04-04-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


प्रश्न:-
देवतांच्या चित्रांचे (मुर्त्यांचे) सर्वांना आकर्षण का वाटते? त्यांच्यामध्ये विशेष असा कोणता गुण आहे?

उत्तर:-
देवता खूप रमणीक आणि पवित्र आहेत. रमणीकतेमुळे त्यांची चित्रे (मुर्त्या) देखील आकर्षित करतात. देवतांमध्ये पवित्रतेचा विशेष गुण आहे, ज्या गुणा मुळे अपवित्र मनुष्य झुकत राहतात. रमणीक तेच बनतात ज्यांच्यामध्ये सर्व दैवी गुण आहेत, जे नेहमी आनंदी राहतात.

ओम शांती।
हा आत्म्यांचा आणि परमात्म्याचा मेळा किती वंडरफुल आहे. अशा बेहद पित्याची तुम्ही मुले आहात तर मुले देखील किती रमणीक असली पाहिजेत. देवता देखील रमणीक आहेत ना. परंतु राजधानी खूप मोठी आहे. सर्वच एकसारखे रमणीक असू शकत नाहीत. तरी देखील काही-काही मुले खूप रमणीक आहेत जरूर. रमणीक कोण असतात? जे नेहमी आनंदात राहतात, ज्यांच्यामध्ये दैवी गुण आहेत. हे राधे-कृष्ण इत्यादी रमणीक आहेत ना. त्यांच्यामध्ये खूप-खूप आकर्षण आहे. कोणते आकर्षण आहे? पवित्रतेचे, कारण त्यांची आत्मा देखील पवित्र आहे तर शरीर देखील पवित्र आहे. तर पवित्र आत्मे अपवित्र असणाऱ्यांना आकर्षित करतात. त्यांच्या समोर लोटांगण घालतात. त्यांच्यामध्ये किती ताकद आहे. भले संन्यासी आहेत, परंतु ते देवतांसमोर नतमस्तक होतात. भले काहीजण तर खूप घमेंडी असतात, तरी देखील देवतांच्या पुढे किंवा शिवाच्या पुढे झुकतील जरूर. देवींच्या चित्रापुढे देखील झुकतात कारण बाबा देखील रमणीक आहेत तर बाबांनी बनविलेले देवी-देवता देखील रमणीक आहेत. त्यांच्यामध्ये आकर्षण आहे पवित्रतेचे. ते त्यांचे आकर्षण आता पर्यंत चालत आले आहे. तर जितके यांच्यामध्ये आकर्षण आहे तितकेच तुमच्यामध्ये देखील आकर्षण असले पाहिजे. जे समजतात की, आपण असे लक्ष्मी-नारायण बनणार. तुमचे या वेळेचे आकर्षण मग अविनाशी बनते. सर्वांचेच होत नाही. नंबरवार तर आहेत ना. भविष्यामध्ये जे उच्च पद मिळविणारे असतील, त्यांच्या विषयी इथेच आकर्षण वाटू लागेल कारण आत्मा पवित्र बनते. तुमच्यापैकी जास्त आकर्षण त्यांच्यामध्ये असते जे खास आठवणीच्या यात्रेमध्ये राहतात. यात्रेमध्ये पवित्रता जरूर असते. पवित्रतेमध्येच आकर्षण आहे. पवित्रतेचे आकर्षण मग शिक्षणामध्ये देखील आकर्षण घेऊन येते. हे तुम्हाला आता ठाऊक झाले आहे. तुम्ही त्यांच्या (लक्ष्मी-नारायणाच्या) ॲक्युपेशनला जाणता. त्यांनी देखील बाबांची किती आठवण केली असेल. ही त्यांनी जी राजाई प्राप्त केली आहे, ती जरूर राजयोगाद्वारे प्राप्त केली आहे. यावेळी तुम्ही हे पद प्राप्त करण्यासाठी आला आहात. बाबा बसून तुम्हाला राजयोग शिकवत आहेत. हा तर पक्का निश्चय करून इथे आला आहात ना. पिता देखील तेच आहेत, शिकविणारे देखील तेच आहेत. सोबत देखील तेच घेऊन जाणारे आहेत. तर हे गुण सदैव असले पाहिजेत. नेहमी हर्षितमुख राहा. सदैव हर्षित तेव्हा राहू शकाल जेव्हा बाबा अल्फ च्या आठवणीमध्ये राहाल. तेव्हाच बे (बादशाहीची) देखील आठवण राहील. आणि यामुळे खूप रमणीक देखील बनाल. तुम्ही मुले जाणता - आपण इथे रमणीक बनून मग भविष्यामध्ये असे रमणीक बनणार. इथले शिक्षणच अमरपुरीमध्ये घेऊन जाते. हे खरे बाबा तुम्हाला खरी कमाई करून देत आहेत. ही खरी कमाईच २१ जन्मांकरिता सोबत येते. मग भक्ती मार्गामध्ये जी कमाई करता ती तर आहेच अल्पकालीन सुखाकरिता. ती काही कायमची साथ देत नाही. तर या शिक्षणामध्ये मुलांना खूप खबरदार राहिले पाहिजे. तुम्ही आहात साधारण, तुम्हाला शिकविणारे देखील अगदी साधारण रूपामध्ये आहेत. तर शिकणारे देखील साधारणच राहतील. नाही तर लाज वाटेल. आपण उंची कपडे कसे घालावे. आपले मम्मा बाबा किती साधारण आहेत तर आपण देखील साधारण आहोत. हे असे साधारण का राहतात? कारण वनवासामध्ये आहेत ना. आता तुम्हाला जायचे आहे, इथे काही लग्न करायचे नाहीये. ते लोक जेव्हा लग्न करतात तेव्हा कुमारी वनवासात राहते. मळके कपडे घालते, तेल इत्यादी लावते कारण सासरी जाते. ब्राह्मणा मार्फत लग्न लावले जाते. तुम्हाला देखील जायचे आहे सासरी. रावण पुरीमधून रामपुरी अथवा विष्णुपुरी मध्ये जायचे आहे. तर हा वनवासाचा रिवाज याच्यासाठी ठेवलेला आहे की कोणताही देहाचा किंवा कपडे इत्यादीचा अभिमान येऊ नये. कोणाची साधी साडी असेल, आणि जेव्हा दुसऱ्यांना पाहतात की यांच्याजवळ तर चांगली भारी साडी आहे तर विचार चालतात. असा विचार करतात की हे तर वनवासात नाहीत. परंतु तुम्ही वनवासामध्ये असे साधारण राहत असून कोणाला इतके उच्च ज्ञान द्या, इतका नशा चढलेला असावा तर त्याला देखील तीर लागेल (हे ज्ञान काळजाला भिडेल). भले भांडी घासत राहा, कपडे धुत राहा, तुमच्या समोर कोणी येईल तर तुम्ही लगेच त्यांना अल्फ ची आठवण करून द्या. तुम्हाला तो नशा चढलेला असावा आणि साधारण कपड्यांमध्ये बसून कोणाला नॉलेज दिले तर त्यांना देखील आश्चर्य वाटेल, यांच्यामध्ये किती उच्च ज्ञान आहे! हे ज्ञान तर गीतेचे आहे आणि भगवंताने दिलेले आहे. राजयोग तर गीतेचेच ज्ञान आहे. तर असा नशा चढतो का? जसे बाबा स्वतःचे उदाहरण देतात. असे समजा मी मुलांसोबत काही खेळ खेळत आहे. कोणी जिज्ञासू समोर येतो तर लगेच त्यांना बाबांचा परिचय देतो. योगाची ताकद, योगबळ असल्या कारणाने तो देखील तिथेच उभा राहील आणि आश्चर्यचकित होईल की हे इतके साधारण, यांच्यामध्ये इतकी ताकद. मग तो काहीच बोलू शकणार नाही. मुखातून कोणती गोष्ट निघणारच नाही. जसे तुम्ही वाणी पासून परे (दूर) आहात तसेच ते देखील वाणी पासून परे होतील. हा नशा आतमध्ये असला पाहिजे. कोणीही भाऊ अथवा बहिण आली तर त्यांना एकदम उभे करून विश्वाचा मालक बनण्याचे मत देऊ शकता. मनामध्ये इतका नशा असला पाहिजे. आपल्याच ध्यासामध्ये उभे राहिले पाहिजे. बाबा नेहमी म्हणतात - तुमच्याकडे ज्ञान तर आहे परंतु योगाचे जौहर (ताकद) नाही आहे. प्युरिटी (पवित्रता) आणि आठवणीमध्ये राहिल्याने जौहर (ताकद) येते. आठवणीच्या यात्रेद्वारे तुम्ही पवित्र बनता. ताकद मिळते. ज्ञान तर आहे धनाची गोष्ट. जसे शाळेमध्ये शिकून एम. ए., बी. ए. इत्यादी करतात तर इतका पैसा मिळतो. इथे मात्र वेगळी गोष्ट आहे. भारताचा प्राचीन योग तर प्रसिद्ध आहे. ही आहे आठवण. बाबा सर्वशक्तिमान आहेत तर मुलांना बाबांकडून शक्ती मिळते. मुलांच्या मनामध्ये असले पाहिजे - आपण आत्मे बाबांची संतान आहोत, परंतु बाबांइतके आपण पवित्र नाही आहोत. आता बनायचे आहे. आता आहे एम-ऑब्जेक्ट. योगाद्वारेच तुम्ही पवित्र बनता. जी अनन्य मुले आहेत ती पूर्ण दिवस हाच विचार करत राहतील. कोणीही आले तर आपण त्यांना रस्ता सांगावा, दया आली पाहिजे, बिचारे आंधळे आहेत. आंधळ्यांना त्यांची काठी पकडून घेऊन जातात ना. हे सर्व आंधळे आहेत, ज्ञानचक्षु (ज्ञानाचा नेत्रच) नाही आहे.

आता तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे, तर सर्व काही माहित झाले आहे. साऱ्या सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला आता आपण जाणतो आहोत. या सर्व भक्ती मार्गाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला यापूर्वी देखील माहित होते का की हियर नो ईव्हील… सी नो ईव्हील हे चित्र का बनले आहे? दुनियेमध्ये कोणीही याचा अर्थ समजत नाहीत, तुम्ही आता जाणता. जसे बाबा नॉलेजफुल आहेत, तुम्ही त्यांची मुले देखील आता नॉलेजफुल बनत आहात, नंबरवार पुरुषार्था अनुसार. कोणा-कोणाला तर खूप नशा चढतो. वाह! बाबांची संतान बनून मग बाबांकडून पूर्ण वारसा घेतला नाही तर संतान बनून काय केले! रोज रात्रीला आपला पोतामेल (हिशोब) बघायचा आहे. बाबा व्यापारी आहेत ना. व्यापाऱ्यांसाठी पोतामेल काढणे सोपे असते. सरकारी नोकराला पोतामेल काढता येत नाही, ना ते व्यापारी असतात. व्यापारी लोकांना चांगले समजेल. तुम्ही व्यापारी आहात. तुम्ही आपल्या फायद्या-तोट्याला समजता, दररोज खाते तपासा. पुंजी सांभाळा. तोटा आहे की फायदा आहे? व्यापारी आहात ना. गायन आहे ना - बाबा सौदागर, रत्नागर आहेत. अविनाशी ज्ञान रत्नांचा व्यापार देतात. हे देखील तुम्ही जाणता - नंबरवार पुरुषार्थानुसार. सर्वच काही शुरुड-बुद्धी (तीक्ष्ण-बुद्धी) नाही आहेत, एका कानाने ऐकतात मग दुसऱ्या कानाने निघून जाते. झोळीच्या छिद्रातून निघून जाते. झोळी भरतच नाही. बाबा म्हणतात - ‘धन दिये धन ना खुटे’. अविनाशी ज्ञान रत्न आहेत ना. बाबा आहेत रूप-बसंत. आत्मा तर आहे, तीच्यामध्ये ज्ञान आहे. तुम्ही त्यांची मुले देखील रूप-बसंत आहात. आत्म्यामध्ये नॉलेज भरले जाते. त्यांचे रूप आहे, भले आत्मा छोटी आहे. रूप तर आहे ना. त्याला जाणले जाते, परमात्म्याला देखील जाणले जाते. सोमनाथाची भक्ती करतात तर इतक्या छोट्या स्टारची कशी पूजा करतील. पूजा करण्यासाठी किती लिंग बनवतात. छता एवढे देखील भलेमोठे शिवलिंग बनवतात. असे तर आहेत सूक्ष्म परंतु मर्तबा तर उच्च आहे ना.

बाबांनी कल्पापूर्वी देखील सांगितले होते की या जप, तप इत्यादी द्वारे कोणतीही प्राप्ती होत नाही. हे सर्व करत असताना देखील खालीच घसरत जातात (अधोगतीच होते). शिडी खालीच उतरतात. तुमची तर आता चढती कला आहे. तुम्ही ब्राह्मण एक नंबरचे जिन्न आहात. एक कहाणी आहे ना - जिन्नने म्हटले, मला काम दिले नाही तर मी खाऊन टाकेन. तर त्याला काम दिले - शिडी चढ आणि उत्तर. तर त्याला काम मिळाले. बाबांनी देखील म्हटले आहे की ही बेहदची शिडी तुम्ही उतरता आणि परत चढता. तुम्हीच पूर्ण शिडी उतरता आणि चढता. तुम्हीच जिन्न आहात. इतर कोणीच पूर्ण शिडी चढत नाहीत. पूर्ण शिडीचे ज्ञान प्राप्त केल्याने तुम्ही किती उच्च पद प्राप्त करता. पुन्हा उतरता, परत चढता. बाबा म्हणतात - मी तुमचा पिता आहे. तुम्ही मला ‘पतित-पावन’ म्हणता ना, मी सर्वशक्तिमान ऑलमाइटी आहे, कारण माझी आत्मा सदैव १०० टक्के पवित्र असते. मी बिंदू रूप ऑथॉरिटी आहे. सर्व शास्त्रांचे रहस्य जाणतो. हे किती वंडर आहे. हे सर्व वंडरफुल ज्ञान आहे. असे कधी ऐकले नसेल की आत्म्यामध्ये ८४ जन्मांचा अविनाशी पार्ट आहे. तो कधीही झिजत नाही. चालतच राहतो. ८४ जन्मांचे चक्र फिरत राहते. ८४ जन्मांचे रेकॉर्ड भरलेले आहे. इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये इतके ज्ञान आहे. बाबांमध्ये देखील आहे तर तुम्हा मुलांमध्ये देखील आहे. किती मोठा पार्ट बजावता. हा पार्ट कधीही नष्ट होणारा नाहीये. आत्मा या डोळ्यांनी दिसून येत नाही. आहे सूक्ष्म बिंदू, बाबा देखील सांगतात - मी असा बिंदू आहे. हे देखील तुम्ही मुलेच आता समजता. तुम्ही आहात बेहदचे त्यागी आणि राज-ऋषी. किती नशा चढला पाहिजे. राज-ऋषी पूर्णपणे पवित्र राहतात. राजऋषी असतात - सूर्यवंशी, चंद्रवंशी जे इथे राजाई प्राप्त करतात. जशी तुम्ही आता करत आहात. हे तर मुले समजतात की आपण जात आहोत. खिवैयाच्या स्टीमर मध्ये (नावाड्याच्या आगबोटी मध्ये) बसलो आहोत. आणि हे देखील जाणतो की हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. जुन्या दुनियेमधून नवीन दुनियेमध्ये व्हाया शांतीधाम जायचे देखील नक्कीच आहे. हे मुलांच्या कायमचे बुद्धी मध्ये राहिले पाहिजे. जेव्हा आपण सतयुगामध्ये होतो तेव्हा इतर कोणताच खंड नव्हता. आपलेच राज्य होते. आता पुन्हा योगबळाद्वारे आपण आपले राज्य घेत आहोत कारण सांगितले आहे योगबळाद्वारेच विश्वाची राजाई प्राप्त करू शकतो. बाहुबळाद्वारे कोणीही प्राप्त करू शकत नाही. हा बेहदचा ड्रामा आहे. खेळ बनलेला आहे. या खेळाचे स्पष्टीकरण बाबाच देतात. सुरुवातीपासून संपूर्ण दुनियेचा इतिहास-भूगोल ऐकवतात. तुम्ही सूक्ष्मवतन, मूलवतनच्या रहस्याला देखील चांगल्या रीतीने जाणता. स्थूलवतनमध्ये यांचे राज्य होते अर्थात आपलेच राज्य होते. तुम्ही कशी शिडी उतरता, ते देखील आठवले आहे. शिडी चढणे आणि उतरणे हा खेळ मुलांच्या बुद्धीमध्ये पक्का झाला आहे. आता बुद्धीमध्ये आहे की कसा हा दुनियेचा इतिहास-भूगोल रिपीट होतो, यामध्ये आपला हिरो-हिरोईन चा पार्ट आहे. आपणच हार खातो आणि मग आपणच जिंकतो म्हणून नाव ठेवले आहे हीरो-हीरोइन. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आता आपण वनवासामध्ये आहोत - म्हणून अतिशय साधारण पद्धतीने राहायचे आहे. कोणत्याही प्रकारचा देहाचा किंवा कपड्यांचा अभिमान ठेवायचा नाही. कोणतेही कर्म करत असताना बाबांच्या आठवणीचा नशा चढलेला रहावा.

२) आपण बेहदचे त्यागी आणि राजऋषी आहोत - याच नशेमध्ये राहून पवित्र बनायचे आहे. ज्ञान धनाने भरपूर बनून दान करायचे आहे. खरा-खरा व्यापारी बनून आपला पोतामेल ठेवायचा आहे.

वरदान:-
स्वतःला सेवाधारी समजून झुकणारे आणि सर्वांना झुकविणारे निमित्त आणि नम्रचित भव

निमित्त त्याला म्हटले जाते - जो आपल्या प्रत्येक संकल्पाला किंवा प्रत्येक कर्माला बाबांसमोर अर्पण करतो. निमित्त बनणे अर्थात अर्पण होणे आणि नम्रचित तो आहे जो झुकतो, जितके संस्कारांमध्ये, संकल्पांमध्ये झुकाल तितके विश्व तुमच्या समोर झुकेल. झुकणे अर्थात झुकविणे. हा संकल्प देखील नसावा की, बाकीच्यांनी देखील आमच्या समोर थोडेतरी झुकावे. जे खरे सेवाधारी असतात ते नेहमी झुकतात. कधीही आपला रोब दाखवत नाहीत.

बोधवाक्य:-
आता समस्या स्वरूप नाही, समाधान स्वरूप बना.

हे अव्यक्त इशारे - महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.

तुम्हा महान आत्म्यांचा प्रत्येक मनसा संकल्प प्रत्येक आत्म्याप्रती मधुर असावा, महान असावा. जसा बाबांचा स्वभाव नेहमी प्रत्येकासाठी कल्याणाचा आणि दयेच्या भावनेचा आहे, प्रत्येकाला उच्च पातळीवर नेण्याचा, मधुरता आणि निर्माणतेचा आहे. असाच आपला स्वभाव बनवा. जर जोरात बोलण्याचा, आवेशामध्ये येण्याचा स्वभाव असेल तर हे देखील ब्राह्मण जीवनामध्ये खूप मोठे विघ्न आहे. आता अशा स्वभावाचे परिवर्तन करा.