04-05-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो -
निश्चय बुद्धी बनून बाबांच्या प्रत्येक आज्ञेनुसार चालत राहा, आज्ञेनुसार
चालल्यानेच श्रेष्ठ बनाल”
प्रश्न:-
कोणत्या
मुलांना खरे-खुरे खुदाई खिदमतगार (ईश्वरीय सेवाधारी) म्हणता येईल?
उत्तर:-
जे राजाई
प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करतात आणि इतरांना देखील आप समान बनवितात. अशी ईश्वरीय
सेवेवर राहणारी मुले खरे-खुरे खुदाई खिदमतगार आहेत. त्यांना पाहून इतरही सहयोगी
बनतात.
ओम शांती।
तुम्ही जेव्हा इथे बसता तर सर्वांना सांगायचे आहे की, शिवबाबांची आठवण करा. हे तर
तुम्ही जाणता शिवबाबा आहेत, त्यांच्या मंदिरामध्ये देखील जातात परंतु हे तुम्हा
मुलांव्यतिरिक्त इतर कोणालाच ठाऊक नाही की शिवबाबा कोण आहेत. तर शिवबाबांची आठवण
करून द्यायची आहे. इथे बसलेल्या कितीतरी जणांचा बुद्धियोग कुठे-कुठे भटकत राहील
म्हणून तुमचे कर्तव्य आहे आठवण करून देणे. भाऊ आणि बहिणींनो बाबांची आठवण करा, ज्या
बाबांकडून वारसा मिळणार आहे. तुम्ही आता खरे भाऊ-बहिणी आहात. ते तर फक्त मेल,
फिमेलच्या कारणाने भाऊ-बहिण म्हणतात. लेक्चर्स मध्ये देखील असे म्हणतील - ब्रदर्स
अँड सिस्टर्स. ते आहेत भाऊ-बहिणी शरीराच्या नात्याने. इथे ती गोष्ट नाहीये. इथे तर
आत्म्यांना सांगितले जाते की, आपल्या रचयिता बाबांची आठवण करा, त्यांच्याकडून वारसा
मिळणार आहे. फरक आहे ना. ‘भाऊ-बहिण’ शब्द तर कॉमन आहे. इथे बाबा मुलांना सांगतात -
मज पित्याची आठवण करा. ते शिवबाबा आहेत रुहानी पिता आणि प्रजापिता ब्रह्मा आहेत
देहधारी पिता. तर बाप-दादा दोघेही म्हणतात - मुलांनो, बाबांची आठवण करा, इतर कुठेही
बुद्धीचा योग जाऊ नये. बुद्धी खूप भटकते. भक्तीमार्गामध्ये देखील असेच होते.
श्रीकृष्णासमोर किंवा इतर कोणत्याही देवतेसमोर बसतात, माळेचा जप करतात. बुद्धी
कुठे-कुठे पळत राहते. देवता कोण आहेत? त्यांना ही राजाई कशी मिळाली, कधी मिळाली! हे
कोणालाच माहित नाही आहे. शिख धर्माचे लोक जाणतात की, गुरुनानकांनी शिख पंथ स्थापन
केला. मग त्यांचे गुरु नातवंडे येत राहतात. ते पुनर्जन्मामध्ये येत राहतात, या
गोष्टी कोणीच जाणत नाहीत. नेहमी थोडेच गुरुनानकची आठवण करतील. ठीक आहे, समजा, गुरु
नानकना अथवा बुद्धाला किंवा इतर कोणत्याही आपल्या धर्म स्थापकाची आठवण करतात परंतु
हे कोणाला थोडेच माहित आहे की ते आता कुठे आहेत. ते तर म्हणतात - ज्योत ज्योतीमध्ये
विलीन झाली. वाणी पासून दूर निघून गेले किंवा असे म्हणतात की, श्रीकृष्ण
हाजिरा-हजूर आहे, जिकडे पहावे तिकडे कृष्णच कृष्ण आहे. राधेच राधे आहे. असे म्हणत
राहतात. बाबा बसून समजावून सांगत आहेत - तुम्ही भारतवासी देवता होता. तुमची सूरत (चेहरा)
मनुष्याचा, सिरत (वर्तन) देवतांप्रमाणे होते. देवतांची चित्रे तर आहेत ना. चित्रे
नसती तर हे देखील समजले नसते. राधे-कृष्णा सोबत मग लक्ष्मी-नारायणाचा काय संबंध आहे,
हे बाबा येऊन समजावून सांगतात. तुम्ही कोणालाही समजावून सांगू शकता - हे तर निराकार
बाबा आम्हाला सांगत आहेत. वास्तविक निराकार सगळेच आहेत. आत्मा निराकार आहे, मग या
साकार द्वारे (ब्रह्मा द्वारे) बोलते. निराकार तर बोलू शकत नाही. तुम्ही समजावून
सांगू शकता - आमचे बाबा तेच तुमचेही बाबा आहेत. शिवबाबा ज्ञानाचा सागर, शांतीचा
सागर आहेत. बेहदचे पिता आहेत. त्यांना देखील शरीर तर पाहिजे ना. स्वतः म्हणतात - मी
या ब्रह्माच्या तनामध्ये येतो, तेव्हाच तर ब्राह्मण धर्माची स्थापना होईल. ब्रह्मा
द्वारे रचना होते ब्राह्मणांची. तर बाबा ब्राह्मण मुलांनाच समजावून सांगतात, इतर
कोणालाच सांगत नाहीत, मुलांनाच समजावून सांगतात. असे नाही की आपण शिवबाबांची मुले
आहोत म्हणून आपणही भगवान आहोत, नाही. पिता, पिता आहे मुले, मुले आहेत. हो, जेव्हा
मुलगा मोठा होईल, पिता बनेल, मुलांना जन्म देईल तेव्हा त्याला पिता म्हटले जाईल.
यांची तर असंख्य मुले आहेत ना, मुलांनाच समजावून सांगतात. जे निश्चय बुद्धी आहेत,
निश्चय बुद्धी असणारे बाबांच्या आज्ञेनुसार चालतील कारण श्रीमता द्वारेच श्रेष्ठ बनू
शकतात.
आता तुम्ही जाणता आपण
त्या देवतां प्रमाणे बनत आहोत. जन्म-जन्मांतर आपण देवतांची महिमा करत आलो आहोत. आता
आपल्याला श्रीमतावर असे बनायचे आहे, राजाई स्थापन होणार आहे. सगळेच काही पूर्ण
रीतीने श्रीमतावर चालणार नाहीत, नंबरवार चालतील कारण खूप मोठी राजाई आहे. राजाईमध्ये
प्रजा, नोकर-चाकर, चांडाळ इत्यादी सर्व पाहिजेत. असे वर्तन असणाऱ्यांचा देखील
साक्षात्कार होईल की हे चांडाळ फॅमिलीमध्ये जातील. चांडाळ काही एकच तर नसेल ना,
त्यांची देखील फॅमिली असेल. चांडाळांची देखील युनियन (संघटना) असते. सर्वजण एकत्र
भेटतात. स्ट्राइक इत्यादी करतात तर सर्व काम सोडून देतात. सतयुगामध्ये तर अशा गोष्टी
घडत नाहीत. तुमचे एक चित्र देखील आहे, ज्याच्यावर तुम्ही विचारता की, तुम्ही काय बनू
इच्छिता - बॅरिस्टर बनणार की देवता बनणार? तुमची सारी राजधानी स्थापन होत आहे, कमी
थोडेच आहे. बेहदचे बाबा, बेहदच्या गोष्टी बसवून सांगत आहेत. हे बुद्धीमध्ये पक्के
झाले पाहिजे. आपण भविष्याकरिता पुरुषार्थ करून उच्च पद प्राप्त करणार. श्रीमतावर
आपण श्रेष्ठ ते श्रेष्ठ राजाई पद प्राप्त करणार आणि मग इतरांना जेव्हा आप समान
बनवाल तेव्हा म्हटले जाईल - खुदाई खिदमतगार. कोणाचेही काहीच लपून राहू शकत नाही.
पुढे चालून सर्व माहीत होईल. यालाच ज्ञानाचा प्रकाश म्हटले जाते, प्रकाश मिळत जातो.
मनुष्यांना काही माहित थोडेच होते. बॉम्ब्स देखील लपवून बनवत राहतात. कोणतीही वस्तू
ठेवण्याकरिता थोडीच बनवली जाते. सुरुवातीला तलवारीने लढाई केली जाते, नंतर मग बंदूक
बनवली, उपयोगामध्ये आणण्यासाठी, ठेवण्यासाठी नाही. समजतात देखील याने मृत्यू होईल.
ट्रायल तर केली आहे ना. हिरोशिमामध्ये एका बॉम्बने कित्ती मेले होते, त्याच्या नंतर
पहा पुन्हा किती प्रगती केली आहे, किती असंख्य घरे बनवली आहेत. आता असा विनाश होणार
नाही ज्यामध्ये हॉस्पिटलमध्ये पडून राहावे लागेल. हॉस्पिटल इत्यादी तर काहीच राहणार
नाही, म्हणून भूकंप इत्यादी सर्व एकत्र एकाचवेळी होईल. प्राकृतिक संकटांना कोणीही
थांबवू शकत नाही. म्हणतात देखील - हे सर्व ईश्वराच्या हातामध्ये आहे. आता तुम्ही
मुले समजता - विनाश तर होणारच आहे, दुष्काळ पडणारच आहे, पाणी सुद्धा मिळणार नाही…
ते तर तुम्हीच जाणता. काही नवीन गोष्ट नाहीये. कल्पापूर्वी देखील असेच झाले होते.
कल्पा विषयीचे ज्ञान तर कोणालाच नाहीये. म्हणतात देखील क्राईस्टच्या ३ हजार
वर्षांपूर्वी पॅराडाईज होता. मग शास्त्रांमध्ये कल्पाचा कालावधी लाखो वर्षे लिहिला
आहे. कोणाचेच लक्ष जात नाही, ऐकून मग आपल्या धंदा इत्यादी मध्ये व्यस्त होतात. तर
आता बाबा मुलांना सांगत आहेत - आता लवकर-लवकर पुरुषार्थ करा. आठवणीमध्ये रहा तर
भेसळ निघत जाईल. तुम्हाला इथेच सतोप्रधान बनायचे आहे. नाही तर सजा खाऊन मग
आपल्या-आपल्या धर्मामध्ये निघून जातील. श्रीमत भगवंताचे मिळते. श्रीकृष्ण तर
राजकुमार आहे, तो कसले कोणाला मत देणार! या गोष्टींना दुनियेमध्ये कोणीही जाणत नाही.
प्रेमाने समजावून सांगायचे आहे की, शिवबाबांची आठवण करा. शिवबाबा स्वतः म्हणतात की,
मामेकम् (मज एकाची) आठवण करा. ते देखील कल्याणकारी आहेत. इतर सर्व संग तोडून एकाशी
संग जोडायचा आहे. तुम्ही आहात भारताचा बेडा (भारताची जीवन नौका) पार करणारे.
सत्यनारायणाची कथा देखील भारताशीच संबंधित आहे. इतर धर्माचे कधी सत्यनारायणाची कथा
ऐकणार नाहीत. ही कथा तेच ऐकतील, जे नरापासून नारायण बनणारे, आदि सनातन देवी-देवता
धर्माचे असतील. तेच अमर कथा ऐकतील. अमरलोकमध्ये देवी-देवता होते तर जरूर अमरलोकमध्ये
अमरकथे द्वारेच हे पद प्राप्त केले असेल. एक-एक गोष्ट आठवण करण्यालायक आहे. एक जरी
गोष्ट बुद्धीमध्ये चांगल्या रीतीने पक्की झाली तर सर्व काही लक्षात येईल. बाबांची
आठवण करायची आहे आणि स्वदर्शन-चक्र लक्षात ठेवायचे आहे. शिवबाबांसोबत इथे पार्ट
बजावत आहोत, मग घरी जायचे आहे.
बाबाच समजावून
सांगतात - खरे काय आहे, खोटे काय आहे. सत्य एकच आहे बाकी सर्व आहे खोटे. लंकेमध्ये
रावण होता, एकाचीच गोष्ट आहे काय! सतयुग-त्रेतामध्ये तर अशा गोष्टी असत नाहीत. ही
सगळी मनुष्यांची दुनिया लंका आहे, हे आहेच मुळी रावण राज्य. सर्व सीता एका रामाचीच
आठवण करतात अथवा सर्व भक्तीणी, सजणी एक भगवान, साजनची आठवण करतात कारण रावण राज्य
आहे. संन्याशी या गोष्टींना समजू शकत नाहीत. सर्व दुःखी आहेत, शोकवाटीकेमध्ये आहेत,
शोकवाटिका आहे कलियुग. अशोक-वाटिका आहे - सतयुग. इथे तर पावला-पावलावर शोक आहे,
दुःख आहे. तुम्हाला बाबा, अशोक स्वर्गामध्ये घेऊन जातात. इथे तर मनुष्य किती शोक
करतात. कोणाचा मृत्यू झाला तर जसे वेडे होतात. स्वर्गामध्ये तर या सर्व गोष्टी असत
नाहीत. अकाली मृत्यू कधीही होत नाही, ज्यामुळे पत्नी विधवा बनेल, तिथे तर वेळेवर एक
वस्त्र (शरीर) सोडून दुसरे घेतात. मेल अथवा फिमेलचे शरीर घेतील, तर तो साक्षात्कार
होईल. अखेरीला सर्व काही माहीत होईल. कोण-कोण काय बनतील. मग त्यावेळी म्हणतील आम्ही
इतका वेळ मेहनत केली नाही. परंतु त्यावेळी म्हणून काय उपयोग? वेळ तर निघून गेली ना,
म्हणून बाबा म्हणतात - मुलांनो, मेहनत करा, सेवेमध्ये खरे राईट हॅन्ड बना तेव्हाच
राजाईमध्ये याल. सेवेमध्ये बिझी रहा. उदाहरण देखील आहे ना, कशी कुटुंबच्या कुटुंब
सेवेमध्ये गुंतली आहेत. तर असे म्हणणार की, या कुटुंबाने अशी चांगली कर्म केलेली
आहेत ज्यामुळे सर्वांनी स्वतःला ईश्वरीय सेवेमध्ये वाहून घेतले आहे. आई-वडील, मुले
हे तर चांगले आहे ना. सेवेच्या मागे फेऱ्या मारत राहतात. तुम्हा मुलांना खूप आनंद
झाला पाहिजे की, कसे आपण लोकांना रस्ता सांगावा, ज्यामुळे त्यांची आत्मा खुश होईल.
अनेकांना रस्ता सांगत रहा. ही तुम्ही प्रजा बनवली आहे, बीज पेरले ना. जमते जाम (जन्मतःच
राजा) तर कोणी असत नाही. पहिले प्रजेचे अधिकारी असतात नंतर मग पुरुषार्थ करत-करत
काहीही बनू शकतात (अजून उच्च पद घेऊ शकतात). तुम्हाला सेवा करताना पाहून इतरांना
देखील उमंग-उत्साह येईल की, आपण देखील का नाही असा पुरुषार्थ करावा. नाही तर मग
कल्प-कल्प अशीच हालत होईल. पुष्कळ जण येतील आणि पश्चात्ताप करतील. त्यावेळसारखे
दुःख मनुष्य पूर्ण आयुष्यामध्ये कधीच अनुभवत नाही. श्रीमतावर न चालल्या कारणामुळे
अखेरीला इतके दुःख भोगतील, काही विचारू नका, कारण अनेक विकर्म केलेली आहेत. बाबा
रस्ता देखील खूप सोपा सांगत आहेत फक्त बाबांची आठवण करायची आहे. इतरांना देखील हा
रस्ता सांगायचा आहे.
तुम्ही देवी-देवता
धर्माचे होता, जसे ख्रिश्चन धर्माचे मनुष्य, इस्लामी धर्माचे मनुष्य आहेत, तसेच हे
आहेत. हे आहेत सर्वात पवित्र. यांच्या धर्मासारखा दुसरा कोणताच धर्म असू शकत नाही,
अर्धाकल्प तुम्ही पवित्र राहता. स्वर्ग आणि नरक गायला गेला आहे. हेवन कशाला म्हटले
जाते, हे देखील कोणाला माहित नाही आहे. बाबा भारतामध्येच येऊन मुलांना जागे करतात.
५ हजार वर्षांची गोष्ट आहे. जे स्वर्गवासी होते तेच आता नरकवासी बनले आहेत; मग बाबा
येऊन पावन स्वर्गवासी बनवितात. एक साजन येऊन सर्व सजणींना आपल्या अशोक वाटिकेमध्ये
घेऊन जातात. तर सर्वात पहिले सर्वांना हे सांगा की, बाबांची आठवण करा. नाही तर इथे
बसल्या बसल्या बुद्धी कुठे-कुठे भटकत राहते. भक्तिमार्गामध्ये देखील हीच हालत होते.
बाबा अनुभवी तर आहेत ना. सर्वात उत्तम धंदा सोनाराचा असतो. त्यामध्ये खरे आणि खोटे
ओळखणे खूप कठीण असते. इथे देखील खरे लपलेले आहे, खोटेच खोटे चालत राहते. हे देखील
ड्रामा मध्ये नोंदलेले आहे. तुम्ही जाणता - आपण सर्व ड्रामातील ॲक्टर्स आहोत, यातून
कोणीही बाहेर जाऊ शकत नाही. कोणालाही मोक्ष मिळू शकत नाही. विवेक-बुद्धीचा वापर
करायचा असतो. पार्ट अनुसार चालतच राहतात आणि कल्पा नंतर मग पुन्हा तोच पार्ट रिपीट
करतील. तुम्ही पाहाल की, कशी माणसे मरतात, विनाश होणारच आहे. सर्व आत्मे
निर्वाणधामला निघून जातील. हे बुद्धीमध्ये ज्ञान आहे. सेवेमध्ये गुंतून राहिल्याने
अनेकांचे कल्याण होईल. सगळा परिवारच जर या ज्ञानामध्ये चालू लागेल तर ते एक खूप मोठे
आश्चर्यच ठरेल. अच्छा.
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) अंतिम
काळातील वेदनादायक दृश्यांपासून अथवा दुःखा पासून सुटका होण्यासाठी आतापासूनच
बाबांच्या श्रीमतावर चालायचे आहे. आप समान बनविण्याची सेवा श्रीमतानुसार करायची आहे.
२)सेवेमध्ये बाबांचा
राईट हॅन्ड बनायचे आहे. आत्म्याला खुश करण्याचा रस्ता सांगायचा आहे. सर्वांचे
कल्याण करायचे आहे.
वरदान:-
आपल्याच
संकल्पांच्या गोंधळापासून दूर अथवा सजेपासून देखील दूर राहणारे पास विद् ऑनर भव
पास विद् ऑनर अर्थात
संकल्पांद्वारे मनामध्ये देखील सजा न भोगणे. धर्मराजाच्या सजेची गोष्ट तर नंतरची आहे,
परंतु आपल्या संकल्पांच्या गोंधळापासून देखील दूर अथवा सजे पासून दूर राहणे - ही
पास विद् ऑनर होणाऱ्यांची निशाणी आहे. वाणी, कर्म, संबंध-संपर्काची गोष्ट तर मोठी
आहे, परंतु संकल्पांमध्ये देखील गोंधळ उत्पन्न होऊ नये, अशी प्रतिज्ञा करा तेव्हाच
पास विद् ऑनर बनाल.
बोधवाक्य:-
ज्ञानाचे घृत
आणि योगाची वात ठीक असेल तर आनंदाचा दीपक तेवत राहील.
हे अव्यक्त इशारे -
सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.
दुनियेमधील कोणत्याही
प्रकारची खळबळ अचल-अडोल स्थितीमध्ये विघ्न आणू नये. असे विघ्न-विनाशक अचल-अडोल बनून
प्रत्येक विघ्नाला पार करा, जणूकाही हे विघ्न नाही परंतु एक खेळ आहे. पर्वत राई
समान अनुभव व्हावा कारण नॉलेजफुल आत्मे आधीपासूनच जाणतात की ही सर्व विघ्ने तर
येणारच आहेत, हे होणारच आहे.