04-05-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   20.02.2005  ओम शान्ति   मधुबन


“हृदयापासून ‘माझे बाबा’ म्हणा आणि सर्व अविनाशी खजिन्यांचे मालक बनून निश्चिंत बादशहा बना”


आज भाग्य विधाता बापदादा आपल्या सर्व मुलांच्या मस्तकामध्ये भाग्याच्या रेषा बघत आहेत. प्रत्येक मुलाच्या मस्तकामध्ये चमकत असलेल्या दिव्य ताऱ्याची रेषा दिसून येत आहे. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये स्नेह आणि शक्तिची रेषा बघत आहेत. मुखामध्ये श्रेष्ठ मधुर वाणीची रेषा बघत आहेत. ओठांवर गोड हास्याची रेषा चमकत आहे. हृदयामध्ये दिलारामच्या प्रेमामध्ये एकरूप झाल्याची रेषा बघत आहेत. हातांमध्ये सदैव सर्व खजिन्यांच्या संपन्नतेची रेषा बघत आहेत. पायांमध्ये प्रत्येक पावलामध्ये पद्मची रेषा बघत आहेत. असे श्रेष्ठ भाग्य साऱ्या कल्पामध्ये कोणाचेही नसते, जे तुम्हा मुलांना या संगमयुगामध्ये भाग्य प्राप्त झाले आहे. असे आपले भाग्य अनुभव करता का? इतक्या श्रेष्ठ भाग्याचा रुहानी नशा अनुभव करता का? हृदयामध्ये स्वतः गाणे वाजते - ‘वाह मेरा भाग्य!’ हे संगमयुगाचे भाग्य अविनाशी भाग्य बनते. असे का? अविनाशी बाबांद्वारे अविनाशी भाग्य प्राप्त झाले आहे. परंतु प्राप्त या संगमावरच होते. या संगमावरच ही अनुभूती करता, ही विशेष संगमयुगाची प्राप्ति अति श्रेष्ठ आहे. तर असा श्रेष्ठ भाग्याचा अनुभव सदैव इमर्ज राहतो की कधी मर्ज, कधी इमर्ज असतो? आणि पुरुषार्थ काय केला? इतक्या मोठ्या भाग्याच्या प्राप्तिसाठी पुरुषार्थ किती सोपा होता. फक्त हृदयापासून ओळखले, मानले आणि आपले बनवले “माझे बाबा”. अंतःकरणापासून ओळखले, मी बाबांचा, बाबा माझे. माझे मानायचे आणि अधिकारी बनायचे. अधिकार देखील किती मोठा आहे! विचार करा, कोणी विचारले काय-काय मिळाले आहे? तर काय म्हणाल? ‘जो पाना था वह पा लिया’ (जे हवे होते ते मिळाले). अप्राप्त नाही कोणती वस्तू परमात्म खजिन्यामध्ये. असा प्राप्ति स्वरूपाचा अनुभव केला का करत आहात? भविष्याची गोष्ट वेगळी आहे, या संगमयुगातच प्राप्ति स्वरूपाचा अनुभव आहे. जर संगमयुगावर अनुभव केला नाहीत तर भविष्यामध्ये सुद्धा होऊ शकत नाही. का? भविष्य प्रारब्ध आहे परंतु प्रारब्ध या पुरुषार्थाच्या श्रेष्ठ कर्माने बनते. असे नाही की लास्टमध्ये अनुभव स्वरूप बनू. संगमयुगातील दीर्घ काळाचा हा अनुभव आहे. जीवनमुक्तचा विशेष अनुभव आत्ताचा आहे. निश्चिंत बादशहा बनण्याचा अनुभव आत्ता आहे. तर सर्वजण निश्चिंत बादशहा आहात की चिंता आहे? जे निश्चिंत बादशहा बनले आहेत त्यांनी हात वर करा. बनले आहात की बनत आहात? बनले आहात ना! काही चिंता आहे? जर दात्याची मुले बनला आहात तर मग कसली चिंता आहे? माझे बाबा मानले आणि चिंतेच्या अनेक टोपल्यांचे ओझे उतरले. ओझे आहे काय? आहे? प्रकृतीचा खेळ सुद्धा बघता, मायेचा खेळ सुद्धा बघता परंतु निश्चिंत बादशहा होऊन, साक्षी होऊन खेळ बघता. दुनियावाले तर घाबरतात, माहित नाही काय होईल! तुम्हाला भीती आहे काय? घाबरता का? निश्चय आहे आणि निश्चित आहे जे होईल ते चांगल्यात चांगले होईल. असे का? त्रिकालदर्शी बनून प्रत्येक दृश्याला बघता. आज काय आहे, उद्या काय होणार आहे, याला तुम्ही व्यवस्थित जाणले आहे, नॉलेजफुल आहात ना! संगमा नंतर काय होणार आहे, तुम्हा सर्वांच्या समोर अगदी स्पष्ट आहे ना! नविन युग येणारच आहे. दुनियावाले म्हणतील, ‘येईल का?’ प्रश्न आहे - ‘येणार का?’ आणि तुम्ही काय म्हणता? आल्यातच जमा आहे त्यामुळे काय होईल, हा प्रश्नच येत नाही. माहित नाही - सुवर्ण युग येणारच आहे. रात्रीनंतर आता संगम प्रभात आहे, अमृतवेला आहे, अमृतवेले नंतर दिवस येणारच आहे. ज्याला पण निश्चय असेल तो निश्चिंत, कोणतीही चिंता असणार नाही, निश्चिंत. विश्व रचता द्वारे रचनेचे स्पष्ट नॉलेज मिळाले आहे.

बापदादा बघत आहेत सर्व मुले स्नेहाच्या, सहयोगाच्या आणि संपर्काच्या प्रेमामध्ये बांधले जाऊन आपल्या घरी पोहोचले आहेत. बापदादा सर्व स्नेही मुलांना, सहयोगी मुलांना, संपर्कवाल्या मुलांना आपला अधिकार घेण्यासाठी आपल्या घरी पोहोचल्या बद्दल मुबारक देत आहेत. मुबारक असो, मुबारक असो. बापदादांचे प्रेम मुलांपेक्षा जास्त आहे की मुलांचे बापदादांपेक्षा जास्त आहे? कोणाचे जास्त आहे? तुमचे की बाबांचे? बाबा म्हणतात - मुलांचे जास्त आहे. बघा, मुलांचे प्रेम आहे तेव्हाच तर कुठून-कुठून पोहोचले आहेत ना! किती देशांमधून आले आहेत? (५० देशांमधून) ५० देशांमधून आले आहेत. परंतु सर्वात दूरवरून कोण आले आहेत? अमेरिकावाले दुरून आले आहेत काय? तुम्ही सुद्धा दुरुन आला आहात परंतु बापदादा तर परमधाम वरून आले आहेत. त्याच्या समोर अमेरिका काय आहे! अमेरिका दूर आहे की परमधाम दूर आहे? सर्वात दूरदेशी बापदादा आहेत. मुले आठवण करतात आणि बाबा हजर होतात.

आता बाबांची मुलांकडून काय अपेक्षा आहे? विचारतात ना - बाबांची काय अपेक्षा आहे? तर बापदादांची गोड-गोड मुलांकडून हिच अपेक्षा आहे की, प्रत्येक मुलाने स्वराज्य अधिकारी राजा बनावे. सर्वजण राजा आहात? स्वराज्य आहे? ‘स्व’वर राज्य तर आहे ना! जे समजतात की, मी स्वराज्य अधिकारी राजा बनलो आहे, त्यांनी हात वर करा. खूप छान. बापदादांना मुलांना पाहून प्रेमाने भरून येते की, ६३ जन्म दुःख-अशांतीपासून सुटका करण्यासाठी खूप मेहनत केली आहे. तर बाबा हेच इच्छितात की प्रत्येक मुलाने आता स्वराज्य अधिकारी बनावे. मन-बुद्धी-संस्काराचा मालक बनावे, राजा बनावे. जेव्हा पाहिजे, जिथे पाहिजे, जसे पाहिजे तसे मन-बुद्धी-संस्काराला परिवर्तन करू शकतील. टेन्शन फ्री लाईफचा अनुभव सदैव इमर्ज असावा. बापदादा बघतात कधी मर्ज सुद्धा होते. विचार करतात - ‘हे नाही करायचे, हे राईट आहे, हे रॉंग आहे’; परंतु फक्त विचार करतात स्वरूपामध्ये आणत नाहीत. विचार करणे अर्थात मर्ज असणे, स्वरूपामध्ये आणणे अर्थात इमर्ज असणे. वेळेची तर वाट बघत नाही आहात ना! कधी-कधी करता. रुहरिहान करतात ना तर बरीच मुले म्हणतात, वेळ आल्यावर ठीक होऊ. वेळ, ही तर तुमची रचना आहे. तुम्ही तर मास्टर रचता आहात ना! तर मास्टर रचता, रचनेच्या आधारावर चालत नाहीत. वेळेला समाप्तीच्या नजदीक तर मास्टर रचतांना आणायचे आहे.

एका सेकंदामध्ये मनाचे मालक बनून मनाला ऑर्डर करू शकता का? करू शकता? मनाला एकाग्र करू शकता? फुलस्टॉप लावू शकता की लावणार फुलस्टॉप आणि लागणार क्वेश्चन मार्क? का, काय, कसे, हे काय, ते काय, आश्चर्याची मात्रा सुद्धा नको. फुलस्टॉप, सेकंदामध्ये पॉईंट बना. आणखी कोणती मेहनत नाही आहे, एक शब्द फक्त अभ्यासामध्ये आणा “पॉईंट”. पॉईंट स्वरूप बनायचे आहे, वेस्टला पॉईंट लावायचा आहे आणि महावाक्य जे ऐकता त्या पॉइंटवर मनन-चिंतन करायचे आहे, दुसरा कोणताच त्रास नाही. पॉईंट लक्षात ठेवा, पॉईंट लावा, पॉईंट बना. हा अभ्यास पूर्ण दिवसभरामध्ये मधून-मधून करा, कितीही बिझी असाल परंतु ही प्रॅक्टिस करा - एका सेकंदामध्ये पॉईंट बनू शकता? एका सेकंदामध्ये पॉईंट लावू शकता का? जेव्हा हा अभ्यास वारंवार कराल तेव्हाच येणाऱ्या अंतिम वेळेमध्ये फुल पॉईंट्स (पूर्ण मार्क्स) घेऊ शकाल. पास विद् ऑनर बनाल. हीच परमात्म शिकवण आहे, हीच परमात्म पालना आहे.

तर जे कोणी आले आहेत, भले पहिल्यांदाच आलेले आहेत, जे पहिल्यांदा मिलन साजरे करण्यासाठी आले आहेत त्यांनी हात वर करा. भरपूर आले आहेत. वेलकम. जसे आत्ता पहिल्यांदा आला आहात ना, तसा पहिला नंबर सुद्धा घ्या. चान्स आहे, तुम्ही विचार कराल - आम्ही तर आत्ता-आत्ता पहिल्यांदाच आलो आहोत, आमच्यापेक्षा अगोदरचे तर खूप आहेत परंतु ड्रामामध्ये हा चान्स ठेवलेला आहे की, लास्ट सो फास्ट आणि फास्ट सो फर्स्ट होऊ शकता. चान्स आहे आणि चान्स घेणाऱ्यांना बापदादा चान्सलर म्हणतात. तर चान्सलर बना. बनायचे आहे ना चान्सलर? चान्सलर बनायचे आहे? जे समजतात चान्सलर बनणार, त्यांनी हात वर करा. चान्सलर बनणार? वाह! मुबारक असो. बापदादांनी बघितले इथे तर जे कोणी आले आहेत ते सर्व हात वर करत आहेत, मेजॉरिटी हात वर करत आहेत, मुबारक असो, मुबारक असो. बापदादांनी तुम्हा येणाऱ्या सर्व गोड-गोड, अति प्रिय मुलांची विशेष आठवण केली आहे, का आठवण केली आहे? (आज सभेमध्ये देश-विदेशाचे बरेचसे व्ही. आय. पी.ज बसले आहेत) कशासाठी निमंत्रण दिले आहे? माहित आहे? बघा, निमंत्रण तर खूप जणांना मिळाले परंतु येणारे मात्र तुम्हीच पोहोचला आहात. कशासाठी बापदादांनी आठवण केली आहे? कारण की बापदादा जाणतात की जे कोणी आले आहेत ते स्नेही, सहयोगी पासून सहजयोगी बनणारी क्वालिटी आहे. जर हिंमत ठेवाल तर तुम्ही सहजयोगी बनून इतरांना सुद्धा सहजयोगाचा मेसेंजर बनून मेसेज देऊ शकता. मेसेज देणे अर्थात गॉडली मेसेंजर (ईश्वरीय दूत) बनणे. आत्म्यांना दुःख, अशांती पासून सोडवणे. तरी सुद्धा तुमचेच भाऊ-बहीणी आहेत ना! तर आपल्या भावांना अथवा बहिणींना गॉडली मेसेज देणे अर्थात मुक्त करणे. याचे आशीर्वाद खूप मिळतात. कोणत्याही आत्म्याला दुःख, अशांतीपासून सोडविण्याचे आशीर्वाद खूप मिळतात आणि आशीर्वाद मिळाल्याने अतींद्रिय सुख, आंतरिक खुशीची फिलिंग खूप येते. असे का? कारण की खुशी वाटली ना तर खुशी वाटल्याने खुशी वाढते. सर्वजण खुश आहात ना? विशेष बापदादा पाहुण्यांना नाही, अधिकाऱ्यांना विचारत आहेत. स्वतःला पाहुणे समजू नका, अधिकारी आहात. तर सर्वजण खुश आहात का? हां, तुम्हा येणाऱ्यांना विचारत आहेत, म्हणण्यात येते पाहुणे परंतु पाहुणे नाही आहात, महान बनून महान बनविणारे आहात. तर विचारा खुश आहात? खुश असाल तर हात हलवा. सर्व खुश आहेत, आता जाऊन काय करणार? खुशी वाटणार ना! सर्वांना भरपूर खुशी वाटा. जितकी वाटाल तितकी वाढेल, ठीक आहे. अच्छा - खूप टाळ्या वाजवा. (सर्वांनी खूप टाळ्या वाजवल्या) जशी आत्ता टाळी वाजवली, तशा सदैव खुशीच्या टाळ्या अटोमॅटिक वाजत रहाव्यात. अच्छा.

बापदादा नेहमी टीचर्सना म्हणतात, टीचर्स अर्थात ज्यांच्या फीचर्समधून फ्युचर दिसून येते. अशा टीचर्स आहात ना! तुम्हाला पाहून स्वर्गीय सुखाची फिलिंग यावी. शांतीची अनुभूती व्हावी. चालता-फिरता फरिश्ता दिसून यावा. अशा टीचर्स आहात ना! छान आहे, भले प्रवृत्तीमध्ये राहणारे आहेत, किंवा सेवेच्या निमित्त बनलेले आहेत परंतु सर्वजण बापदादा समान बनणारे निश्चय-बुद्धी विजयी आहेत. अच्छा.

चोहो बाजूंचे साकार रूपामध्ये समोर आहेत, किंवा दूर बसूनही हृदयाच्या जवळ आहेत, अशा सदा श्रेष्ठ भाग्यवान आत्म्यांना, सदैव निमित्त बनून निर्माणचे कार्य सफल करणाऱ्या विशेष आत्म्यांना, सदैव बाप समान बनण्याच्या उमंग-उत्साहामध्ये पुढे जाणाऱ्या हिंमतवान मुलांना, सदैव प्रत्येक पावलामध्ये पद्मांची कमाई जमा करणाऱ्या वर्ल्डमध्ये खूप-खूप पद्मगुणा धनवान, भरपूर आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

डबल विदेशी निमित्त मोठ्या बहिणींसोबत संवाद:- सेवेचा चांगला पुरावा देत आहात. यामुळेच आवाज पसरेल. अनुभव ऐकविल्याने इतरांचा देखील अनुभव वाढतो. तर बापदादा खुश आहेत, फॉरेनच्या सेवेमध्ये निमित्त बनणारे छान उमंग-उत्साहाने सेवेमध्ये बिझी राहतात. देशातून गेला आहात परंतु विदेशवाल्यांची सेवा अशीच निमित्त बनून करत आहात जणू काही तिथलेच आहात. आपलेपणाची भासना देता. आणि सर्व ठिकाणचे आहेत, एकाच ठिकाणचे नाहीत, लंडनचे अथवा अमेरिकेचे नाहीत, बेहद सेवाधारी आहेत. जबाबदारी तर विश्वाची आहे ना. तर बापदादा मुबारक देत आहेत. करत आहात, पुढे अजून चांगल्यात चांगले उडत रहाल आणि उडवत रहाल. अच्छा.

पर्सनल संवाद :- सर्वजण होली आणि हॅपी हंस आहात. हंसाचे काम काय असते? हंसामध्ये निर्णय शक्ति खूप असते. तर तुम्ही देखील होली हॅपी हंस व्यर्थला समाप्त करणारे आणि समर्थ बनून समर्थ बनविणारे आहात. सर्वजण एव्हर हॅपी आहात? एव्हर-एव्हर हॅपी. आता कधी दुःखाला येऊ देऊ नका. दुःखाला सोडचिठ्ठी दिली, तेव्हाच तर दुसऱ्यांचे दुःख निवारण कराल ना! तर सुखी रहायचे आहे आणि सुख द्यायचे आहे. एवढे काम कराल ना! इथून जे सुख मिळाले आहे ते जमा ठेवा. कधीही काहीही झाले ना तर – ‘बाबा, गोड बाबा, दुःख घ्या’; स्वतः जवळ ठेवायचे नाही. खराब वस्तू कधी ठेवून घेतली जाते काय? तर दुःख खराब आहे ना! तर दुःख काढून टाका, सुखी रहा. तर हा आहे सुखी ग्रुप आणि सुखदाई ग्रुप. चालता-फिरता सुख देत रहा. किती तुम्हाला दुवा मिळतील. तर हा ग्रुप ब्लेसिंग्जच्या पात्र (आशीर्वादास पात्र) आहे. तर सर्वजण खुश आहात ना! आता हसा बरे. बस्स, हसत रहा. आनंदाने नाचा. अच्छा.

वरदान:-
आठवण आणि सेवेच्या बॅलन्स द्वारे चढत्या कलेचा अनुभव करणारे राज्य अधिकारी भव

आठवण आणि सेवेचा बॅलन्स असेल तर प्रत्येक पावलामध्ये चढत्या कलेचा अनुभव करत रहाल. प्रत्येक संकल्पामध्ये सेवा असेल तर व्यर्थ पासून मुक्त व्हाल. सेवा जीवनाचे एक अंग बनावे, जसे शरीरामध्ये सर्व अंग जरुरी आहेत तसे ब्राह्मण जीवनाचे विशेष अंग - ‘सेवा’ आहे. सेवेचा खूप चांस मिळणे, स्थान मिळणे, संग मिळणे ही देखील भाग्याची निशाणी आहे. असा सेवेचा गोल्डन चान्स घेणारेच राज्य अधिकारी बनतात.

सुविचार:-
परमात्म प्रेमाच्या पालनेचे स्वरूप आहे - सहजयोगी जीवन.

अव्यक्त इशारे - रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:-

पवित्रता तुम्हा ब्राह्मणांचा सर्वात मोठ्यात-मोठा शृंगार आहे, संपूर्ण पवित्रता तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्यात-मोठी प्रॉपर्टी आहे, रॉयल्टी आणि पर्सनॅलिटी आहे, याला धारण करून एव्हररेडी बना तर प्रकृति आपले काम सुरू करेल. प्युरिटीच्या पर्सनॅलिटीने संपन्न असणाऱ्या रॉयल आत्म्यांना सभ्यतेची देवी म्हटले जाते.