे काही घडते, ते नंतर सणाच्या रूपामध्ये साजरे केले
जाते. सतयुग-त्रेतामध्ये जयंती इत्यादी असत नाही. सुर्यवंशींकडून चंद्रवंशी वारसा
घेतात बाकी इतर कोणाचीच महिमा नाहीये. फक्त राजांचा राज्याभिषेक साजरा करत असतील.
बर्थडे तर आजकाल सगळेच साजरे करतात. ही तर साधारण गोष्ट झाली. कृष्णाने जन्म घेतला,
मोठा होऊन राजधानी चालवली, यामध्ये महीमेची तर गोष्टच नाही. सतयुग-त्रेतामध्ये
सुखाचे राज्य चालत आले आहे. ते राज्य कधी, कसे स्थापन झाले! हे तुमच्या मुलांच्या
बुद्धीमध्ये आहे. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, मी कल्प-कल्प, कल्पाच्या संगमयुगावर येतो.
कलियुगाचा अंत पतित दुनिया आहे. सतयुग आदि पावन दुनिया आहे. मी पिता देखील आहे,
तुम्हा मुलांना वारसा देखील देत आहे. कल्पापूर्वी देखील तुम्हाला वारसा दिला होता
म्हणून तुम्ही साजरे करत आला आहात. परंतु नाव विसरून गेल्यामुळे, कृष्णाचे नाव
लिहिले आहे. मोठ्यात मोठे शिव आहेत ना? सर्व प्रथम जेव्हा त्यांची जयंती होईल,
तेव्हाच मग साकार मनुष्याची होईल. आत्मे खरे तर सर्व वरून खाली उतरतात. माझे देखील
अवतरण आहे. श्रीकृष्णाने मातेच्या गर्भातून जन्म घेतला, पालना घेतली. सर्वांना
पुनर्जन्मामध्ये यायचेच आहे. शिवबाबा पुनर्जन्म घेत नाहीत, येतात तर खरे ना. तर हे
सर्व बाबा बसून समजावून सांगत आहेत. ब्रह्मा, विष्णू, शंकर यांना त्रिमूर्ती
रूपामध्ये दाखवतात ना. ब्रह्मा द्वारे स्थापना, कारण शिवाला तर स्वतःचे शरीरच नाहीये.
ते स्वतः येऊन सांगतात की, मी यांच्या वृध्द तनामध्ये येतो. हे (ब्रह्मा बाबा)
आपल्या जन्मांना जाणत नाहीत. यांच्या अनेक जन्मांतील हा अंतीम जन्म आहे. सर्वात
पहिले हे समजावून सांगावे लागेल. शिवजयंती मोठी की श्रीकृष्ण जयंती मोठी? जर
कृष्णाने गीता ऐकवली असेल, तर मग गीता जयंती तर कृष्णाला बरीच वर्षे झाल्या नंतर
होऊ शकेल, अर्थात जेव्हा कृष्ण मोठा होईल त्यानंतरच गीता जयंती होऊ शकेल. या सर्व
समजून घेण्याच्या गोष्टी आहेत ना. परंतु खरे तर शिवजयंती नंतर ताबडतोब गीता जयंती
होते. हे देखील पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. पॉईंट्स तर अनेक आहेत. लिहिल्या शिवाय
ते लक्षात राहू शकणार नाहीत. बाबा एवढे जवळ आहेत, त्यांचा हा रथ आहे, ते ब्रह्मा
बाबा देखील म्हणतात की, सर्व पॉईंट्स वेळेवर आठवणे, हे खूप कठीण आहे. बाबांनी
सांगितले आहे की, सर्वांना दोन पित्यांचे रहस्य समजावून सांगा. शिवबाबांची जयंती
साजरी करतात, तर जरूर येत असतील. जसे क्राईस्ट, बुद्ध इत्यादी येऊन आपला धर्म
स्थापन करतात. ती देखील आत्मा येऊन प्रवेश करून धर्म स्थापन करते. ते आहेत हेवनली
गॉड फादर, सृष्टीचे रचयिता. तर जरूर नवीन सृष्टी रचतील ना. जुनी थोडीच रचतील. नवीन
सृष्टीला स्वर्ग म्हटले जाते, आता आहे नरक. बाबा म्हणतात - मी कल्प-कल्पाच्या
संगमावर येऊन तुम्हा मुलांना राजयोगाचे ज्ञान देतो. हा आहे भारताचा प्राचीन योग.
कोणी शिकविला? शिवबाबांचे नाव तर नाहीसे केले आहे. एक तर म्हणतात गीतेचा भगवान
श्रीकृष्ण आहेत आणि विष्णू इत्यादींची नावे देतात. शिवबाबांनी राजयोग शिकविला होता.
हे कोणालाच ठाऊक नाही आहे. शिवजयंती निराकाराचीच जयंती दाखवतात. ते कसे आले, येऊन
काय केले? ते तर सर्वांचे सद्गती दाता, लिबरेटर, गाईड आहेत. आता सर्व आत्म्यांना
गाईड पाहिजे परमात्मा. ते देखील आत्मा आहेत. जसे मनुष्यांचा गाईड देखील मनुष्य असतो,
तसा आत्म्यांचा गाईड देखील आत्मा पाहिजे. ते तर सुप्रीम आत्म्यालाच गाईड म्हणणार.
सर्व मनुष्य तर पुनर्जन्म घेऊन पतित बनतात. मग पावन बनवून परत कोण घेऊन जाईल? बाबा
म्हणतात - मीच येऊन पावन बनण्याची युक्ती सांगतो. तुम्ही माझी आठवण करा. श्रीकृष्ण
तर असे सांगू शकणार नाही की देहाची नाती सोडा. ते तर ८४ जन्म घेतात, सर्व
नात्यांमध्ये येतात. बाबांना आपले स्वतःचे शरीर नाही आहे. तुम्हाला ही रूहानी यात्रा
बाबा शिकवत आहेत. हे आहे रूहानी बाबांचे रूहानी मुलांसाठी रुहानी नॉलेज. श्रीकृष्ण
काही कोणाचा रूहानी पिता थोडाच आहे. सर्वांचा रुहानी पिता मीच आहे. मीच गाईड बनू
शकतो. लिबरेटर, गाईड, ब्लिसफुल, पीसफुल, एव्हर प्युअर हे सर्व माझ्यासाठी म्हटले
जाते. आता तुम्हा आत्म्यांना नॉलेज देत आहेत. बाबा म्हणतात - मी या शरीराद्वारे
तुम्हाला नॉलेज देत आहे. तुम्ही देखील शरीराद्वारे नॉलेज घेत आहात. ते आहेत गॉड
फादर. त्यांचे रूप देखील सांगितले आहे. जशी आत्मा बिंदू आहे, तसे परमात्मा देखील
बिंदू आहेत. ही कुदरत (ईश्वरीय शक्ती) आहे ना. वास्तविक मोठा प्रकृतीचा चमत्कार तर
हा आहे. इतक्या छोट्याशा स्टारमध्ये ८४ जन्मांचा पार्ट आहे. ही आहे कुदरत (प्रकृतीचा
चमत्कार). बाबांचा देखील ड्रामामध्ये पार्ट आहे. भक्तिमार्गामध्ये देखील तुमची सेवा
करतात. तुमच्या आत्म्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट अविनाशी आहे, याला म्हटले जाते
कुदरत, याचे वर्णन कसे करावे. इतकी छोटीशी आत्मा आहे. या गोष्टी ऐकून आश्चर्यचकित
होतात. आत्मा आहे देखील स्टार प्रमाणे. पूर्णपणे ८४ जन्म भोगते. ती सुख देखील
पूर्णपणे भोगेल. ही आहे कुदरत (प्रकृतीचा चमत्कार). बाबा देखील आहेत आत्मा, परम
आत्मा. त्यांच्यामध्ये सर्व नॉलेज भरलेले आहे, जे मुलांना समजावून सांगत आहेत. या
आहेतच नवीन गोष्टी, नवीन मनुष्य ऐकून म्हणतील - यांचे ज्ञान तर कोणत्याही शास्त्र
इत्यादींमध्ये देखील नाही आहे. तरी देखील ज्यांनी कल्पापूर्वी ऐकले आहे, वारसा घेतला
आहे तेच वृद्धीला प्राप्त होत राहतील. वेळ लागतो. प्रजा प्रचंड बनते. ते तर सोपे आहे.
राजा बनवण्यामध्ये मेहनत आहे. जे मनुष्य भरपूर धन दान करतात तर ते राजाई घरामध्ये
जन्म घेतात. गरीब देखील आपल्या कुवतीप्रमाणे जे काही दान करत असतील तर ते देखील राजा
बनतात. जे पूर्ण भगत असतात ते दान-पुण्य देखील करतात. श्रीमंतांकडून जास्ती पापे
होत असतील. गरिबांमध्ये श्रद्धा भरपूर असते. ते अतिशय प्रेमाने थोडे जरी दान करतात
तरी देखील त्यांना भरपूर मिळते. गरीब भक्ती देखील खूप करतात. म्हणतात दर्शन द्या
नाहीतर मी माझा गळा कापून टाकेन. श्रीमंत असे करणार नाहीत. साक्षात्कार देखील
गरिबांना होतात. तेच दान-पुण्य करतात, राजा देखील तेच बनतात. पैसेवाल्यांना अहंकार
असतो. इथे देखील गरिबांना २१ जन्मांचे सुख मिळते. गरीब जास्त प्रमाणात आहेत.
श्रीमंत मागाहून येतील. तर जो भारत इतका उच्च होता तोच परत इतका गरीब कसा झाला, हे
तुम्हालाच समजते आहे. भूकंप इत्यादीमध्ये सर्व बंगले इत्यादी नष्ट होतील तर मग भारत
गरीब होईल. रावण राज्य असल्यामुळे हाहाकार होतो त्यामुळे मग अशा गोष्टी राहू शकत
नाहीत. प्रत्येक वस्तूचे स्वतःचे आयुष्य तर असते ना. तिथे स्वर्गामध्ये जसे
मनुष्यांचे आयुष्य मोठे असते तसेच त्यांच्या घरांचे देखील आयुष्य मोठे असते.
सोन्याचे, मार्बलचे मोठ-मोठे महाल बनत जातील. सोन्याचे तर अजूनच मजबूत असतील.
नाटकामध्ये देखील दाखवतात ना - युद्ध होते, घरे मोडून-तुटून जातात आणि मग पुन्हा
बनतात. त्यांची बनावट अशी असते. हे जे स्वर्गातील महाल इत्यादी बनवतील, असे तर
दाखवणार नाहीत की, मिस्त्री लोक कशी घरे बनवतात. हो, समजतात की, तशीच घरे असतील.
पुढे चालून तुम्हाला साक्षात्कार होईल. असे विवेक म्हणतो. या गोष्टींशी मुलांचा
काहीही संबंध नाही, मुलांना तर अभ्यास करायचा आहे, स्वर्गाचा मालक बनायचे आहे.
स्वर्ग आणि नरक अनेकदा होऊन गेले आहेत. आता दोन्ही होऊन गेले आहेत. आता आहे संगम.
सतयुगामध्ये हे नॉलेज असणार नाही. याचवेळी तुम्हा मुलांना संपूर्ण नॉलेज आहे.
लक्ष्मी-नारायणाला हे नॉलेज हे राज्य कोणी दिले होते. हे आता तुम्हा मुलांना माहित
आहे. त्यांनी हा वारसा कोणाकडून घेतला. इथे शिक्षण घेऊन स्वर्गाचे मालक बनतात. आणि
मग तिथे जाऊन महाल इत्यादी बनवतात. सर्जन देखील मोठ-मोठी हॉस्पिटल्स बांधतात ना.
तुम्हा मुलांना
दिवसेंदिवस चांगले-चांगले पॉईंट्स ऐकवत आहेत. तुमचा धंदाच हा आहे की, मनुष्यांना
जागे करणे, रस्ता सांगणे. जसे बाबा किती प्रेमाने बसून समजावून सांगतात.
देह-अभिमानाचा प्रश्नच नाही. बाबांना कधी देह-अभिमान येऊ शकत नाही. तुम्हाला सारी
मेहनत देही-अभिमानी होण्यासाठी करावी लागते. जे देही-अभिमानी बनून बाबांचा परिचय
देतात ते जणू अनेकांचे कल्याण करतात. पहिला तर देह-अभिमान आल्याने नंतर मग बाकीचे
विकार येतात. भांडण, तंटा करणे, तोऱ्यात चालणे, हा देह-अभिमान आहे. भले आपला राजयोग
आहे, तरी देखील अतिशय साधारण पद्धतीने राहायचे आहे. थोड्याशा गोष्टीमध्ये अहंकार
येतो. फॅशनेबल घड्याळ पाहिले की ते घालण्याची इच्छा होते. विचार चालत राहील. याला
देखील देह-अभिमान म्हटले जाते. चांगली महागडी वस्तू असेल तर सांभाळावी लागेल. हरवली
तर चिंता वाटेल. अखेरच्या वेळी काहीही जरी आठवले तर पद भ्रष्ट होईल. या सर्व
देह-अभिमानाच्या सवयी आहेत. आणि मग सेवा करण्याऐवजी डिससर्विस देखील नक्की करतील.
रावणाने तुम्हाला देह-अभिमानी बनवले आहे. तुम्ही बघता बाबा किती साधारणपणे राहतात.
प्रत्येकाची सेवा पाहिली जाते. महारथी मुलांना आपला शो करायचा आहे. महारथींनाच
पत्राद्वारे कळवले जाते की, ‘तुम्ही अमक्या जागी जाऊन भाषण करा’. एक-दोघांना
बोलावतात. परंतु मुलांमध्ये देह-अभिमान खूप असतो. भाषण करण्यामध्ये भले पटाईत आहेत
परंतु आपसामध्ये रुहानी प्रेम नाही आहे. देह-अभिमान लून-पाणी (खारट-पाणी) बनवतो.
कोणत्याही गोष्टीमध्ये लगेच चिडणे, हे देखील होता कामा नये; म्हणून बाबा म्हणतात
कोणालाही काही विचारायचे असेल तर बाबांना येऊन विचारा. कोणी म्हणाले की, बाबा
तुम्हाला किती मुले आहेत? मी तर सांगेन - मुले तर अगणित आहेत, परंतु कोणी कपूत आहेत,
कोणी सपूत खूप चांगली आहेत. अशा बाबांचे तर फरमानबरदार, वफादार (आज्ञाधारक,
प्रामाणिक) बनून राहिले पाहिजे ना. अच्छा !
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
देह-अभिमानामध्ये येऊन कोणत्याही प्रकारची फॅशन करायची नाही. जास्ती छंद ठेवायचे
नाहीत. अतिशय साधारण होऊन राहायचे आहे.
२) आपसामध्ये अतिशय
रुहानी प्रेमाने वागायचे आहे. कधीही खारट पाणी व्हायचे नाही. बाबांचा सपूत मुलगा
बनायचे आहे. कधीही अहंकारामध्ये यायचे नाही.
वरदान:-
आपल्या
भाग्याचे आणि भाग्यविधात्याचे गुण गाणारे सदा प्रसन्न चित्त भव
सर्व ब्राह्मण मुलांना
जन्मतःच ताज, तख्त, तिलक जन्मसिद्ध अधिकाराच्या रूपामध्ये प्राप्त होतो. तर या
भाग्याच्या चमकणाऱ्या ताऱ्याला पाहून आपले भाग्य आणि भाग्यविधात्याचे गुण गात रहा,
तर गुणसंपन्न बनाल. आपल्या कमजोरींचे गुण गाऊ नका, भाग्याचे गुण गात रहा,
प्रश्नांच्याही पलीकडे राहा तेव्हाच सदैव प्रसन्नचित्त राहण्याचे वरदान प्राप्त
होईल. आणि मग इतरांना देखील सहजच प्रसन्न करू शकाल.
बोधवाक्य:-
‘एकनामी’ आणि
‘इकॉनॉमी’ने चालणे हाच ब्राह्मण जीवनाच्या सफलतेचा आधार आहे
हे अव्यक्त इशारे:-
“निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा”
निश्चय नेहमीच
निश्चिंत बनवितो; आणि जे निश्चिंत स्थितीमध्ये राहून कोणतेही कार्य करतात ते
त्यामध्ये जरूर सफल होतात कारण निश्चिंत स्थितीमध्ये बुद्धी यथार्थ रित्या निर्णय
घेते. यथार्थ निर्णयाचा आधार आहे - निश्चयबुद्धी, निश्चिंत स्थिती; त्यामध्ये विचार
करण्याची देखील आवश्यकता नाही.