04-06-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो - तुम्ही
पारलौकिक पित्याला यथार्थ रीतीने जाणता म्हणून तुम्हालाच खरे प्रीत-बुद्धी अथवा
आस्तिक म्हटले जाईल”
प्रश्न:-
बाबांच्या
कोणत्या कर्तव्याने हे सिद्ध होते की ते भक्तांचे रक्षक आहेत?
उत्तर:-
सर्व भक्तांना
रावणाच्या जेलमधून सोडविणे, इनसॉल्व्हेंट पासून सॉल्व्हेंट बनविणे (पतितापासून पावन
बनविणे), हे एका बाबांचेच कर्तव्य आहे. जे जुने भक्त आहेत त्यांना ब्राह्मण बनवून
देवता बनविणे - हेच त्यांचे रक्षण करणे आहे. भक्तांचे रक्षक आले आहेत - आपल्या सर्व
भक्तांना मुक्ती-जीवनमुक्ती देण्याकरिता.
गीत:-
भोलेनाथ से
निराला…
ओम शांती।
मुलांनी ही
कोणाची महिमा ऐकली? गायले जाते उच्च ते उच्च भगवान आणि भगवंतालाच पिता म्हटले जाते.
तेच या सगळ्या रचनेचे रचयिता आहेत. जसे लौकिक पिता देखील रचयिता आहेत आपल्या रचनेचे.
सर्वप्रथम कन्येला आपली पत्नी बनवतात आणि मग तिच्या पासून रचना रचतात. ५-७ मुलांना
जन्म देतात. त्यांना म्हटले जाईल रचना. पिता झाला रचयिता. ते हदचे रचयिता झाले. हे
देखील मुले जाणतात की, रचनेला रचयिता बाबांकडून वारसा मिळतो. मनुष्याला दोन पिता तर
असतातच - एक लौकिक, दुसरा पारलौकिक. मुलांना समजावून सांगितले आहे - ज्ञान आणि भक्ती
वेगवेगळे आहे, नंतर मग आहे वैराग्य. यावेळी तुम्ही मुले संगमावर बसले आहात आणि
बाकीचे सर्वजण कलियुगामध्ये बसलेले आहेत. आहेत तर सर्व मुलेच परंतु तुम्ही बेहदच्या
बाबांना जाणले आहे जे साऱ्या रचनेचे रचयिता आहेत. लौकिक पिता असताना देखील त्या
पारलौकिक पित्याची आठवण करतात. सतयुगामध्ये लौकिक पिता असताना पारलौकिक पित्याची
कोणीही आठवण करत नाहीत कारण ते आहेच सुखधाम. त्या पारलौकिक पित्याला दुःख-धाममध्ये
असतानाच आठवण करतात. इथे शिकवले जाते, मनुष्याला हुशार बनविले जाते.
भक्तिमार्गामध्ये मनुष्य पारलौकिक पित्याला देखील जाणत नाहीत. म्हणतात देखील -
परमपिता परमात्मा, हे गॉड फादर, हे दुःख-हर्ता, सुख-कर्ता. आणि मग म्हणतात -
सर्वव्यापी. दगडामध्ये, कुत्र्या-मांजरामध्ये सर्वांमध्ये आहेत. परमात्मा पित्याला
शिव्या देऊ लागतात.
तुम्ही बाबांचे बनले
आहात तर तुम्ही झालात आस्तिक. तुमची बाबांच्या सोबत प्रीत-बुद्धी आहे. बाकी सर्वांची
बाबांसोबत विपरीत-बुद्धी आहे. आता तुम्ही जाणता महाभारी लढाई देखील समोर उभी आहे.
जुन्या दुनियेच्या विनाशा निमित्त दर ५ हजार वर्षानंतर कलियुगी पतित दुनिया पूर्णपणे
नष्ट होऊन मग सतयुगी पावन दुनिया स्थापन होते, बाबां द्वारे. ज्यांची - ‘हे
पतित-पावन या’, ‘हे खिवैया आम्हाला या विषय सागरातून काढून क्षीर सागरामध्ये घेऊन
जा’, असे म्हणून आठवण करतात. गांधीजी देखील गात असत - ‘पतित-पावन सीताराम…’ हे राम
सर्व सीतांना पावन बनवा. तुम्ही सर्व आहात - सीता, भक्तिणी. ते आहेत भगवान, सर्वजण
त्यांना बोलावतात. ते तुम्हाला पतितापासून पावन बनवत आहेत. तुम्हाला कुठेही खस्ता
खायला लावत नाहीत. असे म्हणत नाहीत की, तीर्थ-यात्रेवर जा, कुंभच्या मेळ्याला जा.
नाही. या नद्या काही पतित पावनी नाही आहेत. पतित-पावन एक ज्ञानाचा सागर बाबाच आहेत.
सागर अथवा नद्यांची कोणी आठवण करत नाही. बोलावतात बाबांना, ‘हे पतित-पावन बाबा
आम्हाला पावन बनवा’. बाकी पाण्याच्या नद्या तर साऱ्या दुनियेमध्ये आहेत, त्या
थोड्याच पतित-पावनी आहेत. पतित-पावन एका बाबांनाच म्हटले जाते. ते जेव्हा येतील
तेव्हा येऊन पावन बनवतील. भारताची महिमा खूप जबरदस्त आहे. भारत सर्व धर्मांचे
तीर्थस्थान आहे. शिवजयंतीचे देखील इथेच गायन केले जाते. सतयुग तर आहे पावन दुनिया,
तिथे देवी-देवता राहतात. देवतांची महिमा गायली जाते - सर्वगुण संपन्न, १६ कला
संपूर्ण… चंद्रवंशीयांना १४ कला म्हणता येईल. मग शिडी खाली उतरतात (पतित बनतात).
बाबा येऊन सेकंदामध्ये शिडी चढवून शांतीधाम-सुखधाम मध्ये घेऊन जातात. मग पुन्हा ८४
चे चक्र फिरून शिडी खाली उतरतात. ८४ जन्म कोणीतरी जरूर घेतलेच असतील. मुख्य आहे
सर्वशास्त्रमई शिरोमणी गीता, ‘श्रीमत् भगवत’ अर्थात भगवंताने गायलेली आहे. परंतु
भगवान कोणाला म्हटले जाते हे पतित मनुष्य जाणत नाहीत. पतित-पावन सर्वांचे सद्गती
दाता एक निराकार शिवच आहेत परंतु ते कधी आले, हे कोणीही जाणत नाही. बाबा स्वतःच
येऊन आपला परिचय देतात. आता बघा हे मुलगे आणि मुली दोघेही त्यांना ‘बाबा’ म्हणत
आहेत. गायले देखील जाते - ‘तुम माता-पिता…’ हा राजयोग शिकल्याने तुम्हाला भरभरून
सुख मिळते. तुम्ही इथे येताच मुळी बेहदच्या बाबांकडून स्वर्गाचा २१ जन्मांचा वारसा
प्राप्त करण्याकरिता. आता शिव जयंती देखील भारतामध्येच साजरी केली जाते. रावण देखील
भारतामध्येच दाखवतात. परंतु काहीच अर्थ जाणत नाहीत. शिव आपले बेहदचे पिता आहेत, हे
एकही कोणी जाणत नाही फक्त शिवाची पूजा करत राहतात. जेव्हा संपूर्ण झाड तमोप्रधान
होते तेव्हा बाबा येतात. नवीन दुनियेमध्ये भारत स्वर्ग होता. भारतामध्येच सतयुग होते.
भारतामध्येच आता कलियुग आहे. बाबा समजावून सांगत आहेत - अगदी सुरुवातीला तुम्ही
स्वर्गाचे मालक होता. आता तुम्ही ८४ जन्म भोगून नरकवासी बनले आहात. आता मी तुम्हाला
राजयोग शिकवून मनुष्यापासून देवता, पतितापासून पावन बनवत आहे. भक्ती अर्थात
ब्रह्माची रात्र. ज्ञान अर्थात ब्रह्माचा दिवस. तुम्ही ब्रह्मा कुमार-कुमारी
दिवसामध्ये जाता अर्थात सतयुगामध्ये जाता. या जुन्या दुनियेला आता आग लागणार आहे,
खरोखर महाभारत लढाई आहे. बरोबर याच महाभारत लढाई नंतर भारत स्वर्ग बनतो. अनेक
धर्मांचा विनाश होऊन एका धर्माची स्थापना होते.
तुम्ही मुले बाबांचे
मददगार बनून आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करत आहात. तुम्ही स्वर्गाचे मालक
बनण्या लायक बनाल तेव्हा मग विनाश सुरू होईल. हा आहे शिवबाबांचा ज्ञान यज्ञ भले मग
त्यांना शिव म्हणा अथवा रुद्र म्हणा. ‘कृष्ण ज्ञान यज्ञ’, असे कधीही म्हटले जात नाही.
सतयुग-त्रेतामध्ये यज्ञ केला जात नाही. यज्ञ तेव्हा रचला जातो जेव्हा उपद्रव होतो (अशांती
पसरते). अन्नधान्याचा तुटवडा पडला किंवा लढाई सुरू झाली की मग शांती करिता यज्ञ
रचतात. तुम्ही मुले जाणता - विनाश झाल्या शिवाय भारत स्वर्ग बनू शकत नाही. भारत माता
शिवशक्ती सेना गायली गेली आहे. वंदन पवित्रतेलाच केले जाते. तुम्हा मातांना ‘वंदे
मातरम्’ म्हटले जाते कारण तुम्ही श्रीमतावर भारताला स्वर्ग बनवला आहे. आता बाबा
म्हणतात मृत्यू तर सर्वांच्या डोक्यावर उभा आहे म्हणून आता हा एक जन्म पवित्र बना
आणि बाबांची आठवण करा तर तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. आता तुम्ही
शूद्रापासून ब्राह्मण बनून मग देवता बनाल, या काही नवीन गोष्टी नाहीत. कल्प-कल्प दर
५ हजार वर्षानंतर हे चक्र फिरत राहते. नरकापासून स्वर्ग बनतो. पतित दुनियेमध्ये
मनुष्य जे काही कर्म करतात ते विकर्मच बनते. बाबा म्हणतात - ५ हजार वर्षांपूर्वी
देखील तुम्हाला कर्म-अकर्म-विकर्माची गति समजावून सांगितली होती. आता पुन्हा
तुम्हाला समजावून सांगत आहे - मी परमपिता परमात्मा निराकार तुमचा पिता आहे. हे शरीर,
ज्याचा मी आधार घेतला आहे, हे काही भगवान नाहीत. मनुष्याला देवता सुद्धा म्हटले जात
नाही. तर मग मनुष्याला भगवान कसे काय म्हणू शकता. बाबा समजावून सांगत आहेत, तुम्ही
८४ जन्म घेत-घेत शिडी खाली उतरत आला आहात (पतन होत आले आहे), परंतु वर कोणीही जाऊ
शकत नाही. सर्वजण पतित बनण्याचाच मार्ग सांगतात, स्वतः देखील पतित बनत जातात.
म्हणून बाबा म्हणतात - त्यांचा देखील उद्धार करण्यासाठी मला यावे लागते. हे आहे
रावणराज्य. तुम्ही आता रावण राज्यामधून बाहेर पडला आहात. हळू-हळू सर्वांनाच माहीत
होईल. ब्राह्मण बनल्या शिवाय शिवबाबांकडून वारसा घेऊ शकत नाही. पिता आहेतच दोन. एक
निराकारी पिता, एक साकारी पिता. वारसा मिळतो एक साकारी पित्याकडून साकारी मुलांना
आणि मग निराकारी बेहदच्या पित्याकडून बेहदचा वारसा मिळतो निराकारी आत्म्यांना. आता
तुम्ही मुले जाणता - गोड-गोड शिवबाबांकडून आम्ही २१ जन्मांकरिता सुखधामचा वारसा
घेण्यासाठी आलो आहोत. विश्वाचे मालक बनतो योगबलाने. कोणतेही शस्त्र इत्यादी नाही आहे.
बाबांशी योग लावून विकर्म विनाश करून विष्णु पुरीचे मालक बनतात. आता अमरलोक मध्ये
जाण्याकरिता अमर कथा ऐकत आहेत. तिथे कधीही अकाली मृत्यू होत नाही. दुःखाचे
नामोनिशाण सुद्धा नसते. तुम्ही मुले आला आहात श्रीमतावर चालून बेहदच्या पित्याद्वारे
श्रेष्ठ ते श्रेष्ठ देवी-देवता बनण्याकरिता. हे काही शास्त्रांमधले ज्ञान नाहीये.
दाखवतात की, विष्णूच्या नाभीतून ब्रह्मा निघाले. त्यांच्या हातामध्ये शास्त्रे
दाखविली आहेत. बाबा म्हणतात - ब्रह्मा द्वारे मी तुम्हाला संपूर्ण रचनेच्या
आदि-मध्य-अंताचे ज्ञान ऐकवत आहे. मीच ज्ञानाचा सागर आहे. गातात देखील - ‘ज्ञान
सूर्य प्रकटा… अज्ञान अंधेर विनाश’. सतयुगामध्ये अज्ञान असतच नाही. जेव्हा सचखंड
होता तेव्हा भारत हिऱ्या समान होता, हिरे-माणकांचे महाल बनवले जात होते. आतातर
लोकांना पुरेसे खायला सुद्धा मिळत नाही. आता इनसॉल्व्हेंट (पतित) विश्वाला मग
सॉल्व्हेंट (पावन) कोण बनवणार! हे बाबांचेच काम आहे. बाबांनाच दया येते.
म्हणतात, तुम्हाला
राजयोग शिकविण्याकरिता आलो आहे. नराला नारायण आणि नारीला लक्ष्मी बनवतो. भक्तांचे
रक्षक आहेतच मुळी बाबा. तुम्हाला रावणाच्या जेलमधून सोडवून सुखधाम मध्ये घेऊन जातो.
साऱ्या दुनियेमध्ये जे ब्राह्मण बनतील तेच देवता बनतील. ब्रह्माचे नाव देखील
प्रसिद्ध आहे - प्रजापिता ब्रह्मा. तुम्ही ब्राह्मण आहात सर्वात उत्तम. तुम्हीच
भारताची खरी रूहानी सेवा करत आहात. बाबांच्या आठवणीनेच विकर्म विनाश होतील.
पतितापासून पावन बनण्याचा दुसरा कोणताही पर्याय नाही. आठवणी द्वारेच भेसळ भस्म होईल.
सोनार लोक जाणतात की खरे सोने मग खोटे सोने कसे बनते. त्यामध्ये चांदी-तांबे-लोह
मिसळतात. तुम्ही देखील पहिले सतोप्रधान होता नंतर मग तुमच्यामध्ये भेसळ पडते,
तमोप्रधान बनला आहात. आता मग सतोप्रधान बनावे लागेल तेव्हाच सतयुगामध्ये जाऊ शकाल.
बाबा म्हणतात - कोणत्याही देहधारीची आठवण करू नका. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना
एका बाबांशिवाय इतर कोणाचीही आठवण करू नका तेव्हाच तुम्ही स्वर्गपुरीचे मालक बनाल.
स्वर्ग किंवा विष्णुपुरी होती, आता रावणपुरी आहे. पुन्हा विष्णुपुरी जरूर बनेल.
साधू-संत इत्यादी सर्वांचा उद्धार करण्या करिता येतो, तेव्हाच तर म्हटले जाते -
‘यदा यदा हि धर्मस्य…’ ही भारताचीच गोष्ट आहे. सर्वांचा सद्गती दाता मी एकच पिता
‘शिव’ आहे. शिव, रुद्र ही सर्व त्यांचीच नावे आहेत, अनेक नावे ठेवलेली आहेत. बाबा
म्हणतात - माझे खरे नाव तर एकच आहे - शिव. मी शिव आहे, तुम्ही शाळिग्राम मुले आहात.
तुम्ही अर्धा कल्प देह-अभिमानी होऊन राहिले आहात. आता देही-अभिमानी बना. एक बाबांना
जाणल्याने बाबां द्वारे तुम्ही सर्व काही जाणता. मास्टर ज्ञान सागर बनता. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) श्रीमतावर
चालून श्रेष्ठ ते श्रेष्ठ देवता बनायचे आहे. साऱ्या विश्वाची खरी-खरी रूहानी सेवा
करायची आहे. आदि सनातन देवी-देवता धर्माच्या स्थापनेमध्ये बाबांचे पूर्णपणे मदतगार
बनायचे आहे.
२) आत्म्याला खरे सोने
बनविण्याकरिता एका बाबांशिवाय इतर कोणत्याही देहधारीची आठवण करायची नाही. पारलौकिक
बाबांवर खरे-खरे प्रेम करायचे आहे.
वरदान:-
आत्मिक
उन्नतीच्या साधनाद्वारे सर्व परिस्थितींवर विजय प्राप्त करणारे अकालमूर्त भव
जसे शरीर निर्वाहासाठी
अनेक साधनांचा उपयोग करता तसे आत्मिक उन्नतीसाठी देखील साधनांचा उपयोग करा; यासाठी
नेहमी अकालमूर्त स्थितीमध्ये स्थित होण्याचा अभ्यास करा. जे स्वतःला अकालमूर्त (आत्मा)
समजून चालतात ते अकाली मृत्यूपासून, अकाल पासून (दुष्काळापासून), सर्व समस्यांपासून
वाचतात. मानसिक चिंता, मानसिक परिस्थितींना दूर करण्याकरिता फक्त आपल्या जुन्या
शरीराच्या भानाला नष्ट करत जा.
बोधवाक्य:-
कोणतीही गोष्ट
जो वारंवार फिल करतो तो फायनलमध्ये फेल होतो.
मातेश्वरीजींची अनमोल
महावाक्ये:-
“मनुष्य
साक्षात्कारामध्ये कसे जातात?”
हे जे
साक्षात्कारामध्ये जाणे होते तर याची फिलॉसॉफी देखील खूप सूक्ष्म आहे. या अंत:वाहक
शरीराने जाऊन फिरून येतात. जसे कोणी बाहेर फिरण्यासाठी जातात ना, तर असे होत नाही
की फिरायला गेला तर मेला, तो फिरून मग माघारी येईल ना. तर इथे देखील असेच आहे -
आत्मा या बॉडीतून निघून अंत:वाहक शरीराने फिरायला जाते, थोड्या वेळाकरिता त्याची
आत्मा उडणारा पक्षी आहे, हे देखील परमात्म्याचेच काम आहे जे त्याच्या दोरीला खेचून
दिव्यदृष्टी द्वारे त्याला साक्षात्कार घडवतात. जसे रात्रीचे आपण जेव्हा शरीरापासून
न्यारी आत्मा बनून सुखद अवस्थेमध्ये अथवा स्वप्नाच्या अवस्थेमध्ये जातो, तर त्याच
वेळी शरीर शांत होते, मग देह आणि देहाचे धर्म विसरून जातो. परंतु असे नाही की शरीर
मरून गेले, आणि जेव्हा जागे होतात, तेव्हा त्या रात्रीच्या स्वप्नातील अवस्थेचे
वर्णन करून सांगतात. अगदी तसेच परमात्म्या सोबत योग लावल्याने परमात्मा मग दिव्य
दृष्टीने आत्म्याला सैर करवतात (फिरवून आणतात). आणि जेव्हा ध्यानातून उठतात तर ते
पाहिलेला साक्षात्कार, मग वर्णन करून सांगतात की आम्ही हे पाहून आलो. ते स्वप्न तर
रजोगुणी, तमोगुणी देखील असते; परंतु हे ध्यान तर सतोगुणी अवस्था आहे. तर ध्यानामध्ये
काही शरीर मरत नाही, परंतु शरीराची भासना लुप्त होते. ज्याप्रमाणे क्लोरोफॉर्म
दिल्याने शरीराची शुध्द हरपून जाते. आता बघा, डॉक्टर जेव्हा कोणत्याही इंद्रियाला
डेड करतात (सुन्न करतात) तर इंजेक्शन लावून डेड करतात; परंतु इतर इंद्रिये तर चालू
असतात. तर ध्यान देखील अशाच प्रकारचे आहे की आत्मा उडून फिरून येते परंतु शरीर मरत
नाही. आता ही दोरी खेचण्याची स्मृती देखील परमात्म्यामध्येच आहे, ना की मनुष्य
आत्म्यामध्ये. अच्छा, ओम् शांती.
हे अव्यक्त इशारे -
सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्या नेचरला (स्वभावाला) सरळ बनवा, सहनशील बना.
नेहमी हर्षित
राहणाऱ्यांचे यादगार विष्णूचे रूप दाखवले आहे. विष्णू क्षीरसागरामध्ये आरामात
पहुडलेले आहेत, ज्ञानाचे चिंतन करून हर्षित होत आहेत. तर हर्षित राहण्याचे साधन आहे
- ज्ञानाचे चिंतन. जे जितके ज्ञानाचे चिंतन करतात तर तितकेच हर्षित राहतात. कोणतीही
परिस्थिती त्यांची हिंमत आणि उमंग-उत्साहाला कमी करू शकत नाही. ते सहनशीलतेच्या
शक्तीद्वारे प्रत्येक परिस्थितीला सहज पार करतात.